
Public Program Sangli (India)
Public Program Sangli, 6th January 1986 सांगली तसच कोल्हापूर दोन्हीही ठिकाणच्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात . मागच्या वर्षी आम्ही इथे आलो होतो, आणखीन सहजयोगाबद्दल लोकांना माहिती दिली होती . आता आपण असा विचार केला पाहिजे , की ह्या जगामधे आपण आलो ते कशासाठी ? त्याबदद्ल आपल्या मनामधे पुष्कळ भ्रम आहे . तो विचार आपण करू नये असे पुष्काळांचे मत आहे. कारण असा विचार करून फायदा काय होणार ? आपल्याला पुढचं काय ते काय माहीत नाही . पण जर आपण लक्षात घेतल तर अनेक हजारो वर्षांपासनं आपल्या देशामधे विशेषत: ह्या महाराष्ट्रात , ह्या संतभुमिमधे संतानी अस संगितलेल आहे की, अवघाची संसार सुखाचा करीन ! इतकच नव्हे तर पसायदान म्हणून जे काही ज्ञानेश्वरांनी लिहलय ते सुद्धा वर्णन आपल्याला खर वाटत नाही की , जे जो वांछील ते तो लाहो ! हे कस होणार?, ह्याला मार्ग काय ? जी जी वर्णन अशा परमेश्वरी साम्राज्याची आपल्या शास्त्रात करून ठेवलीय . त्यासाठी मनुष्य नेहमी धडपडत असतो की, अस साम्राज्य आलं पाहिजे .पण ते येणार कस ? आता कम्युनिस्ट लोकांच अस म्हणन आहे की , मार्क्सनी, मार्क्सवादी लोकांच अस म्हणन आहे की मार्क्सनी अशी रचना केली होती की,असे विशेष लोक तयार होणार आहेत , की ज्यांना ग्व्हर्नमेंटची गरज नाही , ज्यांना पोलिसांची गरज नाही ,ज्यांना कशाचीही गरज नाही .पण ते कसे होणार ? त्याचा कुठे कोणी उल्लेख केलेला नाही. ते कसं घडून येणार आहे ?अस होणार तरी कसं ? म्हणून त्यांनी जबरदस्ती केली ,कसतरी करून कम्युनिझम आणला.पण त्याचा काही फायदा झाला नाही. मनुष्य होता तसाच आहे . तेव्हा त्याला काहीतरी कारण असलं पाहीजे , ते Read More …