Devi Puja

Rahuri (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Devi Puja 26th January 1984 Date: Place Rahuri Type Puja

राहरीबद्दल ह्यांना मी सांगितलं नाही, की राहरीचं काय महात्म्य आहे. राहरीमध्ये शालिवाहनांचं राज्य राहिलं. आदि काळामध्ये इथे एक राहर म्हणून राक्षस होता. फार दष्ट आणि तो लोकांना छळत असे. आणि त्याच उच्चाटन करण्यासाठी देवीने अवतार घेतला आणि तिने त्या राहुला ह्या राहरीमध्ये मारलं. ‘री’ शब्दाचा अर्थ होतो, ‘री’ म्हणजे महालक्ष्मी स्वरूप. महालक्ष्मी स्वरूपाने मारलं. म्हणून, आपण असं देवी महात्म्य असं वाचत नाही. कारण देवीमध्ये फक्त महाकालीचं वर्णन आहे. राहुला मुसळवाडीमध्ये मुसळाने मारलं. तरी तो पळत होता. नंतर ओरडला. म्हणून त्या गावाला आरडगाव म्हणतात. मग तो इथे येऊन धाराशाही झाला. मेला इथे म्हणून राहुरीचं महात्म्य आहे. पण त्याचं किती लांबलचक आहे ते बघितलं पाहिजे, कि आज इतक्या वर्षानंतर, हजारो वर्षानंतर शालीवाहनांचे बभ्रूवाहन राज्य करत असतांना त्यांनी विक्रमादित्याला हरवलं. विक्रमादित्य हा एक उज्जैनचा राजा होता. त्याचं स्वत: च एक पंचांग होतं . कॅलेंडर होतं. त्यांनी आपलं एक कॅलेंडर सुरू केलं. त्याचं नाव शालिवाहन. शक त्यांनी सुरू केलं आणि त्या शालिवाहन शकाप्रमाणे १९८८ का काहीतरी वर्षे झालेली आहेत. (थोडे इंग्लिश, नंतर मराठी सुरू) तर ह्यांना मी असं सांगत होते की शालिवाहनाचं जे कॅलेंडर होतं, ते त्यांनी केल्यानंतर मग त्यांनी जे राज्य स्थापन केलं, आणि सुरू त्याच्यात राहिले ते गुढीपाडवा, तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. ह्यांना मी इंग्लिशमध्ये सांगितलं. आपल्याकडे गुढीपाडवा म्हणजे ती शाल, जी शाल ते वाहत असत म्हणून त्याला शालिवाहन देवीची शाल आणि ह्या देवीच्या शॉलमध्ये काय असतं, तुम्हाला माहिती आहे, की त्या शालीने तिला सौंदर्य येतं. आणि त्याशिवाय ती त्याने आपल्या अंगाचं रक्षण करते. म्हणजे थंडीवार्यापासून रक्षण करते. तिच्या लज्जेचं रक्षण करते. आणि इतर घाण वगैरे लागणार असली तरी त्यापासून रक्षण होतं. म्हणजे ती जी आपलं रक्षण करते, ती जे आपलं प्रोटेक्शन करते, तिचं एक सिम्बॉलिक म्हणा, एक द्योतक स्वरूप आपण तिला एक शाल देतो. म्हणजे आमचं केलंस तर आम्ही तु तुला ही शाल देऊ. ते त्याच द्योतक आहे. आणि नंतर मुलं झोपली, ती त्रासात असली किंवा आजारी असली तर आपली ही शाल त्यांच्यावर पांघरते. म्हणून ह्या शालीचं फार महात्म्य आहे. पूर्वी आपल्याला माहिती आहे, की आपल्या महाराष्ट्रात पूर्वी कोणीही असलं तर अंगावर नेहमी शाल देत असत. आता आपण मॉडर्न झालोत म्हणून शाल घेऊन फिरत नाही. (थोडे इंग्लिश स्पिच, परत मराठी सुरू) तर ह्या शालीवाहनाने विक्रमादित्याला हरवल्यानंतर जे पंचांग केलं ते टिळकांनी मानलं. ন

टिळकांच्यामुळे हे शालिवाहनांचं जे कॅलेंडर आहे, ते आपण अॅक्सेप्ट (स्वीकारलेले) केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे, की सूक्ष्म आहे. फार आहे. शालिवाहनांचे जे कॅलेंडर आहे आता ह्यावेळेला त्याच्यामध्ये दिलेला हा कृतयुग आहे. कलियुग नाहीये. कृतयुग म्हणजे ह्यावेळेला जे परम चैतन्य आहे ते कार्यान्वित आहे, म्हणून हा कृतयुग आहे. आणि तो बरोबर माझ्या जन्माच्या वेळेपासून सुरू झालेला आहे. म्हणजे किती सटल आहे. म्हणजे किती सूक्ष्मात त्याने हे धरलंय. म्हणून टिळकांनी सांगितलं की हे खर कॅलेंडर आहे आणि हेच वापरलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रात आपण सगळीकडे शालीवाहन पंचांग वापरतो. हे शालीवाहन पंचांग जरासं वेगळ पडत. पण सहजयोग्यांनी शालीवाहन पंचांग वापरावं. ते खरं आहे. बाकी जे बाह्यातलं , जे विक्रमादित्यांचं आहे, ते बरोबर नाही. हेच वापरलं पाहिजे. आता नॉर्थ इंडियामध्ये मी पण सांगणार आहे, की हेच पंचाग तुम्ही वापरा. कारण हे सूक्ष्मात आहे. तर राहुरीच मी आपल्याला महत्त्व सांगितलं, शालिवाहनांचं महत्त्व सांगितलं. आता नांदगावी आपला प्रोग्रॅम होणार आहे. नांदगाव हे माझ्या माहेरचं गाव आहे. म्हणजे असं की आईच्या माहेरच गाव आहे. लखुजी जाधवांचं तिथे ठाणं आहे. लखुजी जाधव जेव्हा सर्वांना त्रासून, कंटाळून इथे येऊन राहिले होते, तेव्हा शालिवाहनाला औरंगजेब भितोय हे त्यांना माहिती होतं. औरंगजेब अहमदनगरपर्यंत आला, पण ह्या राहुरी भागात आला नाही. कुठलेच मुसलमान इकडे आले नाहीत. त्याला कारण म्हणजे हे देवीचे भक्त आहेत, म्हणून तो भीत होता. म्हणून तो इकडे आलाच नाही. तिथे लखुजी जाधव येऊन राहिले. ते नांदगावी राहिले आणि ह्यांनी त्यांचं जेव्हा …….. (अस्पष्ट) बुडालं तेव्हा त्यांनी येऊन इथे राजधानी केली आणि……. त्यांची एक लहानशी राजधानी होती. असो, आता तिथे त्यांनी मला जमिनी देऊ केल्यात. आणि अशा रीतीने परत इतिहासाची पुनरावृत्ती होऊन राहिली आहे. तिथे आपल सहजयोगाच काम सुरू होणार आहे. तिथे त्यांनी अनेक जमिनी मला देऊ केल्या आहेत. अशाप्रकारे आपल्याला आता सहजयोग जो आहे, तो परत सूक्ष्मातून सुरू करायचा आहे. त्यावेळेला त्यांनी जो केला तो जडामध्ये होता आता आपल्याला तोच सूक्ष्मातून करायचा आहे. म्हणून राहरीचं फार महत्त्व आहे. आणि ह्या घडीला आपण सगळे बंधन देऊयात.