Puja Nashik (India)

Saptashrungi Puja Date 17th December 1985: Place Nasik Type Puja आता मी इंग्लिशमध्ये जरी बोलले असले तरी आपल्याला सगळे कळलं असेल. पण तरी सांगायचं म्हणजे असं की आपला सहजयोग आहे आणि सहज असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की, ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.’ तर सहज हा जो योग घडतो, तो फक्त कुंडलिनीची जागृती आणि तुमच सहस्रार भेदन, इथपर्यंत आमचं तुमचं देणं-घेणं आहे. आता पृथ्वी आहे आणि पृथ्वीमध्ये तुम्ही जर एखाद बी घातलंत, तर तिचं देणं-घेणं एवढच आहे की, ‘बाबा, तुझ्यामध्ये मी अंकूर फोडते.’ पण त्यानंतर बघायला नको. तेव्हा जरी हे अगदी सहज असलं, तरी आता आम्ही संत झालो, हे समजण फार कठीण आहे. आता आम्ही बी घडलो. हे समजणं फारच कठीण गोष्ट आहे. अजून आम्ही तेच आहोत, असं सारखं आपल्याला वाटत असतं किंवा तस नाही वाटलं, तरी आपली वागणूक तशीच असते. तर ती बदलायला पाहिजे आणि समजलं पाहिजे, की आता आम्ही संत झालोत . संतांची किती लक्षणं सांगितलेली आहेत रामदास स्वामींनी! प्रत्येकाने सांगितलेली आहे. त्या संतांमधली आपल्यामध्ये कोणती लक्षणं आहेत ती पाहिली पाहिजे. तिकडे लक्ष दिलं पाहिजे. ती लक्षणं आपल्यामध्ये दृष्टीगोचर का होत नाही? लोक आपल्यामध्ये ते शोधत का नाहीत ? ते आपल्यात त्यांना दिसत का नाही ? त्याला कारण काय हे पाहिलं पाहिजे. तर सर्वप्रथम आपण असा विचार केला पाहिजे, कि परमेश्वराने आपल्याला अंकुरलं आहे. बरं, झालं. आता पुढे काय? आम्ही काय केलं त्या परमेश्वरासाठी ? आम्हाला सहजयोगामध्ये हे माहिती आहे, की प्रत्येकाला आशीर्वादित करतो परमेश्वर. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ योग मिळाला तुम्हाला, क्षेम घ्याच. ते त्याच्याच बरोबर येतं समजा. बिल्ट इन. त्याला काही करायला नको. क्षेम घ्या. पण क्षेमाबरोबर एक Read More …

Public Program Nashik (India)

परमेश्वराला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो . ह्या सर्व सृष्टी मध्ये पृथ्वी हि विशेष मानली जाते आणि त्या पृथ्वीवर विशेष म्हणजे भारत भूमी आहे . तिला योग भूमी असं म्हंटल आहे . त्या योग भूमी मध्ये तपोभूमी जी आहे ती नाशकाच्या आसपास आहे . अशा पवित्र भूमीत तुम्ही आला आहात . आणि इथे माझं कार्य फार होईल अशी मला अपेक्षा आहे . पुष्कळ दिवसापासून अनेकदा इथे आल्यावर सुध्दा माझ्या दृष्टीत असं आलंय कि इथले लोक इतकी मोठी संपदा असून सुध्दा ,एव्हडी मोठी तपोभूमी त्यांच्या पायाखाली असून सुध्दा ,इतक्या साधुसंतांनी आणि ऋषीमुनींनी इथे त्याग आणि तप केलेलं असून सुध्दा ह्या क्षेत्र भूमी मध्ये लोकांचं लक्ष परमेश्वराकडे कमी आहे . त्याला कारण शोधता असं कळलं कि प्रत्येक क्षेत्र ठिकाणी ,महाराष्ट्रात किंवा कोणत्याही ठिकाणी इतकच नव्हे तर तुम्ही जर रोमला गेलात किंवा इतर क्षेत्र स्थळी गेलात जिथे ख्रिश्चन धर्म आहे ,मुसलमानांचा धर्म आहे किंवा जैन धर्म आहे कोणाचाही धर्म असो त्या क्षेत्र स्थळी परमेश्वर उठलेला दिसतो . त्याला कारण काय तर तिथे लोक बसून देवाच्या नावावर पैसे कमावतात . आम्हाला देव सगळा माहित आहे . बाकी कुणाला देव समजत नाही . अशा रीतीने जे भाविक अत्यंत सोज्वळ लोक आहेत त्यांची दिशाभूल करतात आणि त्यांना अशा मार्गाला घालतात कि ते अभिभूत होऊन अशा कर्माला पडतात कि ज्याला आपण म्हणतो कि हे लोक बाधित झाले . ह्यांचे धंदे अशे असल्या मुळे प्रत्येक क्षेत्रस्थळी हा प्रकार झालेला आहे . पण जी मंडळी अत्यंत साध्या  प्रवृत्तीची आहेत आणि भाविक आहेत ज्यांनी अनेक जन्म परमेश्वरासाठी टाहो फोडलेला आहे त्यांना आज हि अशी संधी आहे कि त्यांनी आत्म्याचं आपलं दर्शन घ्यावं . त्याला कारण असं कि Read More …