Makar Sankranti Puja Mumbai (India)

Makar Sankranti Puja Date 14th January 1985: Place Mumbai Type Puja आता तुम्हा लोकांना सांगायचं म्हणजे असं की इतकी मंडळी आपल्याकडे पाहणे म्हणून आली आणि त्यांना तुम्ही सगळ्यांनी एवढ्या ह्याने बोलावलंत, आणि त्यांची इतकी व्यवस्था केली. त्याबद्दल कोणीही, काहीही मला असं दाखवलं नाही की, आम्हाला अशी मेहनत पडली किंवा आम्हाला असा त्रास झाला. आणि मुंबईकरांनी विशेष करून फारच मेहनत केलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या तर्फे, ह्या सर्वांच्या तर्फे मला असं म्हणावं लागेल, की मुंबईकरांनी फार आघाडी मारलेली आहे. पण जे ह्यांना सांगते तेच आपल्याला सांगते. आज आपण तिळगूळ देतो. कारण सूर्यापासून जे त्रास आहेत ते आपल्याला होऊ नयेत.  पहिला त्रास, सूर्य आला म्हणजे मनुष्य चिडचिडा होतो. एक दुसऱ्याला उणंदुणं बोलतो. त्याच्यामध्ये अहंकार बळावतो. सूर्याच्या खाली राहणाऱ्या लोकांना फार अहंकार आहे. म्हणून अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा मंत्र आहे, की ‘गोड गोड बोला. ‘ तिळगूळ घेतल्याबरोबर अंगात गरमी येते आणि लागले वसकन् ओरडायला. म्हणजे झालं! अहो, आत्ताच तिळगूळ दिला. निदान तेवढं तरी तुम्ही गोड बोला माझ्याशी. ते सुद्धा जुळत नाही. तिळगूळ घेतला नी लागले ओरडायला. कसला तिळगूळ तुमचा, फेका तिकडे. तेव्हा आजच्या ह्याच्यामध्ये आपण असं ठरवून घ्यायचं, की ही फार सुसंधी आहे. माताजी आल्या आणि माताजींनी आम्हाला कितीही सांगितलं तरी ते आमच्या डोक्यात जाणार नाही. जर आमच्या डोक्यात गरमी असली तर काहीही जाणार नाही. ही गरमी निघायला पाहिजे. आणि ही गरमी आपल्यामध्ये कुठून येते ? तर ती अहंकारामधून येते. पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही सहजयोग सुरु केला, तेव्हा सगळ्यांच्या भांडाभांडी असायच्या. म्हणजे इथपर्यंत की डोकी फोडली नाही हे नशीब! बाकी डोकी शाबूत आहेत सगळ्यांची आता. पण भांडणं फार. कुणाचं कशावरून Read More …