Shri Chandrama Puja

Vaitarna (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Shri Chandrama Puja, Vaitarna (India), 18 February 1984.

आता तुम्हां लोकांना सांगायचे म्हणजे असे की आज तुम्ही पुजेला आलात ना तर पुजेचा उपयोग असा झाला पाहिजे कि तुमच्यामध्ये ज्या काही देवी देवता आहेत त्या जागृत झाल्या पाहिजेत. आणि त्या देवी देवता जागृत होण्यासाठी आजची पूजा आहे. तेव्हा वेगळया वेगळया देवी देवतांना कसे लोक जागृत करतात? ते शिकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जरा मोठे झाले की तुम्हाला मंत्र शिकवून देऊ. मग तुम्ही दुसऱ्यांनाही जागृती देऊ शकता. मग तुम्हाला हे कळेल की त्यांच्यामध्ये कुठे काय धरलेले आहे? त्यांना कोणचे त्रास आहेत? ते कसे स्वच्छ करायचे? हे तुमच्या लक्षात येईल. मग आलं म्हणजे तुम्हीसुद्धा योगीजनच झालात ना ! तुम्हीसुद्धा नुसते असे हात फिरवून त्यांची कुंडलिनी जागृत करू शकता! आणि त्यांच्या डोक्यावरती थंड येईल. तुम्ही बघाल, आताही तुम्ही कुणावरती करून बघा. तुम्हाला दिसेल कि तुमच्या हातातून अशी कुंडलिनी तुमच्या हातातून वाहते आहे. तुम्ही जरासं असं वरती केलंत कि तुम्हाला वाटेल डोक्यावरती थंड थंड आलं. तीनदा उचलली कि तुम्हाला वाटेल थंडच येईल. पण हयाच्यासाठी म्हणून नेहमी पूजन करावं लागतं. आता तुम्हाला फोटो वगैरे नसले तर तुम्ही फोटो घ्या. त्याला थोडेसे कुंकू लावायचे सकाळी, त्याला नमस्कार करून आणि शाळेला जायचे. घरी झोपायच्या आधी फोटोवरती एक दिवा ठेवायचा लहानसा. दोन्ही हात फोटोवर ठेवायचे, पाय पाण्यात ठेवायचे थोडेसे, आणखी नंतर मीठ घालायचे त्या पाण्यात, थोड़ा वेळ असं बसायचं फोटोकडे हात करून आणि मग पाय पुसून सुकवायचे. बस एवढंच ध्यान आहे. दुसरं काहीही करायचे नाही. पाच मिनीटं संध्याकाळी आणि पाच मिनिटं सकाळी.. सकाळच्या वेळी एक हात आधी फोटोकडे असा करायचा. डाव हात जेव्हा फोटोकडे असेल तर उजवा हात खाली. आणि उजवा हात फोटोकडे असेल तर डावा हात वर. बस असं करून एक दोन मिनिटं उभं रहायचं, नमस्कार करायचा, बंधन दयायचं आणि शाळेला जायचं. अगदी सोपं काम आहे. कळलं ना? अगदी सोपं आहे. तुम्हाला फोटो नसले तर तुम्ही यांच्याकडून फोटो घ्या. सगळयांना मी फोटो दिले होते ना मागे? आणखीन आतासुद्धा तुम्ही फोटो घ्या. म्हणून आता आजच्या पुजेला, अगदी साधी पुजा करायची आहे. म्हणजे पाय धुण्याचा प्रोग्राम, मोदी या. दोन माणसं कुणीतरी घ्या पाहिजे तर! व्यवस्थित धुवायला हवं. बस झालं! चला या लवकर, कोण येणार? त्यांना बसवा. आता पाणी घाला. तीच घ्या परात. हे काढून घ्या खालून. जरा सरका मागे, हयांचे आता नुकतंच लग्न झालेले आहे. कळलं का, नवरा नवरी आहेत. जरा मागे सरका. हे काय, पाणी एवढं कमी आहे? गरम आहे भरपुर. ते तुम्ही गाळून घ्या ना आणखी थंड पटापट होईल ते. बरं ताट आणा. ती अशी परात, ती परात आणा ना मोठी. मोठी परात नाही? योगीनी : स्टीलची नाही आणली? योगीनी : स्टीलची पाय धुण्यासाठी पितळेची असली चालते. पण आता घेवून घ्या स्टीलची. आणून दया काय आहे ते. एका अथर्वशिर्षात सगळयांचे पाय धुवून होतील थोडे थोडे धुतले तर. एक हयांच्या हातात देवून दया अजून म्हणा एकदा मोदी, देवीचं स्वरूप म्हणा. योगी : देवीचं म्हणू? श्री सुक्त सुरू… योगीःमाताजी, अर्थ जरा सांगण्याचा प्रयत्न करू? योगी:श्री माताजी? योगीःअर्थ सांगण्याचा प्रयत्न करून पाहतो? योगीःअर्थ सांगण्याचा प्रयत्न करून पाहतो? करा करा करा सर्व पंचमहाभूतं म्हणा. हां, बरं पुढे. मोदी लग्न न झालेले आहेत? ज्यांचं लग्नं न झालेलं. या.. पुढे. मोठाल्या, फार लहान नकोत. साडीवाल्या. तु लावून दे. हं. काय? ठिक आहे. शब्द नाहीत. हि जागा नाही झाली सबंध इथपर्यंत ठिक आहे. जरा खाली. वरती लाव . तुम्हाला येईल का? हा बरोबर आहे. गंधद्वाराम् हां म्हणजे.. गंधद्वाराम् म्हणजे डोळयांचे, नाक म्हणजे काय इंग्लिशमध्ये स्पिरीटयुअलला असं जोडून नसतं. असा एक शब्द नाही. श्रेयताम् श्रेय म्हणजे स्पिरीटयुअल वेल बिइंग इंग्लिशला एवढे शब्द नाहीत. हेम म्हणजे हात हेम म्हणजे सुवर्ण नाही नाही जात म्हणजे नाही त्यानं विद होतं त्यानं विद होतं. म्हणा. काय झालं. ते काय? उलटं झालं. ते व्हावं निभवावं झोपलेलं स्तुत्यं? असं घाला असं मागं करा इथं करा खाली करा आता वर पुढे बस झालं आता पण मला काय दयायचं काय मागितलं पाहिजे? नाही म्हणजे, त्यांनी काय मागितलं? चैतन्य? चारी दिशातनं शेवटचं ते सांगितल आहे ना आयुष्याचं ते मुख्य समोर या पुढे या इथपर्यंत लावा घाबरून घाबरून मला त्रास होतो घाबरायला काय झालं? आरामात लावा पुढे बोला सोम म्हणजे व्हायब्रेशन सोम म्हणजे व्हायब्रेशन व्हायब्रेशन चैतन्य पूढे म्हणजे सगळयांना आहे ओढा आणखीन ओढा घाबरू नका है सामान उचलून घ्या हळूहळू सर्व आत इथे करा व्यवस्था एक मिनिट, ओटी भरायचीय. लवकर करा. त्यांना भरायचीय. या इकडे. तुम्ही भरा. या. कपडा दया. कपडा दया. टॉवेल दया तो मागे लावलाय तो तोच हात लावलाय तो. हा भरा. फळ घ्या. या इकडे. फळ आणि एक एक हे दया. फळ घ्यायचं. चला मोदी.. कोण सांगणार? ये कुणाला येतं हे सांगता. या तुम्ही. बायकांनी यायचं पुढे. बायकांची कामं बायकांनी करायचीत की नाही. या तुम्ही. इथे बसा इथे. बसा बसा. गवरी ठेवा. मधोमध मधोमध ठेवा. बरोबर बसलंय. बसुन घ्या. तुप घाला. तुप घाला. उलटून ठेवायची ना गवरी? उलटून ठेवा उलटून पेट घेते मग बरोबर आहे. काढा काढा. तुप घाला मधोमध. आता असे एकावर एक असे उभ्या ठेवा त्रिकोणी. हां बरोबर. काढून घ्या ते आहे हे मुख्य आहे पण मुख्य काय आहे ते पुढे या घाबरू नका हया मर्जादीपणाची काय गरज आहे