Public Program (India)

Public Programme in Shahapur, Maharashtra. माहित नव्हतं.आणि इतक्या लांबून यायचं, म्हणजे  एकदम मला असं वाटलं की सहाच्या नंतर प्रोग्राम आहे वगैरे त्यामुळे थोडा उशीर झाला. तरी हरकत नाही  जेव्हा वेळ यायची असते तेव्हाच ती येते, असं आम्ही आत्तापर्यंत सहजयोगात  पाहिलेलं आहे.  आता सहजयोग म्हणजे काय आणि सहजयोगाचा उपयोग काय वगैरे वगैरे अनेक विषयांवर आपण आधीच ऐकलेलं असेल, आणखी पुस्तकही आहेत त्याची ती  वाचलीही असतील.  सांगायचं म्हणजे असं, की आजकालच्या या  धकाधकीच्या काळामध्ये मनुष्य नुसता म्हणजे घाबरून गेलेला आहे.  त्याला आतली काही  शांती म्हणून नाहीये.   आणि  आतली शांतता नसल्यामुळे बाहेरही तो शांत राहू शकत नाही.  बाहेरही तो बंडखोरासारखा  वागतो किंवा अगदीच वाह्यात पणाने काहीतरी  बोलत राहतो किंवा भांडणं करतो किंवा त्याच्या वर गेला  जुलमी जर झाला तर खून पाडतो, सगळ्या तर्‍हेचे जुलूम करायला मनुष्य शिकलेला आहे, ह्या अशा धकाधकीच्या काळामुळे.  जर त्याच्या मनामध्ये शांतता असली,  त्याच्या हृदयामध्ये जर शांती असली,  तर तो बाहेर सुद्धा शांती राखू शकतो.  पण जरआतच  शांतता नाहीये तर बाहेर कशी शांतता राखायची ?  तेव्हा  कुणी जर सांगितलं  की बुवा तुम्ही आता शांत राहा आणि समाधानी राहा, तर लोकांना असा प्रश्न पडतो की ह्या अशा काळामध्ये, मनुष्याने शांत तरी कसे राहायचं ?  सगळीकडनं जसा काही  वणवा पेटावा असं वाटायला लागतं.   इकडे बघितलं तर राजकारणात सुद्धा  मनुष्याला असं दिसतं की काहीही ह्याला भविष्य नाही.  ह्या राजकारणाला काही भविष्य दिसत नाही.  मारामारी, दंगल ,नाही तर एक इलेक्शनला हरले मग दुसरे जिंकले, म्हणजे होणार तरी काय या भारताचं  असं लोकांना वाटू लागतं.  तिसरं म्हणजे घरांमध्ये सुद्धा  भांडण, तंटे, आपापसांमध्ये  मोठमोठाले झगडे ह्या सर्व गोष्टींमुळे मनुष्य खरोखर म्हणजे आज वैतागून Read More …