Shri Ganesha Puja and Devi Puja Rahuri (India)

Shri Ganesha And Devi Puja Date 7th January 1983: Place Rahuri Type Puja तुम्हा सगळ्यांना पाहून इतका आनंद झाला मला आणि कधी राहरीला जाते असं झालं होतं. एकदाचे आम्ही पोहोचलो आणि ह्या राहरीच्या ह्या पवित्र परिसरात पूर्वी अनेक कार्य देवीने केलेली आहेत. पण आताचे जे कार्य आहे ते सगळ्यात मंगलमय आणि सुखदायी आहे. राक्षसांना मारायचं म्हणजे हे काही विशेष सुखदायी वगैरे कार्य नव्हतं आणि अशा घाणेरड्या लोकांशी झुंजत राहण्यापेक्षा कधीतरी असे लोक जे कमळाच्या सुंदर कळ्यांप्रमाणे कुठेतरी वाट बघत बसले आहेत, त्यांची फुलं करण्यात जी मजा येणार आहे किंवा त्यांची फळ करण्यात जी मजा येणार आहे, ती कधीतरी लुटावी असं फार वाटत असेल ते मात्र या जन्मात पूर्ण झालेलं आहे. आणि तुम्हा लोकांचे आनंद बघून फार आनंद वाटला. कितीही म्हटलं तरी ह्या भारतभूमीच्या पाठीवर ही जी महाराष्ट्राची भूमी आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण विश्वाची कुंडलिनी आहे हे मी आपल्याला अनेकदा सांगितलेले आहे . बरं त्याच्यात शास्त्रात आधार असा की ह्याच्यात साडेतीन पीठ आहे असं सांगितलेले आहे. साडेतीन पीठ फक्त कुंडलिनीला असतात. तसेच अष्टविनायक आहेत. हे सुद्धा सर्व महाराष्ट्रात आहेत. ते खरे की खोटे हे तुम्ही पार झाल्याशिवाय जाणू शकत नाहीत. कारण पार झाल्यावरच तुम्हाला कळेल त्याच्यातून येतय ते. पण मुसळवाडीला तर साक्षात् सहस्रारच मुळी आहे. तेव्हा ही किती महान भूमी आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि इथे जे चमत्कार घडणार आहेत ते कुठेही अशाप्रकारचे घडू शकत नाहीत. म्हणजे ह्या परिसरात. कारण ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल, ही फार चमत्कारपूर्ण जागा आहे. मच्छिंद्रनाथांसारख्या माणसाने, जे फार मोठे दत्तात्रयाचे अवतार होते, त्यांनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्याच्याआधी या भूमीला शांडिल्य वगैरे अशा मुनींनी पावन Read More …