The Meaning Of Nirmala

Rahuri (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

  The Meaning Of Nirmala, 1980-01-18

आपण अशे भेटलो म्हणजे आपापल्या हितगुजाच्या गोष्टी करू शकतो, आणि त्याबद्दल जे काही बारीक-सारीक असेल हे सुद्धा आपण सांगू शकतो एकमेकांना, कसं आपण स्वतःला स्वच्छ केलं पाहिजे कारण आपल्या आईचं नावंच मुळी निर्मला आहे. आणि या नावामध्ये पुष्कळ शक्त्या आहेत. पहिला शब्द ‘नि’ आहे. ‘नि’ म्हणजे नाही, नाही जे नाही आणि जे आहे त्याला म्हणतात महामाया. तुम्ही जे नाही आहे वास्तविक, पण आहे असं भासतं, त्याचं नाव आहे महामाया. तसंच हे सर्व संसाराचं आहे. हे दिसतं आहे म्हणून, पण हे काही नाहीच. ह्याला जर आपण बघितलं आणि ह्याच्यात आपण फसलेलो असलो, की असं वाटतं की हेच आहे, हेच आहे व्यर्थ आहे. आर्थिक परिस्थिती वाईट आहे, सामाजिक परिस्थिती वाईट आहे, संसारिक परिस्थिती वाईट आहे. सगळं वाईट दिसतं. चांगलं काही दिसत नाही. समुद्राच्या वर वरच्या थरावर जे पाणी असतं, ते अत्यंत गढूळ, घाणेरडं, त्याच्यामध्ये काय काय वस्तू तरंगत असतात; पण खोल गाभाऱ्यात त्याच्यात गेलं की, इतकं सौंदर्य त्याच्यात, एवढी संपदा शक्ती सगळं काही असतं. तेव्हा ते वरचं काही होतं हे सुद्धा लक्षात राहत नाही. पण सांगायचं म्हणजे हा सगळा भ्रम आहे. हे जे काही बाह्यातलं आहे हे सगळं भ्रम आहे. हे नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवले पाहिजे. ‘नि’ शब्दाची जर तुम्ही आपल्यामध्ये स्थापना केली, हे नाही, हे नाहीय इथून सुरुवात करायची. ‘नेति नेति वचने निर्मोही (अस्पष्ट) हे नाही, हा विचार नाही, हा विचार नाही. परत हा विचार नाहीय असं म्हणत गेलं पाहिजे. ‘निः’ शब्द जो आहे तो विसर्गासहित ‘निः’ आहे त्याचा अर्थ लागतो, तर कायतरी दुसरं आहे. जो भ्रम आपल्याला दिसतो तो भ्रम नाही, तर काहीतरी त्याच्या पलीकडचं आहे आणि ह्या भ्रमामध्ये आपण इतके भरमसाट दिवस घालवले आहेत. आपलं आयुष्य आपण इतकं व्यर्थ घालवलेलं आहे की जे नाही ते इतकं महत्वाचं वाटतं आणि त्यामुळे आपण पुष्कळ पापांचे ढीग एकत्र केले. ह्या गोष्टीत आनंद मिळेल, त्या गोष्टीत आनंद मिळेल. त्याच्यामध्ये सुख मिळेल, ह्याच्यामध्ये सुख मिळेल असं विचार करून आपण जे काही उपभोगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आपल्याला काही मिळालेलं नाहीय. निस्सार आहे ते सगळं. ह्याच्यात सार नाही. निःसत्व आहे तेव्हा अशी दृष्टी ठेवायची की हे नाही आहे, हे सगळं साफ झूठ आहे. ब्रम्ह हेच एक सत्य आहे बाकी सर्व झूठ आहे, असं विचार करत जायचं मग सहजयोगाला अर्थ लागतो. म्हणजे होतं काय बाबा सहजयोगी लोक पार झाल्यावर त्यांना असं वाटतं, आता आम्ही पार झालो नं, मग आम्हांला माताजींचा आशीर्वाद आहे मग आमच्याजवळ ऐश्वर्य काय नाही, म्हणजे ऐश्वर्यामध्ये परमेश्वर आहे असं त्यांना वाटतं. पार झालो मग आमच्या घरामध्ये ठीक का होत नाही? पार झालो तरी आमचा स्वभाव का बदलत नाही? असा विचार केला पाहिजे पहिल्याने. तेव्हा मग लक्षात येईल की आपला स्वभाव नाही बदललेला. आणि ‘स्व’ ‘भाव’ स्वभाव शब्द किती सुंदर आहे बघा. ‘स्व’, ‘स्व’ म्हणजे आत्मा त्याचा भाव तो मिळवलाय का आपण? ‘स्व’ चा ‘भाव’ जर आपण मिळवला, तरी बाह्यात काही जरी असलं तरी आतलं जे इतकं सुंदर आणि अनुपम आहे, की ते बाह्यातलं नुसतं नाटकासारखं वाटलं पाहिजे. हे साक्षीस्वरुपत्व जे आहे ते जो पर्यंत तुमच्यामध्ये पूर्णपणे जागृत होत नाही तोपर्यत ‘निः’ शब्दाचा अर्थ तुम्ही लावलेला नाही आणि त्याचा उपयोगही केलेला नाही असं जर मनुष्य लक्षात घेईल की आपण ‘निः’ वर बसलो नाही आणि अजूनही आपण कधीतरी भावनेच्या आहारी जातो आणि कधी-कधी सत्तेच्या आहारी. दुसऱ्यावर जबरदस्ती करतो किंवा काहीतरी उगाचंच सहन करत बसतो आणि त्याच्याबद्दल आपले रडत बसतो, किंवा मी एवढं सहन केलं हे झालं ते झालं. त्याच्या मधोमध आपली स्थिती आहे, ‘निः’ वर म्हणजे हेही नाही आणि तेही नाही. मध्ये उभे आहात तुम्ही. ही स्थिती आपली स्थापित करायला पाहिजे. ती ध्यानामध्ये फार उत्तम होते. नुसता ‘निः’ शब्दाचा तुम्ही मंत्र केला तरी सुद्धा ध्यानामध्ये होऊ शकते निर्विचारिता. पहिलं निर्विचारितेत यायचं. कोणतंही विचार मग तो कशाचा असेना का? सुष्ट, दुष्ट कसा ही असेना का? त्या विचारावर जर तुम्ही उड्या मारायला सुरुवात झाली एकदा जर का हे जम्पिंग सुरु झालं की मग तुम्हांला मला एक तऱ्हेचा इनर्शिया किंवा मला त्याचं, एक ती स्थिती स्थापन होते, स्थिती स्थापना होते आणि ती स्थिती झाली म्हणजे तुम्ही प्रत्येक विचारांवर उडतच असता, ह्या विचारावरनं, त्या विचारावर, ह्या विचारावरनं त्या विचारावर म्हणून इतरही जणांनी असं सांगितलं की एखादा वाईट विचार आला की त्याला सुष्ट विचारांचा विरोध करायचा, म्हणजे इकडंनं एखादी गाडी आली की त्याला आपण दुसरी गाडी जर रेटली तर दोही गाड्या ज्या आहेत त्या मग कुठेतरी मधोमध येतील. एक अर्थानं बरं आहे हे. पण कधी कधी त्याने नुकसान होऊ शकतं. म्हणजे तिकडनं एक विचार येतो आहे आणि आपण इकडून एक विचार समजा चांगला विचार काढला किंवा ह्या विचाराच्या उलटा आपण घालायचा, तर तो विचार दबून परत चुपचाप बसला कुठे? आणि कुठेतरी एकदमच निघेल असंही होऊ शकतं, आणि असं पुष्कळांचं होतं. दाबून ठेवले विचार, काहीतरी चांगलं केलं पाहिजे, नेहमी चांगलं वागलं पाहिजे. दुसऱ्याशी चांगलं राहिलं पाहिजे अशेही विचार घेऊन लोक चालले, की त्रास होतो, एकदम कधीतरी तो राग निघतो, कधीतरी  मग एकदम असं संताप येतो की नाही लोकांसमोर. अहो, इतके शहाणे वागणारे, एकदम चिडले कशे? आतली सारखी सुद्धा चुकते आपली आणि आतलं जे काही सौंदर्य आहे ते एकदम नष्ट होऊन जातं. तेव्हा काय करायचं निर्विचारितेत राहायचं. विचार हाच निषिद्ध ठेवला पाहिजे. अगदी निर्विचारितेत आपण राहिलं म्हणजे मधोमध विलंबात आपण आलो. विचारच सोडायचा, एकदम प्रयत्न केला पाहिजे विचारांचा आता लोकांना असं वाटतं माताजी विचारांशिवाय कसं होणार? विचारांच्याशिवाय कसं चालवायचं? विचारांच्याशिवाय काय फायदा नाही, विचार काय आहेत पोकळ गोष्टी आहेत. निर्विचारतेत तुम्ही आलात आणि एकाकार झालेले आहेत, म्हणजे तुमचा बिंदू परमेश्वराच्या सागरात मिळाला. तेव्हा त्याची शक्ती तुमच्यात आली तेव्हा ही बोटे काही विचार करत बसत नाही, फिरतंय ना? विचार त्याला द्यायचा, तू कर आमचा विचार पण कठीण जातं कारण आपण निर्विचारितेत असलो माताजी आम्ही सगळं समर्पण केलं. समर्पण केलं आम्ही आई, सगळं काही समर्पण केलं पण काही जुळत नाही, बोलायच्या गोष्टी आहेत त्या, कारण बोलायचं नुसतं समर्पण, निर्विचारिता गाठायची म्हणजे समर्पण. विचारच आपण सोडला, विचार सोडल्याबरोबर मधोमध आलो, मधोमध आल्याबरोबर, निर्विचारितेमध्ये आपण परमेश्वराच्या शक्तीशी एकाकार झालो. परमेश्वराच्या शक्तीशी एकाकार झालो मग, तो सगळं काही बघतो आपलं बारीक-सारीक. तुम्हांला आश्चर्य वाटेल, पण तुम्ही स्वतः आपल्या विचारांनी एखादवेळा करून बघा मग ‘संकल्प-विकल्प करोति’ तो म्हणायचं. आम्ही या रस्त्याने जाऊ या, जाऊन बघा, करून बघा. आता सगळ्यांनी करून बघितलेलंच आहे, सगळ्या देशा-देशांतून झालेलंच आहे. सगळ्यांनी हा प्रयत्न करून बघितलेला आहे. परत सगळं निस्सार ठरलं. तर हे करून बघण्यासारखं आहे, करून बघा, आणि करून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो मार्ग चुकीचा होता. तर आपण फक्त निर्विचारितेत राहिल्याबरोबर ‘निः’ कल्पना आपल्यामध्ये येते. ती प्रेरणात्मक असते. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, सगळं ताट समोर मांडल्यासारखं वाटतं. भाषणाला उभं राहायचंय, निर्विचारितेत उभं राहिलं काही विचार येऊ दयायचे नाही, आणि जर बोलायला लागले. त्या लोकांनी कधीही भाषणं दिलं नव्हतं, ज्याला माहित नाही भाषणं कसं द्यायचं. ज्यांना काहीच ज्ञान नाही विशेष, ते बोलायला उभे राहिले ना की अशे बोलतात की लोकांना आश्चर्य वाटतं, हे बोलतात, हे विचार कुठून आले त्यांच्या डोक्यातनं. कारण नेहमी ते जे तार लागली , तोंडातून निघून राहिलंय. तुमच्या डोक्यात काहीच येत नाहीय. आता आमचं आम्ही सांगतो आपल्याला, आता जसं आपण प्रार्थना केली, आई आमचं असं करून दे. ते मी विचारात घेत नाही. आश्चर्याची गोष्ट आहे, निर्विचारितेत घेतो, म्हणजे तुम्ही म्हटलं मग त्याच्यावर आम्ही विचार करायचा मग त्याला असं करू वगैरे काही नाही, निर्विचारितेत घेतलं की त्याची सगळी मशिनरी तयार, त्याच्यात घालायचं की खट, खट, खट तयार होऊन संपलं. त्या मशिनरीला काम करू द्यायचं. Silent machinery म्हटलं पाहिजे. त्या शांत मशिनरी मध्ये आपले प्रश्न घातले पाहिजे. पण ते बुद्धिजीवी लोकांना फार कठीण. प्रत्येक गोष्टीत विचार करायचे, सगळं झालं, कोणचाही विषय आकलन करताना निर्विचारिता साधता आली पाहिजे. आपोआप निर्विचारिता येते. आता तुम्ही संशोधन करताना निर्विचारितेत करा. तिथेही हात चालवायचे फक्त,  पण निर्विचारितेत बरोबर संशोधन जमेल तुम्हांला. आता मी कितीतरी गोष्टी सांगते. मी जरी जन्मात सायन्स काहीच वाचलं नाही, काही मला काही माहित नाही, सगळं ज्ञान कुठून येतं त्या निर्विचारितेतून येतं. नुसतं बोलतेय मी, नुसतंय बोलून राहिलेय, बोलतेय, (अस्पष्ट) सगळं तयार केलं होतं कॉम्पुटर. तो बोलतोय सटासट. पण तुम्ही जर निर्विचारितेत आला नाही तर तुमचा कॉम्पुटर तुम्ही वापरत नाही, आणि तुम्ही काहीतरी वरुन आणखीन त्या कॉम्पुटरच्या वर काहीतरी लावलंय डोकं, तो एवढं जुना कॉम्पुटर बनवला आहे प्रसिद्ध त्याची एवढी मेहनत केलेली आहे. त्यात इतकं व्यवस्थित अगदी अचूक सगळं काम करून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुमच्या हातून चुका होणारच, कारण त्या कॉम्पुटरचं तुम्ही ऐकत नाही. आपलंच सगळं चऱ्हाट. त्याला काही अर्थ आहे, तर त्याला शब्द ‘प्र’ आहे आणि प्रशिक्षण वगैरे आपण ‘प्र’ शब्द वापरतो. ‘प्र’ म्हणजे निर्विचारितेत जे काही घडतं, ते सगळं ‘प्र’ आहे. जे काही सर्व होतं ते ‘प्र’ आहे ते इतकं प्रचंड आहे, बघा प्र चंड, चंड आहे पण चंडावरती प्रचंड, प्र-काशित, प्र-ज्ञ आता अशे ‘प्र’ या शब्दाला अर्थ असा आहे की, enlightened प्रकाशित आहे. प्रकाश बोलतो का काही, पण दाखवतो स्पष्ट. हे आहे, हे आहे, हे आहे. तसंच निर्विचारितेचा प्रकाश आहे हा. ‘निः’ याला विसर्गासह निर्विचार, निर्व्याज्य, निरहंकारी, निराकार असे अनेक शब्द ‘निः’ पासून निघतात. मग निर्विकल्पात येता येतं. आधी निर्विचार व्हायचं, मग निर्विकल्प विकल्प सुटतात मग कळतं की काहीतरी शक्ती आहे आणि ते सर्व कार्य करतेय, फटाफट पण कशी करतेय बारीक बघा. अगदी बारीक, अगदी बारीक असतं त्याचं काम. तुम्हांला अगदी आश्चर्य वाटेल की अगदी, पण अवचित असं कसं घडलं कसं, आता काहीचं पण तसंच आहे, म्हणून आम्ही घड्याळाला कधी बघत नाही. किती घडयाळात वाजलेत माझ्या, समजा कधी-कधी एकाच्या वेळेला वाजतात रात्रीचे एक, तीनलाच घडयाळ बंद पडलं तर तीन वाजून राहिले. कधी तरी लोकांना दाखवायला- बिखवायला किल्ल्या-बिल्ल्या दिल्या, आमचं आपलं घडयाळ निर्विचारितेत. ते थांबलेलं घडयाळ आहे परमनंट. जे घडायचं ते घडून येतं, घडून येतं. मग काय वाईट नाही वाटत. उशीर झाला तरी नाही झाला तरी, काय आपण आहोत ना जिथे आहोत तिथे. आता काल गाडी फेल झाली, बसलो आरामात, म्हणजे आम्हांला हे सगळे बघायचे होते तारे-बिरे. कधी बघायला मिळत नाहीत त्या लंडनला. आता बघावं मजेत. आता तारे बघत बसलो. बाकीच्या लोकांना घाई झाली, त्यांना लागले वायब्रेशन. आता म्हटलं कशाला वायब्रेशन वाया घालवता, तारे- बिरे बघा की, तुम्हांला कधी बघायला मिळतात का जन्मात बघा की, हे सौंदर्य पाहायचं होतं त्यावेळेला आकाशामध्ये प्रचंड पसरलेलं होतं. तेव्हा आकाशाला असं वाटलं की माताजींनी बघावं आमच्याकडे थोडं कधी-कधी. आमच्याकडे बघितलं पाहिजे ना! त्या सहजयोग्यांकडेच लक्ष देतात. माझी इच्छा होती उतरून बघायचं, पण म्हटलं, लगेच सहजयोगी धावतील माताजीना त्रास होईल म्हणून आपलं तिथनं बघत होतो आम्ही सगळं काही. मजा वाटत होती, म्हणजे काय आहे की आपण कुणाची बंदिश करायची नाही. फक्त निर्विचारितेत राहिलं म्हणजे परमेश्वर आपल्याला अगदी हातावर सांभाळून सगळीकडे घेऊन जातो. सगळी व्यवस्था तो करतो. त्याला काही सांगावं लागतं नाही. त्याला सगळं माहित आहे. पण तुम्ही आलात की नाही त्या प्रवाहात, तुम्ही आलात की नाही. परमेश्वराच्या प्रवाहात तुम्ही आलात की नाही हे पाहिलं पाहिजे, आणि जर तुम्ही त्या प्रवाहात नाही, तर मात्र तुम्ही अजून काठावरच अडकलेत. मग तो प्रवाह येतो, ढकलतो दोन-तीनदा, काढतो. परत चाललेत त्या काठावरच. मग म्हणायचं माताजी आमचं काही जुळतच नाही. काही होतच नाही, पण तुम्ही अडकलेय ना, आपल्या ह्याच्यामध्ये आहे, अं गणेश स्तुती फार सुंदर आहे आपली. जी आहे ती ‘पडता प्रवाही’, प्रवाही शब्द वापरलेला आहे. प्रवाहात जेव्हा आम्ही पडतो प्रवाहात. प्रवाहात वाहायचं, म्हणजे त्याच्यामध्ये आपला प्रवाह नको. प्र-वाह, ‘प्र’ परत आला, हे वाहन करतो. पण ‘प्र’ enlighten जो आहे, त्या प्रवाहात पडायचं. ‘पडता प्रवाही’ आपलं आहे ना, ‘निर्वाणी रक्षावे’. आमचं जेव्हा निर्वाण होईल तेव्हा तुम्ही आमचं रक्षण करा. ‘रक्ष रक्ष परमेश्वरा’ असं आपण परमेश्वराला म्हणतो पण आपण आपलंच रक्षण करत बसलोय. तर परमेश्वर कशाला तुमचं रक्षण करेल, तो म्हणेल चला चला चालू दे थोडं. होऊ दे त्याचं रक्षण, मग सगळं दुःख जगाचं. डोंगराचे डोंगर मला येतं हसायला. अहो काय नुसते बलून्स आहेत नुसते, फुगे. त्याला काही अर्थ नाहीय. आपल्या गांभीर्यात उतरायला शिकलं पाहिजे ते निर्विचारितेतलं समजलं पाहिजे, म्हणजे निर्विकल्प होणार. निरासक्त आसक्तता नाही. माझा मुलगा, माझी मुलगी हे आपल्याकडचं विशेष. इंग्लंडला उलटं आहे. इंग्लंड वगैरे ला माझा मुलगा, माझी मुलगी नसतं. फक्त मी, माझ्यापुरतं. मुलगा गेला चुलीत. एक स्थिती तिथे ही की मुला-बाळांना सुद्धा मारून टाकतात. कुणाला विश्वास नाही वाटणार, पण मारतात, अगदी सर्रास, प्रत्येक आठवडयाला दोन मुलं मारतात. आई वगैरे, इतके दुष्ट लोकं पण इकडे मुलासाठी देश विकायला काढतील. हा माझा मुलगा आहे त्याला काहीतरी विशेष दिलंच पाहिजे. माझा आहे ना, दुसऱ्यांना नाही मिळालं तरी चालेल. माझ्या मुलाला, माझं, माझा नवरा, माझं घर, माझं, माझं चाललं. शेवटी तसंच होतं. शेवटी मग मीच राहून जातं. माझं काही नाही तुझं सगळं काही. बकरीला म्हणतात फार सुंदर लिहिलेलं आहे कबीराने की, बकरी आधी जिवंत असते तेव्हा म्या म्या म्या म्या करत फिरते म्हणजे मी मी मी मी असं. मग तिला मारलं जीव गेला तिचा आता काही राहिलं नाही. मग तेव्हा लक्षात येतं. सगळं आयुष्यभर मी काय म्या म्या करत बसलो, ज्यांना मी मी मी म्हणत होतो ते सगळे बेकार निघाले. सगळे संसारातले लोक, जे आपले घरातले लोक ज्यांनी ज्यांना मी म्हणत होते की माझे आहेत. ते सगळे बेकार निघाले. त्यांनीच मला कापून खाल्लं. मग, मग त्या बकरीच्या लक्षात येतं. मग तिच्या आतड्या काढतात, त्या ओढतात आणि त्या ओढून त्याच्या तारा करून जेव्हा ढोलकडेवाले चालतात ना, ती धुनकी असते ना, ती मग तू ही, तू ही, तू ही, तू ही तूच ऐकायला येतं. तूच एक आहे तसं आपलं झालं पाहिजे. मी नाही, माझं अस्तित्वच नाही आहे, असं एकदा ठरवलं म्हणजे मी शब्दाला अर्थ लागतो.

     मग आपण ‘ला’ शब्द घेऊया. ‘ला’ शब्द म्हणजे हा ललितेचा शब्द आहे. ‘ला’ माझं दुसरं नाव ललिता पण आहे, हे देवीचं वरदान आहे. हे देवीचं अस्त्र आहे. ‘ला’ शब्द ‘ला’ म्हणजे देवी जेव्हा ललित होते किवा शक्ती जेव्हा ललित होते. आता ललित म्हणजे कार्यशील. त्याच्यामध्ये जेव्हा लहरी येतात. तुमच्या हातात लहरी आहेत. त्या लाटा आपल्याला लाटा म्हणतात, तसं हातामध्ये ह्या ज्या लाटा येऊन राहिल्या आहेत, लहरी येतात, ही जेव्हा शक्ती कार्यान्वित होते त्या शक्तीला ललिता शक्ती असं म्हणतात. पण ते अत्यंत सौंदर्यशाली आहे. प्रेममय मुख्य म्हणजे प्रेममय, प्रेमाची ही जी शक्ती जेव्हा कार्यान्वित होते ती ‘ला’ आणि ह्याचं तुम्हांला सगळीकडे आवरण आहे. ती कार्यान्वित असल्यावर मग कशाला काळजी करायची. तुमची काय ही शक्ती आहे, आहो, एक झाडातनं तुम्ही फळ काढू शकत नाही, ओढून असं काढून दाखवा, एक तरी फळ तर सोडा, तुम्ही एक पानसुद्धा काढू शकत नाही. एक मूळ काढू शकत नाही. इतकं असं आहे. तुम्हांला पार केलंय. ‘ला’ शक्ती आहे त्या शक्तीतनं ‘म’ शक्ती आणि ‘निः’ शक्ती अशा दोन्ही शक्ती निघालेल्या आहेत, म्हणजे ‘निः’ शक्ती ही ब्रम्हदेवाची शक्ती सरस्वती ही आहे आणि सरस्वती शक्तीमध्ये मनुष्याला ‘निः’ पणा आला पाहिजे. ‘निः’ पणा म्हणजे पूर्णपणे अनासक्ती. अनासक्तता यायला पाहिजे. आणि ‘ला’ शक्तीमध्ये प्रेम आहे आणि ती शक्ती इतरांशी आपला संबंध जोडते. ललाम, लावण्य शब्द आपण ऐकला असेल. ह्या शब्दांमध्ये ‘ला’ शब्द येतो आणि ‘ल’ म्हणजे आपण लहान मुलांना ल ल ला शिकवतो, म्हणजे त्यांना चुप करायचं असलं की, त्या शब्दाला गोडवा आहे, आणि त्या गोडव्याने आपण सगळ्यांना भरवून टाकलं पाहिजे. सगळ्यांशी बोलताना आपण ती शक्ती वापरली पाहिजे. म्हणजे सगळीकडे चराचरामध्ये ती शक्ती ही परमेश्वरी प्रेमशक्ती सगळीकडे पसरली असताना काय केलं पाहिजे आपण, एकतर विचार सोडला पाहिजे पहिल्या शक्तीचा कारण पहिल्या शक्तीमुळे विचार उपन्न होतो आणि शेवटल्या शक्तीमध्ये काय केलं पाहिजे. ही ‘ला’ शक्ती आहे, त्या शक्तीमध्ये आपण त्या प्रेमाचा आनंद घेतला पाहिजे. तो कसा घेणार. एकाकार होऊन, तन्मय होऊन. आपलं प्रेम दुसऱ्यावर किती आहे हे कुणी मोजतं का कधी कुणी? ते मोजलं पाहिजे काय मजा येते अगदी की आपलं किती प्रेम आहे सगळ्यांवर, असं कधी तुम्हांला येतं का डोक्यात. माझं तसंचं असतं नेहमीच, मला हे वाटतं अहाहा काय प्रेम वाहू आहे राहिलंय किती छान वाटतंय, पण तसं तुम्हांला वाटतं की नाही माहित नाही. माणसांचं मला समजत नाही, एवढं पण तसं मला वाटतं काय वहायला लागलंय माझं प्रेम वा वा! काय आनंद येऊन राहिलाय. तसा एखादा स्वर्णकार किंवा एखादा कलाकार, जेव्हा आपलं संगीत त्याचं वाहू लागतं तर ते बघतो, काय माझं संगीत वाहून राहिलंय वा रे वा! काय मजा येऊन राहिलीय. तसं हे प्रेम नुसतं अबाधित वाहिलं म्हणजे ती ललाम शक्ती. तीच या लाटांची शक्ती आणि तीच ही ललित शक्ती आहे. तर त्या ललिता शक्तीला प्राप्त झालं पाहिजे. तर त्याच्यामध्ये पाहिलं असं की दुसऱ्यांच्याकडे आपली जी दृष्टी असते ती कशी आहे तिकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणजे खालच्या प्रतीच्या लोकांची दृष्टी दुसऱ्याकडे नेहमी अशी असते, की आमचं काय मारायचं म्हणजे चोरायचं, चोरटे लोक बसलेत म्हणजे आता आले की ते आधी जोडे, चपला पाहतील याच्यातील नव्या किती आहेत, मग त्या उचलल्या. आतमध्ये आले, यातले श्रीमंत किती दिसतात, त्यांचे खिशे कुठे आहेत ते आधी बघायचं पण खिशाशिवाय, मग ते खिशे चाचपले. मग बघितलं की हे सत्ताधारी आहेत, मग त्यांना चिकटले, मग त्यांना काहीतरी लोणी लावायचं. त्यांच्याशी दोस्ती सोडायची, त्यांच्यापासनं काय मिळवता येईल ते मिळवायचं अशी अगदी निम्नस्तरातली जे लोकं असतात त्यांची दृष्टी असते, कोण, कुठे त्याला कसा पण रिकामं करायचं तिकडे दृष्टी असते अगदी निम्नस्तरातली. त्याच्यावर काही लोकांची दृष्टी असते की, दुसऱ्याचं काय वाईट असेल वैगुण्य ते बघत बघत बसायचं. त्याच्यात काय आनंद मिळतो मला माहित नाही. ह्या माणसाला हेच नाहीय त्याचं नाकच ठीक नाही, त्याचं तोंडच ठीक नाही. तर त्याच्या घरात असंच होतं. त्यांच्या घरात भांडणच होतात. तर त्यांच्यात हेच आहे त्याच्यात ही खराबी त्याच्यात ती खराबी पण त्याने काय मिळणार आहे आपल्याला. मनुष्य अशानं माणूसघाणा होतो आणि त्याने ही फार माणसाला स्वतःला त्रास होतो म्हणजे स्वतःला त्रास कसा करून घ्यायचा ते माणसाला जाऊन शिकलं पाहिजे. मला तर ते परत परत शिकावं लागणार आहे कारण मला ते काही जमत नाही. मला आनंद ह्याच्यातच होतो की सगळ्यांना भेटून केवढा आनंद होतो. (या या असं काय वाकून या आहे जागा या या या बसा बसा आहे जागा या) तर ही ललाम शक्ती जी आहे जी वापरायची. त्या शक्तीला आपण असं वापरलं पाहिजे की दुसऱ्यांच्याकडे पाहताना निर्विचारितेत जावं, निर्विचारितेत गेल्याबरोबर त्या माणसातही निर्विचारिता येईल म्हणून मी म्हणते बंधनं दया. बंधनं दिली म्हणजे ‘निः’ शक्ती आणि ‘ला’ शक्तीला जर बंधनं दिली म्हणजे ‘ला’ शक्तीला ‘मो’ मध्ये ‘निः’ मध्ये आणलं तर फार फायदा होतो. पुष्कळांना सांगायला लागतं डावी साइड उचला आणि उजवीकडे टाका, अतिकर्मी लोकांना मी फार कार्य करत आहे वगैरे वगैरे असे मी लोकांना वाटतं म्हणजे फार एक कार्यरत असतात. त्यांना सांगते की डावी उजवीकडे घाला, म्हणजे स्वतःचे जे प्रेम आहे ते आपल्या पाच तत्वात भरायचं. जसं आपण रंग भरतो की नाही कॅनवास वर जसा आपण रंग भरतो, तसं आपल्या हृदयातलं जे प्रेम आहे ते आणून ती प्रीती जी आहे ती आणून आपण आपल्या ज्या कार्याची शक्ती आहे ती शक्ती त्याच्यामध्ये भरायची. ती शक्ती एकदा भरली की ज्या अशा माणसाला फार रंगत येते आणि तो हळूहळू असा पसरतो, त्याची प्रीती अशी वाहते. मराठीत एक शब्द आहे स्नेहाळते. त्याची कृती जी आहे ती स्नेहाळते. त्याला असा रंग चढतो अशा माणसाला आणि इतका आकर्षक असतो तो मनुष्य. अशा माणसाजवळ तासन् तास नुसतं जाऊन बसलं तरी वाटतं बुवा बसलेत कुठेतरी निवांत छान, तर ती स्नेहाळली पाहिजे. पण त्याचा उपयोग असा होतो की माणसं जोडली जातात, तोडली जात नाहीत. आपलेपणा वाढतो. सगळ्यांना वाटतं की कुठं तरी असं स्थान आहे तिथं आपल्याला प्रेम, स्नेह सर्व काही मिळालंय, तर ही प्रभूती जी येते प्रेमाची शक्ती आहे, ती जोपासली पाहिजे. आपल्यामध्ये अशे विचार आले कोणचेही तर असं समजलं पाहिजे की आपण त्या गंगेमध्ये (अस्पष्ट) टाकतोय असं जर आपण विचार ठेवला तर आपली जी ‘ला’ शक्ती आहे. प्रेमशक्ती आहे. ती पूर्णपणे स्वच्छ राहिल अगदी स्वच्छ राहिल आणि त्याच्या स्वच्छतेत आपल्याला खूप आनंद वाटेल. दुसऱ्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टी मध्ये कोणचाही चिकित्सकपणा नसला पाहिजे. मला जर विचारले की हे गृहस्थ कशे आहेत, पण मी फार तर कुंडलिनीवर सांगू शकेन की हे त्यांचे हे धरतं कधीकधी, याच्या पलीकडे हे गृहस्थ कशे आहेत त्यांचा स्वभाव कसा आहे वगैरे असं कुणी विचारले की माझ्या लक्षात येत नाही ती गोष्ट. अगदी लक्षात येत नाही. कुणी मग सांगितलं की मग हे फार ह्यांचा स्वभाव असं आहे तसा आहे किंवा काय स्वभाव म्हणजे काय दोन मिनिटांची गोष्ट. आज नदी इथे वाहतेय तर उद्या कुठे वाहणार आहे काय सांगता येत नाही. आता तुम्ही कोणाच्या मुक्कामावर बसलात हे पाहायचं. तुम्ही जर इकडेच बसला घाणीत ती इथं वाहतेय तर तुम्हांला विक्षिप्त वाटतंय, असेल आम्ही तिकडनं सागराकडनं बघतोय. तेव्हा ही नदी कुठं येणार आहे ते आम्हांला माहिती आहे आणि परिवर्तन हे सहजयोगात हे नेहमी होत असतं. तेव्हा माणसाला (अस्पष्ट) मारलं पाहिजे. हा मनुष्य अगदी कामातनं गेलेला आहे. आता हा काही कामाचा नाही असं नाही समजलं पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये परिवर्तन होणार आणि झालंच पाहिजे आणि आपल्या सहजयोगाचं कार्यच म्हणजे परिवर्तनच आहे. तेव्हा ज्यांचा सहजयोगावर विश्वास आहे त्यांनी कोणत्याही माणसाला असं म्हटलं नाही पाहिजे की हा मनुष्य कामातनं गेला. प्रत्येक माणसाला ह्याची पूर्णपणे सवलत दिली पाहिजे. आता आपणच बघता की आम्ही कुठं होतो आणि कुठं आलो. ही आता नदी कुठं चालली पुढे असं जर विचार केला तर तुम्ही स्वतःची तर इज्जत करालच, पण दुसऱ्यांचीही कराल. स्वतः ची ज्या माणसाला इज्जत नसते तो दुसऱ्यांची करत नसतो. तेव्हा ललाम शक्तीला खूप वाढवलं पाहिजे. याच्यावर बोलायला लागले मला एका पुस्तक लिहावं लागेल पण त्याच्यात मजा काय आहे ते मात्र मी तुम्हांला सांगू शकत नाही. कारण ते शब्दात घालता येत नाही. शब्द म्हटले तर फारच अपुरे पडतात. त्या गोष्टीला हे घालायचं म्हटलं तर जसं आपलं स्मित जर तुम्ही अंकित करायचं म्हटलं तर फर तर त्याचे मसल्स कराल पण त्याचे इफेक्टस तुम्ही सांगू शकणार नाही, तशातलंच आहे. ह्या ही शक्तीला वाढवलं पाहिजे. ललाम शक्ती त्याने माणसाला एक सौंदर्य एक आकर्षकता, एक फार स्वभाव चांगला बोलताना, वागण्यात सर्व गोष्टीमध्ये हे आपल्याला बघितलं पाहिजे की आपली ललाम शक्ती वाढते का? एखादया माणसाचा रागावण्याचा गोडवा तो सुद्धा गोडवा आहे. एक मिनिटात रागावणं आणि एक मिनिटात हसायला येतं अशा फारच गोड आणि मधुमय शक्तीला ललिता शक्ती म्हणतात. त्याचा अगदी विपर्यास लोकांनी करून ठेवलेला आहे, की लोकांचं असं म्हणणं आहे की ललिता शक्ती संहारक असते वगैरे असं मुळीच नाही. ही अत्यंत सुंदर आणि फारच कारीगिरीवाली असते आणि कलात्मक इतकी असते, म्हणजे आता सांगायचं असं की समजा एक तुम्ही बी पेरलं. त्यातल्या बी मध्ये काही अवयव नष्ट होतात, ती ललिता शक्ती (अस्पष्ट) तिच्यावर मग झाड आलं ते झाड आल्यावर तिच्यावर पानं फुटतात, पानं आता गळतातसुद्धा. आता आपण पाहिलं तर ती सुद्धा सहज, तेव्हा एक झाडाला आकार येतो. त्याच्यानंतर मग फुलं आली आणि त्या फुलांमधून जेव्हा फळे येतात तेव्हा फुलातलं काही प्रकार गळतात आणि फळं येतात आणि फळं ही कापावी लागतात आणि खावी लागतात, खाल्ल्यावर जो आस्वाद येतो तो ही ती शक्ती आहे त्याचप्रमाणे ह्या दोन्हीही शक्त्या म्हणजे कायतरी काट-छाट केल्याशिवाय मूर्त्या बनत नाहीत. तसंच ही काट-छाट सुद्धा त्याच्यात लागते. असं जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा आपल्या हातून काही काट-छाट होईल की ते काही वाईट आहे असे नाही समजले पाहिजे, त्याचीही गरजच आहे, पण ती कलाकार कलात्मक दृष्टीने करतो आणि एखादा असा बोथट मनुष्य असला तर तो बोथटपणाने करतो. किती कलात्मकता तुमच्यात आहे त्याच्यावर ह्या शक्तीचं अवलंबन असतं. आता एखादं चित्र आपण बघावं आणि बघतच राहावं (अस्पष्ट) अहो काय आहे याच्यात काही सांगता येत नाही, शब्दात येत नाही, बघतो आम्ही तेव्हा अशी चित्रं काही काही असतात ती पहिली की, निर्विचारिता स्थापित होते. निर्विचारिता स्थापित होऊन मनुष्य नुसता संबंधच्या संबंध आनंद उपभोगत असतो आणि ती स्थिती सगळ्यात उत्तम, अतिउत्त्तम आहे. त्याला असं आहे, तसं आहे किंवा त्यांची कशी तुलना करायची वगैरे किंवा काहीतरी अलंकार त्याला घालायचे आणि काहीतरी अलंकृत भाषेत त्याचे वर्णन करण्यापेक्षा नुसतं त्याचं मनसोक्त आनंद घ्यायचा रसास्वाद म्हणतात त्याला तसा रसास्वाद घेत राहायचा त्याला शब्द नाहीत. त्याला वर्णन नाही आहे. ते फक्त आतून अनुभवायचं आहे. तो अनुभव सगळ्यांना घडला पाहिजे.

      आता ‘म’ मधला शब्द फार मजेदार आहे. ‘म’ हा महालक्ष्मीचा शब्द आहे. ‘म’ म्हणजे आपली धर्मशक्ती, तशीच आपली उत्क्रांतीची शक्ती आहे. ‘म’ शब्दांमध्ये माणसाला धडपड करावी लागते. गोष्ट आत्मसात करावी लागते. आतमध्ये घ्यावं लागतं. आकलन करावं लागतं दोन्हीकडून. जसा एखादा आरटिस्ट आपल्या ‘ला’ शक्तीने आपल्या (अस्पष्ट) करतो नंतर ‘निः’ शक्तीने त्याची रचना करतो, आणि त्याला ठीक करायच्या वेळेला तो ‘म’ शक्ती वापरतो. प्रत्येक वेळेला बघतो ठीक आहे का नाही, मग परत हे करा, मग परत मिटवायचं परत करायचं. ती ‘म’ शक्ती झाली म्हणजे हे ठीक नाही ना मग दुसरं आणायचं, तिसरं बघायचं, हे जे ठीक करण्याचं काम आहे त्याला थोडी धडपड पाहिजे. स्वतःलाही ठीक करत राहावं लागतं ते जर नसलं आपल्यामध्ये तर उत्क्रांती झाली नसती. परमेश्वराला एक फार धडपड करावी लागते. ही ‘म’ शक्ती ही म्हणजे आपल्याला हस्तगत करावी लागते, आणि त्या शक्तीला प्राप्त होण्यासाठी टिकवावी लागते. ते टिकवणं जर आलं नाही तर दोन्ही शक्त्या झडून पडतात. या शक्तीत तुम्ही जर उभे राहिलात तर दोन्ही साइड पडतात. मध्यबिंदू आहे. Centre of gravity आहे. त्या मध्यबिंदूमध्ये असायला पाहिजे आणि मध्यबिंदू ही ‘म’ शक्ती आहे आपल्या उत्क्रांतीची जी आणि त्या उत्क्रांतीच्या शक्तीवर जेव्हा तुम्ही वाढत जाल तेव्हाच या दोन्ही शक्त्या तुमच्यामधनं कार्यान्वित होतील. पण ‘म’ शक्तीचा मात्र पूर्णपणे समज यायला पाहिजे आणि त्याची जोपासना केली पाहिजे. म्हणजे असं की ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ जागृतीपर्यंत ठीक आहे. तो देईल खाटल्यावरी, कबूल त्याच्यापुढे त्याच्यामध्ये ही ‘म’ शक्ती जी आहे ती आपल्यामध्ये दोन्हीचं संतुलन घेऊन करावी लागते. रंगाचं जसं आपण संतुलन करतो, रागदारीत आपण जसं स्वरांचं संतुलन करतो, तसंच आपल्याला ह्या दोन्ही शक्तीचं ‘निः’ आणि ‘ला’ या दोन शक्तीचं संतुलन मध्ये साधावं लागतं, आणि ते संतुलन साधण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागते. ते आपल्यातनं पुष्कळदा निघून जातं, ज्यांनी हे साधलं तो सहजयोगी उच्च स्थितीला गेला. फार जास्त इमोशनल सहजयोगी सुद्धा काही कामाचा नाही. किंवा फार जास्त कार्यरत सहजयोगी सुद्धा काही कामाचा नाही. पण जो आपल्या प्रेमशक्तीला कार्यरत करतो आणि वारंवार त्याचं सिंहावलोकन करतो. म्हणजे असं आहे की कार्य पद्धती एक आहे समजा आमच्या कार्यपद्धतीला प्रत्येक वेळेला माताजी काहीतरी नवीन काढतात हे तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक वेळेला माताजींचं काहीतरी नवीन काढतात हे. तुम्ही पाहिलं असेल. प्रत्येक वेळेला माताजींचं काहीतरी नवीन असतं. नवीन पद्धत असते की आता हे नाही जमलं तर दुसरं करून बघायचं. ते नाही जमलं तर तिकडून, जर डोक्यातनं नाही गेलं तर शेपटाकडनं. कधी हसून करते तर कधी रडून करते. कधी समजावून करते तर कधी प्रेमाने सांगते तसं करते. तसंच प्रत्येकाने जर एक पद्धती फिक्स नाही करायची. ही एक पद्धत आहे, सकाळी उठले कुंकू लावले, माताजीना नमस्कार केला की मेकॅनिकल झाले तुम्ही. ही जिवंत पद्धती नाही. जिवंत पद्धतीमध्ये नवीन नवीन पद्धती शोधून काढायच्या. तसं मी नेहमी मुळाचं उदाहरण देते की एक मूळ निघालं की ते मूळ हळूहळू जमिनीत पेरत जातं स्वतःला. आता जिथे-जिथे त्याला अडचणी येतात तिथे बरोबर वळसा घालून नेटाने पुढे जाते ते काही भांडत नाही. आहे ना बस बाबा तू आहे ठीक आहे, वळसा घालून बरोबर ते जाऊन बसतं आणि जर तिथे अडचणी नसल्या तर ते झाडाला मुळी ते धरूच शकणार नाही. अडचणी पाहिजेच अडचणी नसल्या की तर तिथे काही झाड टिकणार नाही, म्हणून अडचणी पाहिजेत अडचणी असल्याशिवाय तुमची प्रगतीच होणार नाही. पण त्या अडचणींवर कसा मात करायचा ते जे शिकवते ती ही ‘म’ शक्ती आहे. आणि म्हणून ती ‘मा’ शक्ती ती आईची शक्ती. म्हणजे त्याला सगळ्यात प्रथम मनुष्यामध्ये सुज्ञता ज्याला विझडम म्हणतात ते पाहिजे. हे आम्ही असं करत आलो तर तसं झालं, मी करणार आता आम्हांला समजा एखादया माणसाचा स्वभाव फार गरीब आहे. गरीब ज्याला आपल्याकडे शब्द वापरतात आणि या आम्ही बदलत नाही काय करणार अहो बदला तुम्ही. सिंह व्हा. एखादा सिंह आहे आता, तुम्ही जरा शेळी व्हा. असं केल्याशिवाय होणार नाही. आपल्या पद्धती बदलायला पाहिजेत. रोजच्या ज्या माणसाला पद्धती बदलता येत नाहीत तो मनुष्य कधीही सहजयोग वाढवू शकणार नाही. कारण तो एका पद्धतीला चिकटला. लोक कंटाळले त्या पद्धतीला आता काहीतरी नवीन पद्धत पाहिजे. बोअर होतो ना मनुष्य, तरीही ‘म’ पद्धती बायकांना फार समजते. बायकांना याची अक्कल फार असते. म्हणजे आज अमुक केले आज पोहे मग उद्या करंज्या, तिसऱ्या दिवशी काहीतरी. सगळं काही बदलून करायचं. म्हणजे पुरुषांना हे लागते सारखी curiosity की आज घरी गेलं की काय असणार बेत. त्याचं नाव बेत. मग ते कुठे जातात हॉटेलात, घरी येणार सरळ काही असलं तरी (हास्य) घरी या. ते बायकांना अक्कल आहे. तर ही जी स्थिती आहे त्याने मनुष्य संतुलन साधतो. त्यांनी मनुष्य एकरसता प्राप्त करतो. ह्या शक्तीला जेव्हा तुम्ही उच्च स्थितीला नेता, तेव्हा हे जे वायब्रेशन्स आहेत ते जे वायब्रेशन्स आहेत ते संपूर्णात संबंध सूज्ञतेतच वाहतात. जर तुमच्यात सूज्ञता नसली तर हे वायब्रेशन्स वाहणार नाहीत. ज्या माणसांमधनं वायब्रेशन्स अत्यंत येतात तो सूज्ञ आहे, त्याची ती सूज्ञताच वाहते. हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि वायब्रेशन्स थांबणार तुम्ही जरी किती दिसले. हे मोठे सहजयोगी आहेत, अमुक-तमुक पायावर दिसतं त्या पकडी आल्या म्हणजे समजायचं आपलं संतुलन सुटलेलं आहे. संतुलन सुटलंय म्हणजे काय आपल्यामध्ये ‘म’ शक्ती किती कमी आहे. म्हणून आमचं नाव खरोखर ‘माताजी’ जे काढलंय त्यातला ‘मा’ हा पहिला शब्द ‘मा’ ‘मा’ चं आहे आणि आमच्या ‘मा’ शक्तीमुळे हे कार्य घडून आलंय. आता जर ‘ल’ शक्ती असती तर काय जमलं नसतं. ‘निः’ ही शक्ती असती तरी काही जमलं नसतं. ह्या ‘निः’ शक्त्या घेऊन आलो पण खरंच म्हणजे याच्यावर मात आहे ‘मा’ शक्ती आणि ‘मा’ शक्तीचं तुम्ही पाहिलंय की आईचं पहिल्यांदा हे सिद्ध झालं पाहिजे की तुमची आई आहे हे सिद्ध व्हायला पाहिजे आपोआप. कुणीही आलं आणि म्हणाल तुमची आई आहे, तुम्ही मानाल का? नाही मानणार. आईची सिद्धता यायला पाहिजे की आमची आई आहे, आई म्हणजे काय, आमचं स्थान आहे ती आमचा अधिकार आहे पूर्ण तिच्यावर आणि तिचा आमच्यावर पूर्ण अधिकार म्हणूनच आहे कारण ती आमच्यावर एवढं प्रेम करते. किती निर्व्याज्य तिचं प्रेम आहे. आणि ती आमची हितचिंतक आहे, मंगलकारी आहे. तिच्यामध्ये काहीही तिच्या हृदयात आमच्या विरुद्ध नाही आहे. हे आम्हांला म्हणजे ‘स्व’ ला सुशोभित आहे. तेच तिच्यामध्ये आहे. असं जर लक्षात आलं तर आईवर विश्वास बसणार आहे किंवा आई जर घातक असली तर कोणाचा विश्वास बसणार आहे का? तर ती सिद्धता दुसऱ्यांना पटवून दिली पाहिजे आणि ते सहजयोग्यांना साधलं पाहिजे की सगळ्यांना वाटलं पाहिजे की आहे कुणीतरी, हा एक सूज्ञ आहे. आणि त्याला संतुलन यायला पाहिजे. ते संतुलन प्रेमाचं आणि कार्यशक्तीचं असं सुंदर साधलं पाहिजे की लोकांना कळलंच नाही पाहिजे. त्याच्या लक्षात सुद्धा आलं नाही पाहिजे. पण त्या माणसाचा परिणाम सगळ्यांवर असला पाहिजे. हे सहजयोग्यांनी साधायला पाहिजे. आता या तिन्ही शक्त्या कशा वापरायच्या, त्या कार्यान्वित कशा करायच्या वगैरे तुम्ही विचार करा आणि घरी करा, म्हणजे ‘निः’ ही शक्तीत सर्व सौंदर्य असायला पाहिजे. घरामध्ये creativity असायला पाहिजे. नवीन-नवीन तऱ्हेने विचार केला पाहिजे. लोकांशी बोलण्याच्या सुद्धा पद्धती नवीन काढल्या पाहिजेत. सहजयोग पसरवण्याच्या शक्त्या वापरल्या पाहिजेत. नवीन-नवीन असं काही केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. या सर्व शक्त्या जर तुम्ही नीट वापरायच्या तर त्याला ‘निः’ शक्ती म्हणजे कार्यशक्ती फार जबरदस्त पाहिजे आणि मग ती जर शक्ती जमली नाही म्हणजे अर्थात ‘ला’ शक्ती ही मुख्य प्रेमशक्ती पाहिजे पण प्रेमशक्ती कार्यान्वित आणायची ती ‘निः’ शक्तीने, पण ती जर जमली नाही तर दुसरं. पहिल्यांदा लाल-पिवळा रंग वापरून नाही जमला ना, मग पिवळा आणि हिरवा वापरून बघू नाही जमलं ना मग हे वापरून बघू. हे जे सूज्ञपणाचे आहे म्हणजे जे की हट्ट नाही ठेवला पाहिजे. हट्टी स्वभाव असला की सहजयोग जमत नाही. नाही ना जमलं आपल्याला, काय सहजयोगच पसरवायचा आहे ना, लोकांचं भलंच करायचंय ना, कल्याणच करायचंय ना, नाहीतर हे, तर ते. आता मी तुमच्या हट्टाला फार बळी पडते. कारण तुम्हा लोकांचे जर हट्ट नाही निभावले, तर तुम्ही लोक आणखीन हट्टाला पेटता. म्हणून तर म्हटलं माताजी असं नाही होत. कधी-कधी मी पण दामटून घेते नाही मला जायचंय, मला करायचं आहे. मी हे करीन, कधी-कधीच करते. पण बहुतेक मी तुमच्या हट्टावरून चालते. कारण मला माहितेय माणसाला हट्ट दिलं त्याचा आमच्यासारखं नाहीय. तो हट्ट म्हणजे काय करून टाकेल. देवास ठाऊक. नाक काढून टाकेल स्वतःचे की डोळे काढून टाकेल की काय करेल ते माहित नाही. तेव्हा माणसाच्या हट्टाला केव्हा पेटवलं नाही पाहिजे. हे आम्हांला समजतं ते ही ‘म’ शक्तीमुळे. पण आपला हट्ट सोडला पाहिजे. माताजीना हट्ट नसतो. जे आहे ते खरं आहे ते काय करायचं ते विशेष आहे म्हणून करायचं. तर आम्हांला काही इच्छा नाही आहे. आमच्याकडे ‘ला’ शक्ती नाही आहे, की ‘निः’ शक्ती नाही की ‘म’ शक्ती नाही आहे. काहीही नाही. त्या शक्त्या आम्ही आहोत हे ही आम्हांला माहिती नाही. आम्ही नुसतं बघत असतो सगळा खेळ चाललेला आहे. या शक्त्या काय आणि हे काय आपलं बघायचं असलं जे जेव्हा होऊन जातं तेव्हाच मानवामध्ये सिद्ध सहजयोगी तयार होतील. अजून सिद्ध नाही झाले. सहजयोगी झालेत पण अजून सिद्ध नाही झालेत. सिद्धता (इकडे-तिकडे बघू नका, डिस्टर्ब नाही करायचं डिस्टर्ब नाही करायचं) सिद्धता साधली पाहिजे. ( they get disturb) सिद्धता साधली पाहिजे. आणि सिद्ध सहजयोगी जो असतो तो अगदी एकतार होऊन परमेश्वराला आपल्या काबूत करून घेतो. सगळं काही त्याच्या हातून वाहू लागतं. तेव्हा आता बघायचं आहे. मी आता वर्षभराला जातेय, कुठं-कुठं तुम्ही आपली सिद्धता वापरता, कशी-कशी वापरता आणि मी हळूहळू सांगत असते प्रत्येकाला की, असं नको, तसं नको, त्याचं वाईट नाही वाटून घ्यायचं. मग ‘म’ शक्तीमध्ये वाईट नाही वाटायचं. मला सांगायलाच पाहिजे हे असं करू नका ते असं त्याने त्रास होईल असं करू नका वगैरे पुष्कळांना वाईट वाटते. एक गृहस्थ आमच्या मुंबईला होते, तर ते लोकांना पायावर घेत असत. मला काही माहिती नव्हतं. मग एकदा त्यांचे शिष्य आले, म्हणजे त्यांनी आपले शिष्य केले होते असं मला माहित नव्हतं ठीक आहे, त्यांना म्हटलं तुम्ही पायावर कशाला घेता? त्यांना फार वाईट वाटलं. पण ह्यांचे वायब्रेशन्स कमी झाले होते त्यांचे म्हटलं पायावर घ्यायचं नाही असं तुम्ही शपथ घ्या, म्हणून तुमची सिद्धता कमी होतेय. अगदी नाही, पायावर घ्यायचंच नाही. आम्ही असं आईनं सांगितलंय, असं म्हटल्याबरोबर ती गोष्ट होणार आहे. आम्ही सिद्ध झालं पाहिजे ही गोष्ट लक्षात जर धरली, आम्हांला सगळ्यांनी मानलं पाहिजे ही की आम्ही सिद्ध आहोत. बघितल्याबरोबर पटलं पाहिजे. असं का झालं तर सगळं उत्तम होईल. एक मी सांगितलं आहे की सगळ्यांना आपल्याकडे जेवायला बोलवा. प्रत्येकाने एक-एक करून ठेवायचे सगळ्या नातलगांना बोलवून जागृती दयायची. सगळे जेवढे नातलग असतील, गावातले त्यांना बोलवायचं. आमच्याकडे माताजींची फार मोठी पूजा मांडली आहे तर माताजींची म्हणू नका, पूजाच म्हणा. आले म्हणजे त्यांना बसवायचं पार करायला. अशारितीने जर झालं तर चार सहजयोगी बरोबर बोलवायचे जेवायला. बरं मग, आजचं भाषण translate  जर इंग्लिशच्या लोकांना द्यायचं. फार beautifuly done.