Shri Saraswati Puja

Dhule (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Shri Saraswati Puja, Dhulia (India), 14 January 1983.

[Marathi Transcript]

आता धुळ्याच्या सहजयोग्यांसाठी अस सांगायचं की, आता बरेच लोकं काल पार झालेले दिसले. आणखी थोडं सिरियसली पण सहज योगात येतायत अस वाटलं. तेव्हा धुळ्यांच्या लोकांनी मात्र काळजी घ्यायला पाहिजे. राऊळ बाईंनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्याचं घर‌ इथे आहे, तुम्हाला माहिती आहे. तिथे सगळ्यांनी रविवारी सकाळी अगदी व्यवस्थित पणे ध्यान हे केलं पाहिजे. तसंच घरी रोज बैठक पाहीजे. बैठक जर तुम्ही केली नाही तर सहजयोगी जमणार नाही. तुमच्या वर अवलंबून आहे. जितकी तुम्ही बैठक कराल, जितकी तुमच्या मध्ये गहनता येईल, तितका सहजयोग वाढणार आहे. जर तुम्ही स्वतः मेहनत नाही केली, तर सहज योग वाढणार नाही आणि तुम्हालाही सहजयोगाचा काही लाभ होणार नाही. म्हणून रोज अगदी न चुकता सकाळ-संध्याकाळ बैठक ही पाहिजे. सकाळी जरी थोडा वेळ असला, तरी संध्याकाळी व्यवस्थित आरामात बैठक पाहिजे. हळुहळू तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमच्या जवळ पुष्कळ टाईम वाचू लागले, कारण बाकीचे तुम्हाला काय आवडणारच नाही. इकडे जायचं, तिकडे जायचं, गप्पा मारायच्या, फालतूच्या गोष्टी तुम्हाला काही आवडणार नाही.  नको रे ते असं होईल उगीचच्या गोष्टी करत राहतात. उलट तुम्हाला वाटेल की काय बसून राहिलेत सगळे, बेकारचे लोक यांना काही समजत नाही. उगीचच आपला कशाला इथे वेळ घालवायचा. तेव्हा ते ही सुटून जाईल आणि त्याच्या नंतर मग, तुम्हाला आश्चर्य वाटेल जसे तुम्ही जमू लागला, जसे तुम्ही मूळात जाल. मुळं दोन चारच असतात पण ती जेव्हा खोल जायला लागतात झाडं वाढू लागतं. असा सहज योग वाढताना तुम्हाला दिसेल. म्हणून माझा तुमच्यावरअनंत आशिर्वाद आहे. काल मी धुळ्याच्या लोकांना खूप समजावून सांगितले. पण तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली पाहिजे, खूप पॉजिटिवली राहिलं पाहिजे, म्हणजे काय होणार नाही.