Public Program

(India)

1984-02-19 Public Program, Marathi, Birthplace of Hanumana near Nasik, India, DP-RAW, 31' Download subtitles: EN (1)View subtitles:
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Public Program in Anjaneri, the birthplace of Shri Hanuman (Marathi). Maharashtra (India). 19 February 1984.

श्री हनुमानांनी मिळवलं होतं, जसं अंजनी देवी नं मिळवलं होतं. त्या अंजनी देवी सारखं, हनुमानासारखं, जर आपण आपल्या हृदया मध्ये बसलेल्या आत्म्याचं दर्शन घेतलं, जर आपल्याला आत्म साक्षात्कार झाला तर आपल्या पुढे कोणाताही प्रश्न उभा राहणार नाही. सर्व, दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर होऊ शकतं.

आपल्या मध्ये अनेक तत्वे आहेत, ती अजुन झोपलेली आहेत, ती जागृत व्हायला पाहिजे. ती जागृत झाल्या शिवाय, आपल्याला काही अर्थ लागलेला नाही. म्हणजे असं आहे की, अजून आपला संबंध परमेश्वराशी झालेला नाही. जो पर्यंत आपला संबंध परमेश्वराशी होत नाही तेव्हा आपण त्याच्या साम्राज्यात कसे येणार.आणि त्याचं जे काय वरदान आहे ते आपल्याला कसं मिळणार. म्हणून आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे, आणि सातत्याने राहिला पाहिजे, हे मुख्य गोष्ट आहे की तो सातत्याने राहिला पाहिजे. परत उगीचचं आपण जर सारख विठ्ठलाला बोलवलं, आणि तो जर धत्त येऊन उभा जरी झाला तरी तुम्ही ओळखणार कसे त्याला, तेव्हा जी अपरा भक्ति आहे, जी परमेश्वराला न पाहता, न जाणता केलेली भक्ति आहे. तिच्या फळाला आज आमचा सहजयोग. ( श्री माताजी थांबले आहेत)

गणेशाला आपण म्हणतो की सहज पडलो प्रवाही तेव्हा तू मोक्षाच्या वेळेला आमचं रक्षण कर. ती मोक्षाची वेळ आज आलेली आहे ती गाठून त्यात सातत्याने आपण राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी काही पैसे द्यावे लागत नाही, परमेश्वराला पैसे कशाशी खातात ते माहित नाही. हे पुष्कळ लोकांना माहित नसेल की परमेश्वराला पैसा काय आहे ते समजत नाही. आता आम्ही खेडे गावात गेलो आणि त्यांना सांगितले हे बघा तुम्ही आम्हाला पैसे वगेरे काही द्यायचे नाही, तर ते म्हणतात बर दहा पैशाच्या जागी वीस पैसे देऊ का? तर परमेश्वराला काय पैसे समजतात का? जेव्हा श्री राम इथे आले होते, त्यांना पैसे कशाशी खातात ते माहिती होत का? किंवा हनुमानांचचं उदारहण आहे, की सीताजींनी त्यांना सोन्याचा एक मोठा भारी हार दिला होता. तर ते प्रत्येक मणी फोडून बघत होते. त्यांनी सांगितलं की काय तू असे मणी का फोडत बसलास? ते म्हणाले मी बघतो आहे की ह्याच्यात श्री राम आहेत कि नाही कशात? तर कशातच श्री राम दिसत नाही. ते सोने बेकारच त्यांना वाटले.ते सगळं सोनं फेकूनच टाकलं. ज्याच्यात श्री राम नाही ते सोनं बेकार आहे. हे हनुमानाने तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणून तो श्री राम आपल्या मध्ये जो बसलेला आहे, त्याला आपण आधी मिळवलं पाहिजे आणि श्री रामाच्या राज्यात प्रवास केल्यावर सगळं काही आपलं दुःख नष्ट होते हे आपल्याला माहित आहे. आणि ते अशा प्रकारनी होतं. आताचीच तुम्हाला जर एखादा चमत्कार सांगायचा म्हणून सांगते, त्याच्या वर तुम्ही विश्वास ठेवा अशातली गोष्ट नाही, पण असे होऊ शकतं आणि झालेलयं आणि तसं सर्व तुमच भलं व्हावं, तुम्ही सगळे सुखी व्हावेत, म्हणूनच परमेश्वराने ही योजना केलेली आहे, की आता माझ्या भारत वर्षातल्या ह्या लोकांना ज्यांनी एवढा परमेश्वरावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांना हा साक्षात दिला पाहिजे, त्यांना हा साक्षात दिला पाहिजे, त्यांना आशीर्वाद दिला पाहिजे, कि तुमचं भलं झालं पाहिजे, तुम्हाला परमेश्वर हा मिळाला पाहिजे. 

अनुभवातली एक गोष्ट मी सांगते की, आमच्या एक लहानसं गाव आहे कळवा म्हणून तिथे एक राजाराम पाटील म्हणून गृहस्थ राहत असतं. ते अत्यंत सर्व साधारण परिस्थितीतले होते. फारच साधारण परिस्थिती होती त्यांची. आणि ते नेहमी माझ्या प्रोग्रॅमला यायचे, आणि त्यांच्या बरोबर आपला त्यांचा मुलगा आणि इतर *** लोकांना घेऊन यायचे. आणि मी असं म्हटलं की कळव्याहून इतकी फॅमिली घेऊन येतात, आणि त्यातनं हार बीर घेऊन यायचे मी म्हटलं हे बघा राजाराम पाटील निदान येण्या जाण्याचे पैसे तुम्ही माझ्या कडनं घ्या. हे फार होतं तुम्हाला. मला भेटावसं वाटतं बरोबर आहे, पण तुम्हाला कसं जमतं हे? तर म्हणे परमेश्वरानं माझी सोय केली आई. म्हटलं काय झाल काय? तर म्हणे माझी एक थोडीशी पडीक जमीन होती, तिथे मी जाऊन ध्यान वगैरे करतो सकाळचा. एक दिवस एक मनुष्य आला त्याने सांगितलं की, तुमच्या जमिनीत अशी काही तरी विशेष गोष्ट आहे की, ह्याच्यातील जर माती वापरली तर विटा दगडा सारख्या होतात असं कोणीतरी सांगितलं म्हणून आम्ही पाहायला आलो आहे. आणि ही जी माती आहे ती आम्ही आता शेराने विकत घेऊ. जी जमीन त्यांनी पडीक समजुन सोडून टाकली होती, तीला सोन्याचं रूप आलं. ही सोन्याची द्वारका परमेश्वर उभा करू शकतो जर तुम्ही परमेश्वराला मिळवून घ्याल तर त्याच तत्व अत्यंत महान आहे. पुष्कळ लोक मानतच नाहीत, शास्त्रीय लोक ह्या गोष्टीला मानतच नाही, की परमेश्वराची कोणी शक्ती आहे. आता हे बघा इथे जे आपल्याला ही झाडं वगैरे दिसतात ही कोण, ही झाडं कूठून आली? ह्यांना हिरवं कोण करतं?आंब्याच्या झाडाला आंब्याचं फळ कोण लावतं? त्याला कोणी दुसरं फळं का नाही लावत? हे सगळं करणारी परमेश्वरी शक्ती आहे. आणि ती परमेश्वरी शक्ती आहे किंवा नाही, तिचा आज तुम्हाला साक्षात होणार आहे.आणि जेंव्हा त्या परमेश्वराची शक्ती तुमच्या मध्ये येऊन जाईल तेव्हा तुमच्यात सूक्त असलेले, अत्यंत गहन अशी जी तत्व आहेत, म्हणजे लक्ष्मी च तत्व स्वतः ते जागृत होतं आणि मनुष्याचं आयुष्य एकदम बदलून जातं. सहज योगानी अनेक फायदे झालेत सर्व प्रथम म्हणजे लोकांना शारीरिक सुख प्राप्त होतं. शारीरिक त्रास असतात ते नष्ट होतात. त्याच्या मुळे पुष्कळसे जे आपले पैसे आणि त्रास आहेत ते वाचतात. नंतर त्याच्या नंतर मानसिक त्रास पुष्कळांना असतो. ते मानसिक त्रास ठीक होतात. त्याच्या नंतर जे आपल्याला पुष्कळांना बौद्धिक त्रास असतात, आता तुम्ही लोक नशिबवाले, तुम्हाला बौद्धिक त्रास कमी आहेत. कारण एवढं शिकलेले नाहीत, जे लोक अति शिकलेले आहेत त्यांना फार बौद्धिक त्रास असतात. तर त्या त्रासा पासून तुम्ही वंचित आहात ही बरी गोष्ट आहे. आणि त्याच्या नंतर जे मनुष्याला लक्ष्मी चे त्रास आहेत ते सुद्धा नष्ट होतात. अशा रीतीने अनेक ज्या त्रासांना आपण भितो ते सर्व नष्ट होऊन आपण परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश करतो आणि तिथे सुखा समाधानाने नांदू लागतो. हे सहज योग आहे आणि त्याच्या बद्दल किती सांगितलं तरी कमी आहे. मी म्हणजे सतत रोज माझं एक कमीत कमी भाषणं होत असतं. आणि प्रत्येक ठिकाणी मी इतकं सांगते तरी लोक म्हणतात अजून तुम्ही काही नवीनच सांगितलं. तर त्याला काही अंत नाही आहे. तुम्हाला काही प्रश्न असला तर मला विचारा आता. माताजी हिंदी मध्ये बोलतात (रोज का भाषण दे दे के, पाणी असेल तर, बिलकुल पवन का पवन पुत्र थे ना तो हवा चल रही है) हा विचारा प्रश्न असला तर विचारायला पाहिजे. काही प्रश्न नाही का? काही तरी प्रश्न विचारायला पाहिजे ना, नाही का? बरं आता मी सांगते एक प्रश्न, एक प्रश्न असा विचारायला पाहिजे कि माताजी हे कसं होतं? हे कसं घडतं? हा असा प्रश्न विचारायला नको का आपण? कुणी काही सांगितलं म्हणून त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे. आपण विचारलं पाहिजे की असं कसं होतं? तुम्ही म्हणता एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत की नाही खऱ्या. तर आपल्या मध्ये अशी एक शक्ती आहे ज्याला कुंडलीनी असं म्हणतात. ती आपल्या पाठीच्या माकड हाडा मध्ये त्रिकोणाकार अस्थी मध्ये सर्पाकार बसलेली आहे. ती साडेतीन विटोळे घालून बसलेली शक्ती आहे. ही शक्ती हिला कुंडलिनी शक्ती असं म्हणतात. आणि अनादि काळा पासून हिचं वर्णन आपल्या मध्ये दत्तात्रयांनी वगैरे केलेलं आहे. पुष्कळश्या पुस्तकां मध्ये म्हणजे मार्कंडये जे चौदा हजार वर्षां पूर्वी झाले त्यांनी सुद्धा ह्या कुंडलिनीचं वर्णनं केलेलं आहे. जे देवी महात्म्य, देवी पुराण वगैरे त्यांनी लिहीलय त्याच्या मध्ये त्यांनी कुंडलिनीच वर्णन केलेलं आहे. ही शक्ती आपल्या मध्ये झोपलेली असते. कारण ही शक्ती म्हणजे आपली शुद्ध इच्छा आहे. आपली खरी इच्छा आहे. आता आपल्याला असं वाटतं की आपली खरी इच्छा म्हणजे आज असं वाटेल कोणाला की बुवा आम्हाला एक घर असलं म्हणजे झालं, तस नसतं, घर झालं म्हणजे मग तुम्हाला काही तरी वाहन पाहिजे, वाहन झालं की मग मुलं पाहिजेत, मुलं झालं की दुसरं पाहिजे. तेव्हा जी शुद्ध खरी इच्छा आहे, ती कोणचीये, ती आपल्या मध्ये एक शक्ती आहे, शुद्ध इच्छा फक्त एक आहे की आपला परमेश्वराशी संबंध झाला पाहिजे. आपण परमेश्वराला भेटलो पाहिजे.  आपला परमेश्वराशी योग घटीत झाला पाहिजे, ही शुद्ध इच्छा आहे आणि ती अजून जागृत झालेली नाही. तीच कुंडलिनी शक्ती, जी आपल्या त्रिकोणाकार अस्थी मध्ये आहे ती जागृत झाली म्हणजे हे कार्य घटीत होतं.आणि पुष्कळांच्या मध्ये ती तुम्हाला डोळ्याने सुद्धा दिसेल, की त्या माकड हाडा मध्ये जसं काही एखादं हृदय चालावं अशा रीतीने ती स्पंदित होते, आणि ती कुंडलिनी शक्ती जागृत झाली  म्हणजे तुमच्या हातामधून चैतन्याच्या लहरी वाहू लागतात आणि चारीकडे असलेलं पसरलेलं चैतन्य सुद्धा तुम्हाला जाणवतं. सर्व प्रथम ही जी परमेश्वराची शक्ती चारी कडे कार्यान्वित असते जी सर्व जिवंत कार्य करते ती सर्व प्रथम जाणवते. आणि ते कसं करायचं ते मी थोडक्यात आता करण्याच्या विचारात आहे. पण आता काही प्रश्न असला तर विचारून घ्या परत. ( श्री माताजी हसत आहेत) विचारा विचारा विचारलं पाहिजे म्हणजे काय की तुमचं लक्ष आहे तिकडे माझ्या ****. विचारा विचारा विचारा एखादा प्रश्न विचारला पाहिजे. (साधकाने प्रश्न विचारला) काय होण्याचा? म्हणजे **** हनुमान मंदिराकडे जाण्या येण्या करता रस्ता आणि वाहनांची व्यवस्था ही होण्याकरता प्रश्न मांडलेला आहे ती आमची इच्छा पूर्ण होईल का? अर्थात होईल पण तो काही फार मोठा मोठी गोष्ट नाही.हनुमाना कडे जाण्याची रस्ता होईल. तुम्हाला माहित नाही ह्या देशा मध्ये पुष्कळ येणार आहे, पण त्यांनी तुमचं समाधान मात्र होणार नाही. हे मुख्य सांगायचं. रस्ता होईल, सगळं काही होईल, कदाचित आमचं एखादं इथे आश्रम सुद्धा होऊन जाईल. काही तरी होईल, पुष्कळ होईल. पण त्याने समाधान होणार नाही, समाधान परमेश्वराला मिळाल्यावर होणार आहे, म्हणजे काय होईल? सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सर्व व्यसनं तुमची सुटणार, हनुमानाला मिळवण्यासाठी पहिल्यांदा व्यसनं सुटायला नकोत का? अहो जर आपण सगळी व्यसनं घेतो तर हनुमान कसा आपल्याला प्रसन्न होईल? आणि देवळात जाऊन तरी,  देवळा पर्यंत जायचे, पाय तोडायचे आणि शेवटी काय मिळणार? तेव्हा मी परमेश्वरा कडनं एक प्रश्न विचारते की आधी आपली व्यसनं वगैरे सुटायला नकोत का?  

परमेश्वराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या मध्ये सुद्धा त्याची क्षमता नको का? म्हटलं ना तर आधी ती क्षमता घ्या ते आई चं काम आहे ते मी करते. आता हनुमानाच्या आईने जे करायचं ते केलं, आता तुमच्या आईला जे करायचं ते करू द्या. ती तुम्ही पात्रता मिळवून घ्या. मग सगळं होणार आहे. मग जे म्हणाल ते, पण आधी परमेश्वराच्या साम्राज्यात जायला नको का? हां, आता दुसरा प्रश्न विचारा, उत्तम होता प्रश्न. हं आईच आहे मी, तेव्हां आईला प्रश्न विचारायला काय हरकत नाही. आई आपली असते, तिला आपण सगळे प्रश्न विचारतोच की नाही. जर आईला नाही विचारायचं तर कोणाला विचारायचं. हा विचारा आणखी, ( साधकाने प्रश्न विचारला कुंडलीनी जागृत करण्यासाठी काय करायला पाहिजे?) हो तो बरोबर प्रश्न आहे. ते मी करणार आहे. ते सांगते, पण बाकी, बरोबर ह्यांनी बरोबर प्रश्न विचारला. हा साधकाचा प्रश्न आहे. हा बरोबर प्रश्न आहे. त्याच्या साठी फार थोडसं करावं लागतं. ती सहजचं जागृत होते. जसं एखादं बी आहे, तर बी ला जर उगवायचं असलं तर काय करायचं, तुम्ही म्हणाल मातीच्या उदरात घाला म्हणजे होतं तसंच आहे. हे माती चं काम आहे, ते सहज होतं. सहज – स म्हणजे, तुमच्या बरोबर जन्मलेली ही कुंडलीनी, तुमच्या बरोबर जन्मलेली आहे, आणि तिचा जो योग मिळणं ते ही तुमचा बरोबर अधिकार आहे, हा तुमचा जन्म सिद्ध अधिकार आहे. योग मिळवणं हा तुमचा जन्म सिद्ध अधिकार आहे, तो तुम्ही घ्यायचा. मग एकदा तुम्ही जागृत झाल्यावर जसा एक दिवा दुसऱ्याला पेटवतो तसं तुम्ही दुसऱ्याला सुद्धा जागृत करू शकता. फक्त थोडसं त्याच्यातलं जाणावं लागत. लहान मुलं सुद्धा करू शकतात. सगळे करू शकतात. आता एक आणखी प्रश्न विचारा म्हणजे मग आपण करूया. ( साधक म्हणाले पाण्याची सोय ****) हो ते ( श्री माताजी हसत आहेत) सर्व सर्व आपण ज्या वस्तू मागितल्या त्या संसारिक आहेत. पाण्याची सोय झाली पाहिजे. इतकी गरिबी आहे इतकी दुर्दशा, मला सांगायचं म्हणजे, मी माझ्या वडिलांचं जे गाव होतं त्या गावी गेले होते. आं, काय म्हणाले?  (साधक बोलत आहेत, विचाराना विचारा काय विचारायचयं ते विचारा) काय पाहिजे सांगा, काय म्हणाल्या, ह्यांची भाषा, माणसाचा जो तमोगुण आहे हा असा ****  आणि दुसरी गोष्ट माणसाने दुसऱ्या माणसा बद्द्ल आपुलकी कशी येईल? बरोबर आहे फार छान प्रश्न विचारलात. ह्यांचा म्हणजे धार्मिक प्रश्न आहे. की आपल्याला एक दुसऱ्या बद्दल प्रेम कसं वाटलं पाहिजे. आणि हा तमोगुण आहे. त्याच्या मुळे आपल्याला एका दुसऱ्या बद्दल प्रेम वाटत नाही. हे रजोगुणा मुळे होतं. रजोगुण माणसं जी असतात ती भांडकुदळ असतात. तेव्हां हे कसं होतं? आता हे चौदा देशातनं लोक आलेत. तुमच्या साठी प्रेम घेऊन आलेतं, तुम्हाला भेटायला आलेत, पण तुमचा एकोपा नाही, त्याला कारण काय? आता बघा हे बोट आहे माझं, ह्याला जर दुखणं झालं ह्या बोटाला तर मला सांगावं लागत नाही, कारण हे दुःख मला झालं, तर मी त्याला लगेचं हाताने चोळून ठीक करते स्वतःच, आहे कि नाही, कारण माझंच बोट आहे ते. तसेच तुम्ही सुद्धा त्या विराट पुरुषाच्या अंगातले एक प्रत्यंग आहात. सगळे जणं आहात, पण अजून त्याची जाणीव नाहीये. त्याची जाणीव नाही की आपण एकच परमेश्वराच्या अंगातले प्रत्यंग आहोत. ही जाणीव नाही आहे. ती जाणीव जागृत झाल्या बरोबर तुमच्या हातामध्ये जी चैतन्य लहरी येतात त्याच्या मुळे एक नवीन चेतना जागृत होते आत मध्ये. आता आपल्याला पुष्कळ चेतना आहेत, जानवरा पेक्षा आपण पुष्कळ जास्त वाढलेले आहोत. वृद्धी झालेली आहे, समजा एखाद्या जानवराला सांगितलं की ह्या घाणीतनं जा, तर तो सरळ निघून जाईल, पण माणसाला सांगितलं तर तो जाऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्हाला आत्म्याचा साक्षात्कार होतो तेव्हा तुमच्यात सर्व प्रथम जी जाणीव येते ती ही की आपण सर्व एका शरीराचे अंग आहोत. तुमच्या बोटांवरच तुम्हाला कळेल की ह्या माणसाला काय त्रास आहे, त्या माणसाला काय त्रास आहे. त्याच्या पोटात दुखत आहे. तुम्ही बसले असालं,  तुम्ही म्हणाल काय हो तुमचं डोकं दुखतय का? तुम्हाला कसं कळलं? मला कळलं म्हणजे माझ्या बोटात कळू लागलं. ही तुमची बोटं बोलू लागतात आणि त्याच्यात कळत की ह्या माणसाला हा त्रास आहे, त्याचं ते चक्र धरलं त्याचं ते चक्र. म्हणजे ज्याला सामूहिक चेतना म्हणतात ती जागृत होते. दुसरा कोण आहे? अहो कुणी जर म्हणे माताजी तुमचे उपकार वगैरे तर त्यांना असं म्हणायचं की अहो दुसरा कोण, सगळे अंगातले प्रत्यंग झाल्यावर दुसरा कोण आहे. जर तुम्हाला त्रास असला तर मला ही त्रास होतो, मी माझा जर त्रास काढला तर तुमच्या वर कुठला उपकार झालेला आहे. तर ही चेतना आपल्यात अजून जागृत नाहीये. ती एकदा जागृत झाली म्हणजे एका दुसऱ्यासाठी आपण जीव देतो कारण जसं आपले नाक, डोळे, तोंड सगळं आपलंच आहे, तशे हे सगळे आपलेच आहेत. ह्याची चेतना आपल्या मध्ये येते. ही चेतना आहे ती आपल्या मध्ये येते. हेच मनुष्याचं जे आहे आता पर्यंत मानव स्थितीतन अतिमानव होण्याचं स्थान आहे. जेव्हा मनुष्य अति मानव होतो तेव्हां सगळ्यांचं दुःख आपल्या मध्ये काय आहे ते कळत. ही चेतना जागृत व्हायला पाहिजे आणि ती होणार. तेव्हां आपापसात प्रेम येणार, इर्षा, घृणा हे सगळं जाऊन आपण सर्व एक असल्यामुळे, एक दुसऱ्याला आपण मदत केलीच पाहिजे कारण आपण एकच आहोत, एकच शरीर आहोत. पण ही चेतना जागृत न झाल्यामुळे या अज्ञानामुळे असं होतंय, हे ज्ञान आतमध्ये जागृत झालं पाहिजे, म्हणजे तुमच्या नसांवर कळलं पाहिजे, तुमच्या बोटांवर कळलं पाहिजे, जाणवलं पाहिजे, “जाणीव” मराठीत फार छान शब्द आहे, ह्याची जाणीव झाली पाहिजे, हे डोक्यानी नाही हो म्हणायचं आम्ही तुम्ही भाऊ बहीण आणि मग भांडणं सुरु, ही आतून जाणीव होते. असं सर्व विश्वाचं होणार आहे. ठीक आहे? फार छान प्रश्न आहे. असा विचार असावा की आपल्यात सगळ्यात एकी यायला पाहिजे आपण सर्व एक आहोत पण अज्ञाना मुळे आंधळ्या लोकांना असं वाटतं आपण सगळे वेगळे आहोत, पण एकदा डोळे आले म्हणजे सगळे एकच आहोत आपण काही फरकच नाही. म्हणतात ना अवलियाला जात नसते. जो योगी जन झाला त्याला जात पात काही राहत नाही. सगळे एक. बरं आता काय करायचं त्याच्यासाठी? पहिल्यांदा मी आई आहे, तेव्हां माझ्या समोर टोपी बीपी घालायला नको तुम्ही आपले सरळ बसा, आई समोर जसे बसता तसं आई समोर बसतात तसे बसा, अगदी सर्व साधारण, काही त्याच्या मध्ये अपरोधिकता नको. अगदी साधेपणाने बसायचे. आई समोर आपण कसे बसतो हा विचार आधी ठेवला पाहिजे आम्ही आमच्या आई समोर बसलोय, आईशी जसा आपले पणा आहे तसा आपलेपणा प्रेमाचा ठेवला पाहिजे, आमचं सर्व कार्य प्रेमाचं आहे तेव्हा अगदी प्रेमाने बसलं पाहिजे. हं आता फक्त दोन्ही हात अशे ठेवायचे मांडीवर, आरामात, आरामात ठेवायचे अशे हं शांत पणाने, हम्म आणि आता डोळे मिटून घ्यायचे, सगळ्यांनी डोळे मिटा, हसायचं नाही, हे बघा त्यानीचं होणार नाही, हे असलं ह्यांनी होणार नाही थोडं शांतपणाने परमेश्वराच्या गोष्टी करतो ना आपण, डोळे मिटा, डोळे मिटून बसा, डोळे मिटण्या मध्ये एवढं हसण्यासारखं काय आहे बरं, हे जे हे आहे ना आपल्या खेडे गावातलं त्यांनीच होत नाही काम खेडे गावातं. नाहीतर तशे फार…