Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Mahalakshmi Puja 3rd February 1985 Date : Warnali Place Type Puja आता मराठीत काय सांगायचे, की ह्या इतक्या सुरम्य स्थानी तुम्ही आलात आणि इथे जगताप साहेबांनी आपली इतकी सुंदर व्यवस्था केली आहे. त्यांना कितीही धन्यवाद दिले तरी पूरे पडणार नाहीत. इतकं प्रेमाने सगळ्यांना दिले आणि केले. त्याबद्दल हे सगळे सहजयोगी इतके आश्चर्यचकित झाले, की आपल्या देशात असा असेल तर किती होऊ शकेल! एवढे प्रेमाने वागून, सगळ्यांची प्रेमाने व्यवस्था करणे हे फार जर एकतरी मनुष्य मोठे काम आहे. हे ह्यांनी साधलेले आहे. त्याची ह्यांना कमाल वाटते. तसेच तुम्ही लोकांनी इतकी मेहनत केली, सगळ्यांनी ब्रह्मपुरीलाही येऊन इतकी सुंदर व्यवस्था केली. जंगलामध्ये. नंतर इथेही सगळ्यांची इतकी व्यवस्था केली. खूप मेहनत घेतलीत. आम्ही तुम्हाला काय देणार? काय विशेष देणार आहोत ? इतके तुम्ही रात्रंदिवस आटोकाट प्रयत्न करता. इथे एक पाटील साहेब आहेत. ते सहजयोगी नव्हते, पण त्यांनी एवढी मदत केली आहे. ह्या लोकांची तुम्ही केवढी सेवा केलेली आहे. त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. फार ऋणी आहे. अनेकदा सांगितलं तुम्ही, की माताजी, तुम्ही ह्याचा उल्लेख करावा. आम्हाला ह्यांच्याबद्दल फार आदर वाटतो. आम्हाला वाटते फार मोठे ह्या लोकांनी केलेले आहे. किती त्यागी लोकं आहेत ! आम्ही इतके करू शकत नाही. तेव्हा आज आपला शेवटचा दिवसच म्हटला पाहिजे टूरचा. कारण ही मंडळी निघालेली आहेत ह्या सर्वांच्या वतीने मी आपले फार फार आभार मानते. सगळ्यांचेच. एकएकाचे नाव सांगण्यासारखे नाही. पण मोदी साहेबांचे तुम्ही विशेषकरून आभार मानले पाहिजेत.