Puja Brahmapuri (India)

Puja at Brahmapuri. Brahmapuri (India), 29 February 1985. Marathi Transcript इथे या लोकांच आगमन झाल आहे,तुम्ही लोका नि त्यांच स्वागत केल ,इतकी व्यवस्था केली,आणि इतकी सुंदर जागा शोधून काढली त्यांच्या साठी तेव्हा त्यांच्या वतीने मीतुमच्या सगळयांचे आभार मानते .या लोका नि इथे फार आनंदात वेळ काढलेला आहे .देव कृपेने यांच्या जवळ यांच्या देशात सगल काही आहे .तुम्ही जाउन बघितल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे लोक अत्यंत श्रीमंतीत वाढलेले आहेत आणि सगळ्या तरहेचा ऐशो आराम याना आहे,आपले रस्ते आपली धूळ तुडवत इथे ते आले आणि मी त्याना संगितल इथे श्रीरामाची आणि सीतेची मूर्ती मिळाली होती ,ही अशी पवित्र जागा आहे जिथे रामदास स्वमिनि या मूर्ती प्राप्त केल्या आणि त्या चाफळ ला नेऊन बसवल्या .या एका गोष्टीवर ही मंडळी म्हणायला लागली की आम्हाला तिकडे जायच आहे . तसच मी इथल्या मंडळिना संगितल की बर तुम्ही तिथे व्यवस्था करा ,त्या सर्व आरमाला सोडून ,त्या सर्व सुखा ला सोडून ते परमेश्वराच्या आनंदा साठी इथे आलेले आहेत . तसाच आपण सुधा ज्या पवित्रा जागा आहेत त्याच महत्व आपण समजल पाहिजे .आणि त्या पवित्र तेच आपण रक्षण केल पाहिजे . आपल्या मधे ती पवित्र ता आली पाहिजे. हे लोक इतके कुशाग्र आहेत की याना माहीत आहे की महाराष्ट्रात विशेष करून या भारत भूमी पेक्षा  सबंध महाराष्ट्रात अत्यंत सुंदर ,रम्य अशी अध्यात्मिक ठिकाणे आहेत . ते दिसायला आपल्याला सुंदर दिसेल या पेक्षा कितीतरी सुंदर त्यांच्या कडे फार सुंदर निसर्ग आहे ,फार सुंदर निसर्ग आहे .म्हणजे अगदी बघता च अस वाटत की काय विशेष आहे .पण त्यात चैतन्य नाही. इथे चैतन्य आहे म्हणून ते लोक आले ,तसेच Read More …

Public Program Angapur (India)

अंगापूरच्या या पंचक्रोशीत या पवित्र भूमीत आज येत आलं त्या साठी मी इथल्या सहजयोग्यांचे फार आभार मानते . अंगापूर बद्दल बरीच माहिती मी आधी वाचली होती . श्री रामदास स्वामींना इथे श्रीराम आणि सीतेच्या मूर्ती मिळाल्या त्यांनी त्या चाफळ मध्ये नेऊन ठेवल्या . त्याही मी पहिल्या आहेत . तेव्हा कधीतरी अंगापूरला जावं अशी माझी फार इच्छा होती . हि पवित्र घटना आहे आणि त्या एका घटने मुळे रामदास स्वामी नि अनेक ठिकाणी श्री हनुमानाचे सुंदर मंदिर बांधलेले आहे . त्यांनी जे कार्य केलं ते समाजोन्मुख होत ,समाजाकडे त्यांची द्रीष्टी होती . समाजाला परमेश्वरी ओळख झाली पाहिजे ,परमेश्वर मिळवल्या शिवाय माणसाचं कल्याण होऊ शकत नाही हि त्यांची ठाम समजूत होती . रामदास स्वामींना एकदा विचारण्यात आलं कि हा परमेश्वरी साक्षात्कार करायला किती वेळ लागतो . त्यांनी सांगितलं तत्क्षण . त्यांनी सहज शब्द अनेकदा वापरला पण सहज लोक नाहीत त्यांची वृत्ती सहज नाही . त्याला कारण श्री कृष्णांनी सांगितलं आहे कि जगामध्ये तीन तऱ्हेचे लोक असतात . एक तामसिक लोक असतात दुसरे राजसिक असतात आणि तिसरे सात्विक लोक असतात .  तामसिक लोक ते असतात जे काहीतरी चुकीचं डोक्यामध्ये भ्रामक घ्यायचं आणि त्याच्या पाठीमागे सगळं आपलं आयुष्य घालवत असतात . आणि राजसिक लोक ते असतात ज्यांना चूक आणि बरोबर यातला फरक कळत नाही वाईट काय आणि चांगलं काय यातला फरक कळत नाही . हे अशे राजसिक लोक असतात . आणि तिसरे सात्विक लोक असतात जे परमेश्वरच नाव घेतात कारण त्याना माहित आहे कि सन्मार्गाने एकदा आपण वागलो कि आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल . ह्या विचाराने जे राहतात ,या ध्येयाने जे राहतात ते खरे सात्विक म्हणायचे . जे लोक उगीचच देवाचं नाव Read More …