Public Program, Dharmachi Durgati Jhali aahe Dhule (India)

 Public program, Day 2, Dhule, India, 17-01-1983   नाशिकचे मान्यवर कलेक्टर साहेब तशेच सहजयोगी व्यवस्थापक आणि नाशिकची भाविक मंडळी या सर्वांना माझा नमस्कार. आम्ही बाहत्तर साली नाशिकला आलो होतो, त्यावेळेला सहजयोग नुकताच सुरु झाला होता, आणि बरीच मंडळी त्यावेळेला इथे साक्षात्कार पावून पावन झाली होती आणि त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन सहजयोग वाढवला, पण नाशकाला कार्य मात्र तसंच राहिलं. आता डॉक्टर साळवी इथं आलेले आहेत, आणि मधून मधून इतर मुंबईची मंडळी सुद्धा इथं येत असतात, त्यामुळे मला पूर्ण आशा आहे की सहजयोग इथे सुद्धा फोफावेल. सर्व प्रथम, सर्व गोष्टी विसरून धर्म आदी किंवा सायन्सच्या वगैरे एक मनुष्याने असा विचार केला पाहिजे की आम्ही ह्या संसारात कशासाठी आलो? आमच्या जीवनाचं लक्ष्य काय आहे? जर आम्ही एका अमिबापासून आज मानवस्थितीला आलो तर ते कशासाठी? या जीवनाला काही अर्थ आहे किंवा नाही? अर्थात या भारतभूमीमध्ये विशेषतः महाराष्ट्रात जिथे आपली साडे तीन पीठे बसली आहेत, विश्वाची सर्व कुंडलिनी आहे, अशा महान देशामध्ये जन्मलेल्या लोकांना हे तर माहीतच आहे की या संसारातून ज्याला आत्मसाक्षात्कार मिळाला तो महान झाला तेच सगळ्यात मोठं मिळवायचं आहे. त्यातून काही नवीन नवीन मंडळी पाश्चिमात्य देशात जाऊन शिक्षण घेऊन आली आणि त्यांना असा प्रश्न पडलेला असतो की देव वगैरे काही नसतो, आहे की नाही किंवा हे जे काही कुंडलिनी बद्दल एवढं मोठं लिहिलेलं आहे, ते ज्ञानेश्वर आपल्या सहाव्या अध्यायात सांगून गेलेत. तुकारामांनी ज्या परमात्म्याला मिळवण्याच्या गोष्टी केल्या. नामदेव आदी अनेक संतांनी या भूमीवर परमेश्वराच्या बद्दल जे सृजन केलेले आहे ते खरं होतं की खोटं होतं? ते खरे होते किंवा भ्रमित होते? त्यांनी जी गोष्ट केली त्याच्यात काही अर्थ होता की उगीचंच त्यांनी काहीतरी Read More …