Seminar in Dole Rahuri (India)

1979-0227 Seminar Dhule , Maharashtra 

[ 1 ]

ही पुण्यभूमी आहे.

राऊल बाई सारख्या योगिनी जिथे वास करतात, ती भूमी आम्हाला फार पूजनीय आहे. तसेच राहुरी चे धुमाळ साहेब जे आपल्या समोर आज भाषण देत होते, त्यांनीसुद्धा क्रांती घडवून आणलेली आहे खेड्यापाड्यातून. त्यांच्याबरोबर राहुरीहून अनेक सहजयोगी आलेले आहेत.  आणि एक एक हिऱ्यासारखे तासलेले सुंदर सहजयोगी आहेत. हे किती विद्वान आहेत आणि किती परमेश्वरतत्वाबद्दल जाणतात हे जर बघायचं असलं तर त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करून बघितली पाहिजे. सहजयोग म्हणजे सहज, […]