Public Program Sonai (India)

Public Program, Sonai (India), January 21st, 1985 सोनाईचे सहजयोगी तसेच सोनाईचे भक्त लोक, सत्याला शोधणारे सर्व जीव, सर्वांना आमचा नमस्कार. सहजयोग आज आलेला आहे अशातली गोष्ट नाही, अनादी काळापासून सहज योगाची क्रिया घडत आहे. रामचंद्राच्या वेळेला राजा जनकानी नचिकेतला आत्मबोध दिला असे म्हणतात, त्यानंतर इंद्राला सुध्दा आत्मबोध घ्यावा लागला. म्हणजे जोपर्यंत आपल्या आत्म्याचा बोध आपल्याला होत नाही, तोपर्यंत आपण अर्धवट आहोत. बुद्धासुद्धा जेंव्हा एक राजपुत्र म्हणुन जन्माला आले, तेंव्हा त्यांच्या लक्षात अशी गोष्ट आली की मानवाचा जीव, मानवाचे आयुष्य हे अपूरे आहे. त्याची बुद्धी ही अपूरी पडते. म्हणून काहीतरी ह्याच्या पलीकडे असले पाहिजे, ज्याच्यामध्ये सुख आहे, ज्यांच्यामध्ये आनंद आहे आणि तो आनंद म्हणजे कधीही संपत नाही. असा कधीही न संपणारा आनंद कुठेतरी असलाच पाहिजे, अशा शोधात बुद्धसुद्धा फिरले आणि  शेवटी एक दिवशी ते असे एका झाडाखाली आरामात पडले होते थकून – त्या वेळेला सहजच त्यांची कुंडलिनी जागृत होऊन त्यांना आत्मबोध झाला. अशाप्रकारे आपल्या देशात अनेक लोकांचा आत्मबोध झालेला आहे. तसेच पुष्कळांना जन्मत:च हा आत्मबोध मिळालेला सुध्दा असतो. पण तरीसुद्धा असे साधुसंत फार कमी झाले. अशी फार अवतरण कमी झालेली आहेत आणि त्यामुळे लोकांना असे वाटते की हे काही आपल्या ह्याचे नाही, हे जनसाधारणासाठी नाही. पण आजचा सहजयोग हा समजोंमुख आहे. समाजाकडे लक्ष आहे. कारण ही जी क्रिया आहे ती पूर्वी एक दोन लोकांनाच साध्य होती आणि जे एक दोन लोकच म्हणवून मोठ्या पदाला पोहोचत असत ते आज सगळ्यांना उपलब्ध झाले पाहिजे अशी मला लहानपापासून इच्छा होती आणि म्हणून ती कशी उपलब्ध करून द्यायची, त्याच्यामध्ये काय लोकांना त्रास आहे, कशामुळे लोकांना ही मिळत नाही, ही ज्ञानाची गुरुकिल्ली का मिळत नाही याचा Read More …

Public Program (morning) Musalwadi (India)

मुसलवाडीच्या सर्व गावकऱ्यांना आमचा नमस्कार .  आपल्या देशामध्ये आपण अजून पुष्कळ अंधारात आहोत . ते अजून आपण समजून घेतलं पाहिजे . आपल्या देसाची अशी दुर्दशा का म्हणून लोक विचारतात . हि मोठी भारी योग भूमी ,महाराष्ट्र म्हणजे फार मोठी पुण्य भूमी आणि संतांची भूमी . हे सगळं असताना आपल्या देशाची अशी दशा का होती आहे . आता आम्ही गेलो होतो एका खेडेगावात त्याच नाव कोमलवाडी आणि तिथे कानिफनाथांची समाधी आहे . असं लोकांनी शोधून काढलं . ते सहजयोगीच शोधून काढू शकतात . कारण चैतन्याने कळत . आता आम्ही जस मुसलवाडीला म्हसोबाचं स्थान आहे हे शोधून काढलं ते सुध्दा चैतन्याच्या दमावर . आणि तिथे बघितल्यावर एकदम दुष्काळ ,भयंकर परिस्तिथी .लोक अगदी वाईट मार्गाला लागलेले काही विचारू नका ,असं वाटलं कि नरकात आपण आलो कि काय . आणि जिकडे पहाव तिकडे म्हणून काही हिरवं असं दिसतच नव्हतं . त्यांनी सांगितलं पाच वर्षातून एकदा पाऊस पडतो आणि पडला तरी थोडा पडतो . आता हिवाळ्यात हि स्तिती तर उन्हाळ्यात लोकांना प्यायला पाणी पण मिळणार नाही . मग एकानी प्रश्न विचारला कि माताजी हे एव्हडे कानिफनाथ इथे असताना ,एव्हडं त्यानी इथे काम केलं मग अशी स्तिती का ?प्रश्न येतो कि नाही कि देवाचं एव्हडं साम्राज्य आहे तर मग लोकांना एव्हडा त्रास का होतो आहे . म्हणजे कारण असं आहे कि कानिफनाथांना फार छळल इथल्या लोकांनी . ते जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांना छळल ,तो मुसलमान ,अमका ,ढमका म्हणून त्यांचे नुसते हाल करून टाकले . त्या शिवाय असं म्हणतात कि त्यांना मारून टाकलं . म्हणून त्या अशा दुसऱ्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला . कुणीतरी तिथे समाधी बांधली पण ती समाधी बघून तर मला रडू कोसळलं . त्याच्यावर थोडे बहोत Read More …