Puja Pune (India)

सहजयोग्यांशी हितगुज पुणे, २५ फेब्रुवारी १९७९

आता सगळी इथे सहजयोगी मंडळी जमलेली आहेत. त्यामुळे हितगुज आहे आणि भाषण नाही. हितगुज हा शब्द मराठी भाषेत इतका सुंदर आहे की जे हितकारी आहे, जे आत्म्याला हितकारी आहे ते सांगायचे. आणि पूर्वी असे म्हणत असत, की ‘सत्यं वदेत, प्रियं वदेत.’ यांची सांगड कशी घालायची? सत्य बोलायचे तर ते प्रिय होत नाही आणि प्रिय बोलायचे तर ते सत्यच असले पाहिजे असे नाही. याची सांगड बसायची म्हणजे फार कठीण काम. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा दुवा काढला आणि सांगितले, […]