Public Program (India)

Music, dance, Public Address at Vaitarna Temple (Marathi/English). Vaitarna (India) , 18 February 1984. आज मला फार आनंद झाला तुम्ही सगळे आलात परत आणि आज तुमच्यात चेतना आलेली दिसते .फार फरक झालेला आहे .मागच्या वेळे पासून ह्या वेळेला सगळ्या मुलांच्या हातात थंड थंड व्हायब्रेएशन दिसतात .त्यांच्यात  फार जागृती झालेली दिसते आहे .चेहरे बदलेले दिसले .आणि बायकां न च्या चेहऱ्यात सुद्धा तेजस्विता दिसली .पुरुष पुष्कळ सुधारलेले दिसले .सगळ्या न मध्ये एकूण आशा जशी चमकावी तस डोळ्यामध्ये आशेच तेज चमकू राहील आहे .हे पाहून फार आनंद झाला .आपल्या देशाचे दुर्दिन होते ते बदलण्याचे दिवस आलेले आहेत .सगळं काही भलं झालेलं आहे .सगळं दारिद्र्य ,दुःख सगळं काही बदलणार आहे .हे बदलच पाहिजे .त्याच्या साठी आपल्याला योग मिळवला पाहिजे .तो तुम्ही मिळवला ,आणि हळू हळू तुमच्या लक्षात येईल कि तुमच्यात केव्हडा बदल झाला .तुमच्या वातावरणात केव्हडा बदल आला .तुमच्या परिस्थितीत किती बदल झाला .आणि संबंध जी काही आपली जी मनस्थिती होती जी अत्यंत दुःखात राहत असे त्याच्यात किती समाधान आलं .ते समाधान तुमच्या हृदयात बसलेल्या आत्माराम च आहे .ते समाधान तुम्ही अनुभवावं त्याचा आनंद घ्यावा ,आणि त्या आनंदात तुम्ही डुंबत राहावं हीच माझी इच्छा आहे .आज सगळ्यांना फार आनंद झाला सगळे फार खुश झाले आणि त्यांनी तुम्हाला पाहिलं कि तुम्ही लोक सुद्धा इतक्या एकजुटीने तिथे आलात ,सगळे जण नाचला त ,सगळ्यांनी आनंदानी जयजयकार केला .आता हे लोक पूर्वी आपल्या देशावर राज्य करत होते .तेव्हा त्यांना आपली काही कदर नव्हती .तेच आज तुमच्या चरणावर आलेत इथे ,तुम्हाला भेटायला आलेत .तुमच्यावर प्रेम करायला आलेत ,तुम्हाला सुख द्यायला आलेत ,तुम्हाला ओळखायला आलेत .आणि त्यांना वाटत कि तुम्ही किती मोठ्या अशा भारतभूमी तल्या महाराष्ट्रात संतांच्या भूमीत  या Read More …

Shri Chandrama Puja Vaitarna (India)

Shri Chandrama Puja, Vaitarna (India), 18 February 1984. आता तुम्हां लोकांना सांगायचे म्हणजे असे की आज तुम्ही पुजेला आलात ना तर पुजेचा उपयोग असा झाला पाहिजे कि तुमच्यामध्ये ज्या काही देवी देवता आहेत त्या जागृत झाल्या पाहिजेत. आणि त्या देवी देवता जागृत होण्यासाठी आजची पूजा आहे. तेव्हा वेगळया वेगळया देवी देवतांना कसे लोक जागृत करतात? ते शिकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जरा मोठे झाले की तुम्हाला मंत्र शिकवून देऊ. मग तुम्ही दुसऱ्यांनाही जागृती देऊ शकता. मग तुम्हाला हे कळेल की त्यांच्यामध्ये कुठे काय धरलेले आहे? त्यांना कोणचे त्रास आहेत? ते कसे स्वच्छ करायचे? हे तुमच्या लक्षात येईल. मग आलं म्हणजे तुम्हीसुद्धा योगीजनच झालात ना ! तुम्हीसुद्धा नुसते असे हात फिरवून त्यांची कुंडलिनी जागृत करू शकता! आणि त्यांच्या डोक्यावरती थंड येईल. तुम्ही बघाल, आताही तुम्ही कुणावरती करून बघा. तुम्हाला दिसेल कि तुमच्या हातातून अशी कुंडलिनी तुमच्या हातातून वाहते आहे. तुम्ही जरासं असं वरती केलंत कि तुम्हाला वाटेल डोक्यावरती थंड थंड आलं. तीनदा उचलली कि तुम्हाला वाटेल थंडच येईल. पण हयाच्यासाठी म्हणून नेहमी पूजन करावं लागतं. आता तुम्हाला फोटो वगैरे नसले तर तुम्ही फोटो घ्या. त्याला थोडेसे कुंकू लावायचे सकाळी, त्याला नमस्कार करून आणि शाळेला जायचे. घरी झोपायच्या आधी फोटोवरती एक दिवा ठेवायचा लहानसा. दोन्ही हात फोटोवर ठेवायचे, पाय पाण्यात ठेवायचे थोडेसे, आणखी नंतर मीठ घालायचे त्या पाण्यात, थोड़ा वेळ असं बसायचं फोटोकडे हात करून आणि मग पाय पुसून सुकवायचे. बस एवढंच ध्यान आहे. दुसरं काहीही करायचे नाही. पाच मिनीटं संध्याकाळी आणि पाच मिनिटं सकाळी.. सकाळच्या वेळी एक हात आधी फोटोकडे असा करायचा. डाव हात जेव्हा फोटोकडे असेल तर उजवा हात खाली. आणि Read More …