Public Program

Nashik (India)

1985-12-17 Public Program, Marathi, Nashik, India, DP, 182' Chapters: Arrival, Yogi introduction, Talk
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: View on Youku: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share

परमेश्वराला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो . ह्या सर्व सृष्टी मध्ये पृथ्वी हि विशेष मानली जाते आणि त्या पृथ्वीवर विशेष म्हणजे भारत भूमी आहे . तिला योग भूमी असं म्हंटल आहे . त्या योग भूमी मध्ये तपोभूमी जी आहे ती नाशकाच्या आसपास आहे . अशा पवित्र भूमीत तुम्ही आला आहात . आणि इथे माझं कार्य फार होईल अशी मला अपेक्षा आहे . पुष्कळ दिवसापासून अनेकदा इथे आल्यावर सुध्दा माझ्या दृष्टीत असं आलंय कि इथले लोक इतकी मोठी संपदा असून सुध्दा ,एव्हडी मोठी तपोभूमी त्यांच्या पायाखाली असून सुध्दा ,इतक्या साधुसंतांनी आणि ऋषीमुनींनी इथे त्याग आणि तप केलेलं असून सुध्दा ह्या क्षेत्र भूमी मध्ये लोकांचं लक्ष परमेश्वराकडे कमी आहे . त्याला कारण शोधता असं कळलं कि प्रत्येक क्षेत्र ठिकाणी ,महाराष्ट्रात किंवा कोणत्याही ठिकाणी इतकच नव्हे तर तुम्ही जर रोमला गेलात किंवा इतर क्षेत्र स्थळी गेलात जिथे ख्रिश्चन धर्म आहे ,मुसलमानांचा धर्म आहे किंवा जैन धर्म आहे कोणाचाही धर्म असो त्या क्षेत्र स्थळी परमेश्वर उठलेला दिसतो . त्याला कारण काय तर तिथे लोक बसून देवाच्या नावावर पैसे कमावतात . आम्हाला देव सगळा माहित आहे . बाकी कुणाला देव समजत नाही . अशा रीतीने जे भाविक अत्यंत सोज्वळ लोक आहेत त्यांची दिशाभूल करतात आणि त्यांना अशा मार्गाला घालतात कि ते अभिभूत होऊन अशा कर्माला पडतात कि ज्याला आपण म्हणतो कि हे लोक बाधित झाले . ह्यांचे धंदे अशे असल्या मुळे प्रत्येक क्षेत्रस्थळी हा प्रकार झालेला आहे . पण जी मंडळी अत्यंत साध्या  प्रवृत्तीची आहेत आणि भाविक आहेत ज्यांनी अनेक जन्म परमेश्वरासाठी टाहो फोडलेला आहे त्यांना आज हि अशी संधी आहे कि त्यांनी आत्म्याचं आपलं दर्शन घ्यावं . त्याला कारण असं कि पूर्वीच्या काळी एकदोनच फुल जशी झाडाला यायची पण आज अनेक फुल झाडाला आलेली आहेत . आणि त्यांना फळ येण्याची विशेष संधी देवाने केलेली आहे . असा हा आजचा वर्तमान काळ फार महत्वाचा आहे . आणि त्या वर्तमान काळात तुमचा जन्म झालेला आहे . अशा तपोभूमीत तुमचा जन्म झालेला आहे . अशा वर्तमान काळात तुमचा जन्म झाल्यामुळे तुम्ही एक विशेष आशीर्वादित लोक आहात . आणि त्या आशिर्वादाला जर तुम्ही मुकलात तर हि संधी परत येणार नाही . असं जरी कितीही समजावून सांगितलं तरी लोकांच्या डोक्यात ते का घुसत नाही ते आता आपल्याला डॉक्टर साहेबानी सांगितलं . त्याला कारण असं आहे कि जिथे लोकं ना पैसे देता येत नाही तिथे ते समजतात कि हि गोष्ट कुचकामाची आहे . पण आता लक्षात हे घेतलं पाहिजे कि ज्ञानेश्वरांना तुम्ही किती पैसे दिलेत ?

आता त्यांच्या नावाने दिंड्या घालत फिरता . पालख्या काढता . त्यांना मात्र पायात वहाणा पण नव्हत्या घालायला . देव कृपेने आमचा जन्मच मोठ्या राजघराण्यात झाला ,आणि सासर हि फार मोठं आहे त्याच्या मुळे आम्हाला एव्हडा काही चपलांचा त्रास नाही . थोडं बहुत आहे आपलं . पण जर तशी स्तिती असती तर माझी स्तिती तुम्ही तशी करून टाकली असती का ?कारण देव मिळवायचा आहे हे जरी लक्षात असलं तरी सुध्दा तो मिळवताना आपण त्याची पैसे देऊ शकत नाही . पैसे देऊन कोणती वस्तू मिळवणं हे काय विशेष झालं . देव काय तुमचा गुलाम नाही ज्याला तुम्ही विकत घेऊ शकता . देवाच्या नावावर इथे त्यांनी दुकान मांडून ठेवली आहेत . अशी अनेक दुकान प्रत्येक क्षेत्रस्थळी आहेत . आणि आपल्याला असे बाबाजी ढाबाजी लोक फार आवडतात . कारण दोन पैसे दिले म्हणजे चांगलं . त्यांनी आपलं सर्टिफिकेट दिल म्हणजे झालं ,ते घेऊन आपण जाणार आहोत . हातात रशीद घ्या . किंवा आम्ही ह्या देवळात येऊन पाच पाच रुपये चढवले आम्हाला याची पावती द्या ,मरताना मात्र असं करा प्रेत जेव्हा जाळलं जाईल तेव्हा ह्या पावत्या पण जाळा . म्हणजे देवाला कळेल आम्ही पाच पाच रुपये दिलेत ते . असं वेडेपणाच जे वागणं आहे त्यांनी देव कसा मिळवता येईल . आता आपल्या विशेष करून ह्या महाराष्ट्रात गोरा कुंभार होते ,आपले तुकाराम बुवा यांच्यात काय विशेष होत ?काय त्यांचं कुणबी होते जातीचे ,शेतकरी म्हणा .नंतर सजन हा कसाई होता ,नामदेव हे एक शिंपी होते . सर्वसाधारण लोक होते सगळे . हे काय भटजी बुवा नव्हते देवळात बसणारे . त्या सगळ्यांना त्रास दिला भरपूर लोकांनी . ज्ञानेश जरी ब्राम्हणाच्या घरी जन्माला आले तरी त्यांनाही सडकून त्रास दिला . साईनाथ इथे येऊन राहिले त्यांनाही सडकून त्रास दिला . जो कोणी खरा माणूस असेल त्याच्या मागे हात धुऊन लागायचं हे ह्या पोटभरू लोकांचं काम असणारच दुसरं काय करणार त्यांच्या पोटावर पाय येतो त्यांचा धंदा बुडेल तर ते तस करणारच . पण तरी सुध्दा जे सुज्ञ आहेत त्यांनी आपली बुध्दी वापरली पाहिजे . उलट मला तर असं वाटत कि एक शेतीवर काम करणारा माणूस किंवा जो जमिनीशी निगडित आहे त्याला जास्त सुज्ञ पणा असतो . आणि त्याला हे समजत कि जे जिवंत कार्य आहे देवाचं त्याला आपण पैसे देत नाही . जर आपल्याला बी पेरायच असल तर आपण काय ह्या मातीला पैसे देतो का ?हिला समजतात का पैसे म्हणजे काय ते ?तिला समजत एव्हडं कि याने बी पेरल आहे आता याला अंकुरले पाहिजे . हे तीच देणंघेणं तिला समजत . तिला पैसे काही समजत नाही ,बाकीचं थोतांड काही समजत नाही . पण आपली दृष्टी ह्या थोतांडाकडे जास्त जाते आणि ह्या कलियुगामध्ये तर जास्तच झालेलं आहे . पूर्वी तर दोनचार लोकांनीच असा छळ केला असेल पण आजकाल मला असं वाटत कि लोक बहुतेक स्वतःच्याच मागे लागले आहेत . आता त्यात दोन वर्ग आहेत एकतर अशे कि त्यात भाविक आहेत ,मनानी शुद्ध आहेत देवाला स्मरतात . देवासाठी टाहो केलेला आहे . विठ्ठल विठ्ठल म्हणत पायपीट करत जातात बिचारे . आणि तिकडे जाऊन ते बडवे त्यांचं डोकं फोडतात . हि एक अत्यंत दयनीय स्तिती आहे . 

म्हणजे जे लोक देवाला आळवून राहिले त्यांचं असं व्हावं हे कस मला वाटत असेल हे तुम्ही सांगा . तुम्हाला सगळ्यांना आया आहेत आणि हि सगळी माझीच मुल आहेत . आणि ह्या मुलांना एव्हडा त्रास व्हावा परमेश्वर मिळवताना हे काही सहन होत नाही मला . दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे स्वतःला फार विद्वान समजतात ते . म्हणजे संबंध गीता कोळून प्यायची ,बसा तुम्हाला आम्ही गीता ऐकवतो . पाच रुपये द्या मग तुम्हाला आम्ही गीता ऐकवतो . त्या श्रीकृष्णांनी किती पैसे घेतले गीता सांगायला . तुम्ही कसले पैसे घेता . आम्ही म्हणजे अधिकारी ,फार विशेष . आम्ही गीता सांगतो त्याचे तुम्ही पैसे मोजा . आणि आपल्याला ते पटत सुध्दा हे गीता सांगतात ना यांना पैसे द्या . अमके बाबा आले ,तमके बाबा आले कुणी ढोरे बाबा आले चालले त्यांच्या मागे . मी कितीदा सांगितलं कि तुम्ही यांच्याकडे कशाला जाता . म्हणे कि आम्हाला पैशाची फार टंचाई आहे म्हणून जातो . अहो अशा माणसाकडे तुम्ही जाल तर पैशाची टंचाई होणारच . पण त्या शिवाय तुम्हाला काहीतरी अपाय होणार आहे . तुमच्या तब्बेती खराब होणार . काय काय  रोग तुम्हाला होऊ शकतात यांनी हे तुम्हाला माहित नाही . अजाणता अशा लोकांकडे जाऊन जे लोक फसलेले आहेत त्यांना आज मी कितीतरी लोकांना मी ठीक केलं आहे . आता इथे जे लोक बसलेले आहेत त्यातले काहीकाही असेच उपटसुम्भा गेले होते परदेशात . आता पुष्कळ उघडकीला  त्यांनी हजारो रुपये त्यांना दिले ,रस्त्यावर पडले ते ,त्यांना नुसते त्यांनी मेस्मराइज करून ठेवलं होत . त्यांना मंत्र मुग्ध म्हणतात तस करून टाकलं होत . आणि त्यांच्या कडून सगळे  पैसे घेतले . आणि त्याच्या नंतर हि मंडळी माझ्याकडे आली त्यांना रोग झालेले ,कँसर चा रोग हा रोग ,तो रोग . आणि म्हणे आमचे गुरु असं म्हणतात  कि तुम्ही जी पूर्वीची जी पापकर्म केलेली आहेत ती भोगा . मग म्हंटल तो कशाला ठेवला आहे गुरु ,त्याच काय लोणचं घालायचं आहे . मी एक आई आहे . मग म्हंटल तुमचा गुरु आहे तर तुम्ही असे आजारी का ?तुम्हाला हे त्रास का?

श्री कृष्णांनी सांगितलं आहे कि “योगक्षेम वाहामयं “,जर योग घटीत झाला तर क्षेम झालं पाहिजे . तुमचं काही क्षेम झालं का ?जर झालं नाही तर हा म्हणजे काही योगाचा मार्ग नव्हे . योगा शिवाय परमेश्वर मिळूच शकत नाही . योग म्हणजे काय तर जीवाचा शिवाशी संबंध होणे . तो झालाच पाहिजे असं सगळ्या शास्त्रात सांगितल्यावर हे इकडचं तिकडचं करून काही काम होणार आहे का . समजा तुम्हाला दिल्लीला जायचं आहे आणि तुम्ही म्हणाल  बर ठीक आहे मी याला दोन पैसे देतो चार पैसे देतो तर असं करून दिल्लीला जाल का तुम्ही ?जायला पाहिजे . केल्याने होत आहे रे ,केलं पाहिजे . रामदास स्वामींनी अशा लोकांना इतक्या शिव्या घातल्या आहेत , मराठी भाषेत शिव्या नाहीत म्हणा . पण जे काही त्यांना दिसलं ते त्यांनी म्हंटल आहे .इतकं कडक शब्द वापरले आहेत त्यांनी . आणि तस पाहिजेच होत आता मला काही तेव्हड जमत नाही . पण त्यांनी चांगलच काढलेलं आहे सगळ्यांचं . त्याच्या नंतर ज्ञानेशांनी एव्हडं सहन केलं आपल्या समोर सगळं साक्षात आहे ते ,तुकारामांनी सांगितलं बर झालं मी महार झालो . कारण असली पाप करण्यापेक्षा महार झालेलं बर . हे सगळं बघून आपल्या मध्ये एव्हडी संतसाधु ची वाणी असताना आपण त्यांची गाणी म्हणतो ,भजन म्हणतो तरी ह्या लोकांना भूल घालणारे हे जे दुसऱ्या वर्गातले लोक आहेत म्हणजे थोडस संस्कृत शिकलेले सागायलागले गीता झाली . कोणच्या शास्त्रात लिहीलं आहे कि कुंडलिनी आहे ,असं का म्हंटल . तुम्ही म्हंटल ज्ञानेश्वरी वाचली का ?हो पण तो अध्याय आम्हाला वाचायचा नाही . म्हंटल कुणी सांगितलं वाचायचा नाही . कुणी भटजींनी सांगितलं वाचायचा नाही . कारण त्या भटजीला समजत नाही ते म्हणून त्यांनी सांगितलं कि तो वाचू नका . बाकी वाचा आणि मला पैसे द्या . सगळं म्हणजे पैशाचा खेळ आहे . पण सांगायचं असं कि परमेश्वर मिळवताना फक्त हृदय पाहिजे . अहो अनेक उधाहरण असताना सुध्दा आपण हे विसरतो कि हे श्री रामाचं स्थान आहे . 

श्रीराम इथे राहिले आहेत . त्यांच्या आयुष्याकडे बघितलं तरी लक्षात येईल तुम्हाला कि पैशाचा कुठे खेळखंडोबा झालेला दिसतो का तुम्हाला . श्रीकृष्णाने म्हंटल का कि तुम्ही याचे पैसे घ्या म्हणून . जर आपण हिंदू धर्माला मानता तर हिंदू धर्मात तर कुणीच म्हंटलेले नाही कि याचे पैसे घ्या त्याचे पैसे घ्या म्हणून . मग कोणच्या आधारावर तुम्ही लोकां न कडून असे पैसे लुबाडता . म्हणजे याला एका शब्दात सांगायचं तर रामदास स्वामींनी याना भामटे हा शब्द वापरला आहे . हे भामटे लोक आहेत ,माणुसकीतून उठलेले लोक आहेत . अशा रीतीने वागणारे लोक . आणि आपण त्यालाच गुरु मानून त्यांनी टिळा लावला आणि येऊन बसले काहीतरी अवतार करून कि झालं . बाबाजी आहेत ते . अहो त्यांनी सगळा त्याग केलेला आहे ,कसला त्याग केला ?तुमचे खिसे कापत बसलेले आहेत . तेव्हा इकडे जे अशा तऱ्हेचे लोक आहेत जे वरवर फार दाखवतात कि आम्ही विद्वान आहोत वैगेरे त्याच्यावर कबीर दासांनी खूप सडकून टीका केलेली आहे . त्यांनी सांगितलं “पढी पढी पंडित मुरख भये “. वाचून वाचून पंडित सुध्दा मुर्खात निघाले . मग ह्या महाराष्ट्रात भक्तीचा इतका गौरव गातो ,त्याच्या बद्दल एव्हडं सांगतो आपण कि भक्ती हि फार मोठी आहे . मग हे जे भक्त लोक आहेत त्यांना अशा लोकांची विशेष आवड असावी याच मला खूप आश्चर्य वाटत . 

आता याच मार्गातले दुसरे जे अजून प्रगत झालेले लोक आहेत ,अशे जे अति शहाणे त्यांचे जे बैल रिकामे आहेत ते लोक आपल्याला असे शिकवतात कि देव वैगेरे काही नाही उगीचच ह्या गोष्टी आहेत . सायन्स म्हणजेच सगळं काही आहे . सायन्स मुळेच सगळा आमचा फायदा होतो . सायन्स नि हे झालं सायन्स नि ते झालं . आता आमचे साहेब तुम्हाला माहीतच आहे कि बारा वर्ष लंडन मध्ये त्यांना चारदा निवडून दिल त्यामुळे बारा वर्ष आम्ही तिथे अडकून पडलो आणि चार वर्ष परत निवडून दिलेलं आहे तेव्हा सोळा वर्षाचा वनवास आमच्या नशिबी आहे . त्या देशात तुम्ही बघा किंवा इतर देशात तुम्ही बघा मी फिरते आता अनेक देशात मी फिरलेली आहे . ते लोक सुखी आहेत का?आपल्याला एक तऱ्हेचं दुःख आहे कबूल . आपल्याला अजून टंचाई आहे ,आर्थिक द्रिष्टया आपण बरे नाही हे खरे आहे पण हे लोक तरी सुखी आहेत का ?. यांची मुल दारूचं नाही पीत तर त्याच्या शिवाय त्याच्या हि पुढचं घाणेरडं घाणेरडं जे आपण कधीही ऐकलं सुध्दा नाही ते घेतात . नीतिमत्ता म्हणून कशाला म्हणतात ते त्यांना माहिती सुध्दा नाही . घरदार सुटलेली मुलबाळ पळालेली ,सगळे अनाथ आश्रमात राहतात . इतके दुखी जीव आहेत आणि ६५ टक्के लोक मला तरी असं वाटत कि वेडावलेले आहेत . अगदी नक्की वेडावलेले आहेत . ज्याला बघावं तो वेड्या सारखा वागतो . काहीतरी मूर्खपणा करतो . म्हणजे त्यांना सर्वसाधारण गोष्टी सुध्दा कळत  नाहीत कि कस वागायचं . आता लंडन ला एक लाट अली ,कोणाचीही लाट अली कि त्या लाटेत वहातात . डोक्याला गोंद लावायचा आणि सारे केस अशे पिंजारून वर वर ओढून घ्यायचे आणि ते केल्या वरती काहीतरी घाणेरडे कपडे घालून त्याच्यात अशी भोक करायची आणि रस्त्यानी फिरायचं . याला काही अर्थ आहे का ?आणि एक नाही दोन नाही जोकर सारखे सगळे फिरत असतात गावभर . त्यांना विचारलं तुम्ही असे का करता तर म्हणतात यांच्यात काय चूक आहे . फार चांगलं आहे म्हंटल ,करा . आता तेव्हड तरी नशीब समजा कि आपल्या मध्ये हे दुर्गुण आलेले नाहीत . आपल्या मध्ये हा वाईट पणा आलेला नाही . अजून आपल्या देशा मध्ये नीतिमत्ता आहे ,आपल्या देशामध्ये अजून लोकांना समजत कि सुज्ञपणा काय आहे . अशे मूर्खपणा करण्याचे धंदे करणारे लोक कमी आहेत .व्यवस्थित एखादी लग्न झालेली बाई असेल तर ती अगदी एखाद्या गृहस्थ बाईला राहायला पाहिजे तस ती राहते . पुरुष गृहस्थ आहेत तशा पद्धतीने राहतात . काहीतरी सोंग घेऊन फिरत नाहीत . तिकडे म्हणजे सोंग म्हणजे काय विचारायलाच नको ,तरतऱ्हेची सोंग घेतात . मग रडत बसतात आम्हाला हे झालं ते झालं म्हणून . तेव्हा त्या देशांमध्ये जी एक संकटाची त्यांना सूचना आलेली आहे ती आपल्या देशात जरी अजून आपल्याला आलेली नसली तरी आपण हे जाणलं पाहिजे कि जर आपण परमेश्वराला ओळखलं नाही आणि नुसते आम्ही चांगले आहोत ,नीतिवान आहोत असं म्हणून चालणार नाही . कि जे श्रीकृष्णाने सांगितलं कि “योग क्षेम वाहामयं “योग घटित झाला तर तुमचं मी क्षेम करेन . 

क्षेम कस बघणार ?आपल्याला सायन्स पाहिजे ,सायन्स ची जी भूत यांच्या डोक्यात बसलेली होती ती निघाली आहेत आता बरीच . कारण सायन्स मुळे फक्त ऍटोमिक बॉम्ब वैगेरे बनवून डोक्यावर ठेवलेला आहे . आणि आता कधी तो आमच्या डोक्यावर पडेल याची सगळ्यांनाच भीती बसलेली आहे . तेव्हा आता क्षेम म्हणजे काय ?क्षेम म्हणजे एकांगी गोष्ट नसते ,नुसते पैशे च येत नाही त माणसा जवळ . पैशे सुध्दा आता बघा ,आपल्या कडे सुध्दा खूप मंडळी असतील अशी बघा कुणाला शंभर रुपये दिले जास्तीचे कि तो चालला गुत्यावर . आपल्याला पैशे वापरायची आहे का अक्कल . बर जर  तुम्हाला स्वतंत्रता दिली ,त्या लोकांना स्वतंत्रता दिली तर पाहिलं कि त्याचे वाभाडे तुम्ही काय काढलेत ते . पण एखाद्या माणसाला थोडीशी जरी  तुम्ही सत्ता दिली कि लगेच तो दुगाडया झाडू लागतो . म्हणजे माणसाची जात आहे का गाढवाची जात आहे हेच समजत नाही मला . म्हणजे काही गोष्ट असली कि आपल्याला झेपत का नाही हे समजत नाही . आपण लगेच शेफारून का जातो हे कळत  नाही . त्याला कारण आहे एकांगी जी आपली प्रगती होते ती दुसऱ्या बाजूला आपल्याला लंगड करून टाकते . सहजयोग म्हणजे काय आहे ,समग्रता आहे . सर्वंद्रीष्टीने आपली त्याच्यात प्रगती होते कारण आत्मा जो आहे तो सगळीकडे प्रकाशला गेला कि प्रत्येक गोष्टीच तत्व जे आहे ते आत्म्यानी प्रकाशित होत . आता इथे आपल्या समोर हि कुंडलिनी आहे . याच्या बद्दल ज्ञान पूर्वी   कुणी तुम्हाला दिलेल नाही आणि कुणी देणार पण नाही . कारण माहीतच नाही लोकांना तर सांगणार काय . आणि सांगूनही नुसतं बोलायचं आम्ही तुमची कुंडलिनी जागृत करतो असं तस आणि मग तुम्ही बेडका सारखे उडता . म्हणजे आता काय बेडूक होणार आहे का तुम्ही ?आता परवा एक साहेब मला आले भेटायला त्यांचे डोळेच अशे वर व्हायला लागले मला बघून . म्हंटल असं काय करता . ते म्हणे आमचे कुणीतरी महाराज आहेत ,मला वाटतंय ते ब्राम्हणांचे कर्दनकाळ असणार कारण सगळ्या ब्राम्हणांना त्यांनी ठिकाणावर लावेल आहे . ते आता नाहीत इथे कुठे . त्याचे सगळे जेव्हडे लोक आहेत त्यांना पॅरालिसिस ,हाय ब्लड प्रेशर ,किडनी फेल्युअर आणि डोळे सगळ्यांचे वर चढतात माझ्या समोर . म्हंटल आहे तरी काय हा गुरुबाबा . हा मेला तर मेला आणि तुम्हाला पण घेऊन जातो कि काय . त्यांनी सांगितलं तुम्हाला अमुक माहित आहे का ,तरणोपाय ,करणोपाय ,गरदोपाय अहो काय काय काढलं त्यांनी . म्हंटल कोणच शास्त्र बोलू लागले तुम्ही . कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे हे सगळं काही . नाही म्हणे आमचे गुरुजी म्हणाले . म्हंटल तुमचे गुरुजी म्हणजे कुणी उपटसुम्भ दिसतात . नाही अगदी ते संस्कृत आहेत . संस्कृतात जर कुणी गाढवाचं बोलणं सांगितलं तर ते मानून घ्यायचं का . आपले जेव्हडे मोठे साधुसंत झाले त्यांनी सर्व साधारण लोकांची भाषा वापरली जे सर्वसाधारण लोक बोलतात ते वापरलं . तुकारामांची भजन बघा ,”समयासी सादर व्हावे “केव्हड मोठं सांगितलं त्यांनी पण शब्द किती सोपा आहे . शब्द किती सोपे रोजच्या भाषणातले त्यांनी शब्द वापरले . काहीतरी विशेष आम्ही आहोत म्हणून मोठा वितंडवाद नाही घातला . सर्वसाधारण जे काही आहे ते सांगितले आहे . आणि तसच जर माणसाने सांगायचंच झालं तर कुंडलिनी बद्दल सुध्दा असं समजावून सांगितलं पाहिजे केजी सगळ्यांना समजली पाहिजे . नाहीतर अशा सांगण्याला आणि अशा भाषणाला तुम्ही मुळीच भीक घालू नये . त्यांनी नुसतं डोकं खराब करण्याची गोष्ट आहे . आता क्षेम कसा होतो ते बघा . 

अगदी सोपी गोष्ट आहे क्षेम कसा होतो ते . आता आपल्या मध्ये जे तत्व आहे ते सात तत्वात वाटलं गेलं आहे . आता हि सप्तशृंगी आहे ना हि फार मोठी गोष्ट आहे . सप्तश्रुंगीला तुम्ही मानता पण हि आहे काय माहित आहे का . तीच तत्व काय माहित आहे काय ?सप्तश्रुंगी म्हणजे तिथे सात पीठ आहेत अशा सात पिठावर बसलेली आदिशक्ती ,अर्धमात्रा हि सप्तशृंगी इथे आहे . आता सगळे चालले तर चालले सगळे पण ती काय आहे तर हे सहस्रारात जे डोक्यात दिसत आहे ज्याला इंग्लिश मध्ये लिम्बिक एरिया म्हणतात तिथे सात चक्रांची पीठ आहेत . त्या पिठावर आदिशक्तीचे स्थान आहे . पण त्यांनी सांगितलं सहस्रारे महामाया . सहस्रारावर जेव्हा आदिशक्ती येते तेव्हा ती महामाया होते . तिला ओळखणं फार कठीण आहे . तेव्हा तिच्या चक्रावर यायचं तेव्हा लक्षात ठेवायचं ती महामाया आहे . तर ह्या सहस्रारावर बसलेली हि जी सप्तशृंगी आहे तिची सात पीठ आहेत . आणि त्या सात पिठांना चालना देणारे तिची सात चक्र आहेत . आणि ती सात चक्र जी डोक्यात आहेत ती खाली अशी सात ठिकाणी आहेत . हे तत्व आहे . हि तुमच्या आतली विधी समजून घेतली पाहिजे . ते काही कठीण नाही . मी तुमचीच भाषा बोलते आहे . कि जी एक शेतकरी माणूस बोलेल किंवा एक सर्वसाधारण माणूस बोलेल त्याच भाषेत मी तुमच्याशी बोलत आहे . तेव्हा तुम्हाला जर त्यात काही समजलं नाही तर तुम्ही मला विचारा . उलट माझे जेव्हडे शिष्य महाराष्ट्रात आणि बाहेर आहेत त्यात जास्त प्रमाणा मध्ये खेडेगावात आहेत . शहरात कमी आहेत कारण शहरात अति शहाणे त्यांचे बैल रिकामे . 

ह्या सात चक्रान मध्ये तुमचं सगळं तत्व लिहीत आहे . आता गणपती आपण म्हणतो ,महाराष्ट्रात फार गणपतीचं वेड आहे . कुठे आहे गणपती आपल्या मध्ये ?कुठे बसला आहे ?ह्या पहिल्या चक्रात बसलेला आहे खाली . मूलाधार चक्रात . आता कशावरून माताजी तिथे गणपती बसला आहे ?ते आम्ही सिद्ध करून देतो तुम्हाला . पहिल्या चक्रावर जर गणपती खराब झाला असेल तर माणसाचं चरित्र ठीक नसेल तर कुंडलिनी उठायची नाही . उत्थान फार कठीण आहे . वर चढायचीच नाही . ते चरित्र ठीक असायला पाहिजे ,जो माणूस बाईलवेडा आहे ,अमका आहे तमका आहे ,आपल्याकडे भरपूर शब्द आहेत त्याला . अशा प्रकारच्या माणसाची कुंडलिनी जागृत होणार नाही . ते त्याच तत्व जे आहे खराब झालं ,गणेश तत्व खराब झालं . म्हणजे ज्याला आपण अबोधिता म्हणतो ते जर माणसात नसल तर त्याची कुंडलिनी उठायची नाही . ती उठणारच नाही तेव्हा काय म्हणायला पाहिजे तेव्हा तर गणेशाचा मंत्र बरोबर सिध्द केलेला म्हणायला पाहिजे . जो जागृत मंत्र आहे तो म्हणायला पाहिजे . आता कुणी सांगितलं तुम्हाला कि रामाचं नाव घेत राहा . बसले मग रामाचं नाव घेत . अहो रामाशी संबंध आहे का तुमचा ?जर तुम्हाला समजा संजीव गांधीला जाऊन भेटायचं असलं किंवा आता राजीव गांधी आला त्याला भेटायचं असेल आणि तिथं जाऊन तुम्ही जर त्याच नाव घेत बसले असते तर त्यानी तुम्हाला अटक केली असती . तस श्रीरामाच आहे तुम्ही उगीचच त्याच नावं रामराम रामराम करत बसलात तर परमेश्वर मिळणार आहे का ?तुमचं कोणतं चक्र खराब आहे ते आधी कळून घ्या आणि मग तुमच्या कोणत्या चक्राच्या दैवताला जागृत करायचं ते समजून घ्या . ते अगदी सोपं आहे . आता सप्तशृंगीला जाता पण हि सप्तश्रुंगी काय आहे असा आपण एक वेळेला विचार केला पाहिजे . कि हि एव्हडी जागृत अर्धमात्रा म्हणतात ,हि अर्धमात्रा म्हणजे काय ?हि इथे साडेतीन वेटोळे घालून बसलेली जी कुंडलिनी आहे ,हे सगळं आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे . मी काही तुम्हाला नव्याने विशेष सांगत नाही पण रोजच्या भाषेत जस आपल्या भाषे मध्ये ज्ञानेश्वरी ज्ञानेशांनी सांगितली तशी मी तुम्हाला रोजच्या भाषेमध्ये तुम्हाला हे सगळं आतलं हे गुपित आहे ते तुम्हाला सांगत आहे . तर ती साडेतीन वेटोळे घालून आपल्या सर्वांच्या मध्ये हि कुंडलिनी आहे . सगळ्यांच्या मध्ये आहे . जनावरांमध्ये ती अजून बरोबर पूर्ण झालेली नाही . म्हणजे तेव्हडी प्रगल्भ नाही . आपल्या मध्ये ती प्रगल्भ आहे . आणि हि जी साडेतीन वेटोळ्याची जी अर्धमात्रा आहे ती हि सप्तशृंगी आहे . बर आता तीन मात्रा कुठे आहेत ?म्हणजे काय ?. ह्या ज्या तुमच्या तीन शक्त्या आहेत म्हणजे महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली . आश्चर्याची गोष्ट आहे कि महाराष्ट्राचे जे पठार आहे ते हि हेच आहे . हे जे त्रिकोणाकार अस्थी इथे दिसत आहे ते परमेश्वराच्या पाठीवर जर बघायला गेलं तर महाराष्ट्राचा त्रिकोण आहे तो . आता तुम्ही कुठे बसलाय ते लक्षात ठेवा . म्हणजे साऱ्या विश्वाची कुंडलिनी इथे तुमच्या पायाखाली बसलेली आहे महाराष्ट्रात . त्यातल्यात्यात इथे अर्धमात्रा म्हणजे ती सगळ्यांच्या वर आहे . तर महाकाली ,महालक्ष्मी ,महासरस्वती अशा तीन ज्या शक्त्या आहेत , 

पहिल्या महाकालीच्या शक्तीने काय होत तर आपण इच्छा करतो . म्हणजे इच्छा शक्ती म्हणा . जेव्हा इच्छाशक्ती नष्ट झाली तेव्हा आपला विद्वंस होतो . त्याला आपण म्हणू कि नाशवंत शक्ती पण आहे ती . आणि दुसरी जी आहे ती क्रिया शक्ती ती महासरस्वतीची . ती उजवीकडे आहे . आणि तिसरी ज्या शक्तीने आपण धर्मधारणा करतो . धर्मधारण करणे म्हणजे मी हिंदू ,मुसलमान भांडण करणे नाही . धर्मधारण करणे म्हणजे ज्यांनी तुम्ही मानव झाले . कुत्र्याला एक धर्म आहे ,विंचवाला एक धर्म आहे ,कार्बनला एक धर्म आहे . आणि तुमचा धर्म काय तर तुम्ही मानव धर्मी आहात . तर जे मानवधर्मी आहेत त्यांनी हा धर्म मिळवला आहे . त्यांना कळलं पाहिजे कि आम्ही हा धर्म मिळवला कसा ?आम्ही मानव झाले कसो ?आणि ते ज्या शक्तीने तुम्ही होता ती धर्मशक्ती ती शक्ती मधोमध महालक्षीमीची शक्ती आहे . पण महालक्ष्मीच्या देवळात जाऊन आपण म्हणतो उदो उदो ग आंबे . आंबे हि कुंडलिनी आहे . आपल्याला माहीतच नाही कि आंबा म्हणजे कोण . हि चवथी शक्ती आहे . हि शक्ती म्हणजे शुध्द इच्छा आहे . शुध्द इच्छा म्हणजे काय ?कि ज्या इच्छेला एकदा प्राप्त झालो मग काहीही नको पूर्ण संतोष आला . अशी जी शुध्द इच्छा आहे ती हि कुंडलिनी आहे . आणि मानवा मधली शुध्द इच्छा काय आहे ?कि परमेश्वराशी योग घडला पाहिजे . तुम्ही काहीही जगातलं काम करा .या जन्मात तुम्ही काहीही काम केलं परत जन्म येईल तुमचा . परत तुम्ही इकडे तिकडे धावपळ करा ,ह्या जन्मात तुम्ही समजा मोठे श्रीमंत झाले ,बर मग सोडा श्रीमंती काय नकोरे बाबा मुलबाळ त्रास देतात ,हे झालं ते झालं . पुढल्या जन्मात तुम्ही म्हणाल ह्या जन्मात आम्ही मिनिस्टर होतो ,झाले तुम्ही मिनिस्टर . मग नको रे बाबा ती मिनिस्टरशिप . ते सुटलं . पुढे तिसऱ्या जन्मात चला  आपण काहीतरी भक्ती बिक्ती करू मग तिकडे धावले बघितलं सगळ्यांनी त्रास दिला काही फायदा झाला नाही . मग मानवा मध्ये हि एक इच्छा आहे ती इच्छा म्हणजे परमेश्वराशी खरोखर तादात्म्य होणे . खरोखर ते मिळवणे . त्यात खोटे पणा नाही . अशी जी इच्छा आहे ती तुमच्यातली खरी शुद्ध इच्छा आहे . बाकी तुम्हाला काहीही मिळूदे ,तुम्ही म्हणाल माताजी आमच्या मुलाचं लग्न एकदा झालं म्हणजे झालं . मला घराला एकदा डागडुजी झाली म्हणजे झालं . तस होत नाही . आधी म्हणाल माताजी मला एक नोकरी मिळूदे . नोकरी मिळाली कि माताजी मला एक घर बांधून द्या . मग आता मला एक मोटार च पाहिजे . हे काय संपत का ?. ती  इच्छा काही संपायची नाही . कारण ती नाही आहे शुध्द इच्छा ती आहे अशुध्द इच्छा . शुध्द इच्छा जी आहे ती साडेतीन वेटोळे घालून जी आपल्या मध्ये बसलेली आहे ती आहे . ती शुध्द इच्छा म्हणजेच खर तत्व आहे आपलं . ती जागृत झाल्या बरोबरच हि सर्व जी चक्र आहेत जी आपल्यामध्ये तत्व आहेत ती जागृत होतात . आणि ते झाल्या शिवाय आपल्याला हे कळणारच नाही कि तत्व म्हणजे काय . लोकांना बाह्यतलं पाहिजे . आतलं नको ,आतली विधी समजून घेतली पाहिजे . कि याच तत्व काय आहे . आम्ही कोण ,आमचं तत्व काय ?आमचं तत्व म्हणजे एकच ते हे कि आमच्यामध्ये शुद्ध इच्छा म्हणून जी एक शक्ती आहे ती त्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये बसलेली आहे .ती जो पर्यंत आमच्यात जागृत होणार नाही तो पर्यंत आम्ही काहीही दुसऱ्या इच्छा केल्या त्या साठी केव्हडीही धडपड केली तरी आम्हाला समाधान होणार नाही . पण त्या साठी तू हे सोड रे ते सोड रे ,अमुक करा तमुक करा सगळं बेकार आहे . राजा जनक राजा होता त्याला विदेही म्हणत असत आणि सीतेला वैदेही म्हणायचे . त्याला कारण कि हा आता राजा आहे श्रीमंतीत बसला आहे जर उद्या त्याला गरिबी आलं तर गरिबीत बसले . आता डॉक्टर साहेब आले होते लंडन ला . आमचं घर महालासारखं आहे कबूल . पण उद्या तुम्ही जर म्हणाल कि माताजी जंगलात जाऊन राहा तर आम्ही व्यवस्थित जाऊन राहू . आम्हाला काही त्रास होणार नाही . कि कस झोपायचं ,आता काय करायचं . कारण मस्त आहोत आम्ही आम्हाला काय करायचं . आहे तेव्हा घालायचं नाही तर नाही सोडा . पण ती वृत्ती नको कि हे सोडा आणि ते सोडा . आणि काय धरायला पण नको . हि कुंडलिनी स्वतःच वर येते कारण तुम्ही इतक्या जन्मजन्मांतरातून परमेश्वराला शोधत आहात . आजच हे शोधण नाही आहे ,कित्येक जन्मापासून आहे हे . ती बसलेली आहे तिथे . आत्ता मी येताना इथे जवळ जवळ पंचवीस तीस माणस आपल्या फाटकात उभी होती .मला म्हणे आम्हाला इथे साक्षात्कार द्या आम्ही काही तिथे येऊ शकत नाही प्रोग्रॅमला . असं का म्हंटल . म्हंटल माझ्याकडे हात करा बर . सगळ्यांनी अशे हात केल्यावर गारगार कस येत आहे ,म्हंटल सुरु झालं . आता डोक्यातून बघा इथून गारगार येतंय का ?हो यायला लागलं . म्हंटल हे झालं तुमचं . पण हे नुसतं हा अंकुर फुटलेला आहे . आणि अंकुरलेलं बी जे आहे ते सांभाळावं लागत . हे आपल्याला समजलं पाहिजे . तेव्हडंच तिथेच आपण कमी पडतो . कितीही लोक तुम्ही पार करा नाशकात ,ते नासूनच जात . ते बी आपलं अंकुरल गेलं आहे ते परत नीट व्यवस्थित वाढवून घ्यायचं ते समजून घ्यायचं ते लोकांना येत नाही . त्यांना काय समजत कि आता आम्हाला अंकुरल ना माताजींनी मग झालं . आता आम्ही पार झालो ना मग झालं . पण ते वृद्धिंगत झालं पाहिजे ,त्या रोपाला एका वृक्षाची स्तिती अली पाहिजे हे समजलं पाहिजे . आणि त्याला काही करायचं नाही . सांगितलं आधीच कि पैसे द्यायचे नाहीत कि काही नाही . पण हि स्तिती आपल्यामध्ये यायला पाहिजे . तेव्हा जेव्हा हि कुंडलिनी आपल्यामध्ये तिचा अभ्युदय होतो असं म्हणतात . आपण म्हणतो उदो उदो ग आंबे . म्हणजे महालक्ष्मीच्या देवळात आपण उदोउदो ग आंबे म्हणतो त्याला कारण काय तर मधोमध जी आहे ती ब्रम्ह नाडी ती महालक्ष्मी . आणि तिच्या देवळात जाऊन आपण म्हणतो आंबे  तू आता उभी राहा . आपण पुष्कळदा म्हणतो . आई चा जोगवा ,आपल्याला सगळ्यांना गाण माहित आहे आईचा जोगवा . जोगवा म्हणजे काय तर योग . आईलाच योग मागावा लागतो . आईच आहे पुनर्जन्म देणारी . ती आई तुमची आंबे आहे . म्हणून आपण तिला म्हणतो आता तू जागृत हो . उधो म्हणजे आता तू जागृत हो . 

हि कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हा तुमच्या साती चक्रांवरती प्रकाश घालते . आणि त्यामुळे क्षेम लाभ होतो . कि सर्वप्रथम तुमची तब्बेत ठीक झाली पाहिजे . आता हि मंडळी बसली आहेत तुम्ही बघा मागे ती जी सहजयोगी लोक आहेत त्यांचे चेहरेच वेगळे दिसतात . अगदी गुलाबा सारखे . त्यांचं चरित्रच वेगळं झालेलं आहे . आता काही लोक आमच्या इथे पुष्कळशे आले नाहीत पण अशे हजारोनी शिष्य आहेत . आणि काही लोक इतके ड्रग वैगेरे घेत असत आणि भयंकर परिस्थितीत असताना माझ्याकडे आले ते म्हणजे बेशुद्ध अवस्थेत च आले म्हंटल तरी चालेल  . अनेक रोग झाले होते त्यांना . पण कुंडलिनी आज जागृत झाली आणि उद्या सुटलं सगळं . आज दारू पिऊन झिंगून यायचे आणि माझ्याशी वाद घालायचे . दारुडे लोक वागतात च तसे . तेव्हा त्यांनी वाद घालायला सुरवात केली मी म्हंटल उद्या ये बाबा . दुसऱ्या दिवशी तो आला आणि पार झाला आणि दारू बिरू पार सुटून गेली ,तंबाकू सुध्दा सुटून जाऊन पडली तिकडे . मी काही सांगत नाही सोडा म्हणून कारण सांगितलं तस तर अर्धे लोक उठून जायचे . मी काही म्हणत नाही . तुम्ही तुमच्या आत्म्याला मिळवून घ्यावं , तुमचा आत्माच तुमचा  गुरु आहे . तो तुम्हाला शिकवतो . मग नकोरे बाबा असं होऊन जात म्हणून पहिलं तत्व हे आहे कि ज्या तुमच्या सवयी त्या झडून जातात . आणि तुमची तब्बेत सुंदर होते . कुंडलिनी जागृतीनी आम्ही कितीतरी कॅन्सर वैगेरे ठीक केले आहेत आम्ही . पण असं म्हंटल्या बरोबर आपले चार नातलग घेऊन यायचे आणि यांचा कॅन्सर तुम्ही ठीक करा म्हणायचं . हे काय आम्ही हॉस्पिटल आम्ही काढलं नाही आहे . फक्त आम्ही तुम्हाला डॉक्टर करू शकतो . आज ह्या लोकांमध्ये चारपाच डॉक्टर परदेशातून आलेले आहेत . पण आपल्या इथल्या डॉक्टरांना मात्र ते आवडायचं नाही . आता हे सगळे जाऊन तिथे तिथल्या सरकारने त्यांची जे चिकित्सा चे मिनिस्टर होते त्यांची जी अडवाईजर आहे तिला माझ्या घरी पाठवलं . मी म्हंटल तुझ्या ऑफिस मध्ये मी येणार नाही तर ती घरी आली . आणि तिने सगळं समजून घेतलं कि कुंडलिनी काय आहे आणि हि शक्ती काय आहे ते आम्हाला सांगा . तर ते रशियात येईल ,लंडन ला येईल पण इथे नाही चालायचं . इकडे म्हणजे हे सगळं चालणार आपलं टाळकुटत बसायचं सकाळ संध्यकाळ .  

अहो भक्ती तरी कशाला करायची ?भक्ती एव्हड्यासाठीच ना कि परमेश्वर मिळवायचा आहे . का भक्तीसाठी भक्ती करता तुम्ही . ते तस झालं तुलसीदासांनी “चित्रकूट के घाट पर भई संतन कि भीड ,तुलसीदास चंदन घीसे ,तिलक करत  रघुवीर “. याला टिळा लावला त्याला टिळा लावला . श्रीराम समोर आले त्यांना टिळा लावला तरी ओळखलं नाही त्यांनी कि श्रीराम समोर आहेत ते . मग असल्या भक्ती ला काही अर्थ आहे का . आणि त्याच्यात त्यांनी इशारा केलेला आहे कि अशी आपण भक्ती करतो कि साक्षात परमेश्वर जरी समोर आला तरी आपण त्याच्या समोर हरे रामा ,हरेराम करत बसणार . तेव्हा आता भक्तीची तुम्ही काही मेहनत घेतली आहे त्याच फळ मिळवण्याची वेळ आली आहे . ते घ्या . ते तुमचंच आहे . हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे . तुमच्यात परमेश्वराने सगळं कार्य करून ठेवलं आहे . हि शक्ती तुमच्यात आहे . आणि ती तुम्ही मिळवून घेत नाही म्हणजे काय म्हणावं . तिकडे तुमचं लक्ष नाही म्हणजे काय म्हणावं . आता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकांनी एव्हडी मेहनत घेतली तशी काही मेहनत करायला नको . उलट एकदा तुमची जागृती झाली म्हणजे आपोआप आशीर्वाद इतके येतात कि तुम्हीच म्हणाल . आजच एक गृहस्थ म्हणाले माताजी इतके चमत्कार घडले आमच्या बरोबर आणि इतकं आमचं संरक्षण झालं ,इतकी आमची उन्नती झाली आहे कि ह्या वर्षभरात कस ते सांगायचं ,कस ते करायचं हे सांगता येत नाही . म्हंटल लिहून काढा आता . कारण परमेश्वर हा परमेश्वर आहे . आणि त्याला जेव्हा द्यायची इच्छा होते तेव्हा तो किती देऊ शकतो हे तेव्हाच तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही त्याच्या साम्राज्यात याल . आणि त्याच साम्राज्य मिळवणं आज अगदी निकट आलेलं आहे ते मिळवून घ्या . तेव्हा स्वातंत्र्य झालं ते वेगळं आणि आता स्व च तंत्र ते घ्यावं . 

शिवाजी महाराजांनी सुद्धा ते स्वतः साक्षात्कारी होते त्यांनी  म्हटलं आहे स्व चा धर्म जागवावा . त्यांनी स्व धर्म का म्हंटल ?या कडे लोकांचं लक्ष नाही . स्व म्हणजे काय . स्व म्हणजे काय तर हा आत्मा . त्याचा धर्म जागवावा . स्व चा धर्म जागवावा असं शिवाजी  महाराजांनी म्हंटल आहे . का म्हंटल त्यांनी असं ?कारण त्यांना हे माहित होत कि आता जे आपण हे स्वातंत्र्य मिळवलं आहे ते स्वातंत्र्य मिळवल्या नंतर त्याच्या वरच जे सतंत्र्य आहे ,खर स्व च तंत्र आहे जिथे आपल्यावरती कोणाचाही काबू येऊ शकत नाही ,कोणत्याही सवयीला पण आपण जुमानु शकत नाही ,कोणाचीही भीरूता वैगेरे ,गुलामी हे सगळं सुटून माणूस जेव्हा अगदी परमेश्वरी तत्वाला जागृत होईल अशी स्तिती येईल तेव्हा तो स्व धर्माला जागृत झाला . म्हणून शिवाजी महाराजांनी सांगून ठेवलं आहे ,ज्ञानेशानी जे पसायदान दिल आहे ते हेच आहे . कि हे असच होणार आहे ,अशारितीने लोक येणार आहेत . सगळे जण सगळं वर्णन करून गेले पण आपण अजून जागृत झालो नाही तर हा आपला दोष झाला . हि अगदी अशी विशेष वेळ आहे कि त्या वेळेला माणूस एकतर इकडे तरी जाईल नाहीतर तिकडे तरी जाईल . हि विशेष भ्रमाची स्तिती आहे . आणि ह्या भ्रमाच्या स्तितींमध्ये जर माणसाने परमेश्वराला मिळवलं नाही तर त्याला दुर्गती येणार आहे . त्या बद्दल मला शन्का वाटत नाही . आणि लगेचच दिसत त्याच उदहारण कि कसे लोक दुर्गातीला चाललेले आहेत . प्रत्येक द्रीष्टीने तर हा एक क्षेमाचा प्रकार मी सांगितला कि आपली तब्बेत टिक होते . तब्बेत ठीक होण्याचं कारण असं आहे कि आपल्यामध्ये जी चक्र आहेत आणि त्या चक्रांच्या मुळे जे संचालित आपल्यामध्ये फ्लेक्सेसेस आहेत ते सगळे ठीक होतात . ह्या चक्रांवरच अवलंबून आहेत ,आता मी डॉक्टरी केलेली आहे तेव्हा मला हे आश्चर्य वाटलं कि डॉक्टर म्हणजे त्यांना डोळ्यांनी दिसत किंवा जिथपर्यंत ते पोहोचतात ते कोत आहे .  कारण आपली बुध्दी कोती आहे ना . त्याला मर्यादा आहेत हे अमर्याद किंवा अनंतातल्या गोष्टी आहेत . या साठी बुद्धीच्या पलीकडे जायला पाहिजे . आणि ते ते जाऊ शकत नाहीत . तेव्हा त्यांना फ्लेक्सेस फक्त दिसत पण त्यांना चालवणारी जी ह्या चक्रांची शक्ती आहे आणि त्यावरचे देवदेवता आहेत ते तर मुळीच दिसत नाहीत . 

तेव्हा गणपतीचं नाव जर मी घेतलं लंडन ला जाऊन तर हे म्हणतात मी हिंदू धर्म पसरवत आहे . अहो म्हंटल आम्ही खूप बघितला आहे हिंदू धर्म पसरवलेला पण त्याचा काही फायदा झाला आहे का ?तुम्ही ख्रिश्चन धर्म पसरवला कुणी हिंदू धर्म पसरवला ,अमुक पसरवा हे प्लास्टिक सारखं पसरवून फायदा काय आहे ,एकतरी कायद्याचा माणूस उभा आहे का म्हंटल . नाहीतर एखाद्या  गाढवाला म्हंटल तू ख्रिश्चन आहेस म्हंटल्यावर तो काय ख्रिश्चन होतो काय ?किंवा एखाद्याला म्हंटल तू हिंदू आहेस म्हंटल्यावर तो हिंदू होतो का ?जो स्व च्या धर्माला ओळखत नाही त्यांनी या भारतातच राहू नये असं माझं मत झालेलं आहे . कारण हि पृथ्वी त्याला उलथवून टाकेल . हि एव्हडी पवित्र पृथ्वी आहे ,सगळ्या संतांनी सिंचलेली हि योगभूमी ,यांच्यामध्ये जो माणूस स्वच्या धर्माला ओळखणार नाही तो उलथून पडेल . आणि हे झालच पाहिजे . ते झाल्या शिवाय आपली डोकी ठीक होणार नाहीत . पण आता परवा मी पंतप्रधानांचे शब्द ऐकले तर मला फार आनंद झाला त्यांनी सांगितलं जरी आपण सायन्स करायचं आहे तरी सुद्धा आपल्या मध्ये बसलेला जो आपला आत्मा आहे तो आपण मिळवला पाहिजे . केव्हडी मोठी गोष्ट त्यांनी म्हंटली आणि स्वतः ते आत्मसाक्षात्कारी आहेत हे सांगायचं म्हणजे . मी पाहिलेत त्यांचे वायब्रेशन . तर ते चैतन्यमय आहेत . तेव्हा आता किती बदल येतो ते बघा तुम्ही . आणि आपल्यातही हा बदल आला पाहिजे . आणि हा यायला काहीही करावं लागणार नाही . पण एकदा तुम्हाला अंकुरित झालेली कुंडलिनी मिळाली ,तिचा आशीर्वाद मिळाला आणि तुमचं ब्रम्हरंध्र आम्ही छेदून टाकलं त्याच्यावर तुम्हाला मग शिकलं पाहिजे ,समजलं पाहिजे आणि ते आत्मसात केल पाहिजे . आणि ते वृद्धिंगत झालं पाहिजे . 

आता आपल्यात शेतकरी बसले असतील कि हे एक बी कामाचं आहे कि जे बी अंकुरल ते बी कामाचं आहे . ते त वायाच जात मग . त्या अंकुरलेल्या बी नि जर पुढे वृक्ष होण्याची हामी घेतली नाही तर ते बेकारच जाणार . म्हणून जेव्हा कुंडलिनीची जागृती होते तेव्हा अत्यंत आनंद होतो फार छान वाटत ,तब्बेती ठीक होतात . पण त्याच्या पुढे काहीच नाही . आता आपल्याला डॉक्टर साहेबांची सांगितलेलंच आहे कि यांच्या इथे सेंटर आहे आणि आपण जर त्या सेंटर वर गेलात ते सगळं आपल्याला समजावून सांगतील कि कुंडलिनी म्हणजे काय ?ते समजण्याची गोष्ट आहे ती वादविवाद घालण्याची गोष्ट नाही . आपण एखाद्या युनिव्हर्सिटीत गेलो तर आपण काय तिथे जाऊन वादविवाद घालतो का . बाबा तू शिकून घे आधी . तुमच्या कडून आम्हाला पैसे नको ,तुमच्या कडून आम्हाला काहीही नको अशी स्तिती असल्यावर तुम्ही उगीचच आम्हाला प्रश्न का विचारता . आधी तुम्ही शिकून घ्या . काहीतरी नम्रपणा धरा जरा . 

तर हि जी आता पहिल्या चक्रावर गोष्ट सांगितली मी तशीच दुसऱ्या चक्रावरती माणसाला जेव्हा जागृती येते ,कुंडलिनी येते तेव्हा त्याच्या प्रकाशामध्ये माणूस अत्यंत तेजस्वी असा क्रियेशील असा होऊन जातो . म्हणजे जे मोठमोठाले आपल्याकडे आर्टिस्ट झाले मुयझिशियन झाले यांना सरस्वतीची जी कृपा झाली होती त्याला कारण असं कि त्यांच्या ह्या दुसऱ्या चक्रावरती विशेष प्रकाश येतो   . तेव्हा सरस्वतीची कृपा घटित होते आणि इथे ब्रह्मांच राज्य आहे . आता कुणाला सांगितलं ब्रम्हदेव इथे बसतात . आता आपल्याकडे आपण सोपानदेवांना ब्रम्हदेव मानतो . ते साक्षात ब्रम्हदेवाचा अवतार होते . पण तेच जर म्हंटल कि अली हा सुध्दा एक ब्रम्हदेवाचा अवतार झालेला आहे तर लगेच लोक माझ्यावर मारायला धावतील . पण जर मुसलमानांना सांगितलं कि तुमचा जो देव अली  होता हाच सोपानदेव आहे , आणि हाच ब्रम्हदेवाचा अवतार होता  तर झालं च . पण खरी गोष्ट हि आहे कि तुम्ही लागलं तर अली च नाव घ्या ,सोपानदेवाचं नाव घ्या नाहीतर ब्रम्हदेवाच नाव घ्या ,इथे जर कुंडलिनी अडकलेली असली तर ती वर चढणार नाही . हि त्याची ओळख आहे , आणि दिसेल ह्या डोळ्यांनी तुम्ही बघाल कुंडलिनीच स्पंदन तुम्ही बघाल तीच चढण तुम्ही बघाल इथून वरून येन तुम्ही बघाल . पण ज्या लोकांमध्ये काही अटकाव नाही आहे त्यांची कुंडलिनी सटकन चढते वरती काही दिसत नाही काही नाही एकदम होत . पण ज्यांच्या मध्ये काही त्रास आहे समजा शारीरिक ,मानसिक कसलाही त्रास असला तिथे कुंडलिनी थांबते आणि धक्के मारते . पण तुम्हाला काहीही त्यांनी त्रास होत नाही . तुम्हाला काहीही दुखावत नाही ,तुमच्यावर परिणाम काही होत नाही . पण दिसायला दिसत कि इथे चालली आहे कुंडलिनी इथे पाठीच्या कण्यावर दिसते . हि शक्ती डोळ्यांनी दिसते . त्याची सिद्धता आहे . आता जे आम्ही म्हणतो त्याची सिध्दता देऊ शकतो . आता त्याच्या वरच जर चक्र आहे त्याला आम्ही म्हणतो नाभिचक्र . त्याला मणिपूर असही  नाव आहे .

आणि ह्या चक्रावरती  श्री लक्ष्मी नारायणाचं स्थान आहे . म्हणजे जेव्हा कुंडलिनी या चक्रावरती येते तेव्हा लक्ष्मीचा प्रसाद मिळतो . आता आपल्या देशामध्ये एव्हडी गरिबी का आम्ही जर एव्हडे साधुसंत झालो . तर गरिबी का ?प्रश्न बरोबर आहे . पण जे भामटे आहेत त्यांना इथे गोदावरीत बुडवून टाका मग येते कि नाही बघा लक्ष्मी . ह्या भामट्यांच्या आहारी जाऊनच लक्ष्मी पळालेली आहे . कारण हे तुमच्यामध्ये भूत घालतात . तुमच्यात बाधा घालतात . इकडन भूत घातली कि तिकडन लक्ष्मी काढता पाय घेते . आणि त्याच्या ह्या अंधारा मुळेच लक्ष्मी काढता पाय घेते . जर आपण हे डोक्यात घेतलं कि यांच्या मुळे आपल्यामध्ये भूत  येतात आणि ह्या लोकांनी आपल्या लक्ष्मीला आव्हाहन केलेले आहे आणि ती इथून पळालेली आहे आणि जर आपण हे सोडलं तर बघा परत लक्ष्मीचं राज्य येत कि नाही ते . सगळ्यात आपल्या देशामध्ये गरीब देश जर असेल तर तो केरला आहे . केरला देशात जाऊन मी बघितलं कि ह्या देशात एव्हडी गरिबी का आहे ?दुसरा मग बिहार . तर केरळाला मग असं आपल्या स्वतःच्या राहण्याच्या घरातच सगळेजण प्रेत पुरतात . घरातच गावातच . स्मशान भूमीत जायला नको घरातच तिथे त्याला पुरून टाकतात . मग अशा लोकांच्या घरा मध्ये लक्ष्मी राहणार आहे का . आपल्या शास्रात असं आहे कि जो माणूस आत्मसाक्षात्कारी नाही त्याला जाळूनच टाकलं पाहिजे .जो  आत्मसाक्षात्कारी  त्याच्या कबर केली पाहिजे ,त्याला जमिनीत घातलं पाहिजे . कारण त्यांनी जमिनीला सुगंध येतो . त्या लायकीची आहेत हि लोक . बाकी जेव्हडे आहेत त्यांना मात्र तुम्ही जाळून टाका . पण हे लोक वाट्टेल ते आपले नातलग मेला ,अमका मेला ,तमका मेला याला त्याला गाड माझ्या जमिनीत असं करतात . आणि म्हणे कि जर पाहिलं तर आमच्या ह्या जमिनीत तुम्हाला हवं असेल तर पाचशे फूट अशी एकावर एक प्रेत पडली आहेत . असं का म्हंटल ,चांगलं आहे . तिथे मी गेले तर माझं डोकंच फिरायला लागलं ,भूतांचच राज्य दिसतय मग कशाला लक्ष्मी राहते तिथे . आणि इतकी गरिबी त्यांची आहे कि ते तिथून मग बिहार ला गेले . आणखीन इकडे तिकडे अरब देशांमध्ये नोकऱ्या करायला गेले . तिथे गरिबी अली यांच्या मुळे . बिहार मध्ये तसच आहे तिथे अत्यंत गरिबी आहे त्याला कारण हि भूत आहेत . कोकणात गरिबी आहे . कारण कोकणात पण हि काम फार आहेत . काली विद्या ,अमुक तमुक हे खूप प्रकारचं आहे . काहीतरी गंडेदोरे बांधा .काहीतरी मंत्र घालायचे ,मांत्रिक तांत्रिक हे सगळं खूप आहे . आणि हे सगळं झालं कि म्हणायचं कि आम्ही म्हणे कुंडलिनीच कार्य करतो . भूतांची काम करायची आणि देवाचं नाव घ्यायचं . कुंडलिनी हि शुध्द इच्छा आहे . असा माणूस शुध्द असायला पाहिजे . 

त्याच्यात शुध्दता असली पाहिजे . उद्या तुमच्या कडून चार पैसे लुबाडून मी जर माझ्यासाठी दागिने केले तर मी काय शुध्द माणूस आहे का ?किंवा जर तुम्हाला खोट बोलून फसवून तुमच्याकडून मी काहीतरी करून घेतलं तर मी शुध्द माणूस आहे ?माझं आयुष्य कस ते तरी पाहायला पाहिजे ना . जर मी वाईट मार्गाने वागत असले ,दारू पीत असले ,अमूक करत असले ,तमुक करत असले आणि त्याच्यावर मी मोठी साधू साध्वी बनून फिरत असेन तर ते तुम्ही ते मान्य करायला पाहिजे का ?हा तर एक विचार असायला पाहिजे कि जे साधुसंत आहेत त्यांचं आयुष्य कस आहे . त्यांचं वागणं कस आहे . त्यांची अंतरिकता कशी आहे . प्रेम आहे कि नाही . खोटा आव आणतात का ते . जे खोटारडे लोक आहेत त्यांना साधुसंत मानल तर ते अशा खोट्या गोष्टी करून तुमच्या लक्ष्मीला पळवतात . आणि अशा रीतीने आपल्या देशात फार गरिबी आलेली आहे . आता मेक्सिको ,पेरू मध्ये मी पाहिलं मला आश्चर्य वाटलं कि त्या देशांमध्ये एव्हडी काली विद्या कशी . आता लंडन ला सुध्दा आहे . लखनौ ला आहे . भयंकर काली विद्या आहे . बसलेत दारोदार अमका बाबाजी तमका बाबाजी . सगळे बसलेत . इथे सुध्दा बसलेत . म्हणजे इकडून गेलेले नाहीत . इकडून सुध्दा पुष्कळ लोक गेलेत . पण तिकडे त्याच्याहून जास्त लोक आहेत . आणि त्या मुळे लक्ष्मीचं साम्राज्य जात कारण हि कुंडलिनी जी हि इथे नाभीवर पडलेली आहे ती खराब होऊन जाते . आता आपल्याला याच शास्त्रपण समजलं पाहिजे . 

आता आपल्याकडे सगळ्यात मुख्य म्हंजे गणपती तर आहेच पण दत्तात्रय ,दत्तात्रयाला आपण एव्हडं मान्य करतो . शुध्द मानतो . हा दत्तात्रय या इथे महाराष्ट्रात उभा राहिलेला आहे . आता दत्तात्रयाचे आम्ही भक्त आहोत आणि पोट दुखत आमचं म्हणजे काय ?दत्तात्रय चारीकडे पसरलेले आहेत इथे . दहा त्यांची स्थळ आहेत ,ते जे निळं निळं दिसतंय त्या भवसागरा मध्ये दत्तात्रयांचं स्थान असून सगळ्या दत्त भक्तांना पोटात का दुखत ?विचारा त्यांना . कुठल्याही माणसाला सांगितलं आले माझ्याकडे आणि म्हणतात माताजी माझ्या पोटात दुखत . काहो दत्तभक्त का तुम्ही ?हो . झालं ,आता दत्तात्रयाचे भक्त असून तुमची पोटाची दुखणे ठीक करायच्या ऐवजी पोटात का दुखत ?कारण दत्ताशी तुमचा काहीही संबंध नाही आणि अधिकार पण नाही . तुम्ही आपलं दत्त दत्त करून त्याला त्रास देता . आधी दत्ताशी संबंध व्हायला पाहिजे . जस मी म्हंटल कि एखाद्या पंतप्रधानांशी तुम्हाला संबंध करायचा असेल तर तुम्हाला काहीतरी मध्ये संबंध करावा लागतो ,त्यांच्या पर्यंत पोहचावं लागत तेव्हाच तुम्ही बोलणार . तुम्ही जर नुसतं नाव घेत बसले तर पोलीस धरणार . पण दत्त म्हणजे काय ?त्यांच्या पायाच्या धुळी बरोबर तरी कुणी आहेत का . पंतप्रधान साठी एव्हडं करावं लागत तर मग ह्या दत्तांसाठी ,उठला तो दत्तगुरु दत्तगुरु करत फिरतो . अहो श्री दत्त तरी म्हणा म्हंटल . काय तुमचे नोकर आहेत कि काय सगळे . असा विचार करून त्यांना नमस्कार करून अत्यंत नम्र पणाने शिकल  पाहिजे कि याना जागृत कस करायचं . आपल्या मध्ये दत्त कसा जागृत करायचा . हे शिकले पाहिजे . उठल्या सुटल्या देवाचं नाव घेणं हा काही देवाचा मान नाही झाला . तुम्ही लक्षात घ्या उठल्या सुटल्या आपण कुणाचं  नाव घेतो का ?आपल्याकडे अशी पद्धत अशी पद्धत असते आपण वडिलांचं नाव घेत नाही . आईच नाव घेत नाही . नाहीतर आपण आपल्या वडलांना जर अरे ए बंडोबा अशी हाक मारली तर लोक म्हणतील तू याचा बाप कि तुझा बाप तो . पण देवाच्या बाबतीती तस नाही देवाच्या बाबतीत जर आपल्याला त्याच्या बद्दल श्रद्धा असली त्याच्या बद्दल आपल्याला आसक्ती असली आणि त्याच्या बद्दल आपल्याला आदर असला तर आपण विचार करू कि परमेश्वराचं नाव ह्या जिभेनी घ्यायचं म्हणजे काहीतरी अधिकार असायला पाहिजे आपल्याला . मग आहे का असा अधिकार आपल्याला ?आपण एक नम्र पणे असा विचार केला पाहिजे . तस न करता बस आपले नाव घेत ओरडत बसले . 

आता हेच लोक म्हणतात कि जो श्री कृष्ण सगळ्यांना धनधान्य देणारा असा कुबेर आहे ,ज्यांनी सुदाम्यासाठी सोन्याची संबंध द्वारिका उभी केली असा तो श्रीकृष्ण त्याच नाव घेत विठ्ठल विठ्ठल करत फिरता . तर काहो आमची तब्बेत का खराब होती हो माताजी . त्याच कारण मी आता सांगणार आहे आणि सांगितलं तर तुम्ही लोक उठून जाल . पण लगेच लक्षात येईल तुमच्या कि जे विठ्ठल विठ्ठल करत जातात ते खातात काय रस्त्यानी ?जे खातात ती राक्षसीण आहे . कारण त्यांनी घसा ,पोट सगळं खराब होत . राक्षशिणीला पोटात घ्यायचं आणि देवाचं नाव घ्यायचं कस होणार मग . पण आपल्या महाराष्ट्रात लाट आहे याची . पण एकदा जर का तुम्ही पार झाले कि सगळं सुटणार एकदम . हे आश्चर्य आहे . सगळं सुटून जात कारण आत्म्याच्या प्रकाशात हा साप आहे तो दिसतो ना . आणि म्हणूनच हि जी कुंडलिनीची शक्ती आहे ती जागृत करून घेतली पाहिजे . त्याच्या शिवाय नुसतं लेक्चर द्यायचं अरे तुम्ही दारू पिऊ नका ,तुम्ही असं करू नका याला काही अर्थ नाही . त्या पेक्षा तुम्हाला जागृत करून देते ,तुम्हाला समर्थ करून देते . सम अर्थ म्हणजे तुमचा जो अर्थ आहे तो तुम्हाला लागला पाहिजे . ते एकदा तुम्ही झाले कि तुम्ही आपोआपच सगळं करणार ,तुम्ही स्वतःचेच गुरु होणार आणि सगळं बघणार . फक्त ते वृद्धिगत झालं पाहिजे . ते वृद्धिंगत झालं आणि त्या स्तीतीला तुम्ही पोहोचलात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कि तुम्ही कितीतरी गोष्टींना प्राप्त व्हाल याची तुम्हाला स्वप्नात सुध्दा कल्पना अली नसेल . 

आता त्याच्या वरती जे चक्र आहे ते आपल्याला दिसत आहे म्हणजे मी अगदी हे थोडक्यात सांगते पण अत्यंत विशद पण तुम्हाला कळू शकेल नंतर . आता नाभी चक्रावर जे चक्र आहे त्याला आपण अनाहत चक्र म्हणतो . हे मधोमध आहे हे जगदंबेच स्थान आहे . आणि हि जी जगदंबा आहे हि ह्या भवसागरातून जेव्हडे भक्त तिचे ,तिची मुल जेव्हडी पार होतात त्यांचं ती रक्षण करते . त्यांना संरक्षण देते . त्यांच्या वरती काही घाला नाही आला पाहिजे . आणि त्या हेच्या मध्ये त्या कार्या मध्ये ती संपन्न आहे . ती एकटीच सगळ्या राक्षसांशी भांडून ,हे करून ते करून तुमचं संरक्षण करते . जेव्हा हे चक्र धरत तेव्हा तुम्हाला भीती असते . मेडिसिन च ज्या प्रमाणे आमचं शास्त्र आहे त्याच्या मध्ये म्हणतात कि बारा वर्षाच्या वया पर्यंत या ठिकाणी जे स्टर्नम म्हणून जे हाड आहे त्याचा मध्ये अँटीबॉडीज म्हणून तयार होतात . म्हणजे हे काय आहे आपल्या मध्ये ते भ्रमर आहे . तिला भ्रमरम्बा म्हणतात ती भ्रमर आहे . ते तयार झाले म्हणजे ते युद्धाला सज्ज असतात . कोणच्याही प्रकारची प्रकुर्ती बिघडली किंवा मानसिक त्रास झाला ,कुठूनही बाहेरून समजा आपल्यावरती कोणाचाही ऍटॅक आला ,कुणी आपल्यावरती हल्ला केला तर त्या हल्ल्याला तोंड देण्याची शक्ती ह्या भ्रमरा मध्ये असते . आणि हे भ्रमर त्यांना आपण अँटीबॉडीज म्हणतो ते भांडून त्यांच्याशी लढतात ,त्या रोगांशी लढतात ,कोणच्याही हल्ल्या बरोबर लढतात आणि आपल्याला परत सुरक्षित करतात . पण जेव्हा हे चक्र धरलं जात तेव्हा माणसाला एक तऱ्हेची भीती असते . एखाद्या मुलाची आई लहानपणी वारली त्याला कळत नाही पण तो मोठा होतो तेव्हा त्याच्या मध्ये ती दिलेरी येते. आता आपल्याकडे शिवाजीला आपण फार वीरपुरुष म्हणतो कारण त्याची आई अत्यंत वीरश्री पूर्ण बाई होती . आणि त्याच्या मुळे त्याच्या मध्ये ती शक्ती अली होती . आई पासून शक्ती येते . आणि हे चक्र धरलं गेलं तर त्याच्या मुळे अनेक प्रकारचे कँसर वैगेरे सुध्दा रोग होऊ शकतात . आता ह्या चक्राला सुध्दा दोन बाजू आहेत एकीकडे श्रीरामाचे आहे आणि दुसरीकडे पार्वतीचे आहे . आणि हृदयामध्ये मात्र आपल्या शिव आहेत आणि शिव तोच निर्गुण आत्मा आहे . ह्या शिवाला स्थान दिलेलं आहे त्याच आपल्या इथे सहस्रारावर ,टाळूवर सदाशिवाचं स्थान आहे . आणि ते सदाशिवाचं स्थान आपल्या हृदयामध्ये शिव म्हणून आपला आत्मा म्हणून प्रतिबिंबित झालेलं आहे . तेव्हा जेव्हा कुंडलिनी अशी वर ऊर्ध्व गतीला जाते तेव्हा ह्या सदाशिवाला जागृती येते ,तो जागृतच आहे पण जसकाही त्याच तेज आहे ते आपल्या हृदयात झाकोळले गेल्यामुळे आपल्याला चैतन्याच्या लहरी जे म्हणजे परमेश्वराची ,सदाशिवाची प्रेमशक्ती आहे ,जीनी सर्व कार्य संसारातील होत जिला आपण ब्राम्हशक्ती असं म्हणतो ती शक्ती आपल्या हातात वाहू लागते . आणि आपल्याला चारीकडे ती आहे सूक्ष्मात हे कळत . कारण आपणच सूक्ष्म होऊन जातो . सूक्ष्म जे आहे ते नुसतं बोलून होत नाही व्हावं लागत आणि ते बोध आपल्या नसांवर कळलं पाहिजे . आपण म्हणतो ना भरीन बोधाची परडी . बोध म्हणजे काय ?कि एखाद्यानं लेक्चर द्यायचं ते नाही . आपल्या ह्या नसांवर ज्याला आपण सेंट्रल नर्व्हस सिस्टम म्हणतो त्या नसांवर आपल्याला त्याचा अनुभव आला पाहिजे . कि चारी कडे हि शक्ती आहे . आणि जेव्हा त्या नसांवर आपल्याला जाणवत कि ती शक्ती आहे मग फक्त ते वापरायचं कस ते शिकायचं . त्याला शिक्षण लागत नाही त्याला पदव्या लागत नाहीत पैसे लागत नाहीत काही फालतूंच मोठेपण लागत नाही . हृदयाचं मोठेपण असलं आणि जर तुम्ही भक्त असलात तर हे घटीत होत . आता आमच्यात मी म्हंटलय आमचे शेतकरी वर्गात आमचे जास्त शिष्य आहेत . कारण साधीभोळी लोक ,दुसरं देवावरती भक्ती फार ,तिसरं ह्या जमिनीशी संबंध हेच्या मुळे फार लवकर पार होतात . आणि एकदा झाले म्हणजे जाऊन स्तीत च होऊन जातात . आणि अगदी कबिरा सारखं त्यांचं बोलणं ,नानका सारखं त्यांचं वागणं बघून मला आश्चर्य वाटत . 

याच्या वर आता जे चक्र आहे ज्याला आपण विशुद्धी चक्र म्हणतो . हे विशुद्धी चक्र फार महत्वाचं आहे . कारण ह्या विशुद्धी चक्राची पहिली ओळख हि आहे कि माणसांनी आपलं डोकं जेव्हा असं वर केलं तेव्हा तो जनावरा तुन  माणूस झाला .तेव्हा हे विशुद्धी चक्र आपलं जे आहे ते प्रगल्भ झालं . आणि त्याची प्रगल्भता जी आहे ती आपण  अशा साठी मिळवली आहे कारण तिथे स्वतः साक्षात श्री कृष्णाचा  वास आहे . श्री कृष्णाचा वास इथे आहे आता विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण सारखे जे ओरडत असतो त्यांनी विठ्ठल जागृत होणार नाही . उलट दुखवून इथे त्रास होतो . पण जर का तुमचा संबंध त्या विठ्ठलाशी खरा झाला तर एकदा नाव घेतलं कि झालं दहादा नाव कशाला घ्यायचं एव्हडं मोठं . एकदा नाव घेतलं कि झालं ,नुसतं त्याच्या चिंतनाने सुध्दा लोकांचं भलं करू शकता तुम्ही . आणि यांचे सर्व रोग जाऊ शकतात . आता नाशकाला याचे फार त्रास आहेत असं मला वाटत . कारण माझा सुध्दा आज घसा बसला . त्यामुळे नाशकात पण जबर दिसतंय काम त्यामुळे मेहनत करायला पाहिजे . तर हा इथे श्रीकृष्ण इथे बसलेला आहे . पंढरपुरात त्यांनी दर्शन दिल पण बसला आपल्यामध्ये इथे आहे . जो पर्यंत इथला श्रीकृष्ण जागृत होत नाही तो पर्यंत पंढरपूरला जाऊन तुम्हाला काहीही समजायचं नाही . ते बडवे बसलेत ना मध्ये . तुम्ही स्वतः त्याला जाणलं पाहिजे इथे कि हा श्रीकृष्ण कोण आहे ?आणि आश्चर्य बघा कि प्रत्येक चक्रांवर ज्याज्या देवता आहेत आणि जेव्हडी त्यांची दल आहेत ,तशी इथे सोळा दल आहेत . ह्या सोळा दलावरती श्रीकृष्णाचं अधिपत्य आहे आणि आपण त्याला नेहमी म्हणतो कि पूर्ण कला . सोळाहजार त्याच्या बायका होत्या . म्हणजे कोण ,सोळाहजार त्याचा शक्त्या होत्या त्याच्या ज्या त्याने बायकांच्या रूपात त्याने मागवल्या . आणि लग्न करून घेतलं . आता आमची म्हणे आम्ही मुल आहोत . पुरुषाला हेच बर होत ,साक्षात पुरुष आहेत ते . तेव्हा त्यांनी म्हंटल सोळाहजार शक्त्या माझ्या  मी वापरायच्या तर कशा ,तर सोळाहजार बायका करून घेतल्या . तर त्याला म्हणायचं असं कस तुमच्या कृष्णाला तर सोळाहजार बायका ,पण तुम्हाला त्याच्यातलं काही कळत का ?गुप्तातल गुप्त ,सौम्यतल सौम्य आणि सूक्ष्मातल सूक्ष्म . त्यातलं काही तुम्हाला समजत का ?काहीतरी वरवर बघायचं सामान्यातलं . पण त्यातलं असामान्य कळत का तुम्हाला ?असा तो श्रीकृष्ण ह्या ठिकाणी जागृत केला पाहिजे . त्याच्यावर मग इथे आज्ञा चक्र आहे . 

इथे बुध्द आणि महावीर आहेत . उजवीकडे महावीर आणि डावीकडे बुध्द बसलेले आहेत . कारण डावीकडून आलेली जी शक्ती आहे ती इथे जाते तिथे महावीर बसलेले आहेत . ते आपल्यावर येणाऱ्या सर्व काही मानसिक त्रासांना दूर करतात . आणि आपल्या कडे अहंकारापासून आलेले जेव्हडे त्रास आहेत त्याला इकडे बुध्द  करतात . आज्ञा चक्रा वरती ख्रिस्त बसलेले आहेत . ख्रिस्त हा दुसरा तिसरा कुणी नसून श्रीगणेशाचाच अवतार आहे . हे आम्ही सिध्द करू . म्हणूनच तो पाण्यावर चालला कारण ओंकार होते ते . हा काही ख्रिश्चन लोकांचाच नाही तर आपल्या सगळ्यांचाच आहे . आता त्याचे वाभाडे काढत बसले ख्रिस्ती लोक जशे आपण सुध्दा रामाचे काढतो तसे ते ख्रिस्ताचे काढत आहेत . प्रत्येकाच्या धर्मात प्रत्येकाने हे ठरवलेलं आहे कि आमचा जो कोणी धर्माचा संस्थापक आहे त्याचे चांगलेच वाभाडे काढायचे . त्याच्या बद्दल माहिती कशी आम्ही सांगतो कि हि आम्ही सिध्द करून दाखवतो . जर तुम्ही खरे पणाला धरत असाल आणि तुमच्यात खरे पणा असला पाहिजे . तर ते खर करून दाखवलं पाहिजे . त्यात आम्ही काहीही वादविवाद करू शकत नाहीत . ते आम्ही सिध्द करून दाखवतो . जर कुंडलिनी इथे थांबली आणि जर ख्रिस्ताच नाव नाही घेतलं तर कुंडलिनी चढायची नाही . डाव्या बाजूला गेली असली तर बुध्दाच नाव घ्यावं लागेल आणि उजव्या बाजूला गेली असेल तर तुम्हाला महावीरांच नाव घ्यावं लागेल . तुम्ही जैन असो व नसो . तुम्ही मुसलमान असो व नसो तुम्हाला पोटामध्ये त्रास झाला तर मोहंम्मद साहेबांचं सुध्दा नाव घ्यावं लागेल . म्हणून त्याला आम्ही विश्व धर्म म्हंटलेले आहे कारण यांच्यात सर्व देवदेवतांना मानलं आहे . हे सगळे एकामध्ये एक गुंतलेले जीव आहेत . सगळ्यांचं आपापसात नातं आहे . आपणच मूर्खां सारखे भांडतो आहे . मूर्खपणा हा एक माणसालाच गुण दिलेला दिसतो आहे मला . इतर कोणत्या जनावरात हा गुण दिसत नाही मला . आणि तो मूर्खपणा आला कशामुळे तर अतिशहाणपणा मूळे . आणि अतिशहाणपणाला ज्याला  आणखीन पैशाची जोड आली कि मग प्रत्येक गोष्ट पैशाने तोलायची . 

मी तिकडे गेले होते बोस्टन ला तर तिथल्या पत्रकाराने विचारलं कि तुमच्या कडे किती रोल्सरॉईस आहेत ?तर लोक म्हणाले त्या काही पैसे बैसे घेत नाहीत त्यांच्या ज्या आहेत त्या आहेत त्यांच्या नवऱ्याच्या . त्या पैसे घेत नाहीत . मग म्हणे आम्हाला काही इंटरेस्ट नाही रोल्सरॉईस असतील तर सांगा त्या असतील तर तुमचा बिजनेस आहे मग नाहीतर नको . मग आता ते रोल्सरॉईस वाले आले इकडे पळत समाधी घ्यायला . हि इतकी लोकांची प्रवृत्ती पैशाकडे गेली आहे कि प्रत्येक गोष्ट पैशावर तोलायची . ह्या माणसाला किती पैसे मिळाले . मग ते उलटही चालत . परवा ,आता आम्ही ज्या घराण्यातले आहोत त्या मानाने आम्ही दोन दागिने घालणारच . कारण त्या घराण्यातले आम्ही आहोत तर काय करायचं . जर आम्ही संन्याशाच्या घरातले असतो तर संन्यास्या सारखं राहिलो असतो . तर कुणी बघितलं कि माझ्या नाकात हिरा आहे त्याच्यावरच टीका . त्यांनी नाकात का हिरा घातला होता म्हणे . म्हणजे काय ,तुमचा घेऊन घातला होता का ?आमच्या घराण्याचं आहे ते . घालावं लागत आम्हाला . तर आम्ही घालणार . म्हणजे इकडेही बोलायचं आणि तिकडेही बोलायचं . म्हणजे एकूण काय कि जे सिध्द आहे ,जे खर आहे ,जे मुख्य आहे ते कस खोडून काढायचं ,त्याला कसे फाटे फोडायचे . हा माणसाचा एक विशेष धर्म आहे . म्हणजे कुणाचं भलं नाही झालं पाहिजे . कारण सत्यानी भलं होणार . आत्म्यानी आनंद होणार ,लोकांना सुख मिळणार ,शांती मिळणार . मग वर्तमानपत्रात कस देणार इथे लढाई झाली तिथे लढाई झाली . कारण ती होणारच नाही . 

मग हे लिहायचं आमची वर्तमानपत्र आहेत सहजयोगामध्ये त्याच्यात हे लिहितात कुणाला काय चमत्कार झाला ,परमेश्वराने कशी मदत केली ,कस कुणाचं प्रेमाचं भेटणं झालं ,कसे लोक भेटले . हे दुसरं सुरु होत . आमच्या वर्तमान पत्रात हेच लिहितात कि एक मुलगी गेली सिसिलीला . तिथे एकटीच बसली होती ,तिला हिरमुसल्या सारखं झालं . तिथे कुणालाच काही सहजयोग समजत नाही . परमेश्वर म्हणजे काय माहित नाही ,एकटेच बसले होते . इतक्यात तिला असं वाटलं कि कुणीतरी आलं बाबा इकडे . आनंद झाला तिला . इकडे तिकडे ती बघते तर दुसरी येऊन तिला म्हणते का ग तुला माताजी नि पार केलं आहे का . हो म्हणे . ती कुठली मुलगी तर फ्रांस ची . ती तिथे सहजच गेली होती . इतक्या कडकडून मिठ्या मारल्या त्यांनी त्याच वर्णन तुम्ही ऐकलं तर डोळ्यात पाणी येईल . तेव्हा पेपरात आम्ही दिल म्हणजे प्रेमाच्या गोष्टी . शुध्द प्रेमाच्या . आता हि मंडळी अली एके काळी ह्यांनी राज्य केलं ,तुम्हाला सांगितलंच कि आमच्या सर्व घराण्याला त्रास दिला . मला सुध्दा बर्फावर घातलं ,माझ्यावरती सुध्दा विजा घातल्या सगळं काही केलं  ह्या इंग्रज लोकांनी पण आज त्यांच्याच मुलांचा मी उद्धार करते आहे इथे येऊन . ते हि फुकटात . का ?कारण प्रेमाची गोष्ट आहे . आणि प्रेमाला मुख्य समजलं पाहिजे कि क्षमा केली पाहिजे . परमेश्वराने माणसाला क्षमा नाही केली तर त्याला कस मिळवणार तुम्ही . परमेश्वर कसा येणार माणसाकडे जो पर्यंत क्षमा नाही करणार . क्षमे शिवाय तुमच्या जवळ कस यायचं . क्षमा हि केली पाहिजे कितीही चुका केल्या तरी क्षमा हि केली पाहिजे . आणि क्षमेच्या पोटीच सगळं काही मिळत . आणि हे क्षमेच स्थान तुमच्या इथे आज्ञा चक्रावर आहे . आज्ञाचक्रावर मी नेहमी म्हणेन तुम्ही स्वतःला क्षमा करा दुसऱ्यांना क्षमा करा ,क्षमा करत जायचं . असं म्हणा क्षमा करणं  नाही करण  हे सुध्दा एक थोतांड आहे . कारण काय करता तुम्ही क्षमा नाही करत किंवा करत काहीच करत नाही . पण होत काय कि तुम्ही जर म्हणालात कि मी त्याला क्षमा नाही करू शकत कारण त्यांनी असं छळ लेले आहे ,माझं असं केलेलं आहे . म्हणजे तुमचं डोकं खराब होत कि नाही . उगीचच दुसऱ्या लोकांच्या आहारी जाता . म्हणून क्षमा हि केली पाहिजे . आणि क्षमा केल्याने माणूस शांतीला प्राप्त होतो . हे स्थान त्या क्षमेच आहे . 

त्याच्या नंतर सहस्त्रार चक्र वरती टाळूवर . सहस्त्रार म्हणजे हे भेदन आहे . अजून पर्यंत सहस्रारा बद्दल कुणीही काही सांगितलेलं नाही . पण हजारो पाकळ्या यांच्यात आहेत कुणी याला सहस्त्रार म्हणतात . आणि त्याचे विभिन्न रंग आहेत . आणि जेव्हा त्या पाकळ्या उघडतात आणि त्याच्यात प्रकाश येतो तेव्हा अनेक जशे काही जोती पेटल्यासारख्या ,त्याला बायबल मध्ये ट्न्ग्ज ऑफ फ्लेमज असं म्हंटल आहे . अशा कमळा सारख्या अशा जिवंत पण अगदी शांत ,सुंदर अशा दिसतात . हि कुंडलिनी सुध्दा ,त्यांनी सांगितलं आहे ना सर्पाचे पिल्लू कुंकुमे नाहीले ,तर ते कुंकू सुध्दा कस लाल लाल दिसत . लाल आणखीन त्याच्यामध्ये अगदी काही तापलेले असल्या सारखे . आणि ती कशी ओढल्या सारखी अगदी खटाखट ओढल्या सारखी दिसते . आणि ती जेव्हा आपल्या ह्या टाळूतून निघते तेव्हा गारगार असं वार हातात येऊ लागत . आधी गरम येत पुष्कळ लोकांना मग गार येत . त्याला आदी शंकराचार्यांनी सलिलम सलिलम म्हंटल आहे . थंडथंङ असं येत . पण त्या आदी शंकराचार्याला सुध्दा त्रास द्यायला कुणी चुकलं नाही . त्यांनाही खूप छळलं ,त्यांच्या आईला अग्नी द्यायला तर लोक म्हणाले तुम्ही नाही देऊ शकत अग्नी तिला . कारण तुम्ही संन्यासी आहात . हे कोण ठरवणार पण ?. तर त्यांनी केळाच्या पानांनी आणि केळाच्या झाडांनी तिला अग्नी दिला . आणि सांगितलं ,त्यांनी शाप दिलाय त्या देशाला कि तुम्ही तुमच्या देशात तुमच्या लोकांना घरातच पुराल . जाळू नाही शकणार . तुम्ही माझ्याऐ बरोबर माझ्या बरोबर अशी जबरदस्ती केलेली आहे . अशा महान पुरुषांना कि जे हिंदू धर्माचे संस्थापक आहेत त्यांचा बरोबर सुध्दा हा जुलूम आणि तेही जातीचे ब्राम्हण असताना सुध्दा त्यांना केव्हडा त्रास दिलेला आहे . आज त्यांचेच आपण गन गातो त्यांच्याच कविता गातो पण त्याच्या बरोबर आपण काय केलं ?आता त्या केरला मध्ये मी गेले होते तर तिथे पत्रकार आले त्यांनी हे लिहिलं कि माताजी जिथे बसल्या होत्या तिथे खाली इथून तिथून सगळी कार्पेट पसरली होती . मला तर दिसली नाहीत म्हणा . कारण त्यांनी एका हॉटेल मध्ये माझा इंटरव्हयू घेतला . तर त्या हॉटेलची कार्पेट असतील तर   त्या हॉटेल वाल्याला असं म्हणायचं का कि तू ती कार्पेट काढून तिथे भस्म टाक म्हणजे मी भस्म फासून काहीतरी बाबाजी बनून बसते . म्हणजे त्या पत्रकारांना बर वाटलं असेल . अशा म्हणजे व्यर्थ नको त्या गोष्टी कडे लक्ष आपलं जात . आणि म्हणूनच हे जे भेदन आहे ते राहत . या भेदनाला दोन्हीकडे एकीकडे अहंकार आणि दुसरीकडे मनःशक्ती म्हणतात . अशा दोन तऱ्हेच्या शक्त्या ज्या आहेत त्या एखाद्या फुगाऱ्या सारख्या होतात आणि त्यांनी ती संबंध शक्ती जी आहे ती दाबून राहते . म्हणजे उजवीकडून अहंकार असा येतो आणि इकडून म्हणजे डावी कडून प्रतिअहंकार म्हणजे मनःशक्ती अशी येते . ह्या दोन्ही शक्त्या अशा आल्या मुळे आपली जी टाळू आहे घट्ट जमते . पण जेव्हा कुंडलिनी टाळूला स्पर्श करते तेव्हा ह्या टाळूला लहान मुलांना कस इथे नरम असत तशी हि टाळू नरम होऊन जाते . आणि अव्याहत अशी हि जी शक्ती आहे ती वाहू लागते . तेव्हा तुम्ही कितीही कार्य केलं काहीही केलं तरी तुम्हाला थकवा येत नाही ,तुमची तब्बेत चांगली रहाते ,तुमच्यावर लक्ष्मीचा वर्षाव होतो ,तसच तुमच्यावर अत्यंत क्रियाशीलता येते . आणि सर्व तऱ्हेची तुमच्यामध्ये एक विशेष व्यक्तित्वाची झळक येते . आणि असं तुमचं व्यक्तित्व होत कि कर्तृत्वान ,बुद्धिवान ,आणि सुज्ञ . त्यात नम्र असं तयार होत . 

सांगायचं म्हणजे इतके नम्र असतात कि हे जेव्हडे भामटे लोक आहेत ज्यांच्या जवळ काहीही नाही ,काही कुंडलिनी कशाशी खातात हे माहित नाही ,ज्यांनी मोठमोठाले काढलेले आहेत आपले मठ वैगेरे . पण हे बघा हे समोर एव्हडे पोहोचलेले लोक आहेत त्यात काही वकील आहेत डॉक्टर आहेत काही आर्किटेक्स आहेत त्यांनी काही असल काढलं नाही . हि नम्रता बघा . कि जेव्हा लोक येतील त्यांना आम्ही देऊ त्यांना आम्ही पार करू . पण आता परदेशातून सगळं आलं मग आता सहजयोग सुध्दा परदेशातून यावा तर आता काय म्हणावं ?. आता हे तुमचं आहे हा तुमचा वारसा आहे . तो जर परदेशातून आला तर खरोखर आपण भारतीय लोक कमालीचे आहोत असं म्हंटल पाहिजे . तिथल्या वर्तमान पत्रात कितीतरी आमच्या बद्दल छापण्यात आलं हि फार मोठी गोष्ट आहे . तिथले मोठमोठाले लोक मला येऊन भेटतात आणि हे कस ध्यान करायचं आणि काय करायचं ते विचारतात . पण आपल्या कडे त्या बद्दल काहीच नाही शहरांमध्ये तर काहीच नाही . खेडेगावात मात्र खूप जोरात कार्य सुरु आहे . आणि जिथे जिथे कार्य सुरु झालेलं आहे तिथे तिथे लोक सुसंपन्न झाले . त्यांचं चरित्र सुधारलं त्यांच्या सवयी सुटल्या . आणि आनंदाच्या सागरात आम्ही पोहोत आहोत अशी नेहमी ते पत्र पाठवतात . तेव्हा हे सगळं आपल्याला घटीत व्हावं आपली कुंडलिनी जागृत व्हावी आपलं ब्रम्हरंध्र छेदन व्हावं त्यातून वाहणारी चैतन्य शक्ती ती तुमच्या बोटा  बोटातून वाहिली पाहिजे आणि तिचा बोध तुमच्या बोटांवर तुम्हाला झाला पाहिजे हि एक माझी शुध्द इच्छा आहे . त्या साठी काय वाट्टेल ते झालं तरी मी मेहनत करायला तयार आहे . पण नाशकाच्या बाबतीत असं वाटत कधी कधी कि मुंबईला हजारो लोक पार झालेले आहेत आणि मुंबा नगरी म्हंटल तर पुष्कळ मोठी आहे ,म्हणजे अंबेची आई तिथे आहे म्हणजे मुंबई ती झाली . पण इथे सुध्दा काही कमी नाही सप्तश्रुंगी बसलेली आहे तरी सुद्धा तिच्या छत्रछाये  खाली इतका अंधेर आणि इतका धर्मवेडेपणा कसा  चालतो ते मला कळत नाही . तरी परत परत विनन्ती आहे कि कृपा करून नसते प्रश्न विचारू नका . नसते उपद्याप करू नका . ह्या पुस्तकात असं लिहिलं आहे ,अहो लिहिलं असेल पण तुम्हाला काय मिळालं त्याने . ह्या गुरूने असं लिहिलं आहे हे पण कबूल पण तुम्हाला काय मिळालं ?. तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे कि नाही ,तुमचा स्वार्थ चा अर्थ मिळावा . स्व चा अर्थ मिळवणं हे खर लक्षण आहे सुज्ञ माणसाचं आणि तोच खरा स्वार्थ आहे . तेव्हा एक आई म्हणून एव्हढच सांगायचं कि तुम्ही मिळवून घ्या . नसते प्रश्न विचारू नका . नसती डोकी चालवू नका त्यांनी आज पर्यंत तुमचं काही भलं झालं नाही . आणि मग हे झाल्या नंतर तुम्ही स्वतः दीपक होऊन दुसऱ्याचं मार्गदर्शन करता आणि दुसऱ्याचं भलं करता . परमेश्वर तुम्हा सर्वाना आशीर्वादित करो . 

आता विचारायचं असं कि तुम्हाला जर काही प्रश्न असतील विचारा . पण उगीचच काहीतरी विचारू नका . म्हणजे कुणी म्हणे माताजी तुम्ही असं जस कार्य करता ,तर म्हंटल तुम्ही करा येऊन इथे . मला तर बर होईल जरा सुट्टी तर मिळेल . पण तुम्ही करू शकता का ?म्हणजे काहीतरी अहंकार पणाचे शब्द किंवा त्याला काही अर्थ नाही . जे खरोखर इच्छुक असतात त्यांच्या प्रश्नाला ती धार असते . ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत ते उभे राहा . 

प्रश्न – कुंडलिनीच्या जागरणाच्या अगोदर काही उपास करण्याची गरज आहे का ?

उपास बिपास काही नाही ,चांगलं दुप्पट खा . आईला दुखवायचं असेल तर उपास करा . आता सहजयोगात आल्यावर उपास बिपास सगळं बंद . आरामात खाऊन  पिऊन  तरबेज झालं पाहिजे . लढाया लढायच्या आहेत ,वीरांना पुढे आलं पाहिजे . हि अशी पाप्याची पितर काय लढणार आहेत . 

प्रश्न – सहजयोग आणि हटयोग यात फरक काय आहे . 

आता हटयोग हा शब्द जो आहे तो हा आणि था ,म्हणजे हा म्हजे सूर्यनाडी आणि था म्हणजे चंद्रनाडी जी आता तुम्हाला दाखवली मी उजवी कडची सूर्यनाडी आणि डावीकडची चंद्रनाडी आहे . ह्या नाडींच्या द्वारे जो योग्य घडतो त्याला हटयोग असं म्हणतात . आता हटयोग या वरती पातांजली योग शास्त्रा मध्ये सगळं विशद रूपाने लिहिलं आहे आणि पतंजलीचे पुस्तक एव्हडं मोठं आहे आणि त्यात त्यांनी संबंध समाधी साधन कस करायचं ते लिहिलं आहे . कस मिळवायचं ते हि लिहिलं आहे . पण हटयोग हा पतंजलीने प्रचारीला होता तो त्या काली होत असे आपल्या देशामध्ये जेव्हा अगदी सुरवात ह्या गोष्टींची झाली होती . हजारो वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये आपल्याला माहित आहे कि चार आश्रमात लोक रहात असत . म्हणजे आधी ब्रम्हचर्यात रहायचं ,मुलांनी पंचवीस वर्षापर्यंत आणि मुलींनी वीस वर्षापर्यंत अगदी ब्रम्हचर्यात इतकं राहायचं कि पूर्वी गोत्रविचार म्हणून जो होता तो इतका कि एका विद्यापीठात शिकणाऱ्या मुलांची लग्न होत नसत . पण आज पर्यंत सुद्धा माझं एक गोत्र असेल आणि दुसऱ्या माणसाचं तेच असेल तर आमचा आणि त्यांचा कोणताही बेटी व्यवहार होऊ शकत नाही . हे आपल्याला माहित आहे . म्हणजे तेव्हा पासून आपल्या कडे संस्कृती होती कि एका विद्यापीठात शिकणारे ,म्हणजे समजा आमचं शांडिल्य गोत्र आहे तर शांडिल्यानी ज्या लोकांना त्या विद्यापीठात जेव्हडी मुल शिकली ते आजपर्यंत त्यांच्या मुलांच्या मुलांची ते कधी अगदी प्रल्हादाच्या वेळेला झालेली त्यांनी सुद्धा लग्न करायचं नाही म्हणजे इतकी पवित्रता ठेवायची हे ठरलेलं होत . आता तशा शुद्ध वातावरणामध्ये त्या वेळेला सुद्धा जी मंडळी या योग्य होती कि ज्यांना आत्मसाक्षात्कार घ्यायचा त्यांना बोलावत असत . आणि त्यांना अष्टांग सांगायचे आठ प्रकारच्या गोष्टींनी ते तयारी करत असत . त्यावेळेला तयारीची गरज होती . त्याची तयारी करावी लागत होती . तर त्याची तयारी म्हणजे अशी कि यमनियम वैगेरे सगळं सांगायचे . पण त्यातल्यात्यात अगदी एव्हडंस होत त्याला म्हणतात कि व्यायाम . तो यमातला एक प्रकार . कोणचा व्यायाम करायचा . पण तो व्यायाम सुध्दा गुरु म्हणजे जो पोहोचलेला गुरु आहे त्यांनी करून घ्यायचा . कुंडलिनी जेव्हा तुमची वर चढते तेव्हा ती कोणच्या चक्रावर थांबली त्याचा आम्हीही सांगतो व्यायाम . नाही सांगत असं नाही . पण असं नाही कि सकाळी उठले कि एक आसन घालून बसले ,नंतर दुसरं आसन घालून बसले आणि सगळी हाड निघाली पाहिजेत ,पोट नुसतं आतून खपाटीला गेलं पाहिजे ,अगदी माणूस असा दिसला पाहिजे कि भूत फिरत आहे . अशातला नाही प्रकार तो . तुमची कुंडलिनी चढली कुठे ,कोणच्या चक्रावर अडकली आहे त्याच्यावर अवलंबूनच तो व्यायाम असला पाहिजे . त्याला शास्त्र आहे . पण आजकाल काय झालाय कि डोक्यावर उभं रहायचं ,पायावर उभं रहायच . वाट्टेल तशे व्यायाम करायचे आणि मग हार्टअटॅक येऊन मरायचं . तेव्हा ती एकांगी वृत्ती म्हणजे आपलं शरीर मात्र आपण ठेवलं पाहिजे नीट बाकी सगळं काही रहात नाही . पण पातंजलानी अष्टांग काढलं होत . ते राहील एकीकडे त्या पुस्तकात ल एव्हडंस काहीतरी धरून तुम्ही काढायला सुरवात केली तर त्यांनी असाच परिणाम होतो जर आपल्याला मोटर चालवायची असली तर आपण त्याची चाकच फिरवत बसलो तर ती मोटर का चालत नाही ?अहो आधी ते इंजिन सुरु करा . ते इंजिन सुरु करायलाच मी इथे आलेली आहे . तेव्हा कुंडलिनी योगच त्यात घडत होता . कुंडलिनीच जागृत होत होती त्याच्यात पण ती कशी जागृत होत होती ते गुरु सांगत नसत . आधी तयारी करत असत कारण ती वेळ सांगण्याची नव्हती . आज ती सांगण्याची वेळ आलेली आहे . आणि आपण इतके सुज्ञ आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे . आधार एकच आहे आता त्या वेळेला लोक पहिल्या पायरीवर होते तेव्हा ते सांगत असत . आणि त्या कालची समाज व्यवस्था अशी होती कि असं ब्रम्हचर्य पाळलं जात होत . त्या वेळेला एका विद्यापीठात शिकणारे सर्व मुलंमुली भाऊ बहिणी सारखे रहात असत . इतकं तिथे मार्दव होत ,इतकच नव्हे पण जो गुरु होता तो पण त्यांचा बाप आणि त्यांची पत्नी हि आई अशा पाच आया असायच्या पूर्वी . ते आता राहिलेलं नाही तेव्हा आता धकाधकीच्या वेळ आलेली आहे त्यामुळे कुंडलिनी एकदम जागृत झाल्याशिवाय कार्य होणार नाही असं लक्षात घेऊनच मी सामुदायिक कुंडलिनीच जागरणाची व्यवस्था केलेली आहे . आता करा याना पार . पुष्कळ झालं आता डोक्यावर उभं राहण्याची वैगेरे काही गरज नाही . 

प्रश्न -कुंडलिनी जागृत होते तेव्हा नेमकं काय होत ?शास्त्रीय भाषेत कस सांगता येईल ?मेडिकल सायन्स प्रमाणे काय होत ?

सर्व प्रथम हि शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा पॅरासिम्फथेटिक  नर्व्हस सिस्टम वर आपल्याला कंट्रोल येतो . पॅरासिम्फथेटिक  नर्व्हस सिस्टम वरती आपल्याला काही माहित नाही मेडिकल सायन्स वर . पॅरासिम्फथेटिक नर्व्हस सिस्टम जी आपली संचालित होते तिचा ह्या सेंट्रल नर्व्हस सिस्टम वर त्याचा परिणाम होतो . म्हणजे कस कि जी पॅरासिम्फथेटिक नर्व्हस सिस्टम  जी आपली यामध्ये आहे ती संबंध सिम्फथेटिक नर्व्हस सिस्टम च जेव्हड काही कार्य आहे त्याला न्यूट्रलाइज करत असते . म्हणजे आपल्याला उद्या धावायचं असल तर सिम्फथॅटिक अक्शन मध्ये येते आणि आपण धावू लागलो कि आपली सिम्फथेटिक जास्त वाढून आपल्या हृदयातून जास्त स्पंदन होऊ लागत . पण ते कमी कस होत ते पॅरासिम्फथेटिक मुळे हे आपल्याला समजत . पण त्या पॅरासिम्फथेटिक वर आपला काही कंट्रोल नाही जी खरी च ऍटोनॉमस आहे . सिम्फथेटिकवर आपला कंट्रोल आहे म्हणजे आपण जर धावलो तर सिम्फथेटिक कम्स इन टू ऍक्शन . पण पॅरासिम्फथेटिक वर आपला काही कंट्रोल नाही . आणि तो कंट्रोल आपल्याला पहिल्यांदा येतो . मेडिकल हे सांगते . आणि आपण जर घरी आला मला भेटायला तर मी सगळं व्यवस्थित आपल्याला सांगून देईल . पण पहिलं एक सांगायचं म्हणजे पॅरासिम्फथेटिक वर आपला कंट्रोल येतो . दुसरं म्हणजेअसं कि जी शक्ती आपल्या मध्ये आहे ज्याच्या मुळे आपण जिवंत आहोत ती प्राणशक्ती आपल्यामध्ये आहे किंवा जी मनशक्ती आपल्या मध्ये आहे त्या पैकी फक्त प्राणशक्ती कडेच मेडिसिनच लक्ष आहे आणि मनशक्ती कडे सायकॉलॉजिस्ट च लक्ष आहे . आणि दोन्ही अजून समग्र न झाल्या मुळे अजून सुध्दा अर्धवट च आहेत . पण होत काय कि जेव्हा तुमची कुंडलिनी जागृत होते आणि जेव्हा ती भेदते आज्ञा चक्राला तेव्हा तिन्ही समग्र होतात . त्यामुळे तुम्हीच डॉक्टर होता . तुम्हालाच कळत तुमच्या बोटांवरती कि कोणच चक्र धरलं आहे आणि त्या चक्राला फ्लेक्सेस कोणच धरलं आहे . म्हणजे आता समजा तुमचं जर सोलर फ्लेक्सेस धरलं आहे ,म्हणजे तुमचं चक्र कोणच आहे त्याला नाभी चक्र म्हणतात . ते बरोबर तुमच्या बोटांवरती कळेल कि उजवी कडे कि डावीकडे . उजवीकडे जर धरलं असेल समजायचं  प्राणशक्तीत दोष आहे डावीकडे धरलं असेल तर मानशक्तीत दोष आहे . मग जर तुम्हाला माहित असेल तर याला कस काढून टाकायचं ?याच ज्ञान तुमच्यात आलं तर झालं . मग डाइग्नोसिस च तुम्ही करता . तुम्हीच डॉक्टर आहात आणि तुम्हीच मेडिसिन आहात . पण आता आमच्या बरोबर चारपाच डॉक्टर आलेले आहेत आपण या भेटायला . आपण डॉक्टर असाल तर मला फार आनंद होईल . तर मी सविस्तर तुम्हाला समजावून सांगेन . पण आता थोडक्यात मी सांगितलं . सगळं मेडिकली समजू शकत . पण मेडिकलच्या हे वरच आहे . जस इन्स्ट्रोलॉजी आपल्याला शिकायची झाली तर आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये बघावं लागत त्याच्या शिवाय नाही समजणार . तसच हे आहे आता ज्या बुद्धीने आपण समजतो त्या बुध्दीमध्ये प्रकाश आला पाहिजे आत्म्याचा मग हे समजेल पण तरी सुध्दा आपण जर आलात तर मी तुम्हाला सगळं समजावून सांगेन पण आधी पार झालं पाहिजे . मग बोलायच्या गोष्टी . इथे आमच्या कडे काही काही असे डॉक्टर आहेत कि जे चारचार विषयात डॉक्टर झालेले आहेत . पण त्या लोकांना काय झालं कि अति सगळं पाहून झाल्यावर लक्षात आलं कि याच्या पुढे काही कळत नाही म्हणून परत मागे वळले . आणि अजून आपण खाई पर्यंत जायला पाहिजे असं दिसत आहे . पण ते खाईत जाण्या पेक्षा आधीच का आपण जाणून घ्यायचं कारण हा तुमचा वारसा आहे . साईनाथ कोणत्या विद्यापीठात गेले होते ?कुठेच नाही पण त्यांना पण तू मुसलमान ,तू अमका ,तू तमका म्हणून त्यांनाही छळून काढलं . आत्ता पर्यंत कुणाला सोडलंय का आपण ?

आता आपण आत्मसाक्षात्कार घेऊया . फार सोपं काम आहे . सर्वप्रथम म्हणजे टोप्या काढून ठेवा . तो आईचा मान आहे आपण आईकडे काही टोप्या घालून जात नाही . दुसरं असं कि जोडे ,चपला काढून ठेवायच्या . आणि जमिनीवर बसलात तर फारच उत्तम . कारण हि पृथ्वी म्हणजे एव्हडी दयामय आहे ,हीच पृथ्वी आपल्यामध्ये ह्या त्रिकोणाकर अस्थी मध्ये आहे . तेव्हा पृथ्वीतत्त्व त्रिकोणाकार अस्थी मध्ये आहे म्हणून जमिनीवर बसलेले बर . दुसरं म्हणजे सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचं . डोळे उघडे ठेवायचे नाहीत . आरामात . काहीही कुणाला त्रास होत नाही . पण काही काही लोकांना जराशी हुक्की येते मधूनच काहीतरी हलायचा किंवा ओरडायचं वैगेरे . त्यांनी मात्र बाहेर जावं . इथे तमाशे करायचे नाहीत . कुणी उडायचं नाही . तस इथे करायचं नाही . साधं बसायचं . सरळ मन करून ,दोन्ही हात असे करून . मांडी घालून व्यवस्थित जमून बसायचं . आता आपली जी चक्र आहेत हि डावीकडे ती कशी जागृत करायची ते मी सांगेन आणि त्या  बरोबर आपली  कुंडलिनी जागृत होऊन तुम्हीच स्वतःला जागृत कराल . म्हणजे एक तऱ्हेचं शिक्षण पण होईल आणि कुंडलिनी जागृत पण होईल . तेव्हा डोळे मिटून नम्र पणाने बसायचं . पण एकमात्र मला वचन  द्यायचं कि आम्ही जर पार झालो तर माताजी ह्यात आम्ही वृदिंगत होणार . आणि स्वतःची वाढ करून घेणार . हे वाया आम्ही घालवणार नाही . कुणी मधेच उठून जाऊ नये . कारण दुसऱ्यांना त्रास होतो . जायचं असेल त्यांनी आधी जावं . एक दहा मिनिटात सुध्दा होईल किंवा पाच मिनिटात सुध्दा होईल . मुंबईला ह्या वेळेला दोन मिनिटात हजारो लोक पार झाले . तर नाशकात काय व्हायला पाहिजे नाशिक केव्हडी पुण्यभूमी आहे . 

दावा हात असा ,हि शुध्द इच्छाजी आहे ती  कुंडलिनी आणि हि तुमची शुध्द इच्छा आहे . इच्छा शक्ती म्हणून डावाहात असा माझ्याकडे ठेवा . आणि उजवा हात कार्यशक्ती आहे आणि तो आपण वापरणार आहोत चक्रांवर . आधी हृदयावरती आत्मा आहे म्हणून नंतर पोटाच्या वरच्या बाजूला गुरुतत्व आहे म्हणून नंतर खालच्या बाजूला शुद्ध विद्या आहे म्हणून . पुढे तो परत असा तो हात वरती न्यायचा इथे मानेवर डाव्या बाजूला विशुद्धी चक्रावर ठेवायचा . कारण आपल्याकडे डावी विशुद्धी फार धरते . मंत्र बिंत्र चुकीचे म्हंटले असतील तर किंवा माझं काहीतरी चुकलंय असं सारखं स्वतःबद्दल न्यूनगंड असला तर इकडे फार दुखत . आणि  हि जागा यावर धरायचं . मग उजवा हात असा डोक्यावर ठेऊन आज्ञाचक्राला जागृती  द्यायची . आणि सर्वात शेवटी मग मागे असा एक हात ठेऊन आणि मग सहस्राराला तळहाताला असं ओढून ,ताणून घ्यायचं आणि तळहात असा बरोबर टाळूवर घालून असा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवायचा . 

आता डोळे मिटून डावाहात माझ्याकडे करा . आता उजवा हात हृदयावर ठेवायचा . मी आपल्याला सांगितलं आहे कि आपल्या हृदयामध्ये आत्म्याचं स्थान आहे . आता प्रश्न विचारा ,श्री माताजी मी आत्मा आहे का ?असा तीनदा प्रश्न विचारा . पूर्ण विश्वासाने . आणि जर तुम्ही आत्मा आहेत तर तुम्ही तुमचे गुरु सुध्दा आहात . म्हणून आता हा उजवा हात डावीकडे पोटाच्या डाव्या बाजूला वरती  असा दाबून ठेवायचा आहे . इथे गुरूच तत्व आहे . इथे परत तीनदा प्रश्न विचारायचा माताजी मी माझा स्वतःचा गुरु आहे का ?आता हा उजवा हात ओटीपोटाकडे खालच्या बाजूला दाबून धरायचा . इथे स्वाधिष्ठान चक्र आहे जी आपल्या मध्ये शुध्द विद्येचं कार्य करत असते . पण ते मी म्हणून होणार नाही . तुम्हाला मागावं लागेल . तुम्हाला म्हणावं लागेल माताजी आम्हाला शुध्दविद्या द्या . मी जबरदस्ती करू शकत नाही . कारण आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे ना . तेव्हा सहा वेळा असं म्हणायचं कि माताजी मला शुद्धविद्या द्या . हि बोधाची गोष्ट अली परत ,असं म्हंटल्यावर आपल्या नसानसातून चैतन्य वाहिल्यावर आपल्याला ती विद्या कळेल कि त्यांनी हे चैतन्य आपण कस वापरायचं . मागावं लागत . असं म्हण्टल्यावरच कुंडलिनी जागृत होईल . आता उजवा हात परत पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे दाबून धरायचा . आता कुंडलिनीची सुरवात झालेली आहे पण आपण तिची मदत केली पाहिजे म्हणजे पूर्ण विश्वास असायला पाहिजे स्वतःवर पहिल्यांदा . आता इथे म्हणायचं माताजी मी माझा स्वतःचा गुरु आहे . असं दहादा म्हणा . कारण दहा गुरुतत्व आहेत . आता हा उजवा हात परत हृदयावर आणून दाबून धरायचा . आणि म्हणायचं श्री माताजी मी स्वतः आत्मा आहे . असं बारा दा म्हणा . हे सत्य आहे . आता स्वतः बद्दल कमीपणाची भावना ठेवायची नाही . मी कस चुकलो ,मी किती  पाप कर्म केली . हे झालं ते झालं ,अहो कसले पापकर्म केले तुम्ही ?परमेश्वर हा नुसता प्रेमाचा सागर नसून क्षमेचा पण सागर आहे . आणि तुमची कोणती अशी पाप आहे जी त्याच्या सागराने धुतली नाही जाणार . हे लक्षात घेतलं पाहिजे . तेव्हा माझं असं चुकलं तस चुकलं अशा प्रकारे कोणतीही कमीपणाची भावना न ठेवता पूर्ण विश्वासाने हा उजवा हात आपल्या डाव्या  मानेवर असा ठेवायचा जिथे मान आणि खांदा याचा कोण होतो . या कोनात जोरात धरून मागच्या बाजूला न्यायचं . इथे लक्षात ठेवायचं कि परमेश्वर हा क्षमेचा सागर आहे . मी दोषी नाही असं परमेश्वराला सांगायचं . सोळा वेळा हे म्हणा . आणि तरी तुम्हाला वाटत असेल मी अजून पापी आहे तर एकशेआठ वेळा म्हणा . म्हजे स्वतःला शिक्षा दिल्या सारखं होईल . स्वतः बद्दल प्रसन्न असायला पाहजे . म्हणजेच परमेश्वर तुम्हाला प्रसन्न होतो . देवांनी तुम्हाला बनवलेलं आहे ,हि सृष्टी तयार केलेली आहे त्यात तुम्ही प्रसन्न राहिला नाही आणि स्वतः चे दोषच काढत राहिलात तर त्याला काय म्हणायचं . देवाचेच दोष काढता तुम्ही . आता मी जर आमच्या भाषणात काही म्हंटल असेल त्याच्या मुळे तुम्हाला वाटत असेल आमचं हे चुकलं ते चुकलं तर ते सर्व विसरून जा ,ते लक्षात ठेऊ नका कृपा करून . काहीही केलं असाल तरी ते आठवत बसायचं नाही मागच . खूप जोरात पकड आहे इकडे . आता काही लोक दारू पित  असतील ,तंबाकू खात असतील काय असेल ते जाऊदे . त्या बद्दल काही दोष द्यायचा नाही . ते काही मोठं पाप नाही केलेलं तुम्ही . ते सगळं सुटून गेलं पाहिजे पण ते सुटण्याची पध्दत लेक्चर देणं नव्हे . कुणाला वाईट म्हणून होणार नाही . ते तुम्हाला दिसलं पाहिजे तुम्ही समजलं पाहिजे ,तुम्हाला समर्थता अली पाहिजे . आता हा उजवा हात उचलून कपाळावर व्यवस्थित आडवा ठेवा . इथे एक सरळ गोष्ट सांगायची म्हणजे अशी आहे कि मी सर्वाना क्षमा केली आहे असं म्हंटल पाहिजे . श्री माताजी मी सर्वाना क्षमा केली आहे असं म्हंटल पाहिजे . त्यात मी कशी करू वैगेरे काही नाही नुसतं म्हणा म्हणजे झालं . मना पासून म्हणा म्हणजे आज्ञाचक्र सुटेल . आता उजवा हात मागच्या बाजूला डोक्याच्या पाठीमागे न्यायचा . असं डोकं धरायचं मागच्या बाजूला . आणि स्वतःच्या समाधाना साठी म्हणायचं मी जर काही चुका केल्या असतील तर मला क्षमा कर .तो तुम्हला क्षमा करण्यासाठी आतुर आहे . आता हाच हात ,तळहात ताणून वरती आपल्या टाळूवर ठेवा . आणि तो हळूहळू सातवेळा टाळूवर फिरवा . कारण तिथे मी म्हंटल होत ना सप्तशृंगी म्हणजे सात पीठ आहेत . आणि तो फिरवताना असं म्हणायचं कि माताजी मला आत्मसाक्षात्कार हवा . तुम्ही कृपा करून तो द्यावा . तुम्ही मागितल्या शिवाय मी काही देऊ शकत नाही . घड्याळाच्या दिशेने फिरवा . आता हा हात खाली घ्या आणि मांडीवर ठेवा  हळू . डोळे उघडा हळूच . आता डावाहात उचलून टाळूवर चार इंच वरती धरून बघा कि काही थंड थंड काही येत आहे का टाळूतून . उजवा हात माझ्याकडे ठेवा . आता डावाहात माझ्याकडे आणि उजवा हात डोक्यावर ठेवा . येतंय का बघा परत थंड थंड . काही विचार न करता बघा . परत एकदा दोनी हातानी करून बघा . आता दोन्ही हात आकाशाकडे करून वरती बघून विचारा हीच चैतन्यशक्ती आहे का ,ब्राम्हशक्ती आहे का . हीच प्रेमाची परमेश्वरी शक्ती आहे का ?आता दोन्ही हात असे खाली करा आणि हातातून गारगार येतंय का बघा . बोटांमधून गारगार व्ही पाहू लागेल . आधी कमी जाणवेल मग वाढत जात . आता बहुतेक  सगळ्या लोकं ना जाणीव झाली आहे . काही लोकांना झाली नाही तरी काही हरकत नाही . ज्यांना झालेली नाही ते लोक मागच्या बाजूला आले तर हे परदेशी लोक जे आहेत ते तुम्हाला जागृती देतील . पण अगदी हे मिळवलंच पाहिजे .