Devi Puja Brahmapuri (India)

Devi Puja Talk, India, 1985-12-27 Time: 26 minutes 56 seconds to 29 minutes 56 seconds. (26.56 To 29.56)               आता तुम्हांला काय सांगायचं तुमची स्तुतीच करत होते सगळ्यांना. सगळ्यांजवळ मी तुमची स्तुती करते, की तुम्ही मूर्खासारखे वागू नका, असं त्यांना सांगतेय मी. तेव्हा तुम्हांला तसं सांगायचं की तुम्ही ह्यांचं अंधानुकरण करायचं नाही. आपलं जे आहे ते फार मोठं आहे. आपला वारसा आहे तो सांभाळला पाहिजे. नुसतं आपण बाहेरच्या लोकांना बघून तसं वागायला लागलो तर आपण मूर्खात निघणार. त्यांना काही संतुलन नाही. त्यांच्या जीवनात काही संतुलन राहिलेलं नाही. एकीकडे वहावलेलं जीवन आहे ते. हे मी पाहून आले ना आता. बारा वर्ष तिथं राहून आले. तप केलं बारा वर्षाचं. बारा वर्षांत तप होतं म्हणतात. (हास्य) तसं तप झालं माझं. आणि आता त्यांचं अंधानुकरण करू नका एवढंच सांगायचं. पण ‘जुनं ते सोनं’ जरी असलं तरी जुनाट जे आहे ते चांगलं नाही. जुनाट नको. ‘जुनं ते सोनं’ पण जुनाट जे धरून बसले ते नको आणि जुनाट सुद्धा आत्ता आत्ताच आलेलं आहे, म्हणजे बायकांना छळणे मुसलमानांपासून शिकलो आपण. इंग्लिश लोकांपासनं डावरी देण्याचं शिकलोय. मुलींना डावरया दयायच्या, आता कशाला? आता आपला असा नवीन नियम झालेला आहे, त्या नवीन नियमांमध्ये आपल्याला काही डावरी दयायला नको. मुलीला अर्धी प्रोपर्टी दयायची, मुलींनी अर्धी प्रोपर्टी घ्यायची ही पद्धत बरोबर आहे. पण मुली घेणारही नाहीत आणि देणारही नाहीत. तेव्हा त्यांचं जे आहे ते शिकायचं. आपली जी नम्रपणाची वर्तणूक आहे तीच ठेवायची. व्यवस्थित राहायचं. जसं आपल्याला पूर्वजांनी सांगितलंय तसं राहायचं. पण जुनाट ज्या वस्तू झालेल्या त्या फेकून टाकल्या पाहिजेत. जुनाटातल्या पुष्कळ वस्तू आहेत त्या म्हणजे ब्राहमणांचं साम्राज्य जे पसरलंय देवळामधनं ते काढलं पाहिजे. Read More …