Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shri Ganesha Mumbai (India)

Kundalini Ani Shri Ganesha 22nd September 1979 Date: Place Mumbai Seminar & Meeting Type आजच्या ह्या शुभ प्रसंगी अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये इतका सुंदर विषय म्हणजे बरेच योगायोग जुळलेले दिसतात. आजपर्यंत कधी पूजनाचा विषय कुणीच मला सांगितला नव्हता, पण तो किती महत्त्वपूर्ण आहे ! विशेषत: या योगभूमीत, या आपल्या भारतभूमीत, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातच्या या पुण्यभूमीत,  अष्टविनायकांची रचना सृष्टी देवीने केलेली आहे, तेंव्हा गणेशाचे महात्म्य काय आहे, या अष्टविनायकांचे महत्त्व काय आहे वगैरे गोष्टी फारशा लोकांना माहीत नसतात याचे मला फार आश्चर्य वाटते. कदाचित जे सर्व काही समजत होते, ज्यांना सगळे काही माहीत होते असे जे मोठेमोठे साधुसंत ह्या आपल्या संतभूमीवर झालेले आहेत, त्यांना कोणी बोलायची मुभा दिली नसणार. किंवा त्यांचे कोणी ऐकून घेतले नसेल, पण याबद्दल सांगावे तितके थोडे आहे आणि एकाच्या जागी सात भाषणे जरी ठेवली असली, तरीसुद्धा श्री गणेशाबद्दल बोलतांना मला ती पुरणार नाहीत.  आजचा सुमुहर्त म्हणजे घटपूजनाचा. घटस्थापना ही अनादि आहे म्हणजे ज्यावेळेला या सृष्टीची रचना झाली, अनेकदा. एकाच वेळी सृष्टीची रचना झालेली नाही तर ती अनेकदा झालेली आहे, जेंव्हा या सृष्टीची रचना  झाली तेव्हा आधी घटस्थापना करावी लागली. घट म्हणजे काय? हे अत्यंत सूक्ष्मात समजले पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे ब्रह्मतत्व म्हणून जी एक स्थिती, परमेश्वराचे वास्तव्य असते, त्याला आपण इंग्लिशमध्ये entropy म्हणू.  जेंव्हा काहीही हालचाल नसते.  त्या स्थितीमध्ये जेव्हा इच्छेचा उद्भव होतो किंवा इच्छेची लहर ‘परमेश्वराला’ येते तेव्हा त्याच्यामध्ये ही इच्छा समावते.  आता काहीतरी संसारामध्ये सृजन केले पाहिजे. क्रिएट केलं पाहिजे.  त्यांना ही इच्छा का होते? ही त्यांची इच्छा. परमेश्वराला इच्छा का होते हे समजणे माणसाच्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. अशा पुष्कळशा गोष्टी डोक्याच्या बाहेरच्या आहेत, पण Read More …