Birthday Puja

Mumbai (India)

Feedback
Share

Birthday Puja 21st March 1986 Date: Place Mumbai Type Puja

आज आपण सर्वांनी माझा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. त्या बद्ल मी आपली आभारी आहे. वाढदिवस एकी कडनं वाढतो आणि एकी कडनं आयुष्य कमी होतं. पण सहज योग्यचं उलट आहे. वाढदिवस आला तर असं समजायचं कि आपल्या आत्मिक वृक्षाला एक आणखीन वाढ झालेली आहे. आपलं आत्मिक वृक्ष वाढत चाल्लय. जरी आयुष्य कमी होतं चाललं तरी सुद्धा आत्मयचा प्रकाश प्रत्येक क्षणी वाढतो आणी प्रत्येक प्रकाशाची किरणं आपल्या सर्व दालनात शिरून आपलं सर्व प्रांगण आलौकीत करून टाकतं. तेव्हा जो पर्यंत आपण जिवंत आहोत तो पर्यंत हा आत्मा अधिक आणि अधिक आपल्या चित्ता मध्य प्रकाश ओढवतो. आयुष्याचा विचार मनुष्याने केला नाही पाहिजे. योग मिळाल्यावर जे आता आम्हाला आयुष्य मिळालेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. त्याचा एक एक क्षण महत्वाचं आहे प्रत्यक क्षणी आम्ही आपली वाढ करून देऊ शकतो. असं समजलं पाहिजे कि जसे बी ला अंकुर फुटतं आणि अंकुर फुटताना बी ला असं वाटतं कि आपलं आयुष्यं संपून गेलंय पण खरोखर त्याचं रूपांतर आता मुळांन मध्ये झालेलं आहे. योग्यांच्या आयुष्याचं महत्व हे आहे कि जेव्हा योग्यांना मरणं येतं तेव्हा त्यांचे अंकुर गौरवांचे अंकुर पृथिवीच्या बाहेर निघतात आणि झाडं कीर्ती रूपानं झळकू लागतं. म्हणजे देह त्याग झाल्या नंतर मनुष्य कीर्ती रूप उरतो तेव्हा योगानंतर जे आयुष्यं आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण आता संतांची किती लक्षणं सांगावी. ज्ञानेश्वरांना आपल्या हयातीत लोकांनी किती त्रास दिला, हा काय तरीच इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतो असं सुद्धा लोकं त्यांना  म्हणाले. कबीरांना किती लोकांनी त्रास दिला. नानकांना किती त्रास झाला. तुकारामांना लोकांनी कधींच मान्य केलं नाही, नामदेवांना सुद्धा लोकांनी सांगितलं हे काही विशेष नाहीत. सगळ्यांनी त्रास सोसला. इथून तिथून सगळ्यांना त्रास झाला. शेवटी शिर्डीच्या साईनाथांना सुद्धा फार लोकांनी त्रास दिला. पण ते दिगंबर झाल्यावर, खरोखरच ते स्वर्गवासी झाले. म्हणजे असं कि त्यांच्या बद्ल जे काही लोकं मूर्खां सारखं बोलतं होते, ज्या ज्या लोकांनी त्यांना त्रास दिला आणि छळलं होतं. ते कुठल्या कुठं विरून गेले आणि ते कीर्ती रूपानं ह्या संसारात आज पर्यंत हजारो वर्षां नंतर सुद्धा आज पर्यतं ते सगळ्यांच्या हृदयात आहेत. हे योग्यांचे लक्षणं आहे. तेव्हा जरी आयुष्यं कमी होत गेलं तरी ते सूक्ष्म रूपांत भरत आहे हे लक्ष्यात घेतलं पाहिजे.मी आपल्याला एकदा सांगितलं होतं की मी काश्मीरला गेले होते. तर जवळ जवळ पाच दहा मैलांच्या अंतरावरचं  मला विब्रेशन्स आले आणि त्या रस्त्यांनी आम्ही जेव्हा पुढे गेलो आणि लोकांनी विचारलं कि इथं काही देऊळ आहे का? तर त्यांनी सांगितलं कि इथे देऊळ बिऊळ काही नाही, इथे सगळे मुसलमान राहतात. त्या मुसलमानांना विचारलं कि इथे काही मस्जिद आहे का? तर त्यांनी सांगितलं कि हजरत बल आहेत तिथं. म्हटलं काय ते? एक केस मोहमद साहेबांचं तिथं होता. तो आम्ही इतक्या दूर दहा मैलांवर त्याचे विब्रेशन्स धरले. एक केस, कदाचित तो त्यांच्या डोक्यात असेल तेव्हा इतके विब्रेशन्स असतील निघत. जितके तो एक सुटून त्या पृथ्वी तत्वात मिसळा आणि आपल्याला माहिती आहे कि योग्यांना आपण समाधिस्त करतो. म्हणजे त्यांच्या वर कबरी बांधल्या जातात. सामान्य माणसांवर कबरी नाही बांधल्या जात कारण अश्या योग्यांच्या शरीराचे जे सुगंध आहेत ते पृथ्वी तत्वाला मिळतात आणि ज्या पृथ्वीत अशे मोठे मोठे योगी पुरले गेले त्या सर्व पृथ्वी मध्ये, त्या सर्व पृथ्वीच्या वातावरणा मध्ये एक आत्मिक बलाची, आत्मिक आनंदाची एक शेती होते. त्या जमीनीला एक सुगंध असतो. त्या वातावरणा मध्ये मनुष्य आत्मिक होतो. आज जे आपण महाराष्ट्रात एवढी पुण्याई मिळवलेली आहे. सहज योग जो इतका पसरला आहे त्यासाठी सर्व संत साधूंचे आपण उपकार मानले पाहिजेत ज्यांनी इथं देह त्याग केला. आणि अजून सुद्धा ते कीर्ती रूपानं ते वावरत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने हे कार्य झालेलं आहे. तसंच सहज योग्यांनी आपल्या आयुष्याकडे पाहिलं पाहिजे कि आता आमचं आयुष्य जरी कमी होत असेल दिसलं तरी आमचं आत्मिक आयुष्य हे वाढत आहे आणि आत्मिक आयुष्याचा प्रकाश हा, हे आयुष्यं संपल्यावर अत्यंत प्रखर असतो आणि त्याच्या परिणाम फार मोठा होतो. आपण आज माझा वाढदिवस करत आहेत आणि अजून पुष्कळ कार्य राहिलेलं आहे. तेव्हा तुमच्या इच्छे प्रमाणे आणखी पुष्कळ वाढदिवस येवोत आणि तुम्ही अशेच अनेकदा आनंदित वाः आणि ह्या प्रकाशाला एक मशाली सारखं तुम्ही आपल्या हृदयात बाळगून सर्व जगाला प्रकाशित करा.