Devi Puja Rahuri (India)

Devi Puja 26th January 1984 Date: Place Rahuri Type Puja राहरीबद्दल ह्यांना मी सांगितलं नाही, की राहरीचं काय महात्म्य आहे. राहरीमध्ये शालिवाहनांचं राज्य राहिलं. आदि काळामध्ये इथे एक राहर म्हणून राक्षस होता. फार दष्ट आणि तो लोकांना छळत असे. आणि त्याच उच्चाटन करण्यासाठी देवीने अवतार घेतला आणि तिने त्या राहुला ह्या राहरीमध्ये मारलं. ‘री’ शब्दाचा अर्थ होतो, ‘री’ म्हणजे महालक्ष्मी स्वरूप. महालक्ष्मी स्वरूपाने मारलं. म्हणून, आपण असं देवी महात्म्य असं वाचत नाही. कारण देवीमध्ये फक्त महाकालीचं वर्णन आहे. राहुला मुसळवाडीमध्ये मुसळाने मारलं. तरी तो पळत होता. नंतर ओरडला. म्हणून त्या गावाला आरडगाव म्हणतात. मग तो इथे येऊन धाराशाही झाला. मेला इथे म्हणून राहुरीचं महात्म्य आहे. पण त्याचं किती लांबलचक आहे ते बघितलं पाहिजे, कि आज इतक्या वर्षानंतर, हजारो वर्षानंतर शालीवाहनांचे बभ्रूवाहन राज्य करत असतांना त्यांनी विक्रमादित्याला हरवलं. विक्रमादित्य हा एक उज्जैनचा राजा होता. त्याचं स्वत: च एक पंचांग होतं . कॅलेंडर होतं. त्यांनी आपलं एक कॅलेंडर सुरू केलं. त्याचं नाव शालिवाहन. शक त्यांनी सुरू केलं आणि त्या शालिवाहन शकाप्रमाणे १९८८ का काहीतरी वर्षे झालेली आहेत. (थोडे इंग्लिश, नंतर मराठी सुरू) तर ह्यांना मी असं सांगत होते की शालिवाहनाचं जे कॅलेंडर होतं, ते त्यांनी केल्यानंतर मग त्यांनी जे राज्य स्थापन केलं, आणि सुरू त्याच्यात राहिले ते गुढीपाडवा, तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. ह्यांना मी इंग्लिशमध्ये सांगितलं. आपल्याकडे गुढीपाडवा म्हणजे ती शाल, जी शाल ते वाहत असत म्हणून त्याला शालिवाहन देवीची शाल आणि ह्या देवीच्या शॉलमध्ये काय असतं, तुम्हाला माहिती आहे, की त्या शालीने तिला सौंदर्य येतं. आणि त्याशिवाय ती त्याने आपल्या अंगाचं रक्षण करते. म्हणजे थंडीवार्यापासून रक्षण करते. तिच्या Read More …