Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja 8th March 1986 Date : Place Pune : Type Puja या पुण्यनगरीला पुणे असे म्हणतात. पण आपल्या शास्त्रात याला पुण्यपट्टणम असे म्हटलेले आहे. साऱ्या विश्वातलं पुण्य या पुणे नगरातून वहात आहे आणि त्याचे वाहक तुम्ही सगळे आहात. आज हा केवढा योग आहे, की जे पुण्याचे स्रोत आहेत असे श्री शिव त्यांची पूजा तुम्ही इथे मांडलेली आहे. जोपर्यंत शिव स्थितीला उतरत नाही, जोपर्यंत त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तो मनुष्य आंधळ्यासारखा वावरत असतो. कोणतीही मानवी धारणा ही एखाद्या छायेसारखी भ्रामिक असते आणि त्या धारणेला बघून, त्यावर आसन मांडून मनुष्य आपलं आयुष्य कंठीत असतो. आत्मतत्त्व जाणल्याशिवाय साऱ्या विश्वातलं जे मर्म आहे ते मनुष्य जाणू शकत नाही. पण सर्वसाधारण आपल्या रोजच्या व्यवहारातलं सुद्धा, रोजच्या मानवाच्या जीवनातलं तत्त्व, मर्म मनुष्य जाणू शकत नाही. प्रत्येक मानवामध्ये हे शिवतत्त्व हृदयामध्ये प्रतिबिंबित आहे, आत्मास्वरूप आणि हे सर्व विश्वाच्या आत्म्याचे प्रतिबिंब जे हृदयात आहे, ते जाणल्याशिवाय ह्या सृष्टीचं सूत्रसुद्धा कळू शकत नाही. अंधारात आपण चाचपडत असतो. एकमेकांना ओळखत नाही, एकमेव एकमेकांना जाणत नाही, कसलीच आपल्याला जाणीव एकमेव नसते. त्याबद्दल भ्रामकता असते. जाणिवेसाठी ज्याला अॅबसल्यूट म्हणतात, तो आत्माच मिळविला पाहिजे. कारण तोच आपल्या सर्व नसानसांमध्ये एकमेव जाणीव देऊ शकतो. ज्याला वेदांनी विद् म्हटलेले आहे, की विद् झाले पाहिजे. ते आत्म्याच्या शक्तीशिवाय आपल्या नसानसांमध्ये येणार नाही. आज जरी आम्ही कितीही म्हटलं की आम्ही जातियता सोडून टाकू, जातीवाद सोडून टाकू, गरीब-श्रीमंत मिटवून टाकू. म्हणजे असे कोणतेही प्रश्न ज्याला इश्यूज म्हणता येतील, जागतिक प्रश्न घ्या, की आम्ही विस्फोटक जेवढे बॉम्ब आहेत त्यांना बंद करून टाकू किंवा सर्व जगात एकच साम्राज्य आलं पाहिजे अशा मोठ्या मोठ्या कितीही कल्पना केल्या आणि ते Read More …