Public Program

Kolhapur (India)

1982-12-30 Procession and Public Program Marathi, Malharpeth, India, DP-RAW, 39'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

1982-1230-Public Program (Malharpeth) Marathi

कलियुगा मध्ये जन्म घेणं आणि तेही आई’च्या रूपाने म्हणजे फार कठीण काम आहे. गुरु म्हटला की त्याचा आपोआपच सगळ्यांना वचक असतो, आई म्हटली की प्रत्येक मानवरासारखच (मानवासारख) आपल्या जी हक्काची आई आहे आपण कसंही तिच्याशी वागलं तर ती आपल्याला क्षमाच करणार तेव्हा सहज योग आई’च्या रूपाने साध्य करण तर व्हावंच लागतं कारण त्याच्याशिवाय होणारच नव्हतं आईच व्हायला पाहिजे दुसऱ्या कोणाच्या शक्तीततच नव्हत हे काम. तर मल्हार पेठेत सत्कार बघून आईचा या कलियुगात फार आश्चर्य वाटतं आणि फार आनंद झाला म्हणजे कलियुग बदलून कृतयुगाला सुरुवात झाली आहे असं पंचांगात आहे ते खरं आहे हे आज मला मात्र पटलं. आम्ही एक स्त्री आहोत तेही एक आई आहोत म्हणजे एकतऱ्हेचा दुबळेपणा आहे हृदयाला तुमचं काही वाईट झालं तर तेही दुखतं ,घनिष्ठ आहात तुमचं चांगलं व्हावं म्हणून इतका आटोकाट प्रयत्न असतो की कसंही करून यांना एकदा मिळालं पाहिजे कारण आईला स्वतःचं काहीच नसतं तिला आपली मुलं ठीक झाली, त्यांना शक्ती मिळाली त्यांचं जे काही आहे ते त्यांना मिळालं त्याच्या पलीकडे काय यायला नको .तेव्हा एक फक्त देण्याचं जे काम आहे ते झालं म्हणजे कृतार्थ वाटतं त्याच्या पलीकडे आणखीन आम्हाला काही नाही ,आपण इतकी मंडळी मल्हार पेठेत सहज योगाच्या कार्यक्रमाला आलात म्हणजे किती भाविक आणि किती सात्विक लोक, परत संत तुकारामांच्या नावाने इथे एवढी सुंदर शाळा काढलेली आहे याबद्दल मला इथले मुख्याध्यापक जे आहेत ते मला दिसले नाहीत कोण आहेत ते .तर त्यांना अत्यंत त्यांचे आभार मानायचे आहे संत तुकाराम म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आमचेच आत्मिक स्वतःचे आहेत त्यांनी तर सहज योगाची व्यवस्था आधीच करून ठेवलेली होती त्याचीच तयारी आपल्या सर्व कवितेमधन त्यांनी पसरवून ठेवलेली आज अनेक वेळेला भाषणातून मी त्यांचे उल्लेख करत असते इतकेच नव्हे तर ही  जी मंडळी परदेशातून आली आहेत त्यांनीसुद्धा त्यांची भजने पुजलेली आहेत आणि मराठीत व्यवस्थित म्हणतात, त्यांची भजने म्हणतात आता तर तुम्हाला कधी ऐकायला मिळाली तर तुम्हाला आनंद वाटेल की हे मराठी भाषिक कुठून आलेत आणि मराठी भाषेत संत तुकारामांची भजन चांगलीच पाठ करून ठेवलेली आहेत त्या लोकांनी त्यांचे अर्थ काय? त्याचे अर्थ काय? त्यांचे मतितार्थ काय आहे? वगैरे सर्वच पुसून ठेवले आहे पण आपल्याकडे मात्र कोड धर्माकडे मनुष्याला जास्त जात कारण आपण खरोखर विशेष लोक जरी आपल्याला एवढी श्रीमंती नसली तरी आपण एक विशेष लोक आहोत कारण या सह्याद्रीच्या पठारावर आपल्याला माहितेय की साडेतीन वेटोळे घालून विश्वाची कुंडलिनी वसलेली आहे साडेतीन पीठ जी आहेत ती या आपल्या महाराष्ट्रात आहेत इतकेच नव्हे तर अष्टविनायक सुद्धा या महाराष्ट्रात आहेत म्हणजे आपल्याला पृथ्वीच फार मोठा देणआहे. आणि फार महत्वाची  आपली भूमी आहे आणि या भूमीवर तुम्ही जन्मल्यामुळे या भूमीच जे दान आहे ते तुम्हाला रात्रंदिवस मिळत असतं याचं जे काही खाणं-पिणं वगैरे आहे ते सगळं तुम्हाला मिळत असत ते सगळं मिळालेल आहे ते सस्यशामला भूमीमध्ये इथे आपण आता इतक्या भरभराटीला आलो की आपल्याला आश्चर्य वाटेल माझी आई नगरची होती आणि तिचे वडील श्रीमंत असायचे आणि मुंबईला जायचे आणि तिथून द्राक्ष घेऊन यायचे चमनचे द्राक्ष घेऊन यायचे आणखीन फक्त तिलाच खायला मिळायचे आणि इतर मुलींना खायला मिळत नसून जेव्हा लग्न होऊन ती नागपूरला गेली तर मला सांगत असे की ताई मला एक वाटतं की आमच्या नगरच्या लोकांना कधी द्राक्ष खायला मिळाली नाही, त्यांनी कधी द्राक्ष पाहिली नाही इथे जर कोणाला द्राक्ष खायला मिळाली तर किती बरं होईल असं म्हटलं तर तुम्ही काळजी करू नका आणि आज बघा केवढी सुबत्ता तुमच्यामध्ये आली आणि किती फरक झालेला आहे आज त्यां नाही आहेत पण त्या लोकांच्या सगळ्यांच्या आत्म्याला किती आनंद झाला असेल .ज्या दिवशी ही सुबत्ता लोकांमध्ये आली पण सुबत्तेवरुन धर्म वाढला कसा परमेश्वरावर ची भक्ती वाढली पाहिजे परमेश्वराचा साम्राज्यही विकास केला पाहिजे कारण सुबत्ता आल्यावर माणसाला असं वाटतं मीच हे केलं, मीच हे केलं पण मनुष्य  काय करू शकतो हे तुम्ही सांगा जर एखादं झाड पडलं आणि मेल तर त्याचं तुम्ही फर्निचर करू शकता पण एका बिला तरी तुम्ही रोखू शकता का? किंवा एका फळातून तुम्ही म्हणाल तर बी काढू शकता पण एका फुलाला तुम्ही फळ करू शकता का? काहीच करू शकत नाही सर्व जिवंत कार्य आहे हे परमेश्वराच्या शक्तीने होत असतं ही परमेश्वराची जिवंत शक्ती आहे त्यांनीच आपल्याला मानव सुद्धा केलंय आणि ते सहजच केलंय सहज सह म्हणजे तुमच्याबरोबर जन्मलेला असा हा योगाचा अधिकार आहे की तुमच्यामध्ये कुंडलिनी आहे त्याबद्दल ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. अनादीकाळापासून हे चाललेलं आहे सगळे सहजच व्यवस्था आहे ही सर्व सृष्टीची रचना सहज आहे ,असं तुमचं हे मानव  होण सुद्धा साठी सहज आहे आणि त्यापलीकडे अतिमानव होण सुद्धा सहज आहे , काही त्याला कर्म पद्धत नाही, काही त्याला त्रास नाही पण प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा असं काही झालेला आहे तेव्हा एकाला कोणालातरी मिळून हे कार्य करावं लागतं त्यात आता आमची नेमणूक झाली आहे म्हणून हे आता कार्य होत आहे तरी अनेकांनी याचा फायदा घ्यावा स्वतःला अतिमानव करून घेणे ते सगळ आपल्यामध्ये आहे ,आत्मा आपल्या मध्ये आहे आणि  कुंडलिनी आपल्यामध्ये आहे फक्त कुंडलिनीचा संबंध आत्म्याशी झाल्याबरोबर त्या सर्वव्यापी शक्ती बरोबर आपला संबंध होऊन हातातून असं गार गार वाहू लागतं डोक्यातून ही इथून ब्रह्म रंध्रातून असं गारगार वाहू लागतं आता सहाव्या अध्यायामध्ये का सांगितलं की तो व्यर्ज आहे कदाचित काही ब्राह्मणांनी उगीचच यांना काही होऊ नये म्हणून सांगितलं असेल किंवा का सांगितलं मला हे समजत नाही पण कुंडलिनीच्या नावावर सुद्धा अत्यंत गोंधळ लोकांनी करून ठेवले कारण ज्यांना अधिकार नाही त्यांनी हे कार्य करायचं नाही अधिकार हा परमेश्वराकडे आहे अशा माणसाला शुद्ध पावित्र्य असावं लागतं ज्या माणसांमध्ये स्वतः पावित्र्य नाही तो दुसऱ्याच्या कुंडलिनीला हात कसा घालू शकेल? कारण कुंडलिनी ही तुमची अतिपवित्र अशी आई आहे आणि ती प्रत्येकाजवळ आहे तिला तुम्ही मलीन नाही करू शकत  तीअत्यंत पवित्र अशी तुमची शुद्ध इच्छा बाकी सर्व तुमच्या इच्छा विकृत होतात पण ती शुद्ध इच्छा परमेश्वराला मिळवण्याची जी शुद्ध इच्छा आहे ती कुठे सारखी नसते आणि म्हणून तिला म्हणतात ती सुप्तावस्थेत आहे .कारण अजून तिचं जागरण झालेलं नाही आणि ते जागरण जेव्हा तुमच्यात होईल तेव्हा तुमच्या कुंडलिनीला हे कळेल तेव्हा समोर कुणी तरी ती व्यक्ती आहे  जी त्या कुंडलिनीच्या कार्याला जाईल आता आमच्या मुळे म्हणा किंवा इतर सहज योग यांच्यामुळे इतर पुष्कळ लोक पार झाले त्यातले काही लोक इथे आले आणि बरेच सहज योगी लोकांनी इथे येऊन एवढं मोठं इथे  बरच कार्य सुरू केलेलं आहे आता असंच मल्हार पेठेत मग पुढे असं वाढवत वाढवत हे सहयोगाचे कार्य सुरू केलेलं आहे आणि हे पसरणारच कारण याबद्दल पूर्वीच हजारो वर्षापूर्वी भाकीत झालेला आहे हे  भाकीत म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं की भृगुनी हजारो वर्षापूर्वी सोळा-सतरा हजारो वर्षापूर्वी म्हणतात लिहून दिलय आता त्यांची किती हजार वर्ष झाले त्याबद्दल वाद घालण्यापेक्षा असे त्यांनी पुष्कळ जुन नाडी ग्रंथामध्ये लिहून दिलेल आहे की १९७० सालापासून हे कार्य सुरू होणार आहे आणि सहज योग हा १९७० सालापासून सुरू झाला आहे आणि त्या सहयोगाची कुंडलिनी जागृत होऊन आणखी  सगळ्यांना ते परमेश्वराचे जे ज्ञान  आहे ते मिळणार आहे .आता भृगू मुनी विषयी तुकारामांनी जे वाच्य केलेल ही गोष्ट खरी आहे .रामदासांचं काही वाच्य झालेल तिथे पाहण्यात  नाही आल नाही आलं ,तुमच्या शाळेत ते गेलेले नाहीत चोखामेळा झाले किंवा कुणीही झाले सखुबाई झाल्या किंवा नामदेव झाले त्यांनी कोणत्या शाळा युनिव्हर्सिटी पाहिल्या नाहीत .पण शाळा युनिव्हर्सिटीत जाणं वाईट आहे असं मी म्हणत नाही पण शाळा युनिव्हर्सिटीत जाऊन तुम्ही परमेश्वराच्या वर…. शाळा युनिव्हर्सिटीत जाऊन लोकांना असं वाटतं की पुस्तक वाचायचं ते परमेश्वराच्या वर आहे इथेच माणूस चुकतो तेसुद्धा ज्ञान परमेश्वरापासून आलेला आहे सगळ ज्ञान परमेश्वरा पासूनच येत पण शेवटी आत्म्याचा दर्शन झाल्यावर त्यात आतूनच ते ज्ञान येऊ लागतं आणि सर्व साधारण मनुष्य सुद्धा आधी इतका संत साधू सारखा बोलू लागतो सहज योगानी पार झाल्यावर आपण सर्व संतच  होतो आणि संतांना काही तुम्ही घरदार सोडून पलायनवाद घेण्याची गरज नाही .घरातच राहून मुला-बाळांना मध्ये राहून आपला संसार चांगलासा साजरा करून अगदी व्यवस्थित पणे नांदुन त्या घरांमध्ये एकतऱ्हेच परमेश्वराचं साम्राज्य आणलं पाहिजे आणि ते साम्राज्य सुखदायी, आनंददायी आणि मंगलमयी असेल ते जर झालं नाही तर ते परमेश्वराचं साम्राज्य नाही  असं ईश्वरीय ॳश तुमच्यामध्ये जागृत झाल्याबरोबर तुमचं वागणं कसं ईश्वरीय  होऊन जातं आता इथे जी मंडळी आली आहेत .बाहेरून जसं आम्ही सांगितलं ते लोक तर तुमच्या मनाने पुष्कळ जास्त वसलेले आहेत पुष्कळ जास्त तर हे म्हणजे संत खरं म्हणजे यांची  एक स्थिती फार उच्च प्रतीची असली पाहिजे जर आज हे पार झाले आणि उद्या या सगळं सोडून बसले ही स्थिती आपल्या महाराष्ट्रात मी एवढी पाहिली आहे तरी पुष्कळ चांगली आहे पण तरीसुद्धा एका दिवसात आज पार झाले आणि उद्या सगळं सोडून आणि व्यवस्थित झाले असे गेले म्हणजे किती मोठे संत असायला पाहिजे म्हणजे यांची पूर्वजन्माची केवढी कमाई असायला पाहिजे त्याच्या शिवाय काही होऊ शकत नाही की, आजच त्यांना मी पार केलं आणि उद्याच्या दिवशी सगळं मोकळं सोडून अगदी कमळासारखे वर आले. सगळं चिखलातून वाहून गेलं आणि सगळे वर आले हे मात्र मला यांचा पाहून फार आश्चर्य वाटतं हे यांचे विशेष आहे बर यांना काही तुमच्यासारखी धर्म मीमांसा नाही, त्यांना काही लहानपणापासून तुमचं वळण मिळालेलं नाही ,जसं वागायचं तसं वागा आई-वडिलांचं सुद्धा लक्ष नाही ,घर वगैरे अशी काही व्यवस्था नसतानासुद्धा या लोकांनी जसा सहज योग आत्मसात केला आणि जो डोक्यावर उचलून धरलेला आहे त्याच्याकडे पाहून मला कधीकधी आश्चर्य वाटतं की आपल्या महाराष्ट्रात आपण रोजच धर्माबद्दल ऐकत असतो आणि आपल्याला एवढे एवढे मोठे संत झालेले आहेत त्यांनी लहानपणापासून आपण त्यांचे अभंगवाणी वगैरे म्हणत असतानासुद्धा जेव्हा आपल्या जवळ हा धर्म   येतो अथवा जागृत होतो तेव्हा मात्र आपण एवढ्या जोराने जमत नाही कारण कदाचित आपल्याला अति माहीत असल्यामुळे अतिपरिचयात अवज्ञान होत आणि त्यामुळे लोक एवढे त्याच्यात जमत नाहीत पण खरं सांगायचं म्हणजे आपल्या देशांमध्ये इतकं वरदान आहे परमेश्वराचं इतका आपण खरोखर इतके भाग्यवान लोक आहोत की त्याची आपल्याला कल्पनाच नाही आहे की  या लोकांनी काय काय विशेष केलं होतं आणि काय काय प्रकार असो जे असं जे झालं आता मात्र पुढे सर्वांनी सहज योग जमवून घ्यायचा सहजयोगा मध्ये म्हटलं तर अनादि आहे पूर्वी काळचा आलेला आज तसाच आहे आणि पुढे अत्यंत मॉडर्न तो आहे कारण याच्या मध्ये सर्व धर्मांची शक्ती मिळवलेली आहे तेव्हा अगदी सगळ्यात विशेष म्हटलं तरी अगदी मॉडर्न हा धर्म आहे की दत्तात्रयांचा संबंध रामाशी काय आहे? दत्तात्रयांचा संबंध मोहम्मदाशी काय आहे? याचा संबंध इतर गुरु लोकांशी काय आहे? सर्व जगातले गुरु हे कोण कोण दत्तात्रयांची अवतरणे झाली हे सगळं काही सहज योगात आहे मग सितेला झालेली दोन मुलं लव आणि कुश यांच काय झालं हे कोणाची  अवतरणे आहेत ? त्यांची अवतरणे काय झाली ते पुढे बुद्ध महावीर कसे झाले वगैरे सगळं काही तुम्हाला सहज योगात सापडेल आणि बरं हे जे आपण काय बोलत आहात आज पर्यंत बोलाचाच भात बोलाचाच कढी पण आता मात्र हे तुम्ही सिद्ध करा एक मनुष्य मुसलमान होते ते इराणातन आलेले डॉक्टर होते त्यांना पोटाचा भयंकर कॅन्सर झालेला तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही दत्तात्रयांना मानता का? ते म्हणे नाही आम्ही फक्त मोहम्मद साहेबांना मानतो तर म्हटलं ते एकच होते ते आम्ही मानायला तयार नाही आम्ही फक्त मानतो ते फक्त मोहम्मद साहेबांना बाकी आम्ही कोणाला मानत नाही मग म्हटलं जर तुम्ही हे मानलं नाही तर मी तुम्हाला ठीक करू शकत नाही म्हणूनच तुम्हाला पोटाचा कॅन्सर झाला तर ते काही मानायला तयार नाही तर म्हटलं तुम्ही आता घरी जा मी पुढे काही करू शकत नाही माझे मी हात टेकले तुमच्यापुढे तर त्यांच्या बायकोला थोडं शहाणपण आलं आठ दिवसांनी परत घेऊन आली ते आता मरायला टेकलेत तेव्हा आता तुम्ही काय म्हणाला आई  तेच करू. मी म्हटलं आता म्हणा तुम्ही की मोहम्मद तुम्ही दत्तात्रय आहात का? असा प्रश्न विचारा मोहम्मद साहेब तुम्ही दत्तात्रयच आहात का? अस प्रश्न विचारा करता करता त्यांचा कॅन्सर एकदम ठीक .आता मी तुम्हाला सिद्ध करून दाखवते आता कुंडलिनी जागृती…. समजा जर ही कुंडलिनी इथे येऊन अडकली तर हे कोणतं चक्र आहे आता तिथे अडकले तर कोणच नाव घेतलं पाहिजे तर जगदंबे च नाव आता जर जगदंबे च नाव तुम्ही आधीपासून फिजिकल घेत असाल तर पुष्कळांना आहे आम्ही हा मंत्र घेतला ,आम्ही तो मंत्र घेतला आम्ही रामाचा मंत्र घेतला आणि आम्हाला काय आजार आहे तर दमा आहे … होणार… कारण ज्या माणसाने रामाचा मंत्र घेतला तो आमच्याकडे द्या आणून उजव्या हाताला जे चक्र आहे रामाचं हृदयाजवळ त्या चक्रावरती काम करावं लागतं आणि खरोखर त्या माणसाला अधिकार नाही रामाचं नाव घेण्याच त्यांनी जर घेतलं तर त्याचं ते चक्र धरत कारण असं आहे की तुमचं अजून परमेश्वराशी संबंध झालेला नाही समजा जर तुमचे  इथले जे कुणी मिनिस्टर असतील समजा आमची त्यांची काही ओळख नाही काही नाही आम्ही जाऊन त्यांचं नाव घ्यायला सुरुवात केली तर तिथे पोलीस आम्हाला पकडतील की नाही तसंच होतं लगेच जोपर्यंत तुमचं योगसाधन झालेलं नाही जोपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात नाही आलात  तेव्हा वेड्यासारखे पोपटपंछी करून जर तुम्ही एकच नाव घेत राहिलत तर ते चक्र तुमचं नक्की खराब होतं  म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की नामाचा सुद्धा महिमा फार आहे पण नामाचा महिमा म्हणजे गुरूंनी जे नाव दिलं ते घेतलं पाहिजे पण आजकाल गुरु सुद्धा इतके भामटे निघालेत की वाटेल ते नाव देतात म्हणजे त्याला काही अर्थच लागत नाही म्हणजे स्वतः  सुद्धा गुरु जो असतो तो स्वतः पार असायला पाहिजे आता ओळखताच येत नाही लोकांना गुरु कोणता पार आहे आणि गुरू आहे की नाही? हा संत आहे की नाही? ही सुद्धा लोकांना ओळख पटत नाही आता परवा  आम्ही एका गावाला गेलो होतो त्याचं नाव होतं मियाची टाकळी गेल्याबरोबर कुणी सांगितलं की कुणीतरी फार मोठे संत होऊन गेले हो म्हणे माताजी यांना ना मिया होती ते फार मोठे संत झाले आणि तिथे आम्ही बसलो डोक्यावर असं जोरात त्यांनी लाईट फेकला की फोटोत सुद्धा तो लाईट आला यांनी जो फेकलेला लाईट तेव्हा आता तुम्ही बघा तुम्हाला तो दिसेल पण काय हे आता तुम्ही म्हणाल तो मुसलमान होता मिया तो तो पार नव्हता तो मुसलमान असो हिंदू असो त्यांना जात नसते कारण संन्यासी ,त्यांना कसली जात आली तसेच कुठेही एखादा मनुष्य म्हटलं की हा पार आहे की नाही तर ते कसं कळणार? जागृत स्थान आहे की नाही ते कसं कळणार तर तुमच्या मध्ये अजून ही शक्ती आलेली नाही बघण्याची जेव्हा तुम्हाला कुंडलिनी च तुमचं जागरण होतं आणि तुमचा आत्मा जेव्हा तुमच्या चित्तातून पाहू लागतो तेव्हा तुम्ही कुठेही हात करून विचारलं की ते स्थान खरं आहे की खोटं जर खरं असेल तर आतून एकदम धडधड असं हातात येऊ लागेल चैतन्याच्या लहरी ज्या आदि शंकराचार्यांनी सांगितल्या होत्या त्या चैतन्याच्या लहरी तुमच्या हातात अशा भरभर भरभर येऊ लागतील आता असं म्हणाल की हे कार्य पूर्वी फार कठीण होतं होतं असो पण आम्हाला नाही पहिले  अस याची आम्ही ते करू बरं आणि दुसरी गोष्ट अशी की झाडाला पूर्वी एकच दोन फुलं लागलेली आहे म्हणून आज जर बहार आलेली आहे आणि पुष्कळ फळ होतात तर मग ते मानत का नाहीत की ते बहार आलेली आहे याच्यात भांडण कशाला करायचं की पूर्वीही नव्हतं आणि आता स्वच्छता का नाही करत हे काय आम्हाला जसं जमतंय तस आम्ही करतोय आणि हे तुम्ही करून बघा याला काही पैसे लागत नाही याला काही मेहनत लागत नाही पण एकदा पार झाल्यावर मात्र तुम्हाला जमाव  लागत जसं एखादं बी तुम्ही आज आईच्या उदरात घातलं की तिच्या शक्तीने जरी त्याच्यात अंकुराआला तरी ते बीज जपावं लागतं ,तो अंकुर मुक्त होईस्तोवर ते जपावं लागतं तसच सहज योगा मध्ये नंतर जपावं लागतं आणि ही सगळी सामूहिक क्रिया आहे तुम्ही म्हणाल माताजी आम्ही घरी फोटो घेऊन गेलो तिथे मेहनत केली तिथे पूजा केली त्यांनी चालायचं नाही सामूहिक आहे म्हणून इथे जे सेंटर आहे त्या सेंटर वर सर्व मंडळींनी येऊन भेटल पाहिजे नंतर येऊन मला पुढल्यावर्षी सांगायचं नाही की माताजी आम्ही प्रोग्राम ला आलो होतो जागृत झालो पण आम्हाला कॅन्सरचा रोग झाला मग कोणचाही तुम्हाला रोग होणार नाही ,कोणताही तुम्हाला त्रास होणार नाही उलट तुम्हीच दुसऱ्यांचे त्रास ठीक करणार इतरांचे जेवढे काही वैतागलेले जीव आहेत त्यांना तुम्ही ठीक करणार घरामध्ये ज्यांच्या संसारीक त्रास असतील ते तुम्ही ठीक करणार म्हणजे तुम्ही शक्तिशाली पण ही शक्ती पहिल्यांदा पूर्णपणे आपल्यामध्ये सामावून घेतली पाहिजे आणि ती सामावल्या नंतर तिचा उपयोग कसा करायचा ते शिकलं पाहिजे स्वतःला कसं बचावलं पाहिजे तेही शिकलं पाहिजे त्याला आम्ही कवच असं म्हणतो म्हणजे बंधन ही बंधन कशी घ्यायची घरातून जाताना किंवा घरात झोपताना तेही शिकलं पाहिजे .या सर्व गोष्टी सहज योगा च्या अशा आहेत जसं तुम्हाला एक आम्ही मोटार दिली आता मोटार आधी तुम्ही सुरुवात केली तर ती आधी त्याची त्याच्यामध्ये शक्ती यायला पाहिजे नाहीतर तर ती मोटार चालणारच नाही तेव्हा आधी त्याचं पीठ उघडायला पाहिजे तसं झालं समजा की तुमचं आधी पीठ उघडलं त्याच्यामुळे तुमच्या मध्ये शक्ती आली म्हणजे तुमच्यामध्ये आता जागृती झाली त्याच्यानंतर आता हे डावी साईड आणि उजवी साईड काय ती समजून घेतली पाहिजे म्हणजे तुमचं ब्रेक आणि एक्से लेटर कसं चालतं हे समजून घेतल पाहिजे मग करता करता तुम्ही निष्णात अगदी होऊन जाता निष्णात झाल्यावर ऑटोमॅटिकली तुम्ही ती मशीन चालवू शकता हे मशीन कशी चालते हे समजून घेण हीच म्हणजे सहज योग विद्या आणि त्याला तुम्हाला काहीही कठीण जाणार नाही कारण लगेच कुठलं ते समजत लगेच व्हायब्रेशन जातात लगेच हे ठीक केलं की लगेच व्हायब्रेशन येतात बरं त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर जो याचा स्वामी आहे म्हणजे याचा स्वामी जो आत्मा आहे तो फ्री होऊन जातो म्हणजे या  मोटारीचा जो स्वामी आहे तो आपल्या मधला ड्रायव्हरही बघतो आणि त्यातला ब्रेक ही बघतो आणि  एक्सलेटर ही बघतो अशी स्थिती आल्यावर तर मात्र तुम्ही निर्विकल्पात उतरता म्हणून सहजयोगा मध्ये दोन पायऱ्या असतात पहिली पायरी असते निर्विचारीता आणि दुसरी पायरी असते निर्विकल्पता ती सगळ्यांनी मिळवली पाहिजे ते मिळवल्याशिवाय सहज योगच इतक्या गहन तेने होणार नाही याला गहराई येणार नाही  . त्याला गहनता येण्यासाठी माणसाला पाहिजे की त्यांनी स्वतःबद्दल आस्था पाहिजे स्वतः आधी काहीतरी विशेष आहोत स्वतः आधी संत झालं पाहिजे आणि येऱ्या गबाळ्याचे काम नोव्हे जे सांगून गेलेले आहे ती अगदी गोष्ट खरी आहे .पट्टीचे लोक पाहिजे त्याला सहज योगाला जे पट्टटी चे लोक असतात त्यांनी इतकी कार्य करून दाखवलेले आहेत की आश्चर्याची गोष्ट आहे आता धुमाळ साहेबच आपल्याला माहितेय त्यांनी हजारो लोकांची जागृती केलेली आहे ,किती लोकांना यांनी ठीक केलेलं आहे पण सहजयोगा मध्ये लोकांना ठीक करण्याच काम नाही आहे ते आपोआपच पार झाल्यावर लोक ठीक होतात .तेव्हा सगळे जगातले आजारीच घेऊन नाही यायचं ,मला पुष्कळ लोक असं म्हणतात की माताजी तुमच्याकडे जेवढे शिष्य येतात तेवढे आजारीच येतात  तेव्हा म्हटलं नाही हजारोंनी सगळे चांगलेच येतात पण एखाद दोन आजारी सुद्धा येतो आणि जर पार झाले तर तुम्ही सर्व ठीक होऊ शकता तेव्हा लक्ष इकडे द्यायचं आमचं भलं होण्यासाठी परमेश्वरानी आणि सहज योगाला आज महायोगा च रूप दिलेलं आहे .तेव्हा या गंगेत सगळ्यांनी न्हाऊन घ्यायचं कृपा करून सगळ्यांनी माझ्याकडे असे हात करायचे आहे आज उशीर झाला ,उशीर होतोच आम्हाला म्हणजे तिथे एक प्रोग्राम परत झाला तो प्रोग्रॅम करून मग इकडे आलो त्यामुळे उशीर होतोच तरी काही हरकत नाही वेळेनी सर्व कार्य होत असतं तेव्हा नुसते असे हात करून बसा आणि असं डोळे मिटा….. फक्त डोळे मिटायचे काही दुसरं करायचं नाही….. सगळ्यांच्या हातामधून थंड येत असेल… पण ज्यांच्या येत नसेल त्यांनी जमिनीवर थोडा नमस्कार करा दोन्ही हातांनी म्हणजे येईल पटकन असा नमस्कार जमिनीला, धरतीमातेला नमस्कार केला की ती ओढून घेईन सगळा काही त्रास म्हणजे खटाखट हातात येऊ लागेल नम्रपणे नमस्कार करुया तर माझं काही चुकलं असेल तर ओढून घ्या स्वतःमध्ये .हलू नका…हलन-बोलण नाही जे हलत असतील त्यांनी डोळे उघडायचे ही काय चांगली लक्षण नाहीत ज्यांचा अंग हलतय त्यांना काहीतरी त्रास आहे ॳग हलल नाही पाहिजे ,डोळे हलले नाही पाहिजे काही नाही सगळं आत मध्ये.. अंतर योग आहे बाहेर हलतात म्हणजे काहीतरी चुकलेल आहे तुमच्या गुरूच, काहीतरी चुकीचं करून ठेवलेलं आहे ते बरोबर नाही डोळे उघडे ठेवायचे काहीही बाहेर तमाशा नाही करायचा अगदी डोळे उघडे ठेवायचे अशा लोकांनी ज्यांना हलायला होत नाही किंवा अंगात वार येतय त्या लोकांनी डोळे उघडे ठेवायचे….. काहीही बाह्यात होत नाही आत मध्ये सगळं घटित होतं आता बघा डोक्यावर सुद्धा बघा गारगार येतं का बघा डोक्यावर उजवा हात डोक्यावर ठेवा डावा हात माझ्याकडे डोळे उघडेच ठेवा टाळूवर बघा टाळूवर अधांतरी धरायचं अधांतरी धरा आणि फिरवून बघा गारगार येतंय का बघा? वरती अधांतरी धरून येतय ना… आलं का… बघा सगळ्यांनी टोपी काढून बघा सगळं कसं गार वाटतय आता गारच वाटणार आहे सगळ्यांना उन्हात सुद्धा गार वाटणार आहे हा दुसरा हात करून बघा येताय का गार.