Devi Puja, Republic Day

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Republic day puja, Devi puja, Pune India, 26/01/1985

आज आपला फार मोठा दिवस आहे परत वसंत पंचमी पण आहे , त्यातून आज राखी पण आहे .हा दिवस दिसेल म्हणून किती लोकांनी तडफडाट केला किती लोकांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला होता .किती तरी गोष्टी अशा झालेल्या आहेत पण आपण मात्र अजून त्या स्तिती ला आलो नाही जिथे आपण जाणू कि हा देश मोठ्या मेहनतीने ,त्यागाने  लोकांनी जिंकलेला आहे या देशात सुद्धा जेव्हा आपण बंड पुकारलं तेव्हा गांधीजींनी असा विचार केला कि या देशाची जी खरी संपत्ती आहे ती आत्मिक आहे आणि आत्मबळ हे हिंसेत नसून अहिंसेत आहे .म्हणून त्यांनी अहिंसेवर सगळं उभारलं .कोणाची हिंसा न करता आपण हा देश जिंकलेला आहे .जेव्हा असं झालं तेव्हा हे आपल्या लक्षात आलं नाही कि हि जी आपल्याला एव्हडी मोठी संपत्ती मिळालेली आहे ,हा जो आपल्याला ठेवा  मिळाला आहे हा जो आपल्याला शिरा मिळाला आहे हा कोणच्या कोंदणात बसवायचा .तर त्याचे जे कोंदण आहे ते या मातीचेच असले पाहिजे आणि ह्या मातीच जे कोंदण आहे ते आत्मबलाच कोंदण आहे .आपल्या जवळ दुसरं काही नाही .या देशाचं सगळ्यात मुख्य आहे म्हणजे  साऱ्या जागाच जे तत्व आहे आणि ते म्हणजे आत्मबलाच तत्व आहे .आणि त्या आत्मबळावरच आपण याची कोंदण बसवली पाहिजे .जो पर्यंत स्वातंत्र्याची कोंदण आत्मबळावर बसवली जाणार नाहीत तो पर्यंत या देशाचं कल्याण होणार नाही .पण त्यासाठी अशी मंडळी तयार केली पाहिजेत जी या आत्मबोधाला प्राप्त झाली .पण अजून मी असं बघते कि आत्मबोधाला प्राप्त झालेली मंडळी सुद्धा ,ज्यांनी आत्मबोध मिळवला आहे ते सुद्धा अजून अत्यंत कोट्या वृत्तीने वागत आहेत .आणि अत्यंत भांडकुदळ वृत्तीने राहत आहेत .त्यांच्या मधले जे प्रकार आहेत त्यांनी कालच मला इतका त्रास झालेला आहे कि आता त्या बद्दल आणखीन काही बोलायचं नाही असं मी ठरवून ठेवलं आहे .भाऊबंदकी आपल्यात कशी आली .आपण आपण म्हणतो भाऊबंदकी महाराष्ट्रात अली भाई लोकांनी आपल्याला मारून टाकलं ,एकदुसऱ्याच्या पाठीमागे काहीतरी त्रास दिला .त्याला कारण काय आहे .त्याला कारण म्हणजे आपण व्यसन घेतली .तुम्हाला आश्चर्य वाटेल कि  विशुद्धी चक्रावर जर काही व्यसन घातली तर माणसाला काही सुबुद्धी रहात नाही .तो नीटपणे वागत नाही ,तो खोट बोलतो आणि कसाही वागला तरी आपलं काही चुकलं आहे असं त्याला वाटत नाही .हि व्यसन आपल्या देशात इतकी वाढलेली आहेत आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत कि त्याचे हे त्रास आपल्याला होतात हे लोकांच्या लक्षात येत आहे .त्याच्या मुळे लोक इतकं खोटं  बोलतात ,इतक्या वाईट रीतीने वागत आहेत ,आणि इतका खोटा व्यवहार जगा  मध्ये चाललेला आहे .हा खोटेपणा काढण्या साठी पहिल्यांदा  व्यसन पूर्णपणे सोडली पाहिजेत .जो माणूस व्यसन पूर्णपणे सोडणार नाही त्याचा स्वभाव चांगला होणार नाही ,तो खोटे पणा करणार .तो खोटी गोष्ट बोलेल .आणि सगळंच काही सत्य ते खोट होईल .तेव्हा आज या मोठ्या दिवशी पुष्कळांनी आपलं आयुष्य घालवलं आहे  या मध्ये ,पुष्कळांनी आपला जीव दिला ,पुष्कळांनी आपलं रक्त सांडलं आहे .हे अनादी कला पासून आपण स्वातंत्र्या साठी झगडलो .आता स्व तंत्रा साठी स्वतःचे तंत्र ओळखून घ्या साठी माणसाने आज हि प्रतिज्ञा करायची कि आम्ही कोणतंही व्यसन आता करणार नाही .कोणत्याही प्रकारचं ,हे काही कठीण काम नाही .परदेशातल्या लोकं च मी बघते कि ते इतके कुशाग्र आहेत कि एकदा पार झालं कि दुसऱ्या दिवशी ते असे मोकळे होतात कि सगळं सोडून कि त्याच्यातले ते काही नव्हतेच .जस एखाद कमळ एका क्षणात वर यावं तसे ते होऊन इतके सुरभीत होतात .पण आपल्या देशात तस नाही .आपल्या देशात काही न काही प्रकार चालतातच ,तरी हे  चाललाच आहे ते चाललाच आहे दहा दहा वर्ष सहजयोगात  लोक राहून सुद्धा काही प्रगती का करू शकत नाहीत त्याला कारण अजून त्यांच्यात व्यसन सोडण्याची समर्थता सुद्धा त्यांच्यात राहिली नाही .ती गुलामी ती गेली पाहिजे ,व्यसनाची जी गुलामी आहे ती गेली पाहिजे .दुसरी गुरूंची गुलामी आपल्याकडे अजून फार भयंकर आहे .कालच एक गृहस्थ मला भेटले .ते सहजयोगात इतके वर्ष आहेत पण त्यांची अजून गुरूंची गुलामी गेलेली नाही .म्हणून ते त्रासात आहेत .आणि कोणी ऐकताच नाही या गोष्टी आणि सांगितलं तर मानतच नाहीत .पण गुरु जर तुमचे चुकलेले असले तर तुम्हाला त्यांचे जे त्रास होतात ते तुम्ही पाहिलेले  आहे.ती एक गुलामी आपल्यातली गेली पाहिजे आणि ती गुलामी काढण्या साठी आपण लक्षात ठेवलं पाहिजे कि जे लोक गुरूनं  कडून येतात त्यांना कितीतरी शारीरिक त्रास असतात .जर तुमचे गुरु तुमचे शरीरही ठीक ठेऊ शकत नाही तर अशा गुरुची गुलामी कशाला .हि अंधश्रद्धा आहे आणि हे तामसिक लक्षण आहे .तामसिक लक्षणा  मध्ये श्री कृष्णाने सांगितलं आहे कि माणूस जेव्हा तामसिक होतो तेव्हा तो कुठल्यातरी चुकीच्या गोष्टी कडे  पूर्णपणे वेढला जातो आणि त्या चुकीच्या गोष्टीलाच सत्य मानायला लागतो .आणि जसा एखाद्या घाण्याला बैल जुंपावं आणि त्याला झापड बांधून तिथं तिथंच तो फिरत असतो आणि किती त्याला सांगितलं कि हे चुकीचं आहे तरी त्याला खरं वाटत नाही त्याच्या डोक्यातच ते जात नाही .हि तामसिक प्रवृत्ती आपल्या महाराष्ट्रात विशेष करून आहे .त्याला कारण सांगायचं म्हणजे आपण फार व्यसनी झालो आहोत .आणि रूढी वादी मुळे इतक्या दिवसान  मध्ये आपण ज्या रूढी मध्ये वाढलो त्या रुढीला आपण कधीच पायबंद घालत नाही .आता एक प्रथम गोष्ट बघा आपल्याला आता उपास केला पाहिजे ,हे कुणी सांगितलं कोणत्या शास्त्राने सांगितलं असं म्हंटल तर कुणी दाखवत नाही .उठल्या सुटल्या उपास करायचा तुम्हाला जर शौक  असला तर जे तुम्ही चिंताल तेच होणार .आपल्या देशात तसेही लोक उपासमारीने मरत आहेत .तेव्हा आणखीन उपास कशाला करायला पाहिजे मला समजत नाही .एव्हडी उपास करायची हौस असली तर मग उपाशीच मरणार ,पुढल्या जन्मी उपाशीच राहणार असं दिसतंय .उपास च पाहिजे ना मग घ्या तुम्हाला ज्याचा शौक आहे तेच मिळाला पाहिजे . तेव्हा तुम्हाला उपास झालेलाच बरा .मग उपासमार होऊद्या मग कशाला रडायचं ,सगळं खायला असून आपण खायचं नाही आणि ते देवाच्या नावावर ,तुम्ही तस नका खाऊ पण देवाच्या नावावर खायचं नाही .पुढे म्हणजे भक्ती मार्ग भक्तिमार्ग एक काढलेला आहे .अहो पण तो मार्ग आहे ध्येय नव्हे हे लक्षात ठेवलं पाहिजे .अनन्य भक्ती कृष्णाने सांगितली आहे .भक्ती मार्ग म्हणजे टाळ कुटत बसायचं ,वाऱ्या  करत पायी जायचं .अंगावर फाटलेले कपडे घालायचे भिकाऱ्या सारखे आणी टाळ कुटत तिथं जायचं आणि डोकी फोडून घ्यायची .त्याला म्हणे भक्ती मार्ग हे कुणी सांगितलं आहे .ज्ञानेश्वरांनी तरी सांगितलं नाही .कि तुम्ही दिंड्या घालत इथून हरेराम हरेकृष्ण करत तिथवर जायचं किंवा विठ्ठल विठ्ठल करत तिथवर जायचं .असं कुठेही लिहिलेलं नाही .त्यानी जे लिहिलं ते वाचायचं नाही त्यांनी जे समजावलं तेते समजून घ्यायचं नाही .आता विश्वात्मके तोषावे ,विश्वाचा जो आत्मा आहे त्यांनी तोषावे .त्यानी संतोष मानावा .मी जे काही वाणीचा माझा यज्ञ केलेला आहे त्याचा संतोष मानावा .आणि मग काय मागायचं ,तोषोनि मज द्यावे पसायदान .हे पसायदान तुम्हाला दिलेलं आहे ते .हे जे व्हाब्रेशन तुम्हाला येतात ते पसायदान आहे .दुरितांचे तिमिर जाओ ,जात का त्या टाळ  कुटणाऱ्यांचं तिमिर गेलेले आहे का .अगदी वाळलेले सुकलेले ,भिकाऱ्या सारखे कपडे घातलेले बघितलं कि रडायला यायला पाहिजे माणसांना कि हि पाप्याची पितर कुठून अली म्हणून .आणि म्हणे आम्ही श्री हरीचे भक्त .अहो ज्यांनी सुदाम्याला सोन्याची द्वारिका दिली त्याचे हे भक्त भिकारी लोक .कशाला त्या कृष्णाला बदनाम करता .आणखीन कुणाचे तरी भक्त व्हा एखाद्या डोंगा बाबाजींचे .ज्यांच्या सुरकुत्या सगळ्या मोजून घ्याव्यात असे बाबाजी पुष्कळ आहेत .त्यांची भक्ती करा पण श्री कृष्णाला कशाला बदनाम करता तुम्ही .त्याच चेहऱ्याचं वर्णन वाचलं नाही कुठे तुम्ही .त्याच्या तेजस्वितेचे वर्णन वाचलं नाही .तो कुठे भिकाऱ्या सारखा राहिलेला कुणी सांगितलं नाही .जरी गाई राखत होता तरी डोक्यावर त्याच्या मुकुट असायचा .मोरपिसाचा ,नटलेलाच आपण ऐकलेलं आहे .कुठं असं ऐकलंय का हातामध्ये झोळी घेऊन निघाला .तोंडामध्ये तंबाकू घालून .हि आपली दशा पण विचार तसा करायचा नाही आणि काळा बुक्का लावायचा डोक्याला .तो काय काळा बुक्का लावत होता का .कस  सुंदर अगदी चंदन डोक्यावर लावत असे .आणि त्याची ती जी खूण होती ,सगळीकडे दिसत असून सुद्धा तुम्ही कशाला काळा बुक्का लावून फिरता .आणि त्या काळ्या बुक्क्याने तुमचे हे आज्ञा चक्र खराब होऊन तुम्ही आणखीनच तामसिक प्रवृत्तीचे झालात .मग कुणी म्हंटल माताजी असं कस म्हणता .,पण जे खर ते मला सांगायचं आहे .आणि तुम्हाला सांगितलंच पाहिजे .मग उद्या तुम्हाला कॅन्सर चे रोग झाले ,विशुद्धी चक्राचे रोग झाले ,याचे रोग झाले त्याचे त्याचे रोग झाले .मग म्हणायचं असं कस माताजी आम्ही वारकरी होतो .म्हणजे त्या देवाचाच दोष काढायचा .हि तामसिक वृत्ती गेली पाहिजे .डोळ्याला झापड बांधून आपलं चालायचं आणि म्हणायचं आम्ही भक्ती मार्गात आहोत .अहो मार्ग म्हणजे काय .कृष्णाने स्पष्ट सांगितलं आहे कि अनन्य भक्ती करा .तुम्ही मला काय दिल ना पत्र ,पुष्पम ,फलं ,तोयं ते घेईन मी पण हे देताना अनन्य भक्ती करा असं स्पष्ट सांगितलं आहे आणि काय डोकं फोडायचं .अनन्य भक्ती केव्हा होणार जेव्हा तुम्ही परमेश्वराशी एकाकार व्हाल तेव्हा .जेव्हा तुमच्यात आत्मबोध होईल तेव्हा .तेव्हा जी भक्ती कराल त्याला काही अर्थ आहे .अशा कृष्णाला आपण सगळी कडे बदनाम करतो .परदेशातही करतो आणि इथेही करतो .कुठे तो श्री कृष्ण आणि कुठे हे वारकरी लोक .दोघांचा कुठे मेळ मला दिसत नाही .तेव्हा जे काही आपलं जून आहे त्यातलं जे उत्तम ,अतिउत्तम आहे ते घ्यायचं आणि जे उगीचच आपल्यावर लादलेलं आहे ते सोडलं पाहिजे .सहजयोगा मध्ये आपण लोक भक्ती करतो सगळं करतो पण फक्त आत्मबोध झाल्यावर .त्याच्या आधी आपण करत नाही .दुसरं उपास तापास आपण करत नाही .,उपास करायचा असेल तर करा आता मला घडतोच आहे उपास .मला सदा सर्वदा तुमच्या कृपेने उपासच घडतो आहे .दुपारी जेवण नाही तर संध्याकाळी जेवण नाही .काहींना काही चालूच आहे .तेव्हा मला उपास करायला नको म्हंटल तरी चालेल .पण तुम्हाला जरी करायचा असला तरी तो स्वतःच्या शरीरा साठी करा पण मग पोट  बिघडलं म्हणून मला सांगू नका .तेव्हा हि समज  आपल्या मध्ये यायला पाहिजे कि आम्ही तामसिक वृत्ती कडे चाललेलो आहोत .आता आम्हाला राजसिक वृत्तीकडे जायचं नाही .हि मंडळी जी दुसरी आहेत ती राजसिक वृत्तीची आहेत .यांच्या कडे काय असत कि काय चूक आणि काय चांगलं  तेच माहित नसत .चूक आणि चांगलं सर्व एक . म्हणजे आपल्याला असं वाटत हे लोक माणस आहेत का जनावर याना हे पण समजत नाही कि कडबा खायचा कि गवत  खायचं कि शेण खायचं .याचा ज्यांना फरक कळत  नाही अशी माणसं  राजसिक असतात .आणि हि राजसिक अवस्था जर अली तर त्या मध्ये सुद्धा मोठा प्रश्न उभा राहतो .कारण अशी लोक संभ्रमात आणि पूर्ण पाने गोंधळलेली त्यामुळे त्यांना काय समजावून सांगायचं हे समजत नाही .ते प्रत्येकाला म्हणतात यांच्यात काय चुकलं .आता इथे लंडन ला नवीन एक निघालं आहे ,रोजच निघत नवीन ,नवीन म्हणजे तरी चार वर्ष झाली कि सुया अशा आपल्या तोंडानं मध्ये खुसपुन घ्यायच्या .नाही  झालं तर मग पिना घालायच्या .आणि असं फिरायचं रंग लावून केसाला .काही तरी बनून जर त्यांना म्हंटल असं का करता तर म्हणतात यांच्यात काय वाईट आहे .यांच्यात काय वाईट आहे ते सांगा आता .उत्तर काय त्याला ,काहीच नाही .तुम्ही मूर्ख आहात त्याच्या मुळे त्याला उत्तर काही नाही .तर असा मूर्खपणा ते करतात .आणि त्या मूर्खपणाला तुम्ही काही सांगितलं तरी पटत त्यांना  नाही .कारण त्यांना वाटत आम्हाला सगळं माहिती आहे ,चूक किंवा वाईट ते .तुम्ही का सांगता .म्हणजे राक्षस  हि  चांगला ,दुष्ट हि चांगला ,आणि भोंदू हि चांगला .आणि महात्मा हि चांगला .आणि देव हि चांगले .सगळे चांगले सगळे एकाच माळेचे .हिटलरही  चांगला आणि कृष्ण हि चांगला .यांच्यात काही फरक करायचा नाही .कुणालाच वाईट म्हणायचे नाही .सगळे चांगले .हि राजसिक वृत्ती झाली .आणि या राजसिक वृत्ती करता तुम्ही , कारण तुमची आता प्रगती होत आहे तुम्ही प्रगतिशील लोक झाल्यामुळे आता तिकडे तुम्ही प्रगती करू नये अशी माझी नम्र विनंती आहे .आता सरळ वरती अशी प्रगती करायची आहे ती म्हणजे सहस्रारातून ब्रम्ह रंध्र तोडून इतक्या उच्च दशेला जायची प्रगती करायची आहे .त्यासाठी यांच्यात काय वाईट आहे त्याच्यात काय वाईट आहे ,असं का करायचं तस का करायचं अशी विचारणा झाली तर समजायचं कि आपण राजसिक झालो .आणि ते तामसिक पेक्षाही बत्तर आहेत .कारण  एकदा झापड काढता येईल पण जी  मुद्दाम झापड घेतली कुणी तर ती कशी काढता येईल .तेव्हा त्या परिस्तितीत जाऊ नका यांच्यात काय चुकलं त्याच्यात काय चुकलं .सहज योगा मध्ये तुम्हीच तुमचे गुरु आहात .तुम्हाला हात मध्ये व्हायब्रेशन येतात आणि तुमचं तुम्हाला काळात कि तुमचं काय चुकलं आहे आणि आपले व्हायब्रेशन  ठीक करायचे .पण एक अशी स्तिती येते तिथे लोकांना काहीच कळत नाही आपलं काही चुकलेलं आहे किंवा नाही .ती परिस्तिति येऊ नये .त्या स्तितीत तुम्ही येऊ नये एव्हडीच माझी हात जोडून विनंती आहे .आज या शुभ प्रसंगी तुम्हा सगळ्यांना सांगायचं म्हणजे तुम्ही या पुण्य भूमीत जन्माला आलात .मी आता परवा कोईमतूर ला गेले त्यांनी सांगितलं कि तुम्ही पुण्याला राहणार ,पुण्यपट्टणम आहे म्हणे ते ,सगळ्यांनी हात जोडून म्हंटल ,म्हंटल ,म्हंटल असं का ,मग मी कोणत्या चुकीच्या गावी गेलेली दिसते  .तस नको व्हायला .आता ते म्हणतील दिसतच आहे मुळी , हेच आहे ते ज्याचं वर्णन केलेलं होत .अशी गोष्ट सांगतात कि एकदा पुंडलिकक्ष आई वडलांना घेऊन मुंबई शहरात आला .पुण्यालाही आला असेल कदाचित .असेल पुण्याची पण   गोष्ट ,तर तो म्हणाला त्यांना मी काही तुम्हाला घेऊन जात नाही कुठे फार झाली तुमची सेवा केली मी .तर आता मी तुम्हाला पुढे नेत नाही .तुमची तीर्थयात्रा करत नाही .तर त्यांनी विचार केला व्हायब्रेशन बघितले आणि म्हणाले ठीक आहे असं कर तू आम्हाला इथून कसतरी बाहेर काढ .या गावातून .आणि मग तुला काय करायचं ते कर .मग त्याने गावातून बाहेर काढल्या काढल्या त्याच्या लक्षात आलं माझं किती चुकलं आहे ते ,तो म्हणाला मला क्षमा करा ,मला काहीतरी  झालं होत .नाही नाही मी तुम्हाला घेऊन जातो .तर  तशातलं मला ह्या पुण्यात मला काहीतरी वाटत .मुंबई ला तरी आहेच .पण आता मात्र लोकांनी असा निश्चय केला पाहिजे कि यापुण्याला आम्ही जी पदवी दिलेली आहे अनादी काळा पासून ,मोठमोठ्या संतसाधुनी ,महात्म्यांनी ती साजरी करू .आणि ती सार्थ करू .असा सगळ्या पुण्याच्या लोकांनी आज निश्चय केला पाहिजे .कि आम्ही जस हे पुण्याचं नाव आहे ,इतकं महान नाव आहे त्या महान तत्वाला आम्ही उतरू .दुसरे काय करतात दुसरे असं करतात तस करतात ,चोऱ्या करतात .दुसऱ्याचं बघायचं नाही .दुसरा दुसरा ,तुम्ही आपले आहात .आम्ही कोत्या वृत्तीला सोडून ,लहान वृत्तीला सोडून मोठ्या ,विशाल विचारांना आत्मसात करू .दसरी गोष्ट आपल्या कडे सगळ्यात मोठा त्रास आहे तो जाती पातीचा ..त्याच्यावर न सांगितलेलंच बर .अनादी कला पासून जो आपल्या मध्ये जातीचा विचार होता त्या बद्दल मार्कण्डेय स्वामींनी लिहिलेलं आहे ,या देवी सर्व भुतेषु जाती रूपेण संस्थिता .असं रोज म्हणतो आपण .पण डोक्यात येतंय का हे काय आहे .म्हणजे देवीची जी जात आहे ती च आपली जात म्हणजे महाकाली ,महालक्ष्मी ,महासरस्वती अशा तीनच जाती जगामध्ये आहेत .आणि चौथी जात आदिशक्ती ची जी तुमची आहे .जर जे तामसिक आहेत त्यांची जात महाकालीची ,आणि जे राजसिक आहेत त्यांची जात महासरस्वतीची ,आणि जे सात्विक आहेत त्यांची जात महालक्ष्मीची .अशा प्रकारे तीन जातीचं फक्त आहेत आणि चौथी जात आहे ती जाती  पलीकडे म्हणून तिला असं म्हणायचं म्हणायचं गुणातीत .असा परिस्थितीत तुम्ही आज बसलेला आहात .तेव्हा जात आणि पात याची भांडण करायची नाहीत .आम्ही अमके आम्ही तमके असं म्हणणारे लोक खरोखर काहीच नसतात .आणि अशी भांडण घेऊन म्हणायचं याना कशाला राज्य दिल त्यांना कशाला राज्य दिल .म्हणजे शिवाजी कुणबी होता .तर त्याला कशाला राज्य दिल असे म्हणणारे पुष्कळ होते आणि आता तुमच्या राज्या वरती कोण बसलेला आहे , पारशी एक माणूस बसलेला आहे मग म्हणान त्याला सगळ्या ब्राम्हणांनी म्हणायचं का बसवलं आहे याना ,बोला .हे लाडके झाले सगळ्यांचे .तो आहे माणूस चांगला पण त्याचा अर्थ कुणी म्हंटलंय का असं शिवाजी महाराजांची स्तिती अशी असताना त्यांना तुम्ही त्रास दिला .अहो त्या गांधीजींना सुद्धा सांगितलं तुम्ही प्रायश्चित करा नाशकात येऊन .शहाणे .आणि प्रायश्चित करून घेतलं एव्हड्या मोठ्या माणसा कडून .महात्मा जिना मी म्हंटल तुम्ही कशाला प्रायश्चित करायला गेले .तर म्हणाले नसतो गेलो तर मला गोळ्या घातल्या असत्या .तुम्ही कुणाला सोडलंय का .ह्या सर्व वणव्यातून तुम्ही लोकांना काढलं पाहिजे .आणि हि जी आपल्या मध्ये कल्पना आहे दुसऱ्यांना धर्मा मध्ये खाली दाखवा .प्रत्येक वेळेला मोठमोठे लोक झाले या देशा  मध्ये त्या सगळ्यांनी प्रयत्न केला कि हि कल्पना लोकांच्या डोक्यातून काढून टाकावी .एकनाथांनी गाढवाला पाणी पाजलं ,नामदेव शिंपी होते ,आपल्या इथे सज्जन म्हणून कसाई होता त्याला आपण संत मानलं आहे ,तुकाराम  नेहमी म्हणायचे महार झालो असतो तर  बरा झालो असतो .हे कशासाठी कि तर जातीचं जे खूळ आहे ते निघालं पाहिजे म्हणून अनेकदा त्यांनी सांगितलं आहे .आणि इतके चमत्कार झाले ,इंद्रायणीत त्यांचे बुडवलेले त्यांचे ग्रंथ बाहेर आले सगळं काही झालं .पण त्याने लोकांच्या डोक्यात आलं नाही कि जे पावित्र्य आहे ती गोष्ट वेगळी आणि जात पात  चा जो झगडा आहे तो वेगळा .आणि ते शिकणारच नाही काही कारण झापड आहे ना डोळ्यावर .ह्या जातीत आम्हाला चालायचं नाही त्या जातीत आम्हाला चालायचं नाही ,हे आम्ही करणार नाही ते आम्ही करणार नाही .अशा रीतीने जे लोक बोलतात ,अशा रीतीने जे लोक वातावरण पसरवतात त्यांनीच आपल्या देशाला दुर्गती आणली . तरी व्यवहारिक द्रीष्टीने विचार करायला पाहिजे जर एका जातीच्या मुलीने दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केलं तर त्याच्यात आणि या जातीच्या विवाहात काहीच फरक नसतो .उलट त्यानी फायदे होतात .समजा जर तुम्ही तुमच्या जातीत च लग्न केलं .मराठ्यांनी मराठ्यांत केलं तर त्यांनी दिवाळीला काही पाठवलं नाही ,हुंडा किती दिला, लग्न करायचं म्हणजे मुलगी अशीच असली पाहिजे .पण तिचा  जर छळ लेला तर कुणी समाज उभा रहातो का त्या वेळेला .हुंडा नाही दिला म्हणून मुलीला घरी पाठवलं तर कुणी समाज उभा रहातो का त्या वेळेला .असा जातीसाठी मरणारे लोक आपल्या मुलींवर अत्याचार करतात .इतकच मला असं वाटत नव्हे ते एक माध्यम आहे अत्याचाराचं ,मुलींना वापरायचं आणि त्यांच्यावर अत्याचार करायच कि ह्या जातीतच लग्न झालं पाहिजे .हे एक माध्यम आहे ,त्या मुलींना छळण्याचं हे एक माध्यम आहे .आणि हे असं रोज आपण स्वतःच्या पोटच्या मुलींना आपण छळत आहोत .जर दुसरा मुलगा चांगला मिळाला ,दुसऱ्या जातीत चांगला तर करायला का हरकत आहे ,काहीच हरकत नसायला पाहिजे .पण तस दिसत नाही तेव्हडा व्यवहारिक पणा नाही .उद्या आपल्या मुलीला सोडून दिल तर ती जात मदत करणार नाही हे समोर दिसत असून सुद्धा आपण त्याच जातीत लग्न करायचं आहे .असला अट्टाहास धरण म्हणजे त्या मुलीच्या डोक्यावरती आपण मुद्दाम काहीतरी फार मोठा बोझ्या घालत आहोत .तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा स्व जातीत ,परत करायचं तर परत करा  हवं तर .पण त्या मुलीच्या मागे  हात धुऊन काय लागले .आणि तिला उद्या छळल्यावर तिच्या सासूने तुम्ही जाऊन म्हणत का नाही आम्ही जातीती लग्न केलं, त्यात तुम्हाला प्रतिष्ठा वाटते जातीत मिरवायला कि आम्ही आमच्या जातीत लग्न केलं ,त्यांनी तुम्हाला काय हार तुरे मिळणार आहेत .त्यात काय मिळालं आहे .असा विचार करा .बायकांचं विशेष असत हे कि आमच्या जातीत झालं पाहिजे म्हणजे तुम्हाला काय मिरवायला मिळत त्याच्या नंतर कि काय मिळत मला हे समजत नाही .गांधीजींनी प्रयत्न केले त्याच्या आधी टिळकांनी प्रयत्न केले ,टिळकांनी स्वतः एका विधवेशी लग्न केलं .आगरकरांनी केले ,किती लोकांनी हे प्रयत्न केल्यावर सुद्धा आम्ही त्या प्रयत्ना च्या पूर्णत्वाला पावलो नाही .आता परत सहजयोगात आल्या नंतर जातीपातीच्या गोष्टी करायच्या नाहीत .आम्ही कोणतीही जात मानत नाही .फक्त एकच जात मानतो ती म्हणजे सहजयोगी .सहजयोग हि विश्व धर्माची गोष्ट आहे .हा विश्व धर्म आहे आणि ज्याच्या मध्ये कोणतीही जात पात ,रेस वैगेरे काही नाही एकच परमेश्वर आणि त्यांनी निर्मित केलेले आपण सर्व मानव जातीतले लोक ज्यांनी परमेश्वराला प्राप्त केलं आहे .आता परमेश्वराच्या साम्राज्यात गेल्यावर इथली खूळ तिथे नेऊ नका .बावनकुळे आणि अमक आणि तमक .आणि एक गृहस्थ तर मला म्हणाले कूलत्व बद्दल बोला माताजी .म्हंटल बोलते कूलत्व तुमच्या कडे फार मोठं असत .कुळ कशावरून येत तुमची कुलस्वामिनी कोण ,त्याच्यावरून येत .म्हणजे देवीचं आलं किनई परत .अहो आम्ही कोणच्याही जातीचे असलो तरी आमची कुलस्वामिनी एक असू शकते .समजा एखाद्याची जगदंबा आहे तर ती मग एका सोनाराची असू शकते ,ब्राम्हणाची असू शकते ,मराठ्या ची असू शकते ,कुणाचीही असू शकते .मग त्याची जात जगदंबेची झाली किनई .म्हणजे कुळ तेच जगदंबेचं झालं ना .आपल्या कडे बघा कुल हे देवी पासून आहेत .देवा वरून नाही .म्हणजे आई वरून कुळ ओळखलं जात .आणि ती गोष्ट खरी सुद्धा आहे .म्हणून या देवी सर्व भुतेषु जाती रूपेण  संस्थिता हे असं म्हंटलेलं आहे  हे तुमचं कुळ आहे हि कुळाची थोरवी आहे .आता मी विचारलं कि शिवाजीचं कुळ कोणतं .कुणाला सांगता आलं नाही .कुणी म्हणे जगदंबा कुणी म्हणे भवानी .भवानी हि त्यांच्या आईची होती .त्याचं कात्यायनी देवीचं   कुळ होत .आता त्यांच्या कडे  तरी  कुळात  कात्यायनीचा कूळाचार आहे कि नाही माहित नाही.  हा कुळाचार आहे  हे कुळ  आहे ,हि कुळाची थोरवी आहे .उगीचच काहीतरी आपल्या मनानं करायचं ,आम्ही इतके कुळी आणि तितके कुळी .पण काही दिसत नाही तसा प्रकार .दारू प्यायला मात्र सगळे एकत्र जातील .दारू प्यायचं झालं तर सगळे एकत्र बसून पितील .एकाच ठिकाणी पितील .दारू पिताना ,मग काय आम्ही दारूचं पितोय त्यात काय एव्हडं .पण पाणी पिताना मात्र आम्ही सोवळं नेसून पिणार .सिगरेट प्यायची असली तरी चालेल  तुमच्या तोंडची अर्धी राहिली असली तरी चालेल .पण जेवायच्या वेळेला मात्र आम्हाला उष्ट्याचा फार विचार .म्हणजे घाणेरडं काम करायचं असलं ,चोऱ्या करायच्या असल्या तर कोणी विचारत का तुमची जात कोणती रे बाबा .जेव्हा चोऱ्या करताना ते एकेक संघ स्थापन करतात तेव्हा त्याच्यात सर्व तऱ्हेचे लोक एकत्र चोरी करतात .तसाच राजकारण आहे .राजकारणात सुद्धा  कुणी असं विचारत नाही  कि बाबा तुझी जात कोणती .सगळे भामटे एकत्र झाले म्हणजे राजकारण सुरु होत .तुम्ही किती भामटे आहेत ते आधी शोधून काढलं पाहिजे .चांगलेच भामटे आहेत पोचलेले मग या आमच्यात ,मग काय अगदी बरोबर जमतंय आपलं .हि अशी परिस्तिति आज आपली आलेली आहे .कि आपल्याला काहीही स्वतः बद्दल  आत्म सम्मान राहिलेला नाही .कारण आत्म्याचं दर्शनच झालेलं नाही मग आत्म सन्मान येणार कसा .फालतू म्हणजे बेकार अशा वस्तूंचं एव्हडं महत्व झालेलं आहे आणि ज्या खऱ्या वस्तू आहेत तिकडे लक्ष नाही .आणि  हे तामसिक लक्षण आहे .आणि हे तामसिक लक्षण आपल्यातून जावं म्हणून तुम्ही पूर्ण प्रयत्न केला पाहिजे .तामसिक माणसाला स्वतःची काही कदर नसते .त्याला काही स्वतः बद्दल वाटत नाही .मला काहीतरी आत्मसम्मान असला पाहिजे असं काही वाटत नाही .आणि तो खुसपट काढत असतो .याच खुसपट काढ त्याच खुसपट काढ ,इकडूनतिकडे काहीतरी खुसपट काढत असतो .तसाच राजसिक माणूस हा आततायी ,छातीठोक पणे ,उघड पणे दोनचार तुमच्या थोबाडात देईल ,तुम्ही त्याला दोनचार दिले तर तुम्हाला तो दोनचार परत देईल .पण ते उघड पणे .त्याच सगळं उघड असत .इतकं कि पाप करायचं झालं तरी उघडपणे त्याच्यात काय वाईट ,ते करायला त्याच्यात काय वाईट .असं म्हणायचं .कोणतीही गोष्ट करायची म्हणजे आडपडदा कशातच नाही .प्रत्येक गोष्टी मध्ये त्याच्यात काय वाईट .दुसऱ्यानाच लाजा वाटायच्या त्यांना बघून अशी स्तिती .तेव्हा आता तुमची जी स्तिती आहे ती तुम्ही जाणावी ,तुमची जी काय जाती आहे ती तुम्ही ओळखावी .आणि कोणत्याही जातीत अतिशयतेत गेले म्हणजे तुम्ही बुडाले .तेव्हा या जातीच्या पलीकडे तुम्ही गुणातीत झालं पाहिजे .आणि त्या स्तितीत तुम्ही स्थिर होऊन आत्मसंप्पन्न  झालं पाहिजे .त्याची श्रीमंती तुमच्यात दिसली पाहिजे .सहजयोगाचं दुसरं लक्षण हे आहे कि तो नेहमी आनंदात असला मस्त असला पाहिजे .कबीर दासनी म्हंटल आहे जाब मस्त हुए फार क्या बोले .जर तुमच्यात मस्ती आली नाही तर मग तुम्ही सहजयोगी नाही .जर तुमच्यात हे आलं ना कि ,काय आहे ,माताजींनी सांगितलं ना मग वाट्टेल ते आम्ही करू .असे मी पुष्कळ लोक पहिले .मी म्हंटल अहो काय करता तुम्ही ,एक हजार माणस येणार आहेत .कस करणार .एक हजार काय आम्ही तीन हजार माणस सुद्धा उचलून घेऊ .त्याला काय लागत आम्ही दहा माणस असलो कि झालं .हि जी मस्ती येते जी बेफिकिरी म्हणतात त्याला .ती मस्ती जर नाही आली तर अजून तुम्हाला सहजयोग साधलेला नाही .त्याच्यात काय माताजी म्हणतात ना मग काय होणारच आहे आणि होत .अशी अनेक लोक आहेत ज्यांना ह्याचा लाभ  झाला आहे . त्यानी पाहिलेलं आहे .त्याना किती फायदे झाले .त्यांनी कितीतरी मिळवलं .पण ती बेफिकीरी यायला पाहिजे .मस्तीत यायला पाहिजे .ती मस्ती जर लोकं मध्ये दिसली नाही तर मी समजते यांचं काहीतरी धरलेलं आहे .भयंकर प्रकार आहे .त्याच्यात गांभीर्य नसत .प्रत्येक गोष्टीत खुसपट काढणे ,लहान सहान  गोष्टीकडे लक्ष देणे .असं नको करायला तस नको करायला किंवा काहीतरी अशा गोष्टी करणे ज्यांनी सगळ्याचा आनंद विराम पावेल असा ज्या गोष्टी आहेत त्या सहज योग्याला शोभत नाहीत .मस्तीत रहायचं ,सगळं मस्तीत केलं तर तुम्हाला आश्यर्य वाटेल कस काम बनत कशा गोष्टी होतात .कारण परमेश्वराच्या साम्राज्यात आले तुम्ही मग मस्तीत येणार नाही तर केव्हा येणार .तेव्हा सगळ्यांनी आज एव्हडा आनंदाचा दिवस आहे ,आपल्या स्वातंत्र्याचा झेंडा लागला तेव्हा आम्ही स्वतः दिल्लीला तो चढताना आणि उतरताना दुसरा झेंडा पहिला होता .तेव्हा मी असं म्हंटल होत कि जी या झेंड्याची शान आहे ती राहिली पाहिजे .आणि त्या शाने प्रमाणे आपण सगळ्यांनी आपलं व्यक्तित्व राखून पूर्ण पणे समग्र झालं पाहिजे .त्या मस्तीत आलं पाहिजे त्या आनंदात आलं पाहिजे .सगळ्यांनी एकात गुंतून घेतलं पाहिजे .गुंतल्या सारखे झाले म्हणजे आता हे लोक इतके बाहेरून आले यांच्याशी दोन मिनिट सुद्धा बोलायला वेळ मिळत नाही ,दोन मिनिट सुद्धा यांच्या बरोबर बसायला वेळ नाही .इतक्या लांबून आले त्यातले काही लोक अशे आहेत कि मी त्यांना कधी पाहिलं सुद्धा नाही .पण ते मस्तीत आहेत .मी त्यांच्या बरोबर एक मिनिट सुद्धा घालवला नाही तरी त्यांना काही वाटत नाही .पण आपल्या महाराष्ट्रात तस नाही ,माझ्या घरी माताजी आल्या नाहीत माझ्या आवारात आल्या नाहीत .माझ्या सेंटर ला आल्या नाहीत .माझं माझं फार आहे .आणि मला वेळ दिला नाही माताजींनी .मला वेळ द्या .सगळं वेळ मी महाराष्ट्रातच खपवते आहे .ह्या लोकांच्या बरोबर  काही बोलायला सुद्धा फुरसत नाही ,बाबा तू कसा आहेस .असही आज म्हंटल नाही त्यांना मी तब्बेत कशी तुझी हे पण विचारलं नाही .हे इथं येतात काय आणि जातात काय .म्हणजे भेटच होत नाही त्यांची .त्यांच्या देशात गेलं कि भेट थोडी होते तर होते .पण कधीही यांनी असं म्हंटल नाही कि माताजी तुम्ही माझ्या घरी या .किंवा  माझ्या  इथे येऊन बसा , किंवा   बोला ,कधीही नाही  .बर दुसरं असं कि मला जर कुणा कडे जायचं तर मी जाणार .ते माझं मत आहे .मला जायचं असेल तर मी  कुठं हि जाणार .मी माझी  सोय बघणार तिथे मात्र लोक म्हणतील माताजी तुम्ही त्यांच्या घरी कशाला गेलात .अरे पण मला तिथे सोय होती म्हणून जाते तुम्ही कोण बोलणार .म्हणजे माझ्यावर हे कि तुम्ही का तिथे जाऊन राहायचं .अशी जबरदस्ती माझ्यावर करायची .म्हणजे हे सगळं इतकं लहानपणाच आणि मूर्खपणाचा लक्षण आहे आणि ते तस करू नये .आणि अशा रीतीने सगळ्यांनी दोन मिनिट माझ्याकडे या ,एक मिनिट माझ्याकडे या कशाला ,कशाला यायचं .त्याच्यात काय मिळणार आहे तुम्हाला .त्याने मला त्रास होऊन माझा संतोष जर तुम्ही घेतला तर काय मला प्रसन्नता मिळणार आहे .आणि त्या प्रसन्नते मुळे मिळणारे आशीर्वाद तुम्हाला कसे मिळणार .जर तुम्ही मला त्रास द्यायचाच मागे लागले तर .तर असा हट्ट करायचाच नाही मुळी  कि माझ्या घरी या ,माझ्याकडे चला .हे माझं पण गेलं पाहिजे .तुमचं घर कोणतं आहे .सगळं माझंच  घर आहे .माझी मुलं ,माझं घर ,माझा नवरा हे सगळं तामसिक लक्षण आहे .त्यातून हे लक्षात ठेवलं पाहिजे जी मुलं हे असं माझं माझं करतात त्या मुलांची कधीही बरोबर बुद्धी करू शकत नाही .कारण त्याच्यामध्ये मन तुमचं एव्हडं गुरफ़टलेल असत कि चुकत काय ,येरे बाळा दोन खून करून आला तरी येरे बाळा .तेव्हा त्याच्या पासून दूर हटून आपण एक सहजयोगी आहोत आपल्या मुलांचं वर्तन कस असायला पाहिजे हे दूर हटून बघितल्या शिवाय कळणार नाही .म्हणून त्याच्या मध्ये गुंतायचं नाही .आणि अशा रीतीने जो समाज तयार होईल तो खरा गुणातीत ,तो खरा सहजयोगी आणि तो च या महा योगाला प्राप्त होणार आहे .सर्वाना माझा अनंत आशीर्वाद