Talk to Sahaja Yogis

Mumbai (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Sahaj Seminar Date : 10th December 1980 Place Mumbai Туре Seminar & Meeting Speech Language Marathi

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता चव्हाणांनी आपल्याला सहजयोगाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. पण कोणत्याही गोष्टीची जर माहिती मिळाली, तर ती गोष्ट मिळाली असं नसतं. माहितीने आपण फक्त जाणतो, की अमुक वस्तू अशी आहे. समजा आम्ही लंडनची आपल्याला माहिती दिली. तरी तुम्ही काही लंडनला अजून गेले नाहीत नां ! तेव्हा लंडनला जाऊन तिथलं वातावरण कसं काय आहे, त्याचा अनुभव यायला पाहिजे. त्यानंतर सबंध लंडनमध्ये काय काय प्रकार आहेत, कोणते रस्ते आहेत, कोणत्या इमारती आहेत, त्या सर्वांचेसुद्धा ज्ञान व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर, ते सगळे कळल्यावर तिथले कायदेकानून काय आहेत ? मग आपण तिथे वागायचं कसं? ज्याने आपल्याला सगळ्यात जास्त फायदा होईल, ज्यासाठी आपण आलो. हा सगळा विचार करावा लागतो. अगदी तसेच सहजयोगाचे आहे. फक्त फरक एवढाच आहे, की सहजयोग ही जिवंत क्रिया आहे. जिवंत क्रियेत आणि कृत्रिम क्रियेत फार अंतर असतं. जिवंत क्रियेत कोणती गोष्ट कशी घडेल ते सांगता येत नाही. म्हणजे आता एखादं झाड जर तुम्ही लावलं, त्याला कुठे फांदी फुटेल, कुठे फुलं येतील, कधी येतील, कशी उमलतील, किती फळें येतील? ते काही आधी सांगता येत नाही. परत ते दिसायचं नाही काही सकाळी उठले फुलं आली. नंतर एखाद्या दिवशी सकाळी उठले फळं झाली. तसं सहजयोगाचं आहे. आधी पार व्हायचं. म्हणजे तुमचे कोंब फुटले. पार झाल्यावर, आता काय काय होतंय आमच्या आतून ते बघत रहायचं, साक्षी स्वरूपात. त्यासाठी पोषक काय करावे लागेल, तेवढं करत जायचं आणि ते करण्यासाठी शक्ती येते माणसामध्ये. म्हणजे मी आता कधीही प्रोग्रॅमच्या आधी म्हणत नाही की तुम्ही दारू पिऊ नका, की सिगरेट पिऊ नका, की हे करू नका, वगैरे कधीही म्हणत नाही. सहजयोगी झाल्यावर मग म्हणते. कारण त्याच्याआधी तुम्हाला शक्ती नसते. विल पॉवर तेवढी नसते तुम्हाला. सकाळी ठरवतील हे करणार नाही आणि तेच हमखास होईल. ते समजतं आईला. पण पार झाल्यावर इतकी आतून शक्ती येते, की आपोआपच, शक्तीपेक्षा काय, की चित्तच इतकं वेगळं होऊन जातं, की तिकडे लक्षच जात नाही. मनुष्य नुसता स्नात होतो आनंदात. त्यामुळे दुसरीकडे काही लक्ष जात नाही. लक्ष परमेश्वराकडे वेधतं आणि त्याच्या आनंदातच तुम्ही ड्ंबत असता. दुसरं काहीही नको आणि मग सगळं आपोआप घडतं. आपोआप जे घडतं तेच जिवंत आहे. ही प्रक्रिया अगदी जिवंत आहे, हे समजलं पाहिजे आणि आपण नुसते एक साक्षी आहोत, ते बघायचं किंवा आम्ही कुठे होतो आणि कुठे आलो. दूसरी फारच महत्त्वाची गोष्ट सहजयोगाची, आजच्या सद्यकाळातली, ती ही, की जो सहजयोग आहे त्याचं महायोगात रूपांतर झालेलं आहे. म्हणजे पूर्वी एखाद दोन माणसं, पार व्हायच. एक-दोन फळं लागायची. पण आज, जनसाधारण अनेक, अनंत लोकांना पार केलेच पाहिजे, झालेच पाहिजे, वेळ आलेली आहे. ते पार झाल्यावर त्यांनीही इतरांना पार केलं पाहिजे. त्यांच्या हातून लोक पार होणार. एवढ्याशा साधनेतसुद्धा लोक पार होतात आणि दूसर्यांना पार करतात. आजपर्यंत असं झालं नव्हतं. मी कालच आपल्याला सांगितलं, मिल्टनचं जे पुस्तक आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे, तुम्ही देवाची माणसं , एक- दोन प्रॉफेट्स व्हायचे. पण आता की

Original Transcript : Marathi ही देवाची माणसं चट्कन प्रॉफेट्स होतील आणि ती अनेक प्रॉफेट्स आपल्यातून काढतील आणि करतील. पूर्वपुण्याईची गोष्ट बोलू नका तुम्ही कोणी. त्याबद्दल मुळीच काळजी करू नका. काय होती आमची पूर्वपुण्याई, अमुकतमुक? त्याबद्दल काही बघायचं नाही. कुठे मला हिशेबच येत नाही कशाचा, पैशाचा तर अगदीच येत नाही. आताच कोणी तरी म्हटल. मी म्हटलं, अहो, पाच पैशाची असली तरी चालेल, दोन पैशाची असली तरी चालेल. ओव्हरड्राफ्ट असला तरी चालेल. एकदाचं होऊन घ्या पार. पण पार झाल्यावर जसं मी म्हटलं, आधी अनुभव आल्यावर जाणलं पाहिजे, की आता आपण दुसर्या प्रांगणात उतरलो आहे. आपली चेतना आता सामूहिक झाली आहे. सामूहिक चेतनेत आलो आपण. चेतनाच बदलली आहे मुळी. त्याच्यामध्ये एकदम बदल आला, ट्रान्सफॉर्मेशन आलेलं आहे. फुलाचं आता फळ झालो आपण, तेव्हा सगळंच्या सगळंच बदलले आहे आणि जर ही जागतिक चेतना आपल्यामध्ये आली तर तिची जोपासना करावी लागते. ती जोपासना तुम्ही केली नाही, तर मात्र सहजयोग हरवतो परत. अशी बरीच मंडळी मी पाहिलेली आहेत. येतात पार होतात, संपलं. त्यांचे लाभ होतात, पार झाल्याबरोबर. पहिला म्हणजे लक्ष्मीचा प्रसाद. आता परवाच एक बाई म्हणाल्या, ‘माझे दागिने सापडले.’ काय ते दागिन्यात काय ठेवलं आहे? पण जाऊ दे. कोणाला नोकरी मिळाली. कोणाला धंदा मिळाला. कोणावर पैशांचा पाऊस पडला, कोणाला काय झालं, हे सगळं झालं. त्याला काय मला समजत नाही, काय त्याचं वैशिष्ट्य आहे, पण जाऊ देत. मग झालं, आम्ही आता सहजयोगी झालो. आता प्रसन्न झाली आमच्यावरती देवी. आता झालं. आम्ही ठीक झालो. कोणी सांगितलं, ‘माझ्या आईचं पटत नव्हतं , वडिलांचं पटत नव्हतं. अमुक झालं. बायको पळाली, अमकं, तमकं.’ ते ठीक झालं. काय आहे त्याच्यातही? कोणी सांगितलं माझी तब्येत ठीक झाली. वेडे होते ते ठीक झाले. अमकं झालं. हे तर करमीत कमी झालंच पाहिजे. इतकं तर होणारच . त्याला काय अर्थ आहे ! पण आत्म्याशी जो तुमचा संबंध, त्याचं जे वरदान तुम्हाला मिळालेलं आहे, ते गाठलं पाहिजे. ते जमवणं जरा कठीण जातं. कारण बाकी गोष्टींशी आपला संबंध आहे. पैसे आपल्याला समजतात, परमेश्वराची श्रीमंती नाही समजत. ती येत नाही आपल्यामध्ये. आम्ही परमेश्वरी राज्यात उतरलेलो आहोत, त्या ऐटीने रहायला पाहिजे. श्रीमंती आली म्हणजे कळतं, मोटारी घेतल्या पाहिजेत. घरं घेतली पाहिजेत. थोडंस असं डोकं करून चाललं पाहिजे. वगैरे वरगैरे समजतं. त्याचं आपल्याला बरेच निदान आहे. पण परमेश्वरी शक्ती आपल्यामध्ये आली म्हणजे आपल्या वागणुकीत, आपल्या व्यवहारात, काय चमक येते आणि आपल्या शक्तीला काय धार येते याची कल्पना फार कमी लोकांना आहे आणि कशी असणार? ते कधी पाहिलंच नाही. बहतेक भामटेच येतात. बुवा बनून. म्हणजे आत्तापर्यंत देवाच्या नावावर इतका अधर्म आणि इतका मूर्खपणा चाललेला आहे, की आपण झालो है म्हणायलासुद्धा सहजयोग्यांना लाज वाटते. ह्या मॉडर्न काळामध्ये असं म्हणायचं, की आम्ही साधू झालो आतून किंवा पीर झालो, मौलवी झालो, तर लोक काय म्हणतील ? हसतील. काय हो काय म्हणता तुम्ही? चांगलं नॉर्मल माणसासारखं बोला . काहीतरीच चालतं तुमचं. म्हणून तिकडे लक्ष द्यावं लागतं. लक्ष असं, की आता आत्म्याचा आनंद आमच्यात येऊ लागला, झिरपू लागला, पण त्याच्या प्रकाशात आम्ही चाललो आहे किंवा नाही? नवीन प्रकाश आमच्यामध्ये आलाय, 3

Original Transcript : Marathi असं दुसर्यांना दिसतंय की नाही? मग सगळे शिक्षण आत्मिक होतं. स्पिरिच्युअल एज्युकेशन सुरू होतं आणि स्पिरिटच शिकवतो तुम्हाला. आत्माच शिकवतो. आत्म्यानेच मग परमात्म्याची ओळख होते. त्याच्याशिवाय परमात्म्याला तुम्ही जाणू शकत नाही. हे लिहिलेलं आहे सगळीकडे. मी सांगते असं नाही. पण आत्म्याची ओळख न करता, कुठेही जाऊन टाळ कुटत बसले, की परमेश्वर ठाकलाच पाहिजे, असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे अशी त्यांची डिमांड आहे. म्हणजे आग्रहाचं असं म्हणणं आहे, की झालेच पाहिजे. मी एवढी पारायणं केली म्हणजे काय ? परमेश्वर अगदी बेकार दिसतो! एवढी पारायणं केली. तुमचा आत्म्याशी संबंध झालेला नाही. अनधिकार चेष्टा आहे सगळी. ते फार चुकलं तुमचं की पारायणं केली. कोणी सांगितली होती ? कबीराने सांगितलं, ‘पढ़ी पढ़ी पंडित मूरख भय !’ ते कळलं मला लंडनला गेल्यावर. अती वाचनाने लोक खरेच कसे मूर्ख होतात, ते लंडनच्या मूर्खांना पाहून मला कळलं. काही काही अती मूर्ख लोकं आहेत तिकडे. सगळेच नाहीत. पण काही काही तिकडे अती मूर्ख आहेत आणि ते सगळे सुशिक्षित, शिकलेले, मोठे विद्वान लोक आहेत. तेव्हा जी जिवंत क्रिया आहे, त्या जिवंत क्रियेला वाचन हे कशाला पाहिजे? ही एक साधी गोष्ट आहे. तुम्ही एखादं बी जर पेरायचं म्हटलं, जर पेरलं तर त्याच्यासमोर तुम्ही काही गीता वाचणार, की पारायणं करणार, की डोक्यावर उभे राहणार, की हठयोग करणार, दोन्ही पाय असे फाकवून? तासन्तास तुम्ही त्याच्यावरती मेहनत करा, ते उगवेल का? आपोआपच उगवणार आहे नां! आता ही गोष्ट फक्त लक्षात घ्यायची, की हे सगळे काही आपोआप घडणार आहे. त्याचा अंकूर तुमच्यामध्ये आहे, ती कुंडलिनी तुमच्यामध्ये आहे, ती शक्ती तुमच्यामध्ये आहे, आणि हे फक्त आपोआप सगळं घडणार आहे. हा अगदी मनामध्ये पक्का विचार ठेवायचा. आता नाही घडलं तर, ‘माताजी का नाही घडलं आम्हाला?’ म्हणून माझ्याशी वाद घालायचा नाही. नाही घडलं तर मी काही करू शकत नाही. एखादं बी खराब गेलं त्याला मी काय करणार ? पण त्याचा अर्थ असा नाही, की तुम्हीच स्वत:ला म्हणायचं की, ‘मीच वाईट आहे. माझ्यातच खराबी आहे.’ अमकं तमकं. असं नाही. त्याच्यामध्ये मग असा विचार आणायचा, की नाही घडलं नां , तर काय गोष्ट आहे बघुयात. माताजी प्रश्न विचारतील. आता कालच मी एका गृहस्थांना विचारलं, ‘काही, म्हटलं तुम्ही कोण्या तांत्रिकाकडे गेले का?’ ‘नाही. ‘काही झालं का?’ ‘नाही.’ चांगले होते. त्यांची चक्र ठीक आहेत. मग लेफ्ट नाभीवर आल्यावर विचारलं, ‘बायको कशी आहे?’ ‘बायकोच्या अंगात येतं.’ म्हटलं, झालं. अंगात येतं म्हणजे हे भूत आहे. दसर काहीही नाही. कोणाच्याही अंगात आलं म्हणजे ते भूतच आहे. हे जाणलं पाहिजे. अंगात यायला देवाला काही अक्कल आहे की नाही? की मोलकरणीच्या अंगात येत आहेत देव. आता काय सांगायचं! आणि मग झिंगतात वेड्यासारखे आणि मग पागलखान्यात शेवटी देव जातात काय? त्याला अद्वितीय शरीर पाहिजे की नाही? वाट्टेल त्या माणसाच्या अंगात देव यायला. इकडे भांडी घासली, बसल्या की आले देव त्यांच्या अंगात! म्हणजे ह्या देवाच्या व्याख्येला तरी काय करावं ! अंगात येणं वरगैरे हे सगळे भूत आहे, हे लक्षात ठेवा. परमेश्वर जर अंगात जागृत झाला, आपल्या आत्म्यामध्ये जागृत झाला तर, मनुष्यामध्ये सामूहिक चेतना जागृत होते. तो होतो. इतकेच नव्हे, पण प्रचंड शक्ती त्याच्यातून वाहू लागते. हे झालं पाहिजे. शक्ती म्हणजे काही कोणाला मारणारी नसते. ही प्रेमाची शक्ती आहे नां! तुमच्या हातून सगळ्यांच्या कुंडलिन्या अशा उठतील तुम्ही बघा. 4

Original Transcript : Marathi कालच एक तरुण इथे बसले होते, चट्कन पार झाले आणि सांगायला लागले, ‘माताजी ह्यांचं हे धरतंय, त्यांचं ते धरतंय.’ म्हटलं, ‘तुम्हाला कळलं कसं ?’ म्हणे, ‘माझं जरा दुखतंय ना त्याने कळलं मला.’ पटापट् सांगायला लागले दुसर्यांना, ‘अहो, असे बसा. तसे बसा. जरा हलके बसा. काय करता तुम्ही? अगदी हलके बसा. आत्ता होतंय. आता ह्याला महायोग का म्हणायचं? विशेष म्हणजे सातही चक्र सहस्रारात आहेत. त्यांचं स्थान सहस्रारात आहे. ही चक्र ह्यांनी सांगितली तुम्हाला आता ती सर्व चक्र सहस्रारामध्ये आहेत. म्हणजे त्यांचे स्थान आहे. त्यांची जागा आहे. आसन आहे त्यांचं. सीट आहे त्यांची. हे आज्ञा चक्र आहे. हे मागे आहे ते मूलाधार चक्र आहे. इकडे स्वाधिष्ठान आहे. हे नाभी चक्र आहे. हे हृदय आहे आणि नाभीचा थोडा भाग इथे पण आहे. ही विशुद्धी आहे. हे चक्र विशुद्धी आहे आणि सबंध अकरा रूद्रांचं, एकादश रूद्र इथे आहे. अशी सगळी चक्रं आपल्या सहस्त्राराच्या प्रांगणात आहेत. म्हणजे लिंबिक एरिया ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, ह्या एरियामध्ये आहे आणि सर्व विश्वाची कुंडलिनी आज सहस्त्रारावर आलेली आहे. म्हणजे साऱ्या चक्रांवर तिचं कार्य आहे आणि म्हणूनच हा महायोग आहे. म्हणूनच आधी एक एक चक्रावर एक एक इनकार्नेशन आलेत आणि त्यामुळे त्या त्या चक्राचं कार्य झालेलं आहे आणि आज इथे ही कुंडलिनी आलेली आहे, तिथे मोक्षच मिळाला पाहिजे. कारण सातही चक्रांवरती तिचं राज्य आहे. सर्व शक्तींमध्ये सातही चक्रांना ती सांभाळून आहे. जेवढी सर्व देवीची नावं आहेत, ती सर्व आहेत. त्यामुळे कोणतेही परम्युटेशन, कॉम्बिनेशन्स असले तुमचे, कोणताही तुमचा त्रास असला, काही असलं, तरी चक्रांना ही कुंडलिनी बरोबर धरून पार करते. कारण सगळं तिथेच आहे. पूर्वी एक एक चक्रांवर कुंडलिनी चढवायची. समजा नाभीवर अडकली की नाभीचे मंत्र त्याला सांगायचे. तो घोकत बसायचा तीन जन्म. नाभी उघडली, की मग त्याच्यावर, आज्ञावर अडकली तर आज्ञाचं, तो घोकत बसायचा तिकडे. पण त्याचा दुरूपयोग हा झाला की, ‘मंतर दे रहे हैं.’ आता मंतर द्यायला कशाला गुरू पाहिजे? गाढवही देऊ शकतो? लंडनला तर असे मंत्र दिलेत, इंगा आणि ठींगा. आता बघा. त्यांना काही येत नाही बिचार्यांना संस्कृत. त्यांना सांगितलं की तुम्ही ठींगा मंत्र घ्या, नाहीतर इंगा मंत्र घ्या. आता काय सांगावं ? आता मंत्र एक एक ठिकाणी तेव्हा देता येतो, जेव्हा ती कुंडलिनी वर चढून एका ठिकाणी थांबली आहे. पण ही जेट कुंडलिनी आहे. आज इथे तर उद्या तिथे. इतकेच नाही तर ह्या क्षणाला एखाद्याची कुंडलिनी तुम्ही चढवतांना बघाल, तर ती अध्ध्या रस्त्यावर येऊन थांबली आणि तुम्ही नाव घेतलं की सट्कन वर. झाले पार . जबरदस्त शक्ती वाहून राहिली आहे आणि त्या शक्तीचं स्वरूप जे आहे, अती सूक्ष्म आहे आणि प्रकांड आहे. जितकं सूक्ष्म असेल तितकं प्रकांड असतं. जसं एच बाँब आहे. हायड्रोजन बाँब आहे, तो अती सूक्ष्म तत्त्वावरती आहे, की हायड्रोजनचे दोन अॅटम वेगळे केले, म्हणजे ते जेव्हा परत भेटायला येतात तेव्हा एकदम एक्स्पोलजन होतं. अगदी तसेच आहे हे. अती सूक्ष्म आहे ही. अती सूक्ष्म आहे आणि प्रकांड आहे. त्यामुळे हे कार्य घडत आहे. त्याबद्दल तुम्ही शंका जी काढता जी ह्या बुद्धीने, ती बुद्धी सीमित आहे. त्याच्या पलीकडची ही घटना आहे. ती घटना तुमच्यामध्ये घटित झाली पाहिजे. मुख्य हे आहे. ती घटना जर घटित नाही झाली तर तुमचं शहाणपण काही कामाचं नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. 5

Original Transcript : Marathi ती घटना घटित होण्यासाठी थोडसं कमी करा. तुमच्यात शिष्टपणा असेल तर तो शिष्टठपणा इथे चालायचा नाही. हे सगळं काही जागृत कार्य आहे. हे ज्याला घडलं, झालं, तो धन्य ! बाकी तुम्ही असाल मोठे लाटसाहब तर बसा घरी. त्या कुंडलिनीला फिकीर नाही त्या गोष्टीची. तुम्ही कोण? अहो, म्हणे आम्ही कोण? तर आमचा एवढा मोठा पगार. बरं, का ? ठेवा. तुमच्या मोटारी कोणत्या ते बघत नाही कुंडलिनी. नम्रपणे घ्यायला पाहिजे. सारं कार्य हृदयाचं असल्यामुळे हृदयाने विचार करता आला पाहिजे. तो येतो का आपल्याला? पहिल्यांदा हे बघा. हृदय एवढं पाहिजे. आता ह्या पुण्यभूमीमध्ये तुम्हाला हृदयं खूप मोठी मिळालेली आहेत. हे मात्र खरं आहे. आता मुंबईचं मला सांगता येत नाही. मुंबईला मोठ्या मोठ्या हृदयाचे लोकसुद्धा असे होऊन जातात अगदी. पण तरीसुद्धा ह्या पुण्यभूमीचं फार मोठं माहात्म्य आहे आणि त्या माहात्म्यामुळेच तुम्ही लोक पार लवकर होता. पण आम्ही परमेश्वराला शोधतो आहे आतून. नक्कीच शाोधतोय. हा विश्वास आपल्याबद्दल तरी पूर्ण ठेवा. कारण त्या श्रेणीतले लोक पार होणार आहेत. जे शोधत नाहीत, परमेश्वर काही त्यांच्या पायावर येणार नाही. सहजयोगात कोणत्याच प्रकारची मेंबरशीप वगैरे नाहीये. कोणत्याच प्रकारचं ऑर्गनायझेशन वरगैरे नाहीये. हा सहजयोगी मेंबर आहे, असं कोणी म्हणू शकत नाही. सहजयोगी व्हावा लागतो. बनावा लागतो. घडावा लागतो. तो जर घडला नाही, तर त्याला कोणी सहजयोगी म्हणणार नाही. असाल कुठले लाटसाहेब तर बसा. आधीच मी सांगितलेले आहे. त्याचा काहीही फायदा नाही. तर ही घटना घडावी आणि ते व्हावं, जे आम्ही आहोत. त्यासाठी आईची करूणा वाहते आहे. त्या गंगेत आम्ही हात धुवून घ्यावा. ह्या अशा एका साध्या, सरळ वृत्तीने सहजयोग घडला पाहिजे. बुद्धीने आणि चिकित्सा करून सहजयोग घडत नाही. तुम्ही कसली चिकित्सा करता हो? कुंडलिनी ही आपोआपच चढणार असल्यामुळे तुम्ही तिच्याशी काही वादविवाद घालणार आहात का ? माझ्याशी घाला. मी उगीचच तुमच्याशी बोलते. पण तिकडे कुंडलिनी आणखीनच थिजत चालली. तिकडे लक्ष ठेवा. इकडे तुम्ही माझ्याशी वाद घालता आणि तिकडे कुंडलिनी थिजायला लागली. कशाला वाद घालता. ते होऊ देत. घडू देत. इतरांचे झालंय तस आमचेही व्हावे. त्यापुढे ती जागतिक चेतना आमच्यामध्ये पूर्णपणे जागृत व्हावी आणि सबंध संसाराचे आज जे परिवर्तन होणार आहे, त्याच्यामध्ये आमचाही मोठा हात असावा. उद्या सर्व संसारातले देश , विदेश आपल्या चरणावर इथे येणार आहेत. पण तुम्हाला कल्पना नाही, की तुम्ही कुठले दिवे आहात ते. हा मोठा प्रश्न आहे. शंभरदा जरी सांगितलं की, अहो, तुम्ही फार मोठे लोक आहात. स्वत:ची किंमत कमी करू नका. तरी ते काही लोकांना समजत नाही. कारण सगळे पैशावरच अवलंबून आहे नां! स्वत:ची किंमतसुद्धा! किंवा सत्ता! तुम्ही जे आहात तेवढे मोठे नसता, तर आम्ही ह्या मुंबई शहरात कशाला आलो असतो वारंवार! तुमच्या सेवेला! दहा वर्षापासून कशाला एवढी मेहनत केली असती? पण तुम्हाला स्वत:ची जाणीव मात्र नाही ही गोष्ट निर्विवाद आहे. दहा वर्षाच्या मेहनतीत कमीत कमी पंधरा हजार लोकांना मी पार केलेले आहे ह्या मुंबई शहरात. पण तरीसुद्धा ते पार झालेले कुठे गेले आणि थोडेसेच लोक का पुढे आले ? ह्याला कारण स्वत:ची किंमत नाही. वेळ नाही मुळी! स्वत:साठी वेळ नाही. तेव्हा स्वत:साठी वेळ द्या. तुम्ही मोठी माणसं आहात म्हणून सांगते. स्वत:साठी वेळ द्या. स्वत:ची किंमत करा. स्वत:ला समजून घ्या. काहीतरी आहे, म्हणूनच माताजी सारखं म्हणतात. मग उद्या कॅन्सर झाला 6.

Original Transcript : Marathi म्हणजे मग माताजींकडे येतातच. ‘माताजी, मला कॅन्सर झाला. आता तुम्हीच मला यातून सोडवा.’ म्हणजे माझं असं म्हणणं नाही, की सहजयोग केला म्हणजे कॅन्सर बरा होतो. पण माणसाचं असं आहे, की अती काहीतरी झाल्याशिवाय तो परमेश्वराची आठवण करत नाही. हे शहाणपणाचं लक्षण नाही. शहाणी माणसं आहेत त्यांनी समजलं पाहिजे, की काहीतरी विशेष आहे, ते मिळवून घ्यावं आणि आम्ही आहोत विशेष, ते मिळवणार आम्ही. इतकेच नाही तर त्या जागतिक चेतनेतले आम्ही मोठे, भारी स्तंभ आहोत. ते स्तंभ बनून आम्ही उभे राहू शकतो. हे सगळे तुमचे लीडर्स वरगैरे बेकार आहेत हो. आले नी गेले. काय त्यांचं आहे ? काय त्यांना आहे ? काय आहे त्यांच्यात व्यक्तित्व ? सगळ्यांचं पाजळलेलं ज्ञान दिसतच आहे. तुम्ही तयार व्हायला पाहिजे. तुम्ही परमेश्वराला शोधायला निघालेत नां! मग आम्ही देतो तुम्हाला! हे घ्या. आम्ही देतो म्हटल्यावर सगळे रागवले. तसं करायचं नाही. अहो, आम्ही कोण देणार ? तुमचेच तुम्ही घ्या. आम्ही काही देत वगैरे नाही. नुसतीच मेहनत आहे आमची. तेव्हा नम्रपणाने कुंडलिनी शक्ती जागृत करून घ्या. ती तुम्हा सर्वांमध्ये आहे. ती आहे किंवा नाही त्याचा पडताळा घ्या. ते व्यवस्थित बघून घ्या. प्रत्येक ज्ञानाला एक पाचवं डायमेन्शन आहे आणि ते आहे आत्म्याचं. कोणतेही, तुमच्या फिजिक्सला आहे, तुमच्या केमिस्ट्रीलासुद्धा आहे ते. तुमच्या मेडिकल सायन्सला आहे. तुमच्या सगळ्या सायन्सला पाचवं डायमेन्शन तुम्ही जर घातलं नाही, तर सगळं अर्धवट आहे. तेव्हा पाचवं डायमेंशन तुम्ही आत्म्याने मिळवून तुमचं जे ज्ञान आहे ते बघा म्हणजे कळेल मी काय म्हणते ते. बरं, आता फार उशीर झाला. आता आपण सगळ्यांना पार करूयात. ते झालं म्हणजे झालं. ह्या भाषणाने होणार तरी काय आहे ? काय आहे, एखादा सेन्सिबल प्रश्न असला तर विचारा. सेन्सिबल असला पाहिजे बरं का! काहीतरी बडबडायचं म्हणून विचारू नका. इतकी काही राजकियता काही नाही. मला काही इलेक्शन लढवायचं नाही. असला प्रश्न तर विचारा. घाबरू वगैरे नका. आता एक प्रश्न मला कळतोय जो तुम्हाला विचारावसा वाटतो तो, की कुंडलिनी वरती यायची म्हणजे माताजी, म्हणतात, त्याला फार त्रास होतो आणि त्याला फार कठीण तपस्या करावी लागते. वरगैरे वरगैरे असा प्रश्न डोक्यात येतो. कारण वाचलेलं आहे बरचस त्याबद्दल. आता ज्याला मोटर चालवता येत नाही, त्याला जर मोटर दिली तर तो सगळ्यांवर जाऊन धडकणार. असे लोक कुंडलिनीला हात घालायला गेले, की तुम्ही असं म्हणायचं की ते मोटर चालवणं म्हणजेच स्वत:ला मारण्यासारखं आहे. तशातलाच प्रकार आहे. ज्याला येत नाही त्याने हात कशाला घालायचा? मग आम्ही असू कोणीतरी म्हणून असं होतंय. हे दुसरं घ्या. असल्याशिवाय कसं होईल ? आहे, आमच्याबद्दल सगळे लिहिलेलं आहे. त्याला काही दूर जायला नको. ते नंतर तुम्ही ओळखून काढालच, का होतय ते ? आणि जे लोक असं सांगतात, की फार अभ्यास करावा लागतो वगैरे, वगैरे किंवा त्याच्यासाठी फार मेहनत करावी लागते, स्वच्छता करावी लागते. झालं, तुमचं पुष्कळ झालं. लहान मुलाला सांगितलं की तू स्वच्छ होऊन रहा. तो आपला पाय रगडत बसतो. आई आली की म्हणते, झालं, तुझं पुष्कळ झालं. इकडे ये. थोडासा साबण वगैरे लावला की पाय स्वच्छ! तशातलं आहे. लहान मुलांची काय अल्पधारिष्टता आहे! तुम्ही काय स्वच्छता करणार? कुंडलिनी तर जागृत झालेली नाही. कसली स्वच्छता करता हो? अहो, जर प्रकाशच आलेला 7

Original Transcript : Marathi नाही, तर स्वच्छता करता कशाची ? प्रकाश आल्यावर करून बघा. आपोआपच होते स्वच्छता! हं, आणखीन विचारा. काय प्रश्न असेल ते. प्रश्न : (अस्पष्ट) उत्तर: सांगितलं नां त्याला काही टाइम नसतो. बघा, काही लोकांची कुंडलिनी जी चढते, ती अगदी तिथपर्यंत आणि काही लोकांची चढली नाही की घसरली. ते गुरूवर अवलंबून. आता घाणेरडे गुरु पुष्कळ निघाले. एकाहून एक विक्षिप्त. काही घाणेरडे आहेत, काही मूर्ख आहेत. काही संन्यासी आहेत. संन्याशी लोकांनी जर कुंडलिनी चढवली असती, तर झालं. संन्यासी वगैरे चालत नाही सहजयोगाला. सर्वसाधारण, नॉर्मल माणसं पाहिजेत. हे संन्यासी म्हणजे नुसतं थोतांड आहे, थोतांड. संन्यस्त मनुष्य आतून असतो बाहेरून होत नाही. आता रस्त्याने आम्ही निघालो तर, ते जैन नागवे निघाले होते. म्हटलं, काय हे! आता काय म्हणायचं, महामूर्खपणा! परमेश्वराचा अपमान आहे. असं सगळीकडे पसरलंय, काही नां काही तरी. हे थोतांड, ते थोतांड. पण एखाद्या सत्पुरुषाशी संबंध असला तुमचा. तर कदाचित मी हे जरूर सांगेन, की तुम्ही पार नाही होऊ शकत. पण त्याने अडथळे येत नाही. कुंडलिनीला अडथळे येत नाहीत. हं बोला . प्रश्न: कुंडलिनी सगळ्यांमध्ये असते का ? उत्तर : हो, हो, फक्त राक्षसांना नसते. नाही का ? पण आहे तुमची मला माहिती आहे. करते नां , बसा बसा, मी करायलाच आले आहे. धावत पळत आले. बसा, बसा. बसूनच होणार आहे. आरामात बसा. करते तुमची. सगळ्यांना आहे. जागृत झाली नाही ह्याचा अर्थ असा नाही की नाहीये. चांगली आहे. व्यवस्थित आहे. बसा, बसा. हूं बोला आणखीन काय? (इंग्लिशमध्ये प्रश्न) अहो, भयंकर त्रास आहेत कुंडलिनी जागृत करण्यात. पण करतेय मी. नंतर तुम्ही करू शकता पार झाल्यावर. आता इथे पुष्कळ, ५०% लोकांना सगळें माहिती आहे. ५०% इथे बसले आहेत. तुमहाला दिसतात का काही वेगळे ? त्यांच्या हातावर कुंडलिनी फिरते आहे. कमीत कमी ५०% बसलेत इथे. तुम्ही ओळखणार नाही. तुम्हाला काही वाटायचं नाही. पण ते बोटाने फिरवताहेत कुंडलिन्या. प्रश्न : (अस्पष्ट) उत्तर : त्यांचं काहीतरी कन्फ्युजन आहे. ती कुंडली म्हणजे होरोस्कोप आहे. ही कुंडलिनी म्हणून एक शक्ती आहे. हं पुढे. एक तुमचा बर्थ झाला, सेकंड बर्थ जो आहे तुमचा ज्याला द्विज म्हणतात किवा ब्राह्मण म्हणतात, जे ब्रह्मतत्त्वाला जाणणं म्हणतात. तो सेकंड बर्थ आहे पक्षाला द्विज म्हणतात. माहिती आहे नां तुम्हाला. एक अंड्यासारखा जन्म असतो आणि नंतर मग त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यावरती दूसरा जन्म असतो त्याला. तसेच हा 8.

Original Transcript : Marathi जो दुसरा जन्म आहे तुमचा, तो, त्याबद्दल सांगते आहे मी. कळलं कां ? प्रश्न : कुंडलिनी जागृत झाल्यावर परत ती झोपते का? उत्तर : कधी कधी झोपते. आता तुम्ही तिच्यामागे हात धुवूनच लागलात, मग काय करणार ? मग ती पळते आपल्यामध्ये आणि तिथे जाऊन झोपते. मग काय करणार? जागृती झाल्यावर त्याची मी तुम्हाला सांगणार आहे ट्रिक. कुंडलिनीला कशी खूष ठेवायची? जागृत कशी ठेवायची? सगळं काही सांगणार आहे. पण जमत नाही काही काही लोकांना. तरी तेच धंदे. एका गृहस्थांची आम्ही कुंडलिनी जागृत केली. मग, त्यांची दारू सुटली. सिगरेट सुटली. सगळें काही झालं. तर चोऱ्यामाऱ्या करू लागले. म्हटलं, की तुमची जागृत झाली, ती खाली पडली. परत नीट करा. तर परत नीट करण्याच्याऐवजी परत त्यांनी सुरू केले धंदे. मग दारू प्यायला लागले. एक- दोनदा बिघडली कुंडलिनी. झाले व्हायब्रेशन्स गेले. सगळं झालं. एका बाईने कुंडलिनी जागृत झाली तर एक सेंटर चालवलं सहजयोगाचं. आणि तिथे मग हळूहळू तिने ब्लॅक मॅजिक सुरू केलं. लोकांना सांगायचं, घोड्याचा नंबर काय आहे ? अमुक तमुक. हे सगळे प्रकार केल्यावर काय होणार आहे ? कुंडलिनी कशी जागृत होईल. त्याचे नियम आहेत. हं बोला . प्रश्न : … पॉवरफुल आहे नां, मग हे बाकीचे धंदे का करतात? उत्तर : ९९% सुटतात हो, पण काही काही लोक पॉवरफुली ह्याने करतात. काय करायचं? ती तुम्हाला मदत करते. पण तुम्हाला संपूर्णपणे तिच्यावर टाकता येत नाही. तुम्हाला विल पॉवर पाहिजे. तुम्हाला इच्छा पाहिजे. कुंडलिनी काही तुम्हाला फोर्स नाही करणार….. असता, पण हरवतं. प्रश्न: आपलं कोण हलवणार आहे? उत्तर : तुम्हीच. तुम्ही राहता. मुश्किल तर ही आहे नां माणसाची. तेवढी तयारी नसते. म्हणून जरा मेहनत करावी लागते. काय आहे, की वाट्टेल त्या माणसाला आम्ही बोलवतो. पूर्वी दहा माणसातून एकाला गुरू बोलवत असत. त्याला आधी उलटं विहिरीवर टांगायचे तीन दिवस. त्यातून बचावले तर दोन-चार दणके. त्याच्यातून बचावले तर त्याच्या गळ्याला दोरा बांधून हलवायचे त्याला. तेव्हा त्यांना पार करत असत. पण माताजींच तसं नाही. या बुवा कसेही असले तरी पार होऊन घ्या. मग थोडी मेहनत पाहिजे. थोडं कच्चं काम असलं तर थोडी मेहनत नको. एखादं जर फोर्थ हँडशीप (चार वेळा विकलेली वस्तू) असलं तर त्याला रिपेअर करावं लागतं जरा. न्यू असतं तर मस्त आहे. काही विचारायला नको. तेव्हा घाबरू नका. तुमचं तसं नाही दिसत. तुमचं ठीक आहे. प्रश्न : ….. (अस्पष्ट) उत्तर : अहो, रिबर्थ म्हणजे काय समजले तुम्ही! प्रिव्हिअस बर्थ नाही. नेक्स्ट बर्थसुद्धा नाही. काय करायचं आहे नेक्स्ट बर्थ घेऊन? काय होणार आहे? तुम्ही भविष्य आणि भूतकाळाची चिंता करू नका. विसरून जा. वर्तमानात रहा. कळलं का? 9

Original Transcript : Marathi मागच्या वर्षी अकलूजला आमचा प्रोग्रॅम झाला, तेव्हा मी म्हटलं होत सहजच, की पेनिसिलिन फॅक्टरीमध्ये बघा प्रयत्न करून. बरीच मंडळी पार होतील. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं नाही, की माताजींनी पेनिसिलीन फॅक्टरीचे नाव का घेतले? त्याला कारण असं की माझ्या भावाच्या लग्नात मी आले होते पुण्याला आणि तुमच्या गेस्टहाऊसमध्ये थांबले होते. सकाळी उठून इथे मी खूप अनवाणी फिरले. माझी अशी इच्छा होती, की ही जागासुद्धा जर चैतन्यमय झाली, तर जी कामगार मंडळी इथे येतील, त्यांच्यावर ह्या वातावरणाचा अवश्य परिणाम होईल आणि त्याचं आज मात्र दृश्य दिसलं. तेव्हा सीता आणि राम हे महाराष्ट्रामध्ये अनवाणी का फिरले? त्याचेही कारण आपल्या लक्षात येईल. परमेश्वराने फार कार्य केलेले आहे. त्याची आपल्याला जाणीव नाही, की आपल्यासाठी परमेश्वराने काय काय कार्य केलेले आहे. सबंध सृष्टीच बघा परमेश्वराने किती सुंदर रचली आहे. रोजच्या आपल्या जेवणातसुद्धा आपण बघतो, पण आपल्या लक्षात येत नाही, की जे आपण अन्न खातो, जी आपण फळं खातो, ही फळंसुद्धा परमेश्वराने आपल्यासाठी तयार केलेली आहेत. एका फुलातून आपण फळ काढू शकत नाही. एकसुद्धा आपण जिवंत कार्य करू शकत नाही. सायन्सचं असं म्हणणं आहे, की आम्ही अमिबापासून माणसं झालोत . ते तरी परमेश्वरानेच केलेले आहे. अनेक वेळेला संसारामध्ये परमेश्वराचं अवतरण झालं, विष्णूस्वरूपात आणि त्याने हे उत्क्रांतीचं कार्य, हे इव्होल्युशनच कार्य केलेले आहे. पण जेव्हा जेव्हा ही अवतरणं संसारात झाली, तेव्हा लोकांना हे समजलं नाही, की ह्याचा आपल्याला काय लाभ होतो? त्यामुळे आपल्यामध्ये कोणती अशी .होते. त्यामुळे आपल्याला कोणती अशी वरची अशी पायरी मिळते? श्रीविष्णूंनी कशाला दशावतार घेतले? असा आपण का विचार करत नाही ? आणि जर व्यवस्थित बघितलं तर बघा आधी मत्स्यावतार आहे. मत्स्यावतार का घेतला? कारण आधी मासळीच बाहेर आली पाण्यातून. त्याच्यापुढे एक एक अवतार बघितले तरी तुमच्या लक्षात येईल, की मग सरपटणारे प्राणी तयार झाले. अशा रीतीने अनेक तऱ्हेचे जे प्राणी तयार झाले, त्यामध्ये परमेश्वराचा हात आहे. शेवटी आता मानव झाले. हा मानव झाला, त्यातसुद्धा ख्रिस्ताचा अवतार सगळ्यात शेवटचा असे आपण म्हणू. त्याच्यानंतर झाले. महावीर झाले. नानक, कबीर हे सगळे झाले. ज्ञानेशांसारखे मोठे मोठे संत, साधू आपल्या ह्या महाराष्ट्रात झाले. त्यांची बुद्ध नावं घ्यावीत तेवढी थोडी. नामदेव झाले, एकनाथ झाले, तुकाराम झाले. रामदास स्वामींसारखे फार मोठे संत होऊन गेले. त्यांनी आपल्यामध्ये धर्म स्थापन केला। आपल्या आत. मनुष्याचा त्यांनी धर्म बांधलेला आहे. बाह्यात नाही. देवळं बांधली. आम्ही हिंदू झालो. मशिदी बांधल्या आम्ही मुसलमान झालो. ख्रिश्चन लोकांनी चर्च बांधले आम्ही खरिश्चन झालो. तुम्ही फक्त मानव आहात. ही गोष्ट प्रथम मानली पाहिजे. ख्रिस्तांनीसुद्धा म्हटलेलं आहे, की जे माझ्या विरोधात रहात नाही, ते माझे आहेत , ते कोण ? पण त्यांना बोलूच दिलं नाही. तीन वर्षात त्यांना संपवून टाकलं. तीन वर्षे फक्त ते बोलले. त्याच्यानंतर त्यांना बोलू दिलं नाही. साईनाथांसारखं फार मोठ दत्तात्रेयांचं इथे वरदान आलं होतं. ते मुसलमान होते. तरी आपण मानतो नां त्यांना! ते दत्तात्रेय होते हे आपण मानतो नां! ते कसं कळलं आपल्याला? ते दत्ताचेच अवतार होते खरे, हे आपल्याला कसं कळलं? त्यांच्या शक्तीमुळे कळलं आपल्याला. त्यांच्यात जी शक्ती होती त्यामुळे आपल्याला 10

Original Transcript : Marathi कळलं. पण त्याच्यामध्ये एक स्थिती मानवाची आलेली आहे, की तुम्हीच स्वत:ची शक्ती जाणून घ्या. अष्टविनायक हे खरे की खोटे? ज्योतिर्लिंग हे खरे की खोटे ? इतकेच काय की लंडनमध्ये मी पाहिलं, की तिथल्या लोकांना काही माहिती नाही. तिथे स्टोनहेंज म्हणून एक जागा आहे, तिथेसुद्धा असे दगड बाहेर निघालेले आहेत आणि त्यांना व्हायब्रेशन्स, चैतन्य लहरी आहेत. त्यांना काही माहिती नाही, हे आहे काय? त्यांना काही काही नावे देतात, हे आहे, ते आहे, पण तिथे बघितलं की कळतं, की व्हायब्रेशन्स आहेत. तेव्हा तुमचा परत जन्म झाला पाहिजे, हे प्रत्येकाने सांगितलेले आहे. मुसलमान लोक त्याला ‘पीर होणे’ म्हणतात, की तुमचा पीर झाला पाहिजे. नानकांनी त्याला पार होणे म्हटलेले आहे. नानक आणि मोहम्मदांमध्ये काहीच फरक नाही. एवढासुद्धा फरक नाही. एकच आहे, ख्रिस्तांनी त्याला ‘यू आर टु बी बॉर्न अगेन’ असं स्पष्ट सांगितलेलं आहे. ‘तुमचा परत जन्म झाला पाहिजे.’ बाप्तिस्मा म्हटलेलं आहे. बाप्तिझम. हिंदू धर्मात त्याला ब्रह्मत्त्व म्हटलेलं आहे. ब्राह्मण झाला पाहिजे. आपल्याकडे आता ब्राह्मण जन्मानुसार होतो. तसे काही नाही. व्यास मुनी ब्राह्मण नव्हते, ज्यांनी गीता लिहिलेली आहे. ते एका कोळीणीचे पुत्र होते. वाल्मिकी हे स्वत: कोळी होते. जन्मानुसार धर्म असतो, वगैरे अशा भ्रामक कल्पना डोक्यात घालून काहीतरी तुम्ही वेगळे आणि हे वेगळे. संसाराची कशी घडी मोडायची? त्यांना कशा रीतीने विलग करायचं? तोडून टाकायचं? आपापसामध्ये कसं वैमनस्य आणि द्वेषाचं राज्य स्थापन करायचं? हे ह्या लोकांनी कार्य केलेले आहे. पण मानव हा परमेश्वरातला एक अंगप्रत्यंग आहे. परमेश्वर जर एक शरीरय्ष्टीपूर्ण असला तर त्यातला प्रत्येक सेल हा मनुष्य आहे. प्रत्येक पेशी हा मानव आहे. फक्त तो जेव्हा जागृत होतो, तेव्हाच त्याला कळतं, की ह्या सबंध विराटाचे आपण एक अंगप्रत्यंग आहोत. ते झाल्याशिवाय ते कळत नाही. बाह्यत: आपण काहीही गोष्ट केली. तुलसीदासांचं तसं झालं. तुलसीदासांनी स्वत: रामाला टिळा लावला आणि राम येऊन समोर उभे राहिले. त्यांना ओळखलं नाही. ख्रिस्ताला कोणी ओळखलं ? जर ओळखलं असतं तर त्याला कोणी क्रॉसवर घातलं असतं? साक्षात् परमेश्वराचा पुत्र गणेशाचा अवतार आहे. साक्षात् ब्रह्माचा अवतार आहे. ब्रह्म साक्षात् अवतरले. त्यांना तुम्ही क्रॉसवर चढवलं. जर त्यांनी ओळखलं असतं, की साईनाथ हे, आत्ताच परवाची गोष्ट आहे, हे दत्ताचे अवतार होते, ह्या तुमच्या महाराष्ट्र भूमीतच त्यांना जेवायलासुद्धा नव्हतं. तुम्ही मोठे दत्तभक्त! तुम्ही ओळखल का दत्ताला? आता ते गेल्यावर मात्र त्यांच्या पूजापाठ सगळं सुरू आहे. पण भामट्यांना मात्र त्यांच्या जीवनातच तुम्ही फार मान्यता दिलेली आहे. तेव्हा ते अज्ञानातच घडलं. तुम्हाला ज्ञान नव्हतं. चक्षू नव्हता. बघायला हवं. त्यामुळे हे घडलेलं आहे. त्याबद्दल सगळ्यांना परमेश्वराने क्षमा केली पाहिजे. जे झालं ते विसरायचं. मागचं पुढचं विसरून गेलं पाहिजे. फक्त आता काय आहे ते मिळवा आणि ते मिळविण्यासाठी आपल्यामध्येच परमेश्वराने ही शक्ती ठेवलेली आहे. अनादि कालापासून आपल्यामध्ये ही आई कुंडलिनी, जगदंबा तिला म्हटलेलं आहे, आपल्यामध्ये परमेश्वराने ठेवलेली आहे. ती अंकुरासारखी सुप्तावस्थेमध्ये आहे. त्रिकोणाकार अस्थीमध्ये असते. त्याला इंग्लिशमध्ये सेक्रम असं म्हणतात. बघा, सेक्रमचा अर्थ आहे सिक्रेट. म्हणजे पॉवर. पवित्र. त्यावेळेलासुद्धा लॅटिन भाषेमध्ये लोकांना माहिती होतं, की ही म्हणजे काहीतरी विशेष पॉवर आहे. ह्या शक्तीच्या जागृतीने 11

Original Transcript : Marathi तुम्हाला आत्म्याचं दर्शन होतं. असं लिहिलेलं आहे. ही शक्ती आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे. जर ही शक्ती जागृत झाली तर नुसतं भाषणाने किंवा कोणता तरी विचार घेऊन आम्ही ठीक आहोत. आम्ही जे केलं ते ठीक आहे. आम्हाला हेच पटतं. आपलं आयुष्य वाया घालवायचं. जर आम्ही ह्या मशिनला मेन्समध्ये लावलं नाही, तर हे चालू होणार नाही. ह्याच्यात शक्ती येणार नाही. जे ह्याला बनवण्यात, मेहनत करण्यात, जे काही आम्ही श्रम घालवले, ते सगळे वाया गेले. तुम्हाला मेहनत म्हणून जे परमेश्वराने बनवलेले आहे, त्याचा जोपर्यंत तुम्हाला अर्थ लागणार नाही, जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुम्ही काय आहात, तोपर्यंत तुम्हीसुद्धा वाया जाणार. तर तुमचा संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे. ‘सहज’चा अर्थ आहे जन्मसिद्ध परमेश्वराशी योग होण्याचा तुमचा जो संबंध आहे, तो जन्मसिद्ध आहे. तो तुमच्यामध्ये जन्मसिद्ध आहे. हा अंकुर रूपाने, शक्ती रूपाने कुंडलिनी रूपाने तुमच्यामध्ये वास करतो. पण ही कुंडलिनीसुद्धा सहस्रारात जागृत होत नाही. ही गोष्ट निर्विवाद आहे. जर एखाद्या रानटी माणसाला एक बी दिलं आणि वृक्ष काय आहे हे त्याला माहिती नाही, त्याला सांगितलं की ह्या बी पासून एवढा मोठा वृक्ष झालेला आहे. तर तो म्हणेल हे कसं शक्य आहे हो? तो ते मोडून बघेल, तोडून बघेल, म्हणेल, आम्ही ह्याच्यात घुसूनही पाहिलं तरी आम्हाला कळलं नाही. ही शक्ती असती तर ह्याच्यात दिसलं असतं. पण एका माळ्याला दिल्यावरती त्याला माहिती आहे, की ह्या भूमीमातेच्या उदरात घेतल्यावर ह्याला अंकूर फुटणार. कारण त्याच्यात ती शक्ती सुप्तावस्थेत आहे आणि म्हणूनच आईचं स्वरूप पाहिजे. कारण मेहनत करायला आईच तयार असते. रागवणं, बिघडणं हे फार सोपं काम आहे. पण प्रेम करणं हे लोकांना कठीण वाटतं. आम्हाला काही कठीण वाटत नाही. तसेच कुंडलिनीचं जागरण अशाच लोकांच्यामुळे होणार आहे. जे स्वत: प्रेमस्वरूप आहेत. ज्यांच्यामध्ये प्रेम नाही, ज्यांच्यामध्ये परमेश्वराचा साक्षात्कार नाही, ज्यांना ह्याचा अधिकार नाही, त्यांच्यासमोर कुंडलिनी जागृत होणार आहे. आता आपलेच बघा. जर शाळेचा मास्तर आला तर मुलं लगेच उभी राहतात. पण जर शाळेचा एक हमाल आला, तर मुलं उभ राहणार आहेत का? ज्याचा अधिकार असेल तोच हे कार्य करू शकतो आणि हा अधिकारसुद्धा प्रेमाचा आहे. ते आपल्याला समजत नाही. अधिकार म्हंटला म्हणजे दंडके पाहिजे हे समजतं . पण हा प्रेमाचा अधिकार आहे. ज्या माणसाला ह्या प्रेमाचा अधिकार असतो, तोच ही कुंडलिनी जागृत करू शकतो, असं विधान आहे. इतकेच नाही तर ज्यांनी हिंदु धर्माची स्थापना केली, जे त्याचे प्रेरक होते त्या आदि शंकराचार्यांनी तर हे सांगितलेलं आहे, की योग, सांख्य वगैरे करून, त्याच्यावर वादविवाद करून, त्याच्यावर भाषणं देऊन त्याच्याबद्दल पुष्कळ बोलून किंवा काही डोक्यावर उभं राहून किंवा भजनं म्हणून किंवा काहीही म्हणून परमेश्वर मिळत नाही. कुंडलिनीच्या जागृतीने मिळतो आणि कुंडलिनीची जागृती ही आईच्याच कृपेने होते. अगदी स्पष्ट लिहिलं आहे आणि शेवटचं त्यांचं पुस्तकसुद्धा जे ‘सौंदर्य लहरी’ म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्यात त्यांनी काहीही विवेचन केलेले नाही. पहिल्यांदा ‘विवेक चुडामणी’ म्हणून पुस्तक लिहिलं. त्याच्यात काहीही केलं नाही. फक्त त्यांनी आईची स्तुती केली. तिचे जे एक हजार चक्र त्यांना माहिती होते त्याचं विषद वर्णन, ती ‘हूं’ म्हणते तेव्हा त्याला काय अर्थ आहे. ती ‘हां’ म्हणते तेव्हा काय होतं ? तिचे कसे काय ते फिरतात ? आणि त्यावेळेला कशा रीतीने शक्तीचे मार्ग बनतात आणि कशा रीतीने कुंडलिनी जागृत होते. वगैरे वगैरे हेच नुसतं ते वर्णन करत राहिले. तेव्हा लोकांनी विचारलं , की तुम्ही इतके विद्वान असून हे काय ? म्हणे ह्याच्या पलीकडे 12

Original Transcript : Marathi काहीही नाही. ह्याच्याशिवाय जर कुंडलिनी जागृत होत नाही तर मग बाकीचं सांगायचं कशाला? म्हणजे एखाद्या बी ला रूजवायचं असलं आणि आपण इथे लेक्चर दिलं की आता ह्या ‘बी’च असं आहे, तसं आहे, अमकं आहे, तमकं आहे, तर त्याच्यात काही येणार आहे का? तुम्ही त्याच्यासमोर हठयोग करा, नाहीतर डोक्यावर उभे रहा, नाहीतर पुष्कळ लोक जीभ वगेरे कापून घशात घालतात. काय काय प्रकार करतात! एका पायावर उभे आहेत तासन्तास. उपवास वर्गैरे करायचा! हे करायचं, ते करायचं. नावं घेत रहायची. पोपटपंची करायची. सगळं करायचं. करून बघा, ते रोप येणार आहे का? ते सहज येतं. आपणहन येतं. त्याच्यासाठी काही करावं लागणार नाही. आज तुम्ही झाले मानव, त्याला तुम्ही काय केलं आहे मुळी? आता हा पेनिसिलिनचासुद्धा शोध जो मॅडम क्यूरींनी लावला. तो तरी कसा लावला? ते तिच्याच पुस्तकात बघितलेलं बरं. तिचं असं म्हणणं आहे, की मी सगळीकडे शोधत होते. मला काही सापडलं नाही. शांतपणे बसले होते, तर कुठून तरी अज्ञातातून मला एकदम कळलं, की पेनिसिलीन हे ह्या ठिकाणी मिळणार. जे ज्ञात आहे, ते सगळं आहेच समोर. लायब्ररीत सगळं ठेवलेलं आहे. जे अज्ञातात आहे, तिथून कळलं. म्हणजे तेच ज्ञान आणि सगळ्या ज्ञातात आहे, ते हे सत्य की तुम्ही आत्मा आहात. तुम्ही आत्मा आहात. हे शरीर, मन, बुद्धी, अहंकार नाही. तुम्ही आत्मा आहात. हे खरं सत्य आहे आणि हे सत्य एकदा आपल्यामध्ये बाणलं गेलं जाणवलं गेलं आणि आपल्यातला आत्मा वाहू लागला, म्हणजे आपल्याला खरा अर्थ लागेल. म्हणजे आपण समर्थ व्हाल. त्याच्या आधी म्हणायचं की तुम्ही हे करू नका, ते करू नका, हे सोडा, ते सोडा, काळे कपडे घाला, नाहीतर पांढरे कपडे घाला. डोक्यात हे घाला, नाहीतर संन्यासी बनून फिरा, नाहीतर. काय जगावेगळ्या गोष्टी आहेत. त्याला काही अर्थ आहे ? हे सगळे ज्यांनी केलं, हजारो वर्षांपासून तुम्ही पाहिलं आहे, रूढीगत, त्याचा काही अर्थ लागला? जोपर्यंत तुमच्यात जागृती होत नाही, जोपर्यंत तुमच्यात प्रकाश येत नाही, तोपर्यंत परिवर्तन होणं हे अशक्य आहे. अगदी ‘बी’चं उदाहरण परत. बी मध्ये परिवर्तन तेव्हाच होतं, जेव्हा त्याच्यातून अंकूर जागृत होतो. तो अंकूर जागृत झाला पाहिजे. जोपर्यंत तो अंकूर तुमच्यामध्ये जागृत होणार नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन येऊ शकत नाही. तुमची वाढ होऊ शकत नाही. तुमची वृद्धी होऊ शकत नाही. आणि तुमचे जे काही आंधळ्यासारखे चाललेले वर्तन आहे, ते बदलू शकत नाही. डोळे आल्याबरोबर तुमच्या एकदम लक्षात येतं, की हे इथं काळं, हे इथं पांढरं, हे इथे निळं आहे. अंधारात सगळेच रंग एकसारखे दिसतात. काहीही समजत नाही आणि सुचत नाही. आता एक पद्धत अशी, की तुम्ही ह्या खोलीत आले. अंधार आहे. चाचपडत चाचपडत एक खुर्ची धरली. म्हणे, खुर्ची म्हणजे खोली. आपल्याला हत्तीची कहाणी माहिती आहे. देवळात जातात. आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. इथेही फार आहे. ‘माताजी, आम्हाला दर्शन द्या.’ हजारो माणसं आली तरी दर्शन पाहिजे. अहो, दर्शन वरगैरे झालं आता. कितीदा आले देवाच्या पायावर तुम्ही! इथून पायी जाता पांडुरंगाला. तिथे त्याचे पायसुद्धा घासून टाकलेत. पण तुमच्यात काही आलं आहे का? असा स्वत:ला प्रश्न विचारायचा. मी बघितलं आहे, त्या पांडुरंगाच्या पायाचे दगडसुद्धा झिजून गेले आहेत. पण इकडे काही झालं कां? म्हणे, ‘चंदनापरी झिजतो पांडुरंग.’ तो झिजतो, पण तुमचं काय झालं? तुमच्यात काही चंदनाचा वास आला का? कारण जे चंदन आहे, ते अजून जागृत झालेलं नाही. ते जागृत झालं पाहिजे. ते जागृत झाल्यानंतर बाकीचं बोलूयात. आधी तुम्ही प्रकाश तर घ्या. आता ह्या खोलीत जर तुम्ही अंधारात आलात, मागे मी सांगत 13

Original Transcript : Marathi होते तसं, तर तुम्हाला काय दिसेल? एक हे दिसलं हे सत्य आहे, ते दिसलं ते सत्य आहे. एखाद्या पंख्याला लागलात तर पंखा सत्य आहे. त्याच्यासाठी भांडणं करायची. पंख्यावाल्याने खुर्चवीवाल्याशी भांडायचं, खुर्चीवाल्याने सतरंजीशी भांडायचं, ते सारखं चालूच. त्यांचं म्हणणं हे सत्य, ह्यांचं म्हणणं ते सत्य. पण डोळे सगळ्यांचे बंद असल्यामुळे आता बघा. आई हे सांगणार आहे, तुम्ही जरा शांत बसा. डोळे उघडते मग बघा. त्यातूनही तुम्हाला माहिती आहे, की एक बटण दाबलं की सगळीकडे लाइट येऊ शकतो. पण जाणकार कोण? ज्याला हा लाइट माहिती आहे, तोच जाणकार.. त्याने जर सांगितलं की हा दिवा पेटवायचा असेल, तर इथे दाबा. लगेच दिवा पेटणार. पण त्या दिव्याच्या मागे केवढी मोठी पूर्वपीठिका आहे. सबंध इतिहास आहे त्याच्यात. त्यामुळे नुसतं काही बटण दाबले ही काही गोष्ट नाही. म्हणजे ही जी कुंडलिनी आपल्यामध्ये आहे, ही जी चक्रं आपल्यामध्ये परमेश्वराने बांधलेली आहेत आणि जी स्थित आहे, जी तुम्ही बघू शकता. कुंडलिनीच चढणं, तिचं स्पंदन पुष्कळ लोकांमध्ये दिसतं. तर हे जे काही परमेश्वराने कार्य केलेलं आहे, ते काही आजचं नाहीये. ते तुम्ही कार्बन होता, त्याच्याही आधी तुम्ही काय होता ? आणि सबंध विश्व आपल्यामध्ये आहे, पण ते जाणण्यासाठी प्रथम आत्म्याचा प्रकाश मिळवला पाहिजे. संध्याकाळी मी आत्म्यावर बोलणार आहे. आता कुंडलिनीवर बोलते. कुंडलिनी शक्ती ही तुमची शुद्ध इच्छा शक्ती आहे. शुद्ध इच्छा शक्ती, म्हणजे त्या इच्छेत दुसरं काही मिक्श्चर नाही. फक्त परमेश्वराला मिळवावं, परमेश्वरात सामावं. आत्म्याचं दर्शन मिळवून आत्म्यामुळे परमेश्वराला मिळवावं. ही एक शुद्ध इच्छा तुमच्यामध्ये परमेश्वराने कुंडलिनी रूपाने ठेवलेली आहे. ती आहे, पण अंधूक आहे. तिला थोडीशी जर चालना मिळाली तर ती पूर्णपणे जागृत होईल. तुमच्या सगळ्या इच्छांवर ती मात करून, सगळं चित्त आतमध्ये ओढून तुम्हाला मार्गदर्शन करेल. आता ‘हे चित्त तुम्ही आतमध्ये न्या,’ असं म्हटलं तर नेऊ शकता का तुम्ही? नाही नेऊ शकत. तुमचे लक्ष माझ्याकडे आहे, माझ्या भाषणाकडे आहे. पण जर मी म्हटलं, की हे चित्त तुम्ही तिकडे न्या, तर नेऊ शकत नाही. पण एकदा ती घटना झाली म्हणजे आपोआप चित्त आतमध्ये ओढलं जातं आणि मनुष्याला त्या आत्म्याची ओळख होते. जेव्हा हे घडतं तेव्हा मनुष्यामध्ये एकदम बदल होतो. एकदम. चेहर्यामध्ये एकदम तकाकी येते, डोळे चमकू लागतात. अगदी हिऱ्यासारखे. हातातून थंड थंड असे प्रवाह येऊ लागतात. ही शक्ती, ही वाह लागते. इथे इलेक्ट्रिसिटी आली तर तुम्हाला सांगावं लागतं. की त्याचं चलनवलन कसं करायचं? ती वापरायची कशी ? इथून …..वगैरे असे इन्स्ट्मेंट घालायचे? तसेच सहजयोगाचे आहे. एकदा पार झाल्यावर त्याचं शिक्षण घ्यावं लागतं. पण ते इतकं सहज साध्य तिकडे न्यायची कशी? त्याचं कसं कनेक्शन करायचं? त्याच्यामध्ये कसे मधे मधे आहे. कारण आपल्या आतमध्ये ते आहे. आता तुम्हाला काही मला सांगावं लागत नाही, की हा निळा रंग आहे. पण एकदा तुम्हाला कोणीतरी सांगितलं होतं, की हा निळा रंग आहे. आता निळा रंग काय ते आपल्याला माहिती आहे. लाल रंग काय ते आपल्याला माहिती आहे. एकदा सांगावं लागतं. तसंच जर का एकदा सांगितलं, की हे चक्र म्हणजे विशुद्धी चक्र श्रीकृष्णाचं आहे आणि जेव्हा हे खराब होतं , त्यामुळे सर्दी, खोकला वगैरे हे आजार होतात. अती नामस्मरणानेसुद्धा हे चक्र खराब होतं. तसेच हे चक्र 14

Original Transcript : Marathi डावीकडचं विशुद्धी चक्र आहे. तंबाखू वगैरे खाल्ल्याने हे चक्र खराब होतं किंवा एखाद्या माणसाने असा विचार केला, की माझं नेहमी चुकतंय. असं सारखं आपल्याबद्दल काहीतरी न्यूनगंड वापरून जो मनुष्य विचार करतो त्याचं हे चक्र धरतं. मग त्याच्यावर मात कशी करायची वगैरे. कारण कनेक्शन झाल्यावरच तुम्ही करू शकता. त्याच्याआधी तुमचं कनेक्शन नसतांना तुम्ही टेलिफोन तरी कुठे करणार? म्हणे आम्ही परमेश्वराची सारखी आठवण करतो. आम्हाला हार्ट अॅटॅक आला. हार्टमध्ये शिव असतांना तुम्हाला हार्ट अॅटॅक कसा आला हो? त्याला कारण असं, अनधिकार चेष्टा आहे. तुम्हाला अजून परमेश्वराच्या साम्राज्यात यायचं आहे. जोपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात जाणार नाही, तोपर्यंत तुम्ही परमेश्वराचे नागरिक नाहीत. परमेश्वराचे नागरिक झाल्याशिवाय त्याच्या साम्राज्यातलं जे काही वरदान आहे, ते तुम्ही कसं वापरू शकाल ? त्याच्यावर तुमचा काय अधिकार आहे? समजा, तुम्ही हिंदुस्थानचे नागरिक असाल, तर हिंदुस्थानचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्यावर तुमचा हक्क आहे. पण इंग्लंडला जर तुम्ही निदर्शनं केली, तर तुम्हाला लोक पकडूनच देतील. तुम्ही कोण? तेव्हा परमेश्वराच्या साम्राज्यात आधी माणसाला जायला पाहिजे. आणि त्यानंतर मग भक्तीला खरा उमाळा येतो. कृष्णाने ह्याबद्दल गीतेमध्ये फार सुंदर सांगितलं आहे. कृष्ण म्हणजे हा फार मोठा राजकारणी होता. कारण त्याचं सबंध अवतरणच मुळी एक विशेष लीलामय होतं. लीला करून लोकांना समजवून सांगायचं. तसं सरळ ऐकत नाहीत. रोज काही तरी कुठून तरी फटका द्यायचा, म्हणजे कळेल. सरळ बोट घालून जर तूप निघालं नाही, तर बोट थोडंस् वाकडं करायला पाहिजे आणि ती वेळ अशी होती. म्हणून कृष्णाने फक्त अर्जुनाला सांगितलं. दुसर्याला सांगितलं नाही म्हणून मग त्यांनी बोट उलटं करून गोष्टी केल्या आणि अगदी दोन शब्दात मी आता तुम्हाला गीता सांगते. त्याचं मर्म काय आहे ते तुम्ही समजून घ्या. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं, की तू ज्ञानाला प्राप्त हो. ज्ञानाला तुम्ही प्राप्त कसे होणार? पुस्तकं वाचून? कबीराने सांगितलं की, ‘पढ़ी पढ़ी पंडित मूरख भय ‘ आणि मी ते बघते असे मूर्ख रोज येतात. ‘पढत मूर्ख’ आपल्या मराठीत अशी फार धार धार भाषा आहे. रामदासांनी असे पुष्कळ पढत मूर्ख पाहिले असतील. तेव्हाच त्यांनी त्यांना पढत मूर्ख म्हटलेले आहे आणि हे पढत मूर्ख जे आहेत , त्याने होणार. ज्ञान हे जे म्हणजे आपली जी चेतना आहे, ती जागृत झाली म्हणजे त्या चेतनेत आपण जाणलं पाहिजे. आज आपली मानवाची चेतना आहे. समजा जर इथे घाण असली तर त्या घाणीतून आपण जाऊ शकत नाही. नाकावर लगेच बोट ठेऊ. पण एखादं घोडं जर तुम्ही काढायचं म्हटलं, त्याला काही घाण यायची नाही. तो आपला सरळ निघेल. त्याच्यामध्ये ती चेतना आलेली नाही. त्याचं मन तेवढ चेतीत झालेलं नाही किंवा त्याच्या व्यक्तित्त्वाला ती चेतना आलेली नाही, की ही घाण आहे. त्या घाणीतून जायचं. परत तुम्ही कोणत्याही रंगाचं त्याला काहीही दिलं तरी त्याला समजायचं नाही. आपल्याला रंगसंगती समजते. सौंदर्य काय ते समजतं . माणसाच्या चेतनेमध्ये ह्या वस्तू आलेल्या आहेत. पण आपल्याला अजून पाप-पुण्य नुसत्या बुद्धीने समजतं. आईने सांगितलं नां हे वाईट, मग करायचं नाही. वडिलांनी सांगितलं म्हणून करायचं नाही किंवा गीतेत लिहिले आहे म्हणून करायचं नाही. पण अजून आपल्या चेतनेत आलेलं नाही. सहजयोगानंतर ते आपल्या चेतनेत येणार. म्हणजे तुम्ही करायचं म्हटलं तरी करू शकत नाही. त्रास होणार. व्हायब्रेशन्स जाणार. जर तुम्ही असा प्रयत्न केला, की आम्ही काहीतरी करून बघू, तर लगेच डोकं जाम 15

Original Transcript : Marathi होणार. आपोआप ते घटित होईल. त्याच्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावा लागणार नाही. हा धर्म तुमच्यात जागृत झाल्यावर तुम्हाला मला सांगावं लागणार नाही. तुम्ही स्वत:च सोडून द्याल. एक गृहस्थ होते. ते फार तंबाखू खायचे. सहजयोगानंतरसुद्धा त्यांनी काही प्रयत्न नाही केला. एका क्षणात सुटू शकली असती, पण त्यांनी प्रयत्न केला नाही आता तंबाखू लहानपणापासून घेत असल्यामुळे त्यांना काही सुटली नाही. शेवटी माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘माताजी, मी ध्यानाला बसलो की माझ तोंड असं मोठं मोठं होतं. वाटतं जसं काही हनुमानासारखं होतं की काय? मला काही समजेना. ‘ आता म्हटलं, ‘सांगू का खरच ? तुम्ही तंबाखू घेता मला माहिती आहे. मागे जाता आणि असं असं करून तंबाखू घेता. खरी गोष्ट आहे की नाही? म्हणे, ‘चांगलीच घेतो माताजी, ह्याबद्दल शंका नाही. ते मानतो मी.’ म्हटलं, ‘आता माझ्यासमोर नुसतं प्रॉमिस करा. तंबाखू घेणार नाही. माझ्यापासून लपवून ठेवण्यात काय अर्थ आहे ?’ म्हटल्याबरोबर तंबाखू खट्कन सुटली आणि ते गेलं त्यांचं. अशा रीतीने गोष्टी सुटत जातात. आपोआप आतमध्ये धर्म जागृत होतो. सांगायला नको. त्याला मेहनत करायला नको. ही धर्माची जागृती होती. हे ज्ञान झालं. ज्ञान म्हणजे, तुमच्यामध्ये, जे तुमचं व्यक्तित्व आहे, त्याच्यातच ती चेतना आहे. तुमची चेतनाच चेतीत झाली. ह्याला कृष्णाने ज्ञान म्हटले आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं, की ज्ञानानेच तुम्ही परमेश्वराला जाणू शकता. भक्तीबद्दल त्यांनी मग सांगितलं , की भक्ती करायची तर अनन्य करा. ते एक फार चांगलं आहे. पुष्पं, फलं, तोयं, काय असेल ते मला द्या. घेतो मी. घ्यायच्या वेळी मी सगळं घेतो. द्यायच्या वेळेला अनन्य. आता ह्या शब्दामध्ये तुम्ही बघा, त्याची एक फोड आहे. अनन्य म्हणजे दुसरा जेव्हा रहात नाही तेव्हा. म्हणजे पार झालेले. पार झाल्यावरच भक्तीला मजा आहे, नाहीतर कोणाला तुम्ही टाहो फोड़ून बोलवता. जसं आता धुमाळांनी आपल्याला सांगितलं की सहजयोगाचे पुष्कळ प्रकार आहेत. अनंत लोकांना अनंत आशीर्वाद मिळालेत. एक आमच्याकडे आर्किटेक्ट होते. म्हणे, ‘माताजी, मी एवढी देवाची पूजा करायचो. देवीची एवढी पूजा करायचो पण माझ्याकडे अठरा विश्व दारिद्र्य. सहजयोगात आल्यावर म्हणे पावसाचा पाऊस सुरू.’ पावसाचा पाऊस म्हणजे कसला? तर म्हणे, ‘ज्या ठिकाणी फार पाऊस पडत होता, अशा ठिकाणी त्यांनी स्पेशल तऱ्हेची घरं बांधायला म्हणून मला पाठवलं आणि नुसते तिथे पैसेच पैसे.’ एक अगदी साधारण मनुष्य, शेतकरी. त्याच्याजवळ लहानसं शेत, अध्ध्या एकराचंसुद्धा नाही आणि कोळी. ते रोज माझ्या दर्शनाला आले म्हणजे एक फुलाचा सुंदर हार करून आणायचे. मी म्हटलं, ‘दादा, तुम्ही एवढा कशाला खर्च करता ? फार आहे तुमच्यासाठी. एवढं करू नका. मला नाही बरं वाटत.’ ‘आई, तुम्हाला माहिती आहे, मग असं कशाला म्हणता ? त्यांनी सांगितलं, ‘शेतातली अर्धी जमीन अगदी पडीक होती. अर्धी जमीन म्हणजे जवळजवळ अर्धा एकर जमीन मी वापरतो. एक मनुष्य माझ्याकडे आला नी मला म्हणाला, ह्या जमिनीतली मी माती घेऊन जाऊ का? ह्या मातीला मी वापरलं तर ह्या मातीमुळे विटा चांगल्या होतील. म्हणजे थोडीशी जर माती मिक्स केली तर.’ आणि म्हणे मला इतका त्याच्यातून पैसा मिळू लागला. अशा रीतीने लक्ष्मी तत्त्व जे तुमच्या नाभी चक्रावर आहे ते जागृत झालं. म्हणून कृष्णाने सांगितलं की अनन्य भक्ती कर. जोपर्यंत परमेश्वराशी तुमचं कनेक्शन झालेलं नाही, तोपर्यंत टाहो फोडून काय होतं ? तू 16

Original Transcript : Marathi एवढे वारकरी जातात, बघा त्यांची काय दशा आहे ? दारिद्र्य, तब्येती त्यांच्या खराब, त्यांना कॅन्सर झालेला. थ्रोटमध्ये ट्रबल (घशाच्या समस्या), काय डोकं फोडलेलं त्या बडव्यांनी काय काय प्रकार. भिकाऱ्यासारखी त्यांची स्थिती. हे काय विठ्ठलाला आवडत असेल? पण त्यांचा संबंध अजून विठ्ठलाशी झाला नाही. झाल्याबरोबर ते सगळें बदलणार. म्हणून त्यांनी सांगितलं की अनन्य भक्ती करा. आधी परमेश्वराला मिळवून घ्या. मग त्या भक्तीला खरी मजा येते. नाहीतर काहीतरी काल्पनिक असं वाटतं. आपल्या मुलांनी तर परमेश्वराचं नावच सोडलं आहे. कारण आमची आई उगाळायचं, देवाला आंघोळ, हे, ते. करून तरी त्यांना काय मिळालं? राग तेवढाच येतो. दारू प्यायची तर दारू (अस्पष्ट) सकाळी चारला उठायचं, चंदन पितात. ब्लॅकचा पैसा आहे तो ब्लॅकचा पैसाही वापरतात. सगळे धंदे आहेत. फक्त सकाळी उठून मात्र ते उगाळत बसायचं. तेव्हा ह्यांना काय मिळालं? जर ह्यांना काही मिळालं नाही तर आम्ही तरी ही मेहनत कशाला करायची? म्हणून परमेश्वरच नाही असा त्यांनी निकाल काढलेला आहे. अल्जेरिया देशामध्ये त्यांचे जे मोठे वयोवृद्ध लोक आहेत, ते मात्र अगदी पक्के खोमेणीसारखे आहेत. फंडामेंटलिस्ट म्हणतात त्याला. ते म्हणजे अगदी, मनुष्याने जरा चूक केली की त्याचा हात कापून टाकायचा. कोणी काही केलं की गळा कापून टाकायचा. त्याला वाळूत गाडून टाकायचं. वरून जोडे मारायचे. असे भयंकर भयंकर प्रकार त्यांनी केले. शर्यत काही तरी काढली आहे. अगदी खोमेणीसारखा प्रकार. अती धर्माधता. ते बघून तिथली जी मुलं आहेत ती कम्युनिस्ट झाली. त्यांनी सांगितलं असला काही परमेश्वर असू शकत नाही. परमेश्वर इतका दुष्ट कसा असेल? पण त्याच्यातला एकच मुलगा लंडनला आला नी पार झाला. लगेच त्याने जाऊन सांगितलं, परमेश्वर आहे. तो धर्मांधतेतही नाही आणि त्याला नाही म्हणण्यातही नाही. मधोमध . आज आपल्याला आश्चर्य वाटेल, अल्जेरियामध्ये पुष्कळ शिकलेली, सुशिक्षित मुलं, मुसलमानांची, ५०० मुलं पार झालेली आहेत. तेव्हा ह्या तुमच्या समाजात, तुमच्या मुलांचा तुम्ही विचार करा. त्याहीपुढे सांगायचं म्हणजे असं, की निकराची वेळ आलेली आहे. तेव्हा ही अनन्य भक्ती घेतली पाहिजे. तिसरं म्हणजे कर्मयोग श्रीकृष्णाने सांगितला की, ‘जे काही तुला कर्म करायचं आहे, ते तू परमेश्वराच्या चरणी ठेव.’ बरेच लोक मला विचारतात, माताजी, आम्हाला जे काही करायचं आहे, ते आम्ही परमेश्वराच्या चरणी ठेवलं. ही अशक्यातल्या गोष्टी आहेत. श्रीकृष्णाची पद्धत ही की अशक्य गोष्टी सांगायच्या. अशक्य. कितीही म्हटलं, परमेश्वराच्या चरणी ठेवलं , पण ठेवलंय का तुम्ही? कारण जोपर्यंत अहंभाव आहे, तोपर्यंत ते सुटणारच आहे. तो अहंभावच सुटला पाहिजे. आता लोक लागले, हा अहंभाव सोडायचा. त्याच्याशी भांडायला लागले. जसं त्या फुग्याला मार बसला, की तो मोठा मोठा होत जातो, असा माणसाला आणखीन डबल अहंभाव येतो. म्हणजे म्हणतात नां, आम्ही हे सोडलं, ते सोडलं. फक्त बुद्धी सोडलेली दिसते. बाकी काही सोडलेलं दिसत नाही. असला भलता अहंभाव लोकांना येतो आणि आम्ही सगळे काही परमेश्वरावर सोडलं, असा विचार करून भ्रामक कल्पनेत रहातात. हे तेव्हाच घडतं , जेव्हा तुमच्या हातून हे वाहू लागतं. तुम्ही काय म्हणता, वहातंय, जातंय, येतंय. काहीतरीच . तुम्ही तिसरेच. हे चैतन्य वाहू लागतं. माताजी, कुंडलिनी वर येतेय. माझ्याबरोबर अमेरिकेला एक बाई आली होती. ती म्हणाली, माताजी, मी इतक्या ह्याने तुमच्याबरोबर आले. माझ्या मुलाला तुम्ही रियलाइझेशन द्याल. म्हटलं आता मी काय करू? तुम्ही द्या म्हटलं सर्टिफिकेट. असं कसं द्यायचं 17

Original Transcript : Marathi सर्टिफिकेट? ते व्हायला पाहिजे. तुमची इच्छा तसेच माझी इच्छा असली तरी ते व्हायला पाहिजे. घडलं पाहिजे. त्याच्यात काही खोटं बोलता येत नाही. ते पैसे मोजता येत नाहीत. डोक्यावर उभं रहाता येत नाही. जे आहे ते आहे. असं आहे. तेव्हा कर्मयोगातसुद्धा, हे तेव्हाच घडणार, कर्मयोग खरा तेव्हाच घडतो, जेव्हा तुम्ही पार होता. मग म्हणतात, चाललंय, येतंय, जातंय. आता आम्ही साक्षी झालो. हे जोपर्यंत घडत नाही, तोपर्यंत भ्रामकतेत राहून लोकांनी असा विचार केला नाही पाहिजे, की आम्ही फार मोठे धार्मिक झालो . मग असं म्हटलं पाहिजे, की धर्म इतका जागृत होतो. जसं एखादं फळ व्हावं आणि सबंध फूल संपून जावं. मनुष्य गुणातीत, धर्मातीत होऊन जातो. ती दशा यायला पाहिजे. आजकाल तऱ्हेतऱ्हेचे प्रकार, नाना तऱ्हेचे गुरू, नाना तऱ्हेचे हे सगळे निघालेले आहेत. पायलीचे पन्नास म्हणतात तसे निघालेले आहेत. पण तुम्हाला काही मिळालं आहे का? आता कालच हे गृहस्थ आले. मला म्हणे ‘साक्षात्कार झाला, असं मला वाटतं.’ ‘कोणी दिला?’ ‘अमके गुरू.’ म्हटलं, ‘बघा, तुम्हाला वाटतंय नां, तुम्ही हे सांगा, की ह्या माणसाची कुंडलिनी कुठे आहे ? अहो, एवढं तरी ज्ञान पाहिजे.’ ‘ते नाही सांगता येणार.’ ‘बरं तुमची कुठे आहे ते सांगा?’ ‘तेही नाही सांगता येणार.’ म्हटलं मग कशाचा साक्षात्कार झाला. समजा, एखाद्या आंधळ्याचे डोळे बरे झाले की, डॉक्टर त्यांना विचारेल की, ‘किती बोटं आहेत ते सांगा?’ ‘ते नाही मला सांगता येणार. पण डोळे बरे झाले.’ असं कसं हो . ते दिसलं पाहिजे नां! ते समजलं पाहिजे नां! ते जाणलं पाहिजे नां! नाहीतर तुमचे डोळे कसे बरे झाले? अशातहेचे गुरू आहेत. म्हणे की मला क्रिया होते. असं कां? एक गृहस्थ आले. दोन्ही पाय माझ्याकडे करून बसले. एकाने सांगितलं, की अहो, असं माताजींकडे बसायचं नसतं. ‘ते माहिती आहे मला. पण मी काय करू? असे जवळ पाय केले तर मी बेडकासारखा होतो.’ असं कां? ‘ते काय आमच्या गुरूंनी सांगितलं , की तुमची जागृती झाली की तुम्ही बेडकासारखे होता.’ आता तुम्ही काय बेडूक होणार आहात ह्याच्यापुढे, मानव झाल्यावर? का साप का विचू? एक साधा विचार घ्या. तुम्ही बेडकासारखे उडता काय, डोक्यावर उभे राहता काय? म्हणजे तुम्हाला स्वत:चा तोलसुद्धा रहात नाही. ज्या शरीराचा तोल तुम्ही आत्तापर्यंत ह्या मानव देहामध्ये मिळवला, तो सुद्धा सुटला आणि त्याच्यापुढे तुम्ही बेताल होऊन नाचू लागले. वेड्यासारखे उडू लागले. कपडे काढू लागले. म्हणजे हा काय प्रकार मूर्खपणाचा? आणि तो म्हणे, ‘आम्ही पार झालो.’ जर नागवं मनुष्याला पार व्हायचं असतं, तर सगळी जनावरं आधी पार करा. माणसं कशाला? काहीच्या काही काढून ठेवतात. पण मूर्ख लोकांचीसुद्धा कमाल आहे. आता तुम्ही जर असा शहाणपणा ठेवला, तर तुमच्यासाठी सप्लाय डिपार्टमेंट आहेच. पुष्कळ लोक अशा रीतीने तयार होऊन येतात. आता आमच्या नागपूरला एक गृहस्थ होते. त्यांना मी चांगली ओळखून आहे. आमच्या साहेबांच्या कंपनीत होते. फार वाह्यात होते. त्यांच्या वडिलांनी सांगितलं की कुठेतरी लावून टाका म्हणून. त्यांचे वडीलही आमच्या ऑफिसमध्ये होते. तर साहेबांनी सांगितलं, ‘त्यांना मी पाठवतो तिथे.’ तिथे जाऊन पन्नास धंदे केले. ब्लॅक मार्केट केलं. स्मगलिंग वगैरे काय करायचं ते सगळं करून आले. मग वडील वारले. तर त्यांना प्रॉपर्टी वगैरे मिळाली. बायकोचे दागिने विकले, घर विकलं, अमुक केलं, तमुक केलं आणि पसार. त्यांची आई रडत आली. ‘आता 18

Original Transcript : Marathi काय करायचं? आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला दागिने दिले. सगळे काढून दिले. आता मुलाने चोरी केल्यावर पोलिसात कसं जायचं? अमकंतमकं सगळं.’ बिचाऱ्या आता कुठेतरी माहेरी, बडोद्याला जाऊन राहून आल्या. आता ह्या गृहस्थांचं खूप मोठं नाव झालं. नाव काय तर म्हणे गुलाबबाबा. आईंनी सांगितलं की, ‘माझ्याकडे पुष्कळ पैसे वगैरे पाठवले. सगळं काही झालं. घर आम्हाला करून दिलं. पैसे पाठवायचा. तर मी त्याला एकदा शपथ घातली. म्हटलं सांग कोण आहेस तू ? कसे पैसे पाठवतो? पत्रात लिहिलं. तर मग कळलं, की हे महाराज म्हणजे गुलाबबाबा नावाने प्रसिद्ध आहेत.’ तर मी असा निरोप पाठवला की, ‘त्या गुलाबबाबाला सांगा की मी नागपूरला येत आहे.’ त्यानंतर तीन महिने कुठे दिसले नाहीत गुलाबबाबा. कोणालाही. ते सगळ्यांना सांगत काय होते, तर घोड्याचे नंबर्स आणि सगळे हे मारवाडी तिथे जाऊन घोड्याचे नंबर विचारत होते. आता हा विचार करा, की परमेश्वराला काही घोड्याचे नंबर माहिती आहेत का? पण तिथे ओळीने लोक उभे. अहो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, हजारो लोक त्याच्याकडे. म्हणजे आता हे माणसांचं शहाणपण तुम्ही बघा. हे असले सगळे प्रकार. तुम्हाला कोणी हिरा दिला काय किंवा घोडं दिलं काय, ते काय परमेश्वराला अक्कल नाहीये? नाहीतर आपल्या बायकांचं म्हणजे अंगात येतं अंगात. सगळ्या मोलकरणींच्या अंगात देवी येते. तिला आणखीन काही जागा दिसली नाही बिचारीला. लागले त्यांच्या पूजेला. त्यांच्या पायावर यायचं. झालं. पण ते अंगात येणं किती कठीण आहे. त्याने किती त्रास होतो माणसाला. वेड्यापिशासारखे लोक होतात. हे सगळे भुताटकीचे प्रकार आहेत. आपल्या महाराष्ट्रात विशेषकरून आणि ते देवळात करतात. महालक्ष्मीच्या देवळात हा प्रकार आहे. त्यांच्या ट्रस्टींनी सांगितलं, माताजी, तुम्ही साक्षात् असून आमच्या इथे या. आधी म्हटलं ‘हे बंद करा.’ पहिली गोष्ट. दुसरं ही दुकानं बंद करा. मग मी येणार. हे पैसे खाण्याचे धंदे जे परमेश्वराच्या दमावर तुम्ही काढलेत ते आधी बंद करा. तर माझ्यावर रागवले. आज रागवाल, उद्या रागवाल. गव्हर्नमेंटने घेतलं. तेव्हा तुम्ही स्वत:च ह्या लोकांना महत्त्व देता आणि ते तुमचा फायदा घेतात. त्याने परमेश्वर मिळणार नाही. परमेश्वर तुमच्यामध्ये आहे तो मिळवून घ्या. मग तिसरी तऱ्हा. नानकांनी सांगितलं, की स्वत:मध्ये शोधा. स्वतःमध्ये शोध तर त्याची अखंड भजनं म्हणायची. स्वत:मध्ये शोध रे बाबा, स्वत:मध्ये शोध रे बाबा. पण हे शोधणार कोण आहेत ? मी सांगितलं की तुम्ही जर हे पेनिसिलीन घेतलं तर तुम्हाला बरं वाटेल. तर तुम्ही रस्त्याने म्हणत चालले, की पेनिसिलीन घेतलं तर मला बर वाटेल. त्याने काय तुम्ही बरे होणार. स्वत:चा इलाज केला का? त्यांने काही तुम्हाला फायदा झाला का? म्हणजे बुद्धीची जोड जी म्हणतात ती भलत्या ठिकाणी द्यायची. बुद्धीची जोड आली की टवाळक्या करायच्या परमेश्वराच्या. ‘परमेश्वर नाही. हे काही तरी उगीचच खोटं दिसतंय.’ एकतर दुर्बुद्धी तरी असेल किंवा सुबुद्धी तरी असेल. सुबुद्धी नाही. सुबुद्धीमध्ये स्वत: साक्षात् परमेश्वर आहे. म्हणून आपण विनायकाला आधी म्हणतो, ‘मला सुबुद्धी दे.’ सुबुद्धी देणारा हा आपला भोळा विनायक आहे. त्याला आपण विचारू, तू आम्हाला सुबुद्धी दे. तुझ्या सुबुद्धीने आम्हालासुद्धा परमेश्वर मिळू दे. आज विनायक कोण आहे, शंकर कोण आहे, कृष्ण कोण आहे ? आपल्यामध्ये त्यांचं स्थान काय आहे ? खिस्त कोण आहेत? मोहम्मद कोण आहेत ? ह्यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. एखाद्या हरिदास बुवाने उभं रहायचं. कुठूनतरी आणलेला बुक्का लावायचा आणि तोंडाला काळे फासून त्याने काहीतरी लेक्चर 19

Original Transcript : Marathi द्यायचं. त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं. झालं. इतिश्री. अहो, केवढं मोठं धन परमेश्वराने तुम्हाला देऊन ठेवलेलं आहे. ते मिळवायला नको का? ते मिळवलं पाहिजे आणि ते तुम्ही हमखास मिळवून घेणार. विशेषत: ह्या महाराष्ट्राच्या पावन भूमीत. आज शिवाजी महाराजांना पाहिल्यावर मला एकदम ते दिवस आठवले. काय त्यांचं ते तेज, काय त्यांची ती समज. अवतारच होते जसं काही. धर्म काय आहे त्यांना माहिती आहे. मुसलमानाच्या सूनेचंसुद्धा त्यांनी केवढं महत्त्व ठेवलं आणि लोकांना पटवून सांगितलं , की दुसर्यांच्या बायकांवरती आपली दृष्टी कशी काय? राजे-महाराजे असूनसुद्धा काय देदिप्यमान लोक ह्या देशामध्ये झालेले आहेत! ते महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे. पण ते पार होते. जागृत होते. सगळ्यात मोठे सहजयोगी महाराष्ट्रातले ते. पण त्यावेळेला त्या कार्याची गरज होती. त्यावेळेला आपला देश पारतंत्र्यात होता म्हणून ज्याच्याशी भांडायच ते कार्य त्यांनी केलेले आहे. पण त्यातही धर्माने केलं, अधर्म केला नाही. आज ही स्थिती आलेली आहे, आमच्यामध्ये आमचेच जे पारतंत्र्य आलेलं आहे, आम्ही जे आमच्या पारतंत्रात पोहोचलेलो आहोत , ते काढा तुम्ही. शिवाजी आमच्यामध्ये जागृत झाला पाहिे. हे कार्य फार सोपं, सरळ आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळी किमया केलेली आहे. प्रत्येक, तऱ्हेतऱ्हेच्या लोकांचे काय काय प्रकार असतात, ते सर्व आम्ही प्रत्येकाच्या घेतलेलं आहे. सगळ्यांचं आम्हाला बारीकसारीक माहिती आहे. हे कळलं, हे कुंडलिनीत घुसून घुसून काढून इथल्या दुकानातून आलेले आहेत. ह्यांचं कळलं. हे ह्या नाटकातून आलेले आहेत. मग त्याची बरोबर कशी व्यवस्था करायची, तेच….. अगदी सोपं आहे. पण स्वत:बद्दल काहीतरी भ्रामक कल्पना नसल्या पाहिजे पहिली गोष्ट. स्वत:ला काहीतरी न्यूनगंड नसला पाहिजे. पुष्कळ लोकांना असतं, ‘माताजी, मी पामर आहे. माझ्यात काय आहे ? मी कोणत्या कामाचा आहे ?’ अहो, तुम्ही जर असे असता तर माझ्यापुढे कशाला आला असता तुम्ही? दूसर म्हणजे मी म्हणजे कोणीतरी. म्हणे, एक फार मोठे सायंटिस्ट होते. म्हटलं असं आहे का? आता एक प्रश्न विचारा, ‘माताजी, तुम्ही, साक्षात् सायन्सचं ज्ञान तुम्हीच आहात का ? ‘ फट्कन त्यांच्या हातात शक्ती सुरू झाली. ही शक्ती तरी कुठूनतरी येते. बाह्यात जे आपल्याला एवढं मोठे झाड दिसतंय, त्याच्यात कुठून शक्ती येते ? त्या पाण्यामुळे. ते खाली दबलेलं आहे. जर आपण नुसतं झाडच बनलो, तर जिवंत राहू शकतो का? पाश्चिमात्य देशात कसं हे लोक झाड बनण्याच्या मागे लागले आहेत. आता फक्त एकच विचार करत होते की जीव कसा द्यायचा? सकाळपासून संध्याकाळप्यंत त्यांचं एकच नाटक होतं, की आमचा जीव कसा द्यायचा? पाळेमुळे शोधून काढल्यावरच ते झाड राहणार आहे आणि ती पाळेमुळे ह्या देशात आहेत. ती हाताला लागली. आता सबंध मानव जीवन हे सुखकर होणार. त्याला लागणारी ही शक्ती सहजयोगाने पूर्ण होणार आहे. आज संध्याकाळी मी सगळे काही सांगणार आहे चक्रांच्या बाबतीत. आणि ह्याने आपली राजकीय, सामाजिक, मानसिक, आर्थिक तशीच आपली शारीरिक स्थिती कशी सुधारते, ह्याबद्दल मी संध्याकाळी सांगेन. तरी आता पुष्कळ सांगितलं. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. आता पार होऊन घ्या. आता उशीरही खूप झालेला आहे. पार झाल्याशिवाय काही होणार नाही. 20