Puja, Be Thankful To God

(India)

1982-01-27 Puja, Be Thankful To God, Sholapur, Maharashtra India, (English, Marathi), 37' Download subtitles: EN (1)View subtitles:
Download video - mkv format (standard quality): Watch on Youtube: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Be Thankful to God; Count Your Blessings
27th Jan. 1982, Kolapur, Maharasthra India

.आता ह्यांना जे सांगितलं ते तुम्ही ऐकलेलंच आहे. पण तरीसुद्धा जरी तुमची खूप स्तुती केली, तरीसुद्धा हे समजलं पाहिजे की आपल्या हिंदुस्तानात सुद्धा अनेक तरतऱ्हेचे प्रकार आहेत. ज्यांनी आपण बांधले जातो. ह्यांच्यात श्रद्धा नाही आणि तुमच्यात आंधळी श्रद्धा, पहिली गोष्ट आंधळी श्रद्धा आहे. ती आंधळी श्रद्धा नीट केली पाहिजे. आता माताजीनी सांगितलं, की समजा असं सांगितलं, की बघा काळयामध्ये  काळं घालू नका, की लगेच माझ्यावरती सगळे दंडे घेऊन येतात, का माताजी म्हणे, अरे मी काय, मी कशाला सांगते?  ज्या गोष्टीला मी मना करते ते का करते?  उगीचच सांगत नाही. काळं घातलं म्हणजे त्याने त्रास होतो, ते करायचं नाही. नाही, हे माताजी आम्ही ते ही करतो आणि हेही करतो, तसं चालायचं नाही. दोन्ही करता येणार नाही. सहजयोग करायचा म्हणजे तो शुद्ध स्थितीत केला पाहिजे. ह्यांच्यामध्ये अश्रद्धा आहे, पण तुमच्यामध्ये आंधळी श्रद्धा आहे आणि हट्टी आहात त्याबाबतीत. तेव्हा ते ही ठीक नाही. आता युगधर्म आपण म्हटलेलं आहे. म्हणजे या युगामध्ये, सहजयोगाची धारणा, आपण धारण करायची असते. त्याच्यासाठी शहाणपण असायला पाहिजे. शहाणपण जर नसलं,  हट्ट  जर केला,  तर काहीच करता येण्यासारखं नाही. हट्ट नाही करायचा. बघायला पाहिजे, माताजी जे म्हणतात ते खरं होतं की नाही. झालं ना एकदा, कळलं ना तुम्हाला, व्हायब्रेशन्स आले नं,  हे सगळं लिहिलेलं नं देवीचे महात्म्य, की माताजींच्या पायावर तुम्ही कुंडलीनी पाहिली ना असताना, तर झालं ना, आता मला पुढे सांगायला कशाला पाहिजे. जर हे साक्षात आहे, तर मग कळलं पाहिजे आपल्याला, की माताजी जे म्हणतात ते केलं पाहिजे. सहजयोगात जे म्हटलंय ते केलं पाहिजे, जर ते तुम्ही करणार नाही, तर सहजयोग तुमच्यात वाढणार नाही. नाही वाढला की मग माताजींवर दोष लावायचा की माताजींनी, अहो, आम्ही इतक्या दिवसापासनं सहजयोग  करतो पण  माताजीनी आम्हाला एवढं सुद्धा मदत केलेली नाही.  म्हणजे तुम्ही केलेला नाही सहजयोग बरोबर! कुठ्ठेतरी पाणी मुरतंय आणि ते पाहिलं पाहिजे .कुठे पाणी मुरतंय ते जर तुमच्या लक्षात आलं, आणि असा अट्टहास नाही  धरायचा,  हट्ट नाही धरायचा. हट्ट धरणं  हा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा विशेष गुण आहे. प्रत्येक गोष्टीत  हट्ट धरायचा, आम्हाला  हेच पाहिजे. हे करा नाहीतर नाही. पण तसं नाहीये ना. जे आहे ते स्वतः बघायचं, शहाणपण धरायचं. आणि जे आहे ते घ्यायचं. साधुसंतांनी जे  सांगितलंय तेच आम्ही सांगतो. पण तुम्ही कुठे साधुसंतांचं करता. काहीतरी आपलं मनानी काढलेलं आहे. जे काही आपल्या मनानं काढलंय आणि त्यानी जे तुम्ही प्रकार करून राहिलात, त्यानी कितीतरी आपल्या देशाला त्रास झालेला आहे. आता शंभरदा मी सांगितलेलं आहे, की हे बाबाजी लोकांच्या कडे जाऊ नका. हे तांत्रिक असतात, ते भुतं घालतात तुमच्यात. जर आपल्या देशातले तांत्रिक गेले तर आपल्या देशातली दरिद्रीपणा जाणार आहे, हे मी शंभरदा सांगते.  तुमच्यातला तांत्रिक जर गेला,  तर, देवी इथे येऊ शकते. कारण काय आहे, लक्ष्मीचं असं सूत्र असतं की जर इकडनं तांत्रिक आला की ती तिकडनं निघाली. म्हणून गंडेदोरे बांधू नका, तावीज घालू नका, तांत्रिकाला आणू नका. मग दारिद्र्य आलं की, अहो माताजी, अहो  असं कसं झालं? योगाने क्षेम होतं असं कृष्णाने सांगितलंय, पण योग जमला पाहिजे ना. आधी योग जमवून घ्या. आधी योग सांगितलाय, मग क्षेम सांगितलाय. आधी क्षेम नाही सांगितलेलं. योग झाल्यानंतर परमेश्वराच्या साम्राज्यात आल्यावर परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो. पण आधी योग तर जमवून घ्या. योगाच्या बाबतीत अत्यंत हट्ट असतो. आणि तो हट्ट केल्यामुळे सगळ्या गोष्टीला दिरंगाई होते. दिरंगाईची वेळ नाही. ह्या वेळेला जितक्या लवकर सहजयोग मिळत आहे, जितक्या झपाट्याने तुम्ही वाढू शकाल, जितक्या झपाट्याने सहजयोगाचा धर्म वाढेल, तितकंच आपल्याला, आपल्या देशाला आणि सर्वच मानवजातीलाच त्याचा फायदा होणार आहे. हे एकदा जर लक्षात आलं, तर मनुष्य लगेच, जे माताजी नी म्हटलं तेच करा. आम्हाला करायचं नाही दुसरं, अशानला. आता प्रत्येकाला आहे की आम्ही कुणाचे बंदे नाही आहोत, आम्ही कशाला करायचं, नका करू. पण उद्या तुम्हाला त्रास झाल्यावर तुम्ही परत आमच्याकडे येणार. डॉक्टरनी काही सांगितलं, समजा, आता हे डॉक्टर ते आधी हे सिद्ध झालं की नाही,  तुम्हाला हे सिद्ध झालं की माताजींनी आम्हाला पार केलं. आता हे सिद्ध झाल्यावर जे माताजी म्हणतात तेच खरं आहे. मी परत सांगितलं, की व्हायब्रेशन्स बघून तुम्ही प्रत्येक गोष्ट करा. कोणी म्हटलं आम्ही मोठे आहोत म्हणून काय मोठं होत नाही. असाल तुम्ही आपल्या ठिकाणी. परमेश्वराच्या दृष्टीत मनुष्य मोठा आहे की नाही ते व्हायब्रेशननी बघायला पाहिजे. व्हायब्रेशननी बघितल्याशिवाय कोणच्याही गोष्टीला मान्यता नाही द्यायची. आता आपल्या इथे सुद्धा पुष्कळ साधू-संत झालेत, पैकी काही खोटे आहेत आणि अजून त्यांची पूजा होते. म्हणजे हे गजानन महाराज, हा काही मनुष्य खरा नाहीये, मुळीच खरा नाहीये. तुम्ही व्हायब्रेशन बघा नुसता अंगाला, नुसतं जसं काही कुणी विंचू चावावे तसं होतं त्या माणसाला बघून. जो मनुष्य खरा आहे, अक्कलकोटचे खरे आहेत, ते खरे आहेत. ते उपासनी महाराज खरे नाहीत. साईनाथ फारच मोठे खरे होते. पण त्यांच्यावर तो जो दुसरा आहे, आता आलेला, सत्य म्हणवणारा, तो खरा नाहीये. म्हणजे जे आहे ते आहे, जे नाही ते नाही. माताजी कशाला कुणाला चांगलं म्हणतात की कुणाला वाईट म्हणतात, असा विचार केला पाहिजे. माझं काही नातं आहे का त्यांच्याशी? खऱ्या लोकांशी आहे, खोट्याशी  नाही. आता तुम्हाला जर मी स्पष्ट नाही सांगितलं तर कोण सांगणार आहे. जर आईने स्पष्ट नाही सांगितलं तर कोणी सांगायचं? पुष्कळांचं म्हणणं असं आहे की माताजी फार चिकित्सा करतात. अहो, चिकित्सा बिकित्सा काय करत नाही, मी स्पष्ट सांगते. आता समजा जर एखाद्या आईने पाहिलं, आपला मुलगा आगीतून चाललाय, त्याला मुलाला दिसत नाही, आंधळा आहे, तर ती सांगणार ना बेटा तिकडे आग आहे तिकडे जाऊ नको. पहिल्यांदा प्रेमाने सांगेल, समजावून सांगेल, सगळं करून बघेल. आणि मग, जर तो जळाला तर त्याला मग नीटही करते नंतर ती. पण कशाला जाळून पोळून  घ्यायचं स्वतःला. स्वतःबद्दल जरा लक्ष द्यायला नको का? स्वतःला जाळूनपोळून कसं चालणार आहे.

दुसरं म्हणजे, पैशाच्या बाबतीतसुद्धा सांगायचंय की पैसे सुद्धा, आपल्याकडे इतके पोटभरू लोकं आहेत, सगळेजण देवाच्या नावावर पैसे कमावतात. खूप पैसे कमवायचे आणि खायचे. दुसऱ्याचे पैसे घ्यायचे आणि त्याच्यावरती जिवन  जगायचं. असे पुष्कळ लोक आहेत. अशा लोकांपासनं दूर राहिलं पाहिजे. सहज योगात कुणी पोटभरूपणा करत आहेत, कुणालाही, केला की त्याला त्रास होणार. मला माहित आहे, लोकांना भयंकर त्रास झालेले आहेत. सात सात पिढ्या त्यांच्या उद्धरणार नाही. तेव्हा त्यांनी पैशात गडबड करायची नाही. ते तर एक झालंच ,पण त्याशिवाय जे लोक असे धंदे करतात त्यांच्याकडे जायचं नाही. आता परवा आम्ही एकाकडे गेलो होतो. ते सहज योगी आहेत. आणि ते एक असे आणून बसवले, त्यांनी, गुरुवर्य कुणीतरी, हवनाला. म्हटलं हे कसे, हे तर पार नाहीत. मग ह्यांना कशाला बसवलं हवनाला? हयांचं आम्हाला पोचणार आहे का? तुम्ही बसा म्हटलं. अहो आम्ही म्हणे ब्राह्मण नाही, आम्हाला काय येत नाही. काही नाही .तुम्ही असतील तर आम्हाला चालतील, ते नको. तुम्हाला काही येत नसलं तरी आम्हाला चालेल. नुसतं तुम्ही आहुतीला काही घातलं तरी आम्हाला चालेल, पण ते नकोत आम्हाला. कारण त्यांना काही येत नाही, पोटभरू आहेत ते. त्या पोटभरू माणसांनी आमची पूजा होत नाही. मनुष्य पवित्र पाहिजे आणि पार पाहिजे. सहज योग म्हणजे, अगदी दिव्य आहे, दिव्य आहे. आणि त्या दिव्यात  तुम्ही तुमचं दिव्य झालं पाहिजे. तुमच्यात दिव्यता आली पाहिजे. दिव्यता येण्यासाठी अगदी, जसं काही सोनं आपण विस्तवातून काढतो आणि अगदी ते जसं अगदी लकाकून निघतं तसं तुमचं झालं पाहिजे. तेव्हा तो सहजयोग, नाही तर त्याला काय फायदा आहे? सहजयोग म्हणजे दुसरे काहीतरी असे चालतात आपले लोक इकडे तिकडे धंदे, असे धर्मप्रचारक, अमुक-तमुक तशातला प्रकार करायचा नाही. तुम्हाला काहीतरी तावून सुलाखून, काहीतरी विशेष तुमचं झालं पाहिजे. तुमची जी आज परिस्थिती आहे, किंवा जे काही आहे, ते सगळं बदलून काहीतरी विशेष तुमच्यातनं निघालं पाहिजे. जसं हिऱ्याला आपण पैलू पाडतो, तसे तुमचे सगळे पैलू पूर्णपणे पाडून घेतले पाहिजेत. हया असं जर झालं तरच ह्या सहजयोगाला अर्थ आहे. मगच मी त्याला खरं म्हणजे महायोग म्हणेन. नाहीतर ह्या अशा सहजयोगाला अर्थ काय आहे? की माताजी आम्हाला खायला मिळालं, आम्हाला माताजी अमुक झालं, ह्याला काय राहिलं, हे काही विशेष नाही मला वाटतं. दुसरं सांगायचं म्हणजे असं की, थोडंसं माझंपण आपल्याकडे, फार विक्षिप्त पद्धतीचं आहे. विलायतेत वगैरे, माझा मुलगा कुणी नाही, माझी मुलगी कुणी नाही, माझा भाऊ कुणी नाही, माझं कुणी नाही, अशा रीतीची वृत्ती आहे, मीच सगळं. इकडे माझ्याकडे आले म्हणजे भाऊ, बहीण, आई, आजोबापासनं सगळे जणं जे आहेत त्या सगळ्यांचं मी बघितलं पाहिजे. आता ते माझ्याजवळ आले अथवा पार झाले किंवा नाही त्याचा काही विचारच नाही. आता त्यांच्या भावाच्या बहिणीच्या अमक्याचे तमके कुणीतरी वारले. माताजी, त्यांचं तुम्ही कसं बघायला पाहिजे होतं. अहो कबूल, पण ते कुठे होते. तेव्हा हे माझे आहेत, हे माझे आहेत, हे माझे आहेत, तसं नाही. माझे सोयरीक  कोण, जे विठ्ठलाचे! हे लक्षात ठेवलं पाहिजे. जे विठ्ठलाचे खरे, ते माझे सोयरीक. बाकी लोकांच्याबद्दल उगीचच ऊहापोह करून काय उपयोग आहे. जर ते सहजयोगातच नाही, त्यांनी जर परमिशनच  मिळवण्याचा प्रयत्न केलेला नाही, तर असे माझे सोयरीक उगीचच  झाले, म्हणजे काहीतरी झाले, आपले संबंध जुळले. काहीतरी पूर्वजन्माचे असतील तर संबंध जुळले. पण ह्या जन्मात मात्र त्यांच्याबद्दल खंत पाळणे किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी आस्था ठेवणे, उगीचच ठेवण्यात काय अर्थ आहे. आणि ज्या माणसांनी अशी आस्था ठेवली त्याला त्रास होणार.

दुसरं, एक, दुसरी गोष्ट सांगायचे म्हणजे, मी, माझी फार इच्छा आहे तुमच्या घरी यावं, बसावं, मला खूप आनंद होतो. घरात, गृहस्थात, कुटुंबात जावं आणि कुणी म्हटलं की मी म्हणते पण येते. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, आईला फार वेळ नसतो. त्या वेळेत जर तुम्ही म्हणालात तर काय म्हणणार, मला तोडून म्हणता येत नाही, नाही येणार वगैरे. पण इतका वेळ कुठे आहे आईला. सकाळपासनं माणसं यायला लागलीत, तिथे बसलो, त्यामुळे कुणाच्या घरी कधी जाणं नाही झालं, तर ते वाईट नाही वाटून घ्यायचं. माझं घर कोणचं आहे, जे माझं घर तेच तुमचं घर आहे नं. मी तिथे आहेच. आली तर बरं, नाही आली तर बरं, असा विचार ठेवला पाहिजे आणि वाईट मात्र वाटून घेतलं नाही पाहिजे अशा गोष्टींचं. जर नाही झालं आईच्या हातून तर झालं, काय हरकत आहे, नाही आल्या ना माताजी, काय हरकत आहे. त्याच्यात काय. माताजींना एवढी कामं आहेत, काही हरकत नाही. माझ्याच  घरी आलं पाहिजे, असा अट्टाहास, हा दुसरं माझं आहे. आणि त्यात शहाणपण जातं. वाईट नाही वाटून घ्यायचं. आजच मला कुठं जायचं होतं, गेले नाही, मला बरं नाही वाटलं, पण करता काय? तेव्हा तुम्ही त्याबाबतीत असं म्हणायचं, की माताजी तुम्ही नका वाईट वाटून घेऊ, आम्हाला माहित आहे तुम्ही कामात आहात. तुम्ही काय इकडे तिकडे जात नाही. तुम्ही सगळं आमच्यासाठीच आयुष्य घालवता. आता माझं, माझा संसार आहे, सगळं सोडून इथे तीन-चार महिने राहते, ऑस्ट्रेलियाला जायचं, अमेरिकेला जायचं, निदान तरी सहा-सात महिने वर्षातनं बाहेर राहते. माझे यजमान आहेत, घर आहे माझं, घरद्वार  सोडून, सगळं काही, तुम्ही रहाल का सहा-सात महिने, कुणीतरी? तसं करतेय मी. तेव्हा एखाद वेळेला माताजीना सुट्टी द्यावी, त्याला काय हरकत नाही. आणि इतकं वाईट नाही वाटून घ्यायचं त्याचं. तेव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत, आता पूर्वीचे लोक, साधुसंत तर कुणाच्या घरी जातच नसत. त्यांचा नियम असायचा आणि सहजयोगातही आमचा नियम आहे तसा थोडाबहुत. घरी कुणाच्या जायचं नाही. एकाच्या घरी गेलं की दुसरा म्हणतो, माझ्या घरी या. मग ते म्हणतात की आमच्या घरी आले होते माताजी, म्हणजे ते एक महात्म्य झालं. म्हणजे काही लोक म्हणत नाहीत तर काही म्हणतात. तर शक्यतो कुणाच्या घरी जायचं नाही, असं आमचा एक नियम आहे. शक्यतो एकाच माणसावरती सगळं घालायचं नाही. आता पेटकर आहेत, आमचे दामले आहेत. आत्ता ह्या दोघांचं म्हणजे वास्तव्य, एकाचं पुण्याला, एकाचं मुंबईला. आता जोपर्यंत सोलापूरला व्यवस्था झाली नाही, तोपर्यंत हयांनी येऊन इकडे करायचं. मग आता सोलापूरच्या माणसांनी सांभाळलं पाहिजे. त्यांनी जबाबदारी घ्यायची. असंच आम्ही सहजयोगाचं करतो. आता असं नाही की हे लोक आले पाहिजेत, की मग व्यवस्था झाली पाहिजे. त्यांच्यावर आता टाकलंय, त्यांनी आपली व्यवस्था बघायची, त्यांनीच. हळूहळू मग आता ह्या लोकांनी सुद्धा आसपास असं  सेंटर सुरू करायचं. जोपर्यंत ते सेंटर उभारत नाहीत, तोपर्यंत ते बघायचं, मग सोडून टाकायचं. तिथे चिकटून बसायचं नाही, की हे मी सेंटर उभारलं आता माझंच इथे सगळं चाललं पाहिजे, असं धरून बसायचं नाही. कुठेही सेंटर उघडायचं असलं, तिथे करायचं, चार माणसं तिथे उभी झाली की ते सोडून टाकायचं, परत आपल्या कार्याला लागायचं. परत दुसरं सेंटर उघडायचं, ते तिथे सुरू झालं म्हणजे ते तिथे, त्या लोकांना, चार लोकांना तयार करून, तुम्ही बा तुमचं सांभाळा, आम्ही तुम्हाला सांगितलं, आता तुम्ही करा. अशा रीतीनेच वृक्ष फोफावणार आहे. आणि अशा रीतीने जर तुम्ही आपल्याला समजुतदारपणानी सगळ्या गोष्टी घेतल्या, प्रेमानी घेतल्या, वाईट नाही वाटून घ्यायचं, वाईट वाटून घेणं म्हणजे आपल्याकडे रुसवा-फुगवी हा जो प्रकार आहे, हे काही इकडे आपल्याकडे लग्न मांडलेलं नाही किंवा तुम्ही वराकडचे नाही आणि मी वधू कडची नाही. माझी तर नेहमीच स्थिती अशी असते की मी वधूकडची  आहे. नेहमी पाय धरण्या धराव्या लागतात. तर तसं आईला करायला लागलं नाही पाहिजे. आपण समजलं पाहिजे की आई जे करते, ते आपल्या भल्यासाठी करते आहे. आणि आपलीच आई आहे. वाट्टेल ते आम्ही मागितलं तरी देणार आहे ती. जे असेल ते तुमचंच आहे. सगळा काही अधिकार तुमचाच आहे. त्याबद्दल शंकाच नाही. पण तरीसुद्धा आपला अधिकार कसा वापरायचा, कितपत वापरायचा, आणि तेव्हा वापरताना सुद्धा, आमचा आईवर अधिकार आहे, म्हणजे आमचाच अधिकार नाही, सर्वांचाच अधिकार आहे. सर्वांचंच सगळं काही आहे. सर्वस्व जे आहे, त्यालाच हे माताजींचं मिळणार आहे, असं समजून एका सामूहिक  चेतनेत, माणसाने राहिलं पाहिजे. कुणी मी मोठा की तु मोठा, की माताजी ना मीच, आता त्यांच्यासाठी मी फळ घेऊन आलो, तर मी मोठा झालो किंवा तुम्ही त्यांच्यासाठी सतरंज्या आणल्या म्हणून मोठे झाले, असे विचार जर केले तर मात्र सहजयोगात तुमची प्रगती होणार नाही, तुमचं नुकसान होईल. म्हणून तुमचं नुकसान झालं नाही पाहिजे. सहजयोगा चे सगळे काही कायदेकानून तेवढे समजून घ्या. ते कायदे कानून परमेश्वरी कायदेकानून आहेत. जर ते तुम्ही प्रेमानी पाळलेत, प्रेमानी परत म्हणते, रागावून नाही. प्रेमानी, समजुतदारपणानी ते जर पाळले तर तुमचे वृक्ष होतील, मोठे मोठे वृक्ष होणार. आणि तुम्ही स्वतः समर्थ होऊन अति बलिशाली होणार आहे. आणि ही संबंध शक्ती तुमच्यातनं स्वतः वाहू लागेल. आणि मला काही करायला नको. तर अशाप्रकारे, सोलापूरला आता येणं झालेलं आहे. पुढच्या वर्षी सर्व सोलापूरच्या मंडळींनी, मी जो प्रोग्राम आखुन पाठवीन, तशा रीतीनी इथे व्यवस्था करायची. मी आखलेला प्रोग्राम जर तुम्ही ठरवला तर सगळी व्यवस्था एका क्षणात होईल. पण जर तुम्ही आपलं स्वतःचं लावलं मध्ये की, नाही असं नाही तसं आहे, तर मग त्रास होईल. मग म्हणायचं माताजी ही व्यवस्था नाही झाली, ती व्यवस्था झाली,  असं. कारण माझं लक्ष तुमच्याकडे मी प्रोग्राम आखल्याप्रमाणे आहे. मी जे काही लिहून पाठवलं ते तुम्ही मान्य करायचं. आणि बघा मग मी तुमची व्यवस्था करते, सगळं तयार होईल. पैसे उभे राहतील, तुम्हाला काही त्रास होणार नाही, काहीही होणार नाही. पण आपली व्यवस्था करायला सुरुवात केली म्हणजे त्रास होईल. हे जर लक्षात आलं आणि समज त्याची जर तुम्ही घेतलीत, तर तुम्ही म्हणजे सर्व जगामध्ये प्रसिद्ध व्हाल. सर्व जगात तुमचं नाव होणार आहे. हे सहज योगी म्हणजे सोलापूरचे हे विशेष, हयांनी काय केलं, इतक्या इतक्या लोकांना पार करून सोडलेलं आहे. ते अमके एवढे विशेष. आत्ता धुमाळांचं नाव साऱ्या गावात झालंय. कारण शहाणी माणसं आहेत. शहाणीपण फार आहेत. पूर्वी धुमाळां मध्ये थोडंसं होतं, थोडा अहंकार. तो काढून टाकला त्यांनी. आता शहाणपण आलंय. अहंकार काढला पाहिजे. आत्ता हट्ट म्हणून अगदी करत नाही. तेव्हा कोणत्याही माणसानी, त्यांच्याकडे बघून स्वतःला सुधारून घेतले पाहिजे. हट्ट किंवा जिद्दीपणा करणं, दुसऱ्यांच्या डोक्यावर बसणं वगैरे वगैरे हे प्रकार सहजयोग्याला मुळीच शोभत नाहीत. उलट जितका सहजयोगी वर येतो, तितकाच तो नम्र होत जातो. ही त्याची ओळख आहे. मी कशाचीच तुमच्यावर जबरदस्ती कधी करत नाही. हे करा, असं म्हणून म्हणत नाही. काय असेल ते मान्य. जे म्हणाल ते. जिथे ठेवायचं तिथे ठेवा. ठेवायचं असलं तर ठेवा नाहीतर बाहेर ठेवा. जमिनीवर झोपा म्हटलं तर जमिनीवर झोपायचं. आमचा कोणताच तुमच्यावरती कोणच्याच गोष्टीचा पगडा नाही. तेव्हा तुम्ही पण अशाच रीतीनी, नम्रपणानी, प्रेमानी. आत्ता एवढ्या मोठ्या परमेश्वराच्या कार्याच्या वेळेला तुमचा जन्म झाला ,तुम्ही एवढं मोठं परमेश्वराचं कार्य करत आहात, इतकंच नाही पण त्या कार्यात तुम्ही इतके यशस्वी झालात, हे किती म्हणजे, हज्जारो वर्षांच्या तपश्चर्या केलेल्या मोठ्या मोठ्या ऋषीमुनींना जे लाभलं नाही ते तुम्हाला मिळालेलं आहे. हे भाग्य कोणाला मिळालेलं आहे. असा विचार करून, अत्यंत नम्रता धरून, प्रेमानी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे आणि दुसऱ्यांच्या कडेही. माझ्या बायकोचंच महत्व झालं पाहिजे, माझ्या बायकोचंच गाणं झालं पाहिजे, तिनीच मिरवलं पाहिजे, असल्या तऱ्हेच्या मूर्खपणाच्या गोष्टी केल्या, कि ती बायकोच तुमच्या डोक्यावरती मिऱ्या वाटायला लागेल. तेव्हा सहज योगाला फार जपून असायला पाहिजे, समजलं पाहिजे. सहज योग म्हणजे काही एका दोघांसाठी नाही, सर्व जगासाठी आहे. आणि त्या सर्व जगात तुम्ही एक विशेष कोंदणात हिरे बसवल्यासारखे होऊ शकता. नाहीतर अगदी, जसं काही तरी आपण, काढून टाकतो, झाडून टाकतो, तशातलेही होऊ शकता. त्यापैकी तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही निश्चित करायचं, मी करू शकत नाही. तेवढंच मला जमत नाही. ते तुम्हीच निश्चित केलं पाहिजे. त्याचा निवाडा तुम्ही करायला पाहिजे. मी तो निवाडा करू शकत नाही.

 तर आत्ता पूजेला सुरुवात करायला हरकत नाही. बरोबर बारा वाजले, जशी माझी इच्छा होती.

 (सहजयोगी सूचना देतांना :- या ठिकाणचे जे सहजयोगी मंडळी आहेत त्यांना पूजेला पुढे बसवावं अशी माताजींनी सूचना केलेली आहे. त्याप्रमाणे मी नावं घेतो, मला माहिती आहे ती, त्या लोकांनी पुढे यावं.)

श्री माताजी :- सगळ्यांनाच बसू देत. काही जास्त दिसत नाहीत.

(सहजयोगी सूचना देतांना :-  श्री व सौ बावळे, या पुढे या लगेच, पटापट उठून, श्री व सौ. चीटे, श्री व सौ जोशी.< Not Clear> नंतर कालिदास, माऊलीकर,  मधु मित्र वक्री, अशोक तांबेकर, श्री व सौ तांबेकर.)