Shri Adi Bhoomi Devi Puja Pune (India)

Marathi Transcription – Bhoomi Devi Puja Date 4th February 1985: Place Pune – Type Puja (Starts at 12:48) इतकी सगळी व्यवस्था तुम्ही सर्व सहजयोग्यांनी मिळून केली, ते बघून असं वाटतं, की पुण्याला राहण्याचं जे आम्ही निश्चित केलं होतं, त्याला काहीतरी विशेष प्रेमाचं कारण असायला पाहिजे. तशी अनेक कारणं आहेत पण मुख्य मला असं वाटतं तुम्हा लोकांच्या प्रेमाच्या ओढीनेच या पुण्यनगरीत वास्तव्य करण्याचे आम्ही ठरविलेले आहे. एकंदरीत इथे जागा मिळणे, त्यात कार्य होणे वगैरे म्हणजे एक विशेषच घटना आहे. पण मुख्य म्हणजे पुण्याला अत्यंत पुण्याईचा साचा आहे, साठा आहे त्याचा. आणि साचा पण आहे. इथे मनुष्य पुण्याईत घडविली जाऊ शकतात. पण अनेक इथे उपद्रव झालेले आहेत आणि ते उपद्रव होणारच. कारण जेव्हा माणसं पुण्याईत घडविली जातात, तेव्हा त्यांच्यावरती आघात करायलासुद्धा, असुरी विद्या ही सगळीकडे कार्यान्वित असते. विशेषकरून अशा ठिकाणी, जिथे काहीतरी पुण्य घडविलं जातं. तेव्हा आपण आणखीन सचोटीने, आणखीन सतर्कतेने काळजीपूर्वक सहजयोग साधला पाहिजे. आणि पुणे हे महाराष्ट्राचं ब्रीद आहे. इतकंच नव्हे की पुण्य आहे, पण हे ब्रीद आहे. आणि ह्या ब्रीदामध्ये जर का चैतन्य फुंकल गेलं, तर आपल्या सबंध महाराष्ट्रात त्याचा परिणाम आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्हा सर्वांची ह्यामध्ये मला मदत पाहिजे.       सर्वप्रथम हे लक्षात ठेवलं पाहिजे, की घर बांधणं वगैरे हे काही विशेष महत्त्वाचं नाहीये आणि ते सोपं काम आहे. पण ह्या घराबरोबरच, जर पुण्यातले सहजयोगीसुद्धा बांधले गेले आणि त्यांना सुंदर स्वरूप आलं, तर मला फार आनंद होईल. ही एक फार मोठी गोष्ट आहे, की आज इथे आपण भूमीपूजनाला आलो, सगळे एवढे संत- साधू आले आहेत. भूमीपूजन करीत आहेत आणि ह्या भूमीपूजनाचा लाभ अनंत काळापर्यंत लोकांना मिळणार आहे. तेव्हा Read More …