The Vishuddhi Chakra New Delhi (India)

MARATHI TRANSLATION OF  19830202 TALK ABOUT Vishuddhi, DELHI प्रेषितांच्या जन्मानंतर ते आपल्या जाणिवेमध्ये एक नवीन विचार लहरी आणतात. आपल्या धर्मभावनेमध्ये ‘एक नवीन परिमाण आपल्या आत एकरूप होताना समजून घेणे आवश्यक आहे. ते असे का ? पूर्वीच्या प्रेषितांनी त्यांचे विचार कसे आपल्या विचारधारेमध्ये रुजविले आहेत. मग आपण म्हणू शकतो, की मोहम्मद पैगंबरांनी असे सांगितले आहे, की जे प्रेषित या आधी पृथ्वीतलावर आले त्यांनी नवीन विचारधारा आणून मानवामध्ये नवीन उत्क्रांती प्रस्थापित केली. एक नवीन पालवी मानवी मनाला अंकुरली. मावनाची नावीन्याची कल्पना ही आहे की जे जुने-पुराणे आहे ते टाकून द्यावे आणि नवे ते घ्यावे किंवा ते असे म्हणतात, की नावीन्य म्हणजे पूर्णत: एक निकटतम सानत्निध्याची अवस्था की या अवस्थेमध्ये मानवाचे उत्थान होईल. पूर्वेकडील आणि पश्‍चिमेकडील लोकांच्या अविचारीपणाचे ते एक प्रमुख कारण होते. जेव्हा केंव्हा एखादी नवकल्पना येते, आपण असे म्हणू शकतो की प्रथम प्रेषित पृथ्वीवर आले आणि त्यांच्या असे लक्षात आले की, मूर्तीपूजा चुकीची आहे. कारण बायबलमध्ये असे सांगितले आहे, की पृथ्वी मातेमधून निर्माण झालेल्या गोष्टींमधून मूर्ती तयार करून त्या मूर्तीची पूजा करणे हे चूक आहे. म्हणून त्यांनी टोकाच्या विचारधारेचा धर्म निर्माण केला आणि सांगितले की कशाचीच पूजा करू नये. पृथ्वी मातेतून निर्माण केलेल्या मूर्तीचीसुद्धा. या जगामध्ये पृथ्वीमातेने निर्माण केलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी कोणत्याही गोष्टीची पुनर्निमिती करून त्यामधून मूर्ती किंवा चित्र निर्माण करून त्याची पूजा करू नये. ‘हे असे करू नये, मूर्तीपूजा करू नये’ असे सांगणारे प्रेषित जेव्हा गेले तेव्हा दुसर्‍या गटाच्या लोकांनी अत्यंत टोकाची भूमिका घेऊन सांगितले की पृथ्वीमातेमधून निर्माण झालेला कोणत्याच गोष्टीची पूजा करू नये अशा प्रकारे मानवामध्ये टोकाच्या विचारांचे दोन गट तयार झाले. एका परिस्थितीमध्ये एक गट सांगतो Read More …