The Vishuddhi Chakra

New Delhi (India)

1983-02-02 The Vishuddhi Chakra, New Delhi, India, camera 2, 115' Chapters: Introduction by Yogi, TalkDownload subtitles: ENView subtitles:
Download video (standard quality): Download video (full quality): Watch on Youtube: Watch and download on Vimeo: View on Youku: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

1983-02-02 The Vishuddhi Chakra, New Delhi, India, DP, 82' Download subtitles: EN,PTView subtitles:
Download video (standard quality): Download video (full quality): Watch on Youtube: Watch and download on Vimeo: View on Youku: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share

MARATHI TRANSLATION OF 

19830202 TALK ABOUT Vishuddhi, DELHI

प्रेषितांच्या जन्मानंतर ते आपल्या जाणिवेमध्ये एक नवीन विचार लहरी आणतात. आपल्या धर्मभावनेमध्ये ‘एक नवीन परिमाण आपल्या आत एकरूप होताना समजून घेणे आवश्यक आहे. ते असे का ? पूर्वीच्या प्रेषितांनी त्यांचे विचार कसे आपल्या विचारधारेमध्ये रुजविले आहेत. मग आपण म्हणू शकतो, की मोहम्मद पैगंबरांनी असे सांगितले आहे, की जे प्रेषित या आधी पृथ्वीतलावर आले त्यांनी नवीन विचारधारा आणून मानवामध्ये नवीन उत्क्रांती प्रस्थापित केली. एक नवीन पालवी मानवी मनाला अंकुरली. मावनाची नावीन्याची कल्पना ही आहे की जे जुने-पुराणे आहे ते टाकून द्यावे आणि नवे ते घ्यावे किंवा ते असे म्हणतात, की नावीन्य म्हणजे पूर्णत: एक निकटतम सानत्निध्याची अवस्था की या अवस्थेमध्ये मानवाचे उत्थान होईल. पूर्वेकडील आणि पश्‍चिमेकडील लोकांच्या अविचारीपणाचे ते एक प्रमुख कारण होते. जेव्हा केंव्हा एखादी नवकल्पना येते, आपण असे म्हणू शकतो की प्रथम प्रेषित पृथ्वीवर आले आणि त्यांच्या असे लक्षात आले की, मूर्तीपूजा चुकीची आहे. कारण बायबलमध्ये असे सांगितले आहे, की पृथ्वी मातेमधून निर्माण झालेल्या गोष्टींमधून मूर्ती तयार करून त्या मूर्तीची पूजा करणे हे चूक आहे. म्हणून त्यांनी टोकाच्या विचारधारेचा धर्म निर्माण केला आणि सांगितले की कशाचीच पूजा करू नये. पृथ्वी मातेतून निर्माण केलेल्या मूर्तीचीसुद्धा. या जगामध्ये पृथ्वीमातेने निर्माण केलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी कोणत्याही गोष्टीची पुनर्निमिती करून त्यामधून मूर्ती किंवा चित्र निर्माण करून त्याची पूजा करू नये. ‘हे असे करू नये, मूर्तीपूजा करू नये’ असे सांगणारे प्रेषित जेव्हा गेले तेव्हा दुसर्‍या गटाच्या लोकांनी अत्यंत टोकाची भूमिका घेऊन सांगितले की पृथ्वीमातेमधून निर्माण झालेला कोणत्याच गोष्टीची पूजा करू नये अशा प्रकारे मानवामध्ये टोकाच्या विचारांचे दोन गट तयार झाले. एका परिस्थितीमध्ये एक गट सांगतो की, हे असे करू नये. मग लोक तसे वागतात आणि सांगतात की प्रेषिताने सांगितल्याप्रमाणे असे करू नये. अर्थातच हे सर्व प्रेषितांच्या मृत्यूनंतर! प्रेषित जिवंत असताना त्यांचे कोणीही ऐकले नसते. ते त्यांचा छळ करतात. त्यांना त्रास देऊन भंडावून सोडतात. सर्व बाजूंनी त्यांचा असा छळ करतात, की अंतत: ते त्यांचा वघही करतील.  

दुसरे असे, की प्रत्येक प्रेषित हा वेगवेगळ्या कालखंडामध्ये जन्मास आला आहे. त्या कालखंडामधील परिस्थितीप्रमाणे त्या त्या वेळच्या समस्यांवर प्रेषितांनी भाष्य केले. ज्यावेळी मोहम्मद साहेबांचा अवतार झाला त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘दारू पिऊ नये.’ लोक म्हणाले, ‘ठीक आहे, आम्ही दारू पिणार नाही, पण धुम्रपान करू शकतो.’ मोहम्मद साहेबांना परत दुरुस्त करून सांगावे लागले, की मीच शेवटचा प्रेषित आहे. पण त्यांना कळून चुकले की ते शेवटचे प्रेषित नाहीत. तेव्हा गुरू नानकांचा अवतार घेऊन परत पृथ्वीवर येवून त्यांनी लोकांना सांगितले, की ‘धुम्रपानसुद्धा करू नका.’ अशाप्रकारे काही लोक किंवा काही समूह की जे एखाद्या अवताराचे अनुयायी असतात, तिसऱ्याच टोकाला जाऊन या अवताराने बांधलेली विचारधारा, ती परंपरा खाली खेचतात. तो महाकाय वृक्ष तोडून त्या जागी स्वत:चे रोपटे लावतात, की जे बनावट असते. मोहम्मद साहेबांच्या विचारांना वेगळ्या मार्गाने वेगळ्या पातळीवर नेले गेले आणि गुरूनानकांच्या विचारधारेला त्यांच्या अनुयायांनी दुसर्‍या मार्गाने दुसऱ्या पातळीवर नेले. अशा वेगवेगळ्या पातळींवर नेल्यामुळे त्या दोन प्रेषितांचा एकमेकांशी संबंध नाही असे त्यांच्या अनुयायांना वाटले. पण ते खरे नाही! आपणास माहीतच आहे, त्यानंतर पुष्कळ गोष्टी घडल्या. असं बघा की, ज्यावेळी एखादे पुनरुज्जीवन सुरू होते, त्यावेळी लोक एकदम टोकाची भूमिका घेतात आणि नाश पावतात.  

ख्रिस्ती धर्मामध्ये असेच घडले, असे तुम्हाला आढळेल. ख्रिस्त जेव्हा अवतरीत झाले तेव्हा, त्यांना संघर्ष कराव्या लागलेल्या समस्यांवर ते बोलले. पण त्यांना मुख्यत: ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी बोलावयाचे होते. ते ख्रिस्ताचे उत्थान, त्या उत्थानाविषयी ते बोलले. ते आत्म्याविषयी बोलले. येशूच्या पुनरुत्थानामध्ये त्यांनी असे दाखवून दिले, की त्यांचे उत्थान झाले, पण लोक या गोष्टीमध्ये अडकून पडले नाहीत. लोकांनी असा कधीच विचार केला नाही, की त्यांना ख्रिस्ती धर्मामध्ये उत्थानाच्या वाटेवर जायचे आहे. कोणासही उत्थान नकोच होते. त्यांनी धर्माविषयी इकडून तिकडून लहान-सहान गोष्टी गोळा केल्या. एक इसम आला, त्याचे नाव सेंट पॉल, की जो कधीही ख्रिस्ताबरोबर नव्हता किंवा कोणीच नव्हता. त्याने स््रिस्तांमध्ये नवीन एक धर्म सुरू केला, की जो ख्रिस्त किंवा ख्रिस्तविरोधी एक मूर्खपणा होता. या पैकी कोणत्याही प्रेषितांनी आपल्या आधीच्या अवतारांना नाकारले नाही.  

एकसंघ राहण्याची, अखंडित राहण्याची नवीन समस्या उत्पन्न झाली होती. मोहम्मद साहेबांना हे माहीत होते, की ही समस्या कधी न कधी उपस्थित होणार आहे. तेव्हा ते सहजयोगाविषयी , पुनरुत्थान होणार आहे अशा अर्थाने खूप बोलले. जगाच्या होणाऱ्या शेवटापेक्षा पुनरुत्थानाविषयी ते अधिक बोलले. आश्‍चर्य असे की ‘कयामत’ विषयी ते फार कमी बोलले. पुनरुत्थानाविषयी ते बोलले कारण त्यावेळी पुनरुत्थान समजून घेणे ही “एक समस्या होती. ज्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागले, त्याविषयी ते बोलले. मी तुम्हाला सांगितले आहे, की कसे बुद्ध आत्मसाक्षात्काराविषयीच बोलले, परमेश्वराविषयी नाही. कारण जे जे ईश्वराकडे गेले, ज्यांनी ज्यांनी ईश्वराचा विचार केला, ज्यांनी ज्यांनी ईश्वराची आराधना केली, त्यांना असे वाटले, की ते स्वत: ईश्वर आहेत. म्हणून बुद्ध म्हणाले की, ‘तुम्ही तुमचा आत्मसाक्षात्कार मिळविला पाहिजे.’ त्यानंतर महावीरांनी नरकाविषयी सांगितले. लोक नरकामध्ये जाऊ शकतात. कारण हे सांगणे त्यांचे काम होते. अंशत: ते त्यांचे काम होते. अंशत:च होते. मानवांची विविध रूपे त्यांना उलगडून दाखवायची होती. वेगळी स्वरूपे, वेगळे दृष्टिकोण!  

जेव्हा मोहम्मद साहेबांनी लोकांना नमाज पढणे शिकवायला सुरुवात केली तेव्हा लोक त्यांना हसले. हे काय करीत आहेत? आम्ही हात असे करावेत असे त्यांना का वाटते? आम्ही जमिनीवर बसावे व आपले हात गुडघ्यावर ठेवावे हे असे त्यांना का हवे आहे? आता तुम्ही एक सहजयोगी म्हणून हे समजून घ्या की त्यांना आपले नाभी चक्र आणि आमच्यामधील धर्म प्रथमत: सुधारायचे होते. या सर्व क्रियांमुळे कुंडलिनीचे जागरण होणार होते. पण साक्षात्काराशिवाय त्यांनी केलेले नमाज फलद्रप होणार नाहीत. तुम्ही गुडघे दुमडून घ्या किंवा हवे ते करा. धर्ममातैडांनी त्यांच्या नमाजाच्या क्रियेविषयी वाक्युद्ध केले, पण त्यामागच्या सत्याचा त्यांनी कधी विचार केला नाही. या गोष्टीवरती त्यांनी खूप गोंधळ केला. काही मोठ्या संघटना स्थापन केल्या आणि सत्य पार बिघडवून टाकले. मोहम्मदांनी सांगितले की, ‘अल्लाह-हो-अकबर’ म्हणताना हे बोट कानात घालून म्हणावे आणि तसे तुम्ही करता. होय ना? सर्व सहजयोगी हे बोट कानात घालून ‘अल्लाह-हो -अकबर’ म्हणतात. कारण तुम्हाला चांगले माहीत आहे, की हे बोट विशुद्धीचे आहे आणि या चक्राचे दैवत श्रीकृष्ण आहेत. ‘अल्लाह-हो- अकबर’ म्हणतात, श्रीकृष्ण विराट होतात. म्हणून जेव्हा जेंव्हा तुम्हाला अकबरांची प्रार्थना करावयाची असते तेंव्हा हे बोट कानामध्ये घालून ‘अल्लाह-हो-अकबर’ म्हणावे.  

हे सर्व धर्मसंबंध आणि इतर सर्वच काही कोणी समजून घेतले नाही. हिंदुंच्यासाठी श्रीकृष्ण हे ओंकार आहेत, तर पाश्‍चिमात्त्यांसाठी ख्रिस्त हे ओंकार आहेत. इतर अरब लोकांसाठी मोहम्मद साहेब हे ओंकार आहेत. असे हे कसे असू शकते ? श्रीकृष्ण, मोहम्मदसाहेब इ. एकमेकांशी संबंधित आहेत. हे असे संबंध सहजयोगात कसे प्रस्थापित करावयाचे ही एक मोठी समस्या आहे. सहजयोगामध्ये येणारा प्रत्येकजण वेगळ्या पंथाचा आणि वेगळ्या दृढ तत्त्वाचा. तेव्हा या सर्वांना एकत्रित करून त्यांना ‘तुम्ही एकच आहात’ असे सांगणे केवळ अशक्य! हिंदू- मुस्लिम ऐक्याबद्दल आपण बोलतो. मोहम्मद साहेब याबद्दल अनभिज्ञ होते, पण नानकसाहेबांनी सांगितले की हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीच ते आले आहेत. पण जगात इतरत्र कुठेही हिंदू-मुस्लिम ऐक्य किंवा इतर कोणतेही ऐक्य घडून येत नाही. हितसंबंधाच्या बाहेर हे घटित होत नाही. बाहेर तुमचा भाऊ, तुमचा स्वत:चा सख्खा भाऊ राहत नाही. पण तुमच्यातील आत्मतत्त्व जागृत झाल्यावर तुमच्या आत्म्याचा संबंध पूर्ण विराटांशी प्रस्थापित होतो, अकबराशी घटित होतो. जर तुम्हाला आतमध्ये विराटांशी, अकबराशी जोडले जायचे आहे, तर तुमचा आत्मसाक्षात्कार झालेलाच असला पाहिजे, अन्यथा त्या केवळ हवेतल्या गप्पा ठरतील. तुम्हाला माहीत नाही की, अकबर हे कोण आहेत? या विराटाशी तुमचा संबंध प्रस्थापित असला पाहिजे. कारण विराट प्राक्कालापासून अस्तित्वात आहे. वास्तविक पाहता वेगवेगळ्या अवतरणांमुळे आपण सर्वजण एकसंघ झालेलेच नाही आहोत. जरी आपण पूर्णत: नास्तिक नसलो तरी परमेश्वरावरती आपला विश्‍वास नाही किंवा परमेश्वराच्या विरोधात असलेल्या इतर गोष्टींवर आपला विश्‍वास आहे असे काही आपण म्हणत नाही. जरी परमेशवरावरती आपला विश्‍वास नसला तरी परमेश्वराच्या काही लीलांवरती, काही स्वरूपांवरती आपला विश्‍वास असतो. पण पूर्ण विराट स्वरूप आपणास सामूहिकतेमध्ये दिसत नाही. तो ईश्वर एकच आहे, हे आपण पाहिले पाहिजे. प्रत्येकजण म्हणतो की, ईश्वर एकच आहे. अर्थात ईश्वर एकच आहे. मी एक व्यक्ती आहे, पण मी एक गृहिणी पण आहे, ‘मला घरातील कामकाज करणे आवश्यक आहे. मी कोणाची तरी बहीण आहे. मी तुमची आई आहे आणि माझ्या मुलांचीसुद्धा आई आहे आणि आजी पण आहे. अशाप्रकारे माझ्या कामाची विविध रूपे आहेत. ती मी करते. प्रत्येकाने ती करावीतच. जेव्हा आपण ईश्‍वर एकच आहे असे मानतो तेव्हा तो जित्राल्टरच्या प्रचंड शिळेसारखा भासतो, पण तुम्ही जाऊन पाहिलेत तर जिब्राल्टरची शिळा एकसंघ नाही. या जगातील कोणतीही गोष्ट एकसंघ आहे असे म्हणता येणार नाही. ते एक संयुक्त आहे, मिश्रण आहे. मग असे असेल तर विश्वामध्ये संचार करणारा ईश्‍वर एकसंघ कसा? ईश्वर एकच, एकसंघ असेल तर त्याची अनेक रूपे असायला नकोत. परंतु परमेश्‍वराची अनेक रूपे आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. तेव्हा मला असे वाटते, की या जगात ईश्‍वराविषयी दोन मते आहेत. एक मत असे, की ईश्वर एकच आहे आणि त्याची कोणतीही रूपे नाहीत. हे चूक आहे. ख्रिस्तांनी म्हटले आहे की, ‘जे माझ्या विरोधात नाहीत, ते माझ्याबरोबर आहेत.’ म्हणून परमेश्वर शिळेप्रमाणे एकसंघ आहे असे समजणे हे कपोलकल्पित आहे. पहा हा मंडप! कसा आहे ? खूप दिवे लावलेले आहेत, पण आम्हा सवांना एकच प्रकाश प्राप्त होत आहे. प्रत्येक दिवा हा वेगवेगळा प्रकाश देत नाही. तसे आहे का? मग ते आपापसामध्ये का भांडताहेत? कशासाठी भांडताहेत ? मूळ प्रकाशामध्येच ते थोडेसे अधिक करून सांगताहेत. मंडप एकच आहे, ‘पण खूप दिवे आहेत. एकच दिवा अपुरा पडेल.  

विविध कालखंडात एकेका व्यक्तीस जन्म घ्यावा लागतो. प्रत्येक वेळी अशा व्यक्तीने जन्मास आल्यानंतर एकप्रकारे मनुष्याच्या जाणीव आणि जागृतीला प्रकाशित केले पाहिजे. त्यात विविधता ही असणारच. कारण मानव वैविध्यपूर्ण आहे. ही विविधता अशी असेल, की समजा, तुम्ही एखाद्याचे त्याच्या उजव्या बाजूवरील कार्य उचलून धरत आहात, तर त्याठिकाणी दुसरा कोणी तरी येवून त्याच्या डाव्या बाजूच्या आयामाचे समर्थन करेल. हे सर्व आपल्या आतमध्ये घटित केले आहे, पण मानवाला त्याच्या दुराग्रहामुळे आणि अज्ञानामुळे ते जाणवत नाही. संपूर्ण जगाकडे आपण पाहिलेत तर आपणास आढळेल, की आपली रचना अशीच झाली आहे, अर्थात बाह्य दिसण्यात विविधता आहेच. एक भारतीय हा भारतीयासारखाच दिसेल, पण फक्त भारतामध्येच तुम्ही पहाल की भारतीयांमध्ये अनेक वेगवेगळे चेहरे आहेत. विविध रंग आणि विभिन्न रूपे भारतीयांच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकाल. भारत वैशिष्ट्यूपर्ण आहे, की जिथे अनेक प्रकारची माणसे आहेत. तुम्हाला इथे रशियन भेटतील, जपानी, चायनीज भेटतील. आफ्रीकन भेटतील. या देशात प्रत्येक प्रकारची माणसे आहेत. ही गोष्ट हे दर्शविते, की या सर्व लोकांना “भारतीय’ म्हणता येईल. आपण सर्व एकच आहोत याचा विसर सर्वदा फक्त अज्ञानामुळेच पडतो असे नव्हे. प्रत्येक मानव हा सारख्याच प्रकारे हसतो. तो वेगवेगळ्या प्रकारे हसतो कां ? खाल्लेल्या अन्नाचे चर्वण ही तो एकाच प्रकारे करतो. तो रडतो ते ही सारख्याच प्रकारे. त्याच्या रडण्याचे ओरडणे ही सारखेच असते, हावभाव ही सारखेच असतात. एखादी स्त्री आपल्या पतीवर रागावली असेल……. काल मी आमच्या बंधूंबरोबर एक कार्यक्रम पहात होते. मला आश्‍चर्य वाटते, की आपले आविर्भावसुद्धा सारखेच असतात. माझे बंधू मला दाखवत होते, की एखादी स्त्री कशी तिच्या नवऱ्याशी भांडते.. कशी वागते. वर वर्णन केलेल्या सर्व भावक्रिया आपण पाहिल्या, तर आपणास आश्‍चर्य वाटते, की जगातील सर्व स्त्रियांच्या भावक्रिया या सारख्याच आहेत. यावर पुरुषांची प्रतिक्रिया तुम्हाला बघायची असेल, तर ती ही तशी एकसारखीच असते.     

माझे पती हे शास्त्रीजींचे सचिव होते हे तुम्हाला माहीत आहे. ताश्कंदला ते लालबहाद्‌र शास््रींजींच्या समवेत होते. तसे एकदा युगोस्लाव्हीयाला गेले होते. या भेटी दरम्यान जनरल टिटोची यांची पत्नी आणि सो.शास्त्री यांची मैत्री झाली. खूप गाढ मैत्री झाली. शास्त्रीजींनी त्यांना इशारेवजा सूचना केली की, ‘पहा, तुम्ही दोघी आता चांगल्या मैत्रिणी झाल्या आहात. इथून निघतांना भारतीय स्त्रीप्रमाणे रडू नका!’ शेवटी निघतांना सो.शाख्रींनी आपले अश्रू बरच वेळ आवरले. पण त्या मला म्हणाल्या, ‘मी रडू आवरलेच होते, पण मिसेस टिटोच रडत होत्या. त्या खूपच रडत होत्या, मग त्या अगदी मोठ्यानेच रडायला लागल्या, माझ्या गळ्यात पडून! मग यात मला माझे अश्रू आवरता नाही आले. मी ही रडायला लागले आणि आमच्या दोघींच्या पतींना खाली मान घालावी लागली.’ म्हणून मूलभूतपणे जगातील सर्व स्त्रिया आणि पुरुष एखाद्या परिस्थितीमध्ये सारखीच प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि हे बघा, की त्यांच्या प्रतिक्रिया या त्यांच्या मुलांवरही तशाच होतात. मुले ही तशीच वागतात. त्याच पद्धतीने वागतात! असे समजा, की आपल्याला कळले, की जगामध्ये कुठेतरी दोन मुले अडकून पडली आहेत आणि त्यांना काहीतरी होते आहे. संपूर्ण जग चिंतीत होईल आणि विचार करेल, की त्या मुलांना कसे वाचवता येईल. त्यांना वाचवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. जग त्यांच्याकरिता ईश्वराकडे प्रार्थना करेल, ‘हे परमेश्वरा, ही दोन मुले कुठेतरी, कशाने तरी अडचणीत सापडली आहेत त्यांना वाचव!” प्रत्येकजण चिंताक्रांत असेल, जसे काही स्वत:चीच मुले तिथे संकटात आहेत. एखाद्या मृत्यूच्यावेळी सुद्धा हे असेच असते. हे मी पाहिले आहे. अवकाशातून जेंव्हा विमान जमिनीवर उतरत असते, तेंव्हा लोक चिंतेत असतात की ते स्वत:ला गमावतील. प्रत्येक मशिदीमध्ये, मंदिरात, चर्चमध्ये आणि सर्वत्र असेच असते. कोणी अमेरिकन असेल, तर तो अमेरिकेत आहे असा कोणी विचार करीत नाही. कोणता धर्म वगैरे काही नाही. असे पहा, की त्यांच्याकरिता तो एक मानवधर्म असतो! मानवामधील बंधुत्व कार्यान्वित होते. अशावेळी ते कोणत्या देशाचे, अमेरिकन लोकांनी भारतीयांचे काय केले असा कोणताही विचार नसतो. एकच विचार असतो की, “परमेश्वरा त्यांना वाचव. कृपा करून वाचव.’ त्याच्याकरिता प्रत्येकजण प्रार्थना करीत असतो. परमेश्वराकडे मागणे मागत असतो, की ते वाचले पाहिजेत. अशावेळी आपल्यामध्ये काय घडत असते? आपण कसे विसरतो, त्यावेळी आपण सत्याला स्पर्श करतो. तर ते असे आहे. कोणीही प्रयत्न करू दे!  

हिटलरने जेव्हा ज्यू लोकांचा छळ केला तेव्हा प्रत्येकाची सहानुभूती ज्यूंच्या बरोबर होती. पण जेव्हा ज्यू लोकांनी मुस्लिमांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा प्रत्येकाची सहानुभूती मुस्लिमांसाठी होती. मग तुम्ही सर्व धर्माचा का विचार करावा? ज्यू लोकांना सुद्धा मुस्लिमांबद्दल सहानुभूती होती. अशावेळी त्यांच्यामध्ये काय मतभेद होते, याचा विचार आपण करीत नाही. कोणाही व्यक्तीने ‘चांगले झाले, त्यांना शिक्षा झाली’ असे म्हटले नाही, ज्यूंनी सुद्धा! म्हणजे आमच्यामध्ये स्थित जे मानवीय आहे, त्यामुळे आपल्यासारख्याच इतर लोकांना झालेल्या छळामुळे आपल्याला क्लेश होतात. अर्थातच धर्मवेडेपणाच्या भयानक कल्पनेने किंवा भीतीने किंवा ‘हल्लेखोरपणामुळे किंवा अशाच काही गोष्टींमुळे आपण निर्दयी होतो. तुम्ही जर जर्मन लोकांना विचारलेत, की असहाय्य लोकांची झालेली कत्तल कशी होती, तर त्यांची मान खाली झुकते. ते म्हणतात, ‘आम्हाला माहीत नाही. आम्ही त्यावेळी आमचेच (शुद्धीवर) नव्हतो. आम्ही ते कसे केले माहीत नाही. ते कसे काय घडून आले हे आम्हाला कळले नाही. खरेच आम्हाला माहीत नाही, ते कसे घडून गेले.’ म्हणून जेव्हा तुमच्यावरती हिंसा चढते तेंव्हा असा विचार करायचा की, ‘ईश्वरा, मी एक मानव आहे. तसेच ते देखील मानव आहेत.’ त्यामुळे एकात्मता येते. ती जाणिवेत उतरते. ही एकात्मिकतेची भावना प्राणिमात्रांमध्ये इतकी नसते. जर प्राणिमात्रांना काही कृती करायची असेल तर त्यांना काही वाटत नाही. माकडाचे पिल्लू आजारी असेल तर त्याची आई काळजीत असते. ती किंचाळते, ती ओरडते, पण जर तेच पिलू मृत पावले तर ती माकडीण ते मेलेले पिलू सरळ बाजूला फेकून देईल आणि परत उठून उभी राहील. एकात्मिकतेची भावना फक्त मानवामध्येच आहे आणि ती आपल्या जाणिवेतही आहे.    

‘ही एकात्मिकतेची जाणीव आपल्याला कृष्णावताराने दिली. श्रीकृष्णांनी आपणास मानवतेची भावना दिली किंवा ही मानवतेची जाणीव त्यांनी आपल्यामध्ये जागृत केली. मानवी संबंधांची जाणीव ज्यांनी आपल्याला दिली त्या व्यक्तिमत्वाला आपण ओळखायला हवं आणि ज्या वेळी अशा समस्या निर्माण झाल्या, जशा की कोणी तरी मला म्हणाले, की सोमनाथला त्यावेळी श्रीकृष्ण हे धडा शिकविण्यासाठी मोहम्मद गझनी बनून आले होते. सोमनाथ मंदिरात पैसे उकळणाऱ्या भीषण ब्राह्मणांना मोहम्मद गझनी हा धडा शिकविण्यास आला होता, हा अनेक हिंदूंचा विश्‍वास होता. खरच अनेक हिंदूंना हा विश्‍वास होता, की पैसे कमावणाऱ्या, खरं तर गरीब भक्त की जे सोमनाथांच्या चरणी समर्पित होते, त्यांची पिळवणूक करणाऱ्या भयंकर ब्राह्मणांना धडा शिकविण्यासाठी सोमनाथाची मूर्ती तोडण्यासाठी श्रीकृष्ण मोहम्मद गझनी बनून आले होते. ते साक्षात परमेश्वर होते. म्हणून ते असे करू शकले.  

आपल्याला हे समजून घेतले पाहिजे, की जर आपण सामूहिकतेमध्ये राहू शकलो नाही, तर मानवीय अखंडत्व आपल्याला उमजणार नाही. आपण असे अखंड नाही आहोत, हे आपल्याला उमजले पाहिजे. मन एक विचार करते, तर हृदय दुसरा, तर चित्त तिसऱ्याच गोष्टीवर असते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला इतके आश्‍चर्य वाटते की, ‘दारू पिऊ नका’ हे सर्व प्रेषितांनी सांगितले होते, पण त्या त्या धर्मातील लोकांनी दारू पिणे सोडले नाही, पण असे असूनसुद्धा परमेश्‍वर ते विसरून जातो. मानव मदिरालयात जातो. पितो, पडतो आणि अडखळत बाहेर पडतो. पण तरीसुद्धा ते मदिरालयात जातातच आणि त्याच परिस्थितीत पुन: पुन: अडकतात. का? कारण मन त्यांना सांगते की दारू पिऊ नका’, बुद्धी सांगते की, दारू पिऊ नका’, पण त्यांचे हृदय दुबळे असते. ते थांबूच शकत नाही. या मानवाच्या सवयी! खंडीत दुबळ्या विचारामधून अशा सवयी निर्माण होतात. आपण आतमध्ये इतके विखुरलेले आहोत, की माणसाला काही चांगले करावयाचे असेल, तर नेमके तो त्याच्या उलट करतो. म्हणून मनुष्याच्या जीवनातील या दुबळेपणामुळे आपण परमेश्वराच्या सान्निध्यात असतो.  

संगीताबद्दल आणि एकंदर प्रत्येक गोष्टीबद्दल ईश्वराने खूप सांगितले आहे. मानव जातीवरील प्रेमापोटीच परमेश्वराने संगीत निर्माण केले. ईश्वराच्या आराधनेसाठी नसेल, तर ते संगीत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देते. त्यावेळी मी फिल्म सेन्सॉर बोर्डवर होते. तर एक बाई होत्या. त्या कव्वाली वगेरे असं काहीतरी लिहीत असत. मी त्यांच्या कव्वाली सेन्सॉर केल्या आणि त्यांना म्हणाले, ‘या रचना काही कव्वाली नाहीत.’ त्यांनी विचारले, ‘का?’ मी त्यांना सांगितले की, ‘या रचना ‘मुजरा’ या प्रकारातील आहेत. खालच्या दर्जाच्या व भयंकर विषयासक्त आहेत. हा परमेश्वराचा अपमान आहे. तुम्ही अशा रचना गाऊ शकत नाही.’ तेव्हा त्या बाई म्हणाल्या, ‘नाही, नाही. या रचना कव्वालीच आहेत.’ मी म्हणाले, तुम्हाला माहीत आहे कां की स्रिया कव्वाली कधीच गात नाहीत. कव्वालीची रचना अशी घाणेरडी नसते आणि जशा वेश्या गातात तशा तुम्ही का गात आहात?’ एकंदरच संगीत हे परमेश्वराची स्तुती स्वरूपच असावे, आणखीन काही नाही. म्हणून आपल्याकडे नाथांची भारूडे, भजने आहेत, पण तुम्हाला असे आढळेल की, श्रीकृष्णांच्या वेळचे संगीत केवळ रासलीलेसाठी होते. रा म्हणजे चैतन्य, स म्हणजे समान. राधा आणि ते सर्वजण रासलीला खेळत असत. संगीताच्या तालावर रासलीला खेळता खेळता हे चैतन्य सगळीकडे पसरत असे, की ज्यामुळे सामूहिकता प्रस्थापित होत असे. हे सर्व सामूहिकतेसाठी होते. तुम्ही हे समजू शकाल की मानवास हे ओळखता येत नाही. विषयासक्तीतील ज्ञानेंद्रियांना सुखकर असे संगीत ते ऐकतात. हे परमेश्वराच्या विरोधात आहे. परमेश्वराच्या आराधनेसाठी ही संगीत शक्ती आपल्याला प्राप्त झाली आहे, आणखी कशाकरिता नाही. वासनाधिनतेकडे घेऊन जाणार्‍या किंवा इतर मनोरंजनात्मक गोष्टींसाठी संगीत नाही. कारण असे की अशा प्रकारच्या संगीताची उमटणारी प्रतिक्रिया ही त्याच संगीतामध्ये समाविष्ट असते. संगीत हे ईशवरासाठी आहे, हे सांगून देखील आपल्याकडील होरान झेबू सारख्या गृहस्थाला संगीत काय आहे हे समजलेले नव्हते. हा एक कट्टर माणूस आणि इतर मुस्लिम हे कव्वाली वगेरे काही गात नसत. ते भयानक अशा गझल्स गायचे, की ज्यामध्ये स्त्री आणि पुरूष यांच्यातील विरहाचे वर्णन आणि इतर बीभत्स वर्णन असायचे. बीभत्स संगीत गाणारे काही लहान सहान ग्रुप, ज्यांनी संगीत म्हणून गायलेले असे काहीही मनोरंजनीय संगीत मानवापर्यंत पोहोचले. या गोष्टीचा कळस म्हणजे उमर खैय्याम! ‘कोण होता तो? तर एक नास्तिक! खरच एक नास्तिक, भयंकर माणूस. पण तो या लोकांना खूप आवडतो. उमर खब्यामचे काव्य – काय ते काव्य! पण लोकांना ते आवडते. का? कारण मनुष्याच्या हृदयातील रूक्ष विदीर्णतेला उमर खय्यामच्या या गझला आवडतात. ‘या, इथे मदिरापान करूयात, जीवनात यासारखे दुसरे रमणीय आहे काय? कोणास ठाऊक या आयुष्यात पुढे घडणार आहे काय?’ खरं तर मोहम्मद साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मदिरापान वर्ज्य करावे असे काव्य उमर खय्यामने गायला हवे होते, पण अशा मदिरापान करण्याविषयीच्या कवितांची लोकांनी कदर केली. इराकमध्ये तो एक महान कवी म्हणून ओळखला जातो. याच इराकमध्ये आज खोमेनी सारखा क्रूर माणूस जन्माला आला, जो अद्यापही या उमर खैय्यामचा आदर करतो. पण खोमेनी उमर खेय्यामचा आदर कसा काय करू शकतो, हे मला काही कळत नाही. हा किती विरोधाभास आहे. पहा हा उमर खेय्याम, किती बीभत्स गझला गातोय, ज्या परमेश्वराची आराधना करणाऱ्या नाहीत. जे संगीत परमेश्वराची स्तुती करणारे नाही, ते संगीत नाहीच मुळी! ते ओंगळ आहे, अश्लिल आहे, गलिच्छ आहे.  

भारतातील आमचे शास्त्रीय संगीत हे ३७ वर आधारीत आहे. जेव्हा ते कुंडलिनी पर्यंत पोहोचते तेव्हा विशुद्धी चक्रातून अंआंइईउंऊंरीं रि क्र क्रं एऐ ओ ओ अं अ: असे ध्वनी निघतात. हे सोळा स्वर, सोळा चक्रातून किंवा उपचक्रातून किंवा विशुद्धी चक्राच्या सोळा पाकळ्यांमधून उमटतात. विशुद्धी चक्रांचे हे बीजमंत्र आहेत. हे सर्व स्वर इथून गळ्यातून उमटतात. म्हणून जेव्हा आपण बीभत्स गाणी गातो तेव्हा आपण आपले विशुद्धी चक्र खराब करतो आणि म्हणूनच जे लोक अशी बीभत्स, अश्लील गाणी गातात, त्यांना दारू पिण्याची आवश्यकता असतेच. कारण मला असं वाटतं की, दारूशिवाय ते असली गाणी गाऊ शकणार नाहीत. दारूशिवाय त्यांना सहन होणार नाही किंवा न पिता ते असे काही करू शकणार नाहीत. त्यांना ईश्वरापासून दूर नेणारी अशी एखादी पळवाट मिळालेली असते. म्हणू त्यावेळी संगीत आणि दारू असे हातात हात घालून चाललेले होते. पाश्‍चिमात्य देशात संगीताच्या सर्व परंपरा मोडल्या. कारण त्यांच्यामध्ये असा काही विचारच शिल्लक उरला नव्हता, की जो त्यांना ‘संगीत म्हणजे परमेश्‍वर’ अशी ओळख देईल. प्रार्थनेनंतरचे परमेश्वराचे ईशस्तवन हेच संगीत होते. सर्वच संगीत हे परमेश्वराच्या आराधनेसाठी हवे. सर्व रागदारी परमेश्वराच्या भक्तीसाठी हवी. दिवसाच्या ठराविक प्रहरी नमाज पढावा, अशी व्यवस्था आपल्याकडे नाही, पण वेगवेगळ्या प्रहरी कोणते शास्त्रीय संगीत ऐकावे, ही व्यवस्था आपल्याकडे आहे. विभिन्न प्रहरी विशिष्ट संगीताचे सूर विशिष्ट राग आळवितात व त्यातून विशिष्ट र्सनिर्मिती होते. हे रस आपल्याला परमेश्वराशी जोडतात. जे रस परमेश्वराशी एकरूप करत नाही तो रस आपल्याला आत्मानुभूती देत नाही. असा कोणताही रस नाही की जो आत्मानंद प्राप्त करून देत नाही. बीभत्स रसामध्ये चित्र-विचित्र कलाकृतीचा आविष्कार अनुभवास येतो. मनात दाटलेल्या मळभात किंवा अनुभवलेल्या ओंगळपणामुळे असे बीभत्स रस निर्माण होतात. आपली इच्छाशक्ती शास्त्रोक्त आहे. आपले संगीतसुद्धा कमालीचे शास्त्रोक्त आहे. कारण जेव्हा कुंडलिनी आपल्या गतिशीलतेमध्ये सप्तस्वरांमधून वास करते तेव्हा संगीताची शास्त्रीय बांधणी होते. हे सप्त स्वर आपल्या सात चक्रांवरती प्रस्थापित आहेत. सा पासून त्यांची सुरुवात होते. मगरे ग म – म म्हणजे मदर, प ध नी. माझ्या नावाची सुरूवातसुद्धा ‘नि’ ने होते.  

सप्तस्वर या सात सुरांनी बांधलेले आहेत. तसेच विकृत स्वर ही आहेत. विकृत स्वर आणि आपल्या चक्राचा विचार करता आपल्याला बारा स्वरांची बांधणी करणे आवश्यक आहे. पण खऱ्या अर्थाने शास्त्रीय संगीत कोणाला समजलेलेच नाही. सरस्वतीची (विद्येची) देवता शारदा आपल्यामध्ये स्थित विराटाची संगीत संदेशवाहिनी आहे आणि ती आपल्याला कसं गायचं हे शिकविते. परमेश्वराला काय आवडते हे देवी शारदा आपणास सांगते. या रागाची कशी बांधणी केली असेल याचा विचार करा. कारण प्रथम ते आरोह आणि अवरोहाकरिता स्वरांची निवड करतात, की जे परमेश्वरास आवडतात. अशाप्रकारे रागांची निर्मिती होते. रागाचे स्वर बांधीव असतात. तुम्ही या रागाच्या स्वरांना बदलू शकत नाही. कारण असं अनुभवास आले आहे, की यावेळी आत्मजागृती होते. चैतन्याच्या जागृतीने त्यांना ही अनुभूती आली. ते अशा प्रकारे कार्यान्वित झाले. वीणा वादनामध्ये त्यांचे स्वर तंतोतंत जुळले. तंतोतंत लागलेल्या सुरांच्या अनुभूतींची अतिशय सुंदर प्रचिती येते. आता हे लक्षात येईल, की हे लोक जे पाश्‍चिमात्य देशांतून आले आहेत त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची बौद्धिक पातळीवर माहिती नसते, पण त्यांना ते आत्मिक पातळीवर समजते, कारण त्यांना आत्मानंद प्राप्त होतो आणि चैतन्य प्रवाहित होते. ही संगीताची जाणीव आणि संगीताचे स्वरचित्र आपल्यामध्ये श्रीकृष्णांनी निर्माण केले. तोच तो श्रीकृष्ण ज्यांनी आपल्याला ताल शिकविला. अर्थातच आपण म्हणू शकतो की, हेच शिव ज्यांनी तालनृत्य केले. पण संपूर्ण मानवामध्ये आपल्या लयीने ज्यांनी तालनृत्य साकारले ते श्रीकृष्णच आहेत. त्यांनी सर्व ‘काळ ताल धरला. ज्याप्रकारे श्रीकृष्ण उभे राहतात, ते उभे राहणे हे तालातच असते आणि त्यांचे बसरीवादन हेच सूचित करते की, परमेश्वराचे प्रेम हेच संगीत आहे. त्याचे संगीत हे परमेश्वरी प्रेमाची पाखरण असते की जे तुम्हाला शांत करते, की जे तुम्हाला मुक्त करते, की जे तुम्हाला तृप्त करते, की जे तुम्हाला सुखी करते. म्हणून त्यांना जे काही सांगायचे होते ते त्यांनी त्यांच्या माधुर्यातून, त्यांच्या संगीतातून सांगितले. त्यांनी कधीही काव्य केले नाही. केले कां? त्यांनी कधीही काव्य केले नसले तरी जेव्हा ते बोलले, ते जेव्हा त्यांच्या गद्रीया भाषेत, गद्यात बोलले – ती गीता झाली. फक्त जेव्हा ते बोलले – ते बोल ‘गीता’ झाले. अर्थातच लोकांनी त्याचा बऱ्यापैकी विपर्यास केला. ती लय! लोक जेव्हा गीतेची पारायणे करतात, तेव्हा मला जाणवते ती लय! असे असूनही आपण हे स्वीकारले पाहिजे, की मानवजातीच्या कल्याणासाठी श्रीकृष्णांच्या श्रीमुखातून गद्यातून प्रकटलेली गीता काव्यरूपात अवतरली, साक्षात गद्यातून! श्रीकृष्णांनी ती सहजपणे तुम्हाला कळेल अशी सांगितली. कारण मनुष्य प्रथम फक्त संगीतच समजू शकला. संगीतातील ताल समजू शकला. मानवाला गीतेतील अनेक शब्द आणि मर्म समजणे शक्‍य नव्हते, पण श्रीकृष्णांनी ते शक्‍य केले.  

कुराणात प्रत्येक आयामाच्या सुरुवातीचे काही शब्द कोणासही समजत नाहीत. ते शब्द दुसरे तिसरे काही नसून बीजमंत्र आहेत. पण त्यांनी या बीजमंत्रांना तिथे स्थान दिले. त्यांना माहीत होते, की लोकांना हे बीजमंत्र समजणार नाहीत. पण त्यांना हे ही वाटत होते की लोकांना हे बीजमंत्र समजायलाच पाहिजेत. म्हणून त्यांनी बौजमंत्रांना हे स्थान दिले. या सर्व गोष्टी कदाचित तुम्हाला कळणार ही नाहीत. कदाचित मी कोण आहे हे ही कळणार नाही. शक्‍यता आहे, पण त्यांनी जे काही केले ते मानवाच्या हितासाठीच केले. हे सर्व घडलेले आहे. श्रीकृष्णांनी त्या युगात ‘हित’ ही कल्पना आपल्यामध्ये रुजविली. कारण असे म्हटले आहे, की तुम्ही नेहमी सत्य बोलले पाहिजे. सत्य अशा प्रकारे बोलले पाहिजे, की ते सर्वांना प्रिय वाटले पाहिजे. आपण सर्वांनी मधुर बोलले पाहिजे. हा श्रीकृष्णांचा संदेश आहे.  

ज्यांचे विशुद्धी चक्र सुस्थितीत आहे, ते खूप चांगले, मधुर बोलतात. सर्वांचे हृदय जिंकण्याची कला त्यांच्या आवाजातील माधुर्यात असते. लोकांना खालच्या पातळीवर न नेता ते वरच्या पदावर घेऊन जातात. मधुरतेने सर्व काही करावे असे श्रीकृष्णांनी सांगितले आहे. ती त्यांची मुख्य धारा होती. त्यांच्या सर्व कार्यामध्ये देवी लीला असते. कारण त्यांनी ते अत्यंत माधुर्याने केले. त्यांनी जे काही केले त्या सर्व दैवी लीला होत्या. विश्‍व हे काही गंभीरपणे, तीक्ष्णपणे किंवा ताण-तणावामध्ये जगावे असे स्थान नाही, पण लीलया जगावे. या कृष्ण लीला, हे नाट्य पहावे. सर्वच काही एक नाटक! म्हणूनच हे सर्व मधुर आहे. या विश्‍वाकडे एक नाटक म्हणून पाहिलेत तर ते अजून मधुर वाटेल. याच्यामधील मधुरता अशी आहे, की कोणी जरी मूर्खपणा करीत असेल तरी तुम्ही त्यामध्ये आनंद घ्याल. जेव्हा हे विश्‍व एक नाटक आहे असे कळते, तेव्हा जरी कोणी कोणाचा खून जरी केला तरी ते नाटक आहे, मिथ्या आहे असे वाटते आणि तुम्ही चिंतामुक्त होता. जगत हे एक नाट्य आहे, या सर्व लीला आहेत हे श्रीकृष्णांनी सांगितले. जेणेकरून मानवाने हे सर्व गांभीर्याने न घेता या लीलांमध्ये खरेखुरे पात्र बनून सहभागी व्हावे. असे पहा, की या लीलेमध्ये कोणीतरी एक पात्र शिवाजी महाराज बनवून तयार केलेत. दुसऱ्या बाजूकडून कोणीतरी पात्र येऊन या पात्रावर तलवारीने वार करीत असेल, तर आपण म्हणतो, की शिवाजी महाराजांचे पात्र करणारा नट काही चांगला नाही. तेव्हा तो नट खऱ्याखुऱ्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शिरतो आणि दुसऱ्या पात्रावर उलट वार करतो. तर हे एक नाटक आहे. श्रीकृष्णांनी या सर्व लीला दाखविलेल्या आहेत. नि:संदेह त्या लीलाच आहेत. पण जेव्हा जेव्हा तुम्ही आत्मसाक्षात्कारी होता तेव्हा तुम्ही या सर्वांकडे एक नाटक म्हणून किंवा एक नाट्य समजून पाहता.  

तुम्ही सर्वांनी हे पाहिलेच असेल, की बरेचसे सहजयोगी नेहमी हसत असतात. कारण ज्याप्रकारे गोष्टी घडतात त्या कळलेल्या असतात. जरी एखादा कोणी गुरू दुर्वर्तन करीत असेल, तर ‘काय हा मूर्खपणा’ असे वाटून तुम्हाला हसायला येईल. आज मला कोणीतरी भेटायला आले. ते मला म्हणाले, ‘माताजी, आयुष्यात मी खूप मूर्खपणाच्या गोष्टी केल्या.’ आणि ते हसायला लागले. ते म्हणाले, ‘या सर्व गोष्टींकडे जेव्हा मी बघतो तेव्हा खरच हसायला येतं.’ ते पुढे म्हणाले, ‘मी एका गुरूकडे गेलो होतो. ते लोकांना नाम देत होते. मी त्यांच्यापर्यंत असा प्रयत्न केला की, त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकांना, मला ही गुरूकडे न्या, अशी विनंती केली. ते तसे फार काही श्रीमंत नव्हते, त्यामुळे त्यांना ते ‘नाम’ वगेरे काही मिळत नव्हते. पण ते म्हणत होते, ‘मला नाम हवे, मला नाम हवेच अहो.’ पण गुरू म्हणत होते, ‘नाही, नाही. एवढ्यात नाही. तुला थांबायला पाहिजे.’ ते म्हणाले, ‘मी त्यांच्या सेवापेटीमध्ये खूपच पैसे ओतले आहेत. ते म्हणतील त्याप्रमाणे मी सर्व काही केले. पण त्यांनी (गुरूंनी) काही मला नाव दिलेले नाही, पण शेवटी ती वेळ आली, त्यावेळी ते गुरू म्हणाले, ठीक आहे. मी तुला नांव देतो आणि त्यांनी मला एक नाव दिले ज्याचा मी जप सुरू केला. मी वेड्यासारखा त्या नावाचा जप करू लागलो.  माझे डोके दुखणे सुरू झाले. तेव्हा ते म्हणाले, ‘ठीक आहे. असा त्रास तुला होणारच! या त्रासातून तुला जावे लागेलच कारण ते नाव तू स्वत: मागून घेतले आहेस!’ हे गृहस्थ ज्यावेळी माझ्याकडे आले होते, त्यावेळी पृथ्वीवर अस्तित्वात नसलेल्या एखाद्या भयंकर प्राण्यासारखे दिसत होते. अत्यंत दयनीय अवस्थेत ते माझ्याकडे आले होते. आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. मी त्यांना त्या दिवशी ओळखलेसुद्धा नाही. मी त्यांच्याकडे पाहतच राहिले. मी म्हटले, ‘अरे देवा, ते तुम्हीच कां?’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘माताजी, या सर्व गोष्टींचे मला हसू येते! मी पाहतोय की लोक कसे मूर्खासारखे कुगुरूकडे जातात. कसे चुकीच्या गोष्टींच्या, चुकीच्या कल्पनांच्या मागे धावतात आणि महत्त्वाचा मुद्दा कसे गमावून बसतात.’ मग त्यांनी मला एक प्रश्‍न विचारला की, ‘माताजी, तुमच्यापर्यंत येण्यासाठी त्यांना अध:पतनाच्या इतक्या खालच्या पातळीवर उतरावे लागते का?’ मी म्हणाले, ‘त्यांच्या बाबतीत माहीत नाही की त्यांनी काय विचार केला असेल! पण हे सत्य आहे, की लोक इतके मूर्ख असतात की विशुद्धी चक्रावरील दोषामुळे सकारात्मक गोष्टींचा स्वीकार करण्यापेक्षा ते अशा चुकीच्या कल्पना आणि नकारात्मक गोष्टींच्या मागे खूप लवकर धावतात.’ 

 जर तुमचे विशुद्धी चक्र शुद्ध असेल, तर तुमच्या हातातून चैतन्य वाहत असते. बर्‍याच लोकांचे विशुद्धी चक्र शुद्ध नसल्याने आत्मसाक्षात्कारानंतरही त्यांच्या हातामधून चैतन्याची अनुभूती त्यांना होत नाही. याचा काय अर्थ होतो, की तुमचे विशुद्धी चक्र ठीक नाही. प्रथमत: तुमच्या वरचढ स्वभावामुळे तुम्ही सामूहिकतेमधील व्यक्ती नसता. स्वभावामुळे! तुम्ही सामूहिकतेशी समरस होणारी व्यक्ती नसता! जसे की काही असंतुष्ट व्यक्ती असतात, त्यांचे, ‘मला हे हवे, मला ते हवे, मला झोपण्यासाठी चांगला बिछाना हवा. माझ्यासाठी तसेच हवे. मी तसेच करीन.’ अशा प्रकारच्या ‘मी’ अहंकार आणि प्रति अहंकाराची सुरुवात या विशुद्धी चक्रातून होत असल्याने अशा लोकांच्यामध्ये हा ‘मी’ अतोनात भरलेला असतो. असं पहा, की एखादा माणूस जर अहंकारी व्यक्तिमत्त्व असेल, तर तो सामूहिकतेमध्ये रमत नाही. कारण इतर सामूहिकतेपासून वेगळा झालेला असतो. त्याच्यातील ३ कार त्याच्या अहंकारी व्यक्तिमत्त्वाने झाकाळलेला असतो. म्हणून तो समूदायात राहत नाही. आता असं बघा, की श्रीकृष्ण कोणासोबत वाढले? लहान लहान गोप-गोपींबरोबर. गाई चारण्याकरिता ते स्वत: जात असत, फक्त गायींच्या मागे गुराखी म्हणून. तुम्ही असं पहा, की श्रीमंत लोकांमध्ये किंवा श्रीमंतीमध्ये कोणत्याही दैवी अवतरणास रस नव्हता. जगाच्या दृष्टीकोणातून अत्यंत सामान्य असणाऱ्या लोकांच्या बरोबर श्रीकृष्णांनी वास्तव्य केले; खेळले, त्यांच्याबरोबर मधुर लीला केल्या. लोणी चोरले. त्यांनी खरच लोणी चोरले. कृष्णावर टीका करणाऱ्या लोकांनी त्यांना चोर म्हटले, ‘ते चोर होते.’ खरोखर ते चोरांच्या वरचे चोर होते, असं बरंच काही.  

श्रीकृष्ण लोणी चोरत होते कारण पैसे मिळविण्यासाठी गोपी मथुरेस जाऊन लोणी विकायच्या! मथुरेतील भयंकर राक्षसांच्या तब्येती सुधारण्यासाठी या लोण्याने मदत व्हायची! म्हणून श्रीकृष्ण, मथुरेतील राक्षसांच्या सुदृढ होणाऱ्या तब्येती पाहन मथुरेला लोणी पाठवायला राजी नसायचे. लोणी चोरणे हा एकमेव उपाय होता, की ज्यामुळे मथुरेला लोणी जाण्याचे थांबावे. ते राक्षस उपाशी मरावेत. त्यांच्यामध्ये जीवनसत्त्व अ आणि ड ची कमतरता वाढावी, त्यांना घशाचा त्रास व्हावा आणि त्यांचे हात इतके कमजोर व्हावेत, की त्यांची हत्यारे उचलण्यासाठी त्यामध्ये शक्ती नसावी. त्यांच्यावर वार करण्याची ही एक चांगली युक्ती आहे, की ते प्रतिकार करूच शकणार नाहीत. अशाप्रकारे त्यांनी हे सिद्ध केले की मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी काही छोट्या छोट्या मूर्खपणाच्या, चुकीच्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. ‘हित!’ हित महत्त्वाचे. कारण त्यांनीच सांगितले होते, की जर खरं बोललात तर लोक दुखावतील. जर असं होत असेल, तर मग काय करायचं ? एक तर लोकांना दुखवायचं किंवा खरं बोलायचं नाही किंवा खरं बोलायचं आणि लोकांना दुखवायचं! या दोन्ही गोष्टी बरोबर होणार नाहीत. समजा मी कोणाला म्हटले, ‘तू अगदी वाईट आहेस’, तर ती व्यक्ती दुखावणार, समजा त्या व्यक्तीला मी खरे नाही सांगितले, तर ती व्यक्ती कामातून जाणार! मग काय करायचे ? श्रीकृष्णांनी ही समस्या सोडविली.  

त्यांनी असे केले, की दोन्हींच्यामध्ये ‘हित’, शब्द आणला. ‘हित’ म्हणजे तुमच्या आत्म्यवृत्तीस जे चांगले आहे ते! जे काही आत्म्यास चांगले आहे ते! ‘हित’ या शब्दाचाच अर्थ असा आहे, की जे काही तुमच्या आत्म्यास बरे वाटेल ते! उदा.मी कोणाला तरी सांगते की, ‘तुम्ही तसे करू नये’, त्याला आज कदाचित वाईट वाटेल, पण जर त्यांना उमजले की, ‘आई माझ्या चांगल्यासाठी सांगते आहे.’ तर त्याप्रमाणे तो ते करेल आणि त्याला त्याचा फायदा ही होईल – ‘हितकारक’! किंवा समजा त्याने ते काम केले नाही, मग काय होईल? असे समजा, की मी त्यांना काहीही सांगितले नव्हते आणि त्यांना ही काही माहिती नव्हती किंवा मी त्याला सांगितल्याप्रमाणे तो ते काम करीत नाही, तर त्यांना त्याचे खूप वाईट वाटेल. हे त्याच्या आत्म्यास क्लेशकारक होईल. ते त्याला आवडणार नाही, पण असे हिताचे काही करताना त्या व्यक्तीस सर्व सांगावे लागते आरि काही वेळा ते अतिशय वेदनादायक असते. त्या दिवशी मी कोणाला तरी म्हणाले, ‘तुम्ही दुसऱ्याचे आजार बरे करू शकत नाही कारण तुम्ही स्वत: अजून तितके परिपूर्ण नाही आहात.’ त्यांना अतिशय वाईट वाटले. मग मला परत त्यांना सांगावे लागले, ‘ठीक आहे, चालू ठेवा, तुम्ही बरे करू शकता इतरांना चांगल्याप्रकारे, पण तुम्ही काही झालं तर परत माझ्याकडे येऊ नका.’ मग तर ती व्यक्ती वेड्याच्या इस्पितळातच भरती होईल, पण जेव्हा तो वेड्याच्या इस्पितळात जाईल, तेव्हा तो काय म्हणेल? मी जे काही त्याला सांगितले होते, ते त्याच्या हितासाठी होते का? मग त्याचा राग जाईल का? शेवटी आपल्याला हीत कशात आहे हे सांगायचे आहे. ते सांगा. सांगणे हे महत्त्वाचे! करणे नाही, सांगणे. ‘हीत’ हे तुम्ही तुमच्या विशुद्धी चक्रावरून सांगता, तेव्हा ते प्रिय होते. अर्थात तो प्रकाश आहे. म्हणून आत्मप्रकाश देणारी गोष्ट तुम्ही सांगा अन्यथा काही सांगू नका. पण लोक इतके आक्रमक असतात की दुसर्‍याची चूक सुधारण्यासाठी पुढे सरसावतात, पण ते प्रेमाने व्हायला हवे. हित म्हणजे प्रेमापोटी केलेले सर्व काही. कोणास काही सांगावयाचे असल्यास ते प्रेमाने सांगता आले पाहिजे. ते सांगणे आवश्यक आहे का हे पाहिले पाहिजे आणि तिसरी अट म्हणजे, तुम्हाला तो अधिकार असावयास पाहिजे आणि जर तसा अधिकार नसेल तर गप्प बसा. परमेश्वर त्याची काळजी घेईल. तुमचा इतर कोणावर ताबा नाही, पण जर तुम्हाला कोणाला प्रेमाने काही सांगायचे आहे आणि तुम्हाला तसा अधिकारदेखील आहे तर ते तुम्हास सांगायलाच पाहिजे. जर तुम्हाला अधिकार नसेल तर कोणालाही काहीही सांगू नका, तथापि त्या व्यक्तीस ते प्रिय वाटणार असेल आणि त्याच्या हिताचे असेल तर जरूर सांगावे. श्रीकृष्णांनी आपणास हे अशा प्रकारे सांगितले आहे की अधिकार-चेष्टा करू नका; म्हणजे अनाधिकाराने काहीही करू नये. असं पहा, की कोणीतरी माझ्याकडे येईल आणि मी मला विचारेल, ‘कोठे आहे ती अमुक व्यक्ती, ज्याचा मला खून करावयाचा आहे? मग सत्य काय आहे? मी त्याला सांगावे कां, ‘ठौक आहे, अगदी खरोखर, तो तिकडे लपला आहे, जा आणि त्याला मारून टाक!’ सरकारी कायद्याने ते एकवेळ बरोबर असेल ही! मला माहीत नाही, तसे आहे का? मला सरकारचे ‘कायदेकानून समजत नाहीत. ते तसं नसतं! मग त्याला काय सांगायला पाहिजे? आपण गप्प रहावे. त्याला काहीही अधिकार नाही! तुम्हाला विचारण्याचा किंवा तुमच्याकडून ती माहिती घेण्याचा त्याला अधिकार नाही! तुम्ही अगदी शांत बसा. मी तसेच करते. मग कदाचित तो तुम्हाला छळेल-काहीतरी करेल. तुम्ही फक्त सांगा, “मला काहीच माहीत नाही.’ अशी अनाधिकारी चेष्टा खूप वेळा अवलंबिली जाते. असे लोक की जे देशभक्त असतात, आपल्या देशासाठी लढत असतात आणि त्या लोकांना त्यांच्याकडून माहिती काढायची असते, त्यांचा छळ होतो. खूप छळ होतो. पण ते माहिती देत नाहीत. भीतीपोटी नाही तर त्यांच्याबरोबर लढणाऱ्या इतर देशभक्तांच्या प्रेमापोटी, बऱ्याचदा हे आपल्या देशात घडलेले आहे. तेव्हा इतर माणसांच्या अधिकारात जे आहे त्यासंबंधी आपण काही बोलू नये. त्याला अधिकार नव्हता मला प्रश्‍न विचारण्याचा. असा द्रदर्शीपणा तुमच्याकडे असायला पाहिजे.

  श्रीकृष्णांनी तो आपणास दिला आहे. त्यांच्यातील द्रदर्शींपणा. मला खूप लोक विचारतात, ‘माताजी, अशा या परिस्थितीत मी काय करावे? त्या परिस्थितीत मी काय करू?’ याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीने आपल्या विशुद्धी चक्रातील दूरदर्शींपणाची वाढ केली नाही. त्याने त्याचा विकास केला नाही. तो अजून त्या पद्धतीने परिपक्व झालेला नाही. अजूनही तो मला प्रश्‍न विचारण्याच्या स्थितीमध्येच आहे. निर्विकल्प स्थितीत तुम्हाला प्रश्‍न पडत नाही. तुम्हाला काय करावयास पाहिजे हे बरोबर कळते. कोणावर कधी ओरडावे, केव्हा गप्प बसावे, केव्हा शांत रहावे, कोणत्या वेळी किती बोलावे या गुणांचा विकास तुमच्यामध्ये योग्य अशा विशुद्धी चक्रामुळे होतो. कारण ते तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या हितासाठी करता. आपण शांत राहिल्याने कधीकधी आपला अधिकाधिक फायदा होतो. हे श्रीकृष्णांनी आपणास शिकविले. त्यांनी ते आपणास फक्त शिकविले असे नाही तर त्यांनी आपल्या विशुद्धी चक्रावरती दरदर्शीपणा प्रस्थापित केला. जगत्‌ नाट्य साक्षी स्वरूपात पाहण्यासाठी त्यांनी आपल्यामध्ये शक्ती घटीत केली. निर्लिप्तता! ते योगेश्वर होते, योग्यांचे ईश्वर! ज्यांनी आपल्यामध्ये योग घटित केला ते श्रीकृष्णच होते. हो हे स्वाभाविक आहे, की आपणास सदाशिवांना प्राप्त करायचे आहे. पण शिव प्राप्तीसाठी श्रीकृष्ण आपणास मदत करतात. ते श्रीकृष्ण, जे अकबर आहेत. तेच महालक्ष्मी तत्त्व आहे. तेच मध्यमार्ग आहेत. जे आपणास शिवापर्यंत घेऊन जातात. सर्व देवगण त्यांना प्रेरीत करीत आहेत. उत्क्रांती अवस्थेतील एक महान कार्य त्यांनी आपल्यासाठी कार्यान्वित केले आहे.  

म्हणजे आपले विशुद्धी चक्र संतुलनात असेल, तर सहजयोग्यांमध्ये द्रदर्शीपणा कसा विकसित करायचा हे आपणास नि:संदिग्धपणे समजते. आपण जे बोलतो ते लोकांना कसे ‘प्रिय’ वाटेल, लोक कसे प्रोत्साहित होतील, त्यांना ते प्रिय कसे होईल या संबंधी काही मार्ग आपण योजू शकतो. तो प्रेममय असेल आणि त्यांच्या हिताचाही , काही वेळा तुम्हाला कठोर बोलावे लागते किंवा तुमचे मौन इतरांना कठोर वाटत असेल, तर काही बिघडत नाही! शेवटी त्यांच्यासाठी ते हितावह असेल. अंतिम ध्येय हीत आहे. आपल्यामध्ये हीत प्रस्थापित करण्यामध्ये श्रीकृष्णाच्या मनात हेच होते. त्याचप्रमाणे त्यांची संहारक शक्ती, जी सर्वनाश करते, खूप लोक याबद्दल त्यांच्यावर टीका करतात. जसे हे जैन लोक!  

श्रीकृष्णांचा एक मामेभाऊ होता, नेमिनाथ. तो काही कृष्ण नव्हता, तो एक सर्वसामान्य माणूस होता. पण उत्क्रांतीमध्ये त्याने एक वरची पातळी मिळविली होती. प्राणीमात्रांच्या हत्येच्या तिटकाऱ्याची तौत्र भावना त्याच्या मनामध्ये बसली होती. अर्थात्‌ प्राणीमात्राची हत्या ही काही खूप चांगली गोष्ट नाही, पण तो काही स्वत: हत्या करीत नव्हता. तसं पाहिलं तर ती त्याच्या लग्नाचीच तयारी होती. प्राणीमात्रांच्या हत्येच्या तिटकाऱ्याची भावना त्याच्या मनामध्ये इतकी पक्की झाली होती, की त्याने खऱया जैन धर्मापासून एक वेगळी गोष्ट सुरू केली, एक वेगळा पंथ की ज्याच्यामध्ये प्राणीमात्राची हत्या वर्ज्य होती. हे इतके हास्यास्पद झाले आहे, की मानवापेक्षा ढेकणांना जास्त महत्त्व प्राप्त झाले. तसेच डासांना पण खूप महत्त्व प्राप्त झाले. या पंथाचे लोक आपले मुख आच्छादन करून रस्त्यावरून चालू लागले. मूर्ख गोष्टींचा अगदी कळस! म्हणून श्रीकृष्णांनी आपणास दरदर्शीपणा प्रदान केला. हे अतिशय महत्त्वाचे होते. कारण आपण जे विखुरलेले असतो, ते विखुरलेपण या द्रदर्शीपणाच्या देणगीमुळे निघून गेले.  

‘पण बऱ्याच लोकांचे विशुद्धी चक्र ठीक नसते. एकीकडे उजव्या बाजूचे विशुद्धी चक्र, जे अतिशय आक्रमक असते. यामुळे आपल्या बोलण्याने आपण इतरांवर वरचढपणा करतो, हावी होतो. पुष्कळशा राजकारणी लोकांमध्ये अशा प्रकारची शक्ती असते की ज्यांच्यामध्ये एखाद्या अमानवीय शक्तीने प्रवेश केला असेल. जसे की हिटलरच्या बाबतीत झाले होते. माणसाच्या मनावर कब्जा करणाऱ्या घाणेरड्या युक्त्या काही तिबेटमधील लामांनी शिकवल्या होत्या. हिटलरने अशा आत्म्यांचा त्याच्या लोकांच्या मनामध्ये शिरकाव करण्याची व्यवस्था केली होती की ज्यामुळे त्या लोकांनी हजारो, हजारो लोकांची हत्या केली.  

डावी विशुद्धी ही एक वेगळी समस्या आहे. अशा लोकांमध्ये सामुदायिकतेची भावना नसते. कारण ते सतत कोणालातरी घाबरलेले असतात. ते इतके नकारात्मक असतात की ते नेहमी समोरच्या व्यक्तीमधील फक्त नकारात्मक बाजूच पाहतात. मी अशी माणसे पाहिली आहेत की जी माझ्याकडे येतात आणि इतर ‘सहजयोग्यांबद्दल सांगतात की, ‘त्या सहजयोग्याचे ते चुकीचे आहे, या सहजयोग्याचे हे चुकीचे आहे.’ हे अतिशय चूक आहे. एकदेखील सकारात्मक गोष्ट नाही का? ते फक्त नकारात्मक गोष्टीच पाहतात. त्यामुळे ते सामुदायिक होऊ शकत नाहीत. ते सतत भीतीग्रस्त असतात. त्यांच्यात असे काहीतरी असते की ते त्यांना सतत घाबरवत असते. म्हणून नेहमी त्यांना इतरांची भीती वाटत असते. अपराधीपणाच्या भावनेने त्यांचे डावे विशुद्धी चक्र बाधाग्रस्त झालेले असते. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल, विशेषत: पाश्‍चिमात्य देशामध्ये – खरं तर ते अतिशय आक्रमक आहेत, असं मानतात – त्यांची डावी विशुद्धी भीषण असते. त्यांच्या करणीने त्यांच्यामध्ये मोठी अपराधी भावना आलेली असते. ते हे समजतात की लोक कसे वागतात, त्यांचा समाज कसा वागतो आणि त्यांच्या देशातील लोक कसे वागतात. एक अपराधी जाणीव त्यांच्यामध्ये नेहमी बसलेली असते. याशिवाय ब्रायन म्हणाल्याप्रमाणे मूळं कापलेली असतात. खरंच मूळं कापलेली असतात, त्यामुळे परमेश्वराच्या विरोधात ते वागतात आणि हे अत्यंत चुकीचे आहे, हे ही त्यांच्या लक्षात येत नाही; हे खरं आहे. ‘आपण चुकीच्या गोष्टी करतो’, या गोष्टीचे ज्ञान असूनही ते चुकीच्या गोष्टी करतात. त्यामुळे डाव्या विशुद्धी चक्रावर अपराधीपणाची ‘पकड येते. त्यांच्या सुप्त अवस्थेतील मनामध्ये त्याची सद्सद्विवेक बुद्धी कार्यान्वित होते आणि तुम्ही कितीही नाही म्हणाला तरी अपराधीपणाची भावना मनात साचत राहते. त्यामुळे डाव्या विशुद्धी चक्रावर बाधा येते. त्यावेळी असं म्हटलं पाहिजे की, ‘माताजी, मी अपराधी नाही.’ डाव्या विशुद्धी चक्रावर अहंकाराच्या प्रतिक्रियेने स्वत:स लपविलेले असते. ही अहंकाराची एक वेगळी बाजू आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अपराधीपणाची भावना आलेली असते. ‘मी तसं करायला नको होतं. मी तसं वागायला नको होतं,’ अशाप्रकारच्या दोन्ही प्रवृत्ती चुकीच्या आहेत. जेव्हा तुम्ही डाव्या बाजूवर असता, त्यावेळी तुम्ही स्वत:वर चिडता, स्वत:चा छळ करता आणि जेव्हा तुम्ही उजव्या बाजूवर असता तेव्हा तुम्ही इतरांना छळता, इतरांवर रागावता, म्हणून मध्यनाडीवर राहणे तेव्हाच शक्‍य होते, जेव्हा तुमचे विशुद्धी चक्र संतुलनात असते, अन्यथा नाही.

  आपल्या दोन्ही तळहातांवर सारख्या प्रमाणात चैतन्य लहरींची अनुभूती आत्मजागृतीनंतर ही काही लोकांना येत नाही हे तुम्ही पाहिले असेल. त्याचे कारण म्हणजे त्यांच्यात संतुलन नसते. हाताद्वारे समजते की त्यांच्यामध्ये संतुलन नाही. सहजयोगात आल्यावर मनुष्याचे दोन्ही हात अतिशय महत्त्वाचे ठरले आहेत. तुमच्या दोन्ही हातांमध्ये सारख्या प्रमाणात चैतन्य लहरींची अनुभूती येत नसेल तर तुमच्यात काहीतरी चुकीचे घडले आहे. तुमच्यात कोणत्या बाजूवर चैतन्य लहरी जाणवत नाहीत, म्हणजे असं पहा, की तुमच्या उजव्या बाजूवरती चैतन्य लहरींची जाणीव होत नाही किंवा तुम्हाला उजव्या बाजूला जडत्व जाणवत असेल, उजवी बाजू जास्त गरम झाली असेल तर तुम्ही खात्रीपूर्वक उजव्या बाजूचे (राईट साइडेड) व्यक्ती आहात. अशा बाबतीत डावी बाजू अगदीच संवेदन शून्य असेल.  

परंतु डाव्या हातावर चैतन्य लहरींची अनुभूती चांगली असेल आणि उजव्या बाजूला काहीही चैतन्य लहरी जाणवत नसतील, तर त्याचा अर्थ तुम्ही उजव्या बाजूच्या व्यक्ती आहात. तुम्ही डाव्या बाजूचे नाहीत, पण दुसऱ्या बाजूने विचार करता, हेच उलट असेल तर, तुम्ही डाव्या बाजूच्या (लेफ्ट साईडेड) व्यक्ती असता. याचा अर्थ असा की संतुलनात नसता. तुमच्या हातावरती संतुलनाची जाणीव व्हायला पाहिजे. हे माहीत असायला पाहिजे ‘की सहजयोगात फक्त विचार करून, तुम्हाला होणाऱ्या त्रासाचे निराकरण होत नाही. त्याकरिता तुमच्या हातांनी त्यावर कार्य करणे आवश्यक आहे. मी जसं तुम्हाला सांगते की, फक्त विचार करून तुम्ही तुमची गाडी चालवू शकत नाही. तुम्हाला तुमच्या हातांचा उपयोग करता आला पाहिजे. पूर्ण सहजयोगाच्या ज्ञानानेच तुमच्या हाताचा उपयोग करून, तुम्ही ध्यानाच्या कोणत्या पायरीवर आहात, कोणत्या स्थितीमध्ये आहात आणि चैतन्य अनुभूती म्हणजे काय हे समजायला पाहिजे. तुमच्या हातांचा उपयोग करा. तुमच्या हातावरती चैतन्य लहरी पाहून तुम्ही नित्याच्या व्यवहारातील कामे करता, तेव्हा इतर लोक म्हणतील, हे लोक वेडे झाले आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी ‘हातावरती चैतन्य लहरी पाहताहेत’. अशा प्रकारे त्यांना हे ही जाणवेल की मोहम्मद साहेबांनी असाच हाताचा उपयोग करण्यास सांगितले होते, पण लोक त्यांना त्यावेळी हसले होते. आज कोणालाही त्याची लाज वाटत नाही. कोणी कोणास हसत नाहीत, अगदी मशिनप्रमाणे, यांत्रिक पद्धतीने ते हातांचा उपयोग करताहेत. जरी मोहम्मद साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नसला तरी. 

म्हणून प्रथम तुमच्या हातांचा उपयोग तुमच्या सर्व हेतुपूर्तीसाठी करा. तुमच्यासाठी करा. हेच हात तुम्हाला मदत करू शकतील. आता कुंडलिनी जागृत झालेली आहे. सर्व चक्रांमधून तिचे कमी अधिक प्रमाणात का होईना भ्रमण सुरू आहे. हे सर्व घडते आहे. म्हणून कुंडलिनीचे उत्थापन जास्तीत जास्त करा. तुमच्या हाताने तुम्ही ते करू शकता. ते एक वर्तुळ आहे. ज्यावेळी कुंडलिनी तुमच्या हाताने वरती उचलता, त्यावेळी तुमच्या हातातून अधिकाधिक चैतन्य लहरी प्रवाहित होतात. फक्त तुमचे हातच कुंडलिनी चढवू शकतात. तुम्ही स्वतःला बंधने घेतांना किंवा कुंडली चढवतांना तुमच्या हातामधून चैतन्य प्रसारित होते. या सर्व क्रिया काळजीपूर्वक शिकून घ्या. तुमचे हात अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमच्या हातामधून चैतन्य लहरी वाहत नसतील तर तुम्हाला त्याची काळजी करावयास हवी. सुरुवातीपासूनच तुमच्या हातामधून चैतन्य लहरींची अनुभूती व्हायला हवी. पूर्वजन्मातील दोषामुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे तुम्हाला हातामध्ये काही समस्या सतावत असतील, तर त्या त्या चक्राच्या हातावरील स्थानामध्ये त्याची जाणीव होईल. त्यानंतर काही वेळाने तुमच्या चक्रांची जाणीव तुम्हाला सहसारावर होईल. काही हरकत नाही. त्यामुळे तुम्ही काहीसे अस्वस्थ वगैरे होण्याचे काही कारण नाही. सर्व काही ठीक करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मग चक्रांची काळजी करण्याचे काही कारण नाही. काळजीचे काहीच कारण नाही. तुम्ही म्हणाल, ‘अरे, हे एवढचं का! छान!’ तुम्हाला ती जाणीव होते. ही जाणीवसुद्धा विशुद्धी चक्रातून येते. आपण फक्त अनुभवतो. फक्त अनुभवतो.  

विशुद्धि चक्राचे अत्यंत महत्त्वाचे कार्य हे आहे की ते शुद्ध आणि निर्मळ असले पाहिजे. सर्व मंत्र म्हणण्यासाठी विशुद्धी चक्राच्या शुद्धतेचीच मदत होते. जेव्हा एखादा गुरू मंत्र देतो तेव्हा प्रथम त्याच्या डाव्या विशुद्धी चक्रावर काही दोष आहे का, इतर कोणत्या चक्रावर आघात झाला आहे, हे तुम्ही पाहिले पाहिजे, पण प्रथम आहे ती डाव्या विशुद्धी चक्राची बाधा. त्याच्याकरीता आपण मंत्रसिद्धीचा मंत्र म्हणावा. ही मंत्रसिद्धी अशा व्यक्तीस प्राप्त होते ज्याचे डावे विशुद्धी चक्र शुद्ध आहे. अन्यथा त्या व्यक्तीकडून मंत्रसिद्धी होऊ शकत नाही. जे काही मंत्र ते म्हणतील ते फक्त यंत्रवत असतील. मंत्र योग्य पद्धतीने म्हणण्यासाठी आणि परिणामस्वरूप ते सिद्ध मंत्र होण्यासाठी तुमची विशुद्धी चांगली असली पाहिजे. जर तुमचे डावे विशुद्धी चक्र ठीक नसेल, तर ‘अल्लाह- ‘हो-अकबर’ हा मंत्र म्हणण्याला सुद्धा काही अर्थ नसतो.  

म्हणून तुम्ही असं पहा, की सहजयोगामध्ये चैतन्याच्या अनुभूतीसाठी डावे आणि उजवे विशुद्धी चक्र किती महत्त्वाचे आहे. म्हणून सहजयोगामध्ये विशुद्धी चक्राचा विशेष महत्त्वाचा सहभाग आणि भूमिका आहे. कारण या चक्रामुळे आपण विराटाशी, सर्वेसर्वा शक्तीशी जोडले जातो. मग तुम्ही अशा मुद्यावर येता की हे सर्व विशुद्धी चक्रामुळे घडते. ‘पूर्ण अकबर’ आपणास कळतो. तुम्ही त्याच्याशी जोडले जाता. विशुद्धी चक्रामुळे ही एकरूपता प्रस्थापित होते आणि तुम्हाला त्याची अनुभूती येते. परमेश्वरी चैतन्याची अनुभूती होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या हातांची संवेदनशीलता, मग हे विशुद्ध चक्र शुद्ध कसे ठेवायचे ही समस्या आहे. …… मला असं सांगण्यात आले आहे की, विशुद्धी चक्रावरील हे भाषण मी संपवावे आणि आता निघावे, पण मला असं वाटतं की, विशुद्धी चक्रावरील हे विवेचन आजच संपवावे.  

आपले विशुद्धी चक्र संतुलनात ठेवण्यासाठी आपणास काय करावयास पाहिजे? तुम्ही लोणी खायला पाहिजे. कारण त्यात प्रामुख्याने अ व ड जीवनसत्व आहेत. जीवनसत्व ड. क्षमा करा. त्यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शियम मिळून त्याची वाढ होते. तुम्ही एक शक्तिशाली माणूस बनता. तुम्ही लोणी न घेता फक्त कॅल्शियम घेतले तर समस्या निर्माण होतात. शरीरिक दृष्ट्या बघता विशुद्धी चक्राच्या तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही लोणी खावे. मी तुम्हाला हे सांगते, गरम पाण्यामध्ये थोडेसे लोणी घ्या. त्या पाण्यामध्ये ते विरघळून घ्या आणि प्या. विशुद्धी चक्र आपल्याला आवश्यक असलेल्या थंड प्रवृत्तीची काळजी घेते. थंड प्रकृती. जेव्हा यकृतामध्ये उष्णता होते, तेव्हा ती सर्व शरीरात पसरते. ही उष्णता थंड करण्याचे एकमेव चक्र म्हणजे विशुद्धी चक्र आणि जर आतमधील इपिथिलाईल सेल्स कोरडे करण्याची, त्याच्या लायनिंगची काही समस्या उद्‌भवत असल्यास पाण्याबरोबर लोणी खावे किंवा नुसतेच लोणी उन्हाळ्याच्या दिवसात खावे. पण त्यासोबत कर्बोदके घेऊ नका. कर्बोदके नकोत. त्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही. हवे तितके लोणी खा. तुमचे वजन वाढणार नाही. तुम्ही कर्बोदके घेणे पूर्णपणे बंद केलेत तर तुमचा आहार हा सात्त्विक आहार होईल. कर्बोदकांना स्पर्शही करू नका आणि मग पहा, तुम्हाला आश्‍चर्य वाटेल की तुम्हाला कसा सात्त्विक आहार मिळाला आहे. लोणी व प्रथिने घ्या. सर्व चरबीयुक्त पदार्थ, साय (क्रीम), प्रत्येक गोष्ट घ्या, तुम्हाला त्याचा काहीही त्रास होणार नाही. प्रथिनांसाठी सर्व सुका मेवा (फळे) घ्या आणि सर्वच वस्तू खा. गोडासाठी मध घ्या, पण कर्बोदके घेऊ नका. आजकाल मध साखरेपासून बनवतात हे तुम्हाला माहीत आहे. जर तुम्ही कर्बोदके टाळलीत आणि ह्या अशा गोष्टी घेतल्या तर तुमची प्रकृती चांगली राहील, पण आपण धीराने घ्यायला पाहिजे. आपल्यामध्ये सर्वप्रकारचे असंतुलन असते. म्हणून मी सांगते, ‘तुम्हाला यकृताची समस्या आहे, तर साखर खा. पण जर तुम्ही असेच साखर खाणे बंद केले असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. तुम्हाला प्रथम यकृत ठीक करावे लागेल. त्यानंतर साखर खाणे बंद केले तर चालेल. काही होणार नाही. पण तत्पूर्वी नको. सर्व डॉक्टर्स साधारणपणे सांगतात, की साखर खाऊ नका.चरबी शरीरातून बाहेर पडते, तेव्हा शरीर सुडौल, मुलायम होते. चरबी शरीरात टिकून राहत नाही. कर्बोदकांच्या अभावामुळे शरीरात चरबी टिकून राहणे शक्‍य नसते.  

तुम्ही हे घरी करू शकता की थोडे लोणी घ्या, ते दोन्ही हातावर चोळा. ठीक आहे? आता हात धुऊन टाका. लोणी धुतले जाणार नाही. ते हाताला चिकटून राहील. लोणी असे धुतले जाणार नाही. पण जर काही पिष्टमय पदार्थाचा, जसे की पीठ, उपयोग केला तर मग हातावरून लोणी धुतले जाईल. त्यामध्ये विरघळून जाईल. जर कर्बोदकाचा उपयोग केला नाही तर लोणी विरघळले जाणार नाही. पण हे त्या लोकांसाठी आहे, ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे असंतुलन नसते. जे पूर्णपणे संतुलनात आहेत, ते लोक हे करू शकतात. मी करू शकते, पण मला कोणी करू देत नाही. सर्वजण माझा उपयोग करतात, जसा काही मी कचऱ्याचा डब्बा आहे. मला फक्त जेवण भरवण्यासाठी करतात. मी खाल्ले नाही तर… अस पहा, आपल्या आईला काही हलकं-फुलकं थोडसं खायला द्या. पण मी असे लोक पाहिले आहेत ते जर मला वाढत असतील, तर ते खूपच वाढतात आणि मी थोडसच खाल्लं तर म्हणतील, ‘काय हे, श्रीमाताजी किती थोडं… !’ खरं तर मला त्याचीही आवश्यकता नसते. लोकांनी माझा स्वभाव समजून घेतला पाहिजे. जेव्हा मला ते जेवण वाढतात, तेव्हा ते इतकं जास्त वाढतात, की मी ते खाऊच शकत नाही. मी खूप कमी जेवते. मला थोडसंच चालतं. मला कर्बोदके खाण्याची आवश्यकता नाही. खरंच नसते. मला कर्बोदकांची गरज नाही, पण ‘माताजी, मी हे बनवले आहे आपल्यासाठी, माताजी, मी हे लाडू बनवले आहेत. आपण खावेत. आई हे मी…’ मग मी म्हणते, ‘ठीक आहे, आण बाबा. तुमच्या आनंदासाठी मला त्रास झाला तरी चालेल.’ प्रियम!  

इतकी साधी गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे की, तुम्ही मला आग्रह करू नका! आग्रह करण्याची खरच ‘काहीही आवश्यकता नाही. कोणालाही खाण्याचा आग्रह करू नका. मला माहीत असते, की मी ज्यांना आग्रह करते, त्यांना त्याची आवश्यकता असते. ‘पण तुम्ही आग्रह करू शकत नाही. कारण तुमच्याकडे तसा द्रदर्शीपणा नाही. जर तुम्हाला माहीत असेल, की कोणाला आग्रह करायचा आणि कोणाला नाही, तर मग ठीक आहे. पण ज्यावेळी आग्रह करता, त्यावेळी ते अन्न चेतन्यित केले आहे का हे पाहिले पाहिजे. जर ते अन्न चैतन्यित नसेल आणि असे अन्न खाण्याचा तुम्ही आग्रह करीत असाल, तर ते खाणाऱ्या माणसाला त्याचा त्रास होईल.  

तुम्हा सर्वांना जर विशुद्धी चक्राचे महत्त्व समजून घ्यायचे असेल, तर प्रथमत: तुम्ही जे काही बोलाल ते  सहजयोगाविषयीचेच असायला पाहिजे. इतर कशाबद्दल नाही. जर तुम्हाला कोठे लेक्चर द्यायचे असेल – मला आधीच माहीत होते, की पुष्कळसे सहजयोगी हे कोणत्या ना कोणत्या संस्थेशी जोडलेले होते. या संस्थेचा सदस्य, त्या संस्थेचा सदस्य आणि अशा काही भयंकर संस्थांचे सदस्य की ज्या परमेश्वर विरोधी आहेत. उदाहणार्थ हरे रामा हरे कृष्णा. जे ख्रिस्त विरोधी आहेत. बाह्यत: ते ख्रिस्ताच्या विरोधातले आहेत आणि अंतरंगात ते कृष्ण विरोधी आहेत, पूर्णत: श्रीकृष्णांच्या विरोधात. जो कोणी तिथे जातो आणि परमेश्वराच्या नावाने याचना करतो, त्याचे विशुद्धी चक्र प्रचंड बिघडलेले असते. विशुद्धी चक्र बिघडण्याचे अनेक त्रास त्यांना भोगावे लागतात – जसे की कॅन्सर! असं बरंच काही आणि त्यातच ते मृत्यू पावतात.  

ज्या व्यक्तीचे विशुद्धी चक्र चांगले आहे. त्यांचा चेहण टवटवीत, पूर्णपणे उजळलेला असतो, जसा की पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आणि जर तुमचे विशुद्धी चक्र ठीक नसेल, तर तुमचा चेहरा कोमेजलेला असतो. जर विशुद्धी चक्राचे कार्य अत्युत्तम असेल, तर तुमची कांती नितळ असते. चेहरा ताजा आणि चमकदार दिसतो. डोळ्यातसुद्धा चमक असते. कारण विशुद्धी चक्र डोळ्यांचीसुद्धा काळजी घेते. ते मानेची काळजी घेते, ते कानाची काळजी घेते, ते नाकाची काळजी घेते. जर विशुद्धी चक्र खराब झाले असेल, तर तुम्हाला नाक-कान-घसा यांच्या समस्या सतावत असतात. जर एखाद्या व्यक्तीला या समस्या असतील तर आपण म्हणू शकतो, की तो माणूस त्या अमूक “एखाद्या संघटनेचा नेता असावा. त्यांना असं वाटतं की ते ‘हरे रामा हरे कृष्णा’ असं बोलताहेत. पण खरं तर ते पूर्ण विरोधी पूर्णपणे कृष्ण लीलेच्या विरोधी काम करताहेत. अगदी ठामपणे. श्रीकृष्णाचे नांव अशाप्रकारे वेड्यासारखे, सर्व लोकांसमोर उभे राहन अशा भयंकर वेषात – धोतर व कुडता की जे त्यांनी अगदी चमत्कारीक असे तयार केले आहेत – त्यांना हे ही माहीत नाही की ते कसे नेसावेत. त्या स्रियांनी कशा साड्या नेसल्यात! पुरुषांनी विकत घेतलेले धोतर आपल्या हजामत केलेल्या डोक्‍यावर बांधले. श्रीकृष्णाने कधी डोक्यावरचे केस काढले होते कां? कधी केस काढले होते कां ? श्रीकृष्णाने आपल्याला दिलेली भेट म्हणजेच त्यांचे केस आहेत. खरे तर श्रीकृष्णाच्या केसांचे वर्णन नेहमीच कवितेमध्ये केलेले आहे.  

एक गोष्ट आहे, एका उर्दू कवीची, जो भारतीय होता. खरं तर हिंदू होता, पण उर्दू कवी आणि काही फाजील लोकांनी त्याला आवाहन केले…. यमकाची एक ओळ सांगितली आणि दुसरी ओळ पूर्ण करण्याचे आव्हान दिले. तो म्हणाला, ‘……’ त्याप्रमाणे त्याने ती ओळ अशी पूर्ण केली,     

 कित्येक कवितांमध्ये श्रीकृष्णांच्या केसांचे वर्णण आलेले आहे. येथे ते हजामत करून धोतर आपल्या डोक्‍यावर बांधून फिरताहेत. श्रीकृष्णाचे आपल्या डोक्यावरचे केस कधी कापले होते कां ? त्यांनी डोक्याची पूर्ण हजामत केली होती कां? ते योगेश्वर होते. त्यांच्या सोळा हजार पत्नी होत्या. त्यावेळी श्रीकृष्णांच्या बरोबर सर्व गोष्टी कार्यान्वित करण्यासाठी सहजयोगी नव्हते, म्हणून त्यांनी त्या शक्‍त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले. त्या सर्व त्यांच्यामधीलच योगिनी होत्या. त्यांनी ते सर्व नाटक रचले. त्या शक्‍त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. कारण एखाद्या पुरुषाने स्रीला, शिष्या म्हणून स्वीकारले, तर स्वाभाविकपणे सर्वजण त्या पुरुषाला दोष देतात. ‘पुरुषा*ला ‘स्री’ शक्ती म्हणून त्याचेबरोबर हवी असते. स्त्री सदासर्वदा शक्तीच असते. म्हणून त्या श्रीकृष्णांच्या पत्नी बनून आल्या आणि श्रीकृष्ण सोळा हजार शक्‍त्या आणि पाच राण्यांचे पती बनले. त्या पाच राण्या म्हणजे पंचतत्त्वे. त्यांनी सर्व लीला केल्या. त्यांनी सृजन केले…. तुम्हाला श्रीकृष्णांबद्दल कसे कळणार ? त्यांना समजण्यासाठी तुम्ही किती खोलवर जाऊ शकता, म्हणून हे लोक क्षणोक्षणी श्रीकृष्णाचा धावा करतात. प्रत्येक क्षणाला रस्त्यावर उभे राहून त्यांच्या नावाने याचना करतात. प्रत्येक ठिकाणी भिकाऱ्याप्रमाणे भीक मागत फिरतात. श्रीकृष्ण कधीही भीक मागत नव्हते. कधीही नाही. या भिकाऱ्यांची निर्मिती परमेश्वराच्या नावावर होते. मला असं वाटतं की परमेश्वराच्या नावाने भीक मागणे हे प्रचंड पाप आहे. परमेश्वराच्या मंदिरासमोर मी हे सर्व घडतांना पाहिले आहे. माझ्या मनात विचार येत असे की, परमेश्वराच्या मंदिरात, परमेश्वरासमोर उभे राहून ते भीक मागताहेत. फकीर ‘होणे म्हणजेच भीक मागणं! हे सर्व काय आहे? हे लक्षण समृद्धीचे आहे का? श्रीकृष्ण बादशहा होते. योगेश्वर… आणि हे भिकारी, श्रीकृष्णाचे अनुयायी ? महाभयंकर. ते किती दयनीय दिसतात. अगदी कोबीसारखे आणि सर्वांचा असा विश्‍वास आहे की ते सर्व शांत आहेत.  

स्वाभाविक आहे, जर कोणी स्मशानात रहात असेल, तर तो शांतच असणार, अगदी मृतावस्थेत! आणि आमचा देश जो एक गरीब देश आहे, जो या भिकाऱ्यांना पोसतो आहे. या देशातील श्रीमंत लोकांनी त्यांना पैसा आणि जमीन दिली. हे लामा आणि हे पाश्चिमात्य देशातील भयंकर लोक, जे तिकडून इकडे आले आहेत, त्यांना अशा प्रकारे मदत करण्याचा हा काय उपाय आहे? हे लोक काही काम करीत नाहीत. खूप छान! इथे येतात, ‘हरे रामा हरे कृष्णा’ म्हणतात आणि गीता वाचतात. गीतेमधील काही श्लोक पाठ म्हणून दाखवितात आणि पैसे कमवतात. छानपैकी पैसे कमावतात. खेड्यापाड्यात जायचे, एकदोन ठिकाणी थांबायचे आणि भीक मागायची. तुमचा यावर विश्‍वास बसेल? आणि आमच्या सरकारला त्याची काहीच पर्वा नाही. हे कोण आहेत? ते इकडे का आले आहेत? परमेश्वराच्या नांवावर ते अशाप्रकारे इथे भीक का मागताहेत? जेव्हा की आपल्या देशामध्ये आधीच इतके सर्व भिकारी परमेश्वराच्या नावावरती भीक मागत असताना, मग या असल्या भयंकर लोकांना ‘मदत करण्यापेक्षा का नाही त्यांना एकत्र करीत आणि त्यांना मदत करत?  

हे लोक परमेश्वर विरोधी आणि श्रीकृष्णांच्या विरोधात कार्य करीत आहेत. ज्यावेळी तुम्ही असे परमेश्वराचे व्यर्थ नाव घेता, तेव्हा तुमच्या विशुद्धीवर बाधा येते. मला असे लोक माहीत आहेत, की बसून वाहे गुरू, वाहे गुरू, वाहे गुरू म्हणत असतात. हे असे आहे कां, नानक साहेब इतके स्वस्त आहेत की त्यांचे नांव असे घेत बसावे, वाहे गुरू, वाहे गुरू, वाहे गुरू! सदासर्वकाळ हातामध्ये जपमाळ घेऊन परमेश्वराचे नाम जपण्याचे, हे सर्व काय चालले आहे? परमेश्वर कोण आहे? तो काय तुमच्या खिशात आहे का? तो असा कवडीमोल आहे. का, की तुम्हाला तो स्वस्तात मिळेल? का, का तुमचे विशुद्धी चक्र असे खराब करीत आहात? सर्वांना हे समजायला हवं! त्यावेळी तुम्हाला खूप आश्‍चर्य वाटले! तुम्ही असे विशुद्धी चक्र खराब करून घेता. आत्मसाक्षात्कार प्राप्तीच्या मार्गातील हे महत्त्वाचे चक्र खराब करता. या अथांगाशी जर तुम्हाला एकरूपता साधायची असेल, तर तुमचे चक्र निर्मळ असावयास पाहिजे.  

या दिवसात सर्दी होते. कारण भारतामध्ये आणि इतरत्रसुद्धा या स्त्रिया आपले शरीर पूर्णपणे झाकत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की आपण फॅशनेबल आहोत हे त्यामुळे इतरांना दिसणार नाही किंवा असंच काही तरी! तसेच अत्यंत अपुरे, तोकडे कपडे वापरण्याची अत्याधुनिक नवीनच एक प्रथा सुरू झाली आहे. दोन्ही बाजूनेही ते परमेश्‍वर विरोधी आहे. सर्वप्रथम म्हणजे शरीराचे प्रदर्शन हे मूर्खपणाचे लक्षण आहे. म्हणूनच मोहम्मद साहेबांनी विशुद्धी चक्राबाबत खूप सांगितले आहे. जसं की स्त्रियांनी त्यांचे शरीर पूर्णपणे झाकले पाहिजे. मी कधी कधी विचार करते, की ती एक चांगली गोष्ट आहे. फॅशनचा मूर्खपणा आजकाल इतका वाढला आहे, की काही काळानंतर तुम्ही पहाल, हे सर्व फॅशन करणारे मच्छर कपड्याशिवाय अवतीभोवती फिरू लागतील. हा अगदी कळस असेल. हे अशा व्यक्तीचे लक्षण असते, की ती व्यक्ती ‘तो’ नसतो किंवा ‘ती’ नसते. ती व्यक्ती ‘ते’ असतात. ‘ते’ लाक नेहमीच असे वागतात. ‘ते’ जे कोणी असतात, त्यांची काही लक्षणं असतात. म्हणून रजनीश : जेव्हा लोक त्यांच्याकडे जातात, तेव्हा हे लोक ‘ते’ बनतात. कारण त्यांच्यामध्ये अशाप्रकारे आकर्षित करण्याची शक्ती असते. कारण त्यांच्यामध्ये लाज-लज्जा, शरम जरासुद्धा उरलेली नसते. हे सर्व असे आहे.  

म्हणून आपल्या विशुद्धी चक्राची आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, हे समजून घेतले पाहिजे. फॅशन आणि इतर गोष्टी इतक्या महत्त्वाच्या नाहीत. महत्त्वाचे आहे, ते म्हणजे तुमची तब्येत. तुम्ही तुमची विशुद्धी खराब केलीत तर फार चुकीचे होईल. म्हणून प्रत्येकाने आपल्या विशुद्धी चक्राची काळजी नेहमी घेतली पाहिजे. तुम्ही सवांनी आपल्या आणि दुसर्‍याच्या विशुद्धी चक्राची काळजी घेण्याचा प्रयत्न नेहमी करावयास पाहिजे.  

हा मंडप येथे घातलेला मला पसंत नव्हता. मी संयोजकांना तसे सांगितले. तर ते म्हणाले की, ‘आपणच म्हणालात की तो बाहेर मोकळ्या जागेवर असावा.’ आता मी असं म्हणत नाही की तुम्ही हिमालयावर जा. तुमचा द्रदर्शीपणा तुम्ही वापरायला पाहिजे. ही एक गोष्ट हरवली आहे. तुमच्याकडे तारतम्य हवे. अशा थंडीत लोकांना असं मोकळ्या जागेत बसण्याची व्यवस्था करणं – मला माहीत आहे, की तुम्ही चांगले साधक आहात. जे लोक सामूहिकतेसाठी कार्य करतात त्यांना हे कळायला हवे की लोकांच्या घशाचे रक्षण, विशुद्धी चक्राचे रक्षण होईल अशी व्यवस्था करायला पाहिजे. हे फारच महत्त्वाचे आहे. अतिशय महत्त्वाचे! आणि तुम्हाला सर्वांना हे माहीत आहे, की मी तुमच्या विशुद्धी चक्राची किती काळजी घेते. प्रत्येकाच्या विशुद्धी चक्राची. कारण मला हे माहीत आहे की ते किती महत्त्वाचे आहे. कारण अशी काळजी घेतली नाही तर तुम्ही सर्वजण विखुरले जाल आणि कुंडलिनीचे सर्व कार्य वाया जाईल आणि माता कुंडलिनीला त्याचा त्रास होईल. म्हणून सर्वांनी आपले विशुद्धी चक्क स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्यावी. आपण स्वत:ला योग्यप्रकारे स्वच्छ ठेवणे, रोज सकाळी आपला घसा साफ करणे, त्याकरिता खळखळून गुळण्या करणे इत्यादी प्रकारे विशुद्धी चक्राची काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला हे ऐहिक सुखाचे वाटेल, पण आईकरिता या ऐहिक सुखाच्या गोष्टीसुद्धा आध्यात्मिक सुखाच्या गोष्टीइतक्याच महत्त्वाच्या असतात. शुद्ध विशुद्धी चक्राशिवाय सहजयोगात येण्याचा काय उपयोग ? म्हणून कृपा करून तुमच्या विशुद्धी चक्राची काळजी घ्या. तिथे योगेश्‍्वराला प्रस्थापित करा. श्रीकृष्णांना तिथे पहा. त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हे समजून घ्या, की परमेश्वराने रचलेले नाटक साक्षीभावाने पाहण्यास आलेले आहात आणि श्रीकृष्णांची बासरी, की जिथे मंजूळ स्वर तुमच्या गळ्यातून बाहेर पडताहेत.  तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद!