Public Program

Pune (India)

1984-02-08 Public Program Marathi, Pune, India, DP-RAW, 93'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Public Program, Pune, India

या पुण्यभूमीवर आधीही पुष्कळ आक्रमण झालेले आहे. इतर राक्षसी प्रवृत्तींनी अनेक वेळेला याच्यावरती आक्रमण केलं. शिवाजी महाराज असताना सुद्धा आपल्याला माहिती आहे; येथे पुष्कळ अशा घटना झाल्या ज्या इतिहासात अद्वितीय आहेत. म्हणजे इथल्या जनतेने नेहमी सत्याचाच भाग उचलून धरला. त्या साठी झगडले. त्याचं ध्येय नेहमी सत्याला धरून राहणं असं होतं. नंतर आपल्या भारतामध्ये जो स्वातंत्र्याचा लढा झाला त्यात सुद्धा इथे वीरत्वाने लोक लढले आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं. तसंच सामाजिक पातळीवर सुद्धा फार महत्वाची कामगिरी केलेली आहे. तेव्हा खरं म्हणजे महाराष्ट्राची मानसिक भूमी ही पुणे. जरी मुंबईला आपण म्हणतो की राजधानी आहे, पण आर्थिक राजधानी असली तरी जी मानसिक म्हटली पाहिजे किंवा धार्मिक म्हटली पाहिजे ती पुण्यभूमी ही पुण्याची आहे. या पुणेकरांवर एक मोठा भारी जबाबदारीचा भाग येतो. तो इतका मोठा जबाबदारीचा भाग आहे याची कल्पना सुद्धा तुम्हांला नसावी.कधी-कधी मला आश्चर्य वाटतं. पण दैवकृपेने येथे सहजयोग जमू लागलाय. हळूहळू त्याची पाळेमुळे जमू लागली आहेत. हे बघून मला फार आनंद होतो. 

पूर्वी मला फार आश्चर्य वाटायचं की सर्व तऱ्हेचे दुष्ट प्रवृत्तीचे राक्षस या पुण्यभूमीला कशे प्राप्त झाले आणि येथे येऊन त्यांनी कशे लोकांवर अत्याचार केले. पाशवी प्रवृत्तीचे लोक तसेच दुष्ट, रानटी तऱ्हेचेबाबाजी वगैरे अशा तऱ्हेचे लोक येथे आले. त्या नंतर इतर ढोंगी आणि अशे लोक येऊन त्यांनी पुष्कळ आक्रमण केलं. पण तरीसुद्धा त्यांची पुण्याई ते जिंकू शकले नाहीत. आणि सगळ्यांना पराभूत व्हावं लागलं आणि त्यांना इथून कूच करावं लागलं. आज अशा परिस्थितीत आपण बसलेलो आहोत. इथे मला दोन तऱ्हेची लोकं दिसतात. त्यातील एक म्हणजे रूढीवादी लोक. अजून आपल्या रूढी आपल्यामध्ये इतक्या रुजलेल्या आहेत, ते आपण डोळे उघडून बघायला तयार नाही. त्या रुढींबद्दल एकही अक्षर बोललं म्हणजे लोकांना राग येतो, पण या पुण्यातच अनेक रूढी आपण बदललेल्या आहेत, हे लोक विसरले. आगरकरांनी बालविधवेचा विरोध केला. इतकंच नव्हे तर विधवा विवाह त्यांनी केला. म्हणजे केवढी मोठी गोष्ट केली, हे आता तुम्हाला समजत नाही, पण त्यावेळेला ही फार मोठी गोष्ट होती. म्हणजे विधवेचा विवाह करणं म्हणजे केवढं अधार्मिक कार्य केलं असं लोकांना वाटत असे, ते आगरकरांनी करून दाखवलं. टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, असं उभ्या कोर्टात जाऊन सांगितलं. अशे पाणीदार लोक ह्या पुण्यभूमीत निर्माण झालेले आहेत; आणि परत होणार आहेत, आणि आहेतही. पण ही जी रूढीगत आपली स्थिती झालेली आहे, त्याला आपण बदललं पाहिजे, कारण हे जाणतनाही आपण. ही आणिबाणीची वेळ आहे. ही फार आणिबाणीची वेळ आहे. हे फार भयंकर चाललेलं आहे. तुम्हाला अजून अंदाजच नाहीय की किती राक्षसांचा इथे धुमाकूळ होणार आहे; आणि काय परिस्थिती निर्माण होईल. आपण झोपेतच आहोत. अजून गुंगीतच आहोत. आपल्याला अजून लक्षातच येत नाही की आपण चाललो कुठे; आणि जरी म्हटलं, याला काही पर्याय आहे तो शब्द बरोबर नाही. याला काही गत्यंतर नाही राहिलं, अशी स्थिती आज आली आहे.

   लोकांना सहजयोगात येताच लाभ होतो. लाभ होतो, होणारच, कारण तुमची कुंडलिनी ही जागृत झाली पण नुसती धुगधुग त्याची. आपण जसं आता प्रमिलाताईनी इतकं सुंदर सांगितलं, असं मी इथे कितीतरी हजारो लोकांना बरं केलं आहे; पण किती लोक सहजयोग निष्ठेने आणि श्रद्धेने करतात? फार कमी. त्यामुळे होतं काय की हजारो लोकांना बरे केलं तरी व्यर्थ आहे. ते लोक आजारी असतात, बर नसतं त्यांना. करुणेमुळे सहजयोग त्यांच्यावरती वाहतो म्हटलं पाहिजे. कृपा करतो आणि त्याने लोक बरे होतात. पण प्रमिलाबाईंसारखे अशे किती लोक मी बघितलेत; कमी जे त्याच्यात निष्ठेने उतरतात आणि निष्ठा करून, श्रद्धावान होऊन स्वतः समर्थ होतात. त्यांनी स्वतःच मग लोकांना ठीक करायला सुरुवात केली. माझ्याकडे कोणी पेशंट घेऊन आला नाही. त्यामुळे आपण इतके रूढीगत झालेलो आहोत की; माताजींनी सगळ्यांना ठीक केलं पाहिजे. माताजींनीच बघितलं पाहिजे, माताजींचा हात लागल्याशिवाय होणार नाही. ही आपल्यामध्ये रूढी आहे की जे काय असेल ते गुरूनेच दिलं पाहिजे. इथे मी आता तुम्हांला गुरु करायच्या मागे आहे. तुम्ही सगळे गुरु झालं पाहिजे. ही रूढी जी चालली होती पूर्वी की गुरु बसलाय एके ठिकाणी जाऊन मग झालं बाकीचे सगळे जशेच्या तशे कोरडे पाषाण. सहजयोग तसा नाही. सहजयोग तुम्हांला गुरु बनवतो. तुम्ही बनलं पाहिजे. तुमच्यातच गुरुत्वाची शक्ती येते. तुमच्यामध्येच ती आजारपण ठीक करण्याची शक्ती, कुंडलिनी जागृत करण्याची शक्ती या सर्व महान शक्त्या आहेत. त्या कुणाला लभ्य नव्हत्या, त्या आज मिळत आहेत. त्या घेऊन त्याच्यामध्ये मात केली पाहिजे; आणि मनुष्याने अशा स्थितीला पोचलं पाहिजे, जिथे स्वतःच तुम्ही समर्थ व्हाल. तसं झालं नाही समजा, समजा जर तुम्ही समर्थ झाला नाही तर मात्र पायदळी तुडवला जाल. आता कोणीही बचावणार नाही. ही अशी परिस्थिती भयंकर आहे या वेळेला, की या अशा एका गुरु परंपरेत फसल्यामुळे तुम्ही लोक जे एकाकडे जे धावून जायचे आणि एकाने सगळे केलं पाहिजे, ते सगळे सोडले पाहिजे. आता आम्ही केलं पाहिजे, आम्ही सुद्धा त्याच्यातले एक आहोत. माताजींनी आम्हांला ते जागृत करून दिलंय. आमच्यात कुंडलिनी जागृत झालीय. अहो, किती लोकांच्या कुंडलिन्या पूर्वी जागृत होत होत्या. आता गगनगड महाराज आहेत; सांगितलं की एका माणसाची पंचवीस वर्षांत कुंडलिनी जागृत केली. मग काय झालं तो वाया गेला. कारण त्याला संन्याशी बनवून जागृती दिली. संसारात आला, परत वाया गेला अन इथं म्हटलं आमच्याकडे हज्जारो माणस पार होतात. अर्थात त्यातले बरेच वायासुद्धा जातात. तुम्ही असं म्हणाल वाया नाहीजात, पण तुम्ही वाया जायच्या मागे का लागता? तुमच्यात हे असायला पाहिजे की आता आम्हांला माताजींनी जागृती दिली आहे, सहजयोगाने एवढा आमच्यावर उपकार केला आता आम्हाला समर्थ झालं पाहिजेआणि जर तुम्ही समर्थ झाला नाही आणि दुबळेपणाने राहिला आणि उद्या कुणी तुमच्यावर अरेरावी केली किंवा आततायीपणा केला किंवा सर्वनाश जरी केला तर त्याला परमेश्वर मग जबाबदार राहणार. ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. हिटलर ज्या वेळेला आला त्या वेळेला सहजयोग नव्हता. जर हिटलरच्या वेळेला सहजयोग असता तर त्या हिटलरला सुद्धा नेस्तनाबूत केलं असतं. अर्थात सहजयोगानेच गेला तो नंतर. पण आज अशी परिस्थिती आहे की माणसाला सांभाळून राहायला पाहिजे. स्वतःची जी शक्ती आहे ती आम्ही जागृत करायची नाही. रात्रंदिवस गाऱ्हाणं घेऊन बसायचं, दुसऱ्यांची गाऱ्हाणी घेऊन यायची आणि गुरुंनी आम्हांला काहीतरी दिलं पाहिजे. गुरूंच्या हातून हे झालं पाहिजे, आम्ही काही करणार नाही. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ ही जी आपली रूढीगत स्थिती आहे ती सोडली पाहिजे. तसे म्हटले तर अनेक रूढी आपल्यामध्ये अजून पुष्कळ आहे पण सहजयोगात आल्यावर बऱ्याच रूढी आपोआप सुटतात. अनेक तऱ्हेचे आपल्या देशावरती आक्रमण आहेत, त्यातले सामाजिक आक्रमणामध्ये आपण ज्या तऱ्हेने मुलींना वागवून घेतो, त्यांची लग्न झाल्यावर त्यांचा छळ करतो, किंवा बायकांच्या बाबतीत आपला जो एक प्रकारचा नेहमी त्यांना कमीपणा देण्याचा विचार असतो, त्या सर्व अत्यंत वाईट अशा ह्या रूढी ह्या आपल्यामध्ये ठसल्या आहेत. त्या सुद्धा सहजयोगाने सुटतात, कारण आत्म्याला, आत्मा हा स्वतंत्र आहे आणि आत्मा हा निर्दोष आहे. त्याला दोष नसतात, त्याला दोष नाहीत. तुम्ही आत्मा झालात तर तुमच्यातील शारीरिक, मानसिक, बौद्धिक सर्व दोष गळून पडणार. त्याच्यात काही विशेष नाही, पण तुम्ही आत्मा व्हायला पाहिजे. श्रीकृष्णाने असं सांगितलेलं आहे की, ‘योगक्षेमं वहाम्यहम’ आधी योग झाला पाहिजे मग क्षेम. पण एक त्याच्यात फार सुंदर त्याच्यात पूर्वीचे एक घातलेलंआहे. ‘नित्य अभियुक्ताना’ त्यांनी नित्य सतत जसं सातत्य असलं पाहिजे. सातत्याने जे स्वतःला अभियुक्त समजतात. अभियुक्त होणे म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला जे काही दिलेले आहे, त्याबद्दल तुमचे सातत्याने त्याच्याबद्दल निष्ठा ठेवणे, अभियुक्त होणे. जसं आपण कोणावरती अं……अं … मुकुट घालतो, त्याला अभियुक्त करतो. त्या मुकुट घातलेल्या माणसाला असं वाटलं पाहिजे, की केवढे माझ्यावर उपकार, माझं केवढं महत्त्व केलं, मला हे मिळालं अशे ज्यांना हे असं वाटत असतं त्यांना त्यांच्याबद्दल ही कल्पना असते की, नेहमी आम्ही अभियुक्त आहोत. त्या परमेश्वराची सातत्याने निष्ठेने आम्ही एकपणा गाठलेला आहे, असं ज्यांना वाटत असतं त्यांचच ‘योगक्षेम वहाम्यहम’ त्यांचंच योग करून नंतर क्षेम करतात. आता जी माणसं आहेत अर्धवटा सारखी, आली ठीक झाली, मग दहा माणसांना घेऊन आले. अहो, तुम्ही का नाही सहजयोग करत? तुम्ही का नाही समर्थ होत? असं म्हटलं तर लोकांना ते पटेना. एखादी एजन्सी घ्यावी त्याप्रमाणे वागतात. ते अगदी चुकीचं आहे. तुम्ही स्वतः समर्थ व्हायला पाहिजे. तुम्ही स्वतः या गोष्टीला जाणलं पाहिजे, की तुम्ही स्वतः आत्मा आहात, तुम्ही आत्मा आहात. आत्ताच तर तुम्ही मिळवलं नाही तर कधी मिळवणार? हे मला समजत नाही की, मुलांना सुद्धा मोठं व्हावं लागतं की नाही, तेव्हा सारखं आईच्या पदराखाली राहायचं, हे योग्य नाही. मनुष्याची जीइतर कल्पना धर्माबद्दल आहे ती सुद्धा बदलते, फार बदलते म्हणजे धर्म स्वतःमध्ये जागृत होतो, म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाही, तुम्ही असं करू नका, तसं करू नका, तुम्हांला जे वाटेल ते तुम्ही करा. उद्या तुम्हांला वाटलं तर तुम्ही माझी बदनामी सुद्धा करू शकता, त्याची सुद्धा तुम्हांला मुभा आहे. तुम्हांला जे करायचं असेल ते करा. पुष्कळ लोकांना मी बरं केलं ते माझी बदनामी करतात, माझ्या विरुद्ध लिहितात, माझ्या विरुद्ध गोष्टी करतात, करू देत. पण त्याचा परिणाम त्यांच्यांवर आला मग म्हणतात, आम्हांला माताजी बघा तुम्ही बरं केलंत, परत दुसरा त्रास झाला, हे झालं, ते झालं मग तुम्ही केलं काय. पण ही जी आपल्यामध्ये कल्पना असते, आपण काही केलं तरी चालतं तसं नाही.परमेश्वराने तुमच्यासाठी काही केलं तर परमेश्वरासाठी तुम्ही काय केलं हा विचार मनुष्याने केला पाहिजे की, परमेश्वराने याच्यासारखे फार विरळे लोक. तेव्हा आम्ही परमेश्वरासाठी काय केलं याचा विचार आज यायला पाहिजे, यायलाच पाहिजे. उद्या जेव्हा संकट येणार आहेत आणि भयंकर संकटं सत्यानासाची येणार आहेत, त्यावेळेला तुम्हांला विचारण्यात येईल की तुम्ही काय केलं हो परमेश्वरासाठी. माताजींनी मेहनत केली सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत. फिरल्या गावभर, सगळ्यांना म्हटलं हे करा, ते करा, तुम्ही काय केलं? प्रत्येक माणसाने जर विचार केला तर दहा हज्जाराच्यावर माणसांना ते पार करू शकतील. इतकी तुमच्यामध्ये शक्ती आहे. सहज पण स्वतःला मिळालं की नाही मग चार माणसांना घेऊन माताजी आम्ही तुमच्याकडे येऊ याला काय अर्थ आहे?मला समजत नाही आणि ही रूढी सगळ्यांना दर्शन झाले पाहिजे. पायावर यायचंय. अरे, पायात काय ठेवलेलं आहे? तुम्ही जर पार नाही तर तुम्हांला मी काय देणार? पायातून दगड आहेत नुसते. आता देवळात गेले ठीक आहे, देवळात जाऊन तुम्ही पाया पडा नाहीतर काहीतरी व्यर्थ वेळ घालवा. त्याला मी तरी काय करू? पण माझ्या पायावर कशाला वेळ घालवता? जोपर्यंत मी तुम्हांला काही दिलं नाही, तुम्ही माझ्या पायावर का येता? एक लहानशी गोष्ट मी सांगते लोकांना की, बाबा तुम्ही स्वतः ला निवडून घ्या, म्हणजे या पायाची सुद्धा तुम्हांला काही कदर येईल. त्याला समजेल हे आहे काय, नाहीतर तुमच्यासारखेच दिसायला दिसतात की नाही? काय त्याच्यात वैशिष्टय आहे? पण ते रूढीगत असल्यामुळे मनुष्याला हे माताजींचे दर्शन हे झालं पाहिजे. मला दर्शन मिळालं पाहिजे. दर्शन खरं तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या आत्म्याचं झालं पाहिजे की नाही? आता थोडं सूक्ष्मात घेऊन बघू या. आपण नेहमी राहतो काय बाह्यात, आतलं अंतरंगात बघत नाही की मी जो आत्मा आहे, तो झालो का? मला आत्मसाक्षात्कार मिळाला का? मी आजपर्यंत इकडे तिकडे शंभर धक्के मारले. ह्याची पूजा कर, त्याची पूजा कर. इकडे ब्राम्हणाला दे, तिकडे त्याला दे. हे सगळे केले. पण मला काही मिळालंय का? माझी शक्ती कुठे दिसली का? मी आई आहे आणि आई तुम्हांला जे परम आहे तेच सांगणार. उलट मला दिसून राहिलंय की, पुढे काय होणार आहे ते. भयंकर प्रकार आहेत म्हणून परत मी तुम्हांला याची जाणीव करून देते, की जर तुम्ही सहजयोगामध्ये पार होऊन नुसते बेकार गेलात तर त्याच्यामध्ये जबाबदारी आमची नाही. ती तुमची जबाबदारी आहे. त्याच्यावर मेहनत करायला पाहिजे. 

    तेव्हा कोणचीही रूढी घेऊ. आता एक म्हणजे इथे लोकांना तंबाखू खायची खूप सवय आहे. महाराष्ट्रात ही तंबाखू राक्षसीण कधीपासून आली माहित नाही. केव्हापासून तिचा अंतर्भाव झाला या देशामध्ये झाला, माहित नाही, पण या राक्षसिनीने सगळ्याना जर्जर करून सोडलंय. अत्यंत वाईट वस्तू आहे, हे खाऊ नये. हे खाल्ल्यामुळे त्रास होतो. असं म्हटलं तर माताजी तंबाखूच्या विरोधात आहेत. म्हणजे काय ती तुमच्या नात्यात होती की काय? तुमचं तिचं काय देणं घेणं लागतं काय? म्हणजे मी विरोधात एवढयासाठी आहे की हजारोनी आज मुलं करोडोंनी जी मुलं परमेश्वरानी एवढया मेहनतीनं बनवली, ती ह्या राक्षसीण, मुर्खिनीच्या हाती फसताहेत. तर काय मी सांगू नये का तुम्हांला? तर त्याच्याबद्दल फार लोकांना नाराजी असते की, माताजींनी असं का म्हटलं? मी काय तुमच्याकडे इलेक्शनला उभी नाहीय. तुमच्याकडे मतं घ्यायला आली नाही. तेव्हा जे काही ठीक असेल तेच मी तुम्हांला म्हणणार आणि सांगणार. मी तुमची आई आहे. ह्याने भयंकर वाईट असे कैन्सरचे रोग होतात. अत्यंत दुष्ट रोग होतात, आणि याच्यापासून कोणालाही सुटका नाही. तेव्हा ज्या लोकांनी तंबाखू घेत असतील त्यांनी थोडा जरासा हिय्या केला तरी सहजयोगात तंबाखू अगदी सुटली पाहिजे आणि उगीचंच पैसे फेकण्याची काय गरज आहे, मला समजत नाही. जर तुमची सुटू शकते आणि हजारो लोकांची सुटली तर तुमची का सुटू नये? एवढा नेभळटपणा कशाला? थोडं हिमतीचं काम आहे. काय तुम्ही  आम्हांला आम्ही जेलमध्ये जायला सांगत नाही, की हातात झेंडे घेऊन औरंगजेबाशी लढा म्हणून सांगत नाही. मावळ्यांसारखं तुम्हांला रानावनात फिरायला सांगत नाही. सरळ घरामध्ये बसून ध्यानधारणा करून एक घाणेरडी वस्तू आपल्या डोक्यात गेलेली आहे ती काढली पाहिजे, असं म्हटलं तर तिकडे         एक लहानशी गोष्टसुद्धा तुम्ही परमेश्वरासाठी करायला तयार नाही, आणि परमेश्वराने मात्र आम्हांला हे दिलं पाहिजे, परमेश्वराने ते दिलं पाहिजे रोज मागत असता. तुम्ही काय देणार आहात परमेश्वराला हाविचार मनाशी ठेवला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की या तंबाखूचीच घेतली तर, त्या विठ्ठलाचे नाव घेऊन टाळ कुटत बसायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आणि तोंडामध्ये ही तंबाखू. ही तंबाखू विठ्ठलाच्या अगदी विरोधात आहे. पुतनाच आहे म्हटलं तरी चालेल. ही तंबाखू तोंडात ठेऊन विठ्ठलाचे नाव घ्यायचं तर तोंड तरी स्वच्छ असलं पाहिजे निदान. नुसते त्याच्याशी टाळ कुटत बसले तर त्याने काय फायदा होणार आहे. बरं ते जरी करत असले तुम्ही, रूढीगत आहे. आपल्याकडे एक विठ्ठल विठ्ठल करत बसण्याची पद्धत आहे. पण आता अशी वेळ आली आहे की, समजा विठ्ठल येऊन तुमच्यासमोर उभा राहिला तुम्ही ओळखणार कशे? प्रश्न विचारा, तुम्ही ओळखू शकता का विठ्ठलाला? साक्षात विठ्ठल तुमच्या समोर उभे राहिले, तुम्हांला कळणार आहे का विठ्ठल कोण आहे? कसं कळणार? कसं कळणार? कारण अजून अंधार आहे डोक्यात. दिसणार कसा तो तुम्हांला? ओळखायला कसा येणार? विठ्ठलाला ओळखायला सुद्धा तुम्हांला आधी आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे; आणि त्याच्यात रुजलं पाहिजे, नाहीतर हलकंच चालतं मग दिसतच नाही. विठ्ठल जरी उभा असला तरी तो ओळखायला येणार नाही. डोक्यामध्ये घुमश्चक्री चालू असेल. एवढंही मान्य करतात लोक की आहे बाबा काहीतरी आहे पण ते खरोखर काय आहे, त्याला लोक आत्मसात करत नाहीत, आणि मानत नाहीत त्याला कारण असं की अहंकार मनुष्याला अहंकार फार आहे.तुम्हांला मानायचं म्हणजे अहंकार. तो अहंकार कसा जिंकायचा? मग त्यानी काही त्रास झाला तरी चालेल, पण तो अहंकार असला पाहिजे. आतापर्यंत या अहंकाराने कोणत्याही साधू- संन्याशाने, कोणत्याही मोठ्या संताने कोणत्याही मोठया अवतरणाला तुम्ही ओळखलं नाही. त्यांचा छळ केला. या महाराष्ट्रात किती साधू- संत झाले, आणि इतके श्री राम आणि सीता अनवाणी ह्या ह्याच्यात चालले, कुणी ओळखलं का त्यांना? कोण होते म्हणून? ते मेल्यावर मात्र तुम्ही त्यांच्या गाथा गाता. त्यांची मंदिरे उभारली. मोठमोठ्या त्यांच्या आख्यायिका लिहिल्या. काय काय लिहून ठेवले आहे बाड पुराण. ते मेले, ते मेल्यावर मग ‘हरे रामा हरे कृष्णा’ करत बसायचं आणि ते जिवंत असताना मात्र त्यांचा पूर्णपणे छळ केला, आणि छळ नसेल केला तर तुम्ही त्या छळाला साक्षी होते. तेव्हा कुणी उठून बोललं का रामाला किती त्रास होतोय, की सीतेला किती त्रास होतोय. ते वानर आले त्यांची मदत करायला. माणसांनी मदत केलेली कुठे ऐकायला येत नाही. एका माणसानं येऊन हातात शस्त्र घेतलं असलं तर चला आम्ही पण धरू तुमच्याबरोबर रावणाशी भांडायला. त्या मानवातनं तुम्ही आलात तरी परमेश्वराची अत्यंत कृपा आहे. काही जर तुम्ही संत साधूंचं केलं असतं. त्यांनी केवढे माझ्यावर उपकार केलेत. आज महाराष्ट्रातल्या संत- साधूंमुळेच माझे हे कार्य होणार आहे. आता परवा एक नामदेव येऊन उभे राहिले, ते म्हणाले की, नामदेवाचा मी भक्त आहे. मला नामदेवांनी सांगितलं देवाचं नाव घेत राहा. असं का? म्हटलं आणि           देवाचं नाव घ्या आणि परमेश्वर आला आणि म्हणाला, आत्मसाक्षात्कार घ्या, तर घ्यायचा नाही की कोणची रीतझाली? म्हणजे नामदेवांचे तुम्ही नाम वाढवून राहिले की त्याला कलंक लावता? असा मी प्रश्न त्यांना ठाम विचारला. कशावरनं तुम्ही हे सांगता, उद्या जर ज्ञानेश आले तर ते काय म्हणतील की तुम्ही आत्मसाक्षात्कार घ्यायचा नाही. त्यांनी जे पसायदान लिहून ठेवलेले आहे. त्याच्यात लिहिलेलं आहे, ब्रह्माचं एकत्व साधेल तो हा सहजयोग आहे. त्यांनी जे वर्णन केलं होतं तोच हा सहजयोग, तोच हा महायोग आहे आज आणि त्याच्या नावावर दिंड्या घाला,  त्याच्या नावावर झिंगत पडा, पण त्यांच्या नावावर आत्मसाक्षात्कार घ्यायचा नाही, त्याला मनाई आहे. आत्मासाक्षात्काराला मनाई जर कुणी संतसाधूंनीकेली असेल तर ते साधू- संत नव्हतेच की ते स्वयं साक्षात्कारी लोक आहेत. तेव्हा अशारितीने भरपूर पंथ निघाले आणि त्यांनी सगळ्यांनी आपल्या खिशात घालून घेतलं सगळं. हा सर्व संत साधूनांआपण खिशात घातलं आहे, आणि वाटेल तसं त्यांना वागवून घेतलं आहे. अश्यारितीने ह्या रूढी पुण्यात सुद्धा पुष्कळ रीतीने रुजलेल्या आहेत. तेव्हा मला सांगायचं असं आहे की आता त्या संत-साधूंनी सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही जी अपराभक्ती केली होती ती पराभक्ती म्हणजे तुमचं परिवर्तन झालं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही जे इथे बसून माझी वाट पाहत होता, तो पर्यंत आपले संबंध अपरा होते. मी तुम्हांला पाहिलं नव्हतं, भेटले नव्हते. आता भेटल्यानंतर मात्र पराभक्ती सुरु झाली.तसेच परमेश्वराच्या साम्राज्यात गेल्याशिवाय तुमची पराभक्ती होणार नाही. म्हणून परमेश्वराच्या साम्राज्यात आलं पाहिजे. भक्तीची दोन रूपं कुठंही वाचली तरी आहेत, की परा आणि अपरा. पण आपण नुसतं टाळ कुटत बसलं म्हणजे आपल्या बापजाद्याने कुटले, त्यांच्या बापजाद्यांनी कुटले. वाडवडील हेच धंदे करत आले तरी हजारो वर्षांपासून टाळ कुटत बसले. त्यांनी कुणाला काही मिळालेलं दिसत नाहीय. कुणाच्या आयुष्यात परिवर्तन झालेलं दिसत नाहीय. अशाने कुणाच्यात आत्मा जागृत झालेला दिसत नाहीय, किंवा त्यांच्यात कोणचाचप्रकाश आलेला दिसत नाहीय. वेड्यासारखे आपले टाळ कुटत बसतात, आणि हे टाळ कुटून जर त्यांना मिळालेलं नाही तर तुम्हांलाही मिळणार नाही. तुम्हीच होते पूर्वीकाळी, तुम्हीच होते. तुम्ही खूप टाळ कुटले. परवा एक बाई मला म्हणाल्या, माताजी मला असं एक स्वप्न येतं, मी या क्षेत्रस्थळी गेले होते, त्या क्षेत्रस्थळी गेले होते. परत त्याच क्षेत्रात गेल्यावर मला दिसतं की मी या क्षेत्रस्थळी गेले होते म्हणून तिथं गेल्यावर पुन्हा साक्षात होतो, म्हटलं, अहो तुम्ही पुष्कळ जन्म हेच करत राहिला आता आतलं क्षेत्र बघा. ते मिळवा. क्षेत्र बाहेरचं कुठलं आता आतलं बघा. सूक्ष्मात उतरायला नको का? पण सूक्ष्मात उतरायला हवे म्हणजे काही विशेष करायला नको. सहजयोगात इतके आम्ही मेहनत करून हा असा तयार केला आहे की प्रत्येकाला सहज लाभ होतो. पण सहज लाभ झाल्यावर सुद्धा, आम्ही स्वयंपाक केला आणि तुम्हांला वाढलं, तोंडातही घातलं आणि कोंबलं सुद्धा, तरी ते पचवावं तुम्हांला लागेल. ते पचवण्याचं तेवढंसं जे कार्य सहज आहे ते सुद्धा लोक करत नाहीत. त्याच्यात उतरत नाहीत आणि उद्या मग जर त्रास झाले की, माताजी आम्हांला हे झालं, आम्हांला ते झालं. वेळ नाही ध्यानाला, वेळ नाही. सर्व धंदे करायला वेळ आहे, पण वेळ ध्यानाला नसतो. इथपर्यंत आहे की, समजा जर इथे प्रोग्राम झाला माझा, उद्या जर दुसऱ्या पेठेत झाला तर, माताजी एवढया लांब यायचं कसं? पण उदया जर सिनेमा असला त्याच्यासाठी जायला तयार आहे. ही आपली जी उथळ प्रवृत्ती आहे, सखोलपणा माणसात जर नसला तर अशा येडया-गबाळ्याचे काम नव्हे हे. येडया-गबाळ्याचे काम नव्हे हे. येडया-गबाळ्याचे असं भलं होणार आहे, पुढे ते तुम्ही बघत राहा म्हणून अशा लोकांनी सहजयोग करू नये. अशे जे अर्धवट लोक आहेत त्यांच्यासाठी सहजयोग नाहीय आणि त्यांच्यासाठी परमेश्वर नाही. जी मंडळी खरोखर समर्थ होऊ इच्छितात आणि मेहनत करतील आणि विशेष तऱ्हेचे राष्ट्र आपण निर्माण करणार आहोत. विशेष तऱ्हेची एक जाती तयार होणार आहे, जी सहजयोग्यांची आहे. ती जर स्थिती तुमच्यात आली नाही तर सहजयोगाला काही अर्थ नाही आणि तुम्हांला तर मुळीचअर्थ राहणार नाही. आता आमच्या बरोबर चौदा देशातनं लोक आले त्यांची मेहनत बघा. सकाळी चार वाजता अंघोळ करून ते लोक ध्यानाला बसतात. इतक्या लांबून इथे तुमच्या महाराष्ट्रात फिरायला आले.  आणि इथे चैतन्याच्या लहरी आहेत. त्यांच्यामते तुम्ही काहीतरी पूर्वजन्माचे संचित केलेले आहे. फार मोठे पुण्यवान आत्मे आहात, म्हणून या पुण्यभूमीत जन्माला आले. तुमच्या दर्शनास ते आले. आता तुम्ही आपल्याबद्दल विचार करा की तुमच्यामध्ये सांगड आहे का हृदयाची आणि बुद्धीची. जी काय आस्था आहे ती किती उथळ आहे. आता माताजी दिसल्या, दर्शन झालं…. झालं. याच्या पलीकडे काही नाही. फार तर एखादा आजार असला बरा झाला म्हणजे झालं. त्यांनी काही कामं होणार आहेत का आमची? जर तुमच्या देशात काम नाही मिळालं तर आम्ही दुसऱ्या देशात जाऊन काम करू, हे मी स्पष्ट सांगते. तेव्हा सहजयोग हा बसवलाच पाहिजे. त्याच्यात मेहनत केली पाहिजे. बाजार-भूणग्यांचं हे काम नाहीय, हे समजलं पाहिजे आणि हे जर बाजार-भुणगे सहजयोगाला लाभले तर असं समजलं पाहिजे की तुम्ही परमेश्वरालाच मना केली आहे.म्हणून एक तऱ्हेची आपल्यामध्ये अशी शिस्त यायला पाहिजे. स्वतःला थोडी शिस्त घालायला पाहिजे, की आदिगंगा आपल्याजवळ वाहत येतेय. आणि ही गंगा आपल्याजवळ वाहत येतेय, तेव्हा तिचा उपयोग करून घेऊ. शिस्त ही पाहिजे. शिस्तीशिवाय नाही होणार. स्वतःला कंट्रोल करायला पाहिजे. साऱ्या जगाच्या आपल्याला उठठेवा, उलाढाली सुचतात, पण स्वतःवर तुमचं वर्चस्व नसलं तर तुम्ही कसले समर्थ. स्वतः लेचेपेचे, तुम्ही करणार काय? हा काय मराठयांचा पाणीदारपणा नव्हे, किंवा या पुण्यातल्या पेशव्यांचा गुण नव्हे. हे कुठले तरी बाजार-भुणगे जन्माला आले असं मला पुष्कळदा वाटायला लागलंय. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी आपल्यामध्ये जाणलं पाहिजे, आपण आत्मा आहोत आणि आईसारखी जी आपल्याला मिळालेली आहे, आज ती अत्यंत समर्थ आणि मेहनत करणारी बाई आहे. आणि आमची जी अशी आई आहे तिच्यासमोर असे लेचे-पेचे काम करून चालणार नाही. आमच्यात शिस्त असायला पाहिजे. आम्ही सहजयोग पूर्णपणे वठवून घेणार आणि पुढे वाढवणार. दहा लोकांना सहजयोगाचं सांगितलं पाहिजे. उठून हळदी- कुंकवाला यांना- त्यांना बोलवायचं, त्यापेक्षा सहजयोग्याना बोलवा. हळदी- कुंकवाला बोलवून त्यांना सहजयोग सांगता येत नाही. अहो, सहजयोगाबद्दल बोलत सुद्धा नाहीत. उलट तुम्हांला बरं नाही, आता माताजी येणार आहेत मी घेऊन जातो, तुम्हांला ठीक करून देतो. सहजयोग काय ते तरी समजून सांगितलं का तुम्ही? एकदा समजावून सांगा, लोकांना म्हणा बघा हे. हे सर्वात मोठं सत्कर्म आहे आणि ते तुमच्या हातातनं होतंय. केवढं मोठं पुण्य लाभेल तुम्हांला, की हे परमेश्वराने तुम्हांला दिले. कशाला गुरु पाहिजेत. स्वतःच गुरु आहात. तुम्हीच ते गुरुत्व घ्या आणि मेहनत करा. जर ही मेहनत केली तर तुमच्या डोक्यावर पुष्पांचा वर्षाव होईल. देवाचा मुकुट शोभेल आणि तुम्हांला लोक संत साधू म्हणून तुमची पूजा करतील. आणि या अशा वरवरच्या गोष्टींनी राहिलात, तर त्याने काही फायदा होणार नाही.पुष्कळ लोकांना असं वाटते की जे लोक माताजी, वाईट रीतीने वागतात, पैसे खातात, लोकांना मारतात, दुष्टपणा करतात त्यांचेच जगामध्ये फार प्रबळ राज्य आहे. ते चुकीचं आहे. अशा लोकांचे कोणी पुतळे उभारत नाहीत आणि त्यांना हार घालत नाहीत. तुम्ही ऐकलंय का कुठे? दारुड्यांचे कुणी पुतळे उतरलेत. जे लोक डबल डबल कामं करतात, त्यांचे कोणी पुतळे उभारत नाहीत, जरी उभारले तरीसुद्धा उदया ते मेल्यावर ते पुतळे जमिनीत गाडतील आणि त्यांच्यावर थुंकतील. त्यांचे नाव सुद्धा राहणार नाही. तेव्हा त्यांच्यातले तुम्ही लोक होऊ नका. उदया इतिहासात लिहिलं जाईल, इतक्या लोकांना सहजयोग मिळाला, इतके त्यांच्यासाठी केलं, सगळं वाया गेलं. काही कामाचे नाहीत, म्हणून मी तुम्हांला आज सांगते खरोखर ही अतिकृपा परमेश्वराची आहे, की तुम्हांला इतक्या स्पष्ट शब्दांत सांगून राहिलेय कीशिस्त ही सहजयोगात पाहिजे. ध्यानधारणेशिवाय सहजयोग येत नाही. ध्यानधारणा ही केलीच पाहिजे, त्याच्याशिवाय सहजयोग येणार नाही. त्याचे लाभ तुम्हांला होणार नाही. आणि माताजी आल्या म्हणजे हे काही असं नाही. माताजी आल्यावर काय, माताजी आहेतच प्रत्येक वेळेला आणि तुमच्या हृदयात सुद्धा त्या आहेत. तेव्हा ह्या ज्या काही या गोष्टी आहेत त्या आपल्या डोक्यामध्ये बसलेल्या आहेत त्या काढून टाकल्या पाहिजेत आणि परमेश्वराकडे आपली दृष्टी लावली पाहिजे. आता दुसरी बाजू अशी आहे की अशे ही पुष्कळ शिष्ट असतील, बुद्धिवादी लोक. जे स्वतःला फार अतिशहाणे समजतात. मराठी भाषेत फार सुंदर म्हणी आहेत, त्यापैकी दीड शहाणे, अतिशहाणे असे पुष्कळ पुण्यात आहेत. पुणं म्हणजे गजबजलेलं आहे अशा लोकांनी, आणि ते स्वतःला फार शिष्ट समजून परमेश्वर नाही हेच सिद्ध करत आहेत. म्हणजे ते स्वतः परमेश्वर दिसतात मला. तेव्हा अशा लोकांच्या कह्यात येऊ नये. वादविवादाने सहज वाढत नाही. रामदास स्वामींनी सांगितलंय ‘मिटे वाद संवाद ऐसा करावा’ ज्यांनी वाद मिटेल असा संवाद करा. नुसता बोलून बोलून बोलाचाच भात बोलाचीच कढी. आपसांमध्ये बोलणंबोलणंबोलणं त्याने काही होणार आहे का? सहजयोगामध्ये मनुष्य किती गहन उतरला आहे ते पाहायला पाहिजे. एक साधा गाडीवान सुद्धा मी बघते, सहजयोगामध्ये एवढा गहन आहे आणि फार आपल्याला विद्वान समजणारा, हुशार समजणारा महामूर्ख आहे. कबीरानं म्हटलंच आहे ‘पढी पढी पंडित मुरख भई’ ते अशाच मूर्खाना बघून सांगितलं आहे. शिकून शिकून एवढं डोकं खराब झालं, आता सहजयोगावरही वाद विवाद, चर्चा. अहो, काय वाद विवाद करता तुम्ही? काय वादविवाद करून तुमची कुंडलिनी जागृत केली का मी? त्याच्यावर वादविवाद करायचा, उहापोह करायचा, भाषणं द्यायची, बोलायचं त्यांनी, काय अर्थ नाही. अशी भाषणं दया ज्यांनी कुंडलिनी जागृत होईल, प्रत्येक शब्द हा मंत्र असायला हवा. जे बोलाल ते कार्य म्हणजे परमेश्वराचं कार्य. प्रत्येक हाताला हालचाली प्रत्येक परमेश्वराचं चैतन्य वाहायला पाहिजे, तर त्याला काहीतरी महत्त्व असते, नाहीतर आपलं बोलायचं म्हणून बोलायचं त्याला काय अर्थ आहे. अशे मी पुष्कळ आता लोक बघत आहे. सहजयोगामध्ये मला फार आश्चर्य वाटतं, आणि हे लक्षात येत नाही की आज आपला सर्व समाज, आपली सर्व सृष्टीच म्हटली पाहिजे, तर ती नरकाकडे धावत चाललीय.नरकाकडे धावत चाललीय. नरक सगळीकडे, नरकाच्या भावना आहेत. स्वतःचा स्वार्थ. स्वार्थापलीकडे लोकांना काही सुचत नाही. स्वार्थापायी वाट्टेल ते झालं तरी चालेल अशे स्वार्थी, महास्वार्थी राक्षस जगात जन्माला आलेले आहेत. तेव्हा अशावेळेला कमीत कमी परमेश्वराचं राज्य संपन्न केल्याशिवाय कसं होणार आहे. तुम्ही जर स्वार्थी झाला तर परमेश्वराचं राज्य कोण संपन्न करणार? उदया तुमच्या मुलांचे हाल- अपेष्टा झाले तर ते तुमच्यावरच आहे, तेव्हा त्यांच्या विचाराने तरी मनुष्याने असा विचार करायला पाहिजे की आज जर आमची जागृती झाली तर वचन दिलं पाहिजे. माताजी आम्ही उदया वृक्ष होऊ. आज अंकुर फुटले, उदया आमचे वृक्ष झाले पाहिजेत आणि एकाहून एक सुंदर वृक्ष झाले पाहिजेत. त्याच्यात ते, श्री माताजी माझ्याकडे या, माझ्या मुलाला बघा, माझ्याकडे या माझ्या भावाला बघा. हे, हे करण्यात काय अर्थ नाही. माझा, माझा, माझा करण्याने आपल्या देशाचा सत्यानाश झाला आहे.माझ्या मुलाचं भलं झालं पाहिजे, माझा मुलगा अमका झाला पाहिजे त्याचे हे झालं पाहिजे. माझ्या मुलीचं असं झालं पाहिजे. हे कोणी तुमच्या साथीला उभे राहणार आहेत? जेव्हा शेवटली वेळ येईल त्यावेळेला तुमचं पुण्य मोजलं जाणार आहे. आणि आज तुमच्या पुण्याईच्या दमावरच, तुम्ही पुण्यात जन्माला आलात, तुम्ही सहजयोगात आलात. त्या पुण्याईच्या दमावरच आज तुम्ही पार व्हा, तेव्हा त्या पुण्याईला आता वाया दवडायचं नाही. फक्त थोडीशी मेहनत पाहिजे आणि ती जर केली तर सहजयोगामध्ये तुम्ही इतके उंच उठू शकता आणि इतकं कार्य करू शकता आणि इतकं काही लोकांना देऊ शकता की जशे वटवृक्ष होऊन राहिले. एका वर्षामध्ये एका लहान बियांचे काही जसं वटवृक्ष झाले. सगळ्यांच्या तुमच्या छत्रछायेमध्ये लोकांना आनंदाच्या नुसत्या सागरात पोहायचे. अशीही मंडळी आहेत, पण फारच कमी, बोटावर मोजणारी मंडळी आहेत. आणि त्यांची मेहनत त्यांचा त्याग बघितला म्हणजे मला असं वाटतं की कधी न कधी इतर लोकसुद्धा तशेच होतील. पण तुम्ही प्रत्येक मनुष्य होऊ शकतो. प्रत्येक मनुष्याला ही घटना होऊ शकते. प्रत्येकाला ही जागृती होऊ शकते, उगीचंच दुसऱ्यांच्यावरती नेहमी ढकलून कामं करायची. दुसऱ्यांनी तुमच्या साठी प्रार्थना करायची, चालेल का तुम्हांला? दुसऱ्यांनी जेवलेलं तुमच्यासाठी चालेल का? नाहीतर असं म्हणायचं तुम्ही जेवा आम्ही बसतो, असं करता का तुम्ही? मग माताजी मला होत नाही वेळ सकाळी मला… नका जेऊ. जेवण एकवेळ सोडता येईल का तुम्हांला? ध्यान हे परमेश्वराच्या साम्राज्यात रमण करण्याचे एक साधन आहे. एकदा त्याच्यात तुमचे रमण सुरु झालं मग (अस्पष्ट) सुरुवातीला जरा त्रास आहे, सुरुवातीचे जवळ जवळ एक दोन महिने थोडा त्रास होतो. एकदा मनुष्य रमू लागला म्हणजे मग त्याला दुसरं काहीच आवडत नाही. त्याच्यातच तो रमतो, पण ते दोन महिने मेहनतीने सातत्याने याच्यात लागलं पाहिजे.             केलं पाहिजे. त्याच्यात जर तुम्ही जर रमले, मग आश्चर्य वाटेल, मग दुसरं नको रे बाबा. कोणी बिघडलं तर बिघडू देत. कुणी रागावले तर रागाऊ देत. समाज संग सुटला तर सुटला. पण हे अमृत जे मिळालंय ते आम्ही सोडणार नाही हे अमृत एकदा जमवून घ्यायला पाहिजे (माईक कडे दाखवून) ह्याचं कनेक्शन नीट व्हायला पाहिजे, हो की नाही?‘नित्यां नि अभियुक्ताना’ म्हणूनमाझी सर्वाना हात जोडून कळकळीची विनंती आहे की, आज जरी मी तुम्हांला पार केलं, तरी काही तरी एखादा मेळावा किंवा काही तरी एक प्रदर्शन किंवा तमाशा करू नका. हे फार महत्त्वाचं मिळालेलं आहे. ते जपून वाढवलं पाहिजे. मेहनत करायला पाहिजे. केंद्रावर यायला पाहिजे. जर तुम्ही ते करू शकले नसला तर तुम्ही अगदी बेकार लोकं, आणि तसं करू नये. मला साताऱ्याला फार आश्चर्य वाटलं, साताऱ्याला प्रोग्राम झाला, इतके लोक आले होते. त्यातले निम्म्याने लोक परत आले. माताजी, आम्ही करायला तयार आहो. आम्ही मेहनत करू, असे लोक सरसावून पुढे येणारे आहेत. कुठे गांधीजी, गांधीजींच्या वेळेला मी तुम्हांला सांगते, लोकांनी आपली घरंद्वारे टाकली. मुलंबाळे टाकली आणि जेलमध्ये जाऊन बसले. आजकालचा जमाना असा आला आहे, की मनुष्याला काहीही करायला नको. नुसतं बसून व्यवस्थित सगळं माताजींनी आमच्या गळ्यात घालावं. स्वतः काही मेहनत करायची नाही. काही करायचं असेल तर माताजीना किती त्रास देता येईल, त्यांना किती वेळ देता येईल हेच आहे. पण आम्ही काही करून दाखवू अशी काही कर्तबगारी फार कमी म्हणून मला आज प्रमिलाताईना भेटून फार आनंद झाला, आणि इथे इतर सहजयोगी काही मंडळी इथे आहेत, त्यांनी स्वतः कार्य केलेले आहे. तसंच तुम्ही सर्वांनी प्रत्येकाने एकेकाने स्वतःवर जबाबदारी घेतली पाहिजे. सहजयोग म्हणजे तुमच्यात असलेल्या कुंडलिनीचे जागरण आहे. त्यात काही विशेष नाही. तुमचं तुमच्याजवळ आम्ही देतोय. तुमची किल्ली तुम्हांला दिली. तुमची जी संपदा आहे ती तुम्हांला देतोय, काही आम्ही विशेष करत नाही. देणं-घेणं लागतं नाही आमचं तुमच्याशी, पण तुम्हांला आम्ही तुमची संपदा दिली. अहो, किल्ली तर उघडा, आणखीन काय काय नाही तर किल्ली तर उघडा, त्यातलं काय ते तर बघा. त्याचा उपयोग तर करून घ्या. ते सुद्धा, त्याच्यासाठीसुद्धा आरडओरडा करावा लागतो. म्हणजे कायसांगावं आता, तुमचं आहे ते तुमच्याजवळ दिलं. हा आत्मा तुम्हांला मिळाला. फक्त तिथे थोडसं चिकटवून घ्यायचं. नामदेवांची फार सुंदर कविता एक आहे. ती कविता श्री नानाकांनी आपल्या ग्रंथसाहेबामध्ये घेतली आहे. ते किती मोठे ते असले पाहिजेत. सगळं साक्षात्कारी लोकांच्या कविता त्यांनी आपल्या ग्रंथसाहेबात लिहिल्या आहेत. त्यात मराठीत आहे,           त्यात गुरुमुखी सारखी वाटते. त्या कवितेत त्यांनी असं म्हटलेले आहे की साक्षात्कारी पुरुष असा असतो जसा एखादा लहान मुलगा पतंग उडवतो. पतंग भरारी आकाशात फिरत आहे आणि तो इतरांशी बोलतो, हसतो, खेळतो पण लक्ष त्याचं त्या पतंगावर आहे, दुसऱ्या पंक्तीत सांगितलं आहे की बायका विहिरीवर गेल्या, पाणी भरलं. तीन-तीन घागरी डोक्यावर घेऊन चालल्या आहेत. घर घरात जायचंय. घाईने चालल्यात, त्या सगळ्यांशी बोलतात, हसणं, खेळणं सगळं चाललेलं आहे पण तरी सुद्धा लक्ष त्या घागरीवर आहे. ती घागर पडली नाही पाहिजे. तिसऱ्या पंक्तीत सांगितलंय एक बाई आहे. तिचं लहान मूल आहे. त्या मुलाला कमरेवर घेऊन सैपाक करतेय, झाड-लोट, सारवण सगळं काम करतेय. पण हे सर्व करताना सुद्धा लक्ष तिचं आपल्या कडेवर आहे. कारण तिथं तिचे मूल आहे. तसं आपलं लक्ष जोपर्यंत होत नाही, की आपलं लक्ष पूर्णपणे आत्म्यावरच आहे. इतर काही गोष्टीवर नाही. तोपर्यंत असं जमत नाही. तोपर्यंत तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये चमक नाही. परमेश्वराचं चैतन्य नाही. प्रत्येक कटाक्षामध्ये निरीक्षण असायला पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष तुमचा एक डोळा जरी उचलला गेला आणि तुम्ही काही पाहिले की तिथे चैतन्य पोचलं पाहिजे, ही स्थिती तुमची होऊ शकते. पण तसं तुम्ही स्वतःबद्दल विचार कुठे करता? त्याची जबाबदारी तुम्ही घेत नाहीत. तसं झालं तर सगळं करायला आम्ही समर्थ आहोत. ते सगळं करायला आम्ही समर्थ आहोत. आणि ते होऊ शकतं आणि तुम्हीसुद्धा ते समर्थ आहात. तेव्हा आपल्या आईकडं बघावं. तिच्या मेहनतीकडं बघावंआणि थोडीशी मेहनत तुम्हीपण घ्यावीत. तुम्हांला आता दोन दिवस पुण्याला आलेय तर तुमची झाली काय, थोडे-बहुत आले काय संध्याकाळला फार उपकार झाले तुमचे असे आहे. पण मी मात्र प्रत्येक दिवस मेहनत करते. प्रत्येक दिवस, आणि आता हे वय माझं झालेलं आहे तरीसुद्धा हे एवढयासाठी करते की एकदा तरी या लोकांना जागृती दिल्यावर त्यांना काहीतरी वाटेल. काहीतरी वाटलं पाहिजे आतून आणि ते आल्याशिवाय होणार नाही. तेव्हा जागृत व्हायला पाहिजे. माणसाने जागृत व्हायला पाहिजे आणि विचार केला पाहिजे. आज आम्ही उभे कुठे आहोत? ह्या आणिबाणीच्या काळी आपण करतोय काय? आणि आपली जबाबदारी काय आहे. आता मी सर्वसाधारण मनुष्य आहे माताजी माझं काय? अहो, सर्वसाधारण माणसंच करणार आहेत. मोठी माणसे करणार नाहीत आणि लहान माणसंही करणार नाहीत. सर्वसाधारण जे मध्यात आहेत तीच मंडळी हे कार्य करतील. एकदा ते कार्य सुरु झालं म्हणजे मग (अस्पष्ट) तेव्हा जी लोक सर्वसामान्य आहेत’, त्यांच्यासाठी सहजयोग आहे. जे घर गृहस्थित बसलेत त्यांच्यासाठी सहजयोग आहे. जे संतुलनात आहेत त्यांच्यासाठी सहजयोग आहे. आणि तुमच्यासाठी आम्ही पूर्णपणे असल्यावर तुम्ही थोडीशी मेहनत नको का करायला? तेव्हा आपल्याला मी इतकं काही म्हटलं ते लक्षात ठेऊन आईला कळकळ वाटते. मी जर काही म्हटलं तर त्याचं वाईट नाही वाटून घ्यायला पाहिजे. तिला कळकळ वाटते. एकंदर परिस्थिती बघते मी हळूहळू इतकी बिघडत चाललीय, तुम्हांला जर वेळीच जागं नाही केलं तर त्याचा फार त्रास होईल. तेव्हा इतक्या कळकळीने मी तुम्हांला सांगितलं आहे. आपल्यामध्ये शिस्त नाही म्हणजे काय? आम्ही कुठले राहणारे? अहो या महाराष्ट्रातले राहणारे आम्ही लोकं आहोत. अशे लेचे-पेचे लोकं नाहीत, असं स्वतः मध्ये विचार करून एवढी धार्मिकता आमच्यामध्ये आहे. त्या धर्माचा आम्हांला वारसा मिळालेला आहे. संत-साधूंनी आमच्यासाठी मेहनत केली आहे. आणि आम्ही काय हे सर्व वाया जाऊ देणार, असा एक मनामध्ये जर विचार करून स्वतःला जागृत करून घेतलं तर ह्या सहजयोगाला फळे लागायला काही वेळ लागणार नाही. असो! सहजयोग काय आहे? सहजयोग कसा मिळवायचा वगैरे वगैरे. याच्यावर आपण अनेक ऐकलं असेल. पण साधंच एक सांगायचं म्हणजे     आपल्यामध्येच कुंडलिनी  आहे. ही कुंडलिनी म्हणजेच शुद्ध इच्छा. ही शुद्ध इच्छा जागृत करून घ्यायची. इच्छा पुष्कळ असतात माणसाला. त्याला वाटतं की आमचं घर ठीक बांधलं गेलं पाहिजे. घर ठीक बांधलं गेलं. आता मोटार पाहिजे. मग पाहिजे ते, मग ते असं चालू असतं. पण हे सगळं असूनसुद्धा माणसाला सुख मिळत नाही, कारण ज्या देशांमध्ये सर्वांतजास्त श्रीमंती आहे, नौर्वे, सिडनी, किंवा अं… आपण म्हणाल तर स्वित्झर्लंड या तीन देशांमध्ये सर्वांत जास्त समृद्धी आहे आणि सगळं स्वच्छता आहे आणि सर्व काही व्यवस्थित आहे. अत्यंत ऐषोआराम आहे. लोकांजवळ पैसा आहे. सगळं असूनसुद्धा तिथे जर तुम्हांला आश्चर्य वाटेल की तिथले जे तरुण लोक आहेत ते एकाच अं…. गोष्टीचा विचार करत बसतात, की आत्महत्या कशी करायची? त्यांना आत्महत्येचे डोहाळे लागलेत, म्हणजे त्याचा अर्थ स्पष्ट असा आहे की पैशे मिळवून सुद्धा मनुष्य सुखी होत नाही. पैशे मिळूनसुद्धा माणसाला सुख नाही किंवा पैशाच्या मागे धावायचं त्यात काही अर्थ नाही. सत्तेच्या मागे लोक लागले म्हणजे कसे वाया जातात, तुम्हांलाही माहिती आहे. जर तुम्हांलाआपली वाट लावून घ्यायची असेल तर सत्तेच्या मागे धावा. सत्तेच्या मागे जे लोक धावले त्यांना काही अक्कलशून्यता येते. तेव्हा त्याच्यातही सुख नाही. तुम्हांला वाटतं की माझा मुलगा, माझी मुलगीअसं करून सुख असेल तेव्हा मुलं, मुलगी होऊन मोठे झाले आणि त्याने त्यांची वासलात लावली, तेव्हा मग त्यांना कळतं की बाप रे बाप! ह्यांच्यासाठी आम्ही एवढं केलं, काय मिळालं आम्हांला. भाऊ हा माझा भाऊ, ही माझी बहीण त्यांच्यासाठी काय करून ते वायागेलेत, ते समजतंय. त्याच्यानंतर माणसाला कधी- कधी असं वाटतं की आम्ही काहीतरी मोठं सामाजिक कार्य करून दाखवावं, म्हणजे गरिबांना आम्ही पैशे देऊ, हे देऊ ते देऊ. त्याच्यातही सहजयोगामध्ये फार प्रथा वाईट. सहजयोगामध्ये आम्ही असा विचारच करत नाही की दुसरा कोणी आहे, कारण तुम्ही सामूहिक चेतनेत जागृत होता. तुमच्यात सामूहिक चेतना जर आली तर तुम्हांला असं म्हणावं लागतं नाही की या माणसावर आम्ही उपकार करतो किंवा काय म्हणजे जर काय ह्या बोटाला जर दुखलं तर मी जरासं हात लावला की चोळून घेतले तर मी कोणावर उपकार केले? माझ्यावरच उपकार केले कारण माझंच बोट दुखतंय. माझंच बोट दुखून राहिलंय, ते मी ठीक केलं, त्याच्यात मी कुणी कुणावर उपकार केले? म्हणजे दुसरा कोणी? मग कुणावरही उपकार, सामाजिक कार्य वगैरे हे सर्व बाहयातलं काम आहे. सूक्ष्मातलं काम जे आहे ते (अस्पष्ट) हे जे बह्यातलं ज्ञान आहे हे एखादया झाडाचं ज्ञान असावं असे आहे. एखादया झाडाला कीड लागली तर त्याच्या पानांना आपण जरी ट्रेटमेंट दिली तर त्या पानं काही ठीक होऊन झाड ठीक होणार नाही. त्याच्यातही कीड जाणार नाही. आपल्याला त्याच्या मुळात उतरायला पाहिजे, आणि त्या मुळात उतरण्यासाठी आपल्याला सूक्ष्म व्हायला पाहिजे. आणि ते सूक्ष्म होण्याची व्यवस्था त्या परमेश्वराने आपल्या आतमध्ये करून ठेवलेली आहे. ती सहजच आपल्यामध्ये ती व्यवस्था होऊ शकते. तिचा आपण उपयोग केला पाहिजे. त्याच्यात आपण वाढ करून घेतली पाहिजे, आणि सूक्ष्म झाल्यावरच तुम्ही ह्या सर्व झाडांची व्यवस्था करू शकता. तेव्हा आधी सूक्ष्म होऊन घ्या, आणि ते अत्यंत सोपं आहे. त्याला काही करावं लागत नाही. सहजयोगामध्ये कोणच्याही गोष्टीला          आम्ही सांगत नाही, असं नका करू, नाहीतर असं म्हटलं तर अर्धे लोक उठून जातील. त्यांना सर्व पोलिटिकल पुढाऱ्यांची झालेली जे म्हणतात तुम्ही म्हणजे अगदी राजे.  वा वा वा! काय विचारू नका. म्हणून माताजींचं बोलणं कधी कधी नाही आवडत, पण मी काहीही करू नका असं म्हणत नाही. आधी तुम्ही जागरूक करून घ्या. तुमच्यामध्ये उदया जर धर्म जागृत झाला म्हणजे तुम्ही आपोआप सोडून दयाल. आपण आधी जागृत व्हा, आणि फक्त मनाचा हिय्या पाहिजे की,माताजींनी म्हटलं तसं मी आत्मस्वरूप होईन. त्याच्यामध्ये वाद करण्यात, दुसऱ्यांचा दोष करण्यात काहीअर्थ नाही. आपण बसून आपल्याला बघणं आहे. स्वस्वरूपी उतरावे हे आईचे म्हणणे आहे. जे साधू संतानी सगळ्यांनी प्रेमाने सांगितलं, रागावून सांगितलं आणि हरतऱ्हेने सांगितलं ते आज सुरु होत आहे. तर याला आपण घोर कलियुग म्हणतो. त्याचं रुपांतर कधीच कृतयोगात झालेले आहे आणि हे परमचैतन्य आज आलेलं आहे. आपण म्हणतो ना, ‘आगता परमचैतन्य’ ते परम चैतन्यआज आलेलं आहे. जगात ‘पुण्योहम तवदर्शनम’ त्यावेळेला मी माझ्या पुण्यवान भूमीवर जर दर्शन झालं तर कुठे आहेत तसे अहो ते गायच्या वेळेला बोलायचं, बोलायचं. बोलायचाच भात बोलायचाच भात. अरे, विठ्ठला कुठे भेटीशी माझी अरे मी म्हणते तुमच्या हृदयातच आहे, तुम्ही करा तर खरी तिकडे लक्ष माणसाचं नसतं. नसते वाद करून आणि वादविवाद करून आजपर्यंत आम्ही जे केलं ते करायचं. ही वेळ चुकवायची नाही. फार आणिबाणीची वेळ आहे, म्हणून मी निक्षून तुम्हांला सांगतेय, ह्या पुण्यभूमीत विशेष कार्य होऊ शकणार आहे. ही विशेष पुण्यभूमी आहे. आहो! कितीतरी इथे मारुती उभे केलेले आहेत. रामदास स्वामींची कृपा आहे. एवढे मारुती उभे केलेत, तुम्ही नुसता विचार करा. नुसता विचार करायचा की हे मला करायचं आहे. निश्चय करा,एकेकाला एक एक मारुती उभा राहिलं. तुम्हांला वाटतं काय की, परमेश्वराची कृपा आज ह्या पुण्यावर आहे. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी नतमस्तकानी आपल्या हृदयामध्ये असा विचार ठेवायचा, की आज जर आम्ही पार झालो तर आम्ही हा हिय्या करणार, पूर्णपणे हे आम्ही व्रत घेणार की, आम्ही आत्मा होणार, आणि जे झालेले आहेत त्यांनी सुद्धा परत सरसावून पुढे आलं पाहिजे, की हो, आम्ही करणार. कोणत्याही आपल्या मनाच्या दुर्बलतेची छायासुद्धा येऊ नाही दिली पाहिजे, किंवा त्याच्यावर अहंकाराचा वाससुद्धा दिला नाही पहिजे. मनुष्याने पूर्णपणे विचार करून सहजयोगामध्ये उतरावे, म्हणजे तुमचे अनेक रोग-व्याधी, हे दैन्य सगळं काही नष्ट होऊन मनुष्य कुठल्या कुठे पोचेल. पण फक्त त्या साठी माणसाचा पूर्ण हिय्या असायला पाहिजे. आणि मला पूर्ण आशा आहे की, जर पूर्वी तुम्ही अनेक लढयांमध्ये लढले, तसा हा शेवटला लढा आहे. हा जिंकल्यावर परमेश्वराच्या साम्राज्यात, आनंदाच्या सागरात पोहत रहायची वेळ आली आहे. सगळ्यांना माझा अत्यंत प्रणिपात, आणि परत परत हेच म्हणणे आहे की कृपा करून आत्मास्वरूप व्हावे. आत्म्याला, बह्यातले सगळे सोडून आत्मस्वरूप व्हावे. हाच माझा आशीर्वाद सगळ्यांना आहे. टाळ्या…..

         आता काही प्रश्न असेल तर विचारा, थोडावेळ पण त्याच्यानंतर आपण ध्यानाचा प्रोग्राम करू आणि फाल्तुक प्रश्न विचारू नका. त्याचं म्हणणं असं आहे की, ज्यांची जागृती झाली, माताजी ते तर प्रश्न विचारतच नाहीत आणि जे फाल्तूचे लोक आहेत, ज्यांची जागृती नाही झाली, तेच विचारत बसतात. (हसत). तेव्हा प्रश्न विचारायलाच सांगू नका. कारण खरीच गोष्ट आहे. ज्याला एकदा अनुभव आला, मग तो कसला प्रश्न विचारणार, आणि ज्याला अनुभव नाही आला तो आधी दारात जायच्या ऐवजी बाहेर उभा राहून आपले प्रश्न विचारतो मूर्खासारखा. ही गोष्ट खरी आहे. पण असला काही एखादा प्रश्न तर विचारायला काही हरकत नाही. मी सांगायला तयार आहे. हा, प्रश्न असा विचारा की ज्या प्रश्नाला काही तरी सांगोपांग असायला पाहिजे, म्हणजे काहीतरी विस्कळीत प्रश्न विचारला तर, तुमची आई फार हुशार आहे ती तुमच्याच गळ्यात घालेल तो प्रश्न. तेव्हा असा-तसा विचारू नका. जरा जास्तच हुशार आहे मी. (हास्य) काय करणार? पाहिजे नं हुशारी. मुले फार हुशार झाली, त्यांना सांभाळायला जरा हुशारी लागते, आहे की नाही? हा काय प्रश्न आहे?

प्रश्न: माताजी, उपास करतात, नैवद्य दाखवतात, वगैरे. आपल्यात हे करत नाहीत. नाही केलं तर नाही काही वेळेला त्रास होतो ना, आपल्यामध्ये?

माताजी: उपास, आता उपासावर आणि प्रश्न विचारलाय उपासाबद्दलकाय विचार आहे ते सांगून टाकतेपण अर्धे लोक उठून जातील. अहो आपल्या देशात भरपूर लोक उपास करतात, तुम्ही कशाला आणि करता?उपास करूनच उपासमारी आणलीय आपण. रात्रंदिवसउपास करूनच उपासमारी आणली आपण, म्हणजे देवाच्या नावावर उपास करायचा नाही आपण. समजा तुमच्या घरी जर मूल जन्माला आलं तर तुम्ही सुतक पाळता का? सुतक पाळाल का तुम्ही? मग संकष्टीला कशाला उपास करता? ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला त्यादिवशीच सुतक कशाला पाळायचं. इंग्लंड मध्ये उलट आहे, ज्यादिवशी ख्रिस्ताचा जन्म झाला, त्या दिवशी दारू प्यायची, मुद्दाम तसंच, नमुना एकच आहे, म्हणजे कसंतरी करून परमेश्वराला नाराज करायचं. तुम्हांला जर आईला नाराज करायचं असलं तर आपण म्हणतो, आज मी जेवणार नाहीझालं, आई गेली. तिच्यावर मात झाली. मग (अस्पष्ट)  उपास करायचा तो आपल्या प्रकृतीसाठी किंवा कशासाठी करायचा असेल तर तो करावा. त्याला काही हरकत नाही. परमेश्वराच्या नावावर उपास करू नका. तुम्हांला हवा ना उपास करायला, मग परमेश्वर म्हणतो करा की करा. मग उपासमारी येते. मग काय चांगलंय परमनंट उपास वा! परमेश्वराच्या सान्निध्यात आम्ही जे आलो, आम्ही परमेश्वराचे नाव घेतोय, त्यामुळे ती उपास करते, चांगलं झालं. डोकं तरी वापरलं पाहिजे की नाही त्या बाबतीत आणि उपास सोडायचा कसा? कारण उपास म्हणजे पुष्कळ लोकांना एक जेवण बदलून घेण्याचा एक प्रकार आहे, म्हणून उपास सोडायचा म्हणजे, आज उपास आहे, समजा तर सकाळपासनं हे की बाबा ह्याचे पीठ आलं का? भुईमुगाचे दाणे मिळाले का? सगळं लक्ष तिकडे, साबुदाण्याची खीर करायची का काय करायची?मग आज उपास आहे ना आपल्याला मग हे खाल्लं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे मग कसं करणार? हे चालतंय ते नाही चालत. मग झालं सगळं लक्ष जेवणाकडे, आणि म्हणे उपास, आणि मग सकाळी जमदग्नीचा अवतार. पण मग आज म्हणजे झालं काय असे हे करून राहिलेत? अहो, उपास आहे आज त्यांचा. असं का? संध्याकाळपर्यंत अर्धे माणसं जो पर्यंत मार खाणार नाहीत, तो पर्यंत त्यांचा उपासाच पूर्ण होत नाही. हे अशे उपासडे लोक सहजयोगाला चालत नाही. उपास करायचा, आम्ही सुद्धा पुष्कळदा जेवत नाही. सहजयोगी जेवत नाहीत. ते जेवायचं नाही, अति झालं म्हणजे नको जेवण, त्याला काय हरकत नाहीय. पण उपवास म्हणून करायचा नाही. आणि त्याने मग रोग होतात आणि ते रोग मग मीच ठीक करणार. समजा जर तुम्ही संकष्टीला उपास केला तर प्रोस्टेटचा तुम्हांला रोग होणार. करून घ्या, मात्र माझ्याकडे येऊ नका. आणखीन पुष्कळसे उपास,आता गुरूंचे आहेत. गुरुवारी जे उपास करतात, त्यांना पोटाचे रोग होतात, करा. अहो, गुरूचा दिवस त्या दिवशी उपास कशाला मांडलात तुम्ही? त्यांच्या जन्माचा दिवस आहे, त्यादिवशी तुम्ही उपास करायचा असतो का? किती दुःखाची गोष्ट आहे. पोटाचे त्रास आणि म्हणे आम्ही दत्तांचे शिष्य, असं का?दत्तपंथी मग आम्हांला पोटात फार त्रास आहे, माताजी. जिथे त्याचं स्थान आहे तिथेच तुम्हांला त्रास आहे, म्हणजे तुमचं काहीतरी चुकलेलं आहे, हे तुमच्या लक्षात आलं का? तर तऱ्हा आहेत या आजारांच्या आणि बहुतेक आजार हे देवाच्या नावावर तुम्ही धंदे केल्यामुळे होतात. त्यातल्या त्यात पुष्कळ लोकांना गुरूची बाधा. वाईट गुरूंच्या कडे जायचं, चुकायचं, कशाला पाहिजे? गुरु सद्गुरू पाहिजेत ना, सद्गुरू आहेत कुठे? जे लोक पैसे घेतात त्या लोकाकडे जातात,ते पहिल्यांदा सांगणार, हे बघा, तुम्ही दहा सोमवार करा, बारा मंगळवार करा आणि चौदा बुधवार करा, म्हणजे सगळे हे करा. तुम्ही मरा, आणि आम्हांला सगळे पैशे देऊन जा, तुमची इस्टेट आहे तेवढी आमच्या नावावर देऊन जा. हे बरोबर आपल्याला कळतं. कारण उपास करायला सांगितला ना मग पारायणं एकशे आठ पारायणं लिहायची. एकशे आठ त्याची पारायणं करायची. पारायणं करून काय परमेश्वर मिळणार आहे? कुणाला मिळालाय का पारायणं करून? दिसत नाही का तुम्हांला? नाहीतर म्हणे आम्ही देवळं धूत बसतो. देवळं धुऊन काय परमेश्वर मिळणार आहे? अहो, हृद्य धुवा, हे आतलं काम आहे. हे अशा रीतीने आपण जे आपले वागतो, परमेश्वराला आळवतो आणि परमेश्वराला जे जाणतो, ते सर्व चुकीचे आहे. अंधारात केलेले काम आहे. आता डोळस व्हा. डोळस होऊन झाल्याशिवाय तुम्हांला कळायचं नाही की किती चुकतात तुम्ही तर तऱ्हेचे रोग होतात या उपासाने, आणि मग माझ्याकडे येतात. अरे, कशाला करतात? कुणी सांगितलं तुम्हांला. तेव्हा उपास-तापास सहजयोगामध्ये देवाच्या नावावर करायचा नाही. असे तुम्ही उपाशी मेलात तर आम्ही काय करणार? मरा, इथे आहेतच मारणारे लोक तशे. आणि असा उपास करून आपण खरोखर म्हणजे परमेश्वराचे जे आहे तो आशीर्वाद आहे, त्याच्याबद्दल कृतज्ञता. परमेश्वराच्या उपकाराची कृतज्ञता.आपल्याला मुलगा झाला म्हणजे आपण लाडू करतो, आणि देवीला मुलगा झाला गणेश त्या दिवशी उपास करायचा, म्हणजे काय मूर्खपणाचं लक्षण आहे हे. आपल्याला आधीपासून सांगितलेलं आहे, पण आपण डोकं का नाही वापरत. ज्यांनी शिकवलं असेल ते राक्षस असतील, कुणीही असतील, तुम्ही आपलं डोकं का नाही वापरलं? तेव्हा बरं पण आता नाही पण आता वापरा, झालं ते विसरून आता मात्र वापरून घ्या डोकं. उपास फक्त एका दिवशी करायचा असतो सहजयोगामध्ये. ज्या दिवशी नरकचतुर्दशी असते, त्या दिवशी सकाळी उठून अंघोळ करून फराळाला बसतात. नरकचतुर्दशीच्या दिवशी नरक हा उघडला जातो. नरक उघडला गेला की त्याच्यात सर्व माणसांना घालतात. त्या दिवशी सकाळी उशिरा उठावे, कारण त्या दिवशी नरक उघडलेला असतो, किती वाजता बंद होईल काय माहिती, म्हणून रात्रीच्या वेळेला उठायचं नाही. चार वाजता उठून अंघोळ-बिंगोळ करून, अरे दिवाळीच्या दिवशी का नाही करत? नरक चतुर्दशी आता माहितेय तुम्हांला, नरकासुराला मारलंय. त्याला आतमध्ये त्या नरकात घालण्यासाठी म्हणून नरकाच दार उघडावं लागतं, की नाही? जेवढे जगातले नरकासूर आहेत, त्यांना कधी घालायचं त्या नरकात? त्या दिवशी बरोबर आपण फराळाला बसतो. म्हणजे भूतांच काम आहे की नाही सगळं. आमच्या सहजयोगामध्ये दिवाळीच्या दिवशी होतं. दिवाळीच्या दिवशी सकाळी अंघोळ-बिंघोळ करून लक्ष्मीच्या स्वागतार्थ तयार-बियार होऊन सगळं व्यवस्थित कपडे-बिपडे घालून तयार होऊन लक्ष्मीच्या स्वागतात राहायचं. त्यात तरी शहाणपण कुठं कुठं आहे? नाही म्हणजे कुठेही दिवा लावून ठेवायचा वगैरे वगैरे हा शहाणपणा आहे. पण काही काही इतका मूर्खपणा आहे, इतका मूर्खपणा आहे तो सोडला पाहिजे सहजयोगात काही पर्याय नाही. कॉम्प्रोमैईस नाही. थोडा मूर्खपणा आणि थोडा शहाणपणा असा मिक्शर नसतो. शहाणपणाच. मूर्खपणा चालतच नाही. तेव्हाच तर तुम्ही मोठे होणार. मोठ्या माणसाचं लक्षण म्हणजे शहाणपण हे नाही का? आणि जे साक्षात्कारी लोक होतात, असतात त्यांची एक ओळख असते, ते कधीच चुका करत नाहीत. कधीच चुका, तेव्हा आपल्या काही थोडया बहुत चुका आहेत त्या सोडून द्यायच्या आणि त्या तरी आपल्याला आई-बाबांनी सांगितल्या म्हणून, जरी तुम्ही इंग्लंड ला जरी जन्माला असता तर दिवाळीच्या दिवशी दारू प्यायले असते आणि पुष्कळ पितातच इथे सुद्धा, नाहीतर बसून पत्ते खेळतात. आता पत्ते खेळायला कोणी सांगितलंय?

हा……………

प्रश्न: What is the relationship between kundalini and healing?

हा………….. जे गृहस्थ आलेले आहेत ते विचारतात की कुंडलीनीने Healing कसे होते?

उत्तर: It is very easy to understand that it is the recidial power. Power that

has created to whole human body and after that it is  (अस्पष्ट)  to manifest itself. That is the shuddhaichha the pure desire. Now the healing is

also one of desires that should be cure and because the kundalini rises she gives that  ‘जे जो वांछिल, ते तो वाहो’ whatever you desire, but your desires also change a priority. Your desires become different. He no more ask for anything you just get pure and you may have to ask for God. Once you asked for Yesterday you completely cured. Just what how was it gives you all the desires which are good desires which are good for you हित. That is well being of your sprit and then the wellbeing of your sprit is only possible when your attention is cleared out of all the other thing and the power who light of the spirits place in that darkness and you get a   tomorrow. It’s not by the healing it just by   healing is not the.  So many things you get in you  can control the electricity. Yesterday I showed how to…….

एक साधक: त्यांना लांब जायचं त्यांना जागृती पाहिजे.

श्री माताजी: हो, हो, ह्याचं बरोबर आहे ह्यांना लांब जायचंय, जागृती पाहिजेय. फालतूचे आता प्रश्न विचारू नका. पुष्कळ लोकांना लांब जायचं आहे. बसा, मलाही फार लांब जायचंय. हे लक्षात ठेवलं पाहिजे, लंडनहून आलेय मी तुमच्यासाठी. पाणी दया. हा… आता जागृतीचं काम.

आता शांतपणानं बसायचं सगळ्यांनी. आता मी उपास केला म्हणून काही पाप लागलेलं नाही कुणाला हे लक्षात ठेवलं पाहिजे, नाही का म्हणजे असं चुकीचं   माझं हे चुकलं, माझा अपराध झाला असा काही विचार करायचा नाही. आईच्या समोर कोणाचाच दोष नसतो. ती सांगते, पण सगळा दोष पदरात घेते ना. हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा तुमच्यात कोणता दोष नाहीये. काही जरी मी म्हटलं तरी विसरून जायचं. सगळा तुमचा दोष पदरात घेतलेला आहे. आता तुम्हांला जागृती देते, फक्त ते घ्या. आता जागृतीसाठी काय करायचं सोपं काम आहे अगदी. या पुण्यभूमीवर तुम्ही बसलेले आहात. हा फार फायदा आहे. जे लोक वर बसलेत, त्यांनी खाली बसलं असतं तर बरं झालं असतं, असो!

           तरी पहिल्यांदा ह्या पुण्यभूमीला नमस्कार तीनदा करायचा. नंतर श्री गणेशाला नमस्कार केला पाहिजे, आणि आमच्या मोक्षाची वेळ आहे ही, त्या मोक्षाच्या क्षणाला ह्या वेळेला तुमचं रक्षण निर्वाणाच्या वेळेला तुमचं रक्षण करो. असं आपण आरतीत म्हणत असतो, ते आज म्हणायचं. ही निर्वाणीची वेळ आहे. आम्ही सहजच प्रवाहात पडलेलो आहोत, तेव्हा तूच आमचं रक्षण कर, असं त्याला मागायचं. हात जोडून पूर्ण हृदयानं केलं पाहिजे. मनापासनं केलं पाहिजे. असं मागून घ्यायचं, त्याच्या नंतर दोन्ही हात माझ्याकडे अशे मांडीवर ठेवायचे आरामात. डोकं फार खाली करायचं नाही, वर करायचं नाही. डोक्यावर टोप्या वगैरे नकोत, ते बरं कारण ब्रम्हरंध्र उघडतं, ते आईसमोर कशाला टोप्या पाहिजेत? तुमचीच आहे, आपलीच आहे. आई समोर सगळं आपलं मोकळेपणाने राहिलं पाहिजे. काही बंधनात नसलं पाहिजे. आणि दोन्ही हात माझ्याकडे आणि डोक्यावर टोपी वगैरे असेल तर ती काढून टाकावी. आरामात बसा. चष्मा वगैरे काढलेला बरा. डोळेसुद्धा बरे होतात सहजयोगाने. काही घट्ट-बिट्ट असलं कमरेला तर हलकं करून घ्यावं. गळ्याला काही घट्ट असलं तर तेही हलकं करून घ्या. कुठे अडचण असेल तर ती अडचण ठीक करू. आरामात बसायचं. कारण एक दहा मिनिटं लागतील. आता डावा हात जो आहे ही इच्छा शक्ती. इथे इच्छा म्हणून ती अशी मांडीवर ठेवायची आणि उजवा हात ही क्रियाशक्ती आहे. क्रियाशक्तीने आपल्याला जी जी चक्रे धरलेली आहेत, तेथे आपण वायब्रेशन्स द्यायचे. चैतन्य दयायचे आणि कुंडलिनी आपली वर वर चढत जाते तेव्हा ते मी जसं सांगेन तसं बरोबर समजावून सांगेन, आणि डोळे उघडू नका, मग कळेल आपल्याला कसं करायचं ते. तेव्हा मुलांनी शांत राहिलं पाहिजे, आणि मुलं जर रडत असतील तर बाहेर घेऊन जा. सगळ्यांना ध्यान करू दया. फार जरुरी आहे. मुलांना बाहेर घेऊन जा जर रडत असेल तर हं…. आता डोळे मिटायचे, आणि डोळे उघडायचे नाहीत. जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत कृपा करून डोळे नका उघडू, नाहीतर कुंडलिनी उठणारच नाही आणि उठली तरी आज्ञा चक्रावरती जाणार नाही. आता उजवा हात हृदयावर ठेवायचा. आपला मार्ग मोकळा करायचा असतो, आणि तो मार्ग मोकळा करण्यासाठी जे मी म्हणेन ते हृद्यापासून म्हणायचे. मनातच म्हणायचं बाहेर म्हणायचं नाही, पण हृदयापासून म्हणायचं.

आता एक प्रश्न विचारायचा, माताजी मी आत्मा आहे का? असा तीनदा प्रश्न विचारायचा. माताजी मी आत्मा आहे का? परत माताजी मी आत्मा आहे का? असं हृद्यापासून विचारायचं. (खोकणे) आता जर तुम्ही आत्मा आहात, तर तुम्ही तुमचे गुरु सुद्धा आहात. तेव्हा प्रश्न विचारायचा. पोटावरती हात ठेवून तीनदा डावीकडे हात ठेवायचा, उजवा हात डावीकडे ठेवायचा, प्रश्न विचारायचा, माताजी मीच माझा गुरु आहे का? प्रश्न विचारायचा, असं तीनदा विचारा, म्हणजे गुरुतत्वातले जे काही दोष असतील ते निघून जातील. हे सर्व चक्रांवर काम आहे. हृदयापासनं विचारायचं. आता उजवा हात ओटी-पोटात घ्यायचा खाली आणि दाबून धरायचा. हे चक्र फार महत्त्वाचे आहे. कारण ते शुद्ध विद्या आहे. ही विद्या ज्यानी आपण परमेश्वराला जाणतो. त्याचे कायदे कानून जाणून घेतो. त्याची व्यवस्था जाणून घेतो आणि त्याचे मंत्र, वगैरे हे जे कुठे वापरायचे ही जी सर्व विद्या आहे, त्याच्या साम्राज्यात जेवढं काही आहे ते शिकणं त्यालाच शुद्ध विद्या असं म्हणतात. निर्मला विद्या किंवा शुद्ध विद्या तर असं म्हणायचं, माताजी आम्हांला निर्मला विद्या दया. निर्मल विद्या दया. असं तुम्ही म्हटल्याशिवाय मी काही जबरदस्ती तुम्हांला देऊ शकत नाही. तेव्हा मी आत्मा आहे मला आपण निर्मल विद्या दयावी. शुद्ध विद्या दयावी असं सहादा म्हणावं. आता परत तो हात उजवा ओटीपोटावर परत घ्यावा दाबून आणि पूर्ण म्हणायचं, माताजी मला शुद्ध विद्या दया, सहादा म्हणा, परत ठीक नाही होऊन राहिलंय म्हणून म्हणते मी. तुमचा अधिकार आहे तो मागण्याचा. जन्मसिद्ध अधिकार आहे. सहज सह म्हणजे तुमच्याबरोबर जन्मलेला हा योगाचा अधिकार आहे. तुम्ही मागून घेतलं पाहिजे. मला माताजी शुद्ध विद्या दया. कृपा करून मला शुद्ध विद्या दया. नम्रपणानं मागायला पाहिजे. असं सहादा म्हणा. हा ओटीपोटातला जो भाग आहे त्याच्या दुसरीकडे म्हणजे उजवीकडे हात लावायचा, आणि सहादा म्हणायचं. माताजी माझी सर्व अविद्या निपटून टाका, नष्ट करा. माताजी माझी सर्व अविद्या नष्ट करा. ही सगळी अविद्या आहे. पारायणं करणं, गुरूच्याकडे जाणे ही सगळी अविद्या आहे. पुस्तकं वाचणं, गीताची प्रवचनं ऐकणं ही सगळी अविद्या आहे. बाह्यातलं आहे हे सगळं, पुष्कळांनी असं केलंय, त्याच्यामुळे माझी सगळी अविद्या दूर करा, माताजी. अगदी पूर्णपणाने, कळकळीने म्हणायचे, म्हणजे जे काय असेल ते सुटेल. फुटलं पाहिजे आतून. (अस्पष्ट) आता उजवा हात परत डावीकडे पोटावर ठेवायचा वर पोटावर डावीकडे उजवा हात परत ठेवायचा. डावा हात तसाच माझ्याकडे आणि म्हणायचं, माताजी, मी माझा गुरु आहे. पूर्ण विश्वासाने म्हणा, कारण जर तुम्ही आत्मा आहात, तर तुम्ही तुमचे गुरु आहात. पूर्ण विश्वासाने म्हणायचं. फार हे जुने आहेत हे त्रास तुमचे. माताजी मी माझा गुरु आहे, असं म्हणायचं, असं दहादा म्हणायचं. पूर्ण विश्वासाने. मी माझा गुरु आहे. असं पूर्ण विश्वासाने दहादा म्हणायचं. बघ्यासारखं कुणी बसायचं नाही. सगळ्यांनी ध्यान केलं पाहिजे. दहादा म्हणायचं मी माझा गुरु आहे. त्याच्यानंतर हा उजवा हात आता हृदयावर परत ठेवायचा, आता पूर्ण विश्वासाने म्हणायचं, माताजी मी आत्मा आहे, तुम्ही आहात, तुम्ही आत्माच आहात. हे जे बाह्यातलं दिसतंय तुम्हांला शरीर, मन, बुद्धी, अहंकारादी हे जे काही दिसतंय ते सगळं अज्ञान आहे. डोळ्यावर पडदा आहे. तुम्ही ते नाहीत. तुम्ही आत्मा आहात साक्षात, तेव्हा बारादा म्हणायचं. माताजी मी आत्मा आहे. ते मी जे बारा आणि असं म्हटलं त्याला कारण असं ह्या चक्रांना ज्या पाकळ्या आहेत त्या नंबर प्रमाणे मी म्हणत आहे.बारादा म्हणायचं, म्हणजे सगळ्या पाकळ्या जागृत होतील. ज्यांना हृदयाचे विकार आहेत. त्यांच्यासाठी हा मंत्र आहे. माताजी मी आत्मा आहे. बारादा  म्हणायचं. पूर्ण विश्वासाने श्रद्धेने, स्वतःबद्दल आदर ठेऊन म्हणायचं. त्यानंतर हा उजवा हात मानेच्या खाली खांद्यावर ठेवायचा, डावीकडे समोरून, पुढून धरायचा, पुढून खांदा धरायचा, मानेच्या खाली हे चक्र फार धरलेलं असतं, महाराष्ट्रात. कारण मनुष्याला जर ते तंबाखू खात नसला तर दुसरा हा रोग असतो, मी फार पतित आहे आणि मी फार वाईट आहे. ते म्हणजे पुस्तक वाचून वाचून स्वतः ला दोष त्याला वाटतं सर्व रोग त्याला झालेत आणि परमेश्वर त्याच्यावर रागावलेला आहे वगैरे वगैरे. तेव्हा आत्मा हा निर्दोष आहे. पूर्णपणे निर्दोष आहे आणि तुम्ही पण निर्दोष आहात तेव्हा असं म्हणायचं, माताजी मी आत्मा आहे आणि मी पूर्णपणे निर्दोष आहे. नंतर, मंत्र म्हटलेले असतात. चुकीचे मंत्र म्हटल्यामुळे सुद्धा हे चक्र धरलं जातं आणि हे चक्र आणि हृद्य चक्र धरलं गेलं म्हणजे हृदयाचे पुष्कळ विकार होतात. अंजायना वगैरे अशे लिथार्जीक जे विकार होतात ते येतात, तेव्हा मी पतित नाही, मी पापी नाही. मी निर्दोष आहे असं म्हणा. मी आत्मा आहे आणि मी निर्दोष आहे परत जो परमेश्वर आहे तो सर्व समर्थ आहे. तो आनंदाचा सागर आहे. दयेचा सागर आहे, ते तरआहेच पण सर्वात मुख्य म्हणजे तो क्षमेचा सागर आहे. त्या सागरापुढे तुम्ही कोणची अशी चूक करू शकाल जो आपल्या पदरात घेऊ शकत नाही. तेव्हा माताजी मी निर्दोष आहे, मी आत्मा आहे असं सोळादा म्हटलं पाहिजे. पूर्ण नेटानं म्हणा, सर्व मंत्रांवर मात आहे ही. आता हा हात कपाळावर आडवा धरायचा. डोळे उघडायचे नाहीत. कृपा करून आता अगदी डोळे उघडू नयेत, आता हा हात आडवा धरायचा. डावा हात माझ्याकडे. या ठिकाणी असं म्हणायचं की, माताजी मी सर्वांना क्षमा केली. हृदयापासून, माताजी मी सर्वांना क्षमा केली. आता पुष्कळांचं असं म्हणणं असते आम्ही क्षमा करू शकत नाही. फार कठीण काम आहे माताजी. आमच्याने क्षमा होत नाही. फार सोपं काम आहे. तुम्हांला म्हणायला काय जातं. नाहीतरी क्षमा नाही केली म्हणजे करता काय तुम्ही? काय करता तुम्ही? स्वतःला त्रास करून घेता. ज्याला तुम्ही क्षमा करत नाही तो तर मजेत आहे, आणि तुम्ही स्वतःला त्रास करून घेता, म्हणून पूर्ण हृदयानं म्हणा, मी स्वतःला क्षमा केली आणि दुसऱ्यालाहीक्षमा केली. मी सगळ्यांना मी क्षमा केली. स्वतःलाही मी क्षमा केली आणि दुसऱ्यांनाही क्षमा केली. कपाळावर आडवा हात ठेवायचा, सर्वांनी श्रद्धेने ठेवायचा. बघा, तुमची कुंडलिनी चढवतेय मी. श्रद्धेने म्हणायचं. हुं……. आता हाच उजवा हात डोक्यावर ठेवायचा. डोळे उघडू नये, म्हणजे हा तळहात आपल्या टाळूवर ठेवायचा. टाळूवर दाबून धरायचा. तळहात हात आपल्या डोक्यावर ठेवायचा आणि टाळूवर ठेऊन दाबून धरायचा, आता हळूहळू फिरवायचा. हे सहस्त्रारावरचं स्थान आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मरंध्र आहे.म्हणजे ज्याच्यातनं कुंडलिनी जेव्हा निघते तेव्हा ती ह्या ती ब्रह्माला प्राप्त होते. परमेश्वराची जी सर्वव्यापी शक्ती आहे, प्रेमाची शक्ती आहे. ती सूक्ष्म आहे, त्या शक्तीला प्राप्त होते, आणि सर्वप्रथम तुम्हांला ही शक्ती हाताला लागते, जेव्हा कुंडलिनी याच्यातनं ब्रम्हरंध्राला छेदते. हे छेदन झालं पाहिजे, पण ते मी जबरदस्ती करू शकत नाही. तुम्ही स्वतः चे स्वतंत्र आहात, म्हणून तुम्हांला म्हणावं लागेल, माताजी कृपा करून आम्हांला आत्मसाक्षात्कार दयावा. आम्हांला पार करावं, आमचं ब्रम्हरंध्र छेदावं. आम्ही हृद्यापासनं तुमच्याजवळ मागतोय, असं सातदा म्हणा, पण हृदयापासनं म्हटलं पाहिजे आणि फिरवत जायचा हात. (फुंकर मारणे) आता उजवा हात खाली ठेवायचा. आणि डावा हात डोक्यावर ठेवायचा. टाळूवर डाव्या हाताचा तळहात ठेऊन फिरवायचा आणि म्हणायचं की आम्हांला आत्मसाक्षात्कार कृपा करून दयावा. माताजी कृपा करून आत्मसाक्षात्कार आपण दयावा. मागितल्याशिवाय होणार नाही, म्हटल्याशिवाय होणार नाही. मी जबरदस्ती करू शकत नाही. इथे माझी मर्यादा संपते. परमेश्वराने तुम्हांला जी स्वतंत्रता दिलेली आहे, ती मी उल्लंघू शकत नाही. (फुंकर) हृद्यापासनं म्हणा कारण इथे हृदयचक्र आहे, तेव्हा ते जर हृदयापासून म्हटलं नाही तर ते भेदणारच नाही आणि मुख्य जागा आहे. मोक्याची जागा हीच आहे. (फुंकर) आता डावा हात खाली ठेवायचा आहे, माझ्याकडे ठेवायचा. उजवा हात जमिनीवर ठेवायचा. उजवा हात जमिनीवर डोळे मिटा. डोळे उघडू नये. आता ह्या भू मातेला म्हणायचं की आमच्यात जे काही जड वस्तू असतील, आमच्यात जे जड दोष असतील. जड दोष असतील ते तू घे. आमच्यातले जड दोष घे. असं भूमातेला हृदयात म्हणायचं. तीनदा म्हटलं तर ती तुमचे सर्व ओढून घेईल. आमच्यात जे काही जड दोष आहेत, दोष आहेत ते घे, किंवा आमच्यात जे तमोगुणी दोष आहेत ते घे. आमच्यात जे तमोगुणी दोष आहेत ते घे. आमच्यात जे काही तमोगुणी दोष आहेत ते तू कृपा करून घे. असं म्हणायचं पृथ्वीमाते;

You have to say with your right hand on the mother earth and the left hand towards me that whatever defects I have got from tamoguna you please suck them.  हुं……

आता उजवा हात माझ्याकडे करायचा, डोळे उघडे करा आणि डावा हात असा वर आकाशाकडे. उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात असं वर आकाशाकडे आणि म्हणायचं जे काही माझ्यामुळे माझ्यामध्ये रजोगुणातले दोष आहेत ते हे आकाश तत्व तू घे, तू आपल्यामध्ये सामावून घे.माझ्यात जे रजोगुणी दोष आहेत ते तू आपल्यात समावून घे. अहंकारादी जे काही माझ्यात दोष आहेत रजोगुणामुळे आलेले ते सगळे आपल्यामध्ये सामावून घे. अतिकर्मीपणा मुळे आलेले जे दोष आहेत ते तू आपल्यामध्ये सामावून घे. अतिविचारामुळे आलेले जे दोष आहेत. ते तू आपल्यामध्ये सामावून घे. अति वाचनामुळे आलेले जे दोष आहेत ते तू सामावून घे. आता डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजव्या हाताने बघा डोक्यात गार येतंय का गरम येतंय, टाळूतनं, ब्रम्हरंध्रातनं गार येतंय. लक्ष इथे ठेवायचं, गार येतंय? येतंय का? बरं आता परत हा हात करून ह्या हाताने बघायचं. ह्या हातानेसुद्धा आलं पाहिजे. दुसऱ्या हाताने बघायचं. लक्ष सहस्त्रारावर पाहिजे. इकडे पाहिजे, टाळूकडे. गार आहे. आता दोन्ही हात असे वर करायचे आकाशाकडे आणि म्हणायचं, ही जी ब्रम्हशक्ती आम्हांला हाताला लागलीय ती परमेश्वराची जिवंत शक्ती जी आमच्या हाताला लागलीय ती माताजी ती हीच आहे काय? हेच चैतन्य आहे का? हेच आमच्या हाताला लागलं हीच ब्रम्हशक्ती आहे का? ही जिवंत शक्ती आहे का? असा प्रश्न विचारायचा. हातावर असं गार गार लागेल. पहिल्यांदा ही जिवंत शक्ती मिळणार आपल्याला, म्हणजे प्राप्त व्हायला ही अगदी जवळच होती, पण अजून तिची जाणीव नव्हती झालेली. ही जी जाणीव होतेय ती हीच ब्रम्हशक्ती आहे काय असा प्रश्न विचारायचा मनामध्ये. ज्याने सर्व जिवंत कार्य होतात. हा…. आलं हातात गार वाटत आहे? आता हात खाली करा, हातात सुद्धा येईल. आता स्वतःला बंधनात कसं ठेवायचं, जागृती कशी करायची ते मी तुम्हांला दाखवते ते करायचं व्यवस्थित. डावा हात माझ्याकडे अगदी लक्ष इकडे ठेवा. दुसरीकडे इकडे तिकडे लक्ष करायचं नाही. लक्ष माझ्याकडे पूर्णपणे लक्ष ठेवून केलं तर कार्य फार लवकर होउ शकतं. डावा हात माझ्याकडे आणि उजव्या हाताने बंधनं दयायची असतात. तेव्हा उजवा हात इकडे असा डावीकडे ठेवायचा आणि वर उचलून डोक्यावरून इकडे घालायचा. एक एक बंधन झालं. एका चक्राला परत मागे हात तसाच आणायचा मग दुसरं बंधन. दुसऱ्या चक्रावर खाली घालायचं. मग तिसरं बंधन, मग चौथं बंधन. मग पाचवं बंधन आणि मग सहावं बंधन. शेवटी सातवं बंधन घालायचं. आता कुंडलिनी आपली उचलायची, कारण आता आपण बसलो आपल्या ह्याला आपण बंधन दिलंय व्यक्तित्वाला, आता कुंडलिनी उचलायची. डावा हात  पुढे ठेवायचा, असं डावा हात पुढे ठेवायचा कुंडलिनीसमोर बसलेल्या स्थितीत सुद्धा, आणि उजवा हात वर, समोर, खाली, मागे असा फिरवायचा. घडाळ्याच्या काट्यासारखा. हं आता उचलत जायची कुंडलिनी, स्वतःची उचला. तुमची उचलता येते तुम्हांला बघा अशी अशी उचलत जायची. उचलत चला वर अशी अशी आता वर न्यायची. खांदे मोकळे सोडायचे. डोकं असं वर घ्यायचं आणि त्याला असा पीळ दयायचा, आणि एक मारा गाठ, परत दुसऱ्यांदा, रोज असं करायला पाहिजे, उचला सगळ्यांनी उचलून बघा हं, स्वतःची तुमची उठणार आहे, व्यवस्थित, व्यवस्थित माझ्याबरोबर चला हं, असं, असं असं आता वर यायचं, वर आणायची. मान मागे खांदे हलके सोडायचे. अशा दोन. आता तिसऱ्यांदा तीन गाठी आहेत फक्त परत. लक्ष पाहिजे हातावर. डाव्या हातावर वर गेल्यावरती मान वर करायची. खांदे हलके करायचे आणि परत एक, परत दोन, परत तीन, आता बघा येतंय ना, गार येतंय, हातांत. ज्या लोकांना आलं अथवा नाही आलं, सगळे सहजयोगी होऊ शकतात, त्याला प्राप्त करू शकतात. तेव्हा आता कुणाशी वाद-विवाद न करताना, न बोलताना तुम्हांला जर दर्शन हवं असलं तर मी इथे आहे, पण गर्दी करायची नाही. 

(अस्पष्ट) 

बायकांनी यायचं मग पुरुषांनी यायचं, गर्दी करायची नाही. शिस्तीत बसायचं, ध्यानात बसायचं. ह्या वेळेला मिळवायचंय, मी समोर उभी असताना मिळवायचं आहे. तेव्हा शिस्तीत बसायचं. तुम्ही दर्शनाला आलात का? बसा, व्यवस्थित बसा कुणी उठायचं नाही बसा खाली.