Talk

Rahuri (India)

1982-02-01 Talk, India Tour Rahuri - Niphad (Marathi), 3'
Download video (standard quality): Download video (full quality): View and download on Vimeo: View on Youku: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribe

Feedback
Share

Talk

तो ला काय अर्थ आहे कि तो असा कि साक्षात् च आत्ता तुम्ही फोटो घेता हे सायन्स चे आपल्यावरती केवढे मोठे काम आहे आत्ता मी हॉंग काँगला (at Hong Kong )गेले होते . एक तिथे फार एक चांगली मुलगी होती ,तिचे संबंध स्वतः चे सगळॆ टेलीविजिनची वैगरे व्यवस्था होती. तिची माझ्यावर फार श्रध्दा होती तिने सांगितले कि टेलीविजिनवरती (on television )एक घेऊ का ? म्हटले घ्या आणि मग तिने टेलीविजिनवर दाखवले कि आणि त्यांना सांगितले कि तुम्ही आत्ता माताजींकडे असे सगळे हात करून बसा ,पाच मिनिटे आणि मला सांगितले अशा तुम्ही उभ्या राहा काही हरकत नाही आणि पुष्कळ लोकांना जागृती आली (आनंदाने हसून सांगत आहेत ) आणि त्यांनी पत्र लिहिले की आमच्या हातात अशा थंड थंड वाऱ्या सारखे काही वाहिले ,कां या चैतन्य लहरी आहेत ? यांच्या बद्दल सगळ्यांनी सांगितलेले आहे . महंमद साहेबांनी त्याला रुह असे म्हटलेले आहे .या चैतन्य लहरींच्यां बद्दल एक मोठे पुस्तक आदि शंकराचार्यांनी लिहलेले आहे. आत्ताचे शंकराचार्य नाहीत ते जुने . जे खरे शंकराचार्य होते . त्यांनी एवढे मोठे एक पुस्तक (हाताच्या बोटाने मोजून दाखवत आहेत )या चैतन्य लहरींवर लिहिलेले आहे .आपण वाचतच नाही मुळी त्याच्या मुळे आपल्याला हि कल्पना होत नाही कि आपल्या या धर्मात सुध्दा केवढा मोठा आपला वारसा आहे . त्याच्यावर ख्रिस्तानी याला कूल ब्रीझ ऑफ द होली घोस्ट (cool breeze of holy ghost )असे म्हटलेले आहे .अगदी स्पष्ट ;ह्याच्या हून स्पष्ट काय म्हणणार कि म्हणजे आधी कुंडलिनी ;पण होली घोस्ट विषयी (with the subject of holy ghost ) ख्रिस्त जास्त बोललेले नाहीत कारण त्यांची आई सुध्दा हि आदिशक्ती होती . त्या वेळेला जर त्यांनी सांगितले असते कि माझी आई आदिशक्ती आहे तर लोकांनी तिच्यावरच हल्ला केला असता ,आणि मग त्यांना सहन झाले नसते मग ते एकादश रुद्रात उतरले असते . म्हणून ते नाटक पूर्ण व्हावे म्हणून ते आपल्या आई बद्दल ते विशेष बोलले नाहीत . पण इतर लोकांना त्यांनी सांगितले .नंतर त्यांच्या आईची सुध्दा लोक पूजा करु लागले . आत्ता ख्रिस्ताबद्दल सुध्दा इतके खोटे नाटे लोकांनी सांगितलेले आहे कि ,महंमद साहेबांच्या बद्दलसुध्दा इतके खोटे नाटे करतात कि, आत्ता या देशां मध्ये लोकांना अशी शंका पडली बुवा कि आहे तरी काय ?कारण या धर्मातले लोक इतके गर्विष्ठ झाले जसे हिंदू लोक सुध्दा (tape is paused )आले का?(हातामधला फोटो सर्वांना दाखवत आहेत )हा आपल्या सेंटरला ऑस्ट्रेलियाच्या (from Australia ) लोकांच्या तर्फे बक्षिस .
(टाळ्यांचा आवाज),कॅलेंडर (calendar ) (हाता मधले कॅलेंडर सर्वांना दाखवत आहेत ) प्रत्येकाला देत आहेत ते . हे ख्रिस्ताने आपल्या
आई बद्दल म्हटलेले होते (हाता मधले कॅलेंडरकडे बोट दाखवत आहेत ) बी होल्ड दि मदर (be hold the mother ) म्हणजे आई कडे लक्ष ठेवा कि ती सगळे काही सांगणार आहे हे ख्रिस्ताने सांगून ठेवलेले होते (टाळ्यांचा आवाज). हे कॅलेंडर ( calendar ) यांनी खास तुमच्या कार्यकर्त्यांसाठी दिलेले आहे