Public Program (India)

महालक्ष्मी आणि त्याचे महत्त्व कोल्हापूर, ४/३/१९८४ कोल्हापूरच्या सर्व भाविक आणि श्रद्धवावान साधकांना आमचा नमस्कार! कोल्हापूरला आल्याबरोबर तब्येत खराब झाली, एक नाटकच होतं म्हटलं तरी चालेल. कारण आमचे सहजयोगी माताजींच्या शिवाय कुठे जायलाच तयार नाही आणि मी त्यांना म्हटलं होतं की सर्वव्यापी शक्ती परमेश्वराची आहे, तुम्ही जाऊन प्रयत्न करा. माझा फोटो घेऊन जा. तुमच्या हातून हजारो लोक पार होतील. पण ते एका ग्रामीण भागात, शहरात नाही, विशेषकरून क्षेत्रस्थळी तर मुळीच होणार नाही. माझे वडील मला सांगत असत की क्षेत्रस्थळी श्रद्धावान फार कमी राहतात. बहतेक क्षेत्रस्थळी लोक पोटभरू, जे देवळावरती पैसे कमवतात किंवा त्यांना बघून बघून परमेश्वरापासून परावृत्त झालेले असेच. त्यांना असं वाटतं की देऊळ थे असून आम्हाला काय फायदा झाला आणि देवळात सुद्धा हे लोक बसून नुसते आपलं पोटं भरून राहिलेत. यांच्यातही आयुष्यात काही विशेष आहे का? त्यांचंतरी आयुष्य काही उज्वल आहे का? त्यांच्यात काही बघण्यासारखं आहे का ? हे एवढं देवीची पूजा करतात, पाच-पाच त्यांच्या आरत्या करतात, तरी यांच्यामध्ये काही बदल होत नाही, पण असा देव आहे तरी काय? आणि अशी देवी जर महालक्ष्मी आहे तर ह्यांची अशी भिकाऱ्यासारखी स्थिती का? त्यामुळे कोणताही बुद्धीजीवी वर्ग याला परमेश्वरापासून परावृत्त करतो. त्यांच्या मनात असा विचार येतो की परमेश्वर म्हणून कोणी शक्ती नाही ठीक आहे, एक देऊळ आहे, चला जाऊन येऊ ! आपले देवळात गेले, दोन पैसे घातले झालं काम! तेव्हा त्याची ती जी सूक्ष्म स्थिती आहे, त्याच्यातली जी सूक्ष्म शक्ती आहे ती कधीही त्यांना मिळत नाही. तसे ते फार भाग्यवान आहेत कारण क्षेत्रस्थळी जन्माला आलेले आहेत हे मोठं भाग्याचं आहे ह्याबद्दल शंकाच नाही. पण क्षेत्रस्थळामध्ये जी इतर गोष्ट व्हायला सुरुवात होते ‘अति Read More …