Public Program (India)

Public Program in Anjaneri, the birthplace of Shri Hanuman (Marathi). Maharashtra (India). 19 February 1984. श्री हनुमानांनी मिळवलं होतं, जसं अंजनी देवी नं मिळवलं होतं. त्या अंजनी देवी सारखं, हनुमानासारखं, जर आपण आपल्या हृदया मध्ये बसलेल्या आत्म्याचं दर्शन घेतलं, जर आपल्याला आत्म साक्षात्कार झाला तर आपल्या पुढे कोणाताही प्रश्न उभा राहणार नाही. सर्व, दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर होऊ शकतं. आपल्या मध्ये अनेक तत्वे आहेत, ती अजुन झोपलेली आहेत, ती जागृत व्हायला पाहिजे. ती जागृत झाल्या शिवाय, आपल्याला काही अर्थ लागलेला नाही. म्हणजे असं आहे की, अजून आपला संबंध परमेश्वराशी झालेला नाही. जो पर्यंत आपला संबंध परमेश्वराशी होत नाही तेव्हा आपण त्याच्या साम्राज्यात कसे येणार.आणि त्याचं जे काय वरदान आहे ते आपल्याला कसं मिळणार. म्हणून आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे, आणि सातत्याने राहिला पाहिजे, हे मुख्य गोष्ट आहे की तो सातत्याने राहिला पाहिजे. परत उगीचचं आपण जर सारख विठ्ठलाला बोलवलं, आणि तो जर धत्त येऊन उभा जरी झाला तरी तुम्ही ओळखणार कसे त्याला, तेव्हा जी अपरा भक्ति आहे, जी परमेश्वराला न पाहता, न जाणता केलेली भक्ति आहे. तिच्या फळाला आज आमचा सहजयोग. ( श्री माताजी थांबले आहेत) गणेशाला आपण म्हणतो की सहज पडलो प्रवाही तेव्हा तू मोक्षाच्या वेळेला आमचं रक्षण कर. ती मोक्षाची वेळ आज आलेली आहे ती गाठून त्यात सातत्याने आपण राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी काही पैसे द्यावे लागत नाही, परमेश्वराला पैसे कशाशी खातात ते माहित नाही. हे पुष्कळ लोकांना माहित नसेल की परमेश्वराला पैसा काय आहे ते समजत नाही. आता आम्ही खेडे गावात गेलो आणि त्यांना सांगितले हे बघा तुम्ही आम्हाला पैसे वगेरे काही द्यायचे नाही, तर ते म्हणतात बर Read More …