Ekadasha Rudra Swayambhu Shilanyas

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Ekadasha Rudra Swayambhu Shilanyas (Marathi Transcript)

आफ्टर सहस्रार   सो ब्युटीफुल , इट्स त्रिगुणात्मिका , 

सी ,वन टू, थ्री .. कॅन यु सी द   त्रिगुणात्मिका. .धिस इज आज्ञा हियर.   

ब्युटीफुल !  व्हेन आय से दॅट, इट इझ इव्हन मोर ! (सामूहिक हास्य ).

नारळ वगैरे  फोडा इथे.

सहजी :  हो. फोडतो ना.

श्री माताजी  :  जे साधू संत सांगू शकतात , ते कोणी सांगू शकत नाही. आता हे सगळे साधू संत आलेत , तुम्हाला इथे  सांगायला. .ह्याचं नाव काय ठेवणार तुम्ही? देवळाचे ? कारण हे सहस्रार आहे. सबंध सातही देव आहेत. 

सहज योगी  :  ह्यांनी आता काय प्राचीन काळापासून म्हसोबा म्हटलं आहे . 

श्री माताजी  :  काय ?

सहज योगी :  म्हसोबा .

श्री माताजी  :  म्हसोबा? तर म्हसोबा का झालं ?

सहज योगी :  अनेक दैवत म्हणून  म्हसोबा त्याला नाव आहे .

श्री माताजी : अनेक दैवत म्हणून म्हसोबा. एकादश रुद्र . एकादश रुद्र . म्हसोबा म्हणजे एकादश रुद्र आहे …थोडंसं म्हसोबा म्हणजे कसं आहे . ते काही सगळ्यांना समजत नाही.

सहज योगी :  अवघड आहे .

श्री माताजी :  तेंव्हा एकादश रुद्र म्हटलं तरी चालेल . किंवा सहस्रार आहे हे. म्हणजे सातही देवता आहेत पण प्रसन्न आहेत. पण एकादश रुद्र म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह पॉवर आहेत. अकरा. त्रिगुणात्मिकाचीही . नाव काहीही दिलं तरी काय ते समजलं पाहिजे. तत्व त्याच्यातलं काय आहे…… काय आहे, तीन आहेत ना आपल्यामध्ये?            

सहज योगी  : हो.

श्री माताजी  : महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. पैकी ( श्री माताजी स्वयंभू कडे निर्देश करून म्हणतात )

ही मधली महालक्ष्मी आहे आणि ही ,ही महाकाली आणि ही महासरस्वती . अश्या रीतीनं हे बनवलेलं आहे .आणि ही सगळी चक्र आहेत त्यांची आत. फारच सुंदर आहे. 

सहज योगी  : आणि हे, हे …

श्री माताजी  : हे पण पवित्रच दगड असतात. काय आहे माझं म्हणणं , ह्यालाही लावलं तर वाईट काही नाही, तेही पवित्रच आहेत. कारण ह्याच्या  आसपास जे दगड आहेत, ते अपवित्र कसे असतील.  

सहज योगी  : नाही .

श्री माताजी  :  तेही पवित्रच  आहेत. पण त्यांचं काही पूजन करण्यासारखं नाही. हे मात्र खरे येऊन राहिलेत. ह्याच्यात काही शंकाच नाही. हे जे तीन आहेत खाली.

सहज योगी  :  प्लॅन आला आहे का आपला?प्लान आलाय?

सहज योगी  :  आलाय आलाय .

सहजी  :  कुठे आहे ? 

सर्व सहजी  :  श्री निर्मला देवी कि जय . जगन्माता श्री  निर्मला देवी कि जय. 

(श्री माताजी    शिलान्यासाचे पूजन करतात. सहजी टाळ्या वाजवतात )

श्री माताजी    :  चांगलं आहे. केवढं मोठं आहे. हे महाराष्ट्राचं भूषण आहे. सर्व देव इथे वसलेत. अनबिलीव्हेबल. इझंट इट?  मिरॅकल ऑफ द  मिरॅकल .