Public Program Pimpri, Pune (India)

आता आपल्या समोर श्रीमती उमाशंशी भालेराव यांनी इतकं सुंदर भजन म्हंटल आहे , कि त्या भजना मध्ये जे काही सांगायचं ते आधीच सांगून टाकलेलं आहे . तुम्हा सगळ्यांच्या तर्फे आणि इथे जमलेल्या सहजयोगांच्या तर्फे ,पिंपरीच्या सर्व सहजयोग केंद्रांच्या तर्फे मी त्यांचे आभार मानते . आणि परत परत असं सुश्राव्य भजन भाषणा ऐवजी ऐकायला मिळेल अशी मला आशा आहे . कारण मी भाषण देऊन देऊन आता कंटाळून गेले आहे . आणि किती भाषण दिली तरी ती डोक्यात केव्हा येणार आहेत असा विचार येतो . सहजयोगा बद्दल अनेकदा पिंपरीला प्रोग्रॅम झाला आणि आपण सर्व मंडळी तिथे आला होतात . त्याच्यावर आपण विचारविनिमय केला आहे .  सहजयोग म्हणजे तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे . सहज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला ,असा हा योग तुम्हाला प्राप्त करण्यासाठी काहीही करावं लागणार नाही अशी परिस्थिती आता आलेली आहे . सहजच ते घडत सुद्धा म्हणून मराठीत सहजला दोन अर्थ आहेत सहज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला आणि सहज म्हणजे अगदी सहजगत्या ,विनासायास . आणि जे आपल्या बरोबर जन्मलेलं आहे ते सगळं सहज आहे . आपल्या डोळ्यांनी आपण काही बघतो ते किती सहज बघून आपण जाणतो कि हे काय आहे . कानांनी आपण ऐकतो ते किती सहज जाणतो कि ते किती सुश्राव्य आहे . अशा प्रकारे सहजयोग सुद्धा अत्यंत सहज असून तो तुमच्या बरोबर जन्मलेला एक योग आहे . आता हा सहजयोग प्रत्येकाला उपलब्ध का व्हावा हे पुष्कळांनी विचारलं . कारण पूर्वीच्या काळी  कुंडलिनी जागरण म्हणजे  काहीतरी बागुलबुवा होता . अशी सगळ्यांनी कल्पना केली होती . कुंडलिनी जागरण म्हणजे काही सोपं काम नाही ,कुंडलिनी जागरण व्हायचं म्हणजे काही काही प्रकार होतात . सहावा अध्याय म्हणजे Read More …

Devi Puja, Republic Day Pune (India)

Republic day puja, Devi puja, Pune India, 26/01/1985 आज आपला फार मोठा दिवस आहे परत वसंत पंचमी पण आहे , त्यातून आज राखी पण आहे .हा दिवस दिसेल म्हणून किती लोकांनी तडफडाट केला किती लोकांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला होता .किती तरी गोष्टी अशा झालेल्या आहेत पण आपण मात्र अजून त्या स्तिती ला आलो नाही जिथे आपण जाणू कि हा देश मोठ्या मेहनतीने ,त्यागाने  लोकांनी जिंकलेला आहे या देशात सुद्धा जेव्हा आपण बंड पुकारलं तेव्हा गांधीजींनी असा विचार केला कि या देशाची जी खरी संपत्ती आहे ती आत्मिक आहे आणि आत्मबळ हे हिंसेत नसून अहिंसेत आहे .म्हणून त्यांनी अहिंसेवर सगळं उभारलं .कोणाची हिंसा न करता आपण हा देश जिंकलेला आहे .जेव्हा असं झालं तेव्हा हे आपल्या लक्षात आलं नाही कि हि जी आपल्याला एव्हडी मोठी संपत्ती मिळालेली आहे ,हा जो आपल्याला ठेवा  मिळाला आहे हा जो आपल्याला शिरा मिळाला आहे हा कोणच्या कोंदणात बसवायचा .तर त्याचे जे कोंदण आहे ते या मातीचेच असले पाहिजे आणि ह्या मातीच जे कोंदण आहे ते आत्मबलाच कोंदण आहे .आपल्या जवळ दुसरं काही नाही .या देशाचं सगळ्यात मुख्य आहे म्हणजे  साऱ्या जागाच जे तत्व आहे आणि ते म्हणजे आत्मबलाच तत्व आहे .आणि त्या आत्मबळावरच आपण याची कोंदण बसवली पाहिजे .जो पर्यंत स्वातंत्र्याची कोंदण आत्मबळावर बसवली जाणार नाहीत तो पर्यंत या देशाचं कल्याण होणार नाही .पण त्यासाठी अशी मंडळी तयार केली पाहिजेत जी या आत्मबोधाला प्राप्त झाली .पण अजून मी असं बघते कि आत्मबोधाला प्राप्त झालेली मंडळी सुद्धा ,ज्यांनी आत्मबोध मिळवला आहे ते सुद्धा अजून अत्यंत कोट्या वृत्तीने वागत आहेत .आणि अत्यंत भांडकुदळ वृत्तीने राहत आहेत .त्यांच्या मधले जे प्रकार आहेत त्यांनी कालच Read More …