Public Program (India)

1984-12-02 Public Program, Pen Village, Maharashtra India  पेणच्या सर्व भक्त आणि प्रेमी जनांना आमचे वंदन असो. मुंबईला सर्व कार्यक्रम ठरवण्यात आला, त्यात काही पेणची मंडळी आली होती आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी म्हटलं माताजी तुम्ही पेणला का येत नाही? आतूनच मला फार ओढ वाटली. मी म्हटले या वेळेला पेणला जायचं माझा प्रोग्रॅम ठरवा तुम्ही दोन तारखेला. ती ओढ का वाटली त्याचं आज प्रत्यंतर दिसलं. ओढ मलाही होती आणि ओढ तुम्हालाही, उशीरही झाला आणि वाटत होतं आणि म्हटलं हि सगळी तिष्ठत बसली असतील, पण हा प्रेमाचा सोहळा बघून सगळी काही माझी चिंता दूर झाली.  ह्या महाराष्ट्र भूमीच वैशिष्ट्य हे आहे, भक्तीचा इतका ठेवा आपल्याला संत साधूंनी देऊन ठेवलेला आहे कि जसं काही सगळीकडे भक्तीची फुलं विखुरलेली आहेत.  वृक्षाला सुरुवातीला एक दोनच फुलं येतात आणि त्यांना पुष्कळ  हालअपेष्टा आणि त्रास सहन करावा लागतो तसंच आपल्या संत साधूंचं झालं पण त्यांनी जी आपल्यासाठी मेहनत केली त्याची हि फळं आपल्याला दिसतात कि इतकी मंडळी भक्तिभावाने स्वतःचा आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी इथे एकत्र झालेली आहेत. आत्मसाक्षात्कार हा शब्द फार मोठा वाटतो आणि तो म्हणायला सुद्धा बराच वेळ लागतो. पण तुमची कुंडलिनी मात्र तत्क्षण, एका क्षणात जागृत होते. झाली पाहिजे. कारण जे फार महत्वाचे आहे ते अगदी सहजच घडले पाहिजे. आपण जो श्वास घेतो तो जर कठीण झाला किंवा त्यासाठी आपल्याला चार पुस्तके वाचावी लागली, किंवा सल्ला मसलत घ्यावी लागली तर किती लोक जिवंत राहतील. जे अत्यंत आवश्यक असे जीवनाला आहे, सर्वात महत्वपूर्ण जे आहे ते सहजच मिळाले पाहिजे. जर ते सहज मिळाले नाही तर ते कुणी मिळावूही शकणार नाही. सगळं संसारातील जेवढं झालेलं आहे. हि जी सृष्टीची रचना Read More …