Public Program (India)

Sarvajanik Karyakram 11th January 1986 Date: Place Shrirampur Public Program Type श्रीरामपूरच्या सर्व परमेश्वराला शोधणाऱ्या साधकांना आमचा प्रणिपात असो. आपण सर्वांनी इतक्या प्रेमाने आम्हाला इथे बोलवलं आणि परमेश्वर प्राप्तीची उत्कंठा दर्शवली त्यातच आम्ही कृतार्थ झालो. तसंही जीवन आहे. आपण जे काही शिकत असतो, त्यामध्ये आपण आनंद शोधत असतो. काहीही आपण करतो ते आनंदासाठी करतो. कोणीही दु:खासाठी शोध करत नाही. दु:ख कुठे म्हणून शोधायला जात नाही. पण जिकडे आनंद आहे. तिकडे माणसाचं लक्ष वेधलेलं असतं. जीवनामध्ये आनंद काय आपल्याला समजत नाही. सुख आणि दुःख ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जो सुखाकडे म्हणून धावतो त्याला शेवटी दुःख होतं. ह्याला काय कारण असलं पाहिजे? जो निव्वळ आनंद, ज्याने सुख आणि दुःख दोन्ही संपून, जातात अशी कोणती स्थिती असली पाहिजे? असा विचार जेव्हा माणसाच्या मनात उद्भवतो त्यावेळी तो एकसांख्य होतो आणि तो परमेश्वराला शोधू लागतो. परमेश्वराच्या नावावर लोकांनी पुष्कळ दुकानं मांडलेली आहेत. दुकानात गेलं म्हणजे परमेश्वर मिळतो असा आपला पुष्कळांचा विचार आहे. सहजयोगात तुम्ही पैसे देऊ शकत नाहीत, असं म्हटल्याबरोबर अर्धे लोक उठून चालले जातात. पैशाने तुम्ही परमेश्वर विकत घेऊ शकत नाही. परमेश्वर घेताच येत नाही आपल्याला. विकाऊ वस्तू नाही आहे परमेश्वर . तर परमेश्वर काय आहे ? ज्याने ही सृष्टी रचली, ज्याने पृथ्वी आपल्याला दिली, ज्या पृथ्वीतलावर आपण जन्माला आलो, हे सगळं करणारा जो परमेश्वर आहे, तो आहे तरी काय? असा प्रश्न मनामध्ये उभा राहतो. पुष्कळसे लोक अशा भ्रामक कल्पनेत इकडे तिकडे भटकतात आणि भटकले आहेत. धर्माच्या नावावरतीसुद्धा पुष्कळांना भरकटवून टाकलेले आहे. ज्याला आपण धर्म म्हणतो, कधी कधी असं वाटतं, की हा धर्मच नसावा. जे धर्मावरती बोलतात त्यांचासुद्धा एवढा अधर्मीपणा! आपल्याला Read More …