
Public Program Rahuri (India)
Sarvajanik Karyakram Date : 22nd February 1984 Place Rahuri
ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK राहरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील, तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक, आपण इथे जमलेले सर्व राहुरीकर आणि मागासलेले लोक, म्हणजे तसं म्हणायला मला बरं नाही वाटत. कारण सगळी माझीच मुलं आहेत. सगळयांना माझा नमस्कार ! दादासाहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखलं , की ह्या मनुष्याला लोकांबद्दल खरोखर कळवळा आहे. ज्याच्या हृदयामध्ये कळवळा नाही, त्यांनी समाज नेते होऊ नये. […]