Public Program

(India)

1985-01-16 Public Program Marathi, Nasik India DP-RAW, 44'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Public Program,Vaitarna,India,16th January 1985

की ह्यात काहीतरी विशेष आहे. आपण जाणून घेतलं पाहिजे की ही मंडळी इतक्या लांबून इतक्या परदेशातून आली.  यांना इथे काय मिळतंय ते समजून घेतले पाहिजे. असा थोडासा आपण समजुतदारपणा ठेवला पाहिजे. <Pause >  कदाचित आम्हा लोकांच्या आर्थिक परिस्थिती मुळे आम्हाला लोकांना हा विचार शिवत नसेल. पण काहीतरी विशेष असल्याशिवाय ही चौदा  देशातली  मंडळी इथे का येतात असा आपण एकदा जर  मनात विचार घेतला तर पुष्कळ गोष्टींचा आपल्याला पत्ता लागू लागेल. अजून आपल्याला  आपल्या धर्माबद्दलच माहिती नाहीये मुख्य म्हणजे. आपला धर्म जरी अनादी होताय,  भारतीय धर्म जरी अनादी होता तरीसुद्धा त्याची अनेकदा पुनर्रचना  कर करून, शेवटी सहाव्या शतकात “आदिशंकराचार्य”  हयांनी अवतरण घेतलं आणि या धर्माची पुनर्स्थापना पूर्णपणे करून कुंडलिनी योगा वरती  त्यांनी  पुष्कळ  पुस्तक लिहिली. कुंडलिनी शिवाय आता मार्ग नाही असं ‘उघडपणे त्यांनी  “सत्य उघडे करूनी  सांगितले”. तसंच श्रीकृष्णाने सांगितलं होतं  की तुम्ही स्थितप्रज्ञ झालं पाहिजे म्हणजे , तुम्ही आत्मसाक्षात्कारी  झालं पाहिजे. आपल्याला हा शब्द समजतो आत्मसाक्षात्कारी ,पण ते म्हणजे काय हे  माहिती नाही. ते आज लोकांना देण्याची पाळी आलेली आहे.

<Pause > पण आपला विचार सखोल नसल्यामुळे जे परंपरागत आपलं चालू आहे तेच चालू आहे. म्हणजे आता टाळ कुटत  जायचं पंढरी पर्यंत. अरे, पण त्याने आपल्या आई-वडिलांना काही मिळाले नाही. आम्हाला काही मिळालं नाही.  का आम्ही  टाळ कुटली ?    पंढरीनाथाला भेटायला.  पंढरीनाथाला भेटणं  म्हणजे देवळात जाऊन नुसतं डोकं फोडून घेणे नव्हे. हे समजलं पाहिजे.  जरी आपण अशिक्षित असलो तरी एक गोष्ट लक्षात येते.  उलट अशिक्षित लोकांच्या लवकर लक्षात यायला पाहिजे की तिथे देवळात जाऊन नुसती जर आपण डोकीफोड  केली तर आपल्याला परमेश्वर  मिळणार आहे का ? नाही मिळणार.  मिळाला आहे का कोणाला? नाही मिळाला. कोणती व्यसन लोकांची सुटली का?  भांडाभांडी सुटली का? कोणाचा स्वभाव ठीक झाला का? नाही झाला. ह्याचा दोष तुम्ही परमेश्वराला देता. आमची गरीबी  सुटली का? नाही झाली. आमचं दैरिद्र  गेलं का?  नाही.  आमचं  दैनं  गेलं का ? नाही. आमचे आजार गेले का ? नाही. मग, परमेश्वर काय केलं असं म्हणून  लोक मलाच ठोक विचारतात पुष्कळ . आम्ही एवढं त्या परमेश्वरासाठी  धावपळत  करतो आणि तुम्ही आता परमेश्वराच्या गोष्टी सांगता माताजी या आधुनिक काळा मध्ये . तर असा परमेश्वर गेला कुठे ?काय आमचं चुकलं? मुख्य  चुकलं असं की प्रत्येक मोठ्या पुस्तकांमध्ये  जेवढे काही आपल्याकडे वेद वगैरे झाले या सगळ्यांमध्ये लिहिलेलं आहे की आत्मबोध हा घेतला पाहिजे  .पहिलं आत्म्याचे दर्शन झालं पाहिजे.  पहिला तुमचा आत्मा जागृत झाला पाहिजे. तहत रामदास स्वामी पासनं   तुकाराम बघितलं तर  ज्यांची  तुम्ही भजन  टाळ  कुटून कुटून म्हणतात  त्याच्यात हेच सांगितलं आहे की आत्मसाक्षात्कारी व्हा . मग म्हणायचं आत्मसाक्षात्कारी व्हा , आत्मसाक्षात्कारी व्हा. पण कुणी व्हायचं? परमेश्वराला ओळखा.  परमेश्वराला ओळखा . हृदयामध्ये  बाणा . कसं करायचं  हो ? प्रश्न उभा राहिला पाहिजे मनामध्ये की आम्ही करायचं कसं ?

 बोलायच्या गोष्टी, ” बोलाचाच भात बोलाचीच कढी”. म्हणजे आहे तरी काय? तसं काही दिसत नाही.  आमचं काही बरं झालेलं दिसत नाही.  मग  परमेश्वराच्या विरुद्ध लोक बसतात.  मग  कम्युनिझम घेतात . परमेश्वरच  नाही असं म्हणतात. असे पुष्कळ जगामध्ये देश आहेत. ते म्हणतात परमेश्वर नाही.  परमेश्वर कशावरून आहे.  असता  तर हे असं  झालं कसं  असतं . पण त्याला  सरळ  उत्तर असं आहे की अजून आपला  संबंधच परमेश्वराशी झालेलाच नाही. जोपर्यंत आपला संबंध परमेश्वराशी झाला नाही, आपण परमेश्वरावर काहीही  हक्क  लावू शकत नाही . आता जर ह्या वस्तू / ह्या यंत्राचा  जर    कनेक्शन  झालं नाही,   काही  संबंध झाला नाही ,तर मी  याच्यातंन  काही बोलले  तर तुम्हाला ऐकायला येईल का ?तसंच आपलं आहे.  आपला संबंध  न  होतानाच आपण परमेश्वराला टाहो फोडून फोडून  अरे परमेश्वरा असं कर तसं कर त्याला त्याला रोज   हुकूमचं  गाडत  असतो.  जसं काही तो आपल्या खिशातचं  बसलेला आहे. पण तुम्ही परमेश्वरासाठी काय केलं आहे?  एक  फक्त लक्षात आणा  की अजून तुम्हाला आत्मबोध  झालेला नाही. तुम्हाला आत्मसाक्षात्कार झालेला नाही.  तो घेतला पाहिजे. आम्ही म्हणे मोठे मुसलमान , कुणी म्हणे आम्ही हिंदू . कुणी म्हणे आम्ही ख्रिश्चन. सगळे एका  माळेचे मणी आहेत. कोणालाही आत्मबोध झालेला नाही. सगळे आपापसात  भांडतात .काही ना काही भांडणं काढून . 

<Pause > मुख्य म्हणजे जी हिंदू धर्माची मुख्य जी गोष्ट आहे, गाभा आहे  जी मुख्य बाब आहे ती म्हणजे आत्मसाक्षात्कार होणें. कोणालाही विचारून बघा. कोणाला जरासे  दोन शब्द ज्यांनी वाचले तो सांगू शकतो. नामदेव ते सांगितलं . जनाबाईनी ते सांगितलं.  तुकारामानी ते सांगितलं . ज्ञानेश्वरांनी तर तेच सांगितलं. पण ज्ञानेश्वर म्हणजे “दिंड्या घालणे”. अहो या ज्ञानेश्वरांच्या मंदिरात आम्ही गेलो होतो. म्हटलं  यांना ध्यान करू  द्या.  ते म्हणाले नाही. तुम्ही दिंड्या घाला. म्हटलं त्या  ज्ञानेश्वरांनी दिंड्या घातल्या होत्या  का  पहिल्यादा ? तुम्ही  ज्ञानेश्वरांच्या नावाने दिंड्या घालता . त्यांनी घातल्या होत्या का? अहो, ते तर वणवण फिरत होते. त्यांना ही कुणी  मान्य नाही केलं आणि आता मला नका मान्य करू. पण दिंड्या घालायचचं  हे कोणी सांगितलं तुम्हाला?ज्ञानेश्वरांनी सांगितलं का? नाही,  मग.

हे आता समोर म्हटलं तुम्ही पुतळ्यात  बसवले . मी काय बोलू तुम्हाला आता.  जर ते  जिवंत असते तर तुम्हाला ठीक केल असतं  . पण  ते आज जिवंत असते तर तुम्ही त्यांचे हाल  केले असते. मेल्यावरती दिंड्या घाला. ही  आपल्या धर्माची  आज  अशी ग्लानी ची स्तिथी आहे. या धर्माला परत संस्थापन करायलाच पाहिजे आणि सगळ्यांनीच  या बाबतीत लक्ष दिले पाहिजे. नुसतं  आपल्याला काय मोठं म्हणून कोणी मोठं होणार नाही. तुमच्यात जागृती झाल्याशिवाय, तुमच्यात धर्माचं  तेज आल्याशिवाय कोणी तुम्हाला मानणार नाही. आता कालच सांगते, मी येताना रस्ता  आमचा चुकला. पुढे’गेलो. एका  दुकानात गेलो.  सगळे झिंगुन पडले होते.  सगळे इथून तिथपर्यंत . आता विचारायचं कुणाला रस्ता  कुठे आहे  मोडक  सागरचा? सगळे झिंगलेले. मग शेवटी मागाऊन जाऊन एक नौकाराला धरून आणलं तर त्याने सांगितलं बाबा  मागे जा म्हणुन .तो एक तेवढा बचावला होता.कसा माहित नाही. बाकी तो ही थोड्या वेळाने जायचा कामातनं . ही आपली दुर्दशा आहे. आणि कशाला गमज्या मारायच्या. जो पर्यंत आपला आत्मा  आपल्याला प्रकाश देत नाही तो पर्यंत आपल्याला काहीही कळत नाही . आपल्यामध्ये  प्रकाशाच नाही . आपल्याला समजताच नाही  की  परमेश्वरी शक्ती काय आहे. त्या परमेश्वरी शक्तीचा किती उपयोग होऊ शकतो. त्यांनी आपण किती मोठे कार्य करू शकतो. आपण म्हणू  आम्ही माताजी खेडवळ आहोत. आम्हाला  काय समजणार. त्याला काही समजायला नको .जास्त विचार करायला तर मुळीच नको. हे सहजचं घडत आणि सहजचं  होत. 

<Pause > नसते विचार करून आणि नसते उपद्व्याप उभे करून तुम्ही काय मिळवलेलं आहे. काही नाही. आता आत्मबोध कसा होतो. तो फक्त कुंडलिनी जागृतीनी होतो. असं  आपल्याला सर्व शास्त्रात सांगितलेलं आहे. मग त्याच्यात कशाला वाद विवाद करायचा? भक्तिमार्ग एवढ्या साठी सांगितला  की तुम्ही परमेश्वराला आठवा , त्याच्या ध्यानात राहा. पण  जर साक्षात परमेश्वर येऊन उभा राहिला, तर त्याला तरी ओळख बुआ . ते का ओळखता येत नाही . उद्या जर तुमच्या समोर राम  किंवा  कृष्ण  येऊन उभे राहिले तर तुम्ही ओळखाल का? देवी येऊन उभी राहिली  तुम्ही  ओळखाल का ? नाही ओळखायची. कशी ओळखणार? ओळखायची  खुण काय? जो पर्यंत आत्म्याचा  बोध होत नाही तुम्हाला कशाचीच ओळख पटणार नाही. इतकंच होणार. आता आपण म्हणतो की हे स्वयंभू स्थान आहे माताजी. कशावरून? कोणी सांगितलं? म्हणून यांना  . तुम्हाला माहित आहे का स्वयंभू आहे किंवा नाही. तुम्हाला त्याचं  काही माहित आहे का?नाही माहित. स्वयंभू कसं ओळखायचं ? तो प्रश्न परत. हा भोंदू का  साधू  कसं ओळखायचं ?चांगला का  वाईट कसं  ओळखायचं ? काही त्याला मार्ग आहे का?वरून संभाविक दिसले तरी आतून ते आहेत की नाही हे ओळखायला काही मार्ग आहे का? एकच मार्ग आहे. आपल्या आत्माच्या प्रकाश आला पाहिजे. एकच मार्ग आहे. एकच त्याला उत्तर आहे. तुमच्यात अजून आत्म्याचा प्रकाश आलेला नाही. म्हणून  गोंधळले.  जेव्हा आत्म्याचा प्रकाश माणसामध्ये येतो तेव्हा चैतन्य त्याला चारिकडनं बोटांना  लागतं. 

<तुम्ही जरा शांत बसा बरं. त्या बाई . काय तुम्हाला झालंय मघापासनं .  चुपचाप बस. दोन मिनिटं शांत बसता येत नाही . त्यांना देवळाची सवय झालेली ना. देवळात जा. देवाला चार शिव्या द्या . नाहीतर काही करा. बसा शांतपणे . चुपचाप बसा . थोडीतरी शिस्त पाहिजे .लोक आले आहेत बाहेरून.काय म्हणतील तुम्हाला ?>

तर मनुष्याला जी एक कल्पना परमेश्वराबद्दल आहे की आपण काही केले तरी ठीक आहे. परमेश्वराचं नाव घेतलं म्हणजे झालं . वाट्टेल त दारू प्या . वाट्टेल तर बायकोला मारा. वाट्टेल त खून करा. वाट्टेल ती कामे केली तरी परमेश्वर आहे ना. त्याला आम्ही मानतो. कसं  मानता  तुम्ही ?तुमच्यामध्ये  आलाय का धर्म?तुमच्या मध्ये प्रेम आलंय का लोकांचं ?तुम्हाला कळकळ वाटतेय का लोकांची? वाटली  तरी त्याच्यात तुमचा परत अहंकार येणार. मी दुसऱ्यांसाठी एवढं करतो.  मी’ दुसऱ्यांसाठी  तेवढं  करतो. पण  आत्मबोध जर झाला तर असं म्हणत नाही मनुष्य. तो म्हणतो होतंय ते. ते  होतंय.  याच ही होतंय. त्यांचं ही होतंय. तिसऱ्या (pause ) तृतीय  पुरुषात मनुष्य बोलू लागतो. त्याचं  झालं त्याचं झालं तो झाला (laugh ) . अकर्मात उतरतो. तो असं  म्हणत नाही , मी केलं , मी केलं  हे  गेलं डोक्यातून. मी गेलाच मुळी . पण ते होण्यासाठी आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. ही मी गोष्ट म्हणते.  म त्याच्यात तुम्ही धर्म कुठे घेऊन आले. आधी धर्मच बसलेला नाहिये पहिल्यांदा . म्हणून म्हणतायत  आता’ आधी धर्म बसवा माताजी. पण माझं जरा उलट {वीस} विचार केलेला आहे. तो फरक काय तो समजून घ्या. म्हणजे तुम्हाला सहजयोग थोडा लक्षात येईल .पूर्वी असं होतं तुम्ही सफाई करा.  एक एक माणसाची चांगली सफाई करा . गुरु लोक खूप ठोकून काढत असतं . एक एखादा जरी गेला तरी त्याला ठोकून  काढायचं . मारून काढायचं. अमुक करायचं . तमुक करायचं . म्हणजे खरे गुरु. खोटे नाही. खोट्याना काय? पैशे द्या म्हणजे झालं. खऱ्यांचं सांगते. बुवाबाजी म्हणजे आपल्याकडे ‘गाजलेलीच  आहे . पण  तरी सुद्धा त्यात हे समजलं पाहिजे की जो मनुष्य खरा असेल तो तुमच्याकडून पैशे नाही घेणार. तुमच्या दमावर नाही जिणार . कधीच  नाही घेणार तुमच्याकडून पैशे . उलट देईल . पण  तुमच्याकडनं घेणार नाही . परमेश्वराला विकता येत नाही. पहिली गोष्ट.  अशी बुवाबाजी वाढली तर  त्याच्या आपण आहारी   जातो आणि माताजी  बुवाबाजीच्या  विरुद्ध आहेत म्हणून माताजींच्या ही  विरुद्ध जातो. पण हे बुवा किती दिवस टिकणार ? उद्या तुम्हालाच त्रास दिले की  तुम्ही याल माझ्याकडे रडत. माताजी तो बुवाजी एवढे  पैसे घेऊन गेला. तो तितके घेऊन गेला. आपल्याला धर्मातलं ,काय समजतंय हे आधी बघायचं . 

दत्ताची जयंती काढली. मुख्य म्हणजे दत्त जयंती. अहो पण दत्त कोण ते तरी माहितीये का? आणि जयंती करता तुमचा संबंध आलाय का दत्तांशी ? जे दत्तभक्त आहेत सगळे.  ज्यांचा आत्मसाक्षात्कार झाला नाही त्यांच्या सगळ्यांच्या  पोटात दुखणार. लिहून घ्या माझ्याकडून. कोणाच्या पोटात दुखलं त्याला वेळी जाऊन विचारा की दत्तांचे भक्त आहेत का? कारण दत्तच रागवलेत. पोटामध्ये दत्त बसलेयत. तेच तुमच्यावर रागावलेत . जर तुम्ही खरंच  दत्तांशी तुमचा संबंध असेल  तर कोणताही रोग तुम्हाला होणार नाही. जर तुम्ही  खरोखर परमेश्वराशी संबंधित असलात  तर कॅन्सर वगैरे कोणताही रोग होणार नाही उलट तो नीट होईल . जर हे झालं नाही तर त्या परमेश्वराचा काय फायदा. तर जे लोक अशा मार्गाला लागतात त्यांनी असा विचार केला पाहिजे, काही तरी  बाह्यतः करू. फक्त आम्ही दत्तजयंती केली . असं का ? मग काय ? आम्ही तांदूळ आणले  अमकं   आणलं तमकं  आणलं . मजा केली. म तसं म्हणा ना. तुम्ही मजा केली.  मनोरंजन केलं.  पण दत्त जयंती झाली?  दत्तजयन्ती  तेव्हा होणार जेव्हा तुम्हाला आत्मबोध झाला. हे ही सगळे करतात दत्ताची जयंती. सगळे करतात . पण ह्यांना झालेला आहे आत्मबोध. तेव्हा दत्तजयंती म्हणजे आपल्यामध्ये तो जो धर्म दत्ताने सांगितला तो आतनं बाणतो . तो बाणला पाहिजे. आतून ते तत्वात उतरलं पाहिजे. भिनलं पाहिजे .तर त्या दत्तजयंतीला  अर्थ. नाहीतर नुसतं मनोरंजन करायचं  देवाच्या नावावर . ते ही  एक चालत .परमेश्वर हा मनोरंजन नाहीये . आनंद आहे तो. मनोरंजन काय ? आज झालं मनोरंजन . हसले खेळले . परत झालं रडगाणं सुरु.

आनंदाला दोन बाजू नसतात. सुख दुःख नसतं . नुसता आंनद असतो . निव्वळ आनंद . तो निव्वळ आनंद तुम्हाला मिळवला पाहिजे. तो तुमच्यात आहे .ते सगळं काही तुमच्यात आहे. ते तुम्हाला द्यायला मी इथे येते . पण त्यात आपलं डोकं लावायचं. “अतिशहाणे त्यांचे बैल रिकामे”. अगदी खरी म्हण आहे आणि त्याची मला प्रचिती फार येते की हे लोक इतके सुशिक्षित असून अतिशहाणे नाहीत. आपण अतिशहाणे आहोत. तेव्हा त्यापासून  आपला काही स्वभाव बदलला का? आपलं काही भलं झालं का ? आपल्या मुलांच काही भलं झालं का?आपली निदान तब्येत  तरी ठीक राहते का? निदान आपल्याला तेवढी तरी समर्थता आहे का ? की  आपण कोणतेही व्यसन घेणार नाही . आपण समर्थ आहोत का?  <Pause >की अजून अगदी कमकुवत मनाची आपण माणसं  आहोत. दारूचा गुत्ता दिसला’ की धावतो तिकडे .दोन पैसे कुठे खायला मिळाले तर पटकन खाऊन घेतो .कुणाचं नुकसान करता आलं तर बसून बसून  तोच विचार करतो.  

की आपल्यामध्ये ते परमेश्वरी प्रेम आलेलं आहे. की ज्या प्रेमाच्या दमावर आपण दुसऱ्याचं कल्याण त्यांचं  भलं करू शकतो अशी शक्ती आली  आहे का आपल्यामध्ये ? नाही आलेली आहे ना? मग  ती मिळवून घ्या. ती  मिळवलीच पाहिजे . त्याला काही शिक्षण लागत नाही . काही  मोठं डोईजड काही वाचन लागत नाही. काही लागत नाही. प्रत्येक माणसामध्ये ही शक्ती आहे  सुप्तावस्थेत . तिला कुंडलिनी म्हणतात. तिचं एकदा जागरण झालं म्हणजे त्याला अंकुर फुटले. पण त्याच्यानंतर त्याचा वृक्ष करतानाच त्रास होतो. विशेषतः आपल्या महाराष्ट्रात. कारण आम्ही म्हणजे डोकेबाज फार. एकदा ते अंकुर फुटलं म्हणजे त्याला सांभाळलं पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला  माहिती आहे. त्याला  सांभाळून जपून एक सुंदरसं    झाड तयार करायचं . एक वृक्ष तयार करायचा आणि मग काय वाट्टेल तरी झंझावात आला काही जरी झालं त्याच्यामध्ये तो  वृक्ष कसा अगदी आपल्या  ऐटीत उभा राहतो. तसं  आपण ऐटीत उभं रहायचं. हे आत्मसाक्षात्काराचं  लक्षण आहे. 

मी तुमची आई आहे आणि मी तुम्हाला जे  समजावून सांगते ते तुमच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी . पण ते सगळं डोक्यावरून जातं . कोणी  ऐकतंच  नाही मुळी .कोणाच्या डोक्यातच येत नाहीये. आता इतक्यांदा इथे आल्यावर सुद्धा अजून वैतारणामध्ये  सगळ्यात कमीत कमी सहजयोगी आहेत. फार दुःखाची गोष्ट आहे. सगळ्यात कमीत कमी. संबंध हिंदुस्थानात सगळ्या जगात सगळ्यात कमीत कमी तुमच्या वैतारणाला लोक कमी आहेत. तरी त्यांचं आम्ही एवढं महत्व करतो. वैतारणाचे लोक आले आहेत. सांभाळा बुआ त्यांना. पण इथे म्हणजे मला असं वाटतं संत  साधू कधी आलेच नसतील . असं असेल कदाचित . कारण ही  इच्छा की आम्ही आत्मबोध घ्यावा  आणि  त्याचं सगळं ज्ञान आम्हाला फुकट  मिळतं ते घ्यावं  हे  सहजस सगळ्यांना असतं.  उपजत असलं पाहिजे . पण ते नाही . आता मात्र थोडीशी प्रगती बरी झाली आहे. मला त्यानी फार आनंद झाला आणि अशीच तुमच्यावर परमेश्वरी कृपा असू द्या. परमेश्वराला मिळवून घ्या .  ही  वेळ आलेली आहे. आणिबाणीची वेळ आहे. ह्या वेळेला जो झाला पार तो झाला  आणि नाही तो राहिला . अशी स्थिती होणार आहे. मी सांगून ठेवते. मग नंतर तुम्ही म्हणाल  माताजी बघा तुम्ही आम्हाला निक्षून नाही सांगितलं . आता आईला जितकं बोलता येईल तितकं मी बोललेलं आहे आणि तितकं मी समजावून सांगितलं आहे की तुम्ही सहजयोगाकडे लक्ष द्या. स्वतःच्या तब्येती ठीक करून घ्या. स्वतःचं  भलं करून घ्या. जस कृष्णानी सांगितलं “योग्य क्षेम: वहामयम’. कृष्णानी सांगितलं योगानंतर मी क्षेम करणार.  त्यांनी असं नाही सांगितलं की मी तुमचं क्षेम वहन करतो. असं कुठं सांगितलं नाही त्याने. त्याला विचारलं . तर त्याने सांगतलं मला फळ पुष्प काही दिलं ते मी घेईन . पण द्यायच्या वेळा एक शब्द वापरलाय . अनन्य भक्ती करा. अनन्य म्हणजे जेव्हा परमेश्वराशी संबंध होतो तो अनन्य . आहे की नाही. जेव्हा दुसरा नाही तो.  परमेश्वराशी काही संबंध नाही. तेव्हा तुम्ही भक्ती करण्यात काही अर्थ नाही. “अनन्य भक्ती” हा शब्द त्यांनी  सांगितलेला  अनेकदा . कर्मात सुद्धा त्यांनी बरोबर मांडलेले आहे की  तुम्ही जे कर्म करता ते परमेश्वरावर ठेवा. ठेवूच शकत नाही मनुष्य. कारण जर तुम्ही जर तुम्ही म्हणाल मी सगळं करतो  परमेश्वरावर. चोऱ्या करतो तेही परमेश्वरावर सोडतो.. मी कोणाला मारतो ते ही परमेश्वरावर सोडतो. कोणचही काम केलं तर मनुष्य सारखा असा  विचार करतो की  नाही  मी काही विशेष केलंय . कारण काय? त्याच्यात अजून अहंकार आहे.

पण जेव्हा तुम्हाला आत्मबोध होतो तेव्हा तुम्ही असं  म्हणत नाही की मी  केलंय. तुम्ही हे ही म्हणत नाही परमेश्वरानी केलंय. तुम्ही म्हणता होतंय ते सगळं. सहज होतंय.  माताजी . सगळं होतंय. सहज होतंय. हे सहजच झालं . कोणची घटना सहज झालं . स ह ज . सह म्हणजे तुमच्या बरोबर आणि  जन्मलेली अशी ती कुंडलिनी आणि तिचा योग  हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तिच्यापासून मिळालेला योग. परमेश्वराची एकात्मता गाठण्याचा/गाठण्याची जी पात्रता आहे ती तुमच्यात आहे. पण त्याच तुम्हाला नाहीये . हक्क  आहे त्याचा. तो तुम्ही घ्या. तुमचा हक्क घ्या . असं  तुमच्या समोर पदर पसरून मी म्हणते आहे . पण तरी तुमच्या डोक्यात काही त्याचा प्रकाश पडतो आहे की  नाही ते देवाला ठाऊक. तेव्हा आमची सगळ्यांची स्तिथी नीट  झाली पाहिजे. आमच्या मुलं बाळाचं भलं  झालं पाहिजे .  आमच्या  घरा द्वाराचं ठीक झालं पाहिजे . असं लक्षात घेतलं पाहिजे. असा विचार केला पाहिजे. 

आता दोन मिनिटं यांना ही  सांगते. बघा किती शांतपणाने  ऐकतात . त्यांना तुमची भाषा समजत नाही. एक अक्षर समजत नाही मराठी भाषेतलं.  पण किती शांतपणाने  हे ऐकतात . बरं तर तुम्ही विचारलं की माताजींचं तुम्हाला भाषण काय समजलं ? ते म्हणतील  आम्हाला  त्याच्यातनं  चैतन्याच्या  लहरी येत होत्या. आम्ही तेच घेत होतो.कारण त्या त्या  स्तिथीत आहेत ना. साधू संत आहेत ते. तर चैतन्याच्या लहरी आम्ही घेत होतो. आम्हाला काय? माताजी काहीही  बोलत होत्या तरी ते मंत्रच होते. तेव्हा आम्ही त्याच्यातल्या लहरी घेत होतो आणि अशे  मी जर सहा तास बोलत राहले असते तरी ते बसले राहतील  असते.  पण ती स्तिथी आपली  यायला  नको का ?त्यांची आर्थिक स्तिथी बरी आहे . पण आपली कमीत कमी सांस्कृतिक स्तिथी बरी आहे त्यांच्या पेक्षा . आपली कमीत कमी म्हणता येईल नाही पण तरी आत्मिक स्तिथी बरी आहे त्यांच्या मानाने. धार्मिक स्तिथी बरी आहे. पण चुकलं कुठे? अति शहाणपण. त्या पलीकडे काही मी म्हणणार नाही . थोडंस तरी नम्रपणा आला पाहिजे. नम्रते शिवाय होणार नाही. तेव्हा आता ज्या भक्तिचा तुम्ही रस्ता घेतला आहे त्या रस्त्याच्या अंतिम टोकाला आल्यावर देवळात या की तिथंच तुम्ही फिरणार मागे पुढे. ते देवळात  काही येतच नाही. भक्ती हा मार्ग आहे  आणि ध्येय जे अंतिम ध्येय आहे. तो आत्मसाक्षात्कार आहे. ते द्यायला आम्ही आलो आहोत.  मागच्या जन्मी  केली. त्याच्या जन्मी केली. प्रत्येक जन्मी तुम्ही भक्ती केली म्हणून तर या योगभुमीत तुम्ही जन्माला आलात आणि आता ही तेच करत बसा. आता घ्या . ज्या साठी एवढी भक्ती केली. एवढा टाहो फोडला ते तुम्हाला मिळवायचे दिवस आले आहेत. ते तुम्ही मिळवून घ्या. त्यानी तुमचं भलं  होईल. तुमच्या मुलांचं भलं होईल. सगळ्यांचं भलं होईल प्रत्येक दृष्टीने . 

बसा . आता फक्त अशे  हात करायचे. सरळ  <हूं > . <Pause >फक्त अशे हात करायचे, सगळ्यांनी. सरदारजी हात ऐसे करो.  हा . चला सगळेजण अशे  हात करा. त त्यात   पळायला कशाला लागले . हे बघा . त्याला मी म्हणते ना. अतिशहाणे . सरळ हात करायचे . अशे हात करा. आधी सहज होतं  ते बघा  आणि डोळे मिटून घ्या. 

<Pause > आता बघा तुमच्या डोक्यात गार गार येतंय का? गार गर वाटतंय का बघा. <Pause > आता डोक्यावर बघा. डोक्यातनं  गार गार निघतंय की  गरम निघतंय  ? आधी गरम निघणार. निघतंय ? गरम की  थंड ?  थंड . आधी काही काही लोकांच्या गरम निघेल. गर्मी निघू द्या . मग थंड येईल. आता उजवा हात  माझ्या कडे करा . डावा हात वर करून बघा. बघा निघताय का?

येतंय.  येतंय  . वरती वरती  , वरती धरा. ही कुंडलिनी आहे. ही आतून जी बाहेर आली . ही चैतन्य स्वरूप आहे म्हणजे काय. हीच तर आहे आदिशक्ती आदिमाया . तिचं  स्वरूप आहे हे  .  हे बघा . आता तुमच्या डोक्यातनं गार  निघतंय.  वरती, वरती धरा वरती  .आता  दुसरा हात. आता हातात येतंय का बघा. हातात येतंय गार गार ? हं . परत   हा हात करा. आलं पाहिजे . आलं नाही म्हणजे काहीतरी खराबी आहे. परत बघा. आणि एकदम  निर्विचरिता येईल. विचार नाही येणार आता . काही विचार नाही डोक्यात;  बघा. काही  विचार आहे का?  

नाही. बघा. हम्ममम  . आता दोन्ही हात अशे करा. गार येतंय. खूप जोरात. आता विचार प्रश्न मनामध्ये. माताजी हे चैतन्य आहे का?

हे ब्रहम आहे का? असं मनामध्ये विचारायचं. हे चैतन्य आहे. Please  ask  the question . Mother  is this bramha . Is this  chaitanya ? Ask a question . You  all  have got  it .<Pause > हम्मम वाढलं ना? वाढलं . काय  ? आलं. आलं  की नाही . <Pause > हम्म (pause ) आता  सगळ्याचं  असं म्हणणं माताजी तुम्ही  कसं  करता? असं  तर कुणी करत नाही. पण करते म्हणजे काहीतरी असले पाहिजे ना मी . असं करतेय ही गोष्ट खरी आहे ना ? मग काहीतरी असायलाच पाहिजे आम्ही . हे नाही लक्षात घेत . काही तरी असल्याशिवाय का करते? काही तरी असलंच पाहिजे . उलटंच  बघायचं आपण . 

<Pause >आता डोळे मिटा आणि चित्त इथे ठेवायचं. डोळे मिटा. 

<Pause> हम्मम झालं. येतंय. थंड वाटलं डोक्यात. बरं  आता आम्ही येतो हा..