Birthday Puja, Be Sweet, Loving and Peaceful

Mumbai (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Puja for the 61° Birthday (Be sweet, loving and peaceful), Juhu, Bombay (India), 22 March 1984.

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सर्व सहजयोगी मंडळींना, संतांना माझा नमस्कार असो! साठी उलटल्यानंतर वाढदिवस नसतो तो! एक एक दिवस कमी होत जातो आयुष्याचा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून एक एक दिवस जेव्हा कमी होत आहे तेव्हा सुद्धा प्रगती त्यामानाने फार गतीमय झाली पाहिजे आणि फार आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही एवढ्या उत्साहाने माझा वाढदिवस केला. फार उत्साह होता, फार प्रेम ! फार आनंद वाटला मला! सहजयोग्यांना या संसारात राहून सगळे कार्य करायचं असतं. मुलं-बाळं, घर -द्वार, आई – वडील सगळ्यांना सांभाळून सहजयोग करायचा असतो. मी तसंच करते. मी सुद्धा माझ्या घरातल्या सर्व लोकांना सांभाळून, सर्व भाऊ-बहिणींना सांभाळून, सर्व नातलगांना सांभाळून, माझ्या यजमानांना सांभाळून सगळ्यांना सांभाळूनच मी माझा संसार चालवून जगाचा संसार चालवते आहे. कोणालाही सोडायचं नसतं. तेव्हा हे काम कठीण आहे. कारण काही तरी मुलीला झालं, काही मुलाला झालं, कुठे काही बिघडलं, नवरा वाईट असला, काही असलं की बायका घाबरतात. पुरुषांच्या नोकरीत काही खराबी झाली, त्यांच्या पगारात कमी झाली, पैशाचा त्रास झाला, असं झालं, तसं झालं. त्याने पुरुष घाबरतात. तऱ्हेतऱ्हेचे असे प्रसंग येतात ज्याने मनावरती दडपण येऊ शकतं. पण अशा परिस्थितीतच सहजयोग बसवला पाहिजे. कारण तुम्ही जर पाण्यापासून दूर असलात आणि तुम्हाला तहान लागलेली असली तर त्याच्यात काही विशेष नाही आणि तुम्ही म्हणाल की आम्ही तहान मारतो, त्याला काही विशेष नाही . पण सगळीकडे पाणी असूनसुद्धा तुम्ही त्यातून अलिप्त राहू शकता, तेव्हाच तुम्ही खरे सहजयोगी आहात. तेव्हा पहिल्यांदा प्रापंचिक गोष्टी फार लोक मला येऊन सांगत असत. माझ्या आईचं असं आहे, माझ्या वडिलांचं तसं आहे, नवऱ्याचं तसं आहे, अमक्याचं असं आहे. हळूहळू करत करत सगळें सुटत चाललं. सुटता सुटता मनुष्य अशा स्थितीला आला आता सहजयोगात, की त्याला स्वत:चा प्रपंच जो आहे तो एक नाटकासारखा वाटू लागलेला आहे आणि बाकी जगाचा जो प्रपंच आहे तिथे काही तरी करून दाखवलं पाहिजे ही भावना जागृत झालेली आहे. असं मला काल लक्षात आलं आणि मला फार आनंद झाला. विशेष करून ही मुंबानगरी म्हणजे, तिथे म्हणूनच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिघ्घंनी मिळून इथे पृथ्वीतून जन्म घेतला. त्याला कारण हेच आहे, की या मुंबानगरीत जोपर्यंत असा काहीतरी जबरदस्त फोर्स येणार नाही तोपर्यंत सहजयोग इथे बसणार नाही. तेव्हा या मुंबानगरीमध्ये अनेक तऱ्हेचे प्रकार आहेत. ते इतके अनेक आहेत की त्यांचे वर्णन करता येत नाही. भूत प्रकार आहेत, बाधा प्रकार आहेत, पैशाचे प्रकार आहेत, लाचलुचपती आहेत. सर्व तऱ्हेची घाण या मुंबई शहरात ! सगळ्या नद्या जशा समुद्रात वाहून जातात तशी सगळी घाण या समुद्रात येऊन बसते. सगळ्या तऱ्हेचे चोर, सगळ्या तऱ्हेचे लंपट लोक, सगळ्या तऱ्हेचे ठगवणारे, सगळे इथे येऊन बसलेले आहेत. तेव्हा या चिखलामध्ये जी कमळं मी काल म्हटली ती, आपल्याला ती ন

Original Transcript : Marathi फुलवायची आहेत. ती जर आपल्याला फुलवता आली तर सबंध देशामध्ये त्याचा लाभ होणार आहे. दिल्लीमध्ये सुद्धा फार जोरात कार्य सुरू आहे. तसंच या मुंबई शहरातसुद्धा तुम्ही फार मोठं कार्य केलेले आहे आणि ते कार्य म्हणजे या अशा अपुण्य नगरीमध्ये, अशा अधर्मी नगरीमध्ये, अशा सर्व घाणीत तुम्ही स्वत:च्या कमळाला वर उचलून घेता, हे फार मोठं आहे. त्याच्यासाठी मी तुमचं किती अभिनंदन करावं ते मला कळत नाही. गर्वाने मी नुसती झुकून जाते, की केवढं हे मोठं माझ्यासाठी झालेलं आहे. माझ्या मुलांनी किती मोठं कार्य केलं. ह्या समाजात राहून, ह्या समाजाशी निगडीत राहून, त्याच्यात सामावून त्यांनी कसं हे सुंदर कार्य केलं आहे. त्याच्याबद्दल मला फार तुम्हा सगळ्यांचा आदर वाटतो. आता प्रगती हळूहळू नको, तर जोरात प्रगतीला लागलं पाहिजे. सहजयोग पसरल्याशिवाय तुम्ही पसरू शकत नाही. सहजयोग पसरला पाहिजे आणि तुम्ही उठलं पाहिजे. तेव्हाच हे होणार आहे. जोपर्ंत तुम्ही उठणार नाही, तोपर्यंत सहजयोग पसरणार नाही. जसे दिव्याची ज्योत वाढते तसा त्याचा प्रकाश वाढतो, तेव्हा हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. जितकी तुमची ज्योत वाढेल तितका त्याचा प्रकाश वाढणार आहे. तऱ्हेतऱ्हेचे लोक आहेत. मला सगळे कबूल आहे. पण त्यातच आपण सहजयोग बसवला ना! त्यातच आपण इतके लोक उभे केले आहेत ना ! आणि आपण सिद्ध करून दिलं ना की परमेश्वर आहे, परमेश्वराची शक्ती आहे आणि त्या शक्तीत आपण कार्य करू शकतो. हे आपण सिद्ध केल्यावर आता त्याबद्दल शंका न ठेवताना अगदी खुल्या दिलाने चढाई केली पाहिजे. खूप जोरात काम सुरू केलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी राहता तिथे शक्य असलं तर एक एक पाटी लावायची बाहेर. एक एक केंद्र प्रत्येक घरात सुरू करायचं. करायचं सुरू. काय होत बघू या! अशा रीतीने जिथे जिथे जमेल, जितकं जमेल तितकं केलंच पाहिजे. जमण्यापेक्षाही थोडं जास्त केलं पाहिजे. आणि ती हिम्मत तुम्ही धरावी आणि हे होण्यासारखं आहे. आणि मला आशा आहे की पुढच्या वेळेला मी मुंबईला येईन तेव्हा पुष्कळ सहजयोगी असतील. असे तर पुष्कळ येतातच सहजयोगी. काल किती लोक आले होते तुम्हाला माहिती आहे. हजारो लोक होते. पण त्या हजारो लोकांमध्ये सहजयोगी, पक्के, पोहोचलेले, जाणलेले किती होते! अजूनही सहजयोगी लोक आपल्या घरच्या वातावरणात, आपल्या घरच्या गोष्टींकडे फार लक्ष देतात. मी क्षणात ते प्रश्न सोडवते तुम्हाला माहिती आहे. आणि सहजयोगात ते अगदी क्षणात सोडवले जातात. पण तुम्ही या लहान-लहान गोष्टींसाठी बसून उगीचच डोकंफोड करता आणि स्वत:चा नाश करून घेता. दूसरी गोष्ट आहे, आपापसामध्ये वैमनस्य. जे पूर्वी होतं किंवा पूर्व काळापासून चालत आलेलं आहे ते सोडून आता आपण सगळे सहजयोगी झालोत . आपल्यातले सगळे जे काही आहे, वैमनस्याचे जेवढे काही पॉईंट्स आहेत ते गेले पाहिजे. जेवढं काही आपले चुकलेले आहे ते सगळं काही गेलं पाहिजे. आपल्यामध्ये जे काही, आपापसामध्ये, मनामध्ये वाईट आलेलं आहे ते सगळं गेलं पाहिजे. कारण आता आपण स्वच्छ झालो आहोत. आता आपण आरशासारखे झालो आहोत. तेव्हा आपल्यामध्ये काहीही घाण राहू शकत नाही. ह्याच्या एका गोष्टीला असं लक्षात ठेवलं पाहिजे की आपली आई किती क्षमा करते. किती तिला याबाबतीमध्ये सहन करावं लागतं. किती गोष्टी सहन करते, कसं सगळ्यांना सांभाळून घेते, कसं सगळ्यांना सामावून घेते. आपल्यासमोर आईचा आदर्श आहे. ती जर एवढं करू शकते, तर आम्ही का करू शकत नाही. आम्ही 3

Original Transcript : Marathi आपल्यामध्ये का भावना आणू शकत नाही की झालं गेलं विसरून जा. कोणी कसेही असले तरी त्यांना डोक्यावर उचलून घ्यायचं. त्यांना मोठंे करायचं, त्यांना बदलून टाकायचं. तुमच्यात ही किमया असल्यावरती मागे काय झालं, कोणी काय केलं हा विचार करू नये. आता पुष्कळ लोकांचं असं असतं की सहजयोगात हे नवीन आलेले. त्यांच्यासमोर तुमचा पहिला आदर्श हा दिसणार आहे की तुम्ही कशा प्रकारे लोकांशी वागता! आता इथे कदाचित आपली जागा होईल. असं मला वाटतं. आणि नंतर आश्रमही होईल. पण त्या आश्रमात चार माणसं ठेवल्याबरोबर जो येईल त्याला दुल्लती मारायची हे काम सुरू होणार आहे. हे मी पाहिलेले आहे. कुठेही आश्रम केला की चार माणसे आले की त्यांना म्हणतात की तुम्ही इथे कशाला आले? तुम्ही कोण? तुम्ही इकडे येऊ नका. तुम्हाला इथे राहायचं नाही. तुमचं हे नाही. तुमचं ते ठीक नाही. ते असं ठीक नाही. ते तसं ठीक नाही अशा रीतीने त्यांच्याशी लोक वागायला लागले सहजयोगात. म्हणजे हे शोभतं का आपल्याला ! असं जर आपण वागायला लागलो तर आपल्याला शोभतं का? कबूल, काही लोक सहजयोगाला लाभदायक नाहीत. कारण ते लोक सहजयोगाला त्रासदायक आहेत. काही लोकांपासून काहीही होण्यासारखं नाही. कबूल! पण त्या लोकांना सगळ्यांना तुसडवून वागायचं नाही. त्या सगळ्यांना हळूहळू आपल्यामध्ये आणायचं. जे त्याच्यातले वाईट असतील, जे त्याच्यातले कामातून गेलेले असतील, त्यांचा आम्ही विचार करू आणि काढून टाकू. पण तुम्ही त्याबद्दल मात्र अगदी शांतपणा ठेवायचा. आपल्या जीवनामध्ये पहिले शांतपणा आणला पाहिजे. अत्यंत शांत झालं पाहिजे. मी सारखं सांगत असते, की कबूल तुमच्या जीवनात खूप ्रास आहे, सगळं काही आहे. पण शांतपणा हा जीवनात आणला पाहिजे. हे मला आता तुम्ही या वाढदिवसाला दान दिलं पाहिजे की, ‘माताजी आम्ही शांतपणा ठेऊ.’ अत्यंत शांत, बर्फाचा शांतपणा आला पाहिजे. अत्यंत सहन केलं पाहिजे. त्याच्याशिवाय काम होणार नाही. आणि ते तुम्ही सहन करूनसुद्धां काहीही तुम्हाला होणार नाही. सगळं सहस्रारातून निघून जाणार आहे. जे काही तुम्ही सहन करता म्हणता ते सगळे निघून जाणार आहे. तेव्हा माणसाने त्याबद्दल जास्त विचार करू नये. मी फार दुःखी, मला हा त्रास वरगैरे. हे कसलं काय आलंय! अहो, तुम्ही संत झाला आहात. आता तुम्हाला दुःख कसलं आलय! संतांजवळ दु:ख राहतात का? असा विचार ठेवला पाहिजे, आम्ही संत झालोत . आम्ही फार मोठे झालोत. आमच्याजवळ दु:ख, आमच्याजवळ या व्यथा ह्या कशा असणार? आम्ही लोकांच्या व्यथा ठीक करणारे. आम्ही साबणासारखे, सगळ्यांना धुणारे. आमच्यावरती कसा मळ बसणार! हा एकदा तुम्ही निश्चय कायम केला तर पहिल्यांदा तुम्हाला ‘शांती लाभ’ होणार आहे. तुमच्यामध्ये पहिल्यांदा शांती लाभणार आहे. आणि तो शांती लाभ झाल्याबरोबरच तुम्हाला सगळे व्यवस्थित दिसू लागेल. जोपर्यंत मनुष्याच्या मनात शांती बसणार नाही, तोपर्यंत काहीही व्यवस्थित दिसणार नाही. सगळं उलटं दिसणार आहे. कोणत्याही माणसाबद्दल धारणा, कोणत्याही परिस्थितीबद्दल विचार ह्या सर्व गोष्टी आहेत त्या जर तुम्ही, अशासाठी तुमचे मन जर हालत असले तर कधीही स्पष्टरूपाने दिसणार नाही. म्हणून याला शांतीचा वास करायचा. शांती पाठ करायचा. आईने सांगितलं शांत राहायचं! शांत झाल्यावर तुम्हाला इतकं लक्षात येईल, की सगळे संबंध कसे बनतात ? सगळा आनंद कसा येतो? मैत्री कशी होते ? कामं कशी होतात? तुम्ही अशांत असले तर तुमच्यावरती जे देवदूत आहेत, 4

Original Transcript : Marathi तुमच्यासाठी जी सगळी आम्ही व्यवस्था केलेली आहे त्या सगळ्या व्यवस्थासुद्धा, त्यांना समजत नाही की आता ह्यांना करायचं काय? एकदम धावपळ सुरू, घाई सुरू, काही काही लोकांचं म्हणजे राग नाही, पण त्यांना प्रत्येकवेळी इथे ठेऊ का तिथे ठेऊ का? ह्याच्या डोक्यावर ठेऊ का त्याच्या डोक्यावर ठेऊ? सारखा हात त्यांचा असा असा चाललेला असतो. तेही अशांतपणा आहे. काही लोक रागीट असतात, तोही अशांतपणा आहे. तऱ्हेत-्हेचे अशांतपणाचे प्रकार आहेत. काही काही लोक बोलत नाही, राग आतमध्ये घेऊन बसायचं, बोलायचं नाही. एकदम फणकाऱ्याने वागायचं किंवा एखाद्याने अगदी मी फार दुःखी आहे असं तोंड करून बसायचं. हे काही साधु-संतांचं लक्षण आहे? साधु-संत देण्यासाठी येतात जगामध्ये. द्यायचं असतं दुसर्यांना. तेव्हा जे साधु-संत असतात, त्यांच्याकडे कोणी आला तेव्हा त्याला ओलावा मिळाला पाहिजे, प्रेम मिळालं पाहिजे. त्याला समाधान मिळालं पाहिजे, परत त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्याला शांत वाटलं पाहिजे, की या माणसाकडे गेलो बुवा, किती शांत वाटलं! किती शांत मनुष्य ! अहो, तुम्ही किती पंडित असलात, तुम्ही ऐकले आहे का कुठे, वेदाचार्य, अमुक-तमुक असले त्यांच्या पायावर कोणी जातं का? एखादा फकिर जरी कुठून आला, रस्त्यावरून एक साधू मनुष्य येऊन उभा राहिला, जो साधू आहे, त्याच्या सगळे पायावर जातात की नाही! तुम्ही कितीही सहजयोगात विद्वान असलात तर त्या विद्वत्तेचा उपयोग काय, तुमच्यात शांतपणा नसला तर! चित्तात ज्याच्या शांतपणा नाही, त्याला कोण साधू म्हणणार? ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पहिली गोष्ट मनुष्याच्या तब्येतीत, वागण्यात भारदस्तपणा, शांतपणा असला पाहिजे. थिल्लरपणा, प्रत्येक वेळेला खिदळत खिदळत हसायचं हे फार कॉमन असतं सहजयोग्यांचं. कारण आतून आनंद होतो. पण खिदळायचं हे बरोबर नाही. भारदस्तपणाने मनुष्याने राहिलं पाहिजे. भारदस्त. राहाणीत , वागण्यात सगळीकडे भारदस्तपणा पाहिजे. आणि दूसरं म्हणजे असं की आपल्यामध्ये जर काही निगेटिव्ह असलं तर त्याचे परिणाम दिसतात वागण्यावर. एखादा मनुष्य जर निगेटिव्ह असला तर त्याच्याकडून सारख्या चुका होतील. ह्याची मिस्टेक, त्याची मिस्टेक, काही ना काही तरी मिस्टेक होत राहणार आहे. मग ‘असं कसं झालं माताजी! माझ्या हातून असं कसं चुकलं?’ कसं चुकलं! काही तरी त्याच्यात खोट असल्याशिवाय कसं होणार ? मग कोणती खोट आहे ? मग माझ्यात काहीतरी निगेटिव्हिटी आहे. माझ्यात निगेटिव्हिटी आहे नां, मग मी ती काढून टाकणार! पण माताजींना येऊन असं नाही म्हणायचं की, ‘माताजी, मी काय करू? मी सगळे करते तरी होत नाही.’ सगळं करते पण मनापासून होत नाही. मनापासून जी गोष्ट होत नाही त्या गोष्टींचा परिणाम तुमच्यापर्यंत येत नाही. पुष्कळ पुरुषांना मी पाहिलं आहे, ‘आम्ही एवढी मेहनत करतो माताजी, पण निगेटिव्हिटी काही जात नाही.’ अशी कशी जाणार नाही. तुम्ही निगेटिव्हिटी नाहीच आहात, कशी जाणार नाही? सगळं निघून जाऊ शकतं, फक्त प्रयत्न हा केला पाहिजे. अजून सहजयोगामध्ये कच्चे लोक पण पुष्कळ आहेत, हे ही लक्षात घेतलं पाहिजे. सगळे पक्के नाहीत. कच्चे लोक पुष्कळ आहेत. सांभाळून ही राहिलं पाहिजे. त्यातले काही कच्चे लोक असे आहेत, की ते पैशाच्या लोभाने आलेले आहेत सहजयोगात. नुसते पैसे मिळविण्यासाठी. पुष्कळसे लोक असे आलेले आहेत. पैसे मिळेल किंवा मोठेपणा मिळेल. स्टेजवर नुसतं 5

Original Transcript : Marathi फिरायला मिळेल. काहीतरी शिष्टपणा करायला मिळेल. लीडरशीप मिळेल. असेही पुष्कळ लोक येतात. पण ते ही बदलणार . कारण त्यांच्याही लक्षात येईल की खोटेपणा सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात काही अर्थ नाही. लोक हसतात. फार मोठे मोठे असे फिरत असतात. उदाहरणार्थ एक गृहस्थ यायचे होते दिल्लीला प्रोग्रॅमला. ते काय म्हणाले, ‘मी काही येऊ शकत नाही. मी फार बिझी आहे . मी अमुक आहे. तमुक आहे. असं झालं, झालं.’ तर एक सहजयोगिनी होती, लहानशीच. शहाणी होती. ती म्हणाली , त्या गृहस्थाला असं सांगा की जसा माताजींनी प्रोग्रॅम केला तसा तुम्ही मावळणकर हॉलमध्ये एक दिवस तरी करून दाखवा. तुमच्या प्रोग्रॅमला चार तरी माणसं येतात का? पैसे देऊन सुद्धा येणार नाहीत. तुम्ही जरी मोठे मिनिस्टर असले, मोठी माणसं असले तरी तसं तुमच्या प्रोग्रॅमला चार माणसंसुद्धा पैसे देऊन येणार नाहीत. तर तुम्ही स्वत:ला काय समजता! तुमचा कोणावर काही अधिकार आहे का? कोणाबद्दल तुम्हाला प्रेम आहे का? कोणी तुम्हाला खरं हृदयापासून मानतं का ? कोणी येणार नाही. आज तुम्ही मिनिस्टर म्हणून येतील उगीचच तोंडपूजेला पण खरोखर पाहिलं तर तुम्ही मावळणकर हॉलमध्ये प्रोग्रॅम करून बघा. या माणसाला चार माणसं सुद्धा भेटायची नाहीत. ोॅडव्हर्टाइज करू द्या. लाखो रूपये खर्च करू द्या. चार माणसं जरी प्रोग्रॅमला आली तरी नशीब समजायचं. म्हणजे शेवटी अशी जी माणसं पुढारीपण घेतात, मोठेपण घेतात, स्वत:ला मोठे समजतात, काही तरी असतं स्वत:चं, शिष्टपणा दाखवायचा वगैरे. या लोकांना नंतर पाडावं लागतं. आश्रमातसुद्धा असं होत नेहमी. आश्रमात एखादा मनुष्य असला तर स्वत:ला शिष्ठ समजतो. मी म्हणजे काहीतरी विशेष. मग तो शिष्ठासारखा वागू लागतो. शिष्ट मनुष्य जो असतो तो महामूर्ख आहे. सगळे हसतात, हां, चढलं वाटतं हे हरभ-्याच्या झाडावर! आज जे लोक तुमच्या पुढे पुढे करतात ते ही खोटे आहेत. ते ही पडणार, तुम्हीही पडणार. तेव्हा आपल्यामध्ये ही कुंडलिनी जागृत झाल्यावर, ज्याला आपण म्हणू की चंडी जागृत झाली, या देशात, चंडी जागृत झाली. म्हणजे काय झालं ? कुंडलिनी जागृत झाली म्हणजे, आपण सडेतोडपणा ठेवायचा त्याच्यात. सडेतोडपणा. कोणी जर खोटेपणा केला तर तो मनुष्य हमखास पडणार. त्यानंतर आपण काळजी करायला नको. तो सगळ्यांच्या समोर दिसेल, की हे असे खोटे आहेत. त्यांच्यात हे दोष आहेत. ते समोर येऊन उभे राहतील. हा सहजयोगाचा विशेष प्रकाश देण्याचा एक भाग झाला. पैशाला तेव्हा जी नवीन मंडळी आलीत, तुम्हाला जर वाटतील की हे खोटे आहेत, हे लपवाछपवी करतात, आले, अमुक झालं, तमुक झालं. काहीही असलं, तुम्ही त्यांची काळजी करायची नाही. त्यांचे विचार आम्ही करणार, त्यांची व्यवस्था आम्ही करणार. तुम्ही स्वत:ची व्यवस्था मात्र भारदस्त राजासारखी ठेवायची. कोणी कसाही असला, कसाही वागला तरी तसंच रहायचं. असं जर तुमचं वागणं असलं तर कोणीही तुम्हाला हात लावू शकत नाही. पण लहानसहान गोष्टींमध्ये लोक भांडणं करतात. लहान लहान गोष्टींमध्ये. आता मराठीत बोलल्या, मग हिंदीत कशाला बोलल्या माताजी. मराठीतून बोलायला पाहिजे. अरे पण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, पण यांना बघा. ह्या लोकांनी, हे फॉरेनर्स आलेत, ह्यांनी तर कधी मराठी भाषा कशाशी खातात, त्यांना मराठी नावाची भाषा पण जगात आहे हे ही माहिती नसेल. पण ते चूपचाप ऐकत बसतात. त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे. कारण ते तुमच्यापेक्षा पुष्कळ हरभऱ्याच्या झाडावर चढलेले आहेत. चांगले आपटले आहेत चढून चढून. त्यांना माहिती आहे, ते हरभऱ्याच्या झाडावरून आपटलेले. आपटून आपटून आता टाकीचे घाव सोसून त्यांच्यात

Original Transcript : Marathi देवपण आलेले आहे. अजून आपल्याला आपटायचं आहे. त्या आपटण्यासाठी आता आपण कशाला चढायचं वरती. जाऊ द्या काही घोड्यावर बसायला नको. कागदी घोड्यावर बसून जी स्थिती होते, ती स्थिती स्वत:ची कशाला करून घ्यायची आणि सगळ्यांसमोर फटफजिती करून घ्यायची. सगळ्यांची फटफजिती होते. तेव्हा एक शहाणपणा धरून, कोणताही खोटेपणाचा, मोठेपणाचा आव आणायचा नाही. सहजयोगात तुम्ही पैसेवाले असाल तर असाल आपल्या घरात. माताजी नाही खरेदी करू शकत. तुम्ही श्रीमंत असाल तर तिथेच रहा. तुम्ही मोठे मिनिस्टर असाल तर घरात बसा. तुम्ही कोणीही असलात तरी तुमचे महत्त्व इथे नाही. इथे मग फक्त हे आहे की तुमची कुंडलिनी कुठे आहे ? तुम्ही सहजयोगात कुठे आहे ? तुम्ही कोणते कोणते सिद्ध केलेत आपले चक्र? ते मुख्य आहे. तो मनुष्य मोठा, बाकी मनुष्य मोठा नाही. हे साधु-संतांचं राज्य आहे. साधु-संतांच्या राज्यात या सगळ्या बाह्यातल्या गोष्टी बाहेरच वाहण्यासारख्या आहेत. त्या तुम्ही कोणत्या गाडीतून आलात? तुम्ही किती पैसे घातले? तुम्ही काय केलं? ह्याचे काही महत्त्व इथे नाही. कोणावर इंप्रेशन पडणार नाही. तेव्हा ज्या गोष्टीचं खरं जगामध्ये नेहमी इंप्रेशन पडलं ते म्हणजे तुम्ही संत -साधु कोणत्या लेव्हलचे आहे ते पाहिलं पाहिजे. ते संत- साधु तुम्ही झालं पाहिजे. एवढा मोठा राजवाडा आहे. फोर्ट आहे, आग्ग्राला. मी गेले होते तिथे. तर रात्र झाली, संध्याकाळ झाली, तर असं वाटायला लागलं की भूतखाना आहे इथे, काही आहेच नाही. जे मोठमोठे राजे झाले, राण्या झाल्या काय काय त्यांनी दागिने घातले असतील. पुरुषांनी काय काय नखरे केले असतील. काय झालं असेल ते झालं असेल. सगळं संपलं. बाहेर आले तर तिथे एक मदार आहे. तिथे एक दीप जळत होता. त्या लाईटमुळे आम्ही खाली येऊ शकलो. कारण लाइटच नाही तिथे. विचारलं की, ही कोणाची? तर म्हणे, हे फकीर होते. आणि हे अकबर बादशहांचे होते. पण ते कधीही आतमध्ये, राजवाड्यामध्ये गेले नाहीत. म्हणून गुरू अकबर बादशहाने त्यांची कबर इथे बांधली. केवढी मोठी गोष्ट आहे. केवढी मोठी गोष्ट आहे की आज त्या माणसाच्या तिथे अजून दिवा लावला जातो आणि त्या एवढ्या मोठ्या महालामध्ये एक दिवा नाही. अंधार गुडूप. कोणाला माहीत नाही, कोण राजे झाले ? कोण राण्या झाल्या? कोणाच्या कबरी तिथे असतील! काय असेल ते असेल. तेव्हा मनुष्याचं जे राहतं, पर्मनन्टली जे राहतं ते काय आहे? ते त्याच्यातलं ऐश्वर्य आहे आणि ते ऐश्वर्य त्याच्या आत्म्यातलं आहे. ते आम्ही सहजयोगाने मिळवायचं. आम्हाला दूसऱ्या लोकांसारखं ऐश्वर्य मिळवायचं नाही. जे टिकाऊ नाही. जे निरंतर राहणारं आहे ते मिळवायचं आहे. आणि ते मिळविल्यानंतर वाटलं पाहिजे, दिलं पाहिजे, लोकांना बरं केलं पाहिजे. त्यांना फायदे झाले पाहिजे. त्यांच्याकडे करुणेच्या भावनेने पाहिलं पाहिजे. सगळ्यांना प्रेमाने वागवलं पाहिजे. हे एकदा जर वाढत चाललं तर मला वाटतं की या देशाची तर काय हजारो देशांची स्थिती आपण ठीक करू. पण पहिल्यांदा तुम्ही तयार व्हायला पाहिजे. माझ्या एकटीच्याने होणार नाही. जसं हे आहे (माईक). ह्याच्यातून मी बोलते आहे. पण याला काढायला किंवा याच्या आवाजाला न्यायलासुद्धा काहीतरी पाहिजे नां! तसंच तुमचं आहे. जर तुम्ही अगदी पूर्णपणे पोकळ असलात तर त्याच्यातून ही शक्ती अशी सुंदर वाहेल की जसं मी काल म्हटलं होतं की ते व्हायचे दिवस आलेत. विश्वाचं कमळ उघडायचं आहे. विश्वाचं सहस्रारदल उघडायचं आहे. सहस्रदलाचं कमळ उघडायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही एकेक दल आहात. ते काही जास्त कठीण काम नाही. सगळ्यांनी जरा मेहनत केली, स्वत:ची ध्यान-धारणा, स्वच्छता

Original Transcript : Marathi ठेवायची. मेहनत करायची. घरातच आपल्या म्हणायचं आमचा हा आश्रम आहे. आम्ही आश्रमवासी आहे. सकाळी उठून ध्यान-धारणा, पूजा वरगैरे सर्व व्यवस्थित करून जे काही कार्य करायचे आहे ते, परत संध्याकाळी ध्यान-धारणा. परत जिथे प्रोग्रॅम असेल त्या प्रोग्रॅमला जायचं. कुठेही प्रोग्रॅम असला तरी तो गाठायचा. आपल्या तिथे जवळपास करू शकतो का एखादं केंद्र, तिथे सुरू करायचं, चार माणसं जोडायची. त्यांना सहजयोगाला बोलवायचं. हळदीकुंकवाला बायकांना बोलवायचं, सहजयोग सांगायचा. असं असं माताजींनी आम्हाला दिलेले आहे. हे मिळालेले आहे. हे सगळीकडे सांगत सुटायचं. सुसमाचार सगळ्यांना द्यायचा. अशा रीतीने सहजयोग वाढवायचा. आणि जी मंडळी अजून अर्धवट आहेत, त्या लोकांना जरासं प्रेमाने घ्यायचं. बसवायचं. ‘हे करा म्हणजे बरं होइल.’ हिडीसफिडीस करून होणार नाही. त्याला फार प्रेमाने वागायला पाहिजे. ही गोष्ट पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते. अत्यंत प्रेमाने सगळ्यांना जोडून घ्यायचं. त्यांच्यावरती सगळ्यात जास्त प्रेमाचं इंप्रेशन पडतं की तुम्ही कसे आहात. एका बाईला मी दिल्लीला पाठवलं, की तुम्ही जाऊन आशीर्वाद घ्या. तर तिने मला सांगितलं, ‘वहाँ तो बंदरों का राज चलता है।’ म्हटलं, ‘बंदरों का राज चल रहा है?’ ‘और कहाँ माताजी, उन बंदरों के बीच मुझे नहीं जाने का। कहाँ आप और कहाँ आप के बंदर !’ मला काही समजेच ना बंदर कैसे रह रहें हैं वहाँ ? तर म्हणे ‘एक से एक तुफान आदमी रहता है?’ ज्याच्याशी बोला तोच म्हणे हरभऱ्याच्या झाडावर. बरं म्हटलं, ‘कोई हर्ज नहीं। हम उनसे बात करेंगे। ठीक है।’ पण इतकं वाईट नसणार. मी तुम्हाला सांगते इतकं वाईट नसणार. पण इंप्रेशन असं पडतं माणसाचं. जरा ही तुम्ही शिष्टपणा केला की इंप्रेशन वाईट होणार. अत्यंत नम्रपणाने रहायचं. दसरं सांगायचं म्हणजे आपल्या भारतीय परंपरेला उतरणारे आपण असायला पाहिजे. आता समजा. एखादा आश्रम आपला झाला आणि तिथे जीन्स घालून, केस कापून एखादी बाई उभी असली आणि तिने ‘हाय’ सुरू केलं, ते म्हणतील, आं, हा कसला काय आश्रम! आपला काही मॉडर्न आश्रम नाही. अनादी आश्रम आहे. ते काही असं नाही, की आपण तिथे मॉडर्न वस्तू आणल्या आणि मॉडर्न पद्धती जाणतो. मॉडर्न बोलतो, तसं काही करायचं नाही. ट्रॅडिशनल होणं वेगळं आहे आणि ग्लॅमरस होणं वेगळें आहे. ग्लॅमर सहजयोगाला मान्य नाही. मान्यच नाही. पण ट्रॅडिशनल राहायचं. म्हणजे असं नाही की विवाहित सत्रीने अगदी भूतासारखं रहायचं. आपल्याकडे तर विधवांनीसुद्धा व्यवस्थित ट्रॅडिशननुसार कपडे घालायचे असं ठरवलेले आहे. तेव्हा ट्रॅडिशनली राहायचं. पुरूषांनीसुद्धा ट्रॅडिशनली राहायचं आहे. जास्त साहेबीपणा करायचा नाही. नाही तर, मी परवाच सांगितलं की साहेबीपणाचं लक्षण असं असतं की जेव्हा काही तरी साहेबीपणा दाखवायचा तर बो वगैरे लावून लोक येतात तेव्हा लोकांना असं वाटतं की हा बेअररच आहे की काय. कुणाला हे वाटत नाही की हा कोणी साहेब आला. मोठे पैसे खर्च करून बो घेतलेला आहे. कशाला पाहिजे? आपल्या देशातले कपडे फार सुंदर लावून आहेत. ते पारंपारिक ह्या देशात आले आहेत. त्याने आपल्यासाठी थंड रहातं, बरं रहातं, व्यवस्थित रहातं, दिसायला सुंदर दिसतं. तेव्हा दुसर्यांचं फालतू अनुकरण करायला नको. शक्यतो माणसाने पारंपारिक स्थितीमध्ये रहायला पाहिजे, विशेषतः आश्रमामध्ये परंपरेने रहायला पाहिजे. आपल्याकडे परंपरागत जी आवभगत आहे, जी बोलण्याची पद्धत आहे, गेटआऊट वरगैरे आपल्याकडे शब्द नाही. असे आपण बोलत नाही कधी गेट आऊट. उठल्यासुठल्या ‘व्हॉटस् रॉँग’ असे आपण शब्द बोलत नाही. किंवा ‘आय हेट यू’ असं आम्ही म्हटलं असतं लहानपणी तर वडिलांनी ठोकून काढलं असतं आम्हाला. ‘आय हेट यू’ असं फार म्हणतात इंग्लिश भाषेत . ‘आय 8.

Original Transcript : Marathi हेट यू’. म्हणजे तुम्ही आहात कोण? हेट यू म्हणजे काय? पण यांच्याकडे असं आपण म्हणू का की ‘ मला तुझी घृणा वाटते.’ म्हणतील, तुला घृणा वाटते का? तर तुझे नाक ठीक करू आपण. तिकडे ही अशी पद्धत आहे बोलायची. ती आपण शिकायची नाही. इंग्लिश पद्धत शिकायची नाही, हे वेस्टर्न शिकायचं नाही. हे चांगलं नाही. ‘आय हेट यू’ म्हणजे काय? आमच्याकडे अशी पद्धतच नाही बोलायची. कोणी आलं तर, ‘भाग्य, परम भाग्य आहे. या, बसा, तुम्हाला काय पाहिजे ?’ अहो, तुम्हाला माहिती आहे आपल्या इथे हरिश्चंद्राने सगळं राज्य देऊन टाकलं. लहान मुलाला मारून टाकलं, कोणी काय केलं. ज्याने जे मागितलं ते आपण आपल्या पाहुण्यांना देत असू. पण आता ही इंग्लिश लोकांची पाहूण्यांची जी पद्धत आहे, म्हणजे वेस्टर्न लोकांची ती आपल्याला नको आणि हे असे भयंकर शब्द तोंडात, घाणेरडे शब्द, शिव्यागाळीचे मुळीच आणायचे नाहीत. अगदी सोज्वळ शब्दाने, आपण जसं एखाद्या बाळबोध घराण्यातील लोक जसे वागतात तसं आपण वागलं पाहिजे. तुमची आई अत्यंत बाळबोध आहे आणि तसेच तुम्ही वागले पाहिजे. आणि वाईट तऱ्हेचं बोलणं मी अगदी ऐकलं की मला फार आश्चर्य वाटतं. आता तुमच्या आया बदलल्या मी तुमची आई आहे. तेव्हा तुमची आई जर तशी बोलत असली तर ते विसरा. आणि माझ्यासारखं वागायला सुरुवात करा. आणि कोणतीही अशी गोष्ट बोलायची नाही. मुख्य सांगायचं म्हणजे प्रेम आणि शांती या दोन गोष्टींचा तुमच्यातून पूर्णपणे प्रकाश मिळाला पाहिजे. लोकांनी सांगितलं पाहिजे की तो प्रेमाचा आणि शांतीचा अवतार आहे. असं मला मनुष्य ऐकायला मिळाले की मला फार आनंद होईल. एवढं मला प्रेमाचं आणि शांतीचं दान आज द्यावं. हे माझं मागणं आहे.