Shivaji the Anchavatara

Satara (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Puja in Satara: Shivaji the Anchavatara. Satara (India), 7th February 1984

Marathi Transcript

शिवाजी महाराजान  बद्दल सांगत होते कारण साताऱ्याला राजधानी स्थापन केली होती .त्यांच्यात जे गुण होते ते आपण घेतले पाहिजेत .त्यांच्यातला विशेष गुण  असा होता कि त्यांच्यात कोणतेच दोष नव्हते जे आपल्या माणसं मध्ये दोष असतात कुणाला कशाची सवय कुणाला कशाची लत  ,कुणाला काहीतरी वेड्या सारखं कशाच्या मागे लागले तर लागले .त्या च्या वरून हे सिद्ध होत कि ते अंशावतार होते .अंशावतार असल्या मुळे त्यांना कोणतीच वाईट सवय ,वाईट खोड ,खोट बोलणं ,दारू पिणं ,या गोष्टी त्यांना सांगाव्या लागल्याचं नाहीत .ते तसे नव्हतेच .दुसरं अत्यंत स्वभावाने गोड होते .स्वभाव फार गोड होता .अत्यंत गोड स्वभावाचे आणि आईला पूर्णपणे समर्पित होते .कधीही त्यांनी कुणाला वाकडा शब्द बोलला नाही किंवा कुणावरही ओरडले नाहीत का कुणावर बिघडले नाहीत .हे दोन गुण फार कठीण असतात .जेव्हा मनुष्याला इतकं आईच वरदान असत आणि त्या वरदाना मध्ये एक महत्व हि येत कारण ते महाराज होते .पण तरी सुद्धा स्वभावा मध्ये अत्यंत गोडवा होता .आणि स्वतः बद्दल शिष्ट पणा नव्हता कि मी राजा आहे आणि हे गोर गरीब आहेत आणि हे मावळे आहेत त्यांच्याशी कस बोलायचं .त्यांच्या बरोबर बसायचं त्यांच्या बरोबर भाकरी खायची ,कांदा भाकरी त्यांच्या बरोबर मजेत खात असत .रात्रन दिवस प्रवास करायचे ,घोड्यावर कुठे हि रात्रीच झोपायचं ,काही करायचं अशा रीतीने त्यांनी आपलं आयुष्य काढलं .आणि अत्यंत हाल अपेष्टा त्यांनी सहन केल्या आणि त्याच्या नंतर जेव्हा संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांचं भांडण झालं त्याला कारण एकाच होत भाऊबंदकी .त्या आपल्या मराठा लोकां न  मध्ये स्वभाव आहे कि अंगात वळण आलेलं आहे त्याच्या शिवाय आपल्याला झेपत नाही म्हणजे सहनच करायला आपण तयार होत नाही कि भाऊबंदकी आपल्यात आहे .हि गोष्ट ऐकायला पण आपण तयार होत नाही पण हि गोष्ट आतमध्ये अगदी मुरलेली आहे .तेव्हा लक्षात ठेवलं पाहिजे .सहज योगात पण भाऊबंदकी मी बघते सारखी ,कुठेही गेलं कि भाऊबंदकी आहे .हा महाराष्ट्राचा एक फार मोठा दुर्गुण आहे .भाऊबंदकी मुले आपण एक राज्य गमावलं .आता परमेश्वरच साम्राज्य गमावू नये ..जे लोक परमेश्वराच्या कार्यात आहेत त्यांना सगळ्यांना जोडून असलं पाहिजे . तोडलं नाही पाहिजे ,तोडून बोलायचं नसत .शिवाजी महाराजांची प्रथा अशी नव्हती ,ज्यांनी काही कार्य केलं त्याच ते केव्ह्ड कौतुक आणि महत्व करत असत .. आपल्याला माहित आहे सिहंगड जिंकल्यावर ते म्हणाले गड मिळाला पण सिह गेला .हि केव्हडी मोठी गोष्ट आहे , कि गड मिळाला काय झालं पण सिह गेला ना आमचा आणि ते जे काय सगळं त्यांचं वागणं होत त्याच्या मध्ये आपण हे शिकलं पाहिजे कि सहज योगात सुद्धा दुसऱ्या माणसाचं महत्व करणं फार जरुरी आहे स्वतःच महत्व करत बसायचं नाही .आम्ही विशीष्ट ,आम्ही विशेष ,आम्ही सगळं काही असं नाही केलं पाहिजे .पुष्कळ लोकांना वाटत आपण शिकलेले आहोत ,सहज योगात काही लीक सुखवस्तू आणि शिकलेले आहेत तर ते इतर ग्रामीण लोकांशी मिक्सअप  होत नाहीत .हि चुकीची गोष्ट आहे .ते लोक वेगळे आम्ही वेगळे ,आम्ही वेगळं राहायचं त्यांनी वेगळं राहायचं अशी जर भावना अली तर सहज योग्य तुम्हाला मिळाला नाही .योग्याला जात पात  काही नसते ,ऊच्च नीच काही विचार नसतो .इतक च नव्हे तर श्रीमंत गरीब असा विचार पण योग्यानं  मध्ये नसला पाहिजे .तरच तुम्ही योगी झाले .तर योग्यांची ओळख हि आहे कि सरमिसळ  सर्वजण आपण एक आहोत .आपण आईची सगळी मूल  बाळ आहोत आपल्या मध्ये काहीही फरक नसला पाहिजे ,पूर्ण पणे समता असली पाहिजे .आपल्या देशाला जर बदलून काढायचं आहे तर जस आपण आपल्या समोर   शिवाजीचं च एक उदाहरण ठेवलेलं आहे आणि बघितलेलं आहे कि पहिली गोष्ट स्वतः मध्ये काही दोष नसला पाहिजे .स्वतः त दोष असलेला माणूस दुसऱ्या ना काय सांगू शकणार .दुसरं म्हणजे असं कि जे त्यांचे फोल्लोवर्स  होते त्यांना सुद्धा त्यांच्या बद्दल नितान्त श्रद्धा होती . सारखं तुम्ही आपले लीडर शी भांडत असाल त्यांचे दोषच काढत असाल तर ते हि चुकीचं आहे .दोन्ही मेळ असायला पाहिजे तरच भाऊबंदकी होत नाही .आणि हा जर दोन्ही मेळ बसवला नाही तर मात्र भाऊबंदकी सुरु होते . तुटक पणे फार बोलणं हे फार चुकीचं आहे .तसेच आपल्या लीडरला मान  न देणं ,त्याचा सारखा पान उतारा करणं ,सारखं त्याच वाईट काढणं ,त्यालाच शिकवायला जाण  हे फार चुकीचं आहे .तेव्हा या जर दोन गोष्टी आपण सांभाळल्या तर आपल्या देशातली भाऊबंदकी संपणार .ती नसली पाहिजे अगदी निघाली पाहिजे मुळातून निघाली पाहिजे .आणि दुसऱ्याचा दोष बघून कधी निघणार नाही स्वतःचा दोष काढला पाहिजे .मी साताऱ्याला एव्हड्या साठी म्हणते कि या साताऱ्यातच स्वराज्याची स्थापना झाली आणि साताऱ्यातच स्वराज्याची बेबंदशाही सुरु झाली .तेव्हा दोन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत कि आपल्या मध्ये बेबंदशाही नसली पाहिजे .हे प्रेमाचं कार्य आहे .आणि प्रेमाला जोडत गेलं पाहिजे बाकी जेव्हडे काही विचार आणि आणि हे सगळं लोक करतात ,काही बुद्धिवादी लोक असतात ते बुद्धीच्या जोरावर दुसऱ्या पासून दूर होतात प्रेमाच्या दमावरच  तुम्ही राहील पाहिजे .प्रेम हे सहजयोगाचं अन्न  आहे .आपण किती दुसऱ्यावर प्रेम केलं ,दसऱ्याचे दोष काढण्या पेक्षा आपण दुसऱ्यांना  किती  दिल हे बघितल पाहिजे तेव्हा दोन्ही गोष्टी जपून वापरल्या पाहिजेत .साताऱ्याला आता हे कार्य सुरु झालेलं आहे मला फार आनंद झाला .आणि काल  मला फार बर  वाटलं .कितीतरी साधक तिथे होते .इतके लोक पार झाले .सहजयोग मध्ये फार मोठं मोठं करायचं आहे आणि फार मोठी माणस  होणार आहेत .हेच उद्याचे सगळे पुढारी आहेत इथे बसलेले .हे सगळं बघून फार मला आनंद झाला .पण लक्षात ठेवलं पाहिजे जे आपलं पूर्वी राजकारणात चुकलं ते आता परमेश्वराच्या साम्राज्यात चुकलं नाही पाहिजे .परमेश्वराच्या राज्याचे कायदे फार जबरदस्त आणि कडक असतात .जो माणूस त्या कायद्याच्या विरोधात जाईल तो तिथेच हाणला  जाईल .तेव्हा सांभाळून असायला पाहिजे ,फार सांभाळून असावं लागत . त्याचे आशीर्वाद हि अनंत आहेत ,क्षमा हि अनंत आहे पण एका मुदती पर्यंत असत ते .त्याच्या नंतर मात्र हात त्याचा जोरात पडतो .तिथे तुमचं मग काही चालू शकणार नाही .म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे आता आपण परमेश्वराच्या साम्राज्यात येत आहोत तेव्हा अशी सुबुद्धी धरली पाहिजे कि इथे कोणतंही  असल्या तऱ्हेचं गलिच्छ जे राजकारण आहे ते आणायचं नाही .या गलिच्छ गोष्टी वर आणायच्या नाहीत .आपण प्रेमाच्या राज्यात सर्व एका दुव्यानी एकदुसऱ्याला  बांधलेले ,एकाच आईची मुले आहोत .तेव्हा आपापसात जी सत्ता मिळवायची ती स्वतः वर मिळवली पाहिजे .दुसऱ्यांवर सत्ता मिळवायची हि जागा नव्हे .स्वतःवर सत्ता मिळवली पाहिजे हि जागा आहे .हे समजलं पाहिजे .जर का सत्ता तुम्ही स्वतःवर मिळवली तर पहिली गोष्ट तुमच्या व्हयब्रेअशन  मध्ये दिसेल ..तुमचे व्हायब्रेएशन कसे आहेत त्या वरून मला कळत तुमच्यात काय चाललं आहे आणि कुठे बिघाड होतो आहे .तेव्हा कृपा करून कोणतीही भाऊबंदकी आणि अशा तऱ्हेचे ग्रुप्स बांधायचे नाहीत आणि बांधले गेले कि लगेच तोडत  जायचं .माताजींनी सांगितलं आहे कि ग्रुप्स बांधायचे नाहीत .कुणाच्या विरुद्ध बसून बोलायचं नाही .कुणाला वाईट म्हणायचं नाही .सगळे मिळून राहील पाहिजे .हा विचार मला साताऱ्याला आल्यावर आला कि आता इथे लोकांना याची नोंद करायला सांगितली पाहिजे .जाणीव दिली पाहिजे कारण सहजयोग म्हणजे फार सहज मिळतो .आणि त्याच्यात जी पहिली गोष्ट होती म्हणजे ती कि मनुष्याला सत्ता येते त्या सत्ते मध्ये तो दुसऱ्याला दाबू लागतो .सहजयोगात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि माताजींनी एकेक माणसाला प्रत्येक ठिकाणी नियुक्त केलं आहे .आणि प्रत्येकाशी त्या संबंध ठेवतात .त्यांचा संबंध त्या एका नियुक्ती मुळे  होतो .जस आपल्या डोक्यात सुद्धा एक ब्रेन आहे .त्या ब्रेन पासून आपण सगळ्यांचा संबंध ठेवतो .तसच सहजयोगात करावं लागत तेव्हा त्या माणसात काही बिघाड झाला तर माझ्या लगेच लक्षात येईल आणि मी त्याला ठीक करू शकेन .पण तुम्ही त्याचे दोष काढून सगळंच खिळखिळं करून टाकाल .लक्षात अली ना गोष्ट तुमच्या जो एक माणूस लीडर असेल त्याला तुम्ही मान्य करा .आणि मी त्याला बघते ,त्यांनी जर चुका केल्या तर मला सगळं समजत .प्रत्येकाचं मला समजत .इतकं मला बारीक माहिती आहे तुम्हाला माहित नाही .मी सांगत नाही म्हणत नाही याचा अर्थ असा नाही कि मला कळत  नाही .मला सगळ्यांचं माहित आहे तेव्हा ज्या एका माणसाला आपण लीडर केलेलं आहे त्याला मान्य केलं पाहिजे .माताजींवर भरोसा आहे झालं तर .तुम्ही जास्त शिकलेले असाल किंवा तुमच्या जवळ जास्त पैसे असतील किहीही असलं तरी तस काही करायचं नाही .एक जो माणूस आहे जो पर्यंत मला तो ठीक वाटतो तो पर्यंत त्याला राहूद्या .पुढे जर त्या माणसाचं काही वाईट असेल तर मी त्याला काढून टाकेन .मला स्वतःला ते समजत एव्हडं लक्षात ठेवलं पाहिजे .म्हणजे सहजयोग वाढणार आहे कारण जरी सहजयोग आपण म्हणू त्याच्या मध्ये काहीही संस्था नाही काही तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत ,मेम्बरशिप नाही तेव्हा कशाने जोडले जाणार आपण तर प्रेमाने जोडले जाणार .सगळयांनी प्रेमानी जोडून घ्यायचं .आणि दुसरं म्हणजे असं कि प्रेमाची सत्ता जी येते आहे ती माताजीं पासून येते आहे .तेव्हा त्यांनी ज्या माणसाला ठेवलं आहे लीडर म्हणून त्याला ठेवायचं .नंतर त्या माणसात वळत दोष दिसला तर मी काढून टाकणार आहे .अगदी नक्की काढून टाकणार .तेव्हा माझ्यावर पूर्ण भिस्त ठेवली पाहिजे .आणि आपलं चरित्र आहे ते कस बनवायचं ,आपण त्यात कस वागलं पाहिजे हे शिकण्या साठी तुमच्या समोर मी आहे ना .बर तुम्हाला जर वाटत असेल मी माताजीन  सारखं नाही राहू शकत आहे तर शिवाजी महाराज आहेत त्यांना बघा .काहीही कठीण नाही .सहज योगात पार झालेल्या लोकांना काहीही कठीण नाही .पुष्कळ लोक आहेत अगदी आयुष्य एकदम बदलून जात ,या लोकांना बघा किती बदलले .जमिनीवर बसू शकत नव्हते पाच मिनिट सुद्धा ,मेहनत करून करून जमिनीवर बसायचं शिकले .तर ध्यान धारणा वैगेरे व्यवस्थित करावी रोज संध्याकाळी निदान झोपायच्या आधी जर पंधरा वीस मिनिट ध्यान  धारणा केली तरी स्तिती बारी होते आणि सकाळच्या वेळेला बाहेर जायच्या आधी एक पाच मिनिट पूजा केली फोटोची कि मग झालं पण प्रत्येक आठवड्यात सगळ्यांनी भेटलं पाहिजे .तर ते झालं नाही तर सहजयोग वठत नाही प्रत्येक आठवड्यात सगळ्यांनी भेटलं पाहिजे कारण हि सामूहिक चेतना आहे .तुमि म्हणाल माताजी आम्ही तुमचा फोटो ठेवतो ,पूजा करतोतरी आम्हाला हा त्रास झाला  काही उपयोग नाही माझं लक्ष नसत मी आपल्याला कालच सांगितलं कि जेव्हा ताक घुसळतो आणि त्यातलं लोणी बाहेर काढतो तेव्हा गोळ्याला चिकटलेलं लोणी आपण बाहेर काढतो आणि बाकीचं फेकून टाकतो तेव्हा गोळ्याला चिकटलेले लोकच आमच्या जवळ आहेत बाकीमाझं लक्ष नसत .तेव्हा त्या ठिकाणी यायला पाहिजे जिथे दहा माणसं भेटतात बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे .पण उद्धट बाजी करायची नाही बोलणं कमी असावं आणि ध्यान जास्त असावं म्हणजे बर  होईल .पण गट बाजी असली म्हमजे मी तुझं ठीक करतो ,मी तुझं फिक्स करतो ,असं सुरु झालं म्हणजे गेलं .इथे येऊन ध्यान धारणा करायची सगळ्यांनी भजन म्हणायच आरती म्हणायची ,काही आपापसातले प्रश्न असतील तर ते मिटवायचे  .पण तिथे बसून काहीतरी वादविवाद करणे किंवा हे करणे ते करणे हे सगळं करू नये .उलट सहजयोगा  मध्ये जे काय मिळवायचे आहे त्याच्या वाढीला मदत करायची आहे .आमची वाढ काय झाली ,कशी झाली ,कुठे आम्ही पोहोचलो हे बघायला पाहिजे .हळू हळू महाराष्ट्रात सहजयोग जमेल .पण पुढची मात्र कधी कधी काळजी वाटते कि एव्हडी माझी केलेली मेहनत वाया नाही गेली पाहिजे .तुमच्यावर सर्व जगाची भिस्त आहे हे लक्षात ठेवा .सर्व जगाची भिस्त हि महाराष्ट्रीयन लोकं वरती आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे .आणि जर तुम्ही बुडवलं तर ते हि शक्य आहे तुम्हाला  तेव्हा तस करू नये आपल्या मध्ये जे दोष आहेत ते काढू न टाकायचे .स्वभावा मध्ये गोडवा आणला पाहिजे प्रेमाने बोललं पाहिजे .आणि सगळ्यनशी समतेने  वागले पाहिजे .हे वागण्यात आलं तर ते आतमध्ये सुद्धा येईल .कारण आता तुमच्यात आत बाहेर एकच  झाले आहे .जे तुम्ही आत कराल ते बाहेर येईल आणीबाहेर कराल ते आत येईल कारण आता तुमच्यात आत बाहेर एकच झाल आहे .असं होत नसत पण आता संबंध झालेला आहे .समजा हे बाहेरच खराब झालं तरी आवाज येत नाही आणि आतलं खराब झालं तरी आवाज येत नाही .दोन्ही वस्तू नीट असायला पाहिजेत .पुष्कळांचं असं म्हणणं असत कि आम्ही ध्यान करतो माताजी आम्हाला व्हायब्रेएशन ठीक आहेत पण तरी बाह्यतलं ठीक व्हायला पाहिजे .नाहीतर हळू हळू आतलं  आहे ते संपून जाणार .म्हणून आत आणि बाहेर दोन्ही माणसाला एक सारखं  असलं पाहिजे .आणि दिसायला तेजस्विता असली पाहिजे .पण त्या तेजा मध्ये कोणत्याच तऱ्हेचा दाह नसला पाहिजे ,दाहकता नसली पाहिजे .पण अत्यंत सौम्य ,सुंदर ,चंद्रा  सारखं शीतल असायला पाहिजे पुढच्या वेळेला मी येईन तेव्हा आणखीन मंडळी राहतील आणि पुष्कळ मंडळी मिळून आपण इथे पूजन करूयात .पण ह्या वेळेला मात्र मी येणार नाही पुढल्या वर्षी मी येणार त्यावेळी मी एक रात्र इथे राहणार आहे .तेव्हा बघू काय जमलं तर करूयात 

English Transcript

It is not proper, but He was not just a mere king, you see He was a Devi bhakta and an ansha avtara and His Mother was also an ansha avtara. What is the sign of an ansha avtara is that they have extra powers over themselves and over others, and they have no temptations, no mistakes.

[Shri Mataji speaks in Marathi to the sound technicians about the sound system problem.]

So, first of all we should know that Shivaji himself was a divine person in the sense that He had no defects in him. He was a detached personality. I do not want to tell you the whole history about him, but his character if you study you will be amazed how detached He was. He was not found of women. He never hankered after them and on the contrary respected women very much. There is a story that once He was presented with the daughter-in-law of a great nawab because the people used to do, I do not know what you call those tactics where you attack the people hiding from behind.

[Shri Mataji is speaking with the sound technicians and the Sahaja Yogis present there about failure of the sound system due to load shedding, load shedding is a problem the people of this place face every Tuesday. Shri Mataji asks the Sahaja Yogis present there to try to listen to Her from their Sahastara, pay attention to Her and they will be able to listen Her.]

So, this great king Shivaji was a man without any temptation for women and once He was presented with a very beautiful lady who was the daughter-in-law of a big nawab, because they looted lot of money and lot of precious things and this lady as well when her caravan was passing through some passage in the mountains. So Shivaji looked at her. He asked her to remover her veil because she was a Muslim lady and then looking at her He said that if my mother was as beautiful as you are, I would have been equally beautiful, is the best way to say you are my sister. He himself had to marry four times because of certain problems of political nature where He had to marry four women, but He married them, because He had to marry and all the four wives were his wives and no other women came into his head. This is such a tremendous character. This is first sign of a personality who is really mature, who has no attention towards another women, which is very common in Maharasthra it is not difficult for them they do not understand what I am talking about. This is one of the things one has to understand how respectful He was to other women. That He gave away all her things, all her money, all her jewelry, all that was looted of that nawab also, all the arms everything, and sent back all the people to the nawab, because if there is a lady she is the shakti, she is traveling so nobody has business to trouble her. This was his respect for women who belonged actually to another party. He had so many qualities that it is impossible to describe on that but absolutely honest, absolutely honest He was and He lived like a saint. He did not care for comfort. If you go and see his things that the had you will be amazed, He could sleep on the stones, but for his kingship He had to wear all the ornaments, all the dresses which He used to wear. If you go in Bombay museum you will see chilkhat we call it a cover made out of iron mesh. He used to wear that, it is so heavy that you cannot lift it, but He had to wear it and He used to fight his wars wearing that, but like all other kings you see in the west He did not have weaknesses, He had no habits, extremely honest, Spartan in temperament, and absolute ideal king He was, an absolute ideal king. He talked to everyone on the same level, treated everybody with respect, never showed off that he was a king, but He kept his dignity all the time and when it was needed to be corrected with all courage He corrected people, He did not care for cheap popularity either. Such a man was a blessing to Maharashtra because He is such an ideal for us and for people to follow and His mother was a great lady who brought him out of the clutches of the Mughal people who tried to convert forcibly Hindus to Islam. Like this Aurangzeb he used to hate music, and he would kill, very right sided fellow, every year the brahmins so many brahmins that the thread they used to weigh according to his body weight. So you can imagine what a cruel man he was. He was like Hitler only, but he was also very honest in the sense he used to make his own caps and sell them and live on that money. He was very right sided who was honest as far as the money was concerned, the government money was concerned, but he was so fanatically imprisoned in his own ideas about God that he had become just like a rakshasha. To face him was very difficult was very difficult in those days, he was a terror. Nobody could face Hitler from inside but Shivaji managed it, and he did it so well.

So Satara is a place where he established his first kingdom. This is the capital of Maharashtra, Satara, that is why it is a very important place. Secondly, after Shivaji, or when Shivaji was the king looking after the whole worldly affairs, his own son fell into a bad company of a fellow who came from Uttar Pradesh called Kabji Kalusha who started drinking and doing all wrong things that should not be done. He was imprisoned, but even then he was a very-very lost case, but a good hearted fellow that is why this Maharasthra was divided into two and his younger brother had to form another kingdom or another part of the capital was in Kohlapur where I think you have seen Sahu Maharaja’s statue there. So he was a very dharmic fellow, very good person and he looked after that part very well. So, Kohlapur started another capital, but what I am trying to say that when negativity starts crawling into something great, then it starts getting divided and it is now a very common character they say of Marathas that they indulge in Bhau Bandki, always form groups. I find it even happening in Sahaja Yoga. I went to Rahuri, I felt that in Rahuri also there is a kind of Bhau Bandki working out. This is character of Marathas and they have to be very-very careful about it. One of them is Bhau Bandki that they form a group suddenly and separate themselves from one another and start fighting each other, it is sort of a coagulation that takes place in their temperaments. One must understand that unless and until absolutely we are united we cannot do Sahaja Yoga. So this kind of separation is a very wrong thing which should be avoided out and out and one thing I want to tell all the Maharashtrians that they have to be careful on this point is Bhau Bandki. This comes out of jealousy out of thirst for power, for not accepting somebody as the leader, trying to find faults all the time. If the leader is wrong also it can happen. If the leader goes wrong if he is not a person who can carry on well with others and something it can happen. So it is quite a mutual thing that works out but as a result of the whole thing is that it starts getting bifurcated and that is how we lost the kingdom of Maharasthra ultimately. So it’s a very good example of understanding how Shivaji worked hard fought Aurangzeb, established his kingdom and how it was lost in second generation itself.

[Shri Mataji addresses in Marathi about Shivaji, that how he established His capital in Satara, that we should try imbibe his character. His utmost quality was that he did not have any dosha (wrong). He did not have any habits. He never had the ego that he was the king, he used to eat with his people, talk to them. Shivaji was a Ansha Avtara, he was devoted to his mother, never spoke in front of her or against he, he was not proud of being a king. She also addresses about Bhau Bandki which she says is a thing the Maharashtrians should be careful of. Mother says that one should work for others, and not think about only oneself. One should not find faults in others, first he should find faults within himself. Love for others is most important in Sahaja Yoga. Nothing is impossible for a Sahaja Yogi who has has established self realization, who meditates regularly, and participates in the collective meditation.]