The Meaning Of Nirmala Rahuri (India)

  The Meaning Of Nirmala, 1980-01-18 आपण अशे भेटलो म्हणजे आपापल्या हितगुजाच्या गोष्टी करू शकतो, आणि त्याबद्दल जे काही बारीक-सारीक असेल हे सुद्धा आपण सांगू शकतो एकमेकांना, कसं आपण स्वतःला स्वच्छ केलं पाहिजे कारण आपल्या आईचं नावंच मुळी निर्मला आहे. आणि या नावामध्ये पुष्कळ शक्त्या आहेत. पहिला शब्द ‘नि’ आहे. ‘नि’ म्हणजे नाही, नाही जे नाही आणि जे आहे त्याला म्हणतात महामाया. तुम्ही जे नाही आहे वास्तविक, पण आहे असं भासतं, त्याचं नाव आहे महामाया. तसंच हे सर्व संसाराचं आहे. हे दिसतं आहे म्हणून, पण हे काही नाहीच. ह्याला जर आपण बघितलं आणि ह्याच्यात आपण फसलेलो असलो, की असं वाटतं की हेच आहे, हेच आहे व्यर्थ आहे. आर्थिक परिस्थिती वाईट आहे, सामाजिक परिस्थिती वाईट आहे, संसारिक परिस्थिती वाईट आहे. सगळं वाईट दिसतं. चांगलं काही दिसत नाही. समुद्राच्या वर वरच्या थरावर जे पाणी असतं, ते अत्यंत गढूळ, घाणेरडं, त्याच्यामध्ये काय काय वस्तू तरंगत असतात; पण खोल गाभाऱ्यात त्याच्यात गेलं की, इतकं सौंदर्य त्याच्यात, एवढी संपदा शक्ती सगळं काही असतं. तेव्हा ते वरचं काही होतं हे सुद्धा लक्षात राहत नाही. पण सांगायचं म्हणजे हा सगळा भ्रम आहे. हे जे काही बाह्यातलं आहे हे सगळं भ्रम आहे. हे नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवले पाहिजे. ‘नि’ शब्दाची जर तुम्ही आपल्यामध्ये स्थापना केली, हे नाही, हे नाहीय इथून सुरुवात करायची. ‘नेति नेति वचने निर्मोही (अस्पष्ट) हे नाही, हा विचार नाही, हा विचार नाही. परत हा विचार नाहीय असं म्हणत गेलं पाहिजे. ‘निः’ शब्द जो आहे तो विसर्गासहित ‘निः’ आहे त्याचा अर्थ लागतो, तर कायतरी दुसरं आहे. जो भ्रम आपल्याला दिसतो तो भ्रम नाही, तर काहीतरी त्याच्या Read More …