Shri Mahaganesha Puja

Ganapatipule (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Shri Mahaganesha Puja, Ganapatipule, India, 1986-01-01

आज आज आम्ही गणपतीपुळ्याला आलो. त्याचे फार  महात्म्य आहे. अष्टविनायका मध्ये, हे महा गणेशाचे स्थान आहे. महागणेश हा पिठाधीश आहे. आणि  ह्या पिठावर  बसूनच तो सर्व गणेशाचे रक्षण करतो. सर्व ओंकाराची चालना करतो. कारण त्याला गुरु तत्व मिळालेले आहे. वातावरणात सुद्धा आपण पाहिलं की, समुद्र  इतका सुंदर आणि स्वच्छ आहे. या गणपतीचे पाय  धुतो.  कारण समुद्र हा गुरु तत्व आहे.  आणि त्या गुरुतत्त्वानी  तो श्री गणेश यांचे पाय धुतो. तसेच सर्व सहज योग यांचे झाले पाहिजे. गणेश  स्तुती झाली, गणेश स्थापना झाली त्यानंतर महालक्ष्मी तत्त्वांनी तुम्ही महा गणेश झाले. ही स्थिती आहे ती लहान मुलांना, मोठ्या मुलांना, वयस्क, ,स्त्री.पुरुष सर्वांना सुलभ  मिळू शकते. जर त्याच्यामध्ये सरळ स्वभाव आला.  त्याला आपण सारल्या म्हणतो. मराठी भाषेत  ज्याला   अबोध धीता म्हणतात. इनोसन्स, याला म्हणतात, ते जेव्हा आपल्यामध्ये पूर्णपणे  बानुन  जाते तेव्हा आपल्याला गुरुपद येऊ शकते. कोणताही गुरु  त्याच्यामध्ये हि  सरलता आहे.  ते  हो ने  पण नाही. तो कधीही गुरु होऊ शकत नाही. त्याचं लक्ष फक्त परमेश्वरी शक्तीकडे आहे. तोच गुरु होऊ शकतो, जो सर्व साधारण माणसाचे लक्ष हे दूषित आहे. ते स्वच्छ नाही. त्याबद्दल ख्रिस्ताने  सांगितले की, तुमच्या डोळ्यात   कोणताही दूषित पणा  नसला पाहिजे. त्याचा अर्थ असा की, विचारांचे काहूर माजून जाते, व भलतेसलते विचार येऊ लागतात. किंवा हे आपल्याला का मिळाले नाही ? किंवा  हेवे- दावे .कोणत्याही वस्तूकडे बघून जर विचार आला तर तुम्ही आज्ञा चक्रा वर अजून मात केलेली नाही. कोणत्याही वस्तूकडे बघून निर्विचार इता आली पाहिजे. विशेष करून जेवढ्या परमेश्वरी संबोधित समृद्ध अशा देवी देवता आहेत त्यांच्याकडे पाहून तरी निर्विचारइता  आली पाहिजे.  निर्विचारइता आली तर दूषित पणा येणार नाही. कारण मनाला घोषित करणारी विचारच येणार नाहीत. मग दूषित पणा कसा येईल. म्हणजे  जे  ख्रिस्ताने  सांगितले, म्हणजे डोळ्याने कोणताही दूषित पणा आला नाही पाहिजे. इतके स्वच्छ असले पाहिजे. जसे सूर्याचे किरण हे जेव्हा कोणत्याही झाडावर पडतात. त्यातली  घाण येत नाहीत. पण त्याला प्रफुल्लित करतात. पण त्याच्यामध्ये शक्ती देतात. तसेच एका सहज योग यांचे डोळ्यांमध्ये तेज असायला पाहिजे.  जे या सर्व जगामध्ये अत्यंत शुद्ध वातावरण निर्माण करते. शुद्ध वातावरणाची सगळीकडे गरज आहे. यात शांती, आनंद आणि परमेश्वराची शक्ती नांदू शकते. नुसतं श्रीगणेशाला  भजून होत नाही. आपल्यामध्ये श्री गणेश जागृत झाला पाहिजे. त्याचा महागणेश झाला पाहिजे. महागणेश झाल्यानंतरच आपल्या देशामध्ये समृद्धता येईल. आपल्या देशाच्या समृद्ध झाल्याच्या कारणाने इतर देशांचे भले होणार आहे. आपणच दुसऱ्याचे पुढारीपण करणार आहोत. अशी दशा आहे. जर आपणच जबाबदारी हातामध्ये घेतली नाही तर या सबंध विश्वाचे काय होईल ते मला सांगता येत नाही. तरी सर्वांना विनंती आहे की, आपल्या डोळ्यातला दूषित पणा काढून टाकला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे सहज्योगा मध्ये मंत्र  निरविचाराचा  आहे. विचारच येऊ द्यायचा नाही. कोणत्याही गोष्टी कडे बघून विचार आला तर यत्र नेती नेती वदने, हे नाही, ते नाही, ते नाही. म्हणत जायचे. किंवा क्षमा केली, क्षमा केली असं म्हणत जायचं. तो विचार नष्ट होतो. आणि निर्विचार इता आली म्हणजे दूषित पणा येण्याचा मार्गच खुंटतो.  सर्वांनी पूर्णपणे प्रयत्न करावा की, डोळे दूषित नसावे. ह्या डोळ्यांनी जर दूषित पणा येत असेल तर हे डोळेच नको, असे श्री संत तुकाराम यांनी म्हटले आहे. आहे त्यापेक्षा आंधळाच बरा. तेव्हा एक प्रकारे असे म्हटले पाहिजे की, या  दूषित गोष्टी पेक्षा जगातील   आंधळेपणच बरे. जमा या दोन्ही गोष्टींची सांगड जमेल तेव्हा असं म्हणता येईल. आता सहज योगी गुरुपदा ला गेले आहेत. माझा तुम्हा सर्वांना पूर्ण आशीर्वाद आहे. आज्  या   गणपतीपुळ्याला  जे महागणपतीचे स्थान आहे. त्याच्या विशेष कृपेने तुम्हा सर्वांना गुरुपद मिळावे.