Shivaji the Anchavatara Satara (India)

Puja in Satara: Shivaji the Anchavatara. Satara (India), 7th February 1984 Marathi Transcript शिवाजी महाराजान  बद्दल सांगत होते कारण साताऱ्याला राजधानी स्थापन केली होती .त्यांच्यात जे गुण होते ते आपण घेतले पाहिजेत .त्यांच्यातला विशेष गुण  असा होता कि त्यांच्यात कोणतेच दोष नव्हते जे आपल्या माणसं मध्ये दोष असतात कुणाला कशाची सवय कुणाला कशाची लत  ,कुणाला काहीतरी वेड्या सारखं कशाच्या मागे लागले तर लागले .त्या च्या वरून हे सिद्ध होत कि ते अंशावतार होते .अंशावतार असल्या मुळे त्यांना कोणतीच वाईट सवय ,वाईट खोड ,खोट बोलणं ,दारू पिणं ,या गोष्टी त्यांना सांगाव्या लागल्याचं नाहीत .ते तसे नव्हतेच .दुसरं अत्यंत स्वभावाने गोड होते .स्वभाव फार गोड होता .अत्यंत गोड स्वभावाचे आणि आईला पूर्णपणे समर्पित होते .कधीही त्यांनी कुणाला वाकडा शब्द बोलला नाही किंवा कुणावरही ओरडले नाहीत का कुणावर बिघडले नाहीत .हे दोन गुण फार कठीण असतात .जेव्हा मनुष्याला इतकं आईच वरदान असत आणि त्या वरदाना मध्ये एक महत्व हि येत कारण ते महाराज होते .पण तरी सुद्धा स्वभावा मध्ये अत्यंत गोडवा होता .आणि स्वतः बद्दल शिष्ट पणा नव्हता कि मी राजा आहे आणि हे गोर गरीब आहेत आणि हे मावळे आहेत त्यांच्याशी कस बोलायचं .त्यांच्या बरोबर बसायचं त्यांच्या बरोबर भाकरी खायची ,कांदा भाकरी त्यांच्या बरोबर मजेत खात असत .रात्रन दिवस प्रवास करायचे ,घोड्यावर कुठे हि रात्रीच झोपायचं ,काही करायचं अशा रीतीने त्यांनी आपलं आयुष्य काढलं .आणि अत्यंत हाल अपेष्टा त्यांनी सहन केल्या आणि त्याच्या नंतर जेव्हा संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांचं भांडण झालं त्याला कारण एकाच होत भाऊबंदकी .त्या आपल्या मराठा लोकां न  मध्ये स्वभाव आहे कि अंगात वळण आलेलं आहे त्याच्या Read More …