Welcome Talk

Ahmednagar (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Welcome Talk 1985 01 25 Ahmednagar, Maharashtra, India.

[English Transcript]

Mr Pankay, the administrator of Municipal corporation of Ahmednagar, and other officers who are being very kind to host you to this beautiful function. And all the public from Ahmednagar. From all the Sahaja yogis abroad who have come all the way here, also the Sahaja yogis who are Indians, I would like to Thank administrator Mr Pankay for his kind invitation to this gracious occasion. [Clapping..]
Tomorrow is a great day, in my life also, that it’s our republic day, we got our independence on the 15th of August, but we celebrate 26th as the republic day and as you know that my father, my mother, all my family sacrificed everything that they had to achieve this freedom. Even I, as you know, I have done my bit in this respect, and I have been a great leader of young students at that time. So, it is such a great thing to see this dream come true that without getting your freedom, your political freedom, you cannot ask for your spiritual freedom. Today, we don’t have Mahatma Gandhi with us, but if he was here, he would have supported Sahaja Yoga out and out. [Clapping..]

As Mr Pankay has pointed out that it is our heritage of our culture which has kept us together, in this diversity, the unity is expressed because we have set certain basic fundamental ideas which are common, whatever religion, whatever race we may have. One of the fundamental idea, which is a very great thing, I think that divinity is higher than any other office. The divine personality is higher than anybody else in this world. And this is something which is so evident in India, which you all must be surprised to see, that a saint, who is not a person who is holding any organizational position, or is not a person who is organizing any religion or a head of any religious body but any saint, whether he is living in a hut, whether he is living in a jungle, if he is a saint, he is respected by all. This is the most important fundamental thing that has kept us together. Because, if you have the guideline from a saint, then you can never be deviated from the right path, because they know what is to be done. When we are guided by all these seers and saints in this country, how can we be away from our spirit, that’s why our music, our dancing, our expressions, our languages, everything hovers around the spiritual growth of humanity. This great asset that we have, has led us to go through various phases of difficulties, invasions and all kind of slaveries, still we have maintained that balance with in us, thanks to the saints of this country. Now, as it is, you all are travelling and enjoying yourself with all the divine vibrations that you are feeling in this country, I should also say, that every place you have been, they have been extremely happy to receive you and to host you and to look after you because they think that you are also all saints from all the countries travelling down, so, may god bless you all. [Clapping..]

Marathi Transcript

आता आपल्या नगरच्या लोकांसाठी दोन शब्द मला सांगायचे आहेत . मी खरोखर अहमदनगर चिंच मुलगी आहे . माझे आई वडील दोघंही नागरचेच होते . आणि नंतर काही कारणा मुले संबंध  वंशज च काही कारणामुळे बाहेर गेला . सगळंच कुटुंब बाहेर गेल्या मुळे आमचा संबंध नगर जिल्ह्याशी अगदी तुटल्या सारखा झाला . पण सहजयोगामध्ये सर्व प्रथम मला जिथे स्थान मिळालं ते आहे नगर . आणि याच जिल्ह्यामध्ये माझं सर्वात जास्त कार्य झालेलं आहे . कदाचित हि पूर्व जन्माची काही पुण्याई असेल कि आपल्या माहेरच्याच घरी इतक्या सुंदर पणाने झालं पाहिजे . 

सहजयोगाचं कार्य हे आत्मबोधाचं आहे . भाषण देण्याचं नाही . कृतीत यायला पाहिजे ,जे तुम्ही सांगता ते झालं पाहिजे . पण ते एकदा रामदास स्वामींना विचारलं कि किती वेळ लागतो आत्मबोध व्हायला ?तर त्यांनी सांगितलं तत्क्षण . त्या क्षणी होत ,झालं पाहिजे . आणि खरी गोष्ट आहे हे तत्क्षण घडण्या सारखं आहे . आणि आतातर हजारो लोकांना तत्क्षण एकसाथ घडत ,ज्याला आपण आत्मबोध म्हणतो हि घटना अत्यंत सरळ आणि सहज आहे . आणि सहज असायलाच पाहिजे . जेव्हढ्या जिवंत क्रिया आहेत त्या अगदी सहज असतात . त्या साठी आपल्याला पैसे द्यावे लागत नाही काही नाही ,काहीही करावं लागत नाही . सहजच हि घटना घडून येते . आणि त्याच्या मुळे आपल्याला आत्मबोध होतो . फक्त करणारी व्यक्ती निरिच्छ असायला पाहिजे . पवित्र असायला पाहिजे . आणि जाणकार पाहिजे . जर त्या व्यक्तीला याची काहीच जाणीव नसेल आणि त्या व्यक्तीला आत्मबोध झालेला नसेल तर ती व्यक्ती हे कार्य करू शकत नाही . पण जर उद्या आपल्याला आत्मबोध झाला तर आपणही दुसऱ्यांना जागृती देऊ शकतो . दुसऱ्याचं भलं करू शकतो . आत्मबोध होताच असं पाहण्यात आलेलं आहे अनेक तऱ्हेचे रोग माणसाचे ठीक होतात . अनेक प्रकारचे रोग याने ठीक झालेले आहेत . काही काही लोकांचे तर तत्क्षण ठीक झाले तर काही लोकांना थोडा वेळ लागला . पण रोग ठीक झाले . त्या शिवाय याच्या मुळे जी लोकांची मानसिक स्तिती खराब असते ,पुष्कळशा लोकांना मनामध्ये अत्यंत विकार होतात ,भयग्रस्थ असतात ,चिंतातुर असतात त्यांच्या सगळ्या चिंता दूर होऊन ते सुद्धा अगदी शांतचित्त होऊन जातात . तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या वाईट सवयी असतात ,ज्या सवयी पासून आपण आपली सुटका करून घेऊ शकत नाही त्या सर्व सवयी पुष्कळदा तत्क्षण सुटतात . ह्या लोकं मध्ये बहुतेक जेव्हडी लोक आहेत त्याना काहींना काहीतरी सवयी होत्या पण एकेक सवय यांची सुटून आज हे चांगले झालेले आहेत . आणि आज धर्माच्या राज्यात उतरले आहेत आणि धर्मवान झाले आहेत . जेव्हा तुम्ही समर्थ होता तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता रहात नाही ,पण कोणत्याही प्रकारची इच्छा पण रहात नाही कि जी तुम्हाला अनिष्ट करेल . कोणत्याही अनिष्ट गोष्टीकडे तुमचं लक्ष जात नाही आणि त्याच्या वरती स्वारी करून अगदी व्यवस्थित आनंदात राहता . 

आपल्या देशामध्ये अनेक साक्षात्कारी पुरुष झाले . शिवाजी महाराज सुद्धा हे साक्षात्कारी पुरुष होते . तसेच ज्ञानेश्वर तसेच ह्या ठिकाणी झालेले मछिंदरनाथ ,गोरखनाथ अशी इतकी लोक आहेत कि त्यांची नाव तरी किती घ्यायची असं होऊन जात . अशा या विशेष पावन भूमी मध्ये ह्या महाराष्ट्र देशामध्ये त्यातल्या त्यात ह्या नगर  मध्ये याच्या आसपास आपल्याला माहित आहे कि नाथपंथियांच्या लोकांनी फार मेहनत केली आहे . त्यांची जी मेहनत आहे तीच फळाला येऊन आज इतके लोक इथे आत्मबोध पावत आहेत . आत्मबोधा शिवाय आपल्या देशाचं कल्याण होऊ शकत नाही . तसच कोणत्याही देशाचं होऊ शकत नाही . कारण कुणाचीही सांपत्तिक स्तिती बारी झाली तरी तो माणूस वाईट मार्गाने जाणार नाही असं कस सांगता येईल . विशेतः जर जास्त पैसे आले तर बहुतेक माणूस वाईट मार्गालाच जातो . स्वार्थी होतो ,वाईट गोष्टी करतो ,तेव्हा त्या पैशाने आपली परिस्थिती पूर्णपणे ठीक होईल ,किंवा जे कृष्णाने क्षेम सांगितलं आहे ते होईल हि गोष्ट चुकीची आहे . त्यांनी सांगितलं आहे कि योगक्षेम वाहामयं . योग झाल्याशिवाय क्षेम कधीच होणार नाही . पुष्कळशे लोक समजतात कि आपलं शिक्षण जास्त झालं कि आपलं भलं होईल पण शिक्षण झालेली पुष्कळ मंडळी अशी आहेत कि त्यांच्या मध्ये काही धर्म राहत नाही . त्यांच्या मध्ये काही प्रेम रहात नाही . त्यांच्या मध्ये इतक्या कुचक्या भावना असतात कि हे शिकलेले कसे आहेत याच आश्चर्य वाटत . म्हणजे त्याही गोष्टींनी माणसाची बुध्दी उघडेल असं नाही . तर हा आत्मा आहे त्याच्याच प्रकाशात माणूस अत्यंत प्रफुल्लित होऊ शकतो . आणि त्याच्या मधेच त्याला धर्म सुध्दा त्याला आपलासा वाटतो . त्याला मग अधर्म करताच येत नाही . आता आपण पाहिलं असेल कि जे मोठमोठाले संतसाधु झालेत त्यांनी कधी काय अधर्म केला नाही त्यांना काही हे सांगावं लागत नसे . तसेच तुम्ही सुध्दा त्या तुमच्या आत्म्याला प्राप्त व्हाल तेव्हा कधी हि मला सांगावं लागणार नाही ,कुणालाही सांगावं लागणार नाही . तुम्ही स्वतःचे स्वतःच गुरु व्हाल . स्वतः च स्वतः ला ठीक कराल . अशी हि अत्यंत सुंदर रचना देवाने आपल्यात केलेली आहे . आणि ह्या कुंडलिनीच जागरण होताच तुम्ही त्याच्या आनंदाला पूर्ण पणे पावन होता . 

आज संध्यकाळी आता परत माझा एक प्रोग्रॅम आहे . सकाळी एक लेक्चर झालेले आहे . सारा दिवस असं चाललेलं असत तेव्हा थोड्या वेळात एव्हडा मोठा विषय सांगणं कठीण आहे . पण आपण आता संध्याकाळी तुम्ही त्या प्रोग्रॅम ला यावं तिथे मी हि क्रिया करणार आहे आणि सगळ्यांना हि गोष्ट प्राप्त होईल अशी मला आशा आहे . आपण सर्वानी एव्हड्या प्रेमानी आम्हाला बोलावलं आणि ह्या सर्वांचं एव्हडं स्वागत केलं त्या बद्दल अनेकदा मी आपली आभारी आहे .