Public Program, Swacha dharma Pune (India)

1985-12-22 Public Program, Swacha Dharma, Pune. पाडवळीत गावातले सरपंच तसेच इथले ग्रामस्थ मंडळी त्यांनी हा कार्यक्रम इतका उत्साहाने योजला आहे की माझं हृदय  भरून आलं आहे . या पवित्र भुमीत श्री तुकाराम महाराज राहीले त्यांनी परमेश्वराची गाथा गायली .परमेश्वराची ओळख सांगितली . लोकांना अनेक प्रकारे आपल्या जीवनातून अत्यन्त मुल्यवान अशी माहीती  दिली .आज येतांना उशीर होत होता कारण रस्त्यामध्ये दुसरी गाडी फेल ( fail ) झाली तर तिकडे मला तुमच्या उत्साहाची आणखिन त्रासाची पूर्ण कल्पना येत होती .पण त्या वेळेला तुकारामांचा एक अभंग आठवला समयासी सादर व्हावे . समयाला सादर असलं पाहिजे. इतक्या सोप्या शब्दात फार मोठी गोष्ट तुकाराम बुवांनी सांगितली .समयासी सादर व्हावे म्हणजे आपण एकतर पुढचा तरी विचार करतो किंवा मागचा तरी विचार करतो .पण ह्या क्षणाला ,ह्या क्षणाला  काय मिळतंय ते आपण बघत नाही . वर्तमान काळात राहू शकत नाही , आज आता इथे काय आहे ते आपल्या लक्षात येत नाही .त्यामुळे जे विशेष आहे जे महत्वाचं आहे ,जे संपुर्ण आहे ते आपल्याला मिळू शकत नाही एवढी मोठी गोष्ट एका वाक्यामध्ये समयासी सादर व्हावे इतकं नम्रपणानी त्यांनी म्हटलेलं आहे .इतका उत्साह इतकं प्रेम तुम्ही आईला दिलंत त्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत . आज एवढया धकाधकीच्या काळामध्ये आपल्या समाजात अनेक तऱ्हेचे  वैगुण्य आलेले आहेत .पुष्कळ खराबी आलेली आहे त्यामुळे प्रत्येकाला काहीना-काहीतरी दुःख आहे कुणाला शारिरीक दुःख आहे ,तर कुणाला मानसिक दुःख आहे ते नसलं तर एखाद्याला कौटंबिक दुःख पण फार आहे ,सामाजिक दुःख आहे .तरतर्हेचे त्रास एकदम जशे काही सगळेच्या सगळे एकत्र फोफावून उभे राहिलेत. माणसाला समजत नाही भांबावून गेलेला आहे की जावं तर जावं कुठे करावं तरी करावं Read More …