Birthday Puja, Be Sweet, Loving and Peaceful Mumbai (India)

Puja for the 61° Birthday (Be sweet, loving and peaceful), Juhu, Bombay (India), 22 March 1984. ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सर्व सहजयोगी मंडळींना, संतांना माझा नमस्कार असो! साठी उलटल्यानंतर वाढदिवस नसतो तो! एक एक दिवस कमी होत जातो आयुष्याचा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून एक एक दिवस जेव्हा कमी होत आहे तेव्हा सुद्धा प्रगती त्यामानाने फार गतीमय झाली पाहिजे आणि फार आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही एवढ्या उत्साहाने माझा वाढदिवस केला. फार उत्साह होता, फार प्रेम ! फार आनंद वाटला मला! सहजयोग्यांना या संसारात राहून सगळे कार्य करायचं असतं. मुलं-बाळं, घर -द्वार, आई – वडील सगळ्यांना सांभाळून सहजयोग करायचा असतो. मी तसंच करते. मी सुद्धा माझ्या घरातल्या सर्व लोकांना सांभाळून, सर्व भाऊ-बहिणींना सांभाळून, सर्व नातलगांना सांभाळून, माझ्या यजमानांना सांभाळून सगळ्यांना सांभाळूनच मी माझा संसार चालवून जगाचा संसार चालवते आहे. कोणालाही सोडायचं नसतं. तेव्हा हे काम कठीण आहे. कारण काही तरी मुलीला झालं, काही मुलाला झालं, कुठे काही बिघडलं, नवरा वाईट असला, काही असलं की बायका घाबरतात. पुरुषांच्या नोकरीत काही खराबी झाली, त्यांच्या पगारात कमी झाली, पैशाचा त्रास झाला, असं झालं, तसं झालं. त्याने पुरुष घाबरतात. तऱ्हेतऱ्हेचे असे प्रसंग येतात ज्याने मनावरती दडपण येऊ शकतं. पण अशा परिस्थितीतच सहजयोग बसवला पाहिजे. कारण तुम्ही जर पाण्यापासून दूर असलात आणि तुम्हाला तहान लागलेली असली तर त्याच्यात काही विशेष नाही आणि तुम्ही म्हणाल की आम्ही तहान मारतो, त्याला काही विशेष नाही . पण सगळीकडे पाणी असूनसुद्धा तुम्ही त्यातून अलिप्त राहू शकता, तेव्हाच तुम्ही खरे सहजयोगी आहात. तेव्हा पहिल्यांदा प्रापंचिक गोष्टी फार लोक मला येऊन सांगत असत. माझ्या आईचं असं आहे, माझ्या वडिलांचं तसं आहे, Read More …