Seminar in Dole

Rahuri (India)

Feedback
Share

1979-0227 Seminar Dhule , Maharashtra 

[ 1 ]

ही पुण्यभूमी आहे.

राऊल बाई सारख्या योगिनी जिथे वास करतात, ती भूमी आम्हाला फार पूजनीय आहे. तसेच राहुरी चे धुमाळ साहेब जे आपल्या समोर आज भाषण देत होते, त्यांनीसुद्धा क्रांती घडवून आणलेली आहे खेड्यापाड्यातून. त्यांच्याबरोबर राहुरीहून अनेक सहजयोगी आलेले आहेत.  आणि एक एक हिऱ्यासारखे तासलेले सुंदर सहजयोगी आहेत. हे किती विद्वान आहेत आणि किती परमेश्वरतत्वाबद्दल जाणतात हे जर बघायचं असलं तर त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करून बघितली पाहिजे. सहजयोग म्हणजे सहज, सह म्हणजे आपल्याबरोबर, ज म्हणजे जन्मलेला. सहजयोग हा एक महायोग आहे. हा आपल्याबरोबर जन्मलेला आहे.

[ 2 ]

  असे हात करून बसा, कुंडलिनी जागृत व्हायची तर असे हात करून बसा साधे, टोप्या जरा काढा, काळे कारगोते असतील तर काढून घ्या, म्हणजे बरोबरच होईल ते काळे. काही गळ्यात माळाबीळा असतील तर काढून ठेवलेल्या बऱ्या, कारण त्याने रुकते, कुंडलिनी तिथे थांबते.  आता आपल्यामध्ये कुंडलिनी ही संस्था आहे असं अनादी काळापासून लोकांनी सांगितलेलं आहे. विशेष करून आदिशंकराचार्यानी, मार्केंडेयस्वामींनी त्याच्यावर विस्तारपूर्वक लिहिलेलं आहे. त्यानंतर कबीर, नानक यांनीसुद्धा याच्यावर विस्तारपूर्वक लिहिलेल आहे. ही तुमची आई आहे आणि आई हे फार पवित्र स्थान आहे. आता फ्रॉईड सारख्या घाणेरड्या माणसाने आपल्या आईशी घाणेरडा संबंध ठेऊन आणि फारच घाणेरडी स्थिती काढलेली आहे. आणि त्यामुळे आज पाश्चिमात्य देशामध्ये त्यांची जितकी हानी झालीये ती जाऊन बघावी आणि मग आश्चर्य वाटत कि ह्या राक्षसांनी, हिटलरनी तर नुसता लोकांचा शिरच्छेद केला पण याने सगळ्यांची ही कुंडलिनीच फिरवून टाकलेली आहे कारण कुंडलिनी ही आई आहे आणि ती पवित्र आई आहे. आईचं पवित्रपण भारतीय माणसाला सांगायला नको. जे लोक आईचं पवित्रपण जाणत नाही त्यांना सहजयोग लाभू शकत नाही. ते शक्यही नाहीये. कारण असेही लोक आम्ही पाहिलेत, भारतीय असूनसुद्धा कि ते पवित्रपणाला विसरलेले आहेत. पवित्रपणाचं महत्व ते विसरलेले आहेत, आणि स्वत:ला त्यांनी अश्या रस्त्यावर वाहून घेतलय कि जो सरळ destruction वर जातो, नाशाला जातो.

  ही शक्ती आपल्यामध्ये स्थित आहे, ती विराजते आणि ती असते असं अनेक लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आजकाल जे पुष्कळ से गुरु वगैरे निघालेले आहेत त्यांना काही इतिहास राहिलेला नाही. ते जे काही बोलतात ते सगळे अधांतरी आहे. स्व:ताचच काहीतरी टूम काढलेली आहे पैसे कमावण्यासाठी. त्याला काहीतरी इतिहास असायला पाहिजे. प्रत्येक घटना ही ऐतिहासिक असते. जशी उत्क्रांती आपण जर बघितली तर अमिबापासून मनुष्य होईस्तोवर त्याला एक हळू हळू एकेका टप्याने वर यावं लागलय तसाच सबंध जो इतिहास आध्यात्मिक जीवनाचा झालेला आहे ती सुद्धा एक घटना एका मार्गाला येऊन पोहोचवते. जर ही जिवंत प्रक्रिया आहे तर ज्या प्रमाणे एक बी, त्यातून मुळे निघतात, बुंधा निघतो, पाने निघतात, फुले होतात आणि मग त्याला फळे लागतात असे क्रमाने ते एक एक घडत जातं त्याच प्रमाणे आज जे काही अध्यात्मामध्ये आपण वाचलेल आहे, तुकाराम बुवा काय किंवा  ज्ञानेश्वर किंवा त्याच्याही आधीची जे लोक मोठे मोठे साधुसंत आपल्या देशात झालेले आहेत या साधुसंताना एक प्रकारे पुष्कळश्या गुरुलोकानी तिलांजली देऊन आम्हीच काय काहीतरी शिष्ट आहे म्हणून एक नवीन नवीन टूम काढून, आणि स्व:ताचा नुसता पैसे बनवण्याचा मार्ग आखलेला आहे.

   त्यात त्यांनी काहीही पापकर्म केली तरीही ती पापकर्म सुसंगतच त्यांना वाटतात आणि तस ते आपल्या बुद्धीने असा चमत्कार घडवून आणतात कि hypnosis च्या मुळे त्या गोष्ठी लोक्यांच्या डोक्यात बसतात आणि लोक ते मानू लागतात. या लोकांची स्थिती पुढे जाऊन, कालातंराने वेड्यासारखी पिसाटल्यासारखी होते आणि होणारच कारण जे सत्य आहे, जे खरं आहे, जे विद्यमान आहे ते मिळण्याचं साधन असायलाच पाहिजे. परमेश्वराने आपल्याला अमिबापासून आज मानव का केलं? कसं केलं? त्याने कोणती रचना आपल्यामध्ये केली, हे जे आपले आज व्यवहार चालले आहेत हे कोणत्या सूक्ष्मशक्ती मुळे चालतात, याबद्दल आपल्या शास्त्रामध्ये इतकंच  नव्हे पण इतर शास्त्रामध्ये याचं  पुष्कळसं अध्ययन झालेलं आहे. बाइबल मध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. कुराणामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. तसाच आपल्या सर्व शास्त्रांमध्ये सुद्धा याचा फारच विस्तारपूर्वक उल्लेख आहे. आणि प्रत्येक धर्मात एक गोष्ट लिहिलेली आहे कि तुम्ही आत्म्याशी ओळख करून घ्यायला पाहिजे. तुमचा परत जन्म झाला पाहिजे. तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे. जो पर्यंत तुमचा पुनर्जन्म होत नाही, त्या बाकीच्या सर्व गोष्टीना काहीही अर्थ लागत नाही.

[ 3 ] 

  डेन्ट म्हणून  एक फार मोठा शास्त्रज्ञ झाला आहे त्याने असं सांगितल कि जो पर्यंत तुम्हाला आत्मा आणि त्याचं द्वार मिळत नाही, तो पर्यंत तुम्ही कोणतही धर्मकार्य केलं तर, त्यात एखादया राक्षसालाच तुम्ही पूजित असाल तर तुमच्या लक्षात येंणार नाही.  कारण आत्म्या मुळेच संपूर्णत्वाला मनुष्य येतो आणि त्याचे डोळे उघडतात. म्हणजे असं कि आता इथे जर लाईट नव्हती तर तुम्ही जे काही पाहत होतात ते अंधारात आणि अंधारात तुम्हाला काहीही दिसत नव्हत तेव्हा जे काही मिळेल ते सत्य असं धरून तुम्ही चालत होतात. आत्मा हे अध्यात्म्याचे डोळे आहेत. ते उघडल्याशिवाय आपण आत्म्याबद्दल किंवा  परमात्म्याबद्द्दल काहीही जाणू शकत नाही. आता हे करताना आम्हाला काय केलं पाहिजे, त्याबद्दल आम्ही काय उपाययोजना केली पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे. एक सरळ माझा प्रश्न आहे कि तुम्ही अमिबाचे मानव झालात, तुम्ही काय केलत? किंवा एखाद्या फळाला विचारावं कि तू एका बी पासून फळ झालास तू काय केलस? कोणतीही जिवंत क्रिया ही आपोआप घडते. मानव कधीही कोणतंही  जिवंत कार्य करू शकत नाही जो पर्यंत तो आत्म्याशी संबंधित होत नाही. सगळं हे मेलेलं कार्य आहे. जर विटा आहेत तर त्या मेलेल्या आहेत त्याचं जर घर बांधलं, एखाद झाड जर कधी पडलं तर त्याचे जर तुम्ही बसायला एखादे बाक वगैरे केले तर हे सगळं मेलेलं कार्य आहे. हे जिवंत कार्य नाही आहे. जिवंत कार्य मनुष्य तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याच्यामध्ये आत्म्याचा प्रकाश प्रगट होतो.

[ 4 ]

  आता मी इथे आपल्याला कुंडलिनी विषयी सांगणार आहे त्याच्याबद्दल एक दोन मी प्रचीती आपल्याला सांगते. तुम्ही स्वत:च्या डोळ्यांनी कुंडलिनीचं स्पंदन बघू शकता. ही आमची ओळख आहे. मार्केडेयांनी याची ओळख दिली आहे आमची कि त्यांच्या पायावर कुंडलिनीचं स्पंदन होईल. इथे असे पुष्कळसे लोक आहेत कि ज्यांनी हे कुंडलिनीचं स्पंदन पाहिलेलं आहे. हजारो लोकांचं असं स्पंदन पाहिलेलं आहे. ही त्रिकोणाकार अस्थी मध्ये स्पंदते. आम्ही याच्या फिल्म्स सुद्धा घेतलेल्या आहे आणि लंडनला आज पुष्कळ लोकांच्या मध्ये हे कार्य होत आहे. हे स्पंदन तुम्ही वर चढताना सुद्धा बघू शकता. पण ज्या माणसामध्ये काहीच रुकावट नसते आणि जे लोक पवित्र साधे सरळ असे लोक असतात अश्या लोकांना कुंडलिनी कधी चढते तेही कळत नाही. एकदम निर्विचारिता येऊन त्याच्यानंतर ते हातातनं चैतन्य वाहू लागतं म्हणून माझं कार्य मी बहुतेक खेडेगावात करते शहरात मी कार्य करत नाही. कारण शहरात भामटे पुष्कळ आलेले आहेत. शहरातले लोक भामट्यांना भाळतात. त्यांना भामटे पाहिजेत, काहीतरी सर्कस पाहिजे. त्यांना सत्य नको. त्यांना कोणत्यातरी सर्कशीत आपणही उभं राहिलं पाहिजे असं वाटत. खेडेगावातला मनुष्य सरळ साधा, आणि परमेश्वरला जाणणारा त्याला आपण spiritual sensitivity म्हणतो किंवा आध्यात्मिक संवेदनशीलता म्हणतो ही असते. रामाच्या वेळेला , जेव्हा ते वनवासात गेले होते तेव्हा प्रत्येक गरिबांना आणि रस्त्यावरच्या सर्व लोकांना, जंगलातून फिरताना सुद्धा, त्यांना माहित होत कि हे श्री राम आहेत. आता आपण म्हणतो कि आपल्या इथे अष्टविनायक आहेत. अष्टविनायकांची भूमिका आहे, हे अष्टविनायक म्हणजे कोण? अष्टविनायक म्हणजे पृथ्वीतून निघालेली चैतन्य तत्वे आहेत. विनायक हे त्याचं एक प्रतिक आहे. हे सगळ्यात मोठं प्रतिक आहे. ते ओळखलं पाहिजे. ते पावित्र्याचं   प्रतिक आहे.

[ 5 ]

   परमेश्वराने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा गणेशाला निर्माण केलं पहिल्यांदा, पवित्रता निर्माण केली. पण गुरूंचा उलटा प्रकार असतो नेहमी. ते बरोबर पवित्रतेला नष्ट करून तिथे स्वैराचार करतात आणि तिथे भूत आणतात. म्हणजे समजा एखाद्या देवीचा फोटो असला तर त्या देवीसमोर काहीतरी स्वैराचार करायचा हा तांत्रिकपणा आहे. त्यामुळे देवीचं चित्त तिथनं हटते कारण घाणीकडे देवीच चित्त राहत नाही. तिला घाण पसंत होत नाही. तिला सुगंध पाहिजे. तिला फुलं पाहिजे. जगातलं जेवढं सौंदर्य आहे ते देवीला पाहिजे. तिला घाण पसंत होत नाही. व्यभिचार वगैरे असे घाणेरडे प्रकार तिला बघवत नाही. त्यात तिचं चित्त त्या जागेतून हटल्याबरोबर तिथे ते सैतानाचे  राज्य आणून घेतले आणि मग ते सैतानाचे  राज्य तिथे आल्यावर लोकांना भुरळ घालणं, त्यांना hypnotize करणं, त्यांच्याकडून पैसे काढणं, त्यांच्या पैश्यावर गमजा करणं म्हणजे इतकी दलित दशा आहे. इतकी ग्लानीची दशा आहे ती. अशा रीतीने हे गुरु लोक सुद्धा ठगवत असतात. पण त्याचा अर्थ असा नव्हे कि खरे गुरु जगात नाहीत. जगात अनेक खरे गुरु आजही आहेत. पण बहुतेक जंगलात दडून बसले आहेत. मला सुद्धा भेटायला येतात आणि सांगतात आई तुम्ही दहा बारा वर्ष मेहेनत करा मग आम्ही येतो. आजकाल जग भामट्यांच आहे, राक्षसांच आहे. हे राक्षस आजकाल आलेले आहेत आणि राक्षसांवरच लोक भाळलेले आहेत. त्यांना सत्य नको स्वत:चाच विनाश करण्याच्या मागे लोक लागलेत. त्यांना स्वत:चा विनाश दिसत नाही. अशा जगात आम्हाला यायचं नाही. आणि आम्हाला हे लोक क्रुसावर टांगतील किंवा आम्हाला हे लोक विष प्रयोग करतील तेव्हा आम्हाला यायचं नाही.

[ 6 ]

तेव्हा आज ही स्थिती सहजयोगाची जरी असली तरी मला फार आनंद वाटतो. या आजच्या आमच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यात अनेक लोक पार झालेत. एका क्षणात, एका क्षणात कुंडलिनी सटकन उठून ब्रह्मरंध्रालाछेदून गेली. आता हे आपल्या मध्ये आहे कि नाही, आता आमच्या इथे दोन डॉक्टर्स आहेत आणि असे अनेक डॉक्टर्स आमचे शिष्य लंडनला आहेत आणि आमचं फारच solid काम झालेलं आहे. परत आता medical sciences मध्ये माझं lecture आहे. मी स्वत:च medicine केलेलं आहे डॉक्टरांशी बोलयचं म्हणून. आणि लंडनला सुद्धा एका डॉक्टरच्या बायकोचा cancer ठीक केल्यामुळे त्या डॉक्टरांनी, स्वतः ते फार मोठे डॉक्टर आहे तिथले, डॉक्टरच्यामध्ये एक conference ठेवलेली आहे. तिथे ही सर्व गोष्ट पुढे येणार आहे. तर आपल्यामध्ये ज्या शक्त्या आहेत त्याचा संबंध परमेश्वराशी कसा लागतो ते मी आपल्याला सांगणार आहे.

[ 7 ]

  पहिला तर ऐतिहासिक संबंध मी आपल्याला सांगितला ते आज पर्यंत जे काही एक एक अनेक अवतार होत गेले, त्या अवताराचं आज फळ मिळण्याची वेळ आलेली आहे. आजकाल एक टूम निघालेली आहे कि प्रत्येक अवताराला काहीतरी शिष्टपणा करून, आपल्या डोक्याच्या किल्ल्या फिरवून लोकांना मुर्खात काढून आणि सगळ्यांचा अपमान करायचा आणि त्याला आम्हीसुद्धा अगदी शिष्टासारखे संमत होतो. हे फार मोठं पाप आहे. अवतारांची थट्टा करणे, त्यांना समजून न घेता त्यांना तुच्छित लेखणे हे फार मोठं भयानक काम आहे. ते करू नये. पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे कि तुम्ही कुठे आहात. तुमची काय पात्रता आहे, तुम्ही काय मिळवलेलं आहे आणि हा जो मनुष्य गुरु किंवा अशा कुणी गोष्ट बोलत असेल तर त्या माणसाने तरी काय मिळवलेलं आहे. त्याची काय स्थिती आहे. तो स्वत: सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिंकत असतो, आजारी असतो. एका ही आजाऱ्याला त्याने बरं केलेलं माहित नाही. अशा माणसाच्या मागे सुद्धा आपले आजकालचे तरुण लागलेले आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे, कि आपल्या देशात हे घडत आहे परदेशात सोडून दया, परदेशात तर, इतके घाणेरडे लोक आहेत कि त्यांना शिकवायला तेच त्यांचे गुरु होतील असे सगळे त्यांना माहित आहे पण ज्या कचऱ्यात ते जाऊन पडले, तिथून ते उठण्याच्या प्रयत्नात आहे, त्यांच्या लक्षात आलेलं आहे ,  तिथल्या विचारात लोकांच्या लक्षात आलेलं आहे कि आम्हाला लोकांनी आणून खड्डयात घातलेलं आहे. आमची सगळी व्यवस्था चुकली, आमची मुलं वाया गेली, आम्ही वाया गेलो. त्या माणसाने आमचे सर्व तऱ्हेचे जेवढे काही मंगल होते ते संपवून टाकलेले आहेत. हे फ्रॉईड बद्दल सगळे लोक जाणत असून सुद्धा आज तोच फ्रॉईड आमच्या डोक्यावर येऊन बसलेला आहे. इतकी जुनी आपली परंपरा आहे, त्या परंपरेचा तरी अभ्यास केला पाहिजे त्याला जाणलं पाहिजे. आपल्या जवळ एकाहून एक अति उत्तम लेखक आहेत आणि त्यांनी फार सत्यावर लिहिलेलं आहे. त्याची माहिती घेतली पाहिजे आणि त्या नंतर त्या भामट्यांच्या जवळ जाऊन काही शिकलं पाहिजे. प्रथम हे जाणलं पाहिजे कि तुम्ही कोणत्याही परमेश्वरच्या कार्यासाठी, lecture साठी किंवा परमेश्वरच्या स्मरणासाठी किव्वा कुंडलिनी जागृती साठी पैसा घेऊ शकत नाही. हे हलकटपणाचं लक्षण आहे.

[ 8 ]

कुंडलिनी जागृती ही आपोआप घडते. किती पैसे देऊन तुम्ही एका बी मधून अंकुर काढू शकता? जे लोक दुसऱ्यांच्या पैश्यावर जिवंत राहतात ते अत्यंत दरिद्री लोक आहेत. जरी त्यांनी पैसे बनवलेत भामटेपणानी, तरी त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही पाहिजे. आपल्या शहरांमधून ही फार प्रथा वाढलेली आहे म्हणून मी आज धुळ्याच्या लोकांनासुद्धा सांगू इच्छीते कि जो पर्यंत तुम्ही पूर्णपणे रुतले नाही गेलात तो पर्यंत अक्कल आपली शाबूत ठेवा. आणि जाणून घ्या कि परमेश्वरी तत्व हे सगळ्यात महत्वाचं असल्यामुळे ते मिळालच पाहिजे, मिळणार, आपोआप घटीत होऊन मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही जर पैसे द्यायला कोणी मनुष्य काढत असेल तर त्याला स्पष्ट सांगाव कि परमेश्वराला तुम्ही विकत घेऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही पैसा ही देऊ शकत नाही. परमेश्वरच्या नावावर काहीही विकता याचं मला फार आश्चर्य वाटत म्हणजे ज्याला विकताच येत नाही त्याच्या नावावर सगळं विकतं हे फार आश्चर्याची गोष्ट आहे आणि हे समजून असलं पाहिजे कारण आम्ही एका शहरात आलेलो आहोत म्हणून आम्ही शहरवासीयांना सांगतो कि तुमच्याजवळ पैसे आहेत, तुमच्या खिशात पैसे आहेत. जिथे गुळ तिथे माशी. तुमच्याजवळ पैसे आहेत हे या लोकांना माहित आहे. सगळ्या पैसेवाल्यांच्या शरीराला लागलेलं हे भूत आहे. त्यांचा एकूण एक पैसा काढून घेतल्याशिवाय त्यांना चैन येणार नाही. म्हणून सांभाळून असलं पाहिजे कि परमेश्वरी तत्वासाठी तुम्ही पैसे देता असा अहंकार पोषक तुम्हाला विचार देऊन तुमच्या अहंकाराला बळावून आणि ते तुम्हाला लुटून काढतील. नंतर लुटल्यावर मात्र तुम्ही ओरडत माझ्याकडे याल, माताजी आम्हाला लुटून घेतलं म्हणून.

[ 9 ]

  जे सत्य आहे ते आपोआप प्रगट झालं पाहिजे. आता तुम्ही मानव झालात ही चेतना,  ज्याला awareness म्हणतात  ही या थराला आली. ते तुम्हाला कसं सहजच मिळालेलं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काही उड्या मारल्या नाही किंवा धरपकड केली नाही किंवा काहीही केलं नाही म्हणून हे आपोआपच घटीत झालं ही परमेश्वरची कृपा आहे. जर एखादा लहानसा थेंब समुद्रापासून अलग झाला तर तो काही समुद्रापर्यंत येऊ शकत नाही, पण समुद्रालाच त्या थेंबापर्यंत यावं लागतं. परमेश्वरालासुद्धा हा प्रश्न आहे कारण जर त्याने सर्व सृष्टी निर्माण केली आणि सर्व सृष्टीचं त्याने इतकं सुंदर, आजपर्यत जे काही आहे ते घडवलं  , त्यानंतर त्या सृष्टी ला काहीतरी अर्थ यायला पाहिजे. ज्या मानवाला त्याने इतक्या मेहनतीने घडवलेलं आहे त्याच्यात हजारो नाड्या आणि हजारो इंद्रिय स्थितीमध्ये असून, प्रलयामध्ये असून त्याशिवाय रोजच्या वागण्यात सुद्धा, व्यवहारातसुद्धा इतके सतर्क असतात अश्या या परमेश्वराला त्या मानवाला अर्थ दिलाच नाही? म्हणजे समजा आम्ही जर हे मशीन घडवलय आणि जर याला आम्ही मेन ला लावलं नाही तर याला काही अर्थ नाही. तसच जोपर्यंत तुम्ही मेनला लागत नाही तोपर्यंत तुम्हाला ही अर्थ नाही पण ते याला जमत नाही तसच तुम्हालाही जमणार नाही. याचा अर्थ असा नव्हे कि आम्हीच काहीतरी करतोय किंवा आम्ही काही केलेलं आहे त्याच्यात. हे समजण्यासारख सोपं तत्त्व आहे.

[10]

एखादा दीप जर पेटलेला असला, पण तयार असला, तर एक पेटलेला दीप येऊन त्याला जळवू शकतो. अगदी सोपं तत्त्व आहे ते. परमेश्वराने तुमच्यात दीप ठीक ठीक केलेला आहे. अश्या तऱ्हेने तुमचा दीप आतमध्ये आहे ते बघण्यासारख आहे  आणि हे समजून घ्यावं.  या त्रिकोणाकार अस्थी मध्ये ही कुंडलिनी तुमची आई, प्रत्येकाची आई आहे. ती परमेश्वराने तिथे बसवलेली आहे. ही समजा तुमची टेप आहे जन्मजन्मांतरीतली इथे बसवलेली आहे त्रिकोणाकार अस्थी मध्ये साडेतीन वेटोळे घालून. आता हे सगळं म्हणतील लोकांच्या घरात कुंडलिनी वाले lecture देतात त्यांना काही माहित नसतं तरीसुद्धा lecture देतात आणि बोलतात तिथे. ही तुमची आई आहे, प्रत्येकाची ही आई आहे. आणि त्याच्याखाली जे चक्र आपल्याला दिसत आहे ज्याला मूलाधार चक्र म्हणतात. त्याच्यामध्ये श्री गणेश बसवलेला आहे. तो कशाला? तो एवढ्यासाठीच कि कुंडलिनीच रक्षण झाल पाहिजे. कुंडलिनीच्या लज्जेचं रक्षण झालं पाहिजे. जी गौरी आहे तिने गणेश बसवलेला बाहेर, गौरी तुमची आई आहे. ती वाट बघतेय त्या दिवसाची जेव्हा असा कुणीतरी अधिकारी तुमच्यासमोर येईल, ज्यावेळी ती तुम्हाला पुनर्जन्म देऊ शकते. ती अनेक जन्मापासून तुमच्या बरोबर आलेली आहे. ती तिथे स्थित आहे आणि खाली नुसता गणेश बसवलेला आहे.

 आता गणेश तत्वाबद्दल जितके सांगावं तितकं थोडं आहे. कारण हे बाळाचं तत्त्व आहे. लहान बालक जसा अबोध असतो, innocent असतो, तसं हे तत्त्व परमेश्वराने आपल्यात बसवलं आहे. आता मुख्य म्हणजे या लोकांच कार्य असं कि तुमचं जे innocence आहे तेच तोडून टाकायचं म्हणून. तुमच्यातला गणेशच संपवून टाकायचा. म्हणजे तुमची कुंडलिनी काही वाचू शकत नाही. म्हणजे गणेशाला जी शक्ती आहे त्यातली एक शक्ती ही आहे कि ज्याने आपली sex ची शक्ती पूर्ण होते. कारण ते एक बालक आहे त्याला काहीच समजत नाही, अबोध आहे म्हणून त्याला तिथे बसवलेलं आहे. सहजयोगाच्या वेळेला तुम्हाला ही त्या बालकासारखं अबोध असायला पाहिजे. नाहीतर तुमची कुंडलिनी वर येणार नाही, आणि होतच एकदम. ज्यावेळी कुंडलिनी चढते त्यावेळी बंध पडतो तिथे आणि कुंडलिनी वर चढते. गणेश त्या वेळेला सांगतो कि आता हातामध्ये चैतन्य येऊन राहिलेलं आहे तर कुंडलिनी ला आदेश होतो कि ठीक आहे आता तुम्ही उठाव आणि ही घटना घटीत होते. आपण गणेशाला पुजतो पण गणेश म्हणजे काय हे आपल्याला माहित नाही. आता त्याबद्दल सगळं सांगयचं म्हणजे कठीण आहे. पण तरीसुद्धा गणेशाचा आणि कार्बन चा अगदी जवळचा संबंध आहे. हे तत्त्व प्रत्येक मानवात आहे. त्याचा नाश सर्रास चाललेला आहे. कारण त्याचाच नाश झाल्यावर तुमचा नाश होऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा त्याचाच नाश करण्याच्या मागे लोकं आहेत म्हणजे तुमचंच पावित्र्य नष्ट केल्यावर मग ते तुमचा ही नाश करू शकतील. ही त्याची प्रथा आहे.

[ 11 ]

हा गणेश खाली बसलेला ज्यावेळी त्याच्यात vibrations येतात तेव्हा जागृत होतो आणि जागृत झाल्यानंतर कुंडलिनी ला इशारा करतो कि आता तुम्हाला वर चढायला हरकत नाही. आता लक्षात घेतलं पाहिजे कि हे जे सातवे चक्र आहे त्याला कुंडलिनी भेदत नाही. कुंडलिनी वरच्या सहा चक्रांना भेदते. खालचं चक्र जसंच्या तसं असत. तेव्हा असे हे घाणेरडे प्रकार करून कुंडलिनी जागृत करणारे महामूर्ख, फक्त तुमचं पावित्र्य नष्ट करून तुमची सगळी personality संपवण्याच्या मागे आहेत. हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेही तुमच्या कडून पैसे घेऊन. स्वत:ला अश्या महामुर्खात काढू नका आणि विचारा, तुम्हाला काय मिळालय? परमेश्वराने हे तत्त्व किती मुश्किलीने तिथे बसवलेलं आहे, ते तिथे जागृत करून घेतलं पाहिजे. महाराष्ट्र हा म्हणूनच महा राष्ट्र आहे, मोठा देश आहे आणि तिथे असली माणसं  टिकू शकणार नाही कारण इथे अष्टविनायकांच जे साम्राज्य चाललेलं आहे आणि त्यांच्यातून जे vibrations येतात त्यांच्या मुळे सगळं वातावरणच मुळी निनादित आहे. पुष्कळांच असं म्हणणं आहे कि ही सगळी मूर्तीपूजा आहे. हे त्यांना कसं सांगायचं हे पृथ्वीतून निघालेलं चैतन्य तत्त्व आहे. कारण त्यांच्या हातातून चैतन्यच वाहत नाही मुळी, ज्यांच्या हातातून चैतन्य वाहत नाही त्यांच्याशी काही बोलण्यात अर्थ नाही म्हणून मी म्हणते जोपर्यंत आत्म्याची परीक्षा होत नाही तोपर्यंत धर्माच्या बाबतीत तुम्ही काहीही केलं तरी सुद्धा त्याला काहीही अर्थ लागत नाही. जसं टेलिफोनच connection लागल्याशिवाय तुम्ही जर टेलिफोन चालवलला तर त्याला काही अर्थ नाही, तसंच आहे. कुंडलिनी ही जागृत होऊन तुम्ही पार झालच पाहिजे ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर मग हातातून हळूहळू vibration वाहू लागतात. आता याची व्यवस्था आपल्यामध्ये कशी केली आहे ते मी आपल्याला सांगते. (चालू करा)

[ 12 ]

  याच्यामध्ये आम्ही आपल्याला फक्त तीन नाड्या दाखवलेल्या आहेत एक उजवीकडे, एक डावीकडे, एक मधोमध. या तीन नाड्या autonomus nervous system ज्याला म्हणतात, स्वयंचलित, त्यांना पोषण करतात. या सूक्ष्म नाड्या आपल्या मणक्यांच्या हाडांमध्ये असतात. या तीन नाड्या म्हणजे परमेश्वरच्या तीन शक्त्या आहेत. त्या आपल्यामध्ये कार्यान्वित करतात. पैकी जी डावीकडची नाडी आहे जिला ईडा नाडी असा म्हणतात त्यामुळे आपलं अस्तित्व असत. हे शिवतत्त्व आहे. यामुळे आपल्यामध्ये अस्तित्व असत. जर ही नाडी नसती आली तर आपल्यात अस्तित्व आल नसतं. आपल्या इच्छा, भावनासुद्धा या नाडी मुळेच जागृत होतात आणि कार्यान्वित असतात. हिला ईडा नाडी आणि चंद्र नाडी असेही म्हणतात. हाथा आपण फार ऐकलेलं आहे हाथायोग मधलं, हटयोगामधलं था जे आहे ते या नाडीचं नाव आहे. ही नाडी परमेश्वराची ती शक्ती, जिला आम्ही महाकाली म्हणतो. त्या शक्तीमुळे स्थित असते. आता संस्कृतात त्याला नाव आहे महाकाली, इंग्लिश मध्ये नाही त्याला आम्ही काय करणार. इंग्लिश लोकांच ज्ञान इथे आणून सांगण्यासारखं काहीही नाही. त्यांच राजकारण वैगेरे काहीही असेल पण धर्माच्या बाबतीत त्यांनी काही मिळवलेलं नाही. आपली इतकी जास्त आता, परसत्ता डोक्यावर नाचलेली आहे कि जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी स्वताचं अस्तित्व अजून आपण जाणलेलं नाही, म्हणून आपल्या हिंदुस्तानात ज्या ज्या लोकांनी मोठ्याला गोष्टी शोधून ठेवलेल्या होत्या सगळ्यांना आपण तिलांजली दिलेली आहे, इतकच नाही तर आज गांधीजीनाही आपण विचारत नाही. पण ही मात्र आपण घोडचूक करत आहोत. कारण science नी जेव्हा सर्व गोष्टींचा शोध लावला, त्यानंतर ते त्याच स्थितीत जाऊन पोहोचलेत कि जिथे असं म्हणतात कि कुंडलिनी जागृती ही घटना घडली पाहिजे आणि त्यातले पुष्कळ लोक या स्थितीला पोहोचले आहेत कि ही घटना काहीतरी triggering मुळे होते. ती बुद्धी मुळे होऊ शकत नाही, कोणत्या कार्यामुळे होऊ शकत नाही. पण काहीतरी trigeering मुळे होते. आदिशंकराचार्यानी सांगितलेलं आहे 

“न योगे | न सांख्येन ||”

  कशाने होणार? वादविवाद करून होणार नाही, नाचून डोलून होणार नाही. कशाने होईल? आईच्या कृपेने होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. विवेक चूडामणी सारखा मोठा ग्रंथ शंकराचार्यांनी लिहिल्यावर दुसरा ग्रंथ त्याने सौंदर्यलहरी म्हणून लिहीला. त्याच्यामध्ये सगळं त्याने आपल्या आईचं वर्णन आणि या लहरींचं वर्णन केलेलं आहे ज्याला आपण चैतन्यलहरी म्हणतो. एकाने विचारलं कि तुम्ही हे कां सुरु केलं तर म्हणे हे सगळं विद्या आहे बाकी सगळं अविद्या आहे. ही गोष्ट खरी आहे कारण जे सर्वव्यापी आहे ते तत्त्व, परमेश्वरीतत्त्व, हे कार्यान्वित असतं आणि जगातलं एक बाल सुद्धा परमेश्वराच्या याच्याशिवाय हलत नाही. हे ते जाणल्याशिवाय, ते तत्त्व ओळखल्याशिवाय  तुम्हाला समजणार नाही. 

[ 13 ]

आपली स्थिती अशीच आहे जशी काय खेड्यातले लोकं aeroplane वर बसले आणि त्यांनी असं म्हटलं या aeroplane ला फार बोझा नको, म्हणून कमी सामान घेऊन जा तर त्यांनी आपल्या डोक्यावरच सामान ठेवलय, तश्यातली आपली स्थिती आहे. जो पर्यंत ही घटना तुमच्यात घटीत होत नाही, ती होईलच असं आम्ही हमखास सांगत नाही किंवा आम्ही त्याचा ठेका ही घेतलेला नाही. झाली तर ही तुमची स्वत:ची संपदा, तुमची पुण्याई, परमेश्वराने तुम्हाला दिलेला हा विशेष आशिर्वाद आहे तो घ्यावा आम्ही मध्ये बसलेलो आहोत. आणि नाही झाली तर त्यात आमचं चुकलेलं नाही. त्यात तुमचच कुठेतरी चुकलेलं असेल किंवा तुम्हाला काहीतरी मानसिक त्रास असेल किंवा तुम्हाला काहीतरी शारीरिक त्रास असेल किंवा तुम्हाला बौद्धिक असेल किंवा तुमचं धार्मिक सुद्धा काहीतरी चुकलेलं असेल. त्यामुळे सुद्धा ही कुंडलिनी रुकू शकते. पण या कुंडलिनीचं हे वैशिष्ट्य आहे कि जेव्हा ही कुंडलिनी वर उठते तेव्हा ती या सर्व चक्रांमधून आत मध्ये जाताना ही जी डावीकडची नाडी आहे, जिला आपण ईडा नाडी असं म्हटलेलं आहे. तशीच जी उजवीकडची नाडी आहे जिला आपण पिंगला नाडी असं म्हणतो. या दोन्ही नाडींना जागृत करत जाते. म्हणजे असं उजवी आणि डावीकडची नाडी मिळून मधोमध ते चक्र तयार होतं. जेव्हा ही कुंडलिनी या मधल्या चक्रातून छेदन करते त्यावेळेला दोन्हीबाजूला त्याच्यापासून लाभ होतो.

[ 14 ]

आता तिकडची जी नाडी आहे त्याने आपण आपली सगळी शारीरिक आणि बौद्धिक क्रिया करत असतो. जेवढ आपलं planning आहे future च जेवढे काही विचार आहेत तो सगळा आपण ह्याने करतो. या दोन नाड्या आपल्यामध्ये, सूक्ष्मामध्ये ईडा आणि पिंगला. आणि बाहेर जड तत्वात त्यांना left and right sympathetic nervous system असं म्हणतात. नंतर ही जी सहा चक्र वर आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा, ही चक्र सुद्धा अनुक्रमाने असं म्हटलंय मी आपल्याला, कि तुम्हाला इतिहास आहे. आपल्या अनेक उत्क्रांतीच्या काळात ही आपल्यामध्ये बांधलेली गेलेली आहेत. त्यांना milestones म्हणतात तशी आहेत आणि त्या प्रत्येक चक्रावर एकेक दैवत आहे ते ओळखलं पाहिजे, जाणलं पाहिजे.  आणि त्यांना जागृत कसं करायचं हे जर तुम्हाला समजलं तर सगळी तुम्हाला परमेश्वर तत्वाची विद्या आली. जर ते तुम्ही जाणलं नाही तर बाकी सगळी अविद्या आहे. आता आम्ही cancer चे रोग बरे करतो यात काही शंकाच नाही. आम्ही अगदी केलेलच आहे. लंडनला सुद्धा केलेलं आहे पण आमचा हा धंदा नाहीये रोग बरे करण्याचा. आजच आम्हाला जयसिंगराव म्हणत होते कि माताजी आम्ही पाच वर्ष झाले पार झालोय. आमच्या family मध्ये वडील आमचे बिछान्यावर नेहेमी असायचे, सगळ्यांना आजार. जेव्हा पासून आम्ही पार झालो तेव्हापासून आमच्या कडे डॉक्टर म्हणून आला नाही. नाहीतर प्रत्येक आठवड्याला त्याची फीज असायचीच आमच्या डोक्यावर. कारण जेव्हा ही कुंडलिनी वर चढते तेव्हा जी उजव्या बाजूची ची नाडी आहे तिला ती पोषक करते त्यामुळे आपल्याला शारीरिक लाभ होतो. त्याचप्रमाणे डावीकडची जी आपली conditioning आहे ती सुद्धा संपून जाते.

   आता फ्रॉईड  वैगेरे नी जे सांगितलं कि तुमच्या मध्ये जी कंडिशनिंग आहे ती काढली पाहिजे म्हणजे फारच एकाकी कार्य आहे. जर माणसाला या कंडिशनिंग पूर्णपणे काढली तर त्याच्यात अहंकार येतो. म्हणजे आता  इथे आपण बघताना दोन नाड्या आहेत त्याच्यापैकी डावीकडची जी आहे ती ईडा नाडी आहे, ज्याला फ्रॉईड ने फक्त ओळखलंय. त्याला सगळं काही माहिती नाही थोडबहुत माहित आहे कारण आंधळी माणसे ना. तर ही जी नाडी, ईडा नाडी आहे ह्या ईडा नाडी मुळे फक्त आपल्याला मानसिक जे काही कंडिशनिंगनी होतं म्हणजे आपला past त्याने बनतो. आपलं जे काही गत आहे ते बनतं. म्हणजे आता मी आपल्याशी बोलतेय ना, हे सगळं तिच्यात जाणार, त्या प्रदेशात, त्या area मध्ये जातं. पण आपल्याला future पण आहे. आपल्याला भविष्य पण आहे. आणि आपल्याला हे वर्तमान present पण आहे. याची व्यवस्था मात्र काही फ्रॉईड ला आली नाही कारण आंधळे असल्यामुळे अर्धवट बघितलं आणि स्वतः अत्यंत घाणेरडा मनुष्य असल्यामुळे, घाणेरड्याच्या डोळ्यात सगळं घाणेरडं दिसत म्हणून त्याने अशी विचित्र काहीतरी एक नवीन theory काढली होती. फारच एकांगी आहे ते. आणि त्या एकांगीपणामुळे  तुमच्यामध्ये जे condtioning आहे ते काढलं पाहिजे असा त्याने एक नियम काढला पण जर मनुष्याला काही सुसंस्कर नसले तर तो किती अहंकारी होतो, त्याला किती इगो येतो ते इथे बघता येईल आपल्याला. कारण डावीकडची जी बाजू वर जाते त्याने सुपरइगो म्हणून एक संस्था तयार होते. आणि उजवीकडून जी आपण कार्य करतो त्याचा byproduct म्हणून इगो म्हणून एक संस्था तयार होते. आता हे सगळं psychologicalच आहे. म्हणजे फ्रॉईड नंतरच आलेलं आहे पण फ्रॉईड नंतर कोणी कोणाला मानत नाही त्याला च देव मानून बसले. त्याच्यानंतर युंग आले, एवढं कार्य केलं, कुणी जाणत नाही त्याला. कारण लोक घाणेरडे आहे त्यांना घाणेरडेपणा पाहिजे. तर हे जे superego म्हणून आपल्यामध्ये येत, प्रतिअहंकार, तो असा येतो कि समजा एक लहान मुल आहे आईजवळ दुध पितय. ते आनंदात आहे पूर्णपणे, त्यावेळेला त्या मुलाला आपण एकीकडून दुसरीकडे आईने केलं तर राग येतो. त्यावेळला  त्याचा इगो जागृत होतो. असं कां केलं?? तेव्हा आई त्याला म्हणते चुप राहा, हे condtioning झालं. त्याने सुपरइगो जागृत होतो. हे दोन्हीही असायला पाहिजे. इगो आणि सुपरइगो हे दोन्हीही समतोल असायला पाहिजे माणसामध्ये.

[ 15 ]

  म्हणजे मधोमध जागा बनवून कुंडलिनी जेव्हा वर जाते तेव्हा ते दोन्हीकडून suck होतात खाली, आणि कुंडलिनी वर ब्रह्मरंध्राला छेदून, तुम्ही अगदी बघू शकता इथे छेदताना. तुम्हाला दिसेल. इथे अगदी खडकाळ आणि टाळू, टाळू अशी आतमध्ये जाते. आणि ही जी सहा चक्र आहेत त्यांची वेगळी वेगळी नावं  आहेत. आता इतका काही वेळ नाही सगळं सांगयाला. पण तरीसुद्धा सांगण्यासाठी, जेव्हा कुंडलिनी आपल्या ब्रह्मरंध्राला छेदते, त्यावेळेला सामुहिक चेतना आपल्यामध्ये होते. म्हणजे actualization ज्याला म्हणतात. घटणार, सांगावं  लागत नाही म्हणजे आपली कुंडलिनी कुठे आहे हे लोक सांगू शकतात जे लोक पार झालेले आहेत. आपली जी बोटं  आहेत ह्या बोटांमध्ये संबंध sympathatic ची चक्र आहेत. उजव्या आणि डावीकडचं कोणतं चक्र धरलेलं आहे ते या बोटांवरती कळू लागतं. त्याच्याआधी कळत नाही म्हणजे आत्मज्ञान झाल्यावरच आपल्याला हे कळतं कि आपल्यात काय चुकलेलं आहे आणि सामुहिक चेतना जागृत झाल्यामुळे ही जागृती होते, हे काय lecture होत नाही कि भाषण होत नाही कि काही पुस्तक होत नाही पण ही घटना तुमच्यात घटीत होते तुम्ही ते होता, एक अतिमानव होता. ज्याच्यामध्ये तुम्हाला ही सामुहिक चेतना समजते आणि लहान मुलं सुद्धा सांगू शकतात, तुमच तुमचं कोणतं चक्र धरलेलं आहे. आता माझी नात फक्त अडीच वर्षाची आहे आमच्या इथे एक इंग्लंडची मुलगी आली होती पत्रिशा   म्हणून, आता गेली ती परत. तिने सांगितल, ती घरी गेली आणि तिने तिला विचारलं अनुपमा माझं कोणतं चक्र पकडलय तिने सांगितलं लेफ्ट नाभी,लेफ्ट विशुद्धी आणि तिचं धरलेलं. कारण बोटच तेवढी जळतात. हे subjective knowledge आहे. तुम्ही subject होता. तुम्ही कर्ता होता.

[ 16 ]

  आता उदाहरणार्थ एक माणूस घाणीतून गेला, त्याला घाण येते. आणि एक जर जनावर घाणीतून गेला तर त्याला घाणीचा काही त्रास होत नाही, माणसाला होतो. आजकाल तर असे नियम मी पहिले कि त्याला सुगंधाचा त्रास होतो म्हणजे किती घाणेरडे असले पाहिजे. तर त्यांना घाणीचा त्रास होतो. हे मानव आहेत. पुढे गेल्यावर जेव्हा ही जागृती होते तेव्हा त्यांना नैतिक घाणेरडेपणाचा त्रास व्हायला लागतो. म्हणूनच जे आम्ही म्हटलं कि सगळ्यांची व्यसन सुटली आपोआप. हे काय आम्ही दारूबंदी वैगरे काढलेली नाही कारण आत्म्याचा आनंद आत पाझरू लागला कि आपोआप हे सगळं सुटत. आपण बोर होतो म्हणून या गोष्टी घेतो. पण मनुष्य इतक्या आनंदात रममाण होतो त्या आत्म्याच्या आंदोलनात, इतका तो समाधानी बनतो, संतोषी बनतो तसच संबंध त्यांचं व्यक्तिमत्व इतकं सुंदर होऊन जातं, इतकं आकर्षक होऊन जातं आणि त्यानंतर dynamic होऊन जात. त्याने सांगितलेली ही गोष्ट खरी आहे, जी मुलं शिकत नव्हती ती क्लास मध्ये first क्लास येऊ लागली. ही गोष्ट अगदी खरी आहे. हे जेंव्हा घटीत होतं , जेंव्हा अशी घटना माणसामध्ये होते, तेव्हा तो कोणत्याही व्यसनाकडे जात नाही कारण त्याचं  तिकडे चित्तच जात नाही. त्याचं चित्त इतकं जास्त अलोकीत आहे कि तो अश्या घाणेरड्या वस्तूंकडे जातच नाही आणि आपोआप ती गोष्ट सुटते. अगदी आतून तुम्हाला कळतं कि हे चक्र धरलेलं आहे. इथून कुंडलिनी चाललेली आहे, वर कुठे पोहचलेली आहे. ती कुठे जरी ती तुम्हाला दिसली नाही तरी आतून तुम्हाला कळेल कि या माणसाची कुंडलिनी कुठे चालली आहे आणि वर कुठे गेली आहे.

   हे संबंध च्या संबंध शास्त्र पूर्वीपासून केलेलं आहे आज केलेलं नाहीये. कबीराने सुद्धा सहजयोग सांगितला पण कबीराचही खोबरं केलं काही काही लोकांनी. मला तर ही कमाल वाटते लोकांच्या डोक्याची, कि सगळ्याचं खोबरं  हे कसे करू शकतात आणि तुम्ही ते मानून तरी कसे घेता. कबीरने सुद्धा याच्यावर लिहिलेलं आहे, नानक ने लिहिलेलं आहे, तुकारामबुवांनी  लिहिलेलं आहे तसं ज्ञानेश्वरांनी तर फारच स्पष्टपणे लिहिलं आहे. तर सर्वप्रथम गोष्ट आपल्या देशाची आहे कि आपल्याला मर्यादा आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. आपला देश म्हणजे फार मोठा आहे. त्या लोकांजवळ पैसे असतील पण लक्ष्मीतत्व नाही त्यांच्याकडे. अगदी घाणेरडे लोक आहेत. तुम्ही जर, त्या लोकांबद्दल जाणायचं असलं, तर त्यांच्या देशात जाऊन बघा. ही आमची मंडळी इथे आल्यावर यांना इतकं आश्चर्य वाटत कि इथल्या लोकांना किती प्रेम आहे. तिथे जर तुम्ही कुणाच्या घरी गेलात तर एक कप तुम्हाला कोणी चहा देणार नाही. मोठा श्रीमंत लॉर्ड असला तरी सुद्धा. एकेक कवडी सांभाळून ठेवेल तो. आपल्याकडे लोक एखादे असे इकडचे तिकडचे लोक आले तर जोडे वहाणा वगैरे नेतील फार तर, तिथे तर एखादा पाहुणा तुम्ही घरात आणला तर बायका मुली सगळं घेऊन पळून जायचा. इतकी तिथे घाण साचलेली आहे त्या देशांमध्ये. आपल्याला असं वाटत तिथले लोक खूप सुखी आहेत.

  स्विडन मध्ये जिथे कि सगळ्यात जास्त सुबत्ता आहे, फार पैसा आहे. त्या ठिकाणी सगळ्यात जास्त आत्महत्या होतायेत. सगळ्यात जास्त म्हणजे १० पैकी ९ लोक आत्महत्येचाच विचार करत असतात म्हणजे अशा सुखा आणि सुबत्तेला काय बघायचं. लंडन मध्ये जे statistics निघालेत त्याच्यामध्ये असं सांगितलय, कि इंग्लंड देशामध्ये प्रत्येक आठवड्याला दोन मुल, आईबाप मारून टाकतात ठार. आणि तीन family तल्या लोकांनी मिळून तीन मधल्या एका family च्या आईवडिलांच्या सुद्धा मारायच्या मागे असतात. statistics घेतल्यावर.  आणि बेशरमपणे सांगतात. काहीही त्यांना शरम नाही म्हणजे बेशरमपणा हे त्याचं मुख्य तत्व. त्यांना शरम कशाशी खातात हे त्यांना माहित नाही, अगदी बेशरामासारख राहायचं. तिथेसुद्धा आम्ही सहजयोग उभा केला. आज असे आमचे ३०० हिरे आहेत तिथे आणि इतके विद्वान आहेत, कि तुमचं सगळं तुम्हाला समजावून सांगतील. मी इतके आजपर्यंत पाहिलेत, आमचे शिष्य पुष्कळ आहेत तिथे आणि त्यांनी एवढ कार्य केलेलं आहे इथल्या लोकांनी सुद्धा, आणि इतके खोल उतरले आहेत सहजयोगामध्ये, आणि इतकी त्यांना माहिती आहे पण मी असे foreigners पहिले नाही, ज्यांनी एवढी मेहेनत घेतलेली आहे, आणि प्रत्येक वाचून, त्याचा सगळा हे काढून त्याचा बरोबर पत्ता लावून, हे कसं आहे, काय आहे, याचा सबंध अभ्यास करून सहजयोगाला त्यांनी आपलं अगदी जीवन वाहून  घेतलेलं  आहे आणि हे कार्य करत आहेत. मुर्खासारखे ओरडत आणि रडत बसत नाही. कोणीही आपली चक्री फिरवावी आणि त्याच्यामागे धावत सुटत नाही. बुद्धी डोक्यात ठेऊन एकेक अक्षर नी अक्षर ते समजून घेतात आणि हे चक्र कोणतं आहे, ते चक्र कोणतं आहे आणि या चक्रावर कुंडलिनी कशी चढते, ती वर कशी न्यायची. याच लोकांनी हजारो लोकांना बरं केलेलं आहे आजकाल मी कोणालाच बरं करत नसते. ही शक्ती आपल्या आतून वाहत आहे. अहो अगदी साधारण खेड्यात राहणाऱ्या लोकांनी, एवढा चमत्कार करून दाखवलेला आहे. पण आम्हाला जरा publicity आम्ही इतकी करत नाही या गोष्टीची, होते आपोआप. आता पारधींचा लेख तरुणभारतात आला ते म्हणजे आश्चर्य वाटलं मला कारण सहजच त्यांनी तो लेख दिला आम्ही काही त्यांना सांगितलं नव्हत.

[ 17 ]

   कुंडलिनीच्या नावावर सुद्धा अनेक गोष्टी लोक विकतात. कुंडलिनी मध्ये सामुहिक चेतना झाली पाहिजे. पहिली गोष्ट. मनुष्य सामुहिक चेतनेत उतरला पाहिजे. त्याला कळलं पाहिजे कि दुसऱ्याची कुंडलिनी कुठे आहे. म्हणजे माझ्याकडे पुष्कळ तुम्हाला सांगते, माताजी आमची कुंडलिनी उठलेली आहे. बरं बसा म्हटलं तर लागले उडायला घोड्यासारखे, नाहीतर बेडकासारखे उडतात. अहो म्हटलं हे काय? आमची जागृत झाली म्हणून आम्ही असं उडतोय. आता म्हटलं तुम्हाला अतिमानव व्हायचंय कि घोडा व्हायचंय नाहीतर बेडूक व्हायचंय नाहीतर उद्या पिसवा व्हाल. ढोरासारखे ओरडता म्हणजे हे काय मानवाचे लक्षण आहे आणि मी अतिमानव परमेश्वराच्या गोष्टी करते आणि तुम्ही हे काय मांडलय माझ्या पुढे. तर आमच्या गुरुंनी सांगितलं, असं का? आम्हाला त्यांनी नाव दिलेलं आहे, झालं. माळ दिलेली आहे, झालं. कुंडलिनी कुठे आहे, ती चढली कि नाही वर. म्हटलं तुमची कुंडलिनी जर चढलेली आहे तर तुम्ही यांची सांगा कुठे आहे सध्या. ते कसं सांगायचं? म्हटलं मग कशी चढली तुमची कुंडलिनी? याला कोणता रोग झालेला आहे  ते सांगा? ते सांगता येत नाही. तुम्हाला कसला त्रास झालेला आहे ते सांगा, चक्रांवर? माताजी ते काही आम्हाला माहित नाही. चक्र वगैरे असतात असं आमच्या गुरुंनी फक्त सांगितलं आहे. बर. आणि हे तुम्हाला दिलय. शेवटी मग पागलखान्यात सगळ्यांनी जायचं व्यवस्थित. हे किती पापकर्म होऊन राहिलंय जगामध्ये. पैसे कमावण्यासाठी यांनी स्मगल करावं  काय करायचं असेल ते करावं.

वाटेल ते धंदे करावे पण कुणाची.

प. पु. श्री माताजी निर्मला देवी