Public Program

Angapur (India)

1985-01-29 Public Program Marathi, Angapur India DP-RAW, 66'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

अंगापूरच्या या पंचक्रोशीत या पवित्र भूमीत आज येत आलं त्या साठी मी इथल्या सहजयोग्यांचे फार आभार मानते . अंगापूर बद्दल बरीच माहिती मी आधी वाचली होती . श्री रामदास स्वामींना इथे श्रीराम आणि सीतेच्या मूर्ती मिळाल्या त्यांनी त्या चाफळ मध्ये नेऊन ठेवल्या . त्याही मी पहिल्या आहेत . तेव्हा कधीतरी अंगापूरला जावं अशी माझी फार इच्छा होती . हि पवित्र घटना आहे आणि त्या एका घटने मुळे रामदास स्वामी नि अनेक ठिकाणी श्री हनुमानाचे सुंदर मंदिर बांधलेले आहे . त्यांनी जे कार्य केलं ते समाजोन्मुख होत ,समाजाकडे त्यांची द्रीष्टी होती . समाजाला परमेश्वरी ओळख झाली पाहिजे ,परमेश्वर मिळवल्या शिवाय माणसाचं कल्याण होऊ शकत नाही हि त्यांची ठाम समजूत होती . रामदास स्वामींना एकदा विचारण्यात आलं कि हा परमेश्वरी साक्षात्कार करायला किती वेळ लागतो . त्यांनी सांगितलं तत्क्षण . त्यांनी सहज शब्द अनेकदा वापरला पण सहज लोक नाहीत त्यांची वृत्ती सहज नाही . त्याला कारण श्री कृष्णांनी सांगितलं आहे कि जगामध्ये तीन तऱ्हेचे लोक असतात . एक तामसिक लोक असतात दुसरे राजसिक असतात आणि तिसरे सात्विक लोक असतात . 

तामसिक लोक ते असतात जे काहीतरी चुकीचं डोक्यामध्ये भ्रामक घ्यायचं आणि त्याच्या पाठीमागे सगळं आपलं आयुष्य घालवत असतात . आणि राजसिक लोक ते असतात ज्यांना चूक आणि बरोबर यातला फरक कळत नाही वाईट काय आणि चांगलं काय यातला फरक कळत नाही . हे अशे राजसिक लोक असतात . आणि तिसरे सात्विक लोक असतात जे परमेश्वरच नाव घेतात कारण त्याना माहित आहे कि सन्मार्गाने एकदा आपण वागलो कि आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल . ह्या विचाराने जे राहतात ,या ध्येयाने जे राहतात ते खरे सात्विक म्हणायचे . जे लोक उगीचच देवाचं नाव घ्यायचं ,काहीतरी टाळ कुटत बसायचं किंवा त्यासाठी काहीतरी वेड्या सारखं वागायचं असं समजतात हे तामसिक लोक आहेत . तसच काहीतरी एक खूळ  डोक्यात घेऊन बसायचं आणि त्या खुळालाच महत्व द्यायचं हे सगळे तामसिक लक्षण आहे . तामसिक माणूस म्हणजे एखाद्या घाण्याला आपण बैल जुंपतो आणि त्याला झापड घालतो तसा असतो . त्याला ते सांगितलं तेचतेच तो करत असतो त्यातच सगळं आयुष्य घालवून शेवटी नष्ट पावतो . अशा या तामसिक वातावरणा मध्ये कधी कधी एखाद्या संतसाधुना फार त्रास भोगावा लागतो . असा आपल्या इथे सर्व संत साधूंनी त्रास भोगला आहे . श्री रामदास स्वामी हे स्वतः च लोकांपासून दूरच राहत असत . कारण ते लोक किती त्रास दायक आहेत हे ते जाणून होते . श्री समर्थ म्हणजे साक्षात हनुमानाचं अवतरण आहे . त्याची अनेक उदाहरण आपल्याला सापडतात कि हे साक्षात हनुमानाचं अवतरण आहे आणि म्हणूनच त्यांनी लग्न केलं नाही . आणि ते अखंड ब्रम्हचारी राहिले . पण जे समाजात योग्य आहे त्या बद्दल त्यांनी सांगितलं आहे कि परमार्थ हा परमेश्वराला मिळवण्याचा जरी योग्य मार्ग असला तरी संसाराला सांडून ते करायचं नाही संसारातून पळून परमेश्वर मिळवता येत नाही . हि गोष्ट सर्व लोकांनी सांगितली ,तुकारामांनी लग्न केलेलं होत त्यांचा पण संसार होता . संसारात राहूनच त्यांनी परमेश्वराची गाथा गायली आहे . 

आता आपल्याला असं समजलं पाहिजे कि ह्या देशामध्ये पुष्कळ संतसाधु झाले . विशेषतः आपल्या महाराष्ट्रात तर अनेक संतसाधु झाले पण आपण त्यांना ओळखलं नाही . ते जेव्हा जिवंत होते तेव्हा आपण त्यांना छळून काढलं . त्यांची गोष्ट ऐकली नाही त्या मुळे आज हि आपली दुर्दशा आहे . जर आपण त्यांचं ऐकलं असत तर आज आपली अशी स्तिती अली नसती . पुष्कळशे लोक मला परदेशात असं विचारतात कि माताजी तुम्ही म्हणता तुमचा देश योगभूमी आहे . महाराष्ट्र तर पुण्यभूमी आहे तर मग तिथे इतकी हालाकीची स्तिती का ?त्याला कारण म्हणजे कृष्णाने सांगितलं आहे कि ,”योग क्षेम वाहामयं “आधी योग घडला पाहिजे मग क्षेम घडणार . जर तुमच्यात योगच घडला नाही तर क्षेम कस होणार . म्हणून आधी योग मिळवला पाहिजे . ज्यांनी योग मिळवला नाही आणि क्षेमाच्या मागे लागले आहेत त्यानां परमेश्वराचा आशीर्वाद मिळत नाही आणि त्याच भलं होत नाही . पुष्कळांना असं वाटत कि आपली आर्थिक परिस्थिती ठीक झाली तर आपण अगदी स्वर्गात जाऊ हि चुकीची गोष्ट आहे . आता मी परदेशात जाते ,माझे यजमान तिकडे निवडून गेल्या मुळे  त्यांच्या बरोबर मला फिरावं लागत .आणि मी तिथे सर्व फिरून पाहिलेलं आहे . तिथल्या लोकांची आणि समाजाची फारच दुरावस्था आहे . कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही . दोनचार वर्षातच सगळ्यांची लग्न तुटुन मुलबाळ आणि नवराबायको सगळेच अनाथालयात जातात . अत्यंत वाईट परिस्तिथी आहे . लोक दारू पितात ,गांजलेले आहेत त्या शिवाय आणखीन फार वाईट अशी त्याना व्यसन लागलेली आहेत . अगदी त्यांची स्तिती इतकी खराब आहे कि त्यांना पाहून असं वाटत कि एव्हडे पैसे मिळवून ,एव्हडा सगळं असून सुध्दा ह्यांना काही सांपत्तिक सुख मिळालेलं नाही . मुलगा कधी ड्रग घेऊन घरी येतो तर आईवडील दारू पिऊन पडलेले असतात ,झिंगत असतात . कोणाला कोणाचं सुख नाही ,अगदी मशीन सारखं आयुष्य तिथे चाललेलं आहे . तिथले जे तरुण मुल असतात ती याच प्रयत्नांत असतात ,विचारात असतात कि आत्महत्या कशी करायची . एव्हडं करून जर असं होत तर याचा अर्थ असाच होतो कि पैशाने सुख किंवा आनंद मिळतोच असं नाही . आनंद हा फक्त आत्म्यांनीच मिळतो आणि आत्म्याला मिळवल्या बरोबरच सर्व गोष्टी संतुलनात येतात . एकदम अति काहीच होत नाही . अति पैसा मिळत नाही अति विद्या मिळत नाही कारण काहीही अति झालं म्हणजे डोकं खराब होत . पैसा जास्त झाला तरी माणूस तो जिंकू शकत नाही . जर त्याच्या जवळ विद्या जास्त असली तरी तो जिंकू शकत नाही . त्याच्या जवळ जर मुलबाळ ,बायको ,घरद्वार असलं तर तो त्यातच गुंतून संपून जातो . आपल्या महाराष्ट्रात विशेष करून हिंदुस्तानात सुध्दा ती प्रथा फार वाईट आहे कि आपला मुलगा म्हणजे काहीतरी विशेष . तो सगळ्यांच्या डोक्यावर बसला पाहिजे . अशी जी कल्पना आपल्या मुलाबद्दल आपली असते ती चुकीची आहे . किती हि म्हंटल तर आपण हे समजलं पाहिजे कि ,सारी सृष्टी हि त्याच्या कुटुंबात आहे . पण विशेष करून महाराष्ट्रा मध्ये सात्विक मंडळी आहेत . धर्ममार्गाला लागलेली आहेत . हवं संतसाधुचे फार मोठे आपल्या वरती उपकार आहेत . त्यांचे ऋण आपण फेडता फेडू शकत नाही . त्यांनी इतकं ऋण आपल्यावर केलं आहे समजावून सांगितलं आहे कि तुम्ही परमेश्वराच्या नादी लागा . पण नादी लागण्याचा अर्थ काहीतरी वेड्यासारखं वागणं नव्हे . जो दिसला कुणी भामटा जेल मधून सुटून आला आणि त्यानं जर भगवे वस्त्र घातले तर लागले त्याचा पाया पडायला . 

एखादया बाईच्या अंगात भूत आलं तर म्हणे हिच्या अंगात देवी अली . म्हणजे आपण अगदी सारासार विचार करत नाही इतके अज्ञानात आपण राहतो . आपण म्हणजे अशिक्षित जरी असलो तरी एक सारासार विचार ,एक विवेक एका शेतकऱ्याला असायला पाहिजे . आणि त्याला समजलं पाहिजे कि देव हा ज्या माणसात असेल किंवा त्याचा अंश जरी असेल किंवा त्याला जर आत्मसाक्षात्कार झाला असेल तर तो वेगळ्या प्रतीचा माणूस असतो . त्याला तुमचे पैसे नकोत ,त्याला तुमच्या घरद्वार यात काही ध्यान नसत . किंवा कोणत्याही प्रकारची इच्छा ,अपेक्षा त्याला काही नसते . फक्त तो देण्यासाठी च येतो . अशे जे संतसाधु आहेत त्यांना मान्य केलं पाहिजे . पण सगळ्यात नानक साहेबानी सांगितलं आहे कि साहिब से मिलादे . म्हणजे परमेश्वराशी जो भेट घालून देतो तोच खरा तुमचा सदगुरू आहे . बाकी सगळे अगुरु आहेत . जे बाकी सगळे गुरु बनून फिरतात अशा गुरूंना आपण मान्य करतो हे एक तामसिक पणा च लक्षण आहे . दुसरं लक्षण मी पाहिलेलं आहे ते फारच विशेष म्हणजे काही काही तामसिक लोकांचं आहे ते म्हणजे असं कि जे काही भटांनी सांगितलं ते मानायचं . म्हणजे आता गांधीजी परदेशात गेले होते जर ते परदेशात गेले नसते राउंड टेबल कॉन्फरन्स ला गेले नसते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसत . पण ते एव्हड्या मोठ्या कार्याला गेले होते ,तिकडून ते आल्यावर नाशकाच्या भटांनी सांगितलं कि जो पर्यंत तुम्ही प्रायश्चित करणार नाही तो पर्यंत आम्ही तुम्हाला या देशात राहू देणार नाही . तर तेव्हड्या मोठ्या माणसाला जो एव्हडं मोठं कार्य करायला निघाला होता ह्या शहाण्यांसाठी नाशकाला जाऊन प्रायश्चित घ्यावं लागलं . म्हणजे किती शरमेची गोष्ट आहे . म्हणजे आपल्याला कुणाचं मोठं कार्य काही दिसत नाही आपण काहीतरी आपल्या डोक्याचं एक लहानसे खूळ घेऊन त्या माणसाचा रात्रंदिवस अपमान करायचा . असं आपण सगळ्यांच्या बरोबर अत्याचार केलेले आहेत . मी गांधींच्या बरोबर होते मी त्यांना विचारलं कि तुम्ही असं का केलं ?ते म्हणे नसत केलं तर यांनी मला गोळ्या घातल्या असत्या . शेवटी घातल्याचं त्यांना गोळ्या . पण असं आहे कि मोठ्या माणसाचं कार्य आपण बघू शकत नाही कारण आपल्या डोळ्यामध्ये तेव्हडी द्रीष्टी नसते . आपण त्याला हाणून पाडण्यासाठी बसलेलो असतो . 

सहजयोगाचं पण मी पाहिलं आहे तसच आहे सहजयोग हे एक फार मोठं कार्य आहे . विश्वाचं कार्य आहे . सर्व विश्वाचे जे धर्म आहेत ते त्याच्या तत्वावर सहजयोग बसवलेला आहे . हे आत्म्याचं दर्शन कधीही इतक्या लोकांना झालं नव्हतं ते आज सहजयोगाने होत आहे . पण मी असं बघते कि तिथे गेल्यावर एक आनंदाचा उल्हास बघितला इतके लोक प्रेमाने वागत होते ते बघून मला अगदी भरून आलं . आणि फार आनंद झाला कि किती भक्तिभावाने हि सात्विक मंडळी इथे आली . पण जी सात्विक मंडळी आहेत ती सहजयोगाला टिकून राहतात . त्यात जर दोनचार तामसिक मंडळी असतील तर काहीतरी खुसपट काढतात . असं करायला नको होत तस करायला नको होत . तुम्ही कोणाचं काही भलं केलय का ?असं त्यांना प्रश्न विचारायचा ,तुम्ही चूप बसा . तुम्ही कुणाचं आज पर्यंत भलं केलेलं नाही ,नेहमी खुसपट काढत बसायची . सहजयोगात जे आहे ते प्रामाणिक आहे . त्याला पर्याय नाही . तो अपर्यायी शब्द आहे . सहजयोगात जे घडत ते तुमच्या आत्म्यामुळे घडत आणि आत्म्याला पर्याय नाही . हे जाणलं पाहिजे . किंवा हे असं झालं असत तर बर झालं असत ,तस झालं तर बर झालं असत . असं केलं का माताजींनी तस केलं का माताजींनी . अरे तुम्हाला आम्ही हे चैतन्य दिल ,जे कुणी दिल नव्हतं ते दिल . ते तर बघा . हे असे तामसिक प्रवृत्तीची चार मानस जरी एका खेडेगावात अली कि ते आपलं कार्य करून टाकतात आणि ज्यांनी मिळवलं त्यांचं सगळं गमावून टाकतात . म्हणून मी तुम्हाला चेतावनी देते ,हि फार मोठी चेतावनी सर्व ग्रामीण भागात देते कि तामसिक लोकांचं साम्राज्य पसरू देऊ नका . त्यांना बुध्दी  नाही . निर्बुध्द आहेत ते . आणि मुर्खांसाठी सहजयोग नाही आहे . तेव्हा जर त्यांना सहजयोग लाभला नाही तर ते तुम्हालाही मुर्खात काढायला लागतील . कारण त्यांना लाभला नाही म्हणून ते काहीतरी त्याच खुसपट काढून तुम्हाला सांगतील कि हे केलं नाही पाहिजे ते केलं नाही पाहिजे . 

सहजयोग हा शास्त्रावर आधारित आहे . तो काही कुठून हवेतून आणलेला नाही . आता मी परवा गेले होते एके ठिकाणी तर एका गृहस्थानी मला सांगितलं कि आम्ही अशी अशी कुंडलिनी जागृत करतो आणि त्याला आम्ही शक्तिपात म्हणतो आणि अरुणोदय ,करुणोदय असे शब्द सांगितले . अहो पण त्याला काही शस्त्राचा आधार आहे का शक्तिपाताला ?जे अनादी काळापासून कुंडलिनीच जागरण होत होत त्याबद्दल सगळ्यांनी लिहून ठेवलं आहे . नंतर आदिशंकराचार्यानी जे स्पष्ट रूपाने लिहिलं त्यांच्या नंतर ज्ञानेशांनी हि स्पष्ट सांगितलं ते आज जर घडलं तर त्याला म्हंटल पाहिजे याला काहीतरी शास्त्र आहे . झाडाला पहिल्यांदा मूळ येतात मग त्याला बांधा येतो मग त्याला फांद्या येतात मग फांद्यांवर पान येऊन मग त्याला फुल लागून मग त्या फुलातूनच फळ येतात . काही हवेत लटकत नाहीत ,प्रत्येकाला आधार असला पाहिजे . आणि ज्या गोष्टीला आधार नाही अशे हि हे बुध्दीजीवी लोक किंवा त्याला म्हणू आपण राजसिक लोक काढत असतात . काहीतरी टुम काढायची . त्यांची पण एक नवीन टुम असते आणि लोकांना वाटत वा वा फार छान आहे , आमची अशी कुंडलिनी जागृत होते . आणि त्या अनुशंगाने सुध्दा मी असं पाहिलं ते लोक असं म्हणतात कि कुंडलिनी जागृत झाली म्हजे तुम्ही बेडका सारखे उडू लागता . आता तुम्हाला काय बेडूक व्हायचं आहे का . ?आता तुम्हाला अतिमानव व्हायचं आहे . तो मानव ज्याचं वर्णन ज्ञानेशा नि केलं ,आता विश्वात्मके देवे तोषावे ,तोषूनी द्यावे पसायदान . हे पसायदान देतो आहोत आता आम्ही तुम्हाला ते घेतलं पाहिजे . त्यांनी जे सांगितलं आहे ते मिळवलं पाहिजे . ते सोडून दुसरं काहीतरी आपल्या मनानी काढायचं तशारीतीने वागायचं आणि त्याच त्याच घाण्याचा बैलासारख फिरत राहायचं हे चुकीचं आहे . जो पर्यंत तुम्हाला आत्मबल मिळणार नाही तो पर्यंत आत्मसाक्षात्कार होणार नाही . आपल्या देशाची हालाकीची स्तिती जाणार नाही . जरी पैसे आले तरी ते पैसे दारूत जातील . नाहीतर आणखीन कोणत्या तरी घाणेरड्या व्यसनात जातील . किंवा आणखीन कशात तरी जाऊन सर्वनाश होईल . पण जर आत्म्याचं बळ तुमच्यात आलं तर धर्म जागृत होईल . आज तुमची सात्विकता बघून ,तुमचं प्रेम ,आनंद बघून तो उल्हास बघून मला हेच वाटलं कि हा जो नंदनवनाचा इथे अनुभव आला हा असाच कायम लोक ठेवतील कि नाही . किंवा परत त्या तामसिक स्तिती मध्ये ,परत त्या अंधारात लोक स्वतःला लोटून घेतील . आणि जो प्रकाश आम्ही तुमच्यात दिलेला आहे तो नष्ट करतील हि एक मला सारखी धुकं धुकं लागलेली असते . कारण खेडेगावात कितीही म्हंटल तरी लोकांमध्ये काहीतरी अशे लोक असतातच कि जे सगळ्यांना मागे खेचतात . एकतर ते पोटभरू लोक असतात ज्यांना पैसे पाहिजेत आणि जे देवाच्या नावावर पैसे कमावतात . त्यांना हि गोष्ट पसंत पडत नाही कि माताजी काही पैसे घेत नाहीत . कारण याना तुम्ही पैसे काय देणार ,पैसे काय देवाला समजतात का . देवाला तर माहित नाही पैसा कसा असतो ,तुम्हीच पैसा तयार केला आहे . तेव्हा तुम्ही मला पैसे देऊन तरी काय उपयोग होणार आहे . पण हे माताजी तुम्हाला पाच पैशे चालत नसतील तर दहा पैसे देऊ . काहीतरी करून पैशावर आणायचं ,पैशाचा आणि देवाचा काहीही संबंध नाही . पण ज्या वेळी तुम्हाला आत्म्याचं फळ मिळत ,ज्यावेळी तुमची कुंडलिनी जागृत होते तेव्हा नाभी चक्रावर बसलेली लक्ष्मी जागृत झाल्यामुळे तुम्हाला लाक्षिमीच फळ जरूर मिळत . तुम्ही लक्ष्मी तत्वात उतरता . पण लक्ष्मी तत्व आणि पैसा यात खूप फरक आहे . लक्ष्मी हि देवी आहे आणि ती एका कमळावर उभी आहे सुबकतेने . ती काही कुणाच्या डोक्यावर उभी रहात नाही ,कुणावर अत्याचार करत नाही कुणाला वाईट बोलत नाही कुणाशी तीच वैर नसत . एका कमळावर साधी उभी असते . इतकं तीच वागणं हळुवार आणि छान आहे . हि अशी लक्ष्मी देवी बनवलेली आहे तिचा एक हात दान देण्यासाठी आहे तर दुसरा आश्रय देण्या साठी आहे . ती एका हाताने दान करते ,जो पैसेवाला माणूस असतो ,स्वतःला लक्ष्मीपती समजतो तो दान करतो त्या हातानी दान झालं पाहिजे . ते जर दान करता आलं नाही तर तो लक्ष्मीपती नव्हे . आणि ते दान सहजच झालं पाहिजे . असं नाही कि मी याला दिल ,त्याला दिल . डोळे मिटून दिल गेलं पाहिजे . आणि मग विसरून गेलं पाहिजे कि कुणाला काय दिल ते . असा जर दाणी माणूस असला तर त्याला दानत असं म्हणायचं . नंतर त्याच्या हाताला आश्रय असला पाहिजे . लक्ष्मीपती असलातरी त्याच्याकडे आश्रय असला पाहिजे . त्याच्याकडे आश्रित असले पाहिजेत आणि ते सुखावह स्तिथीत असले पाहिजेत . त्यांना दुःख नाही झालं पाहिजे . पण सगळ्यात मुख्य म्हणजे दोन हातामध्ये कमळ आहेत ती हि गुलाबी रंगाची त्याचा अर्थ असा कि असा माणूस अत्यंत प्रेमळ असायला पाहिजे . आणि कमळासारखा स्वच्छ . जो चिखलातून निघाला तरी सुद्धा त्याचा सुगंध सगळीकडे सुरभीत होईल असा तो माणूस असायला पाहिजे आणि त्याच्या घराला  ,त्याच्या ऐश्वर्याला कमळाचीच सर अली पाहिजे . म्हणजे कमळासारखं सौन्दर्य संबंध त्याच्या घराला तिथल्या वातावरणाला आलं पाहिजे . त्या शिवाय त्या कमळामध्ये जर एक भुंगा त्याला अनेक काटे आहेत तो आला तरी सुद्धा त्याला तो स्वीकार करतो ,आपल्या मध्ये त्याला सामावून घेतो आणि अगदी आपल्या पाकळ्यांवर आरामात झोपायला सांगतो असा तो लक्ष्मीपती असायला पाहिजे . पण आपल्या कडे लक्ष्मीपती म्हंटल्यावर पहिल्यांदा अरेरावी करणारा ,दुसऱ्यांना दाबणारा ,तिसऱ्याना वरून वरून दाखवणारा नाहीतर  ,दारू पिणारा ,वाईट चालीने चालणारा ,अत्यंत वाईट मार्गाला लागलेला .खोटं बोलणारा ,पैसे खाणारा असाच आपण लक्ष्मीपती पाहिलेला आहे . तेव्हा हि लक्ष्मी आपल्यामध्ये जागृत होते तेव्हा लाक्षिमीच साम्राज्य आपल्यामध्ये येत . हि वेळ रामराज्याची आलेली आहे . जे त्या वेळेला अंगापूरला झालं ते आज दाखवायचं . जे त्या वेळी झालं ते आज पूर्ण करायचं आहे . ते संपूर्ण करण्यासाठीच आज सहजयोग उभा राहिला आहे . तेव्हा तुम्ही सर्वानी शहाणपण डोक्यात ठेऊन स्वतःच्या आत्म्याला मिळवलं पाहिजे . आणि तो मिळवल्या नंतर त्याला जपून ,सांभाळून वापरलं पाहिजे आणि त्याचा एक वृक्ष झाला पाहिजे . हा सहज आहे सह म्हणजे तुमच्या बरोबर आणि ज म्हणजे जन्मलेला . तुमच्या बरोबर जन्मलेल्या ह्या योगाचा जन्मसिद्ध अधिकार तुमच्या मध्ये आहे तो तुम्ही प्राप्त करून घ्यायचा आहे . 

हि कुंडलिनी त्रिकोणाकार अस्थी मध्ये बसलेली आहे आणि ती सहजच जागृत होते जस काही आईच्या ह्या उदारा मध्ये आपण एक बी घालतो आणि ते बी कस आपोआप अंकुरीत होत तशी हि सुद्धा एक आपोआप घटना आपल्या मध्ये घडते . आता कुणी अतिशहाणे असून काहीतरी विशेष सांगत असले तर तिकडे लक्ष द्यायचं नाही . जे घडत ते मिळवलं पाहिजे आणि ते मिळवून पुढे वाढवून घेतलं पाहिजे . बुध्दीला विवेक असला पाहजे . जर बुध्दीला विवेक नसला तर तुम्ही सात्विक मंडळी नाही . ज्या माणसाला विवेक नाही कोणत्याही गोष्टीचा तो सात्विक असू शकत नाही . मग तो तामसिक किंवा राजसिक होऊ शकतो . पण सात्विक मंडळींना विवेक असायला पाहिजे . माताजी आमच्या गावी आल्या आम्हाला देऊन गेल्या हे केव्हड महत्वाचं आहे . आत्मसाक्षात्कार काय सहज होत नसतो . पण होतोच ,झाला पाहिजे सहज . श्री रामदास स्वामींना विचारलं कि आत्मसाक्षात्काराला किती वेळ लागतो तर ते म्हणाले तत्क्षण ,त्या क्षणी झाला पाहिजे . असं त्यांनी सांगितलं आणि तस तुम्हालाही झालं पाहिजे . म्हणजे त्या वेळी शिवाजी महाराजांच्या वेळेला त्यांनी सांगितलं होत कि आत्मसाक्षात्कार तत्क्षण घडतो . पण ती तयारी असायला पाहिजे . ती जमीन असायला पाहिजे . काही तुमची तयारी असो किंवा नसो आम्ही असं ठरवलं आहे कि तुमची कुंडलिनी जागृत करून द्यायची . तुमच्या मध्ये आत्म्याचा काय तो लहानसा दिवा लावूनच द्यायचा . मग त्या दिव्याच्या उजेडात तुम्हाला जे काही दिसेल ते तुम्ही पाहायचं . कारण दिवा तो असा असाच हळू हळू वर येणार आणि त्याची ज्योत मोठी होणार . कधी असं वाटेल कि अंधार आहे पण परत तुम्ही दिवा मोठा केलात कि दिसेल आपल्यात काय चुकीचं आहे . म्हणजे तुम्हाला कुणी गुरु नको कुणी सांगायला नको ,तुमच्यात जे चुकलंय ते तुम्हालाच कळल्या मुळे तुम्ही ते व्यवस्तीत ठीक कराल . हि अशी व्यवस्था देवाने तुमच्या आत मध्ये करून ठेवलेली आहे आम्ही काही नवीन करतो असं नाही . जे तुझं आहे तुझं पाशी ते देण्या साठी आम्ही आलो आहोत . तुमच्या मधेच आत्मा तुमच्या हृदयात आहे आणि तुमच्या मध्ये च हि कुंडलिनी त्रिकोणाकार अस्थीमध्ये बसलेली आहे . सदाशिवाचं जे स्वरूप आपल्या हृदयामध्ये आत्मा स्वरूप आहे त्या सदाशिवला कुंडलिनी जागृत झाल्याबरोबरच हे हृदयातलं आपलं आत्म्याचं स्वरूप आपल्या नसानसातून वाहू लागत ,आपल्या बोटाबोटातुन ते जाणवत . सगळ्यांना हे जाणवत कि सगळी चराचरातील जी सृष्टी आहे ती परमेश्वराच्या शक्तींनी व्यापली आहे . हि शक्ती म्हणजे आद्यशंकराचार्यानी सांगितलं कि सलीलामसलीलां म्हणजे थंडथंङ असे आपल्या हातातून वाहायला लागते ती शक्ती जेव्हा आपल्याला मिळाली ती ऋतुंभरा प्रज्ञा जिने सर्व जिवंत कार्य होतात ती आपल्या हाताला लागली कि आपण आत्मसाक्षात्कारी झालो . पण तरी सुद्धा आत्मसाक्षात्कार झाल्यावर आधी नुसतं अंकुरलेलं जे काही ज्ञान आहे ते वाढवलं पाहजे . आणि त्याचे वृक्ष उभे केले पाहिजेत . 

मला फार आनंद झाला कि जे लोक अंगापूरला आहेत ते वाशीला असतात आणि वाशीला आमचं फारच सुंदर केंद्र चालू आहे . तेव्हा फक्त बचावून राहायचं ते फक्त अशा लोका  पासून जे उपरोधिक आहेत ,वरवरच्या गोष्टी करतात ,काहीतरी खुसपट काढायची ,काहीतरी खूळ काढायची कारण त्यांना साक्षात्कार झालेला नाही . तुम्ही मात्र सावध राहायला पाहिजे . सावध राहिल्या शिवाय हे कार्य होणार नाही . जो माणूस सावध राहणार नाही तो यांच्यात सुरवातीला वाहून जाऊ शकतो . म्हणूनमी आपल्याला विनंती करून सांगते कि, हे कशाला आले ,कुणी म्हणाले इकडे माताजी ह्या सगळ्या विदेशी लोकांना कशाला घेऊन आले . म्हणजे मी तुम्हाला विचारून आणायला पाहिजे का . त्याच्यात तुम्हाला काय हरकत आहे ?. पण ते कशाला आले तर त्यांचं असं म्हणणं आहे कि ह्या महाराष्ट्र हि पुण्यभूमी आहे . अंगापूरला ह्या मूर्ती सापडल्या तर अंगापूर काय आहे ते जाऊन बघावं . महाराष्ट्रातले लोक फार भक्तीवान आहेत असा त्यांचा समज झालेला आहे म्हणून तुमच्या दर्शनाला ते आले . आणि इकडे तुम्ही म्हणता इतक्या अहंकाराने कि हे कशाला आले इथे ?. हे ज्या साठी आलेत तुम्ही त्यांना दिलय पुष्कळ त्यांना एव्हडा प्रेम दिल ,उल्हास दिला ,एव्हड्या आनंदाने त्यांचं तुम्ही स्वागत केलं हे त्यांनी पाहिलं आणि त्यांना फार आनंद झालेला आहे . इथले लोक किती भक्तीवान त्यांना किती संतांची ओळख आहे ,आपल्या आईची ओळख आहे ,आजकाल कलियुगात कुणी आईला मानत नाही . हे लोक आईला इतकं मानतात हे बघून त्याना फार आनंद झालेला आहे . म्हणून हे  चौदा देशातले लोक आपल्या देशात ,तुमचं पुण्य कार्य मोठं बघायला आलेले आहेत . त्याच्या मते तुम्ही फार पुण्यवान लोक आहात . म्हणून ते तुम्हाला भेटायला आले आहेत . तुमच्याकडे कुणी असं भेटायला आले तर तुम्ही त्याला उलट म्हणायचं का असं . हि कोणची रीत झाली . हि आपल्या भारताची संस्कृती झाली का ?. कि पाहुणे आले कि त्यांना म्हणायचं कि तुम्ही कशाला आलात इथे . ह्या अशा प्रकारचे सुध्दा लोक तुम्हाला भेटतील . काहीतरी काढायचं आणि मूर्खासारखं बोलायचं . हे काही राजकारण नाही आहे . मला तुमच्याकडून काही निवडणूक जिंकायची नाही आहे . काही मत घ्यायची नाही आहेत . फक्त तुमच्या आत्म्याला जागृती दयायची आहे . आत्म्याला जागृती दिल्या बरोबरच बाकी सगळं जागृत होऊ शकत . त्याच्या आधी केलेली जागृती सर्व नष्ट पावते . हळू हळू तिचा काहीही परिणाम होत नाही आणि ती ऱ्हास पावते . कारण कारण आणि परिणाम ह्या दोन गोष्टी आहेत . कोणत्याही गोष्टी परिणामाला आल्या कि त्यांना कारण असलं पाहिजे . पण कुंडलिनी हि कारणांच्या पलीकडे असल्यामुळे ती ज्या गोष्टी घडवून आणते ते फार चमत्कार पूर्ण आहे . आश्चर्य वाटत ,अरे हे काय ,कस झालं काय झालं . तेव्हा ते बघितलं पाहिजे . 

ह्या इथे महाराष्ट्रात आपल्या अनेक रूढी पडलेल्या आहेत . त्या इतक्या घाणेरड्या रूढी आहेत कि त्या रूढींनी आपण आपल्या बायकांचे सुध्दा गळे कापतो ,आपल्या मुलांचे आपण गळे दाबतो आणि स्वतःची पण फार वाईट स्तिती करून घेतो . उदाहरण अर्थ फार लहान मुलीच लग्न करायचं नाही असा शारदा ऍक्ट केलेला असताना सुध्दा इथे आठ आठ वर्षांच्या मुलींची लग्न झालेली माहिती आहेत . आणि मग नवऱ्यानी सोडून द्यायचं ,त्यांना छळायचं . मग नवऱ्यानी सोडल्यावर बाईंनी दुसरं लग्न करायचं नाही आणि रात्रंदिवस काबाडकष्ट करायची आणि कस तरी मरायचं . किंवा लहानशा मुलीला वैधव्य आलं तर तिने विधवेसारखं राहायचं हे अशे छळ ज्या बायकांचे आपण केलेले आहेत त्याची फळ भोगायला नकोत . त्याची फळ आपल्याला भोगावी लागतात . म्हणजे “यत्र नारिया पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता “ज्या ठिकाणी स्त्रीचा मान होतो तिथेच देवता राहतात . पण स्त्री सुध्दा अशी असायला पाहिजे कि जी पूजनीय व्हावी . अशा आपल्या स्त्रिया आहेत पुष्कळ बिचाऱ्या सहन करतात . काही काही दुष्ट हि आहेत म्हणा . मी असं नाही म्हणत कि सगळ्यच चांगल्या आहेत . पण तरी त्या फार सहन करतात . आणि आपल्या रूढींनी आपण त्यांचा सर्वनाश केलेला आहे . अशा ज्या बायका आहेत टाकलेल्या वैगेरे ,ज्यांना फार त्रास आहे . अशा बायकांना ह्या लोकांनी उचलून धरलं आहे . माताजी तुम्ही घाबरू नका आम्ही यांचं आयुष्य सुधारू . तसच इथल्या पुष्कळ मुलींनी असं ठरवलं आहे कि आम्ही इकडे लग्न करून ह्या लोकांशी व्यवहार करू ,त्याचा अर्थ असा आहे कि आमचा जो सहजधर्म आहे त्याच तत्व धरलं आहे . आणि सहजयोगाचा जो धर्म आहे त्याला आपण स्वधर्म म्हणतो . जो शिवाजी महाराजांनी सांगितला कि स्वधर्म ओळखावा . नंतर ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे कि स्वधर्म सूर्य विश्व पाहो . स्वधर्माचा जो सूर्य आहे तो सर्व विश्वाला दिसायला पाहिजे . कारण सर्व धर्माचं सार म्हणजे स्वधर्म आहे . स्वधर्म म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या आत्म्याचा धर्म . त्याला काहीही पर्याय नाही तो एकाकी आहे असा तो धर्म आपण जर स्वीकारला तर जगात कोणाचीच भांडण होणार नाहीत . आमच्या सहजयोगामध्ये अनेक मुसलमान ,हिंदू ,ख्रिश्चन ,प्रत्येक जातीचे ,धर्माचे ,परदेशी लोक सर्व तऱ्हेचे लोक एकाच धर्मात सामावलेले आहेत . त्याच्या मध्ये आम्ही गणेशाला मानतो . देवीला मानतो कारण सर्व देवीचं कार्य आहे हे . जिने ह्या सृष्टीला बनवलेले आहे ती काय अनेक लोकांना अनेक तऱ्हेने पहात असेल . जी ती सगळ्यांचीच आई आहे तिला काय मुसलमान ,हिंदू असा भेदभाव दिसत असेल का ?. तुम्हीच सांगा तुमची जर आई असली आणि जर एका मुलाने हिंदू धर्म घेतला आणि दुसऱ्याने मुसलमान धर्म घेतला तर ती काय दोघांना वेगवेगळं समजेल . ?तिच्या प्रेमात हा भेदभाव दिसणार आहे का? हे सगळं बाह्यतलं आहे . जो आतला धर्म आहे तो परमेश्वरी धर्म आपल्यामध्ये आहे ,जे गुरुतत्वात आहे ते कस काय जागृत होत तेच तुम्हाला बघायचं आहे .  

हा धर्म जेव्हा माणसात जागृत होतो तेव्हा माणसाची सर्व व्यसन आपोआप सुटतात . मला कुणाला सांगायला नको कि तू हे सोड म्हणून . कारण हा धर्म आपल्यामध्ये आहे फक्त तो अजून जागृत नाही . तो जागृत झाल्याबरोबर माणूस स्वतःच  धर्मात उतरतो . कोणताही वाईट काम तो करत नाही . म्हणजे हे साधुसंत जे होते जे आत्मसाक्षात्कारी होते त्यांनी कधीही कोणताही वाईट काम केलं नाही . त्यांना सांगावं लागलं का कि तुम्ही असं करू नका ,हे खाऊ नका .ते करू नका म्हणून . ह्या अशा आपल्या ज्या भ्रामक कल्पना आहेत त्या भ्रामक कल्पनांना आपण सोडून दिल पाहिजे .जो पर्यंत  स्वधर्म आपल्यात येत नाही तो पर्यन्त हे सगळं आपल्यातून जाणार नाही . नानक साहेबानी म्हंटलेले आहे “कहे नानक बिन अपाचिन्हे मिटे न भ्रम कि जाई “. जो पर्यंत तुम्ही स्वतःचा स्वधर्म ओळखणार नाही तो पर्यंत तुम्हाला ह्या भ्रमातून सुटका होणार नाही . म्हणून स्वचा धर्म ओळखला पाहिजे . आत्मसाक्षात्कार मिळवला पाहिजे असं सर्वानी सांगितलं . पण त्या साठी भूमिका हि मागायची कि जेव्हा स्वधर्म मिळवायचा म्हणजे पहिल्यांदा हे लक्षात ठेवलं पाहिजे कि आम्ही ज्या भ्रामक कल्पना केलेल्या आहेत त्या काढल्या पाहिजेत . म्हणजे असं कि पुष्कळ लोकांना सवय आहे कि दोन पैशाचा गंडा ह्या भटांनी दिला कि तो गळ्यात बांधून फिरायचं . आम्ही ते मानत नाही . हि गोष्ट खोटी आहे . दोन पैशाचा गंडा देणारे हे पैसे बनवत आहेत ,ते पोटभरू ,ठग लोक आहेत त्यांच्या आहारी जायचं नाही . ज्यांनी तुमच्याशी ठग पणा केला त्यांच्या आहारी जायचं नाही . त्यांना सोडून टाकायचं . जे आपण आहोत ते समजलं पाहिजे . दुसरं म्हणजे असं कि आता आपण म्हणतो कि भक्ती मार्ग आहे . भक्ती मार्ग मी आधीच सांगितलं आहे एव्ह्ड्यासाठी कि देवाला आपण जर आळवत राहिलो तर आपलं लक्ष ईकडे तिकडे जात नाही . पण भक्ती मार्गाचा अर्थ असा नाही कि तुम्ही मार्गातच राहायचं त्याला ध्येय आहे ,मार्गाला ध्येय आहे ना . ज्या ज्ञानेशाच्या नावाने तुम्ही दिंड्या घालता त्यांनी सांगितलं आहे कि स्वधर्म सूर्य विश्व पाहो . साऱ्या विश्वामध्ये स्वधर्म लोकांनी ओळखावा , शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे स्वधर्म ओळखावा . पण कोणी तिकडे लक्ष घालत नाही . इतकच नाही कि त्या नि सांगितलं कि सहावा अध्याय कोणी बघायचा नाही ,सांसारिक लोकांनी सहावा अध्यय बघायचा नाही . तर कुणी बघायचा ?संन्याशांनी ?त्यांनी बघून काय होणार ?कारण संन्याशाला तर पार करू शकत नाही . संन्याशी जर आला तर त्याला आम्ही आत्मसाक्षात्कार देऊ शकत आंही . कारण हि सुद्धा आतली प्रवृत्ती आहे बाहेरची नाही . बाह्यतः काय असत सन्यास ?कस आहे राजा जनकाला सगळं राज्य होत ,मुलबाळ होती तरीही त्याला विदेही म्हणत असत आणि म्हणूनच सीतेला वैदेही असं नाव पडलं . तेव्हा सन्यास घेणं त्याच्यासाठी काही कपडे घालून फिरण्याची गरज नाही आहे . फक्त आपल्या आतमध्येच ती प्रवृत्ती यायला पाहिजे . माणूस सर्व द्रीष्टीतून मग उच्च दशेला पोहोचतो आणि तिथे तो परमेश्वराच्या साक्षीत उभा राहतो . मग देव त्याच प्रत्येक काळजी घेत असतो . ह्या अशा नवीन युगामध्ये ,नवीन स्तिति मध्ये आपण सर्वजण पदार्पण करणार आहोत . पण आम्ही अजून हि तसेच खुळ्या सारखे असलो तर येऱ्या गबाळ्याचे काम नोहे हे आधीच सांगितलेलं आहे . तेव्हा मूर्खान साठी सहजयोग नाही . किंवा जे लोक अगदी पाप्याची पितर आहेत त्यांच्या साठी सुध्दा सहजयोग नाही . मुख्य म्हणजे असं लक्षात घेतलं पाहिजे कि सहजयोगात आले म्हणजे तुम्ही सबल होणार . तुमच्या चेहऱ्या वरती तेजस्विता अली पाहिजे . तुमच्या मध्ये एकदम शक्ती संचारली पाहिजे . आणि संचार म्हणजे भूत येन नाही , जस एखाद्या बाईच्या अंगात भूत आलं म्हणजे आपण म्हणतो देवीचा संचार झाला . हे दुसरं खूळ आहे . देवीचा संचार व्हायला देवीला काही अक्कल आहे कि नाही . बाईच्या अंगात यायला ,कोणाचीही मोलकरीण असली तर पहिल्यांदा तिच्या अंगात देवी येणार . आणि मग लागले सगळे तिच्या पायावर यायला . हे किती चुकीचं आहे . कारण आपल्या लक्षात यायला पाहिजे कि देवी आहे ती ,या देवी मुळे फक्त कुंडलिनीच जागरण होत . जर ती देवी असती तर कुंडलिनीच जागरण झालं असत आणि आत्मसाक्षात्कार मिळवला असता . तर अशा रीतीने आपण अनेक मार्गाने चुका केलेल्या आहेत त्या दुरुस्त करून आता जो सरळ मार्ग आहे जयनी आपलं कल्याण होणार आहे ,ज्यांनी आपला आत्मोध्दार होणार आहे ,जे शास्त्रात सांगितलेलं आहे ती मिळवण्याची संधी आलेली आहे . आणि त्या साठी ह्या पुण्यवान स्थळी जिला अंगापूर म्हणतात तिथे श्री रामदास स्वामींनी आपले चरण ठेवलेले आहेत ,जे साक्षात हनुमानाचे अवतरण होते त्यांच्या ठिकाणी आलो आहोत त्या बद्दल मला फारच आनंद वाटला आहे . 

त्यात दुसरी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे जातीयवाद, भयंकर जातीयवाद आपल्या देशात माजलेला आहे . आणि त्यामुळे बेबंदशाही माजलेली आहे . अनादीकाळामध्ये पुष्कळ वर्षांपूर्वी चौदा हजार वर्षांपूर्वी मार्कंडेयांनी लिहून ठेवलं आहे कि “या देवी सर्व भुतेषु जाती रूपेण संस्थिता “,त्यांनी जातीचं वर्णन हे केलं होत कि ,जी देवी आहे ती जात बनवते . म्हणजे तुमची जी देवी तुमची जी कुलस्वामिनी आहे ती तुमची जात . तुमची कोणच्या कुलस्वामिनीचे आहात . तुम्ही जर महालक्ष्मीचे आहात तर तुम्ही सात्विक आहात ,तुम्ही महाकालीचे आहात तर तुम्ही तामसिक आहात ,जर तुम्ही महासरस्वतीचे आहात तर तुम्ही राजसिक आहात . पण शेवटी सगळं जे येत ते शरणागत होऊन त्या महालक्ष्मीच्या सुषुम्ना नाडीच्या चरणाशी उदे उदे ग आंबे उदे येत . म्हणजे खरी शुद्ध इच्छा आहे जी तामसिक इच्छा आहे हि खरोखर इच्छाशक्ती आहे असं म्हणू कि आता ती झोपलेली आहे ,ती अशी जागृत झाल्याबरोबर जे आपल्याला मिळत ती खरी आपली दशा आहे तेव्हा या तिन्ही स्तिती जरी असल्या तरी त्या आवश्यक आहेत . जेव्हा या स्तितीतूनच कुंडलिनी आपली वर उठते तेव्हा आपण संतुलनात असतो त्या वेळी हे घडत . तेव्हा हा विषय अत्यंत कठीण आणि जटिल जरी वाटत असला तरी काम अगदी सोपं आहे . जर तुम्हाला सांगायचं कि हि वीज कशी अली तर तुम्हाला डोकेदुखी होईल पण सांगायचं कि हे बटन आहे इथे हे दाबलं कि वीज इथे येते . हे तुम्हाला माहित आहे . तेव्हा ह्या विषयाच्या आतमध्ये गहनात जाण्यासाठी आता तुम्ही वेळ न  घालवता  आपला आपला दिवा पेटवून घ्यावा .आणि त्याचा नंतर हि घटना काय आहे काय नाही हे समजून घ्यायचं असेल तर समजून घ्या . पण तुम्ही आनंदाच्या सागरात इतके पोहायला लागता कि आता काही समजायला नको माताजी असं होऊन जात . अशी हि अत्यंत सुंदर किमया परमेश्वराची आहे . आणि आपल्या मध्ये हे सगळं  सुंदर बनवून ठेवलेलं आहे आणि आज आपल्याला ते होण्याची पूर्णपणे पात्रता आहे . आपण ते अगदी मिळवू शकतो . आजच्या या सुंदर वातावरणामध्ये हे घटीत व्हावं ,तुम्हाला सगळ्यांना मिळावं हीच माझी इच्छा आहे मला दुसरं काहीही नको . फक्त हे देण्यासाठी तुमचं माझ्याजवळ काहीही नाही आहे जे तुमच्या जवळ ठेवलेले आहे तेच तुम्हाला द्यायचं आहे . तुमच्याच किल्ल्या तुमच्या हातात द्यायच्या आहेत . तेव्हा ते कृपा करून स्वीकारावं ,आई अली आहे आपल्या दारात , ती प्रेमाने  सांगते आहे तेव्हा ते ऐकून घ्यावं . उगीचच स्वतःच्या डोक्याने काहीतरी गोष्टी काढून ,खुसपट काढून आपला नाश  आणि दुसऱ्यांच्या नाश करू नये . अशाने नुकसान तुमचंच होणार . दुसऱ्यांना काही सांगून रूमही आज जरी फितावलं तरी उद्या तोच माणूस तुम्हाला उलटून म्हणेल कि तू माझं हिट काही केलं नाही ,माझं तू अकल्याण केलं आहेस . म्हणू अशा लोकांच्या कडे आपली द्रीष्टी ठेऊ नये . तर आपली द्रीष्टी उन्नत असावी तिकडे लक्ष असावं कि आपण आता कुठे कोणत्या स्तिथीत जाऊ शकतो . हा विषय इतका मोठा असल्या मुले एव्हड्या लहान वेळात मी सगळं काही सांगू शकत नाही . पण तरी सुध्दा आमच्या कडे पुस्तक आहेत ,आश्चर्याची गोष्ट अशी कि माझ्या फोटोला सुध्दा चैतन्यलहरी येतात . त्याच्या मुळे त्याचा हि तुम्ही उपयोग करू शकता . पण तरी सुध्दा फोटो कसा वापरायचा ,त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे केंद्रावर आल्यावर च कळेल . मला फार आनंद वाटला कि तुमच्या कडे इतके सुंदर केंद्र आहे आणि इथे चांगले लोक आहेत तुम्हाला या बद्दल सांगतील आणि तुमची काळजी घेतील . तरी तुम्ही सगळ्यांनी केंद्रावर यायचं आणि सगळं शिकून घ्यायचं . अंगापूरला रामदास स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळ्यांना सहजयोग देऊन सगळे योगिजन व्हावेत ,संतजन व्हावेत आणि चंदना सारखे तुम्ही पण सगळे व्हावेत आणि सर्व जगाने तुमच्याकडे मोहित होऊन बघावे हीच माझी एक सदिच्छा आहे . 

श्री गणेशाचं नाव घेऊन ह्या पुण्यभूमीला नमस्कार करून उजवा हात ह्या भूमीवर ठेवायचा . नंतर डावाहात माझ्याकडे करा . आता हि डावी बाजू हि इच्छाशक्ती आहे ,म्हणजे तुम्ही माझ्याकडे हि इच्छा करत आहात कि तुम्हाला आत्मसाक्षात्कार पाहिजे आहे . ह्या इच्छा शक्तीला जेव्हा चैतन्य मिळेल तेव्हा ती जाऊन जे काय तुमच्या इच्छेमध्ये चुकीचं असेल ते सगळं घेऊन ह्या पृथ्वी तत्वात जाईल . पण त्या मध्ये विचार करायचा नाही स्वतःला दोष लावून घ्यायचा नाही . मी फार वाईट आहे ,पापी आहे असा स्वतःला दोष लावून घ्यायचा नाही . उलट तुम्ही परमेश्वराचे मंदिर आहात आणि त्यात मला दिवा लावायचा आहे हे समजून आपल्या बद्दल अभिमान बाळगून बसायचं आहे . आता टोपी काढून घ्या कारण ब्रम्हरंध्र हे इथे आहे . ते सुद्धा छेदाव लागत . गळ्यात जर गंडेदोरे असतील तर काढून टाका . दुसऱ्या वेळेला मी सांगेन कि उजवा हात माझ्याकडे करायचा आणि डावाहात असा उलट आकाशाकडे करायचा . उजवी बाजू म्हणजे आपली क्रियाशक्ती आहे ,आणि सूर्य कडून आपल्याला क्रियाशक्ती मिळते . म्हणून असा डावाहात आकाशाकडे करायचा . डोळे सगळ्यांनी बंद ठेवा . सहज बसा . डावा हात माझ्याकडे . मला आत्मसाक्षात्कार द्या हि इच्छा करायचं . आता बघा डावा  हात तुन गारगार येतंय का बघा . वाटतंय ना गार . आता उजवा हात माझ्याकडे करायचा आणि डावाहात आकाशाकडे करायचा . मागच्या बाजूला तळहात गेला पाहिजे . हि क्रियाशक्ती आहे . येतंय का बघा उजव्या हातातून थंड थंड . आता दोन्ही हात समोर मांडीवर घ्या . आता डोळे हळू हळू उघडा . आता डोक्यातून ,टाळूतून थंडथंङ येतंय का बघा . आता दोन्ही हात वर आकाशाकडे करून विचारायचं कि हीच परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का ?. आता निर्विचार समाधी साधली आहे ,याच्या पुढे आता निर्विकल्प समाधी साधायची . ते साधण्या साठी फारतर महिनाभर तुम्ही सेंटर वर आला तर निर्विकल्पता येते . आता यांच्यात विकल्प करायचे नाहीत . हे सगळं विचारांच्या पलीकडे असल्यामुळे याच्या बद्दल काहीही विचार ,वाद होऊ शकत नाही . हे लक्षात ठेवलं पाहिजे . फक आता हे काय आहे हे जर तुम्ही समजून घेऊ शकलात तर तुम्ही सर्व महान गुरु होऊ शकता . याला लहान थोर ,जातपात ,श्रीमंत गरीब काहीहि लागत नाही . तुम्ही मानव आहेत हेच फार मोठं आहे . तेव्हा हे जे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे त्याला तुम्ही स्वीकारावं हे पसायदान दिलेले आहे ते घ्यावं आणि त्यावरती आपल्याला पुढे करायचं ते बघितलं पाहजे . याला पैसे लागत नाहीत काहींनाही .फक एक चित्तात  धरायचं  कधीही कोणतं व्यसन असलं आणि त्याची आठवण झाली कि माझी आठवण करा ,माझी आठवण केल्या बरोबर ते व्यसन सुटेल . थोडीशी हिम्मत पाहिजे सगळ्या तऱ्हेची व्यसन सुटून जातील . आणि व्यसन सुटल्या बरोबर इथे साम्राज्य येईल परमेश्वरच आणि लक्ष्मी इथे नांदेल . परमेश्वर तुम्हा सगळ्यांना सुखी ठेवो . दर्शनाला आधी सगळी लहान मुल येतील नंतर बाकी सगळी . लहान मुलांना त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही ,नाहीतर मी इथून निघून जाईन . सगळ्यांनी शांतपणाने या .